Sunday, 17 January 2016

 📝📄 साहित्य मंथन 📄📝
            आयोजित 
🚦🚦विचार मंथन 🚦🚦
~~~~~~~~~~~~~~~~~
भाग क्रमांक :-   39
~~~~~~~~~~~~~~~~~
विषय :- दुष्काळ "शेतकऱ्यांच्या" मुळावर

स्पर्धेतील सहभागी सन्माननीय सदस्य
1) श्री संदीपजी पाटील, नांदेड (सुंदर  कविता)
2) जयश्री ताई पाटील ( सुंदर लेख )
3) श्री उत्कर्षजी देवणीकर सर स्पर्धेसाठी नाही (सुंदर लेख व कविता )
4) श्री कवी राजेंद्रजी कामुलकर (सुंदर कविता )
5) निर्मलाताई सोनी  ( सुंदर कविता )
6) श्री रामरावजी जाधव काका  (सुंदर कविता )
7) संगीताताई देशमुख, वसमत  (सुंदर लेख)
8) श्री मारुतीजी खुडे सर  (सुंदर लेख )
9) श्री आप्पासाहेबजी सुरवसे सर  (सुंदर लेख )
10) सुलभा ताई कुलकर्णी, बोरिवली  (सुंदर लेख )
11) श्री निलेशजी आलंदे सर  (सुंदर लेख )
12) श्री नागोराव सा.येवतीकर सर  ( सुंदर लेख )
13 ) श्री गजानन पवार स्पर्धेसाठी नाही, (लेख )
सर्व जीवलग मित्र मंडळींनी खुप खुप सहकार्य केले ,या विचार मंथन स्पर्धेत आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार...
           धन्यवाद. ...
कोणाचे नाव जर नजर चुकीने राहीले असेल तर कळवावे. ..
      🙏🙏🙏🙏🙏


नागोराव सा. येवतीकर यांचा लेख 





















📝📄साहित्य मंथन 📄📝
                           आयोजित
🚦🚦विचार मंथन🚦🚦

        भाग :------39
-----------------------------------------
विषय :-दुष्काळ "शेतकऱ्यांच्या" मुळावर
=====================
संयोजक :-श्री. अरविंद जी कुलकर्णी सर
****************************
परीक्षण :-श्री गजानन जी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विचारमंथन भाग -39
विषय :- ''दुष्काळ उठला शेतकऱ्याच्या मूळावर''
ज्याला जगाचा पोशिंदा ,बळीराजा म्हणतोय त्याची आजची अवस्था फारच वाईट झालेली आहे हे मान्य करावेच लागेल
पुर्वीच्या काळी ''उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी''पण आज या
घडीला सर्व चित्र पालटले आहे
कधी त्याने सुटी ची अपेक्षा केली नाही अहोरात्र शेतात परीश्रम करून आपल्या शेतातील राखण करीत बसतो जे शेतात पिकत तेही विकताना त्याचे हाती नाही तो व्यापारीच याच्या मालाचा भाव ठरवतो जणु काही भरसभेत वस्त्रहरण चालू आहे.
तो व्यापारी मार्केट मंडीमध्ये  हातातील लोखंडी 'सळई' ज्याला (बांबू) म्हणतात तो त्या पोत्यात खुपसतो एका पोत्याला निदान पाचसहा जागेवर भोके पाडून 'कोथळा' बाहेर काढावा  अशाप्रकारे खुपसतो आणि निदान एक पावशेर माल पोत्याबाहेर काढतो खुप जीव तुटतो त्यावेळी पण ही वेळ त्या व्यापा-याची असते एक पावशेर माल शेतात जमा करायला एकदिवस लागतो पण व्यापारी ज्या रीकाम्या पोत्याची किंमत  बाजारात शंभर रुपये आहे त्या पोत्याला व्यापारी पाचसहा जागी फाडून मोकळा होतो.

''खुंटतो जीव बापाचा बघून
व्यापारी चालवीती थट्टा..!
भोग संपता संपेना,
जगण्यासाठी लागे सट्टा...!!''

सावकार दाम दुप्पट पैसा वसूल करतो कारण सरकारी कर्ज बँक देते बँकेचा व्याज दर ही कमी आहे पण तरी ही न परवडणारे आहे कारण एक भ्रष्टाचाराची साखळी एवढी जोर धरून आहे की साधे  25 हजार कर्जासाठी आधीच  5 हजार रुपये मोजून द्यावे लागतात ते पण कर्ज अवेळी मिळते प्रत्येक बँकेवर दलाल उभे आहेत मग शेतकरी जगणार तरी कसा ? सामान्य माणसाला बँक कर्ज ही देत नाही.बँकेची कर्जे, सावकारी कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे कर्ज, मुलींच्या लग्नातील कर्ज,
त्यातही निसर्गाची वक्रदृष्टी सततचा तिन वर्षे दुष्काळात होरपळून निघणारा बळीराजा.
त्यालाही वाट्त आपली मुलं खुप शिकायला पाहिजे पण माप रीकामेच राहते नैराश्य येते आणि दुःख ,दारिद्र्य सदैव त्याची पाठ सोडायला तयार नाही..
खर्च करून सुद्धा यावर्षीचे उत्पादन एकरी दोन ते तीन पोते उत्पन्न मिळाले आहे
माझ्या गावाकडील एका कास्तकारानी रोज मजूरी करून यावर्षी एक एकर शेतजमीन मक्तेदारीत पाच हजार रुपयामध्ये केली गरीबीमुळे पाच हजार किंमत त्याच्यासाठी खुप काही होती मोठ्या आशेने तो आनंदाने शेत पिकवायला लागला आणि निसर्गाने दगा दिला सोयाबीन एक बॅग शेतातून मळणीयंत्रातून काढली अवघी अडीच पोती भरली यामधून हिशोब लावला तर शेतीत गुंतवणूक 5000 रू, बियाणे साठी 2500 रू, नांगरणी ,1000 रू, मशागत 1000₹,निंदनी,कोळपनी 2000₹,औषध फवारणी 3 वेळी 4500₹,शेतावरून पिकं काढणी 2000 ₹,मळणीयंत्र 600₹,एकूण खर्च 17600₹ आणि भाव मिळाला 3500 ₹
अडीच पोती म्हणजेच 2 क्विंटल 50 किलो
एकूण उत्पन्न 8750 ₹ घरामधील 8,850 गेले खुप दुःखी झाला पण काय करणार तरी काय?  शेवटी नशीबाला दोष देतोय.
शेतकरी जगला पाहिजे तो जर जगाला नाही तर खुप अनर्थ ओढवेल तो स्वतःसाठी कधीच जगला नाही इतरांचे सुखातच आपले सुख मानणारा बळीराजा आहे पण आज त्यावर उपासमारीची वेळ आली आहे तो आज आधारा साठी वाट पहातो आहे कोणी त्याला वाली नाही म्हणून तो आत्महत्या सारखा मार्ग अवलंबताना दिसत आहे.

