ताजा है . . . . .
गरम है . . . . . .
बढ़िया है . . . . . .
नगरच्या आठवणी घेऊन
लवकरच येत आहोत . . . . .
प्रतीक्षा असावी . . . . 👀
=========********============
=========********============
|| आठवणी अहमद नगरच्या ||
●●●●●●●●●●●●●●●●●
एक अवलिया शब्दवेडा
व्हाट्सअप ग्रुप काढता झाला
न थांबला इथेच मात्र
एक एक कवी वेचता झाला..!!
नामी शक्कल त्याच्या मस्तकी
वापर तयांचा करता झाला..
ठेविल्या स्पर्धा नाना विविध
लेखणीत बळ भरता झाला..!!
उत्साहीत सारे नव कवी
उधाण तयांना देता झाला..
संग्रह काढू चारोळ्यांचा
प्रस्ताव असा मांडता झाला..!!
न बोलले नुसते खरे केले
शिव धनुष्य लीलया पेलता झाला..
साथ मित्रांची मोलाची त्याला
दिन रात उत्साही राबता झाला..!!
भरले स्वप्न डोळ्यात सर्वांच्या
सुख स्वप्न असे साकारता झाला..
एक एक मोती नीवडत वेचत
लडी सुरेख आकारता झाला..!!
शिल्पकार तोच सोहळ्याचा
आनंद मेळा भरवता झाला..
एक एक मित्र आला भेटीला
प्रेम आनंद भरता झाला..!!
रंगला सोहळा प्रकाशनाचा
साहत्य इतिहास घडविता झाला..
न भूतो भविष्याती अशी
भेट आम्हांस देता झाला..!!
🙏 धन्यवाद अरविंदजी आणि सहकारी
*****सुनिल पवार......
=========********============
#आठवणी अहमदनगरच्या#
"उठीउठी गोपाळा"अशी भुपाळी कानी यावी अश्या अमृतवेळेस मला थंडीची दुलई पांघरून नगरच्या जुन्या बसस्टॉपवर ट्रॅव्हलने सोडले.
अंधाराचं साम्राज्य अजून होतं म्हणून तिथेच थांबलॆ.उगीच त्रास नको म्हणून आत्याला कळविले नाही.तेवढ्यात साहीत्य यात्रेचे बांधव दिलीपजी....वारंगकरजी....संदीपजी....नासाजी भेटले.शतजन्मीची ओळख असल्याप्रमाने सगळे एकमेकांना प्रेमाने विचारपूस करीत होते.
नंतर साधारण साडेबाराला हसतमुखाने सगळे पटवर्धन हॉलला भेटलो.अरविंदकाका....जाधवकाका यांचा चरणस्पर्श सुखावून गेला.साग्रसंगित असं नियोजन बघून काकांच्या आयोजनाला मनोमन सलाम ठोकला🙏🏼 तेवढ्यात सोवनीजिंनी माझ्याकडून स्वागतगीत चाचपडून घेतले😀
काकांच्या आदेशानुसार पार्वती कॉर्नरला लंचचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचलो.जामूनके साथ दिलीपजी फोटो खिंच रहे थे.तेवढ्यात मुंबई च्या मैत्रिणी पोहोचल्या.कडकडून भेटी झाल्या.....त्यांचा बॉंबे टू नगर प्रवास फूल टू धमाल झालेला त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
अगदी थोड्या गॅपमधे मी एक चोरटी धाव घेतली.पटकन रेडीओसिटीवर जावून आर जे प्रभूला भेटूव आले.स्मरणीय भेट ठरली.लागलीच हॉलकडे मोर्चा वळविला.साहीत्य यात्रेचे बरेच मानकरी जमले होते.वृषालीताई....माधवसक....जाधवकाकी विचारपीठावर स्थानापन्न झाले.शिल्पाताईंनी सुत्र हाती घेतलॆ.पुजन आटोपले.गळा नसून मी स्वागतगीत म्हटले अन आपण गो़ड मानून घेतले.नंतर पाहुण्यांचे स्वागत झाले.संगितीाईंनी अलंकारीक भाषेत व सुहास्यवदने मान्यवरांचा परीचय करून दिला.
