Sunday, 6 March 2016


================ निकाल ================

साहित्य मंथन whatsapp ग्रूप आयोजित विचार मंथन स्पर्धा
विषय : जागतिक महिला दिन
संयोजन व परीक्षण : सौ. प्रिया वैद्य, बोस्टन, अमेरिका
============================
( 1 ) जागतिक महिला दिन.
जागतिक महिला दिन हा भारतातच काय संपूर्ण जगात अतिशय उत्साहात,धुमडक्यात साजरा करण्यात येईल ,यात काही शंका नाही.  जर महिला दिनी एकाच व्यासपीठावर सुषमा स्वराज आणि सोनिया गांधी किंवा मग ममता -जयललिता-मायावती-रबडीदेवी ,सुप्रिया सुळे यांनी  बोलायला सुरुवात करतील तर सगळ्याच परस्परांच्या मनातील खंत ,गोष्टी बोलून दाखवतील कारण आज  एकविसाव्या विज्ञानवादी युगात ही भारत हा पुरुषप्रधान देश होता आणि आजही आहे.त्याला राजकीय पक्ष तरी कसे अपवाद राहतील.कारण सत्ता ही दिवस -रात्री प्रमाणे बदलत असते परंतु हेच कालचे विरोधक आजचे सत्ताधीश आणि आजचे सत्ताधीश हे उद्याचे विरोधक असणार हे नक्कीच  जरी खरे असले स्त्रियां विषयीची मानसिकता बदलताना दिसुन येत नाही. म्हणून जनता जनार्धन तव्यावरील भाकरी पलटतात, ते ही खायच्या नागेलींच्या पानाप्रमाणे....., परंतु आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कुठेही कमी नाही.ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी काकण भर जास्त पण कमी नाही ,पुरुषांच्या पेक्षा कौशल्याधिष्टित सहजतेने काम करताना दिसून येतायत.
         आज महिला सबलीकरणासाठी "स्त्री संघटन" होणे नितांत गरजेचे आहे. अबला ह्या सबलाच झाल्याच पाहिजेत हे ही तितकेच खरे .आज मित्तीला सर्व पुरुषी अहंकारी वृत्तीने वागण्यााचे आपल्या घरातून सुरुवात करून सोडून दिले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने  भारत एक जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकू शकेल.आज प्रत्येक घरात अशी एक विचारधारा बनत चालली आहे की ,ज्याप्रामाणे छत्रपतीे शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्यांच्या घरात तशीच अवस्था आज मुलींच्या बाबतीत दिसून येते आज म्हणून तर सरकारला सुकन्या ,सावित्रीबाई, कु.स्वाती इ.सारख्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागते. त्यापेक्षा भयावह परिस्थिति आज मुला-मुलींच्या जन्मदराचे प्रमाण व्यस्त दिसुन येते आहे. त्याही पेक्षा आजची  स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची कर्दनकाळ म्हणून घरातच वावरतेय. प्रत्येक  जन म्हणतोय की, आई पाहिजे,बहिण पाहिजे,पत्नी पाहिजे,मग मुलगी ,बेटी का  नको ? मग घोडे कुठे आडत आहे.  आज मित्तिला प्रत्येक जन सोशल मेडियावर चर्चा करताना "बेटी बचाव -बेटी पढाव"  नारा जोरात लगावताना दिसतोय पण विचार आणि प्रत्यक्ष कृतीचा अवमेळ दिसतो आहे. ज्यांना पहिले अपत्य मूलगी आहेत तेच पांढरपेशी लोक मुलींच्या जन्माचे कंस, रावण, राक्षसी प्रवृत्ती,नव्हे तर साक्षात कुप्रसिध्द डॉ.सरस्वती -सुदाम मुंडेच्या रूपाने डोके वर काढतात.
       आज ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना एकाही स्त्री शेतकरी महीलेने आत्महत्या केलेली आढळून येत नाही. शिवाय सर्वात जास्त दुष्काळाशी दोन हात हे त्या घरातील स्त्रियाला करावे लागतात.पण तीला ह्या असल्या "महिला दिनाचे " ना सोयर ना सूतक ..! तिला बस राब राब राबावे लागतेय. आज स्त्री शिकुन प्रत्येक क्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करताना कशाची तमा न बाळगता ती निश्चित यशस्वी वाटचाल करत आहे.याउलट राजकारणात तर सरपंच पतीच  गावचा कारभार हाकतात,सरपंच बाई ह्या नामधारी नावालाच, केवळ फक्त झेंड्याची दोरी धरण्यापुरत्या आणि  फोटो सेशन पुरत्याच्...त्याचप्रमाणे शहरी भागात ही नगरसेविकांचे मिस्टर त्याहुन  निराळे नाहीत.ते ही स्वः त नगरसेवक, नगराध्यक्षाच्या तोऱ्यात वावरात.एवढेच काय तर मध्यतंरी अशी ही बातमी वाचनात आली की,एका जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पती हे संबधित जिल्ह्याचा कारभार अक्षरक्ष:शिक्षणा धिकारी दालनात बसून  पवित्र शिक्षणाचा गाढा हाकत आहेत..हा कोणता कळस म्हणायचा...,विकासाचा..,की अधोगतीचा.... निर्लज्जेतेचा...का पुरुषप्रधान मानसिकतेचा...