✏_______ विचार मंथन साठी
       ✒✒
गजानन पवार ,वरुड देवी हिंगोली..
( स्पर्धेसाठी नाही )
🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄
🍁🍁बळीराजा 🍀🍀

मृगाची पेरणी,
केलीया आशेने,
वृथा परी सारे,
होवोनिया l

दुष्काळी दिवस,
निर्जळी सर्वत्र,
चाऱ्याविन गुरे,
मरीतसे l

नापिकी शेतीशी,
अस्मानी संकट,
नयें मायबाप,
मदतीस l

थोडंफार पीक,
घेऊनी बाजारी,
नसे हमीभाव,
विकोनिया l

ध्यानी मनी स्वप्नीं,
सावकारी कर्ज,
लेकरांचि चिंता,
ग्रासीतसे l

वयातली लेक,
नाहे हाती पैका,
उजवावे कैसी,
चिंतेतसे l

दुष्काळाच्या झळा,
लागे बळीराजा,
अवयव विक्री,
करीतसे l

कसले हे जिणे,
नकोसे वाटती,
प्राण जगी फास,
त्यागीतसे l
          ✏✏
😔😔संदीप पाटील,नांदेड.
🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃
विचारमंथन भाग -39
विषय :- दुष्काळ उठला शेतकर्याच्या मूळावर
......मृगाची सुगंधी माती
      जिला खरीपसुगीची आस
      मात्र बळीराजाला आळवतोय
      सावकारी कर्जाचा फास.....
हो  एकंदर अशीच स्थिती आहे बळीराजाची आज.कधी काळी इथे बळीचे राज्य होते हे देखील खोटे वाटावे.पण जोवर उदरभरण करणारा सुखी नसेल तोवर कुणीही सुखी होवू शकणार नाही.
      नाना पाटेकर बरोबर म्हणतात की;"तुम्ही रात्रभर तुमची संपत्ती उघड्या आभाळाखाली ठेवून पहा...मग पहा झोप येते का?"..आपण मस्त खुशीत जगत असतो अन दुष्काळाच्या झळा शेतकरी एकटाच सोसत असतो.
        परवाचीच गोष्ट ... शाळेतून येतांना प्रवासी जीपमधे एक शेतकरी वीसएक किलो कापूस घेवून विकायली निघालेला होता.उतरतांना जिपवाल्याने खसकन त्याचे पोते ओढले व थोडा कापूस सांडला तो एवढा कळवळला...म्हणाला ओ भाऊ जरा दमानं....एकेक बोंड गोळा करतो आम्ही.शपथ एवढे वाईट वाटले.जिथे एकेक बोंडासाठी बळीराजा कळवळतो त्याच देशात बरेच लोक कपडा एकदा वापरून टाकून देतात.
         आपण खूप काही मदत तरू शकतो पण ईच्छा पाहीजे.धान्य...भाजीपाला...फळे शक्यतो शेतकर्यांकडूनच घ्यावी.सत्यनारायण न करता तीच मदत एखाद्या गरजू विद्यार्थाला द्यावी.परवाच एका मुलीने पासचे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली.आपली एखादी टिचभर मदत कुणासाठी लाखमोलाची होवू शकते.
      सरकारलाही कळायला हवे की कर्ज माफ करून प्रश्न मिटणार नाही तर शेतकरयासाठी ठोस पावलं उचलनं गरजेच आहे.शेततळी बनविणे...नाला बंडींग यासारखी कामे  होवू शकतात.आण्णा हजारे व पोपटराव पवाप यासारखे गावे घडली तर प्रश्न मिटू शसतो.
        नाना व मकरंद "नाम"द्वारे बरचं भरीव योगदान देत आहेत.त्यांच्यासारखे कर्ते सुधारक हवे केवळ बोलके नव्हे.इथे बळीराजाची चूल पेटायचे वांधे अन दुसरीकडे शेती अभ्यासदौरे मजेत होतात परदेशात.काय शोकांतीका आहे नाही?
       आज दुष्काळाचे चिन्ह चिंता वाढवतयं अन शेतकरी जिवंतपणी चितेवर जळतोय.घरात लग्नाची पोर...दारात सावकाराचा घोर....अन दलाल बनलाय चोर अशी स्थिती आहे.जगावं कसं त्यापेक्षा त्याला जीव देणं सोप वाटतयं.
     "मेरे देशकी घरती
सोना...उगले हिरेमोती" हे केवळ कपोलकल्पीत भासतयं.म्हणे जय जवान जय किसान...या दोघांनीच मरायचं अन सर्वांनी एेश करायची  असं चित्र दिसतं.
         जेवतांना प्रत्येक घासागणिक आपण त्यांचे ऋणीआहोत हे ध्यानात ठेवावं.पोट पैशाने नाही अन्नानेचं भरतं.
       आपण आज एक वसा घेवूया की शेतकरयासाठी मनसा वाचा कर्मणा जे काही करता येईल ते करूया....
जय बळीराजा.....
.......................
         ✏✒✏
              जयश्री पाटील.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
शेतकऱ्याच मनोगत
                                           मित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा शेतकरी असल्यामुळे मला कुठेतरी ते भावलं .हे मनोगत फक्त फेसबुकच्या कट्ट्या पुरताच मर्यादित न राहता ते सगळ्यांपर्यंत पोहोचाव या उद्देशान खाली जसेच्या तसे देत आहे.त्या आधी शेतकऱ्याच मनोगत अतिशय समर्पक शब्दात मांडणार्या `त्या `अज्ञात लेखकाचे आभार मानणे योग्य होईल .
होय आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे
वाटतात .... पाण्यासारखे पेट्रोल/डीझेल उधळणाऱ्या एसयूव्ही कार
बाईक उडवाव्या वाटतात .... त्यांनाही डॉक्टर, इंजिनिअर व्हावेसे