वृृषाली ताईंचा सुसंवाद जिव लावून गेला.माधवसरांचा 'तो चंद्रमा'गतकाळात घेवून गेला.जाधवकाकांनी रजा घेतली ती जिवनगौरव पुरस्कार स्विकारून.कृतार्थ वाटलॆ.
नंतर नासा सरांनी माईकचा ताबा घेतला व दोन चार षटकार मारले.प्रत्येक कविची ओळख व सादरीकरण झालॆ.सर्वजण फोटो...शूट घेण्यात मग्न होते.हो....देवणीकरांना सर्व😌मीस करत होते.
तेवढ्यात माझ्या आग्रहाखातर गृपचे फोटो घेतलॆ.सोबतच गारव्याची तोड चहा आली.लागलीच संगित रजनी सुरू झाली.नंदकुमारजींनी ऐसी लागी लगन या भजनाने जोरदार सुरूवात केली.मी निवेदनाद्वारे थोडा हातभार लावला.भजन .....गझल...
.शिटीवरील गाणं.....असं संगितमय वातावरण झालं.मी एक फर्मा्ईश केली व त्यानुसार अजीज नाजाची फर्मास कव्वाली झाली.
जागृतीताईही उत्तम गायल्या.
हळूहऴू समारोपाची वेळ आली.शेवटी नासा सरांनी व दोन्ही ताईंनी छान पसायदान म्हटले व आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.एकमेकांना पुस्तके भेट देवून भरून पावलो.स्नेहालयला थो़डीफार मदत झाली.जाताजाता काकांनी पुढील सूत्र नासा सरांकडे सोपविली. कुलकर्णी परीवाराचा छोटेखानी सत्कार झाला.आणि ज़ड अंतःतरणाने निरोप घेतला तो पुन्हा भेटण्यासाठी.
दुसरया दिवशी मी अरविंद काकांकडे जावून कृतज्ञता व्यक्त केली.आत्याबाईचा साडीचोळीचा आहेर पदरात घेतला व गो़ड मिष्टांनासह गोड आठवणी उराशी बाळगून नगरचा निरोप घेतला.
"निरोपाचे बोलतांना
हास्य थोडे देवून जावे
जाताजाता मात्र दुःख
त्यांचे घेवून जावे"...
पुन्हा भेटू लवकरच🙋🏻
- सौ. जयश्री पाटील वसमत
=========********============
*अहमदनगरच्या आठवणी*
तसं म्हणाल तर या स्पर्धेमध्ये लिहिणं मला जमणारच नाही...कारण मी या कार्यक्रमाला हजरच नव्हतो..पण प्रत्येक तासाच्या updates ग्रुप वर येतच होत्या...कोण कधी आले,कधी
गेले,कधी पोहचले व काय बोलले,या सर्वांची माहितीफोटो व व्हिडियो ने कळतच होतीे...मी या ग्रुप मध्ये तसा ऊशीराच आलो...या कार्यक्रमाबद्दलही जास्त काही माहित नव्हते...आणि जेव्हा पुर्ण कळाले,तेव्हा थोडासा ऊशीर झाला होता...याबद्दल दिलगीरी तर व्यक्त होतच आहे....!
काही घरगुती कार्यक्रमांत अडकुन असल्याने पोस्ट पण वेळचेवर वाचता येत नव्हत्या...पण वेळेतला वेळ काढुन उत्सुकतेपोटी वाचन होतच होत...मी नंतर सर्व पोस्ट,फोटो,लेखन,व्हिडिओ पाहिल्या आणि खुप miss केला हा कार्यक्रम...