कमीत कमी उच्च शिक्षित शिकलेल्या- सवरलेल्या महिलांनी तरी स्वः ता पासून सुरुवात करावी .आणि स्वः ताला कमी समजण्याची रूढ़ ,प्रथा,परंपरा,नव्हे तर स्पर्धा मोडीत काढावी..
       आज एकंदरीत विचार करता स्त्रियां ह्या 50%टक्के आहेत आणि प्रमाण 33%आरक्षण मागत आहेत. पण ते ही मिळत नाही याला जबाबदार कोण ? तर एकूणच उदासीनताच नव्हे काय...?
ज्याप्रमाणे खासदार आमदार हे सर्व मिळून त्यांच्या निधी ,पेंशन किंवा ततसंबंधी  एकमुखाने बिनविरोध निर्णय घेतात.त्याच प्रमाणे कट्टर राजकीय महिला एकत्र येऊन स्त्री जातीच्या प्रगतीसाठी,उन्नतीसाठी , विकासासाठी अतिशय मनातून प्रयत्न करतात,झटतात हे खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांचा आदर्श घेऊन स्थानिक पातळीवर सुद्धा गट ,तट, जात, पात, धर्म ,पंथ, वर्ग, पक्ष हे सर्व विसरून सर्व महिलांनी आणि विशेषतः पुरुष वर्गानी ही एकत्र येऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणा साठी  प्रयत्न करावेत हीच ' "महिला दिनी "' माफक आणि रास्त अपेक्षा...!!!!!
- आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
जि. प. प्रा. शा .लोणीघाट, ता. जि .बीड
9403725973
============================
( 2 ) जागतिक महिला दिन
मातृत्वचा गोड सागर म्हणजे माता सर्व श्रुष्टिची जणींनी महिला तिचा आदर हा सर्व माणवजातीने राखला पाहिजे नव्हे राखायलाच हवा
आज देश प्रगतीसाठी धावतो आहे आनंद वाटतो पण कधी वृतमान पत्रात कधी शेजारीच ऐकायला मिळते की अमुक वर्षाची बालिका, अमुक वर्षाची महिला यांच्यावर अन्याय, अत्याचार झाला तेव्हा मात्र मन हेलावून जाते तेथून विचाराला सुरूवात होते की? ही कसली प्रगती अरे! हा आधिकार कोणी दिला या नराधमांना
तुम्हीच जगता काय रे येथे कुत्र्या मांजरा सारखे?
ज्यां मातेला भगवंतानी सोंदर्य बहाल केले आहे हे काय फक्त तुमच्या नजरा चुकविण्यासाठीच किती घाणेरडी नजर टाकता एका परस्त्री वर 'आमच्या छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगा.... एक मुस्लिम महिलेला मातेचा दर्जा दिला' ''अशीच आमची आई असती तर आम्ही ही सुंदर झालो असतो''!
मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईने या अत्याचारी समाजाचा खुप जाच सहन केला त्याचीच सुंदर फलप्राप्ती आजची म्हणून महिला सबळ झाली आहे..
विचार पवित्र ठेवा सर्व काही सुंदर होईल
महिलांना खरचं स्वातंत्र मिळाले असे वाटते का? मी तर म्हणेन नाही..स्वातंत्र मिळाले तर एखाद्या विधवा महिलेला समाज का मान्यता देण्यास मागे पुढे बघतो तिला का तिचे विचार मारावे लागतात?
किती तरी वेळेस तिच्यावर वाईट प्रसंग ओढवले जातात...
जगाचा बघण्याचा दृष्टीकोन ही वेगळा भासतो
का तर ती विधवा आहे म्हणून? यात तिचा काय दोष आहे
हे कुठेतरी थांबायला हवे आहे थांबले तरच महिला दिन
ख-या अर्थाने सार्थ झाला
हा प्रश्न एकट्या महिलांचा नसून सर्वांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत माझ्या अल्पबुद्धिने जे वाटले ते परखड मांडण्याचा प्रयत्न केला काही चुका असतील तर क्षमा असावी...
विचार मंथनसाठी
महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व माता जणींनीला
हार्दिक शुभेच्छा
- गजानन पवार, हिंगोली
070667 79265‬
============================
( 3 ) जागतिक महिला दिन
कसा सुरू झाला हा महिला
दिन? कधी ?कुठे ?कशासाठी?
