Sunday, 17 April 2016


📚  साहित्य  दर्पण 📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

भाग :------      1ला  पहिला
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
दिनांक :--17 एप्रिल 2016
वार:----- रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
वेळ सकाळी 9:00Am ते
सायंकाळी 7:00Pm पर्यंत
==================
विषय:----समाजात स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे उपाय
==================
संयोजक :--प्रा.नितिन दारमोड,नांदेड
************************
परीक्षक:---प्रा.सौ.संगीता भालसिंग अहमदनगर
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"''''''''''''''''''''''''''''
संकलन:-- श्री अनिल जी लांडगे सर ,परभणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आणि ग्राफिक्स :--ना सा येवतीकर सर धर्माबाद
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'


* समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्याचे उपाय *

यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवता या संस्कृत भाषेतील सुवचनाचा अर्थ आहे ज्याठिकाणी स्त्रियांची पुजा केली जाते त्याठिकाणी देव रमतो. हे झालं शब्दशः अर्थ परंतु प्रत्यक्षात त्याचा अर्थ असा आहे. ज्या घरात स्त्रियांची पुजा केली जाते म्हणजे स्त्रियांना मानाचे स्थान दिले जाते, त्यांच्या विचारांना वाव दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो, आणि त्यांना समानतेची वागणूक दिली जाते, त्या घरात देव रमतो यांचा अर्थ त्या घरात शांतता व समृद्धी राहते. त्या घरची उत्तरोत्तर प्रगती होत राहते. वरील सुवचन आपणांस बऱ्याच ठिकाणी वाचण्यात येते. नेहमीप्रमाणे वाचन करणे आणि सोडून देणे यापलीकडे आपण काहीच करीत नाही हे ही सत्यच आहे. पुरातन काळापासून महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेली नाही हे वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या छोट्या मोठ्या महिलांच्या अत्याचाराच्या बातम्यामधून कळून येते. आजही स्त्रियाना चूल आणि मूल या क्षेत्रापुरतेच बांधून ठेवले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आजही त्यांना त्यांचा दर्जा मिळालेला नाही. त्यांचा दर्जा उंचाविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? यांचा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे असॆ वाटते.
शनि मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सध्या समाजात वादविवाद चालू आहेत. न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु समाज मानण्यास तयार नाही. तेंव्हा प्रश्न असा पडतो की, महिलांना मंदिरात प्रवेश दिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय ? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, अमानुष छळ या विषयावर आंदोलने झाली असती तर कदाचित महिलांना मोकळा श्वास घेता आले असते. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या समस्येवर सर्वांनी भरभरून लिहिले आहे मात्र समाजात आजही महिलांचे समस्या काही कमी झाले नाहीत कारण या समस्यावर उपाययोजना झालीच नाही. फक्त चर्चा आणि चर्चाच झाली. म्हणूनच उपायांची अंमलबजावणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. संसारात पुरुष आणि स्त्री दोघांनाही समान महत्व आहे. रथाच्या चाकाप्रमाणे पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक आहेत. एक जरी चाक खराब झाले तर ज्याप्रमाणे रथ चालत नाही अगदी तसेच पुरूष आणि स्त्रियांचे आहे. दोघांच्याही प्रगतीत एकमेकास असलेला आधार महत्वाचे आहे त्याशिवाय जीवनाची प्रगती शक्यच नाही.
शिक्षणाने माणसाचा संपूर्ण विकास होतो हे यापूर्वी महात्मा फुले यांनी सांगितले आहे. शिक्षणामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. अन्यायाविरूध्द लढण्याची शक्ती मिळते. समाजात मान आणि सन्मान दोन्ही मिळतात. याचमुळे समाजात स्त्रियांचा दर्जा उंचाविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसोबत याच शिक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले तर कोणत्याही संकटाला न डगमगता यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. आज कित्येक स्त्रिया स्वतःच्या पायांवर उभे होत आहेत. त्यामुळेच समाजात त्यांचा दर्जा सुध्दा उंचावला जात आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलींची संख्या समाधानकारक आहे मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येत लक्षणीय फरक आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मुली उच्च शिक्षण पूर्ण करतात. यांत बदल झाले पाहिजे. शासनाने सुध्दा मुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी मुलींच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य द्यायलाच पाहिजे. मुलगा - मुलगी यांत भेद न मानता समान तत्वावर चालली पाहिजे असॆ वाटते.
जी व्यक्ती पैसा कमाविते, त्यांस घरात, समाजात आणि गावात प्रतिष्ठा मिळते आणि आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये पैसा फक्त पुरुष कमावितो म्हणूनच त्यालाच प्रतिष्ठा मिळते, यांत काही चूक नाही. मग स्त्रियांनी देखील रोजगार किंवा नौकरी मिळविले आणि त्याद्वारे पैसे कमवु लागले तर समाजात, घरात आणि गावात त्यांची सुध्दा प्रतिष्ठा नक्कीच वाढू लागेल, यांत शंकाच नाही. यांचाच विचार करून प्रत्येकाने आपल्या बहिणीला किंवा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असॆ शिक्षण देऊन त्यांना रोजगार किंवा नौकरी करण्याची संधी दिली तर ते स्वतः प्रगल्भ होतील आणि त्यांचा समाजातील पत वाढून दर्जा सुध्दा वाढण्यास मदत होईल. महिलांचा समाजातील दर्जा उंचाविण्यासाठी दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक श्री मुरलीधर ( बाबा ) शिंगोटे यांनी जय महाराष्ट्र च्या स्तंभलेखिका राही भिडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीच्या निमित्ताने मुख्य संपादकाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थाने महिलेचा सन्मान केला आहे असॆ वाटते.
जुन्या विचारांचा पगडा डोक्यावर असल्यामूळे समाज आज सुध्दा त्या सनातन परंपरेत अडकून पडले आहे. श्रध्दा आणि अंधश्रद्धाच्या विळख्यातून महिला अजूनही बाहेर आले नाहीत. तेंव्हा महिलांनी आत्ता आपला समाजातील दर्जा वाढविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे सुध्दा तेवढेच आवश्यक आहे. समाजात एकाएकी असॆ बदल होणार नाही. त्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही सामंजस्यपणे वागणे ही गोष्ट सुध्दा विसरून चालणार नाही.