कधी न भेटलेल्या अनोळखी व्यक्ती...पण नातं...???"सख्ख्या भाऊ-बहिणिंसारखच"...या संदर्भातलाही प्रसंग ऐकावयास मिळाला...रामराव जाधव सर जी यांनी लिहिलेली आठवण ही वाचली आत्ताच...अभिमान ही वाटला😇काहीजणांना कायम वाटत असते,हे सोशल मेसेजींग वर नुसता गप्पा टप्पा व बोलणी वा नुसता बोलबच्चन टाईप होतात...पण ईथ याला अपवाद आहे....याच बोलबच्चन नेटवर्कींग चा वापर लोकांना खरोखर बोलता करण्यासाठी झाला...!नुसता online होणारे contacts गाठी-भेटीत झाले...chatting चंही गप्पागोष्टींत व चर्चेत रुपांतर झाल...मी यातला थोडाला भाग नाही अनुभवु शकलो,पण आहे त्यात समाधानीही झालोय😊तसपण लहान असल्याने घरच्यांनीपण नसतं सोडलं ईतक्या लांब,पण घरात बसुनच या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला...मनापासुन धन्यवाद
मी लिहिलेल्या या ओळी स्पर्धेच्या विषयाला अनुसरुन नसतीलही,कारण मी तीथे हजर नव्हतो...पण हा कार्यक्रम माझ्या देखतच झालाय अस मात्र वाटत आहे... या सर्व आठवणींच्या पुस्तकातील एक पान बनवल्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो...आणि हा कार्यक्रम पार पाडताना लहानस्या खारुताईच्या वाट्याप्रमाणे वाटा असणार्यांपासुन सर्वांनाच heartly congratulations💐✌🏻
You all made it real😊
:-निलेश सुरेश आळंदे.
गडहिंग्लज.(कोल्हापुर)
=========********============
पान क्रमांक 01
पान क्रमांक 02
पान क्रमांक 03
=========********============
नगर ला जाऊ असे मी मनात
ठरवून निघालो. पहाटेच्या २ वा.पासून जागाच होतो.बुलडाणा ते नगर अंतर खूप दूर किमान
२५० ते ३०० किमी मनाची तयारी केव्हाचीच झाली होती. कडाक्याची थंडी मी म्हणत होती. घर ते एस टी स्टॅड अंतर खूप सोबत एक
दिवस पुरेल एवढे सामान. निघालो एकदाचा पहाटेचे ५ वाजले असतील बायकोचे
मन थोड़े थोड़े होत होते.परत
लवकर निघण्याच्या अटीवर
तिला निरोप दिला रस्त्याने
पायही गारठून गेले होते बस
५.३० ची होती मी
पोहोचलो तेव्हा १० मी उशीर झाला होता....!
अरे देवा माझ्या जीवाची घालमेल सुरु झाली होती.
धावतच चौकशी खिड़की
गाठली तर......! बस आलेली
आहे फलाटावर बघा लगेच फलाट गाठला तर बस निमुटपणे माझीच वाट पहात
उभी...! तड़क सिटवर जावून
बसलो थंडितही गर्दी कमी
नव्हती. एकदाचा प्रवास सुरु
झाला.
आनंद गगनात मावत नव्हता
"भेटी लागी जीवा....
लागलिसे आस।"
गीत ओठावर तरळत होते.
सोहळा कसा असेल यापेक्षा
माझे मित्र भाऊ भगिनी कशा
असतील असे अनेक प्रश्न मनात तरळत होते.
खिड़कीतून थंडीची लाट मध्येच डोकावत अंगावर शहारे आणत होती.डोक्यात
उत्सुकतेचे वारे घोंगावत होते.
एकूणच प्रवास कुड़कुडत सुरु झाला होता.
पण आनंद गगनात मावत
नव्हता ज्याला कधीही बघितले नाही केवळ आंतरजाला द्वारे मुक्या-मुक्या
बोलणे तर वारंवार झाले होते.
आता प्रत्यक्ष भेटीची वेळ
जवळ जवळ काही तासांवर
येवून ठेपलि होती.
कार्यक्रमाला जायचेच
म्हणून कित्येकदा दचकुन
बेरात्रि जाग आली होती.
आज मात्र रात्री दोन वाजता
पासून झोपच येइना.अचानक
थंडीने कधी डोळा लागायचा.
कधीतरी एकदाचे ११ वाजून गेले.नेवासा फाटा आला कंडक्टर ओरडला
गाडी १५ मि.थांबेल चहा
नास्ता उरकुन घ्या.आता
काही मिनिटाचा वेळ उरला
होता.ठरल्या प्रमाणे पत्ता
विचारण्या साठी अरविंद
काकांना फोन लावला लगेच
उत्तर आले "पाईप लाइनला
उतरा." जीव एकदाचा भांड्यात पडला.
