Saturday, 21 May 2016

📕📗साहित्य दर्पण 📝🔏

💈💈द्वारा आयोजित 📺📻

📑📃साहित्य सेवा 🖊✏

भाग ::---पहिला (1ला)

खास कविता स्पर्धा
★★★★★★★★
21 मे 2016
वार :::-–-शनिवार
~~~~~~~~~~~~~~~
विषय :---मुक्त कविता
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक:-आप्पासाहेब सुरवसे
______________________
संकल्पना:--नासा येवतीकर
______________________
परीक्षक ---कवि मारुती खुडे
==================
[5/21, 7:44 PM] Surwase: 
*📚साहित्य दर्पण*📝

             द्वारा आयोजित


आजच्या *साहित्य सेवा* या अनोख्या *खुली कविता* स्पर्धेतील
सहभागी स्पर्धक

01] स्मिता देशपांडे
02 ]जागृती निखारे
03] हणमंत पडवळ
04] विशाल मोरे
05] नरेंद्र मस्के
06] बाबू डिसोजा
07]प्राची देशपांडे
08 ]आप्पासाहेब सुरवसे
09]संगीता भांडवले
10]अनिल लांडगे
11] सुभद्रा खेडकर
11] कुंदा ताई पित्रे
12]प्रविण सानप धुळे
13] वृषाली वानखेड़े
14]शशिकला बनकर
15]स्वाती केळकर
16 ]सुनंदा पाटिल
17] मंजूषा देशमुख
18 ]मीरा खेडकर
19 ] संदीप ढाकणे
20] प्रा .संगीता भालसिंग
21 ]मीना सानप
22] जयश्री पाटिल
23] कल्पना जगदाळे
24]निर्मलाताई सोनी
25] *निलेश आळंदे*
26] निलेश कवडे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि आभार

पहिल्या वहिल्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणां सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार.....!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏
साहित्य दर्पण
एडमिन कोअर कमिटी
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 9:11 AM] ‪+91 98905 67468‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी :
आक्टोपस :::
केवळ सत्तेसाठी
आमिषे भूलवित
स्वप्नांना झुलवित
अजस्त्र आक्टोपस
गिळत चाललाय
हळुहळू सारेच
सर्व दिशांनी वेढा
घेत काह्यात पूर्ण
करीत नामशेष
आपले विरोधक
सत्तेच्या लालसेने
पिसाटलेला हिंस्र
उपाय थकलेले
गलितगात्र देह
शरणागत पात्र
निव्वळ कारस्थाने
नामोहरमा बुद्धी
खेळी भलती धूर्त
सावध ऐका हाका
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 10:39 AM] ‪+91 96379 91478‬:
मुखवटा माझा

बोलतो जैसा मी
आचरणे तैसा
न कधी आणतो
जगा फसवितो

दाखवितो मी जो
चेहरा जगाला
मुखवटा माझा
रोज सांभाळतो

वाचे निंदा सदा
करतो सज्जनांची
आळवितो गाणी
मुखे दुर्जनांची

उभा जन्म माझा
स्वार्थातच गेला
अंती मृत्यू मात्र
हेलावुन गेला .

© स्मिता देशपांडे ....
       अ.नं .22
साहित्यसेवा मुक्त कविता स्पर्धे साठी.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 10:47 AM] ‪+91 86980 67566‬: '
ढोल वाजवीत ये घना'

ढोल वाजवीत येरे घना येरे घना
दाटल्या काळया आभाळी
वीज ओढते उभ्या आडव्या रेघा
व्याकुळ जीवा बघुनी फुटू दे रे पान्हा....ढोल..

लई तापली भुई झाली लाही लाही
विसाउनी झाडावर पाखरं वर पाही
चार थेंबाच्या आशेनं रोजचा दिस जाई
हिरमोड नको करु फेड तू दैना....ढोल..

सुकली पानं तशी रानं नि मनं
घोटभर पाण्यासाठी रोनोमाळ वनवन
आटली नदी उदास वाटते
धो धो बरसुनी भिजू दे परगणा......ढोल...

सुकल्या ओठांवर सुकली गाणी
कोरड घशाला डोळयात पाणी
अकांत भुईचा भिडू दे तुला
हिरव्या साजात मला नटू देना.....ढोल...

                          श्री.हणमंत पडवळ
             मु.पो.उपळे(मा.)ता.व जि.उस्मानाबाद.
