Monday, 11 July 2022

सोपे की अवघड ( mulanshi gappa )

मुलांशी गप्पा भाग - 1
सोपे व अवघड प्रश्न

आज शाळेतल्या मुलांना काही प्रश्न विचारल्यावर बहुतांश मुलांनी उत्तरे दिली. त्यात अर्धे बरोबर होते तर अर्धे चुकलेले होते. मुलांना यावर एक संशोधनात्मक प्रश्न विचारलं की, काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर दिलात ते कसे काय ? सर्व मुलांनी एका सुरात उत्तरं दिली, ' सर, ते सोपे प्रश्न होते.' त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलं की, काही प्रश्नांचे उत्तर चुकले ते कसे काय ?यावर मुलं म्हणाली, ' सर, ते अवघड प्रश्न होते. ' यावर मी मुलांना बोलते करण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, प्रश्न सोपे आहे की अवघड कश्यावरून ठरवता ? त्यावर वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलीने उत्तर दिलं की, ' ज्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला माहीत असते ते सोपे आणि जे माहीत नसते ते अवघड.' तिच्या उत्तरावर तिला शाबासकी देऊन तिलाच प्रतिप्रश्न विचारलं की, ' काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहित होते आणि काही माहीत नव्हते, याचा अर्थ काय ? ' त्यावर ती मुलगी म्हणाली, ' ज्या प्रश्नांचे आम्ही उत्तर दिलोय ते प्रश्न आम्हांला कधी ना कधी विचारले जायचे त्यामुळे ते पाठ झाले किंवा माहीत झाले. ' तिची जिज्ञासा जाणून घेण्यासाठी पुढचा प्रश्न विचारलं की, ज्या प्रश्नांचे उत्तर माहीत नाही ते कसे मिळवाल ? यावर ती जरा विचारात पडली. काय उत्तर सांगावं याचा ती विचार करू लागली. पूर्ण विचार करून ती म्हणाली, ' सर, वाचन करावे लागते.' यावर मी म्हणालो, अगदी बरोबर, आपणाला जास्तीची माहिती मिळविण्यासाठी वाचन करावे लागते. वेगवेगळी पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्र वाचावे लागतात. त्यामुळे आपणाला खूप काही माहिती मिळते. शाळेत जे काही ज्ञान मिळते त्याही पलीकडचे ज्ञान मिळवायचे असेल तर अवांतर वाचन करत राहावे लागते.
 तसेच सर्व प्रश्न सारखेच असतात, ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत असतात ते सोपे वाटतात तर ज्या प्रश्नांचे उत्तर आपणाला माहीत नसतात ते अवघड वाटतात. सर्वच प्रश्न सोपे वाटावे असे जर वाटत असेल तर खूप वाचन करावे आणि आपल्या डोक्यात खूप माहिती साठवून ठेवावी. ही क्रिया एका तासात, एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होणारी नाही. त्यासाठी अविरत आणि निरंतर वाचन करणे आणि आपल्या माहितीमध्ये वाढ करत राहणे आवश्यक आहे. मनुष्य हा आजीवन विद्यार्थी आहे असे का म्हणतात ? तर ते यामुळेच. तेव्हा मुलांनो ज्ञान समृद्धी मिळविण्यासाठी काय कराल ? यावर मुलांनी जल्लोषात उत्तर दिलं ' वाचन ' आजपर्यंत जी व्यक्ती जीवनात आपले नाव कमावले आहे ते फक्त वाचन केल्यामुळे. तेव्हा भरपूर वाचन करून आपण ही समृद्ध होऊ या ....!  

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

पूर्ण लेख वाचन केल्याबद्दल धन्यवाद .....! 

आपल्या प्रतिक्रिया व्हाट्सअप्प द्वारे जरूर कळवावे. 

मतदान जनजागृती ( Voting Awarness )

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जनजागृती चला मतदान करू लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.  चला मतदान करू .......! ...