पोहोचलो बुवा एकदाचे.
ठिकाण काही क्षणावर येवून
ठेपले.रिक्शा पकडून रावसाहेब पटवर्धन सभागृह
गाठले कुळकर्णी काका ,वारणकरजि,धामणे वाटच बघत होते काही वेळात रामराव काका आले.एक एक जण
प्रवेश करीत होता आपला
परिचय देत व् घेत होता.
पोटात भूकेचा डोंब उसळला
होता.अरविंद काकांनी पासेस
दिल्या मंदार,मी,वारणकरजि,
धामणेजी जेवणास पार्वती
जेवणावळ गाठली.एकेक
प्रसंग डोक्यात झेरॉक्स काढावि तसा कॉपी होत होता.अखेर मनसोक्त जेवण
आटोपले.
कार्यक्रम स्थळी गर्दी
वाढतच होती.सर्वांचे चेहरे
अगदी उत्सुकतेने ताणले
गेले होते.मला माझा मित्र
सुनील पवारला भेटण्याची
आस लागली होती.पण ते
कुठेतरी भेटीला गेल्याचे
कळले. असो आता कार्यक्रम
सुरु झाला अध्यक्ष म्हणून
माधवराव व प्रमुख पाहुण्या
वृषाली जी अगदी दोन्ही
देखणे व्यक्तिमत्व आपापल्या
क्षेत्रात गाजलेली.
होती.
कार्यक्रमात प्रस्ताविक
अरविंद काकांनी सुरु केले
अन् कॅमेरे सरसावाले फोटो
वर फोटो उडू लागले. प्रत्येक
जण आपले मनोगत व्यक्त करीत होता
कार्यक्रम सुरु असतांना ओळखींची देवाण घेवाण ही
सुरुच होती.कोण कसा दिसतोय ? याकडे सर्व मंडळी डोळे किलकिले करुन
बघायची मी सुद्धा ओळख
देत होतो.माझ्या बाबतीत
मात्र अनेकांनी गाटांगळी
खाल्ली होती.माझा fb व
व्हाट्सअप वरचा फोटोने
घोर केला होता.या बाबिने
का होईना हास्याचे फवारे
उडतच होते.सर्वांचे चेहरे
आनंदाने ओसांडून वाहत
होते.
एक एक करुन भाषणे
संपत्त आली होती.शेवटी
दूसरे सत्र सुरु झाले.
सोवनी सर गायला
लागले "ऐसी लागि लगन....!"
टाळ्यांचा कडकडात सुरु
झाला....सा नि ध प म ग रे सा........आ...आ..आ...
संगीत सुरांची मैफल सजलि.
एक एक करीत कार्यक्रमाचि
सांगता झाली.
डोळे घराकडे लागले होते.
पण कुणाचाही पाय सभागृहातून बाहेर पडण्यास
तयार नव्हता शेवटी फोटो
सेशन झाले व् जड़ अंत:करणाने काढता पाय
"आठवणीची झोळी" भरुन
घेवून काढता पाय घेतला.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👏🏼👏🏼👏🏼👏🏼😜😔😔
माझ्या जीवनात एक मजेशीर गोष्ट घडत आहे...
माझी आई मला सांगते की , तुझे नाव घुगऱ्या घालून ठेवले आहे...
ते आप्पा
आप्पासाहेब....
पण मला माझ्या या नावाचा गर्व आणि अभिमान वाटतो...
तो पुढील प्रसंग असा....
माझा मुलगा English Mediam मध्ये इयत्ता 1 ली मध्ये शिकतोय...
आणि मला बूुधवारी हाफ डे असतो
मी त्या दिवशी असाच माझ्या लाडाच्या ""अथर्व""ला शाळेत आणायला गेलो..
आणि माझा अथर्व मला पाहिले की माझ्याकडे पळत आला...
आणि मला म्हणाला की ...
