जागतिक कविता दिवस
।। कविता ।।
शब्द हेच धन शब्द हेच मन
शब्दामुळेच जिवंत आहे तन
कवितेतील शब्द बोलाविते मला
कवितेतील शब्द जागविते मला
कवितेमध्येच गुंतला माझा प्राण
कवितेनेच दिलाय मान सन्मान
कविता आहे म्हणून मी आहे
कवितेसाठी माझा जन्म आहे
कवितेमुळे माझी ओळख झाली
याच कवितेने मला प्रसिद्धी दिली
कवितेने मला नेले सातासमुद्रापार
कवितेनेच वाढविला माझा परिवार
- नासा येवतीकर
।। कविता ।।
शब्दांमागून शब्द आले
मनात आले लिहीत गेलो
अनुभवाचे काही विचार
काव्यामधून व्यक्त केलो
कमी शब्दांत जास्त विचार
कवितेतून होतो साकार
आपल्या मनातील भावनांना
कवी कवितेतून देतो आकार
शब्द हेच त्यांचे धन
शब्द हीच त्यांची संपत्ती
शब्दांचे भाव जोडले की
होते नव्या कवितेची उत्पत्ती
कविता वाचायला सोपी पण
समजायला अवघड असते
शब्दांमधून उतरलेल्या भावना
कवींचे हळवे मन सांगते
- नासा येवतीकर, 9423625769
।। कविता ।।
कविता कशी करावी ?
साधी करावी, सोपी करावी
दुसऱ्यांना समजेल अन
उमजेल अशी करावी
कविता कोठे करावी ?
घरात करावी, बाहेर करावी
ज्याठिकाणी सुचत असेल
त्याठिकाणी लगेच करावी
कविता कोणावर करावी ?
आई वर करावी
बायको वर करावी
जीवापाड प्रेम करणाऱ्या
जुन्या प्रेयसीवर करावी
कविता का करावी ?
मन समाधानासाठी करावी
कुणाचे तरी दुःख दूर
सारण्यासाठी करावी
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
No comments:
Post a Comment