Sunday, 26 March 2017

प्रगती मधील अडसर : दारू भाग दोन

[3/26, 5:35 PM] ‪+91 94213 45341‬: लेखन स्पर्धा दारू  एक समाज प्रगतीतील आडसर
संगीता सपकाळ बीड.
कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हातात आहे. जीवन जगण्याच्या कला आणि मुलभूत गरजा पुर्ण झाल्या की जीवन सुखी होते.असे नाही .सर्व गुणसंपन्नता सुसंस्कृत आणि संस्कारशीलविचारांची गरज आहे.हे सर्वशाळेतील शिक्षक , आणि घरातली माणसं सर्वांना मनातुन  विविधविषयांवर औपचारिक शिक्षण देत असतात कलत नकळतअनुभव विश्वआणि अनुकरण आपण करत असतो.जीवन शिक्षणाचा पाया घरात घातला जातो.आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक दिवस धावपळीत जात आहे.अर्थातच अर्थाजनांसाठी आई वडिल घराबाहेर पडतात.विभक्तकुटुंब पद्धती नुसार घरात आजी आजोबा नाही.मुल पाळणा घरात.त्यांस दुध पिण्यास दुधाची बाटली.पून्हा पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली.महाविद्यालयात गेल्यावर कोल्डड्डिकची बाटली. बाटल्याचा सहवास?सुसंस्कृत संस्कारक्सतुरी
आजीवृदधाआश्रमात.कोण रुजवेल यांच्या मनात संस्कार? म्हणूनच म्हणावेसे वाटते की ज्या नातवंडांना
मिळाला आजी आजोबाचा सहवास त्यांच्या जीवनाचे सोने हमखास.व्यसनाधिनता समाजाला लागलेली कीड आहेआणि शरिरालाही ती कीड लागल्या वाचून राहत नाही.
म्हणुनच मी याबद्दल असे म्हणेल की,
नात कसं बांधू मी समाजाच जिथे दान पेरल विषमतेच
तरूणांना ग्रासल व्यसनानं
आणि हायच खाल्ली आयूष्यानं
आणि हायच खाल्ली आयूष्यानं
दारूच व्यसन सहज लागते पण सहज
सुटत नाही.ते जीवन संपवून च टाकते.भरलेले सुंदर संसार उद्ध्वस्त करून होतात लहान मुलांना बापाविणा पोरके व्हावे लागते. तरूण स्त्री विधवा झालेल्या अवस्थेत व्याभिचाराला बली दिलीजाते समाज कलंकित घटना घडल्या जातातआणि एड्स सारख्या आजारानी समाज ग्रासला जातो अनैतिक संबंध तसेच
बालगुन्हेगाला खत पाणी घातले जाते.
समाज  विघातक घटना घडल्याजातात. नशेत आत्महत्याकेली जाते .दारूच्या नशेत
समाजकंठक कामे केली जातात. यातुनच देशद्रोही निर्माण होतात.
आपल्या सस्नेहाचे सहकार्यासहकार्याबदधल आपले मत बदलते आपण आपल्या कर्तव्यात एकनिष्ठ राहू शकतनाही आणि कार्य पुर्ण करू शकत नाहीत.सरकारीअधिकारी किंवा राष्ट्रीयपातळीवर जरी दारू निर्मितीतुन
आथिर्कदृष्ट्या फायदा झाला तरी शेवटी राष्ट्रीयपातळीवर तरूण स्त्री पुरूषांना दारू ही घातकच आहे.
मोदींच्या काळात नोटाबंदी यशस्वी झाली. तशीच दारू बंदी झालीच पाहिजे. आदर्श समाजनिर्माण हिच व्युक्ती महान.समाज विकास म्हणजे राष्ट्रीय विकासाची पहिली पायरी आहे.इतकेच मीप्राथमिक शिक्षक या नात्याने सांगू शकते.
धन्यवाद.

