एप्रिल फुल
एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये. हसी मजाक कधी कधी अंगावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून इतरांना मूर्ख बनवतांना थोडी काळजी घेतली तर त्या मजेची किरकिर होत नाही. पण अजून काही गोष्टीची यानिमित्ताने उजळणी घ्यावी असे वाटते. फक्त या एकाच दिवशी आपण मूर्ख बनवल्या जातो का ..... ?
समाजात असे अनेक लोकं, अनेक मंडळी आहेत, जे की आपणाला बऱ्याच वेळा एप्रिल फुल केले आहे. किराणा दुकान असो वा कोणतेही दुकान तेथे आपणाला बहुतांश वेळा मूर्ख बनविल्या जाते. पैसे कमावण्याच्या नादात तो आपणाला म्हणजे ग्राहकाला नेहमीच लुबाडत असतो. त्याच्यावर कोणाचेही अंकुश नसते, शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून तो आपला व्यवसाय वाढवतो आणि बंगल्यावर बंगले बांधतो. इकडे सामान्य नागरिक मात्र दररोज लुबाडल्या जातो, म्हणजे त्याला नेहमीच एप्रिल फुल केल्या जाते. ज्या ज्या ठिकाणी भेसळ होते त्या त्या ठिकाणी लुटला जाणारा सामान्य नागरिकच असतो, हो ना. सर्वात जास्त नागरिकांना एप्रिल फुल केल्या जाते ते म्हणजे राजकारणी लोकांकडून. होय, ही मंडळी निवडणुकांच्या वेळी खूप मोठी आश्वासन देत मतदारांना दिवसा स्वप्न दाखवतात, जेंव्हा निवडून सत्तेवर जातात तेंव्हा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना साधी आठवण देखील नसते. कारण पुढच्या निवडणुकीत पुन्हा तोच अजेंडा असतो. मतदारांना तर ते निव्वळ मुर्खच समजतात. बिचारे, मतदार तरी काय करणार म्हणा, तो देखील शेवटी कुणाच्या तरी आशेवरच जगत असतो. लहानपणी आई काही तरी खोटेनाटे बोलून आपल्याकडून काम करवून घेत असे. बाबा ही कधी तरी खोटे बोलून आपली सुटका करून घेत असत. ताई आणि दादा काही वेगळं सांगणं नको, ते देखील त्यांच्या कामासाठी कधी तरी खोटे बोलत असतातच. प्रेयसी व प्रियकर यांच्यात अधूनमधून असे घटना घडतच राहतात. नवरा-बायको या दोघांत देखील असेच नाट्यमय वळण चालूच राहते. म्हणून म्हणावेसे वाटते मानवाच्या जीवनात एक एप्रिल रोजीच एप्रिल फुल नसून पदोपदी तेच जीवन आहे. कुठे कळत असते तर कुठे नकळत होत असते.
- नासा येवतीकर, 9523625769
लेख आवडल्यास comment मध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका.
कविता
*..... एप्रिल फुल .....*
आई बाबा दादा ताई यांना
सर्वानाच लागली होती चाहूल
आज घरातला छोटा बंटी
करणार आहे सर्वाना एप्रिल फुल
सकाळपासून लागला कामाला
एक छानशी संधी शोधू लागला
खूप विचार नि अनेक कल्पना
पडले नाही एक ही कामाला
आईला चकवून पाहिलं तसं
बाबांना ही त्याने चकवलं
ताई दादांनी दादच नाही दिलं
बंटी मग नाराज होऊन बसलं
जीवनात नेहमी जागृत राहावं
कुणाच्या बोलण्यात फसू नये
खोटे खोटे बोलून आपण ही
दुसऱ्याला कुणाला फसवू नये
खरी शिकवण मिळाली बंटीला
एप्रिल फुलच्या दिवशी खास
सर्वाना धन्यवाद देत म्हणाला
बनवणार नाही कोणाला मूर्ख
आजपासून ठेवा माझ्यावर विश्वास
- नासा येवतीकर, धर्माबाद
*9423625769*
🌿 🌹 🍃 🌹 ☘️ 🍀
No comments:
Post a Comment