              मो.  8698067566.
(मुक्त कविता स्पर्धेसाठी.)
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:08 AM] ‪+91 73877 37148‬:
📝मुक्त कविता स्पर्धेसाठी📝
     

   ❤अर्थ प्रेमाचा❤
आज पाहीले जेव्हा
तिला,
 खुप वेदना झाल्या मनाला,,
मि  एवढे प्रेम केले
जिला ,
आज ति पाहत सुद्धा नाही मला,,
का ति समजत नाही
मला,
का दूखवते ति माझ्या
मनाला,,

वेड लागलय प्रेमाच
प्रत्येकाला,
अम्रृत समजतात ते
प्रेमाला,,
पण? ? जेव्हा ठेच लागते ना मनाला ,
जहर म्हनतात मग तेच त्याला,
 अरे नका आपल रूद्य
देऊ कोनाला,,
नका नरकात घालू
स्वत:ला ,
काय असते प्रेम हे विचारा मला,,
अर्थ स्पष्ठ करून सांगेल
मि तुम्हाला,
ऐकनार माझ तर वाचवाल स्वत:ला,,

प्रेम हे लाभलय
सर्वांला,
पण
निभवता येत नाही प्रत्येकाला,,
निभवता आले
ज्याला,
खरा प्रेमी म्हनावे लागेल त्याला,,

जेव्हा कळेल हे प्रत्येकाला,,
नविन मार्ग मिळेल या दू:खी जिवनाला,,

📝📝📝📝📝📝
विशाल मोरे
७३८७७३७१४८
@५२
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:29 AM] ‪+91 95529 80089‬:
 दान
पत्ता द्या जरा चुकलेल्या सुखांना
तळ आधीच दुःखांनी मांडला आहे ।
जीवदान द्या कोमेजल्या पिकांना
वरुण धरणीवर रुसला आहे ।
उजेड द्या अंधारल्या झोपड्यांना
पुनवेचा चांद ढगाआड लपला आहे ।
वाट द्या नयनांतल्या अश्रुंना
कंठ नरेंद्राचा आज दाटला आहे ।
नरेंद्र म्हस्के , शिरपूर
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:31 AM] ‪+91 98603 14260‬:
 गृहिणीचा वावर असतो घरात
दिवसभर ती संसारासाठी कष्ट करते
परि तिच्या कष्टांना मोल नसते सारा वेळ घरातच अशी सर्वांची भावना असते

धुणीभांडी फरशीला बाई असते
दिवसभर ही काय करत असते?
 प्रश्न असतो सर्वांच्या मनात
परि कष्टाला तिच्या मोल नसते

आलागेल्यांची उस्तवार करत असते
विन्मुख कुणाला पाठवत नसते
दमणूक होते तरी हसातमुख असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते

मुलगी,सून ,पत्नी, आई
 सासूची भूमिका निभावत असते
नातवंडाची जबाबदारी घेत असते
हवंनको सारं पहात असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते

गृहित तिला धरले जाते
"गृहिणी "पदवीधारक ठरते
सारे घर आवरुन ठेवते
 परि कष्टाला तिच्या किंमत नसते

दुखले खुपले सर्वांचे करते
नातीगोती जापत असते
घराला घरपण तिच्यामुळेच असते
परि कष्टाला तिच्या किंमत नसते

घरात असताना कुणालाही
 तिची किंमत कळत नाही
घरापासून दूर जाताच तिची
किंमत सर्वांना कळत असते
 प्राची देशपांडे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 11:34 AM] ‪+91 98905 67468‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी :
आक्टोपस :::
केवळ सत्तेसाठी
आमिषे भूलवित
स्वप्नांना झुलवित
अजस्त्र आक्टोपस
गिळत चाललाय
हळुहळू सारेच
सर्व दिशांनी वेढा
घेत काह्यात पूर्ण
करीत नामशेष
आपले विरोधक
सत्तेच्या लालसेने
पिसाटलेला हिंस्र
उपाय थकलेले
गलितगात्र देह
शरणागत पात्र
निव्वळ कारस्थाने
नामोहरमा बुद्धी
खेळी भलती धूर्त
सावध ऐका हाका
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 12:17 PM] Surwase:
📝-----कविता ---- 📋

★★आई ★★

शिसारी लागता
आन - पाणी जाईना
व्याकुळ जीव होई
परी काळजी करी सजना ||१||

उदरात उमलते कळी
मारते पाय ठाव घेत
गरा गरा फिरुनिया
आनंद देई स्वर्गवत ||२||