वाटते. उच्चभ्रू राहणीमानाचे माजोरी दर्शन घडवणाऱ्या प्रत्येक
शहरी गोष्टीचे त्यांनाही आकर्षण आहे. अशी स्वप्ने पाहणे
गुन्हा आहे काय ? टाटा,
अंबानी यांच्या उद्योगांनी देशाची अर्थव्यवस्था खरेदी करता येईल
इतकी संपत्ती कमवावी आणि आमची दहा पंधरा एकराची शेतजमीनही
हिसकावून घ्यावी आणि एमआयडीसी च्या यमाने तृप्तीचा ढेकर
द्यावा. आमची अंत:करणे जळत नाहीत का ? बाईक , कार, बस,
रिक्षा तर सोडाच साधे पायी चालत शाळेला जावे असे
रस्तेही आमच्या लेकरा बाळांना मिळत नाहीत.
आमच्या अडलेल्या लेकीसुनांची खड्ड्यातच सुटका होते
याचा अपमान आम्हाला वाटत नाही नसेल का ?
जरा सर्दी खोकला झाला कि सुपर स्पेशालिटीत दाखल
होणाराना महागडी औषधे कधी कडू लागत नाहीत.... मात्र कांदा कडू
लागतो. पेट्रोल/डीझेल कितीही महागले तरी ब्र नसतो...
भाजीपाला स्वस्त पाहिजे... तुमच्या एक वेळच्या शावर आंघोळीत
आमच्या कांद्याचे दोन वाफे भिजू शकले असते. ऐन उन्हाळ्यात
शेतीचे पाणी रोखून शहराला पाणी पुरवले गेले
तेव्हा किती जणांनी आपले शावर बंद केले .... उन्हाळ्यात एक
रात्री कुलर पन्नास लिटर पाणी फस्त करते..... तेवढ्यात ठीबकवर
मोसंबीची चार झाडे जगू शकली असती.. किती जणांनी कुलर वापरणे
थांबवले.... एक एसी तीन एचपी पावर ओढतो... तेवढ्यात
एका शेतकऱ्याचे शेत भिजवता येते .... झाला का एसीचा वापर
बंद ? .... शेतीला मिळणारी वीज इकडे वळवल्यामुळे चाळीस
वर्षापूर्वीची तेलावर चालणारी इंजिने खेड्यात टूकटूक करताना दिसत
आहेत...कारण सोळा सोळा तास वीजच नसते...! का नाही होणार
शेतमाल महाग ... ? खेड्यात वीजच नसते तर कुठला टीव्ही अन
संगणक ? पंखा, कुलर तर विचारातच घ्यायचे नाही ..!
का आम्ही सावत्र आईची लेकरे आहोत ? दिवाळीत शहरे
विषारी दारूच्या धुराने ओसंडून वाहतात
आणि आमच्या पोरांना साध्या टिकल्या उडवत बसावे लागते... काय
त्यांनी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतल्याचे पाप केले म्हणून ?
त्यांना नाही वाटत कानाचे पडदे फाडणारे फटाके फोडावेत
म्हणून...? शेतकऱ्यांच्या किडन्या फेल होत नाहीत ?
त्यांना हृद्यविकाराचे झटके येत नाहीत ? सरकारी इस्पितळात
डुकरासारखे भरती होताना त्यांना अपमान वाटत नाही ? कुठून
येतील महागड्या उपचारासाठी पैसे ? तुमच्या कुत्र्यांना मिळतात
तसले वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांच्या गाई,
बैलाला सोडा या माणसांनाही मिळू नयेत ? कुठून येईल हा पैसा ?
उन्हाळ्यात तुम्ही आठ दहा दिवस सकुटुंब सहलीला जाऊन लाखभर
रुपये खर्च करून यावेत... आणि त्यांनी फक्त वारीत पायपीट करून
पर्यटनाचा आनंद मानावा ? एक दिवसाची सुटी टाकून
स्वातंत्र्यदिन विकेंडला जोडून चार दिवसांची मौज
मजा करणारांना माहित आहे
का कधी शेतकऱ्यांनी साजरा केलेला विकेंड ! त्यांचा स्वातंत्र्यदिन
बैलाबरोबर शेतात साजरा होतो..!
जर आम्हा येड्या मुक्याना काहीच स्वप्ने नसतात असे समजत
असाल तर एक दिवस शेतकऱ्यांची पोरे नक्षलवादी म्हणून
भरती व्हायला लागलेली दिसतील. स्वातंत्र्यदिना
च्या पूर्वसंध्येला कांदा हाच जीवनमरणाचा प्रश्न
झालेल्या मित्रांनो भानावर या .... ! भारत पाक क्रिकेट म्याच
असेल तर पाक कडून सीमेवर मारल्या गेलेल्या जवानांचे स्मरण
करायला आम्हाला फुरसत नसते..! हे आमचे देशप्रेम !... म्हणे जय
जवान ... जय किसान.

👆स्पर्धेसाठी नाही....
उत्कर्ष जी देवणीकर
🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪🐪
श्री
का पुढा-याची दुष्काळी गावास भेट
लाल दिव्याच्या सफेद गाडीतून
उतरे सफेद रेडा
हात जोडूनी गरीब जनतेसी,
थोडा खाई पेढा.
सुवासिनी कवतिके ओवाळीती,
पोरे टोरे धूमू लागती
तालावरती नाचू लागती
लेझीम दटया पटया घेऊन
रंगी पताका ऊडवू लागती
धूम धडका सूरू जाहिला
एकच गावामध्ये
रेडा मध्ये गाव सभोवती,
सर्व जाहिले तीथेची गोळा
शुष्क झालीती चावर चाटूनी,
बैल बघोनी त्या रेड्यासी
म्हणू लागली मनी आपल्या ,
हा कोणाचा आला पोळा
आता कुठुनी आला पोळा
        ✒✏✒
_____ कवी राजेंद्र कामुलकर
🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏
'' विचार मंथन स्पर्धा"

विषयः- " दुष्काळ, शेक-याच्या मुळावर"
*********************

व-हाडी गीत....