अशा तर्‍हेचे प्रश्न मनात येणे साहजीकच आहे.
१९१० मधे प्रथम  कोपनहेगन येथे स्रियांनी  मोठा औद्योगिक संप घडवून आणला होता. या व अन्य सर्वच क्षेत्रातील लिंगभेदाला आपला विरोध दर्शवण्यासाठी. याच ठिकाणी आंतरराष्र्टिय समाजवादी महिला परिषदेने स्री दिनाचि जाहीरनामा आखला व प्रसिद्घ केला .  १७ देशातील  १०० स्री प्रतिनिधींनी तो संमत केला
१९११ ला प्रथम याच
परिषदेच्या प्रेरणेने डेन्मार्क , आॅस्र्टिया, जर्मनी व स्वित्झर्लड या देशातील स्रियांनी प्रचंड मिरवणुका,संच मोर्चे यामधून कामाच्या ठिकाणी स्री पुरूष समानता, समान वेतन,  सर्व स्रियांना कमाईचा हक्क आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याच्या हक्काची मागणी केली
१९१७ मधे ८मार्च या दिवशी युद्धाला ऊबलेल्या रशियन स्रियांनी ,"भाकरी आणि शांतता" याची मागणी करत देशभर सर्वत्र संप घडवून आणले आणि ४ दिवसातच रशियाचा जुलमी राजा झार याने महिलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
१९७५ साली युनायटेड नेशन्स आॅर्गनायझेशनने जागतिक पातळीवर ८मार्च हा महिला दिन म्हणून घोषीत केला.
याचे एक मुख्य ऊद्द्दीष्ट आहे ते म्हणजे तरराष्र्टिय पातळीवर राजकीय,सामाजिक, आर्थिक व शांततेच्या पातळीवर महिलनी केलेल्या अजोड कामगिरीचा यथोचित गौरव करणे.
आत्ता ८ मार्च  २०१६ रोजी साजर्‍या होणार्‍या महिला दिनाची संकल्पना आहे ,
सर्व पृथ्वीवर २०३० पर्यत
स्री व पुरूष ५०:५० अशी समान लोकसंख्या पर्यत आणणे.तसेच: स्रियांची १००% शोषण मुक्ती करणे.
स्रियांच्या देहविक्रीचा व्यापार पुर्ण थांबवणे.
स्रीचे शाररिक, मानसिकव
आर्थिक, शोषण थांबवणे.
संपुर्ण लैंगिक शोषण मुक्तीसाठी कायदे राबवणे  व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे
स्रीयांच्या कौमार्य शुद्धतेचा पुरावा म्हणून खासकरून अनेक मुस्लीम समाजात व आफ्रिकन जमातीत अजूनही  मुलगी लहान असताना करण्यात येत असलेल्या अत्यंत अमानुष आशा 'योनी बंदी'  म्हणजे ( genital mutilation)च्या शस्रक्रियांना १००%आळा घालणे.
प्रत्तेकाने pledge for sex Parity म्हणजे "लिंग  समानतेची प्रतिज्ञा घेणे.
या प्रतिज्ञेतुनच
१ स्रियांच्या नेत्रृत्वाला संधी
२ कमाईच्या समान संधी देणे
३ स्रियांच्या महत्वाकांक्षा पुर्ण व्हाव्यात म्हणूनसंधी ऊपलब्ध करून देणे
४ पुर्वग्रहदुषीत समाजिक रुढींचे ऊच्चाटन करणे
५ स्रियांनी आर्थिक सामाजिक  ,औद्योगिक,
शैक्षणिक राजकीय कर्तृत्वाचा गौरव करणे
अशी सर्व धोरणेआखण्यातआली आहेत.
पण.........
काही देशात व शहरी भागात वरील काही ऊद्दीष्टे फलीत होत असली तरी रोजच्या रोज वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या अत्यंत विपरीत आहेत
१ स्रियांवर  त्यांच्या शरीर मनावर मालकी हक्क गाजवणे हे तर जगभरच्या पुरूषांचे सार्वत्रिक वर्तन
आहे.
२ स्रिच्या पोषणाकडे दुर्लक्ष करणे, मुलींना पुरेसे जेवण न देणे
३ तिला शिक्षणा पासुन वंचीत ठेवून ,कोवळ्या वयात सर्वप्रकारच्या कौटुंबिक जबाबदार्‍या घ्यायला लावणे.
४ जवळच्या नातलगांकडूनच नव्हे तर प्रत्यक्ष बाप भाऊ यांचेकडूनतिचे लैंगिक शोषण होणे
५ स्री भ्रृण हत्या सर्रास आढळणे
६ स्री पुरुष विषम लोकसंख्याचा राक्षस
७ कामाच्या ठिकाणी समान काम करूनही  पुरूषापेक्षा कमी
वेतन, कामाचे जादा तास भरायला लावणे .
