Thursday, 24 May 2018

बुडती हे जन न देखवे डोळा

बुडती हे जन न देखवे डोळा

स्वकियांसाठी प्रत्येक जण झटतात परंतु इतर लोकांसाठी आपण का झटावे ? असा विचार करणारे लोक जीवनात काय मिळवतात ?  काहीच नाही. कुठलाही स्वार्थ मनात न आणता केलेले काम व ती व्यक्ती क्षणात जगभर पोहोचते. भारतात असे बरेच संत-महात्मे ऋषीमुनी होऊन गेले आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध हे सर्वजण लोकांच्या सुखासाठी जगत राहिले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा यांनी सुद्धा याच कार्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. देशातल्या गरीब लोकांना अंगभर कपडा मिळावा म्हणून महात्मा गांधीजींनी आपल्या अंगावरील कपड्यायाचा त्याग करून आयुष्यभर पंचा नेसले व चरख्यावर सूत कातले. दलित लोकांना न्याय मिळावा, त्यांना सन्मान मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी 1956 साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लोकांना विशेष करून स्त्रियांना सन्मानाने जगता यावे यासाठी मदर तेरेसा शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिल्या. कशासाठी ? कारण एकच, या सगळ्यांना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी होती. त्यांनी आपल्या कुटुंबाचा किंवा परिवाराचा कधी ही विचार केलेला नाही. त्यांनी नेहमीच वसुधैव कुटुम्बकम समजले होते. त्यांनी स्वार्थी, आपमतलबीपणाने जर विचार केला असता, तर काय झाले असते ? या प्रश्नावर प्रत्येकाने विचारमंथन करणे गरजेचे आहे. मला पोटभर खायला मिळाले की मी दुसर्‍याचा काय म्हणून विचार करावा ? ही मानसिकस्थिती बदलून टाकणे महत्त्वाचे आहे. म्हणून संत तुकाराम महाराज यांचे " बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणऊनि " ही ओळ लक्षात ठेवल्यास देशात शांतता, समता आणि बंधुता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही एवढे मात्र खरे ?

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769

2 comments:

  1. सर नमस्कार..
    बुडती हे जन न देखवे डोळा या संत तुकाराम महाराजांच्या अभंग ओळीचा शिर्षक म्हणून समर्पक वापर.समजोद्धारासाठी आपल सारं आयुष्य खर्च करणार्या महात्म्यांच्या नामोल्लेखाने वाचन उत्सुकता वाढत जाते.आणी आजुन असतं तर बरं झालं असतं असं वाटतं.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...