आज ते ...ss न ......ते.... सपाटे सर ,,,,,,,,,म्हणत होते..होते...की...
सुरवसे सर म्हणजे साहित्य मंथन
म्हणजे
📚📚साहित्य मंथन....📚📚
कारण मला त्यावेळी काहीच सुचेना ...मन भरून आले..तसाच मी आलेला आवंढा गिळला...
मनोमन धन्य झालो असे वाटले...
साहित्यमंथन नी माझी ओळख आणि अस्तित्व नव निर्माण केले आहे.... ...
साहित्य मंथन आणि ना सा ग्रुप हे फक्त माझ्या साठीच एकाच नाण्याच्या दोन बाजु वाटतात...
अगदी खणखणीत नाणे.....!!!
आणि हाच माझा... ***अथर्व ****
ना सा ग्रुप वरील सकाळचे
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन नित्यनियमाने ऐकतो हे मला तरी न उलघडलेले कोडे आहे....
धन्यवाद ...
साहित्य मंथन
मला एक नवी ओळख आणि अस्तित्व प्राप्त करून दिल्याबद्दल...
- अप्पासाहेब सुरवसे, लाखनगाव
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💐💐💐💐💐💐💐💐
।।ग्रुप संकल्प।।
हा ग्रुप करेल,
आणखी घट्ट विण नात्यांची।।
हा ग्रुप धरेल,
कास नव्या विचारांची ।।
हा ग्रुप देईल संधी,
प्रेमानं आनंद वाटण्याची ।।
हा ग्रुप देईल ताकद,
दुखः विसरून जाण्याची ।।
हा ग्रुप देईल शक्ती,
एकमेका आधाराची ।।
हा ग्रुप नेहमीच करेल,
बात लाखमोलाची ।।
हा ग्रुप घेईल प्रतिज्ञा,
खदखदून हसवयाची ।।
हा ग्रुप दाखवेल नवी दिशा,
आयुष्य उपभोगणयाची ।।
हा ग्रुप राहो कायम चिरतरूण...
घ्या नव वर्षा च्या शुभेच्छा भरभरून..
====================================
🎯🎯साहित्यमंथन 🎯🎯 आयोजित भाग ======36
---------------------------------
अहमदनगरच्या आठवणी
---------------------------------
📚📚📚📚📚📚📚
साहित्य मंथनच्या आठवणी
काढता डोळ्यात येते पाणी
नवरंग प्रकाशनाच्या दिनी
मज गेले आजोबा सोडुनी
मज वाटे खूप हुरहुर
इकडे आड तिकडे विहीर
मनी केला पक्का निर्धार
जाई आजोळी आईच्या माहेर
सोबत सखा मा.तु.खुडे गुरु
पण मी मना कसे आवरु
मा.तु.मज धीर देत सावरी
असा हा योगायोग जिव्हारी
नवरंगचा रंगारंग सोहळा
लागी लगन सोवनींच्या गळा
मज घाली पुन्हा पुन्हा भुरळ
डोळ्यातूनी पाणी सहज तरळ
अमरावती ,वसमत , नांदेड
अहमदनगर, उस्मानाबाद की बीड
बुलढाणा की मग दादर, मुंबई
सोहळयाची चर्चा होई स्नेहालयी
सोशल मेडियाचा हा ग्रुप आदर्श
लोक होती उत्सुक घेण्या प्रवेश
नयनी साठवून दिव्य अप्रूप
सदस्य घेती एकमेकांचा निरोप
✏🎯🎯🎯✒
आप्पासाहेब सुरवसे सर
लाखनगांवकर
===========================
🌸साहित्य मंथन आयोजित 🌸
🌸भाग ==== 36🌸
विषय -
🌹अहमदनगरच्याआठवणी🌹
🌹प्रेषक --कुंदा पित्रे🌹
🍁स्पर्धेसाठी🍁
=====================
खरं म्हटलं तर मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर नव्हते तेव्हा प्रत्यक्ष पाहणं व फोटोज्,ऑडियोज्,अनुभवलेल्या क्षणांच लेखन हे सारं दृग्गोचर करणे यात जमीन अस्मानाचं अंतर आहे .तरी देखील वरील सारं व्हाॅटस् अप वरून पाहून खूपच फ्रेश व्हायला झालं! माझा सहभाग नव्हता याची रूखरूख लागली व मी मनाला समजावलं --फिर कभी !!