घडावे शिवबा,लहू, फुले ,शाहू
वाचतसे पुस्तक गर्भसंस्कार
रमाई,अहिल्या,सावित्री,जिजाऊ
ऐसे उदरी जन्मावे रत्न वीर ||३||

नऊ महीने नऊ दिवस
कठीण यातना, हाल सोसवत
गर्भवतीस विचारावे चार
पावले चालण्याची किंमत ||४||

सृजनशील स्त्री जन्मा जीवनी
उतराई वाटे तव बनून आई
बाळाचा टै टै टाहो पडतो कानी
धन्य धन्य ती माऊली होई...!!!
|| ५||

✍🏼🖊🖋🎯🖋🖊

श्री. आप्पासाहेब सुरवसे
        लाखणगांवकर
AMKSLWOMIAW
""साहित्य सेवा दर्पण '"
****स्पर्धेसाठी***
   🌹 AK 47 🌹
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 1:40 PM] ‪+91 99234 45306‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी


।।माझी माय।।
पहाटेच्या पा-यामंदी
जवा झाकाळ असते
अंगणात माझी माय
सडासारवण करीते
सारं गाव झोपीत असते
माय गुरांना चारा चारते
सडाशेणाचं सारवण
भिंती पोतिरा ओढीते
दारी रांगोळी काढीते
देवाचा देव्हारा पुजीते
दोन्हीसांज माझी माय
तवा भाकर थापीते
तिच्या तव्यावर जणू
आकाशीचा चांद हासे
दिसभराची थकुन
माय रानातुन येते
चिमुकली कुशीत घेऊन
सुख स्वर्गीचे भोगीते
            .....संगीता भांडवले(१६)
      मु.अ.प्रा.शा.शेंडी ता.वाशी
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 1:42 PM] ‪+91 96896 75050‬:
 साहित्य सेवा मुक्त कविता स्पर्धेसाठी...

‘पाणी वाचवा'

थेंब थेंब पाण्यासाठी,
माऊलीचा आटापिटा।।
भरेना कधी माठ-रांजण,
किती घालूनीयाही खेटा।।

थेंब थेंब पाण्यात कसं,
महत्त्व जीवनाचं दडलयं।।
केल्याने छळ निसर्गाचा,
दर्शन दुष्काळाचं घडलयं।।

घोटभर पाण्याच्या शोधातं,
मायमाऊली फिरे अनवाणी।।
ओळखूनी भविष्यातला धोका,
थेंब थेंब वाचवा रे पाणी।।

थेंब अन् थेंब पाण्याचा,
आता जमिनीत जिरवा।।
पाळाल हा मंत्र तरचं,
राहील जीवनात गारवा।।

✒अनिल लांडगे उंडणगाव,@27
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
9689675050/9021261820
©copy right
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:17 PM] Kunda pitre:
साहित्य दर्पण
🍁🍁🍁🍁
मुक्त कविता --- स्पर्धा
✍✍✍✍✍✍
प्रेषक ---- कुंदा पित्रे (46)
=================
==अश्रू==

फक्त दोन अश्रू
  झपाटलेला पाऊस--
छप्पर कललेल्या डबक्यात
डोईवर फाटक्या पदरात
काड्या झालेल्या हातापायात
तपेल्या,कथेल्या छपरांच्या
                         आधारात!
भिजलेला रूपया थरथरणारा हात
                 चटणी मिठाच्या वाटेत
पण अमलींच्या अधिकारात
        असतात फक्त दोन अश्रू!
थरारलेला पाऊस--
बादशाही फरशी, कंच रूजाम्यात
मऊ आयाती वरत्र प्रावरणात
साकळलेल्या दुधा फळांच्या देहात
सजवलेल्या फुलदाण्यात
        जमलेल्या परदेशी संस्कृतित
निळ्या नोटा--
        चायनिज धाब्याच्या शोधात
माणुसपण हरशलेल्या घरकुलात
       असतात फक्त दोन अश्रू!
ढगाळलेला पाऊस---
अनेक चौकोनी कुटुंबात
    ओल्या पानातून
    थिबकणारा थेंब साचतो
   कुंद सांद्रावली हवा साचते
आर्जवी संगीत,
         जमलेली मैफल भावते
निर्लोभी मन ,
           व्याकुळत भिरभिरते
पण, पण पाकोळी प्रेमाचे--
               क्षण नाही गवसत
असतात फक्त दोन अश्रू !
सांगाल कां कुणी ---
            या दोन अश्रूंचा अर्थ ?
       न दिसणा-या अश्रूंचा अर्थ?
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:17 PM] ‪+91 94035 93764‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी
🙏  पंढरी🙏
बाई पंढरी पंढरी कोण्या गवंड्यान बांधली
बाई रुख्मिणमाता डाव्या भुजाला मांडली।।
बाई पंढरी पंढरी घोकू नाही वेड्यावाणी चंद्रभागा तुझ पाणी धावा घेत घोड्यावाणी।।
भरली गं च्ंद्रभागा कुणीकड जाती बघा
सा़वळा गं माझा हरि पुलावर उभा।।
बाई पंढरी पंढरी दुरुन दिस काळी निळी ।।
विठ्ठलाच्या माडीवर जनाबाई बुक्का दळी।।
🌺खेडकर सुभद्रा बीड (२०) मो९४०३५९३७६४
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:40 PM] ‪+91 94036 17701‬:
साहित्य दर्पण
             🍁🍁🍁🍁

        मुक्त कविता --- पाऊस
          ✍✍✍✍✍✍

    ====================



शब्दात भिजलेला पाउस होता
पावसात भिजलेले दोघे आपण

आणि मनातला ओलावा आजुनही सांगतोय
गेल्या वर्षीच्या पावसाची खूण


भिजलेली पायवाट, भिजलेले ऊन
नव्यानेच पुन्हा फुलत होतो दोघेही, प्रत्येक सर अंगावर घेउन

आता पुन्हा वेध लगाल्येत, त्या ओल्या कस्तुरिचे
नकळत मिठीत घेणार्या, धूर्त शहाण्या पावसाचे



*प्रविण सानप*
*धुळे*
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 2:55 PM] ‪+91 97636 67401‬:
 मुक्त कविता स्पर्धेसाठी

शेतकरी दादा

माझा शेतकरी दादा
लावी मातीचे उटणे
येता सर्वांगाला घाम
आंघोळीने ते नटणे

पिक शेतात लावून
त्याला जिवापाड जपणे
येता पिकाला बहर
लहर सुखसमृद्धिला येणे

ज्वारी बाजरी गहू
आज्जी आजोबा पाहू
ऊस आणि मका
जिवाभावाचा सखा

बटाटा टमाटा काकडी
बहिण धिराची वाकडी
डाळिंब द्राक्षे मैतर प्यारे
परदेशी म्हणती चला रे...

हरभरा चवळी वाल
रांगणार्या लेकरांची
तिरकी चाल
वाटाणा सोयाबीन
जुळी लेकरं गुणवानं

सार्या शिवारी जमले
सोयरे धायरे...
देति जिवाला जीव
मैतर माझे प्यारे

आला अवकाळी पाऊस
केली त्याने नासधूस
झाली गारपीट, उडे त्रेधातिरपीट..
माझं हिरवं शिवार
झालं काळठिक्कर

आसवांचे वाहिले पाट
मन केलं आता घट्ट
करू परत पेरणी
मनं होतील तरणी
सारी देवाची करणी
तोच देईल आधार
नको होउस बेजार



© सौ. शशिकला बनकर, भोसरी
@35
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:03 PM] ‪+91 99214 24125‬:
 🌴 आठवण🌴

आठवण तुझी येता*
मन तुझ्यात शिरते
शब्द ह्रदयी दाटते
जिव अलगद कापते**

आठवण तुझी येता*
वाट कालोखी वाटते
नाद मंदीरी घुमते
साथ तुझी ते सांगते**

आठवण तुझी येता*
आसवान्ना जाग येते
न ओंजल अश्रुंची वाहते
सात फेरे ते स्मरते**

आठवण तुझी येता*
सुर पाव्यात विरते
द्रीश्स्ट कु ण।ची लागते
गाठ जन्माची तूटते***

आठवण तुझी येता*
सांज वेली ती भासते
दिशा कुंपणी शोधते
तुझ्याविना मी जगते**

 वृषाली वानखडे*
    अमरावती.
  🙏🏻 स्पर्धेसाठी🙏🏻

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:19 PM] ‪+91 98702 51951‬:
मुक्त कविता स्पर्धा
        '-___अनुराग -__

 तू झटकन् जातेस रागावून निघून!
पुन्हा कध्धी येणार नाही,निक्षून सांगून!
उरतो मी एकटाच,घेतो माझ्यामध्ये गुरफटून!
तू हसत नाहीस का बोलत नाहीस,
माझ्याकडे तर पहातच नाहीस,
कारण रागाचा तवंग अजून
      डोळ्यात असतो,
आकाशातला फुगा,खाली यायला
      तयार नसतो!
पण मला माहीत असते,
तुझ्या नजरेचे पक्षी,माझ्याभोवती
     फिरत असतात!
त्यांची होणारी फडफड,
श्वास निश्वासांची धडपड,
बघून मला कीव येते,
तुझी सारी तडफड!
कुठेतरी वाटत असते,
हे सारे संपून जावे!
पण कुणाचा राग काढणे,
मला कधीच जमत नसते;