६ स्रीयांना होणारी मारहाण
७ स्रियांवर होणार्‍या बलात्कारांचे भयानक वाढते आकडे
८ स्री पोलीस, स्री कंडक्टर परिचारिका, गार्ड यांचेवर होणारे हल्ले
असे विषण्ण करणारे चित्र पाहीले की निदान आपला देश तरी युनोने ठरवून दिलेल्या ऊद्दिष्टांना पुर्ण करेलअसे वाटत नाही.महिला दिन ऊत्सव साजरे होतायत,समानतेच्या मोटरसायकल रॅल्या निघतायत, पण प्रत्यक्षातसामान्य स्री, " दीन" आहे ने खरच!
बर ,  एक स्री तरी दुसर्‍या स्रीला  तरी कुठे सन्मान पुर्वक समान वागणूक देतेय!
म्हणजे खरी गरज आहे ती
१ शिक्षण व संस्कारातून स्रियांबाबतच्या समाज धारणेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची.
२ स्रियांनी शारीरिक सबलता व आत्मनिर्भरता
प्रात्त करून घेण्याची
३ व्यवसाय व कौशल्य शिक्षण घेऊन स्वयंपुर्ण होण्याची
४  घरातल्या मुलांना स्री देहाचा  व मनाचा आदर करायची शिकवण देण्याची.
५ स्री ने स्वत:चा सन्मान ठेवण्याची व अन्य स्रियांना कमी न लेखण्याची.
म्हणजे मग रोजचा दिवसच सन्मानाचा असेल! दीन नसेल!
खर तर आज असे एकही क्षेत्र नाही जेथे स्रिने कत्तृत्व दाखवलेले नाही. सुनाता विल्यम्स, कल्पना चावला या अवकाशात झेपावलेल्या स्रिया असोत वा सेनेच्या तिन्ही दलात भरती होणार्‍या सैनिका असोत ! ती कुठेच कमी
नाही! रेल्वे चालवणे , हवाई जहाज चालवणे, ट्रॅक्टरनी शेती करणे, संरक्षण ऊत्पादन, न्याय वैद्यक, गुत्पहेर ,अशा
खास तुरूषी समजल्या जाणार्‍या क्षेत्रातले महिलचे कार्य महान आहे. असे असताना,' मुलगी झाली हो'म्हणून गळे काढणारे वा जन्मताच तिचा अंत करणारेही याच देशात आहेत.
म्हणून स्रियांनी जाणले पाहीजे की ,'एकी हेच त्यांचे बळ आहे'.'मिलकर लडेंगे मिलकर पाएंगे'
- अंजना कर्णिक, पुणे
098207 58823
============================
   ( 4 )   "जागतिक महिला दिन"
      महिला कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी ८मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या महिला कामगारांच्या लढ्याचे प्रतीक म्हणून 'जागतिक महिला दिन' जगभर साजरा होतो. या लढ्याने महिलांच्या हक्कांची जाणीवही जगव्यापी झाली. वस्त्रोद्योगातील महिला कामगारांच्या हक्कांसाठी न्यूयॉर्कमध्ये ८मार्च १८५७ ला पहिले आंदोलन झाले. त्याचेच स्मरण करीत  पन्नास वर्षानी ८मार्च रोजीच महिला कामगारांचे आंदोलन झाले. सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा व सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षितता  मिळावी,यासाठी रुटगर्स चौकात ही निदर्शने झाली. यानंतर कोपनहेगन येथे दुसऱ्या जागतिक समाजवादी महिला परिषदेत ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन  म्हणून स्वीकारावा,असा ठराव क्लारा झेटकिन या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने मांडला.तेव्हापासून ८मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो.ही आहे आज जगभर साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक महिला दिनाची' पार्श्वभूमी!पण वास्तव काय आहे?ज्या उद्देशाने हा दिवस साजरा करायचे ठरले होते त्यातील सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला सुरक्षितता मिळाली का?
     या प्रश्नाचे उत्तर खेदाने नकारार्थीच  येईल.