मग म्हणावस वाटले🍁🍁
आठव दृष्यांचा सजला झुला
परि नसे जरी मी तेथे
गोंजारले मन क्षणा क्षणाला
शब्दांगणी ,असे मी तिथे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
यह समा,यह आसमा
खींचकर बुला रहा था
लेकिन कठिन रक्तिमा
बंधनोमे उलझ रहा था
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
It was glorius show
wish shuld have
attended it
seeing the photographs now.
lost joy , I can not get it.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आणि मग मला मोत्यांच्या लडी दिसू लागल्या.
मागे मी लिहल्याप्रमाणे व्हाॅटस् अप वरील चारोळ्याचं नवरंग हे पुस्तक हे आपल्या मैत्रांगणाचे पहिलं अपत्य !! या पहिल्या अपत्याचे बारसं इतकं धुमधडाक्यात झालं की, साहित्यप्रेमीनी हजेरी लावली त्याला तोड नाही.कारण जयश्री पाटील वसमतहून भल्या पहाटे बसस्टाॅन्डवर काळोखात एकट्या सकाळ होण्याची वाट पहात थांबल्या खरं धाडस !!
दिलीपजी हिंगोलीहून,ना.सा.सर धर्माबादहून,वारणकरजी नांदेडहून एव्हढ्या लांबच्या पल्ल्याची माणसे थंडीत कुडकुडत रहायला हाॅटेल मिळते काय शोधत होती .कमाल झाली.
अनिल हिस्सल बुलढाण्याचे 300 कि.मी.अंतर काटून रात्रभर झोप नाही ,पहाटे बस घेऊन कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अहमदनगरला हजेरी लावली.प्रकृति साथ देत नसूनसुध्दा श्री.रामराव जाथव यानी हजेरी लावली !अरविंदजीनी त्यांचा जीवनगौरव करून यथोचित मान राखला. यातून एकच निष्कर्ष निघतो.अमाप साहित्य प्रेम व आपलं लेखन कोणीतरी वाचतयं हे मानसिक समाधान!! पण कुणीहि आठवण लिहताना नकारात्मक लिहले नाही. यावरून
अरविंदसरांच कुशल ऑर्गनाजेशन दिसून आले.एकदा समारंभ स्थळी पोहचल्यावर अभ्यागताना कोणती उणीव भासली नाही असे दिसले .कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन ,वेळेवर संपला हे जाणवले. गाण्याची मैफल चांगली रंगली असावी कारण त्याची ऑडियो ऐकायला मिळाली नाही.मलाही गाणं म्हणता आले असते.असो. शिल्पाताईचे सुत्रसंचालन मोजकेच नेमके असावे असे फोटोवरून जाणवले.अध्यक्षिय भाषणाची ऑडियो पाहिजे होती .अध्यक्ष वैशाली शिंदे काय बोलल्या कळले नाही. सुलभाताई कुलकर्णी यांची व्हिडियो फिल्म पुनःप्रत्याचा अनुभव देऊन गेली. प्रत्यक्ष ओळख नाही . तरी नांवे असल्याने फोटोवरून व्यक्ति कळल्या.पडद्यामगचे अरविंदजी दिसत होतेच.एकुण उपस्थितानी नवरंग चारोळी पुस्तक प्रकाशनाचा सोहळ्याचा आनंद मनी साठवला.
व्हाॅटस्अपमुळे जग किती जवळ आलेय हो!
नाहीतर जन्मात कधी कोल्हापूर,पुणे,नांदेड,औरंगाबाद,अहमदनगर,हिंगोली,धर्माबाद,
वसमत,रत्नागिरी येथील व्यक्तींचे लेखन कथी समजलेच नसते.
खरंच अरविंदजी तुम्ही साहित्यगंगेचा सुंदर प्रवाह निर्माण केलात असाच तो पुढे मोठा होऊ दे व छोटे लेखक मोठे होऊ देत .त्यात मी पण आलेच.
