धार्मिक स्थळी मोबाईलवर बंदी का ?
भारतात सर्वात जास्त पर्यटन कोठे होते ? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येथे धार्मिक स्थळ. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू दे. निसर्ग पाहण्यासाठी किंवा ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठीजाणाऱ्या लोकांची संख्या किती असू शकते ? हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच काही मंडळी अश्या ठिकाणी भेटी देतात. शाळेच्या सहली सुद्धा आयोजित केल्या जातात. सहसा त्या सहली ऐतिहासिक असायला हव्यात मात्र तसे बहुतेक शाळांतून होत नाही. म्हणूनच भारतातील ऐतिहासिक स्थळे आज ही उपेक्षित आहेत आणि त्या उलट धार्मिक स्थळे मात्र भाविक भक्तांनी ओसंडूनवाहत आहे. याच संधीचा फायदा घेणार नाही तो माणूस कसला ? प्रत्येक प्रसिद्ध असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी लोकांची खूप लूट चालू असते. कोणती ही वस्तू या ठिकाणी दामदुप्पट दराने मिळते. खास करून लहान मुलांसाठी ज्या खेळणी किंवा इतर वस्तू ठेवल्या जातात त्याचे भाव तर गगनाला भिडलेले असतात. येथे प्रत्येकजण भाविकांना लुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यात त्या धार्मिक स्थळांचे कमिटीवाले कुठे मागे राहतील. ते सुद्धा भाविकांना लुटण्यासाठी अनेक कल्पना तयार करतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. साधे चप्पल ठेवण्यासाठी येथे पैसा मोजावा लागतो. चप्पल टाकून कोणीही धार्मिकस्थळाच्याठिकाणी जाऊ शकत नाही आणि चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून त्यास सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. मात्र सध्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंदी घातली ते मात्र काही कळण्यासारखे नाही. दहशतवादी लोकं मोबाईलचा गैरवापर करून यापूर्वी अनेक दहशतवादीकारवाया केल्या म्हणून ही खबरदारी घेणे योग्य आहे, यात यत्किंचित वाड नाही. मात्र अश्या निर्णयामुळे लोकांना किती त्रास होतो याची कल्पना देखील कोणी करत नाही. सामान्य माणूस आपल्या आठवणी जपून राहाव्यात म्हणून प्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोबाईल द्वारे आपले आणि आपल्या नातेवाईकांचे फोटो काढण्याची इच्छा ठेवतो. त्यात काही चूक नाही. मात्र या कमिटींच्या लोकांनी मोबाईलवर बंदी टाकून सर्वाना पेचात टाकले आहेत. येथे देखील त्यांचा भाविकांना लुटण्याचा पूर्ण डाव असतो. आज मोबाईल ही प्रत्येक आवश्यक गरज बनली आहे. एका कुटुंबात साधारणपणे तीन मोबाईल झाले आहेत. दर्शनाला जाताना हे सर्व मोबाईल सोबत घेऊन घेल्यास तीन ही मोबाईल काउन्टर लाजमा करणे आवश्यक आहे ते ही दहा रुपये प्रति मोबाईल या दराने. म्हणजे हे लोकं आपल्या मोबाईलवर ( बिन भांडवलाचा धंदा आहे ) किती पैसे कमावित असतील याचा विचार जरी केला तर अंगावर शहारे येतात. परत प्रवेशाला एक दोन पोलीस वाले असतात ते सर्वाना चेकअप करून मंदिरात सोडतात. म्हणजे कायद्याचा धाक सोबतीला दिल्यामुळे याचा हमखास धंदा चालतो यात काही वाद नाही. म्हणजे भाविकांची लूट करण्यासाठी हे मंडळी एवढ्यावर थांबत नाही. भाविकांची फोटो काढण्याची भूक भागवावी म्हणून धार्मिक स्थळांच्या आतमध्य त्यांचे फोटोग्राफर ठेवतात आणि खूप मोठी रक्कम घेऊन त्यांच्या कडून फोटो काढले जातात. खरे तर सामान्य असलेला भाविक अशी कृती तरी करू शकतो का ? जागोजागी सिसिटीव्ही कॅमेरे लावून आपली यंत्रणा मजबूत करण्याऐवजी भाविकांना लुटण्याची ही क्रिया त्वरित बंद व्हायला पाहिजे. त्याउलट त्या स्थळांविषयी कोण चांगली माहिती आणि फोटो प्रसिद्ध करतो त्याची स्पर्धा लावून बक्षीस द्यायला हवं. मात्र तसे होत नाही. यावर प्रशासन गांभीर्याने विचार करून धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जे मोबाईल वापरण्यावर बंदी दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करावा आणि सामान्य भाविकांना सुखाने जगू द्यावे एवढंच सुचवावे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
No comments:
Post a Comment