       " म्या हावो बळी "

समद्या जगाचा पोशिंदा हाये मी जरी,
अठरा इश्व दारिद्रय नांदते माहया घरी....

कायी माती माय माही न् बाप ह्यो सर्जा,
वाटते मले असं की जसा हावो म्या राजा ....

दरसाला परमानं चार एकरी वावर पेरलं,
दगा देला पावसानं न् दुष्कायानं घेरलं ....

एवढा बरसला बापा, धुवून नेलं वावराले,
न्हाई आली दया त्याले, ना आली देवाले ....

पीक -पानी गेलं, ढोराईचा चारा बी गेला,
लेकराईच्या त्वांडाचा घास पावसानं नेला ....

वावराची दशा पाहून डोयाले पानी आलं,
गोठयात हंबरते ढोरं न् रिकामं व्हतं डालं ....

वाहून गेलं वावर, राह्यली फकस्त माती,
तरफडा लेकराईचा पाहून फाटून गेली छाती ....

होता नोता दाना सावकार घेवून गेला,
मागल्या वर्सीचं व्याज वसूल करुन गेला ....

जगवू कसं लेकराले, चिंता पहा उरी दाटली,
त्यापुढं माहया जीवाची किंमत शून्य वाटली ...

घेतो बापा निरोप आता खावून इषाची पुडी,
हरलो जिंदगी अन् ठरलो दुष्कायाचा बळी ....
           ✏✏
         निर्मला सोनी.
🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐
दुष्काळानं रान झालं ओसाड,
खाया नाही उरलं काही घरी|
पाण्यासाठी चालली पायपीट,
जनावरे हंबरती उपाशी दारी|1|

दुबार पेरणीचे पेलेना संकट,
बियानाला पैसा नाही उरला|
सातबारा कोठे राहीला कोरा,
बँक तयार नाही कर्ज देण्याला|2|

शाळेतुनी घरी आलय पोर,
फाटका युनीफाॅर्म चालेना|
हाताला नाही काही काम,
पैशाचा मेळ काही जमेना|3|

लेकरांना खाऊ घालुन सांजा,
कारभारीन झोपे पाणी पिऊन!
कसं जायाच वरीस आवंदाचं,
शेतकरी पार खचला मनातुन|4|

सावकाराचा तगादा लागला,
कर्ज फेडण्या दमडा लाभेना|
कोठवर सोसयचा आपमान?
प्रश्नाचे उत्तर काही सापडेना|5|

अखेर तुटले आत्मबलाचे बंध,
मनी निराशेचे ढग दाटुन आले|
चालला रानात दुःखाचे तंद्रीत,
गळफास घेऊन जीवन संपविले|6|

गावोगावी असेच घडत आहे,
प्रत्येक घरात भुक रडत आहे|
कोणी गाव सोडून जात आहे,
शहराकडे जो तो धावत आहे|7|

सोडुनी तालेवार वाड्याला,
शहरी बकाल वस्तीत राहे|
किड्या मुंगीवानी जीवन झाले,
वडापाव खाऊन अर्धपोटी राहे|8|
              ✒✏
                रामराव जाधव.
🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘
🍁विचारमंथन स्पर्धा 🍁भाग ३९

  " दुष्काळ उठला शेतकऱ्यांच्या मुळावर !!"
   