आता माझ्या नजरेसमोर आपल्या इतर साहित्य प्रकाशनाचा सोहळा तरंगतो आहे.
धन्यवाद
इथेच थांबते
============================
91 74989 64901:
विषयमंथन भाग: ३६
विषय: अहमदनगरच्या आठवण.
आतुरआत्मा आनंदतरंग
आसुसलेले अंतरमन
अहमदनगरची आस
असे मनी मानसी वसलेल्या आम्ही चौघी सुलभाताई, शिल्पाताई, वृषालीताई आणि मी .सोबतीला सुनिल पवार ही होते.थंडी गुलाबी, हवा ही शराबी असे धुंद वातावरण आणि ऊत्साहात निघालेले साहित्यिक, मग गप्पांचे काय? "आनंदाचे डोही आनंदतरंग "असे मस्त खेळीमेळीचे वैचारिक देवाण- घेवाणीचे सत्र आमच्या डौलाने निघालेल्या तव्हेरा गाडीत पार पडत होते.शिल्पा जुनी मैत्रिण , बाकी सगळ्या नव्या ओळखी( प्रत्यक्षातल्या), वॉट्स अँपच्या होत्याच.वृषाली माझ्यासारखीच हंसरी , खेळकर पट्कन आमच्यात मिसळली. माळशेज घाटातून जातांना१० मिनिटांची सुंदरशी सहल अनुभवली.शिल्पाचे सँडविचेस्, माझे पालक परोठे, लिंबू क्रश गोड लोणचे वर थर्मासमधून आणलेल्या गरमागरम चहाचा घोट, सोबतीला थंडगार हवा, वानरांच्या गोड हालचाली, हिरवेकंच डोंगर वाहवा! मस्त मज्जा! तृप्तीचा ढेकर देऊन निघालो.डौलदार वळणांमधून, डोंगरदर्या पार करत १.३० ला आमची तव्हेरा पोहचली. सर्वजण वाटेला डोळे लावून बसलेले.आम्हाला पाहतांच आनंदले.मग पार्वती कॉर्नरला भोजनासाठी गेलो.नंदकिशोरजी, अंजनाजी, कुलकर्णी सरांची मंडळी, अशी बरीच लेखक मंडळी भेटली.वाटलेच नाही त्यांना पहिल्यांदाच भेटतोय.फारच बरें वाटले.
माझ्या मामांकडे (श्री. विनायक ढेपे)जाऊन समारंभासाठी तयार झालो.चहा घेतला.२.३० ला कार्यक्रम सुरू झाला.
कवि माधव सावंत, वृषाली शिंदे, कुलकर्णीसरांनी दिप प्रज्वलन केले.शिल्पाताईंनी सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली.शारदेची पूजा सुरू असतांना स्वरचित शारदा स्तुती गायली.पाहुण्यांनी स्थानापन्न झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.श्रीफळ, मोमेंटो आणि शाल देऊन.यावेळी साहित्य - मंथनचे महामेरू श्री .रामराव जाधवकाकांचा जीवनगौरव करण्यात आला.तब्येत बरी नसतांनाही काका आम्हा सर्वांना आशिर्वाद द्यायला आले होते. हे त्याच्या मनाचे मोठेपण!
त्यानंतर नवरंग चारोळी संग्रहाचे प्रकाशन प्रतिलिपी .कॉमच्या मराठी विभाग प्रमुख वृषाली शिंदे आणि कवी माधव सावंतसर ह्यांच्या हस्ते पार पडले.अंजना भालसिंग यांनी खुमासदार शैलीत पाहुण्यांचा परिचय त्याच्यावरील कविता शब्दबद्ध करून गाऊनकरून दिला.कुलकर्णी सर, वृषालीताई यानी आपले मनोगत फारच सुंदर सादर केले.कवी माधव सावंतांनी मस्त कविता सादर केल्या ;जीवनातील जुन्या चंद्राची आठवण काढत, प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत.नंतर नवरंग मधे सहभागी झालेल्या प्रत्येक कवि, कवयित्रींनी आपापली ओळख, आपापल्या खुमासदार शैलीत करून दिली, आणि स्वरचित चारोळ्यांची बरसात प्रेक्षकांवर करून त्यांना नवरंगाच्या होळीत चिंब भिजविले.अनेक कँमेरे सरसावत होते, फोटो निघत होते.प्रत्येकाची शैली वेगवेगळी, पण भावना परिपूर्णतेनी भारलेली. ना.सा.सरांनी केलेली मदत दिसत होती.सत्र पहिले असे संपले.