नागोराव सा . येवतीकर 09423625769

=============================================

📚✒साहित्य दर्पण 📰🖊
                    द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार   🗽
≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠≠
प्रेषक::-→↓↓↓↓
श्री. आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
★★★★★★★★
            "सत्याला सत्य आणि असत्याला असत्य हे अनुभावाच्या कसोटीवर प्रत्यक्षात मानायला जे शिकवतं आणि हेच सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करायला जे बाळकडु पाजलं जातं नव्हे तर ते शिकवण देतं ते म्हणजे शिक्षण "---आद्यशिक्षण क्रांत्तिकारक,क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी अगदी मार्मिक आणि समर्पक शब्दात शिक्षणाची व्याख्या  केलेली आहे... आणि म्हणून स्त्री, -स्त्री कल्याण, तिचा विकास ,उत्कर्ष,आणि तिच्या संबधी विविध दूरदृष्टि महत्वाकांक्षी योजना  याचा उहापोह चर्चा, वाद- विवाद, परिसंवाद हे स्थानिक पातळी पासून ते जागतिक पातळी पर्यंत एरंडाच्या गुर्हाळाप्रमाणे गाळतात.एवढेच काय लोकशाहीच्या चौथा खांब विविध प्रसारमाध्यमे यात मुद्दामहुन विषय चगळतात.पण परिणाम मौल मात्र शून्य दिसते .
         एरंडाचे गुर्हाळ याच साठी म्हटले आहे की,स्त्रीचा दर्जा ,समाजातील पत , प्रतिष्ठा, किंमत उंचावण्याच्या प्रत्येक जन कोठुन सुरुवात करतो हाच खरा वास्तववादी प्रश्न पडतो आहे ? आपल्या घरातील स्त्रीला आपण घरात किंमत देणार नाहीत,एवढेच काय समाजात वावरु देणार नाहीत , तिच्या स्वाभिमानी जगाला अंकुश न लावता स्वातंत्र्याची वागणूक देणार नाहीत  तोपर्यंत  स्त्री आणि स्त्रीच्या वेगवेगळ्या रुपाची  महती , महत्व ,किंवा महिमा आपण खऱ्या अर्थाने  वर्णन करुच शकत नाहीत आणि म्हणून मुलभुत पहिला उपाय म्हणून घरात अगोदर किंमत ,मान- सन्मान द्या ,मग समाज आपोआप  किंमती बरोबर मान- पान, सन्मान ,प्रतिष्ठा देईल नव्हे तर तिला डोक्यावर घेत  तिच्या कार्यकर्तुत्वाची नि प्रगल्भतेची  मीमांसा   करत कौतुक ,प्रसंशा केल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही ...
                   आज मित्तिला पुरोगामी पणाचे ढोंग वर करणी दिसून येते आहे कारण पुरोगामी विचार आणि कृती यात खुप मोठी दरी असल्याचे दिसून येते आहे. एकीकडे  सर्वोच्च न्यायालय स्त्रीला आत्मसन्मानाची वागणूक देण्यासाठी कटिबध्द असल्याचे  कायद्याच्या भाषेत सांगत असले, तरी  दुसरीकडे स्थानिक महिलांना हाताशी धरून आणि  त्यांचा स्त्री जातिविषयीचा अज्ञानाचा  फायदा घेत "काटयाने काटा काढला जातो " या उक्तिप्रमाणे  स्त्रीच स्त्रीच्या विनाशाचा पाया रचत आहे नव्हे स्त्रीच स्त्रीच कर्दनकाळ ठरू पाहते आहे . आजघडीला पुरोगामित्वाच्या विचारांना कुठेतरी कृतीची जोड कमी पड़ते आहे,याचा सारासार विचार व्हावयास हवा..! म्हणूनच कथनी आणि करनी मधील विषमता दूर व्हावी आणि मग पुरुषांना  मंदिर प्रवेशच काय ...? पण घरातल्या  किचन मध्ये पुरुषी अहंकारी वृत्तीला स्वयंपाक घरात  स्त्री बरोबर पुरुषाला प्रवेश घेण्यास भाग पाडावे म्हणजे------ म्हणजे आजची ही स्त्रीची  दयनीय, केविलवाणी- दीनवाणी अवस्था येणाऱ्या पुढील काळात न दिसता पुरुषांच्या बराबरीची नि वैचारिक उत्तुंग गरुड़ झेपेच्या प्रगल्भतेची येणाऱ्या  भविष्य काळात  उंचावल्याशिवय राहणार नाही.....