भारत हा कृषिप्रधान देश!देशामध्ये ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते असे म्हणतात.  आज जागतिकीकरणामुळे व खुल्या बाजारपेठेमुळे कदाचित एवढे लोक शेतीवर अवलंबून नसतीलही. पण ज्या देशाची ओळख ही कृषिप्रधान देश  अशी आहे,त्या देशात आज कृषी आणि कृषकाची काय अवस्था आहे??? आज सर्वात दयनीय अवस्था देशाच्या मुख्य घटकाची,याच शेतकऱ्यांची आहे.
    आज आपण पाहतो की,औद्योगिकीकरणामुळे आणि अजून वेगवेगळ्या कारणाने  सर्वत्र प्रदूषण वाढले आहे आणि या प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे शेतीला!हरितक्रांतीमुळे शेतीत रासायनिक खते,विषारी किटकनाशके आणि घेण्यात येणाऱ्या एकच एका पिकामुळे जमिनीची सुपिकता नष्ट झाली. त्यामुळे पिकाचे उत्पन्न घटले.
    आज सर्वत्र वृक्षतोड ही अतिप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात चार चार महिने मुक्कामाला येणारा  पाऊस हा कधीतरी अनोळख्या पाहुण्यासारखा हजेरी लावून जातो. याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आजचा आ वासून उभा असलेला दुष्काळ! या दुष्काळाचा तसा सर्वच प्राणिमात्रांवर दुष्परिणाम दिसून येतो पण या अस्मानी संकटाचा फटका बसला तो शेती आणि शेतकऱ्यांवर! कितीतरी वेळा पाण्याअभावी शेतात पिके तर दारात जनावरे मरताना पहाण्याची हतबलता शेतकऱ्यांवर येते.
       दुष्काळ हा जणू शेतकऱ्यांच्या मुळावरच आलेला आहे.शेतीमध्ये पावसाच्या भरवशावर प्रचंड महागाचे बी-बियाणे पेरायचे,वेळ पडली तर त्यासाठी  सावकारकडून कर्ज उचलायचे आणि नंतर आभाळाकडे डोळे लावून बसण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हातात उरलेच काय??  कधीतरी पाऊस हजेरी लावतो आणि इकडे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होवून तो त्या पिकाला महागडे खते देतो. पण त्यानंतर  पावसाने पाठ फिरवल्याने ते पीक आणि त्या पिकासोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपतात. घरात लेकरांच्या शालेय वस्तू असो अथवा अंगभर कपडे तो आपल्या कुटुंबाला पुरवू शकत नाही.
 इकडे कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो.या दुष्काळात पदरात आलेले पसाभर धान्यावरही दलालाची लालसा,यात तो पिचत जातोय. देणेकऱ्यांच्या घराकडे वाढलेल्या चकरा आणि शेतातील नापिकी यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय तरी कोणता उरतो???आपण मानवी  जीवन सुंदर म्हणतो ते जीवन ज्यांची स्वप्ने अशी जागीच करपून गेली त्यांच्यासाठी खरच हे जीवन सुंदर असेल का?
       असा हा जीवघेणा शेतकऱ्यांच्याच मुळावर आलेला हा दुष्काळ अन  त्यात सरकारची  ही शेतकऱ्यांबद्दल असलेली कमालीची उदासीनता!!शेतकऱ्यांना उभारी,आधार देण्याइतक्या  सरकारकडे योजना नाहीत. महात्मा फुल्यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' यात इंग्रजाची शेतकऱ्यांबद्दल सांगितलेली  धोरणे व अनास्था  आजही स्वतंत्र देशात काहीही बदलली नाही.अशा अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी भरडल्या जात आहे.
   सुखासिन नोकरदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे  भत्ते वाढविण्यापेक्षा शेतकऱ्यांना खत,बी-बियाणे यावर सबसिडी,शेततळी आणि त्यांच्या पिकाला हमीभाव दिला तर हा बळीराजा नक्कीच जीवन जगण्यास प्रवृत्त होईल.  शेतकऱ्याला बळीराजा असं म्हटल्या जाते. पण दुर्दैवाने आज त्याचा  अन्वयार्थच घ्यावा लागेल. अस्मानी-सुल्तानी अरेरावीचा तो बळी ठरतोय. असा हा जगाचा पोशिंदा उपाशी मरतोय. म्हणूनच म्हणावेसे वाटते,
     "लाख लोक मेले तर चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे"
    ✒✏✒✏✒
 संगीता देशमुख,वसमत
🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆
विचार मंथन......
भाग...३९
..................................
खरं तर संयोजकाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी अाहेत......
कारण अतिशय संवेदनशिल विषयावर मंथन करण्याची संधी उपलब्ध करुन दिली...
....
दुष्काळाने रौद्र रुप धारण केलं....त्याचं जीवंत उदाहरण सांगायचे झाले तर जालना जिल्हातील र्‍हदय विदारक घाटना..ती अशी की दुष्काळाने होरपळुन निघालेल्या एका कर्जबाजारी शेतकर्‍याने चक्क गावकर्‍यांना अापल्या स्वताःच्या मयताचे अामंत्रण देवून मरणाला कवटाळले...किती भयंकर अाणि वेदनादायी अाहे...
उभ्या जगाचा पोशिंदा अाज अन्नपाण्यावाचुन मरणाच्या दाडेत सापडला अाहे.
अनेक भगीनी अाज या दुष्काळाच्या तडाख्याने अापले कुंकु कायमचे गमावुन बसल्या अाहेत....
     अनेक संसार अक्षरशः उघड्यावर पडले अाहेत..अनेकंची लेकरे पोरकी झालीत...
       माझे गांवही या दुष्काळाने पिढीत अाहे.....गेली चार पाच वर्ष झाली शेतकर्‍यांच्या पदरी फक्त निराशाच पडली.....अाज गांव ओस पडला..अनेक कुंटुंब अपल्या पोटाची व चिमुकल्या जीवांची भूक भागविण्यासाठी अापल्या घरावर तुळशीपत्र ठेवून कामाच्या शोधात अांध्रप्रदेशात स्थलांतर झाली....
     
     जीवांच्या अाकांतापोटी अापल्याकडे असलेली जनावरे सोय होत नसल्यामूळे अक्षरशाः बेभाव विकुन टाकली....बाया बापड्यांच्या अंगावरचे दागदागीणे एवढेच नव्हे तर अापल्या सौभाग्याचे प्रतिक असलेले मंगळसूत्रही गमावले....त्यांचे केविलवाणे
चेहरे पाहून अापल्याही तोंडचे पाणी पळते...हृदय हेलावते..

         पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर होऊन बसला..शेतकर्‍याचा हा अाक्रोश र्‍हदय पिळवटून टाकणारा अाहे...
वाढती महागाई,मालाला हमी भाव नाही...सरकारच्या हवेतल्या घोषणा,तुटपुंजे अनुदान,वाढता भ्रष्ट्राचार दुष्काळाबरोबर या गोष्टीमूळेळी बळीराजा मेटाकुटीला अाला अाहे..
   त्यात पोरीचं लग्न,पोरांचं शिक्षण यातही शेतकरी बेजार झाला अाहे....
शासन दरबारी याची कुठेच दाद ना फिर्याद...
मग सांगा कसं जगायचं?

  अाश्या अनंत समस्येचा सामना शेतकरी बांधवाना करावा लागत अाहे...
शेवटी सगळीच मार्ग बंद झाली की,स्वतःचे सरण स्वतःच रचायची वेळ येते..
सरकारची पॅकेज येतात केव्हा अाणि जातात कुठे हा संशोधनाचा मुद्दा अाहे.......
      एकीकडे करोडोचा भ्रष्टाचार अाणि शेतकर्‍याच्या वाट्याला मरणाचे दार....
कसली ही विषमता....
  एकीकडे पबमध्ये,पारलरमध्ये पैसे उधळनार्‍या बायका अणि एकीकडे सकाळचे भागले मात्र सांजची चिंता करनारी माऊली.....विचार कराला भाग पाडते...नको तेथे खर्च करणारे,बारमध्ये उद्यटपणे पैसे उधळनारे शेतकर्‍याच्या
एका कोंथिबिरचा भाव करताना..मात्र एक रुपयाचा विचार करतात.ही किती मोठी शोकांतिका...

      शेतकरी वाचवा,देश वाचवा..पण कसा?
अशा असंवेदनशिल समाजाच्या कळपात शेतकर्‍याने कसे जगायचे..?
नैसर्गिक दुष्काळाचा फटका तर जिव्हारी लागतोच पण...
या मानुसकी हरवलेल्या निष्ठुर र्‍हदयशून्य नितीमता गमावून बसलेल्या दुष्काळाचे काय......?
      खरं तर हाच दुष्काळ शेतकर्‍यांच्या मूळावर उठला अाहे... शेतकर्‍याच्या र्‍हदयावर घाव घालत अाहे...
मानसिक खचिकरण करण्याचे काम करत अाहे..