        स्त्रीने "चूल आणि मूल" ही पारंपरिक चौकट तोडून उंबरठ्याच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या कार्यक्षेत्रासोबत तिच्या  समस्येचे रूपही विस्तारित झाले.तिचा कौटुंबिक  छळ बंद झाला आणि सामाजिक अत्याचार सुरू झाला.स्त्रीला वैचारिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने फुले दांपत्याने १८४८मध्ये मुलींच्या शिक्षणाची मशाल पेटवली. याचा परिणाम असा झाला की,ती वैचारिक आणि बऱ्याच प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली परंतु ती सुरक्षित मात्र अजूनही होऊ शकली  नाही. ऱोज वर्तमानपत्र उघडले की,त्याच त्याच संस्कृतीचा ऱ्हास दाखविणाऱ्या व काळीज चिरून टाकणाऱ्या बातम्या वाचल्या किंवा आजूबाजूला तशा घटना पाहिल्या,ऐकल्या की वाटते,"जागतिक महिला दिन" साजरे करून काय साध्य होत आहे?आज सर्वच क्षेत्रात स्त्रीने उत्तुंग भरारी मारली. त्यात यशस्वी सुध्दा झाली  झाली आहे. स्वत:चा वेगळा ठसा देखील उमटवला आले. यावरून स्त्री सक्षम झाली असे म्हणता येईल परंतु तरी ती सुरक्षित झाली म्हणता येईल का?कारण या देशात बलात्कार करणारा उजळ माथ्याने फिरतो तर बलात्कारीत स्त्रीवर आत्महत्येची वेळ येते. गावापासून शहरापर्यंत कुठलीही स्त्री सक्षमपणे  अशा प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य प्राप्त करु शकलेली नाही. आजही स्त्रियांसाठी संविधानापेक्षा समाज आणि धर्म यांचेच कायदे लागू होताहेत. मूठभर स्त्रियांचा झगमगाट आणि स्वैराचार पाहून अखिल स्त्रियांच्या जीवनमानाचे अंदाज काढणे,हे कपोलकल्पित होईल.स्थानिक स्वराज्य संस्थेने स्त्रियांसाठी आरक्षण दिले असले तरी ग्रामीण तर सोडाच पण बऱ्याच शहरी स्त्रिया सुध्दा रबरी शिक्का किंवा कळसूत्री बनून राहील्या आहेत.
      अशावेळी "तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार"याप्रमाणें स्त्रीने स्वतःहून या  स्वातंत्र्याचा,आरक्षणाचा सक्षमपणे लाभ घेतल्याशिवाय उपयोग होणार नाही.नाहीतर असे वर्षानुवर्षे जागतिक दिन येतील अन अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या  पिढीतील काहीजण या दिवसाला एक परंपरा म्हणून साजरा करतील किंवा काहीजण अंध्दश्रध्दा म्हणून सोडून देतील.
   "घे झेप मुली  आता,पिंजऱ्यातच नको फडफडू,
अन्यायाविरुध्द पेटून ऊठ,नको आता कढू अन रडू ,
नव्या युगाची,नव्या धाडसाची वाट नवी पाडू,
महिला जागतिक दिनाचे हेच आता दे लेकीला बाळकडू."
   समस्त महिला भगीणीना सन्मान,वैचारिक स्वातंत्र्य,हक्क प्राप्त होवो,हीच येणाऱ्या "जागतिक महिला दिना"निमित्त हार्दिक शुभेच्छा.
     - संगीता देशमुख, वसमत जि. हिंगोली
============================
( 5 )
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर नाव - सौ. वृषाली शिंदे
भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत, ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. समाजात अश्या असंख्य महिला आहेत ज्यांचे कार्य विशेष नोंद घेण्यासारखी आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या प्रतिलिपी डॉट कॉम च्या मराठी विभाग प्रमुख सौ. वृषाली शिंदे यांची माहिती त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
त्यांचा जन्म मुंबईत दिनांक- 21जुलै 1971 रोजी झाला. त्यांच्या परिवारात पती आणि एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यांचे आई वडिल दोघेही नौकरी करत. त्यांचे शिक्षण बी. ए. जरी असेल तरी माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रात खूप मोठे काम त्यांनी केले आहे. मे 1993 मध्ये त्यांचा विवाह झाला. ते सरकारी नौकरी करतात, त्यांना भटकंती, प्रवासाची खूप आवड आहे आणि भरपूर वाचन करतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच  हे मजल गाठू शकले असे ते म्हणतात.
मी -  प्रतिलिपी कडे कसे वळलात ?  वृषाली शिंदे - लहानपणापासून साहित्य वाचनाची आवड, शाळा व कॉलेज जीवनात साधारण कविता करत असे, वाचनाची प्रचंड आवड, सामाजिक जाणीव, मातृ भाषेबद्दलची आस्था
मी -  प्रतिलिपी विषयी काही सांगा ?