दिवस असाच जाणार?
   शंकेची काजळी धरते!!
पण,ध्यानीमनी नसता अचानक,
तुझ्या शब्दांची बरसात होते!
"बोलायच नाही का?"
ओठातील माघार थरारून जाते,
राग वितळलेल्या डोळ्यात तुझ्या
         पाणी येते,
त्यात माझ्या एकटेपणाची
आग केंव्हाच विझून जाते!
आग केंव्हाच विझून जाते!!!

स्वाती केळकर, दादर मुंबई २८
*************************
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:40 PM] ‪+91 84220 89666‬:
 झोपडीचचयाया नभातून टपटपतो पाऊस
घेतो गाडी मडकी त्यात झेलतो पाऊस

माय वलीचिब माझी शिवारातून परते
तेच धडुते पिळून  लाज अंगाची झाकते

भिजलेला काडीफाटा शिलगता शिलगेना
ऊब घरटयास नाही आग लाकडा लागेना

फुकणीनं फुकताना धूर भरला घरात
 तवा रानीचा पाऊस दिसे मायेच्या  डोयात

एक वला  एक कच्चा घास जाई घशाखाली
वला मायेचा पदर माझी वाकय झालेली

दामिनिचया उजीडात रात   डोयात काढली
झुंजू मुंजू  होताहोता धार पाण्याची  वाढली

सकाळीच उठताना पाहीन चकमक गाव
पाण्यावर  डगमगे माझ्या  झोपडीची नाव

दूर राहीला किनारा गाव राहीलारे दूर
पाण्यामधी मिसळला  माझ्या  आसवांचा पूर


सुनंदा  पाटील
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 3:49 PM] ‪+91 94228 84140‬:
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
  🌹 *मुक्त* *कविता* *स्पर्धेसाठी*🌹

             *पाऊलखुणा*
========================

वाटतात ओळखीच्या,
वाटेवरील ह्या पाऊलखुणा
हसत बागडत असतांना
पडतांना तर कधी
सावरतांना च्या ह्या आठवणी जुन्या,
लडिवाळ त्या हट्टीपणाला
आवरतां ना च्या खुणा,
कधी हसणे तर कधी रडणे
कधी तर नुसतेच रुदनाचे स्वर,
तरी चरचर काळीज तुमचे
फटतांनाचा तो आवाज जुना,
कधी सरले दिस ते आणिक
कधी उमटल्या उभरणीच्या खुणा,
बघता -बघता  कधी परके झाले  ?
आपले सर्व दूर झाले
घरटे मजसाठी दुसरे शोधू लागले ,
का मला म्हणती परकीआता  ?
   भिजविलेले कुंकू लाल त्यात,
  उमटवित गेली मी  माझ्या
पावलांच्या खुणा,
भावले जरी सर्व मनास तुमच्या
मज , आपले पणाचा सूर
गावेना ,
कोण आपले ?आणी कोण परके ?
शब्दां चा ह्या अर्थ कळेना,
या सर्व चालिरितिं मध्ये
अस्तित्व माझे मला मिळेना,
   एक दिवस तो हि आला ---
संपून बाह्य शृंगार गेला
 अस्तित्व माझे संपवून गेला,
 अनंत यातना मज मनी झाल्या,
कुठे सरल्या त्या पाऊल खुणा---
ज्या मला पोरके करुन गेल्या
  ना होते मी लाडकी कुणाची ना होता आता
 सांभाळनारा  कोणी धुरा
  का मला स्वत:चे अस्तित्व नसते?
  जो हि आला तो फक्त हक्क बोलून गेला------
   हक्क बोलून गेला.

=========================
सौ● *मंजुषा* *देशमुख* @४०

         *अमरावती*

        ९४२२८८४१४०
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:05 PM] ‪+91 99234 93375‬:
कविता स्पर्धसाठी
****************
दुष्काळ
*******
जेव्हा दुष्काळ पडतो
तेव्हा भेगा जमिनीला पडतात
व कळजाला पडतात
तरी मानवा एक तरी झाड लाव!
विहीरीचे पाणी तळ घाठले
अश्रु कोरडे वाहू लागले
प्राणी पक्षी फिरू लागले
मानवा एक तरी झाड लाव!

डोईवर सुर्य ओकतो
रान पाखरे मुके होतात
गावो गावी खडोपाडी
पाण्यासाठी शुकशुकाट
मानवा एक तरी झाड लाव!

गायी गोठे सपाट झाल्या
कत्तलखाने रंगून गेले
दुभत्या म्हशी मोकाट झाल्या
तर कुणाच्या गळ्यात फाशी
मानवा एक तरी झाड लाव!
   मानवा एक तरी झाड लाव!