    याला काही अपवाद अाहेत..त्यांचे मानावे तेवढे उपकार कमीच...पण शेतकर्‍याप्रती सगळ्यानीच अादरभाव राखून त्यांना अार्थिक पाठबळाबरोबर मानसिक अाधारही तेवढाच महत्वाचा अाहे....
         🎯 मारुती खुडे
               माहुर,नांदेड..
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

📚📚साहित्य मंथन 📚📚
                           आयोजित
🗽🗽विचार मंथन🗽🗽
          भाग :------39
-----------------------------------------
विषय :-"दुष्काळ शेतकऱ्यांच्या मुळावर"
======================
स्पर्धक:-"श्री. आप्पासाहेब सुरवसे
××××××××××××××××××××××
   
राजाने छळले,  नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले तर फिर्याद कोणाकडे करायची अशी त्या आटपाट नगरातील अबला नारीची कथेतील अवस्था आजच्या घडीला ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर वर्गाची झालेली दिसून येते आहे.दरवर्षीप्रमाणे गत चार- पाच वर्षापासून पाऊस कमी आणि त्याच अवर्षणाने दुष्काळी परिस्थिती वर्षानुवर्षे वाढत चालली आहे. जनावरांना चारा नाही, माणसाला पियाला पाणी नाही, हाताला काम नाही म्हणून पर्यायाने शेतकरी, कष्टकरी ,शेतमजुरांच्या घरात पोटाला खायला अन्नाचा दाणा नाही ..म्हणून ---म्हणून आज मित्तिला बरेचशे संसार शहरी भागात स्थलांतरित होत आहेत ; नव्हे तर शहरातल्या बकाल अशा वस्त्यात, फूटपाथवर आपल्या लाडक्या मुला- बाळांच्या शिक्षणांला वाऱ्यावर सोडून संसार थाटताना दिसत आहेत. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठीच.......!
           शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना ह्या किती फसव्या आणि कुचकामी आहेत. उदाहरण म्हणजे राष्ट्रिय रोजगार हमी योजना  ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात राबवली जाते आहे. आणि जर अशी रोजगाराची कामे नसतील तर सरकारची जबाबदारी म्हणून (100) शंभर दिवसांचा रोजगार मिळणार असे प्रायोजन आहे हा झाला नियम, कायदा....!
 पण प्रत्यक्षात ग्रामरोजगारसेवक आणि संबधित गुत्तेदार ही मंडळी शेतकरी, शेतमजुरांच्या नावाखाली खोऱ्याने पैसा लूटत आहेत.  बोगस जॉबकार्ड बनवून घेतात खरे पण विहिरी, रस्ते,नाला सरळीकरण ,शेततळे किंवा मग इतर सामाजिक वनीकरणाची कामे ही JCB ,पोखलीन किंवा तत्सम यंत्रांच्या साह्याने करताहेत . मग हेच लोक ग्रामसेवक,तलाठी,BDO, तहसिलदार चिरीमिरिच्या, टक्केवारीच्या  मोहापायी चुकीची कामे मंजूर करतात.बील, देयकं काढतात. आणि चक्क विहिरी चोरीला लावतात .आणि शिवाय मदतीला पोलीसांना बोलवताच. स्वतः अडचणीत येतात आणि इतरांना फसवण्याच्या नादात स्वतः लाच फसवतात.
              एकंदरीतच काय तर सुमार वृक्षतोड झाली .पावसाची क्रांती नव्हे उत्क्रांती होते आहे.कारण पूर्वी पावसाळ्यात आठवडाभर तरी महाराष्ट्रात ,मराठवाडयात सूर्यदर्शन होत नसायचे असे पूर्वीचे बुजुर्ग, जाणकार लोक सांगतात. आणि आजच्या काळात तर एक ही दिवस असा उगवत नाही की आज सूर्यदेव आग ओकला नाही.  (12 )बारां ही महीने उन्हाळाच असल्यासारखे वाटते नव्हे प्रत्यक्ष अनुभवावे लागतेय.
              सोबतच आज सामाजिक समस्या वर आपले करियरचे तुनतुने वाजवणारे आणि ढेऱ्या भरणारे  कितीतरी NGO च असल्याचे निदर्शनास येते आहे .फक्त पैसा आणि प्रसिद्धिचा हव्यास हा एकमेव उद्देश् . त्याला अपवाद NAM नाम आहेत म्हणा.त्यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात मग मराठवाडा असो विदर्भ असो नाहीतर पश्चिम महाराष्ट्र असो आपला सूर्यप्रकाशावत आदर्श आशेचा किरण दाखवला आहे.त्यावरच तर उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी, मजूरवर्ग बुडत्याला काडीचा आधार नव्हे तर साक्षात् दिपस्तंभ ,विजयस्तंभ वाटतोय.
                त्यातच या वर्षी मायबाप सरकारने " गो  " हत्या बंदीचा कायदा लागू केला .भूमिहीन शेतमजूर शेतकऱ्याकडे काही जनावरे असतात .त्यात चारा नाही,पाणी नाही ,आणि कमी म्हणून कड़क कायदा आला. दुष्काळ    आ   वासुन उभा .त्यात या खोकाड, भोकाड जनावरांचे संभाळ करून करायचे तरी असा महाभयंकर प्रश्न दत्त म्हणून उभा होता .. पण त्यातून उशिरा का होईना पण सरकारने गुरांच्या छावण्या चालू केल्या एवढे तरी पुण्य पदरी वाटून घेतले. आणि भ्रष्ट लोकांना भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले आणि स्वः ता साठी ही राखून ठेवले . यातूनच कित्येक भ्रष्टाचारचे कोट्यावधीचे आकडे येत्या काळात विविध प्रसार माध्यमांतुन समोर येतील हे ही तितकेच सूर्यप्रकाशाइतकी सत्य  भविष्यवाणी आहे. कारण बिहारमधील 'चारा घोटाळ्यांचा' आदर्श छावणी मालक नक्कीच घेतल्याशिवाय  राहणार नाहीत.
         दुष्काळाची दाहकता, भीषणता एवढी आहे की, खेड्या -पाड्यातील शेतकरी Whats App आणि  Facebook इत्यादी सामाजिक माध्यमातून स्वतः चे जीवन संपवण्याचे खास प्रेमपत्र मा. मुख्यमंत्र्याना लिहिण्याचे धाडस करत तर आहेच शिवाय मंत्रालयात जाऊंन आपली जीवनयात्रा संपवितोय. वाडी, वस्त्या, खेड्या ,पाड्या ,तांडयावरील शेतकरी स्वतः च्या लग्नाचे निमंत्रण जसे आवडीने,प्रेमाने, आनंदानं आणिआपुलकीने द्यावे तसे स्वत:च्या अंत्ययात्रेचे निमंत्रण आज शेतकरी गावा- गावातील प्रत्येक घरी देतो आहे. आणि आपली 230000000₹ (दोनशे तीस) करोड़ रुपयांच्या शरीराची किंमत विष ,फास दोरीच्या हवाली फुकटात बहाल करतोय.
         एकंदरीतच काय तर सरकारने खडबडून जागे व्हावे. शेतकरी आत्महत्या केल्यावर देण्यात येणाऱ्या मदतीच्या मलमपट्या "न" लावता """ नाम ""सारख्यांच्या मदतीस जाऊंन किंवा मग घेऊन त्यावर एक सर्व समावेशक दूरदृष्टि ,महत्वाकांक्षी  उद्देश् ठेऊन केवळ सत्ता, पद, पैसा, खुर्ची, मान, लालच याचा  विचार न करता येणाऱ्या पुढील भावी पिढीस माणूस म्हणून (कुत्रा म्हणून नव्हे  ) आत्मसन्मानांने जगण्यासाठी  कायमची उपाययोजना करण्यासाठी आदर्श कडक नियमावली तयार करावी आणि तिची तितक्याच तत्परतेने   अमंलबजावणी माणुसकीच्या  मानवतेच्या दृष्टिकोनातून करावी ही नम्र विनंती....
         शेतकऱ्यांच्या ,शेतमजुरांच्या म्हणून .....................दुष्काळ हा ""मानवतेच्या
========= """'''मुळांवरउठला आहे असे आज तरी वाटते आहे......
     