वृषाली शिंदे -  प्रतिलिप हा एक तरुण आणि होतकरू मुलांनी नवीन साहित्यकसाठो उपलब्ध करून दिलेला उत्तम मंच आहे.  ह्यावर कुणीही नवीन किंवा प्रसिद्ध साहित्यिक आपले लेख, कथा, कादंबरी, कविता, नाटक किंवा कुठलेही साहित्य विना मूल्य प्रकाशित करू शकता त्यासाठी कुठलीही रक्कम घेतली जात नाही. तसेच हे साहित्य डिजिटल फॉरमॅट मध्ये ई-बुकच्या रुपात प्रकाशित केले जाते, जी कि येणाऱ्या पुढील काळाची गरज आहे. शिवाय हे ऑनलाइन प्रकाशित होत  असल्यामुळे जगभरातून ते आपण आपल्या कॉम्पुटरवर, टॅबवर किंवा स्मार्टफोनवर सहज केंव्हाही वाचू शकता. प्रतिलिपी हे काम फक्त एक भाषेसाठी करत नाही तर सध्या मराठी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू आणि गुजराथी अश्या सहा भाषेत चालू आहे आणि बाकी भाषेतही लवकरच सुरु होणार आहे. प्रतिलिपी मराठी विभागाची मी प्रमुख आहे व मराठी भाषेचं सर्व कामकाज मी पाहते. विशेष म्हणजे प्रतिलिपिवरील साहित्य वाचकांसाठी ठराविक फी च्या रुपात वाचनासाठो ठेवले जाणार आहे आणि त्यातून आलेली 70% रक्कम हि लेखकास दिली जाणार व बाकी 30℅ प्रतिलिपी आपली website व स्टाफ साठी खर्चाच्या रुपात वापरणार आहे. सध्या प्रतिलिपी ला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील आठवड्यात (मार्च पहिला आठवडा) प्रतिलिपिवरील वाचकांची संख्या 30 लाख च्या वर पोहोचली आहे, आणि हे प्रतिलिपीने खूप कमी वेळात साध्य केले, त्यासाठी लेखकाचा व वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे व त्यांचे आभार. आपण ही www.pratilipi.com या वेबसाईट ला भेंट दया आणि आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख email वर पाठवा त्यांस नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचसोबत 9969484328 या क्रंमाकावर ही संपर्क करु शकता.
मी -  जागतिक महिला दिनाविषयी महिलांना काय संदेश द्याल ?
वृषाली शिंदे -  मी संदेश देण्या इतकी मोठी तर नाहीच. कारण महिलांना महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून अनेक समाज सुधारकांनी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले आहे आणि तो एक खूप मोठा संदेश आहे. आणि त्याचमुळे आज महराष्ट्रातील अनेक महिला शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या आहेत, तरीही एक खंत आहे आजपण असंख्य महिला शिक्षण घेऊन सुद्धा आणि क्षमता असून ही आपला संसार, चूल आणि मूल ह्यापुढे सरकत नाही. तरीही मी संदेश देऊ इच्छिते कि स्त्रीयांनी मला जमणार नाही किंवा मी करू शकणार नाही हे झुगारून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यामुळे त्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विकास घडवतील. फक्त मी स्त्री आहे असे समजून चालणार नाही तर आपणही एक मानव आहोत, पुरुषाप्रमाणे आपल्यालाही बुद्धी, ताकद दिली आहे आणि तिचा खरोखर उपयोग करणे जरूरी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
मी - आपणांस सुध्दा खूप खूप शुभेच्छा.

शब्दांकन -
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769
============================
( 6 )
"समाजासोबतच सोशल मिडीयावरील स्त्री स्वतंत्र व सुरक्षित आहे का ?"
   या संदर्भात आपण मत मांडावे असं वाटलं.मुळात कोणतीही स्त्री जेव्हा फेसबुकवर,वॉटस अप वर येते तेव्हा तिचा उद्देश ज्ञान,मनोरंजन,व्यक्त होणे,आधुनिक जगाच्या संपर्कात राहणे,व नंतर जवळचे मित्र झालेच तर सुख दु:ख शेअर करणे..असे वेगवेगळे उद्देश कमी अधिक प्रमाणात असतात.पण स्त्री सोशल मिडीयावर आली म्हणलं कीच बर्याच लोकांच्या भुवया उंचावतात. या स्त्रीला मग वेगवेगळे अस्त्र वापरुन माया,प्रेम,प्रोत्साहन अशाप्रकारे जवळीकता वाढवुन नंतर मूळ स्वरुपात येऊन वाईट मेसेज,कमेंट द्वारे त्रास दिला जातो.प्रत्येक स्त्री ही उपभोग्य वस्तु आहे,ही धारणा अशा लोकांच्या मनात असते.तसं पाहीलं तर असे लोक फार कमी आहेत.चांगल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे.पण वाईट लोकांच्या कारवायामुळे स्त्रिया एकतर फेसबुक सोडुन जातात,किंवा तुरळक यांच्या दबावाला बळी पडु शकतात तर काही आत्मविश्वासाने याला तोंड देऊन खंबीरपणे सामना करतात.
   या सर्व प्रकारांतुन दिसुन येते की स्त्री कितीही खंबीर असली तरी तिला त्रास होतोच.
या सर्व गोष्टी दूर करायच्या असतील तर..समाजाची मानसिकता बदलावी लागेल...मुलींना सुरक्षितपणे शिकता,फिरता,नोकरी,व्यवसाय करता आला पाहीजे..स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवुन दिल्याशिवाय...नुसता कोरडा मोठेपणा कामाचा नाही असे मला वाटते...
माझी एक रचना...