          स्त्रीला विरोध आणि फक्त विरोध कुठे होत असेल तर तो सर्वाधिक तिव्र स्वरुपात  तिच्याच् घरात ,नंतर मोहल्ल्यात, समाजात ,गावात, नि मग नातेवाईकांमध्ये सामना करावा लागतो मग  ही शृंखला बनत जाते .आणि हीच शृंखला का बनते तर  स्त्रीत्वाविषयीचा समाजाचाच काय तर एकंदरीत सर्व पर्यायी घटकांचा स्त्री आणि स्त्रीत्वा वर नेहमीच अविश्वास दाखवला जात आहे.हा अविश्वास गैर विश्वासु आहे म्हणून स्त्रीला देवीच्या रुपात पाहतात मग विश्वासु ही समजण्यात  यावे तरच म्हणजे पुरोगामी त्वाचा ठसा जगाला बिंबवलेला दिसू शकेल..
           शिक्षणाशिवाय प्रगती नाही,विकास नाही ,उत्कर्ष नाही आणि सर्वांचे मूळ म्हणजे शिक्षण ...!!! संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी "शिक्षण" हेच एक रामबाण जालीम एक नंबरचे औषध आहे. हे कदापि ही विसरून चालणार नाही. आणि म्हणून आज मग पुन्हा एकविसाव्या शतकात काही धर्मांध शक्ति स्त्रीच्या जुन्या रूढि चाली रीती परंपरा पण बिनबुडाच्या  पाळल्या जाव्यात  यासाठी आग्रह धरताहेत..
        संविधान मानते की संबध मानव जातीचे   कर्माने श्रेष्टत्व  ठरवले जाऊ शकते.. न की त्याच्या जन्माने...!!! पण म्हणून काय आता नव्याने मनुस्मृतिचे प्रकाशनाचा घाट बांधला जातो आहे की काय ? आणि मग जुन्या सर्व सिस्टम वर्णवर्गीय अगदी तंतोतंत पाळल्या जाव्यात यासाठी अट्टहास करत आग्रह धरत आहेत.
          आजच्या स्त्रीने मग  काय फक्त रांधा -वाढा,धूणी- भांडी ,नि उष्टी काढ़ा किंवा मग "चुल आणि मूल "या आणि अशा कर्मठ विचारांत आणि कृतीमध्ये  गुरफटून रहायचे का ?? याला जबाबदार कोण ??  तर स्वत:ला सावित्रीच्या लेकी म्हणून  ज्या महिला सिध्द करत अथवा मानायला तयार होत नाहीत त्या अशा जळमळटलेल्या विचारांच्या  पाईक म्हणून स्वता:ला घोषित करतील आणि मग इतिहासाचा काळ त्यांना आणि त्याच्या प्रवृत्तीला कदापि माफ करणार नाही. खऱ्याखुऱ्या सराईत गुन्हेगार म्हणून इतिहासात गणल्या जातील  इतिहास त्याची नोंद घेईल आणि इतिहास ,सामाज ही मग माफ करणार नाही यांच्या अशा विचार आणि कृतीचे पुनर्वसन हे होणे क्रम प्राप्त झाले पाहिजे.
         पूर्वीचा मनुचा कायदा हा आभासी आणि आजचा संविधानाचा  वास्तववादी युगाचा वेध घेणारा कायदा यात जमीन आसमान चा फरक आहे.पण आजची शिकल्या सवरलेली स्त्री मनुचा कायदा पाळते .नैसर्गिक नियमांना  हारताळ फासते म्हणजेच  काय तर मासिक धर्मात पाळीच्या वेळी  कोणतेही  सत्कर्म  ,पूजा पाठ किंवा  ग्रामीण भागातील स्थानिक राजकारनातील पदाधिकारी असणाऱ्या स्त्रीया "झेंडावंदन "सारख्या राष्ट्रिय कामाला नकार देते मग  पुन्हा प्रश्न पडतो की समाजात स्त्रीचा दर्जा नेमका कोणी उंचवायचा....?????