***********************
मिरा खेडकर (6)  9923493375
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:13 PM] ‪+91 94035 93764‬:
मुक्त कविता स्पर्धेसाठी
🙏  सुख   🙏
सुखातच सर्व काही असत
दुखातही खुप काही असत
फक्त ते समजून घ्यायच असत
दुखात मला खुप काही समजल
सुखात सगळे एकत्र येतात
दुखात मात्र एकट्याला सोडतात
स्वतची जाणीव होते दुखात
कोण आपल असत आणि
कोन आपल नसत यासाठी
दुखाला जवळुन पहाव लागत
माझ्या जीवनातसुखही आली
आणी दुखही आली
तरीपण सुखापेक्षादु खाची
संख्या जास्त होती        
मग मी दुखालाहीआपलस केल
मग सुखही हळुहळु येऊ लागली
मला कळुन चुकल होत
दुखाला सामोर गेल्याशिवाय
सुख येत नसत
दुखातही खुप काही असत
फक्त ते जाणुन घ्ययच असत
फक्त ते जाणुन घ्ययच असत🙏🙏🙏🙏
खेडकर सुभद्रा बीड (२०)मो९४०३५९३७६४
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:22 PM] ‪+91 75885 12467‬:
साहित्यसेवा काव्यस्पर्धाकरिता-

📝माझी कविता✍🏻

🌧🌳 दैना 🌳🌧

वाट तुझी पाहताना
जिंदगी उधार झाली
पर तुला मात्र दया
कधीच नाही आली.

डोळ्यातल्या पाण्यानेही
केला आता दुरावा..
संसाराच्या बाजारात
जीव माझा साडंला.

भेगाळल्या भुईपरी
नशीबाच्या फाटल्या रेषा
उन्हाच्या या काहिलीने
मनात जाळ पेटला.

साऱ्या जिंदगीचा मी
असा आक्रोश केला,
पर तुझ्या डोळ्यात
पाण्याचा थेंब नाही आला.

वाट तुझी पाहताना,
आता जीव जाईल रे.
तू नकोच बरसू आता
अश्रुने भिजविल रान रे.

हाल माझे पाहून देवा
येईल का थोडी दया
जगण्याची झाली दैना
मरण तू देईना.

✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
औरंगाबाद.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:32 PM] 25 भालसिंग संगिता:
साहित्य दर्पण

काव्य स्पर्धा

🌷🌷🌷🌷🌷🌷

मोकाट कुत्रे
*********************
भुकेलेले मोकाट कुत्रे
रस्त्यारस्त्यात दिसतात ...
संधी मिळताच दिन-रात्री
तनामनाचे लचके तोड़तात ...

कितीही जपून गेले तरी
कधी कधी अनर्थ घडतात
अशा परिस्थितीत आधी
अबलेलाच दोषी धरतात ...

वेळ आली आता,शेवटी
भटकी कुत्री मारायची ...
घट्ट शृंखला तोडून-मोडून
अबलेला सबला करायची ...

********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग (25)
अहमदनगर
21में2016
spsfun.com
स्पर्धेत सहभागी रचना
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 4:36 PM] ‪+91 84220 89666‬:
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मुक्त  काव्य  स्पर्धेसाठी

झोपडीतला पाऊस

झोपडीच्या नभातून, टपटपतो पाऊस
घेतो गाडगी मडकी, त्यात झेलतो पाऊस

माय वलीचिंब माझी, शिवारातून परते
तेच धडुते पिळून,  लाज अंगाची झाकते

भिजलेला काडीफाटा, शिलगता शिलगेना
ऊब घरट्यास नाही, आग लाकडा लागेना

फुकनीनं फुकताना, धूर भरला घरात
तवा रानीचा पाऊस दिसे मायेच्या डोळ्यांत

एक वला एक कच्चा, घास जाई घशाखाली
वला मायेचा  पदर, माझी वाकळ झालेली

दामिनीच्या उजिडात, रात डोळ्यात  काढली
झुंजूमुंजू  होताहोता , धार पाण्याची वाढली

सकाळीच उठताना,  पाही टकमक गाव
पाण्यावर डगमगे, माझ्या  झोपडीची नाव

दूर राहिला किनारा,  गाव राहिला तो दूर
पाण्यामधे मिसळला, माझ्या  आसवांचा पूर !!
__________
सुनंदा पाटील
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 5:46 PM] ‪+91 94237 15865‬: 🕯🕯🕯
दिप🕯🕯🕯

अंतरीचा दिप मालवू नको रे
गीत  विरहाचे ऐकवू नको रे