चहापानाचा कार्यक्रम झाला.समस्त मंडळी पुनःश्चः ताजीतवानी झाली.३००/३५० मैलांचा प्रवास , रात्रभर जागरण, झोंबणारी थंडी सहन करून सारी लेखक मंडळी हजर होती.ऊत्साहाचा झरा खळाळत होता सगळ्यांमध्ये! नमन सगळ्यांमधील आंनदाच्या उधाणाला.हे श्रेय सगळ्यांना एकत्रित आणणार्या जादूगाराला श्री.अरविंद कुलकर्णी सरांना जाते.नमन सर तुम्हाला.
सत्र दुसरे
सूत्रसंचालनाचे कार्य शिल्पाताईंनी जयश्रीताईंच्या हातात सोपविली.
नंदकिशोरजींच्या गोड आवाजातील धुंद करणार्या गीतगायनाचा, विडंबनगीताचा आणि शीळवादनाचा हा कार्यक्रम ऐसी लागी लगन ह्या भजनाने सुरू झाला.आणि प्रेक्षकवर्ग तालासुरांच्या रंगात न्हाऊन गेले.
मी पण एक भावगीत आणि क्लासिकल सिनेगीत सादर केले.पुणे- मुंबई विदाऊट प्रँक्टिस गाणे होते.पण तबलजीची आणि नंदकिशोरजींच्या हारमोनियमनी गाण्यात मजा आणली. असे हे सत्र नंदकिशोरजींनी आपल्या गाण्याने समाप्त केले.
मनात , अंतरंगात नवरंग साठवून समस्त कविमंडळी परत नांदेडला कथासंग्रहाच्या निमित्ताने पुढच्या २५ डिसेंबरला भेट म्हणून.निरोप घेती झाली.
©जागृती निखारे.
============================
91 74989 64901:
कधीही न भेटलेल्या
सहवासात कविंच्या
गप्पागोष्टी फुललेल्या
नवरंगात भिजलेल्या
----------------------------
मनोगत मांडतांना
सहजस्फुर्त बोलतांना
चाचपले प्रेक्षकांना
आनंदभाव अर्पितांना
-------------------------------
गाण्याची पकड
मनाने घेतली
निरपेक्ष फुलपाकळी
अंतरंगी साठविली
------------------------------
चहा वाफाळलेला
घोटघोटांनी घेतलेला
अंतःकरणी साठविला
प्रेमानी अजमाविला
© जागृती निखारे
२५-१२-२०१५.
============================
91 98207 58823:
नवरंग प्रकाशनाचा क्षण
ऊजळला सरत्या वर्षी
न भेटलेल्या सुह्रुदाचा योग
जुळला, जुळली घट्ट मैत्री
अरविंदजी काका आणि
सहकार्यांनी घातला घाट
परगांवच्या पाहुण्यांचा तर
काय ऊडवला थाट
हजर नव्हते समारंभी जरी
साकारले चित्र सामोरी
सार्यांच्याच नजरा आनदी
अन हुहहूर दाटली ऊरी
कृतज्ञता अन सार्थकतेचे
दाटले होते नयनी पाणी
नवरंगी स्वभावाचे नवेनवे
जुळले धागे मृदु रेशमी
एक एक करके बढता रहा
जथ्था लिखनेवालोका
नवे संकल्प ,नवी स्वप्न मनी
निर्धार नवनिर्मीतीचा
ऊगवत्या सुर्याच्या साक्षीने
नवे स्वप्न साकारायचे
प्रत्येकाने झटून एकजुटीने
साहित्य मंथन ऊंचवायचे
अंजना कर्णिक
============================