ती जळत राहते,
तो जाळत राहतो,
कधी हुंड्यासाठी,
कधी एकतर्फी प्रेमासाठी,
कधी वासनापुर्तीसाठी,
चारित्र्याच्या संशयापोटी,.....
ती शांतपणे जळत आलीय..
त्याचा अन्याय भोगत आलीय...
पण तीही बनलीय सक्षम आता..
नाही चालणार अहंकाराची सत्ता..!
- दिलीप धामणे, हिंगोली
099222 36870‬
============================
( 7 )
‬महिला तिच्या कर्तुत्वाला शतशः नमन
अनादी काळापासुनच स्त्री जातीस अनन्यसाधारण कार्ये केलेली आहेत अन् ज्या त्या वेळेला स्वतःची नवी ओळख तसेच स्थान मिळवून संपुर्ण जगताला तिची महती पटवून दिलेली आहे.
कोणतेही कार्य असो स्री कार्यक्षम होती आहे अन् असेलही.सृष्टी निर्मात्या श्री महादेवांनी ही त्यांच्या शक्ती रूपात पार्वती मातेस स्थान दिले.त्याच देवीने अनेकानेक रूपात प्रकट होऊन अनेकानेक असाध्य कार्ये पूर्णत्वास नेली. इतकेच नव्हे तर झाशीची राणी, मा जिजाऊ यांना तर त्यांच्या कर्तुत्वासाठी साता समुद्रापार लहान थोर जाणतात.
जे स्वतः देवादिदेवांनी स्विकार केले तेच आजच्या ह्या कलियुगी सर्वच विसरले आहोत ह्याचीच खंत वाटते.
आजही स्रीया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुनी कामे करतात किंबहुना पुढेच आहेत उदाहरणादाखल अनेक नावे घेता येतील
पहिली IPS (आय पी एस)-किरण बेदी
महिला मुख्यमंत्री- श्रीमती मोदी
तडफदार महिला पंतप्रधान- इंदिरा गांधी
महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील
अन् अजुनही बरेच.
खेद हाच की आजच्या SO CALLED पुरुष प्रधान संस्कृती ने आजकालच्या पिढीच्या विचारांना दुषित करुन टाकले आहे.पुरुष प्रधान संस्कृती निर्माण करणारे सर्वांना ह्याचा कसा विसर पडु शकतो की पुरूषाला जन्म देणारी ती स्री च आहे जी नुसता जन्म देत नाही तर प्रसुतीच्या वेळेस स्वतःच्या होणा-या त्रासाचा विचार न करता नव जीवास जन्म देते अन् ह्या सर्वात तिचा स्वत:चाही नव जन्म होतो (तो शारीरीक त्रासाचा पुरुष कल्पना ही करू शकत नाही)
सांगणे इतकेच की विचार बदला आयुष्य बदलेल. स्री च्या स्रीत्वाचा सन्मान करा किंबहुना करायलाच हवा तो आपण सर्वांनी कितीही झाले तरी आपले सर्व आराध्यांची शिकवणच आहे ती, मग ते आराध्य कोणीही असो
कोणताही देव राजे शिवाजी कोणीही असो शिकवण एकच स्रीयांचा सन्मान करावा.
अन् स्री ही एका नव्हे तर तीन कुळांचा ऊद्धार करते त्याच धर्तीवर विचार कराल तर पुरुष एकाच कुळाचा ऊद्धार करतो.
स्री चा आदर होई जिथे
साक्षात दैवी शक्ती वसे तिथे.
चला संकल्प करूयात फक्त महिला दिना पुरता मर्यादित न ठेवता अंगवळणी पाडुन अहोरात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये स्रीयांना समान मान देऊन त्यांचा सन्मान करूयात
संजय पाटील, पुणे
099704 46447
============================
( 8 )
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हाता.याविरुध्द स्त्रिया संघर्ष करीत होत्या.१८९० मध्ये अमेरिकेत मतदान हक्काबाबत द नॅशनल अमेरिकन वुमन सफ्रेज असोसिएशनची स्थापना झाली.पण ती मर्यादित हक्काबाबत लढत होती. म्हणून या मर्यादित हक्कांना देशांतरीत कामगार स्त्रियांनी विरोध केला व क्रांतिकारी मार्कस्वाद्यानी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काच्या मागणीला पाठिंबा दिला.
१९०७  मध्ये स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यात क्लारा झेटकिन  या लढाऊ वृत्तिच्या कम्यनुस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क पाहिजे.हे स्त्रियांचे कर्तव्य आहे. अशी घोषणा केली.  ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारानी रुटगर्स चौकात जमून निदर्शने केली. त्यांच्या अनेक मागण्यापैकी एक मागणी म्हणजे प्रौढ स्त्रियाना मतदानाचा हक्क मिळावा.या जोरदार मागणीमुळे क्लारा झेटकिन प्रभावित झाली.