✍🏼🖊🖊🎯🖊🖊✒
श्री. आप्पासाहेब सुरवसे
       लाखनगांवकर
AMKSLWOMIAW
=============================================

** समाजात स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचे उपाय **
         
           विधात्यानं निर्माण केली ही सृष्टी ! समवेत निसर्गही ! त्याचा येथेच्छ उपभोग घ्यायला पुरूष जातीला जन्माला घातलं... भविष्याला आपल्या ओटीत फुलवणारी अन् भूतकाळाला पदरात झुलवणारी स्त्री त्यानं निर्मिली... स्त्री निर्मितीचा हेतू किती निर्मळ पण आमच्या संस्कृतीनं तिच्या नाजूक पायात रूढी परंपरेच्या बेड्या ठोकल्या. चुल आणि मुल इथं पर्यंत मर्यादित ठेवलं. पण काळ बदलत गेला आणि तिने जुलुमाचा पिंजरा तोडून आपल्या आशा आकांक्षांचे पंख फडकून विकास घडवायला सुरुवात केली. कधी कल्पना चावला बनून अवकाशाला गवसणी घातली तर कधी सिंधूताई सपकाळ बनून अनाथांची माय बनली. कधी इंदिरा गांधी बनून राजकारणात दबदबा निर्माण केला तर कधी किरण बेदी बनून प्रशासनातलं कौशल्य दाखवून दिलं. पण मुळात स्त्री आजही उपेक्षितच आहे. रस्त्यावरून चालत जात असतांना तिच्या कडे वासनेच्या नजरेतून पाहणारे आंबटशौकीन नर समाजात आजही वावरतात. म्हणून स्त्री जातीला समाजात योग्य मान सन्मान व आदर मिळणे ही काळाची गरज आहे.
          सर्वात आधी समाजाची स्त्रियांप्रती असलेली मानसिकता बदलायला हवी. परस्त्री माते समान हा विचार रुजलाच पाहिजे. स्त्री जातीने आत्ता सशक्त होण्यासाठी शिक्षणाची कास अधिक परिपक्वपणे धरली पाहिजे. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडून विज्ञानवादी विचार केला पाहिजे. वट सावित्री साठीचे नवस उपवास सोडून क्रांतीज्योती सावित्रीबाईचे चरित्र वाचले पाहिजे. पाळण्याच्या दोरी बरोबरच आपल्या विकास रथाची दोरी सांभाळली पाहिजे. देव-देवतांची पारायणे करण्यात गुरफटून न राहता स्त्री उध्दारकांची चरित्रे वाचून आपल्या वैचारिक पातळीत वाढ घडवून आणावी. परंपरेच्या शृंखला तोडून वैचारिक परिवर्तन घडवून आणावे. नवरा आंधळा होता म्हणून आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधणारी गांधारी न होता पतीच्या आंधळेपणावर आपल्या डोळसपणाने त्याला दृष्टी मिळवून देणारी नवी गांधारी उभारायला हवी.
        शनी शिंगणापूर च्या चौथ्यावर प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई ह्यांनी यशस्वी आंदोलन केलं पण त्याने काय शनी देव वेगळा पावला काय? नवा चमत्कार घडवून आणला काय? नाही ना. मग हीच आंदोलनं जर स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी केलं तर... हुंडाबळी विरोधात उभारलं तर... नक्कीच स्त्री जातीच्या उध्दारासाठी मदत होईल.
             समाज जीवनाच्या चौकटीत पुत्ररत्न देणारी माता समाजाच्या आदरास पात्र ठरते पण कन्यारत्न देणारी माता अवहेलनेला कारण ठरते. म्हणून आजच्या स्त्रीयांनी आपल्या सर्वांगीण विकासा करीता शिक्षणाच्या वाटेवर चालायला हवे. स्त्री पुरुष समानतेचा अजेंडा मिरवायला हवा. विज्ञानाची साथ धरून बदल घडवायला हवा. प्रत्येक कार्यक्षेत्रात आपल्या विकासाचा झेंडा फडकावयाला हवा.
समाज हा चंद्रावर जात असला तरी एक गोष्ट विसरतो की भारतीय महापुरूषांना घडवणारी केवळ स्त्रीच आहे. तिच्या शक्ती सामर्थ्याने महापुरूष राष्ट्राचे नायक झाले. छत्रपती शिवरायांना घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारी माता रमाबाई, म. फुलेंना घडवणारी सावित्री ही स्त्रीच होय. आज चंगळवाद आणि परावलंबी जीवनाच्या आहारी गेलेली आपली नवीन पिढी भरकटलेल्या अवस्थेत नानात-हेचे अनैतिक कृत्य करुन स्त्रीयांचे शील लुटत आहेत. येथे 'आरोपी कोण' हे शोधण्यापेक्षा मुलाने आपल्यातला छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर, म. फुले जिवंत केला आणि मुलीने आपल्यातील जिजाऊ, रमाई, सावित्री जिवंत केली तर चंगळवादाचा पराभव होईल. शिवाय दिल्लीची निर्भया देखील पुन्हा भारतात कुठेच होणार नाही.
      स्त्रीयांच्या सहनशक्तीची उंची आणि विविध भूमिकेचे गुणधर्म मोजण्याएवढा पुरुष जाणी असेल असे मला वाटत नाही. तसा जाणी तरूण निर्माण व्हावा आणि स्त्री-पुरूष समानतेच्या नवयुगाचा आरंभ व्हावा एवढीच निखळ भुमिका यामागे आहे.