       ✒🎯🎯🎯✏
 श्री.आप्पासाहेब सुरवसे सर
       लाखनगांवकर

                     ता:- वाशी
       जि :-उस्मानाबाद
 पिन ----413526
-------------------------------------------

📲--9403725973
*****†********************
📲--9130093301
🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈
विचार मंथन.
  सुखदाम वरदाम्र अशी आमची काळी आई आहे.पण आपल्या देशावरटे दुष्काळाचे सावट आपण दूर करू शकलो नाही.हे सावट नाही तर आपणच आपल्यावरओढून घेतलेले संकट आहे.
आज शेतकरीराजा हतबल झाला आहे..पाऊस कमी डोक्यावर कजाॅचा बोझा कुटूबाचा भार मुलांचे शिक्षण

 ,मुलींचे लग्न अशा असंख्य प्रश्र्नांचा मनात कल्लोळ विचारमती खुंटली व रस्ता धरला तो आत्महत्येचा.आपल्या नंतर कुटूंबाचे काय होईल?असाविचार मनात आला नसेल का?.
       जय जवान जय किसान  हा नारा नाराच राहिला. श्रीमंत
 हा श्रीमंत बनत चालला गरीब
 आणखीच गरीब बनत चालला आहे.
       दारूण परिस्थितीचा विचार करण्याची विचार शक्ती नाहिशी झाली आहे .पिक नाही गुरांना चारा नाही. अन्न नाही पैसा नाही कजॅबाजारी घर गहाण गुरे विक्री साठी माल व्यापारी कमी भावात घेतात .अवचित येणारा पाऊस गारपीट यात भरडला जातो तो शेतकरी.
           परत पेरणी करावी तरी बियाणे आणणार कसे?कजाॅचा डोंगर असताना कोण देणार?अशा अनुतरीत प्रश्र्नांची साखळी.
       समाजातील दानशूर माणसे  पुढे झालेली आहेत. पण ही मिळणारी मदत फारच तोकडी आहे.समाज मनाला जाग आणण्यासाठी
व शेतक-याना जगवण्यासाठी स्वाथीॅवृती कमी करणे गरजा कमी करणे मदतीची वृती बाळगणे दान देणे दत्तक विद्याथीॅ घेणे कन्यादानासारखे कायॅ करणे.वस्तूच्यारूपात मदत करणे पाणी अडवा पाणी जिरवा. झाडे लावा झाडे जगवा वाळू चोरांना आळा बसवणं असे उपक्रम राबवणे त्यासाठी सक्रीय भाग घेणे. धामिॅक वृतीचे स्तोम न माजवता त्याला सामाजिक बांघिलकीची जोड देणे. दुस-यावर अवलंबून न राहता स्वतःपासून सुरूवात करावी हे.ही नसे थोडके.
      शेतक-यांना जगवणे हेच आपले पहिले कतॅव्य आहे.नाहीतर काही वषाॅनी तूरीची डाळ म्यूझियममध्येच बघायला मिळेल.
      विचार मंथन दुष्काळ उठला शेतक-यांच्या मुळावर.
✒✏✒
            सुलभा कुलकणीॅ
 बोरीवली.
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
निलेश सुरेश आळंदे
गडहिंग्लज.
(8857912164)

  विषय:-दुष्काळ शेतक-यांच्या मुळावर

           दोन महिन्यापुर्वीचीच गोष्ट,वडिलांबरोबर दुरदर्शन वर बातम्या बघत बसलो होतो.ठळक बातमी शेतक-यांवरच होती."चिंताग्रस्त दुष्काळग्रस्त"
ते पहाताना थोड्याच क्षणात बरेचसे विचार येऊन गेले.तेच विचार व काही ज्यादाचे म्हणने मांडतोय मी आजच्या विषयाला.

