Friday, 22 January 2016


~~~~ साहित्य मंथन ~~~~~
            Φ  द्वारा Φ
📢🔈काव्य मंथन🔈📢

चारोळी स्पर्धा
=====================
     विषय:--प्रजासत्ताक दिन
=====================
मोकळ्या हवेत लहरताना
तिरंग्याचा अभिमान वाटतो
प्रजासत्ताकाचं वरदान घेऊन
प्रत्येक भारतीय इथं जगतो..

त्रिभुवनी या राष्ट्राचा
असाच डंका वाजत राहो
तन-मन-धन अर्पण केलं ज्याला
तो प्रजासत्ताकदिन चिरायू होवो
          ✒✏
    डॉ.विशाल शेटे


झाला भारत मुक्त आता
नाही राहीला कुणीही गुलाम
भारत भू च्या विर शहीदांना
साहित्यमंथन चा सलाम ।
  📝✏✒✏📝
    @ अरविद कुलकर्णी

2).....
      प्रजासत्ताक दिनाला कौतूक
      शूर बालक-बालिकांचे
       हत्तीवरून शोभे मिरवणूक
        फिटे पारणे डोळ्यांचे

           ✒✒
        जयश्री पाटिल
***************************
,
5)
 गुजरातच्या विद्यार्थ्यांना स्मरूण
 कंठ दाटतो गळ्या
प्रजासत्ताकदिनाच्या मिरवणूकीत
निजल्या होत्या कोमल कळ्या

      ✒✒✒✒
       जयश्री पाटील
=====================
राजपथावरील संचालन पाहून ,
विरोधी राष्ट्राच्या पोटात येतो गोळा,
शूर सैनिकांच्या मुळेच रंगतो ,
प्रजासत्ताक दिनाचा सुंदर सोहळा
        ✏✒
@ बाबाजी गोडसे ,नवी मुंबई

1)प्रजासत्ताक दिन उत्सव,
नव्हे केवळ दिस सुट्टीचा!
अधिकार सार्वभौमत्वाचा,
जगती सन्मान या देशाचा!

              रामराव जाधव.
2)
भारतीय प्रजासत्ताक चिरायु राहो,
यास्तव दक्ष राहे सैनिक आष्टोप्रहर!
पण जे लोभी साथ देतील अतंकाला,
पाडुन बुरखा, चढवु त्यांना फासावर!
             ✏✒✏
                  रामराव जाधव.

शान आपुल्या हक्कांची,
स्वातंत्र्य अन् शक्तिची.
प्रजासत्ताक दिनी आनंदे,
गाणी गाऊ मुक्तिची.
   ✏✒✏
     डॉ.सुधीर अनंत काटे,
          निगडी,पुणे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
📚📚साहित्यमंथन 📚📚
                    आयोजित
🎤🎤काव्य मंथन🎤🎤

📋📋चारोळी स्पर्धा📋📋

विषय:- प्रजासत्ताक दिन
----------------------------------------
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनावर
ISIS च्या हल्ल्याचे असे सावट
गुप्तचर यंत्रणांची असे करडी नजर
दूर करती दुष्ट दुश्मनांचे कावेबाज कपट

         ✒🎯🎯🎯✏
       आप्पासाहेब सुरवसे
          लाखनगांवकर
*****************************
प्रजासत्ताक भारताचे संविधान
लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर
जगी असे विश्वरत्न महान
म्हणून तया म्हणती शिल्पकार

         ✒🎯🎯🎯✏
     श्री.आप्पासाहेब सुरवसे
             लाखनगांवकर
====================
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भारत मातेच्या विरानी
स्वातंत्र मिळवून दिले..!
पारतंत्र्याचा पाडूनी फडशा
प्रजासताकदिनी तिरंगे फडकवले..!!
✏_______ ✒✏
       गजानन पवार

==≠==================
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्याची गाऊन गाथा
दिन प्रजासत्ताक साजरा झाला ..!
देशाची शान तिरंगा शोभला,
शुरविरांचा सन्मान केला..!!
✏______ ✏✒
गजानन पवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्पर्धेसाठी. .
1)
झटले जे हुतात्मे देशासाठी,
ती लढाई होती स्वाभिमानी,
प्रजासत्ताकाच्या दिनी आठवू,
ज्यांनी तिरंगा दिला अभिमानी..
×××××××××××××××××××××
2)
सलाम वीरा, तुझ्या धैर्याला,
आमच्याच साठी तू लढला,
झेलून वार शत्रूंचे हृदयावरी, मान तिरंगाचा तू राखून गेला ....