चाहुल तुझ्या  पाऊलांची
वेड लावी जीवाला
अजुन तिष्ठत उभी
धीर देई मनाला
डाव असा असा अर्ध्यावरी
          मोडू नको रे------
अंतरीचा दिप मालवू नको रे
भाबडी मी मनाची
आहेच स्वप्न वेडी
पंख लावुनी झेप घ्यावी
तुझ्या सवे विहरावे
स्वप्नांची माला अशी तोडू नको रे
अंतरीचा दिप मालवू नको रे
नको चिंता या वेडीची
रात्र आहे सोबतीला
काजव्यांचा नाद रिझवी
माझ्या वेड्या मनाला
अशा कातर वेळी सावलीला
दुर लोटू नको रे-------
अंतरिचा दिप मालवू नको रे
देश रक्षणाचे कर्तव्य
आहे भावनेहुनी थोर
परी रात्रंदिवस मनी घोर
गनिमास सोडू नको स्वैर
तराणे एकले पणाचे छेडू
नको रे------------
अंतरीचा दिप मालवू नको रे

***********************
मुक्तकविता स्पर्धेसाठी
सौ. मीना सानप  बीड@7
मो.नं.--9423715865
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 5:50 PM] ‪+91 99214 24125‬:
🌴 *आठवण*🌴

======================
   *कविता* *स्पर्धेसाठी*

======================

आठवण तुझी येता*
मन तुझ्यात शिरते
शब्द ह्रदयी दाटते
जिव अलगद कापते**

आठवण तुझी येता*
वाट काळोखी वाटते
नाद मंदीरी घुमते
साथ तुझी ते सांगते**

आठवण तुझी येता*
आसवांना जाग येते
न ओंजळ अश्रुंची वाहते
सात फेरे ते स्मरते**

आठवण तुझी येता*
सुर पाव्यात विरते
दृष्ट कुणा ची लागते
गाठ जन्माची तूटते***

आठवण तुझी येता*
सांज वेळी ती भासते
दिशा कुंपणी शोधते
तुझ्याविना मी जगते**

 वृषाली वानखडे* ७५
    अमरावती.
  🙏🏻 स्पर्धेसाठी🙏🏻

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 6:44 PM] ‪+91 99219 67040‬:
🌹मुक्त कविता 🌹
       ★स्पर्धेसाठी★

         *अंकुर*
==================
बीज कुशीत रुजलं
आनंद फार झाला
"तो" का "ती" असेल
जीव  चिंतातुर झाला

घर आनंदून गेलं
करती सारे नवस सायंस
घेती सारे काळजी तिची
"तो"ची साऱ्यास हवसं


गर्भापासूनच विरोध
ना कळे मज अजुन
"मुलगी" नको- नको
मात्र बायको हवी सजून धजुन

एक दिवस असा
स्त्री प्रधान संस्कृतीचा येईल
अन् मग तेंव्हाच
नर भ्रूण हत्या होइलच...!!!!!
******************* ***

सौ. कल्पना जगदाळे-घिगे
           बीड
             @8★
==================
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 6:48 PM] Nirmala soni:
स्पर्धेसाठी...

तू जर आयुष्यात आलीच नसतीस तर...

श्रावण हा बेधुंद होवून बरसला नसता,
गंध फुलांचा चहूकडे दरवळला नसता,
ओढ चंद्राची कुठे मनास राहिली असती,
सागर ही प्रेमवेडा होवून खळाळला नसता...

तू जर आयुष्यात आलीच नसती  तर....

ग्रीष्मांत कधीच वसंत मोहरला नसता,
रेशमी केसात हा मोगरा बहरला नसता,
दुनिया सुरेख स्वप्नांनी सजली नसती,
मग प्रेमात कुणी कधी जिंकला नसता..

 तू जर आयुष्यात आलीच नसती
तर...

निर्मला सोनी.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 7:01 PM] 234 Nilesh aalande:
सांग ना रे का...??

का रे असं कोण
जवळ येत ईतक्या
स्वत:लाही नसते
परवानगी खोलवर जीतक्या...

का रे असं कोण
होऊ देत नाही परक
एकटे असताना आपण
आठवुन देत सारख...

का रे असं कोण
सोडुन जात हात
विसरुन जातो कसा
जन्मोजन्माची साथ...

का रे असं कोण
विनाकारण सोबतीला येत
कारण नसताना मग
नकळत सोडुन जात...

का रे अस कोण
मनात घरट करत
गरज खरी ज्यावेळी
त्याचवेळी परक करतं..

निलेश सु.
==================
★★★★★★★★★★
~~~~~~~~~~~~~~~