"शेतामध्यी माझी खोप
तीला बोराट्याची झाप
तीथ राबतो कष्टतो
माझा शेतकरी बाप"...
प्राथमीक शाळेत असताना ही कवीता शिकलो आणि शेतक-यांबद्दल उत्सुतकता निर्माण व्हायला लागली..तसं आमच्या पुर्ण घराण्यात एकाचीही शेती नाहीच,पण आमची असावी अस्स सारख मला वाटत.सारख वाटायच,आपण पण शेतात जाव,काहीतरी पिकवाव,पाणी पाजावं,आणि बरच काही.(शेतक-यांच्या परीस्थीतीची जाणीव नसेल कदाचीत म्हणुनच ते).पण जसजस समजु लागलं,तेव्हा उमगल-"एकतर साधी खोप, तयास बोराटीची झाप,कष्ट करणारा तो शेतकरी,ईतक सर्व काही कमी होत??त्यात आणि हा दुष्काळ वाढीव आला...!तसाही आधीच दुष्काळ,त्यात हा 'खरा दुष्काळ' म्हणजे खरच दुष्काळात तेरावा महिना की!"
            अन्नदाता अस्स ओळखलं जाणारा,दिवसभर काबाजकष्ट,जास्त अपेक्षा न करता पोटापुरत कमवण्याची जीद्ध ठेवणारा असा तो शेतकरी,दिवसभर काम करुन मगच सुखाची झोप घेणारा..!पण सरळ जगणा-याचं वाकड होतच असतं...आलेल्या पीकाला कमी किंमत,महागाई हे कमी पडलं म्हणुन 'दुष्काळ'चाही परिणाम त्यांच्यावरच.दोनवेळच्या जेवणाचही अवघडच बनत त्यांच.त्यांनाही वाटत आपली मुलं शिकावीत,मोठी व्हावीत,लाल दिव्याच्या गाडीतुन फिरावीत...त्यासाठी ते पै न पै जमवत असतात,पण मधुनच हा दुष्काळ येतो अन् पोरांच्या शिक्षणासाठी केलेली जमवाजमव पण पाण्यासारखा वाहवुन नेतो!
शेतकरी आपल्या पीकांना व गुरांना त्याच्या मुलांप्रमाणचे सांभाळत असतो पण खरच,हा दुष्काळ शेतक-यांच्या तोंडचा घास पळवुन नेतो..
जो सहन करु शकतो तो टीकतो पण रडत कडतच!आणि...
आणि..जो नाही करु शकत सहन त्याला एकच उपाय उरतो...आत्महत्या..शेवट..पुर्ण जगाचाच शेवट तो!!!
पैश्याशिवाय चालत नाही,पिकवल्याशिवाय पैसा नाही,पिकवायला तर पाऊस-पाणी नाही...पैशे असच कोणी देत नाही,सरकार मदत काही करत नाही...अन्....अन् देव काय कुणाचं ऐकत नाही!!!
खरचं,ईतका का कठोर बनतो हा देव?ऊठता बसता,काम करता या कष्टक-यांच्या तोंडी त्याचच नाव...विठ्ठला-पांडुरंग! पण कुठे जातो हा विठ्ठल दुष्काळ पडल्यावर?कुठे जातात हे देव,शेतकरी उपाशी झोपल्यावर?का झाकतात डोळे सर्व,हाच शेतकरी आत्महत्या केल्यावर???
            अस्स नाही की मी वर असलेल्या देवाबद्दल बोलतोय,मदत करणा-यांचा हात देवाचाच तर..पण नाही कोण सरसावत मदतीला!जाणारा जातो पिकल पण गळुन पडल्यासारखा...ना कुणास फरक  ना कुणास चिंता.दुष्काळाच नेमक कारण वाढत प्रदुषणाच.पण याचा थेट परिणाम या शेतक-यांवरच होतो खरा!
               मान्य आहे हजारो मदतीचे हात येतातही पुढे..पण ते नावापुरतेच!सरकारही मदत जाहीर करत,पण नाहीच पोहचत त्यांपर्यंत!आशा संपल्या कि वाटी असतेच ती-निराशा...हा दुष्काळ शेतक-याच्या मुळावरच घाव घालतो!संपवुन घेतो स्वत:ला!
पण काही छोटी-मोठी पावल उचलली तर बरच काही होऊ शकत..जसकी-
*शिर्डीच्या साईंच्या मंदिरात /वा ईतर ठिकाणी लाखो भावीक दर्शनास येतात आणि करोडो रुपयांची देणगी/नीधी देतात,अशे बरेचसे करोडो जमा पण आहेत...
त्यातीलच थोडी देणगी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या नावे 'मदत' म्हणुन तर करावी.
*या दुष्काळग्रस्तांना सरकारकडुन जाहीर केलेली मदत थेट व लवकरात लवकर त्या निराश व हताश शेतक-याकडे पोहचावी
*शेतक-याने आत्महत्या केल्यानंतर मदत निधी दिला जातो...त्या जीवाची किंमत तेवढीच???
*तीच मदत जीवंतपणी केली तर जगण्याची उमेद तर राहील त्यांस!
*शेत-यांनीही त्यांनी पिकवलेल पीक स्वत: विकाव,दलालांच्या हवाले करु नये.
*संकट,अपयश सर्वांच्याच वाट्याला असत..पण त्याला आपला शेवट समजु नये,खचुन न जाता जगण्याची उमेद ठेवली पाहिजे..
                  हे शेतकरी राजा,तुला अन्नदाता समजल जात,पण याच अन्नामुळ जीवंत राहतो आम्ही...म्हणजे,
अन्नदाता तर आहेसच तु
अपयशाला खचुन नको जाऊ
उभा रहा परत हिम्मतीवर स्वत:च्या
जीवनदाताही आमचा आहेस तु.
कष्टाला तुझ्या करतो मी प्रणाम
जगाच्या पाठीवरचा जिवंत देव आहेस तु...
खचुन नको जाऊ,
निराश नको होऊ,
राबणारा,कष्ट करणारा शेतकरी बाप आहेस तु.

धन्यवाद.
            ✏✒✏✒
               निलेश आळंदे

🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃

संकलन :-श्री. आप्पासाहेब सुरवसे  सर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...