Sunday, 28 March 2021

29/03/2021 rang

*..... रंग झाले मी ......*

चिंब झाले मी, दंग झाले मी
मित्रांसंगे खेळून, गुंग झाले मी

रंग झाले मी, भंग झाले मी
इंद्रधनुष्याचे सप्तरंग झाले मी

अभंग झाले मी, गंध झाले मी
फुलाफुलातील सुगंध झाले मी

अंग झाले मी, संग झाले मी
प्रवचनातून सत्संग झाले मी

मंद झाले मी, तंग झाले मी
तुझ्या हातातील पतंग झाले मी

छंद झाले मी, धुंद झाले मी
तुझ्या प्रेमात बेधुंद झाले मी

तरंग झाले मी, तवंग झाले मी
सत्यमेवसाठी दबंग झाले मी

आरंभ झाले मी, प्रारंभ झाले मी
श्री गणेशाने शुभारंभ झाले मी

 - नासा येवतीकर, धर्माबाद
   *9423625769*

🌿 🌹 🍃 🌹 ☘️  🍀

*...... रंग ........*
रंग लावू प्रेमाचा
रंग देऊ स्नेहाचा
रंग बांधू नात्याचा
रंग मनी हर्षाचा
रंग टाकू उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंग हा धुलीवंदनाचा

- नासा येवतीकर, धर्माबाद
    9423625769 

( पिरॅमिड रचना )

           हे 
          रंग
       आपल्या
       जीवनात
      सुखसमृद्धी
    निरोगी आयुष्य
   तुम्हा प्रदान करो

- नासा येवतीकर, धर्माबाद
 9423625769

चारोळी ... सप्तरंग 
लाल हिरवा काळा पिवळा
सप्तरंगात गेले मिसळून
आकाशाचा निळा रंग ही
विविध रंगात गेला न्हाऊन

- नासा येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...