[5/21, 7:03 PM] 223 Nilesh kawde:
 स्पर्धेसाठी

माय. . .
दिली सूर्यानं जांभई
त्यानं झाकट पडली. . .
माय घराच्या वाटेनं
वावरातून निंगाली. . .

तिनं कावड खोललं
घरी अंधार दिसला. . .
सांजवेळी देव-यात
एक दिवा पेटविला. . .

टेंबा मातीच्या तेलाचा
सपरीतल्या दारात. . .
माय लावून निंगते
घाई घाई रंदानात. . .

प-हाटीच्या दोन चार
काड्या चुलीले चारते. . .
पोटापुरता चुलीत
तव्हा उबाय पेटते. . .

जव्हा निजते विस्तव
माय मारते फुंकर. . .
जाई धुपट डोयात
तिची भाजते भाकर. . .

दारं खिडक्या सोडून
रंदानातले धुपट. . .
जाई मायच्या डोयात
किती वागते उपट. . .

चांदण्याईची वदर
मस्त बसते पंगत. . .
त्याच उजेडात आमी
खाली बसतो जेवत. . .

तिच्या जुन्या लुगड्याची
घेतो  ओढून वाकय. . .
वाकईच्या उबीमुळे
जाई हिवाळ्याचं भय. . .

माय झाकटी उठून
करे सडा सारवण. . .
विस्तवावानी तापाच्या
तिचं जळते जीवन. . .

काम करता करता
तिची राह्यते न्याहरी. . .
माय वावरात जाते
भूक ठेवुनिया घरी. . .
. . . निलेश कवडे अकोला

======================
★★★★★समाप्त ★★★★★
~~~~~~~~~~~~~~~~~~


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...