''प्रजासत्ताक दिन चिरायू हो
       ✏✒✏✒
        निर्मला सोनी.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताकाने दिले हक्क
आले प्रजेचे देशावर राज्य
 लोकहो विसरू नका कर्तव्य
देशसेवेसाठी रहा सदा सज्ज
         ✒✏
       अंजना कर्णिक
###@#$$$$$$$###@@
गणराज्य व्हावे सुराज्य
होते ध्येय आंबेडकरांचे
 पण देशात माजलेत भ्रष्ट
  गाडूया इरादे  भ्रष्टाचारींचे।
✒✏✏
अंजना कर्णिक
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
काव्य मंथन चारोळी स्पधाॅ.

1)शूर वीरांच्या शौयाॅनी
   तिरंगा लहरतो गगनी
     अभिमान बाळगावा भारतीयानी
    त्यास फडकत ठेवू कतॅव्यानी.
*****************************
2)झेंडावंदन आणि संचलन
   होती प्रजास-ताक  दिनी
   अमरजवानांचे बलिदान
आठवत राहू ध्यानीमनी.
      *✏✒✏****
         सुलभा कुलकणीॅ
++++^^^^++++****&+
साहित्य मंथन

चारोळी स्पधाॅ
1)प्रजास-ताक दिन 26जानेवारी
   तिरंगा फडके उंच काठीवरी
   भाषणे होती दारोदारी
    रजेचा लाभ घेती कमॅचारी.
*****************************
2)थोर मंडळीनी भोगला तुरूंगवास
     परकीयांच्या शृंखला  झुगारूनी
  दिली प्राणाची आहूती, एकच मनी आस
ध्वज ऊभारू या प्रजास-ताक दिनी.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
-- प्रजासत्ताक दिन --
1. समाजातील अन्याय रोखुनी,
    शिवरायांनी दिले स्वराज्य,                                  मना-मनातील वादळ शमवुनी,
    भीमरायांनी दिले गणराज्य.

"""""''"'''''''''''''''''''''''''''''''''''''''''""""""""""""""
2. हाकलुनी लावून इंग्रजांना,
    स्वातंत्र्याने घडविली क्रांती,
    समानतेने वागवून सर्वांना,
    गणराज्याने आणली शांती.
           ✏✒
      _क्रांती एस. बुद्धेवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🌸चारोळीस्पर्धा 🌸
  विषय- "प्रजासत्ताक दिन"
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

१) "प्रजासत्ताकाचे पोवाडे,गाती सनई चौघडे,
दारोदारी रांगोळया अन मांगल्याचे सडे,
यासमयी पुण्यस्मरण शहिदांचे घडे,
अभिमानाने गगनी तिरंगाही फडफडे."

२)"पासष्टी पार केलेली प्रजासत्ताक,
आता तरी लोकाना सर्वार्थाने कळावी,
कर्तव्य आणि अधिकार बजावताना,
प्रजेची सत्ता प्रजेला मिळावी."

- संगीता देशमुख, वसमत
 
स्पर्धेसाठी👆🏼
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🌸चारोळीस्पर्धा 🌸
  विषय- "प्रजासत्ताक दिन"
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

१)

स्वातंत्र्य , समता आणि
मनात बंधुता ठेवू.....
प्रजासत्ताक दिनी आपण
ऐवढीच शपथ घेवू..


2)

प्रजासत्ताक दिनाला...प्रश्न
विचारा स्वत:च्या मनाला..,
गुलामीची वागणूक आपण
देत तर नाही ना कुणाला..?

     ✏✒✏✒
- योगेश पुंडलिक देवकर
  साखरखेर्डा .
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तिरंगा आहे आमुचा छान
फडकत राहतो गगनात
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
साजरा करतोत उत्साहात
✒✏📋✏✒
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
==साहित्यमंथन==
        🌺चारोळीस्पर्धा🌺
       विषय--प्रजासत्ताक दिन
     🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
1)  प्रजासत्ता देशात यावी!!
      इरादा खुप होता चांगला
      किती घटना,बदलावी !!
      पणआशयच सारा भंगला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2) प्रजासत्ताक दिनी
               तिरंगा लहरतोआहे!!
      जवान सीमेवर
              प्राणबाजी लावतायत!!
      इमादारी धोक्यात
                फसत अडकते आहे
       बलात्कारी,अतिरेकी
              दबा धरून बसतायत!!
         ✏✒✏✒
             प्रेषक--कुंदा पित्रे
             🍁🍁🍁🍁🍁
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


संकलन :----------
       श्री .आप्पासाहेब सुरवसे
                  लाखनगांवकर


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳






No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...