11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक कविता
।। लोकसंख्या ।।
अश्मयुगीन काळातील
लोकं गुहेत राहत होती
कंदमुळे फळे खाऊन
जीवन जगत होती
लागला अग्नीचा शोध
मग चाक लागले पळू
आदिमानव स्थिर जीवन
जगण्याकडे लागले वळू
पाण्याच्या जवळ राहून
ते शेती करू लागले
पाहता पाहता मानवांचे
राहणीमान बदलून गेले
लोकं वाढू लागली तशी
अनेक प्रश्न झाली निर्माण
अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी
निसर्गाचे झाले निर्वाण
बघा कशी जगाची
समस्या ही वाढली
जंगले साफ करून
लोकांनी घरे बांधली
येणारा भविष्यकाळ पहा
सर्वांसाठी असेल अवघड
आपलीच माणसं होऊ नये
आपल्यासाठी अवजड
लोकसंख्या वाढली जशी
झाला पर्यावरणाचा ऱ्हास
खायला मिळेना अन्नपाणी
जगण्याचा होऊ लागला त्रास
सरकारने केला कायदा
हम दो हमारे दो
लोकसंख्या आवरण्यासाठी
प्रत्येकानी मंत्र जपा हो
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड
9423625769