( शब्द मर्यादेची अट पाळून )

✒ प्रा. नितीन दारमोड
      धर्माबाद
=============================================

समाजात स्त्रियाचा दर्जा उचाविण्यासाठी......
स्त्रियांनी कुठल्याच परीस्थितीत खंबिरपणे न घाबरता सामना केल्यास
त्याचा दर्जा उचावेल...
"कारण"
 आजकाल विनयभंग,बलात्कार असे
प्रकार घडत असल्याने
स्त्रियाना समाजात मोकळेपणाने जगण्यास मनाइ केली जाते,,त्यामुळे त्याच्या मनातील इच्छा,आकांशा मनातच राहतात...
     उदा: शिक्षण घेउन स्वताच्या पायावर उभ राहून या समाजात आपले
अस्थित्व निर्मान करावे
पण समाजातल्या अशा घटनांनमुळे ते पूर्ण करू शकत नाहीत ,,
..
..
विनयभंग बलात्कार असे प्रकार थांबविण्यासाठी,,व स्त्रियांचा दर्जा समादात उचाविण्यासाठी
  आपल्या मुलींना,बहीनींना  स्व:ता सामर्थ बनविण्यासाठी
माझ्यामते कराटे क्लासेस, बॉक्सींग झ.विद्या प्राप्त करून द्याव्या लागतील तेव्हाच स्त्रिया आपले स्वरक्षण स्वता करू शकतील,,तेव्हाच स्त्रियाचा दर्जा समाजात उचांवेल कारण
     ति स्व:ता च्या पायावर उभी असेल ,ति स्वताची मदत स्व:ता करू शकेल..
..
..
..
विशाल मोरे
7387737148
=====================================

1)  स्रि शिक्षणाची कास धरावी.
2)मूलाप्रमानेच मुलीची काळजी घ्यावी.
3)शिक्षणामध्ये अग्रक्रम द्यावा.
4)मुलीला उच्च शिक्षण द्याव
5)मुलीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे.
6)आवडी निवडीचे स्वातंत्र्य असावे.
तिचे वयात आल्यावरच लग्न  करावे.
स्रियांकडे समाजाचा पाहण्याचा  द्रुष्टीकोन विधायक असावा
स्रियांच्या आत्मसंमानाला ठेच लागू नये.
सुनेला मूलींप्रमाणे वागवा.
भारतात गायीप्रमाणे माय पण सुरक्षित असावी.
🖊🖊🖊🖊✒✒
सदानंद मोरे  वडोदा
ता.मलकापुर जि.बुलडाणा.    
 7387298079/9561082632

=======================================


























No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...