क्लाराने १९१० साली कोपनहेगन याथे दुस-या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारानी केलेल्या कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा हा ठराव केला.मग अमेरीका,युरोप वगैरे देशात या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. परिणामी १९१८ साली इंग्लंड व १९१९ साली अमेरीकेत यश मिळाले .
भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ साली पहिला महिला जागतिक दिन साजरा झाला.१९७५ हे साल युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहिर केले.त्यानंतर स्त्रियांच्या समस्या समाजासमार,जगासमोर येऊ लागल्या.स्त्रियांच्या संघटना निर्माण झाल्या.सामाजिक,राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक यात परिस्थिनुसार स्त्रीविषयक प्रश्नांच स्वरुप बदलत गेले. स्त्री संघटनाच्या मागणीतदेखील बदलाव आला.
  पुरणकालापासुन स्त्रियांना संघर्ष तर करावाच लागला,सीता,द्रौपदी,मध्यायुगीन काळातील संतस्त्रिया मीराबाई,जनाबाई,पुढे जिजाई,राणी लक्ष्मुबाई,यानी प्रांतासाठी दिलेला लढा,स्वातंत्रासाठी अनेकीनी दिलेले बलिदान,सावित्रीबी फुले,रमाबाई रानडे (१,२) डॉ.आनंदीबाई जोशी या जागतिक स्त्रियांच्या सन्मानाच्या उबंरठ्यावर कितीतरी पुढे होत्या.त्यांची प्रखर आत्मशक्ती,आत्मभान वाखाण्याजोगे होते.त्यांना त्रिवार वंदन.!
जागतिक पातळीवर काम केलेल्या तसेच  लेखन,कला,व्यवसायात ब-याच महिला आघाडीवर आहेत.अगदी अलीकडे प्रकाशात आलेल्या महाराष्ट्रात फलटन येथे असलेल्या केवळ मराठीवर प्रेम म्हणुन अमेरीका सोडून आलेल्या Maxine Bernstein मावशी इथे मराठी शाळा काढते व सारे जीवन मराठी शिकविण्यात व्यतित करते.
मृणालिनी साराभाई नृत्यनिपुण (नुकतेच निधन झाले),अभिनेत्री नूतन,साधना मूर्तीमंत सादगी,व त्यांचा जीवंत अभिनय,
लेखिका,दुर्गाबाई भागवत –सार आयुष्य लेखनाला वाहिलेल.इंदिरा संत,शांताबी शेळके,जीवनात कठीण प्रसंगाना तोंड देत मंगलमय गीतरचना केल्या.समाजसेविका विद्या बाळ,रेणू गावास्कार यांच कार्य अशांना स्मरण करणं म्हणजे त्यांना मानाचा मुजराच ! (खर तर कितीतरी स्त्रिया आपल्या तेज:पुंज कार्याने तळपत आहेत.पण इथे मर्यादा आहे.)
  स्त्रिया विषयी एव्हढा जागर चालु असताना सारा सन्मान मिळत असताना भारतात अजूनही खेडोपाडी पारंपारीकता,धर्मच्या नावांखली अनिष्ठ प्रथा चालु आहेत. त्याचा भळी स्त्रियाच ठरत आहेत.
  शहरातसुध्दा स्त्रियावरबलात्कार,मारहाण,अतिप्रसंग,खुन होतच आहेत. कामाच्याठिकाणी लैगिंग शोषण होतेय.जिकडे पहावे तिकडे स्त्रियावर बळजबरी केली जातेय.घटस्फोटाचे प्रमाम वाढते आहे.कधी कधी स्त्रियांच स्त्रियांच्या वैरी ठरत आहेत.वेश्याव्यवसाय तस्करी ,अनीष्ट रुढिना खतपाणी ,बुवाबाजीला उत्तेजन ,याला स्त्रिया हातभार लावतायत की, काय ?अशा सामाजिक प्रश्नांच्या चळती समोर असताना ख-याखु-या अर्थाने महिला सुखी झाल्या कां हा प्रश्न पडतो.मग जागतिक महिला दिन साजरा करायचा कां?
  या प्रसनाकडे स्त्री संघटनानी आधिक लक्ष पुरवावे.स्त्रियामधील अनिष्ट भावनाच केली तर जागतिक महिला दिन साजरा करण्याला अर्थ उरेल !उद्याच्या ८ मार्च साठी स्त्रियांनी पायाभूत सच्चेपणात टिका की, आपोआप ससत्री ही देशाचा भक्कम पाय ठरेल !  आशा करु या.— त्याप्रित्यर्थ--एक चारोळी –
               महिला दिन आहे गोजिरा
               शोषितांना द्या मायेचा हात
               संघा संघाने येथे पसरा
               सहिष्णुता जपा साथ साथ

- कुंदा पित्रे, दादर, मुंबई
093247 42706
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...