[3/26, 5:58 PM] Savant Laxman Sir: *प्रगतीमधील अडसर-दारू*

निर्धनता, व्याभिचार,आळस,दुर्व्यावहार,पैशांचा मोह, लालच,गर्व व्यासनानिधनता इत्यादी अनेक कारण मानवाला माणसापासून दूर घेवून जातात.आणि माणूस माणसापासून दूर गेला की त्याच्यातील मानवता संपते आणि त्याच्या प्रगतीच्या वाटेला खिंडार पडते.
    गावोगावी, शहरातील अनेक युवक व्यासनाधिनतेच्या विळख्यात अलगद शिरू लागले आहेत आणि आपल्या आनमोल देहाचे निर्जीव सांगाडे करू पाहत आहेत. हसत्या खेळत्या परीवारातील कर्ता पुरुष ज्यावेळी दारूच्या आहारी जातो त्यावेळी त्या परीवारातील सदस्यांचे जीवन नरकयातनेपेक्षा कमी राहत नाही. रोजचाच तो ञास नवर्याचा घरातील स्रीला होतो. त्याच्याकडून रोजचीच मारहाण त्यामुळे कुटुंबात व समाजात तिला हिणतेची वागणूक मिळते. लेकराबाळांची खाण्याची आबाळ होते, मनमोकळे वातावरण मिळत नसल्याने त्यांचे शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. दारूच्या आशा नशेमुळे खेडेगावात बरबाद झालेली पाहायला मिळत आहेत. प्रगतीपासून कोसो दूर गेलेली पाहायला मिळत आहेत.
   शहरातही तीच व्यथा आहे. सुशिक्षित समजला युवक नौकरी,प्रमोशन मिळताच सेलिब्रेशन म्हणून थोडीफार घेतो व हळूहळू त्याची त्याला लत लागते. दारूच्या आहारी तो एवढा जातो की त्याला त्याशिवाय जगणे मुश्किल होऊन जाते मग नौकरीला मुकतो, बेकारी वाढते, पती-पत्नीत वादविवाद वाढत जाऊन घटस्फोट घेतला जातो व प्रगतीच्या विरूद्ध दिसेला वाटचाल होते. दारूच्या आहारी गेल्यामुळे तरूण मुले खोखला झालेली दिसत आहेत, लग्न जमणे मुश्किल झाले आहे आणि यामुळे समाजात गुंडगीरी,बलात्कार इत्यादी गुन्ह्यांची वाढत चालली आहे.
  नशेची लत जोपर्यंत संपणार संपली जाणार तोपर्यंत सोन्याचा दिवस उजडणे कदापि शक्य नाही.भारताच्या प्रगतीचा तोच तर खरा अडसर आहे दिसत आहे. त्यामुळे नशामुक्त समाज घडवणे काळाची गरज बनली आहे.

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

[3/26, 6:04 PM] तोटावार मॅडम बिलोली: लेखस्पर्धा
प्रगतीमधला अडसर:दारू

दिवाळीच्या सुटया संपल्या शाळा सुरु झाली.नेहमीच्या सवयी प्रमाणे मी किचन शेड कडे गेले व खिचडी वाल्या मावशीला विचारलं 'मग काय सुमनबाई कशी झाली दिवाळी'?माझ्या ह्या एका वाक्याने ती रडायलाच लागली.म्हणाली काय सांगू बाई सुटी मध्ये पैसे जमा झाले लेकरांना कपडे घ्यावं म्हटलं तर तुमच्या मामाने सगळे पैसे दारूत घालवले पोरी रडून रडून राहिल्या हो.तिला कसबस समजावले व वर्गात आले पण डोळ्या समोरून तिचा तो चेहरा जात नव्हता.तिचा प्रत्येक धुरात 1 हजार रुपया साठी धुरात घालवलेला दिवस आठवत होता.किती आशेने दिवाळी साजरी करायची म्हणून ती आनंदात होती पण प्रत्यक्ष काय झालं.मन नुसतं जड झालं होतं .असे बरेच किस्से मी प्रत्यक्ष पहिले होते .विचार आला खरच दारू हे व्यसन किती बाधक आहे ना प्रगतीमधील.मुली खूप हुशार पण बापाच्या व्यसना पुढे त्या हरून गेलेल्या.आज आपण समाजात पाहतो अगदी गरिबा पासून तर श्रीमंत घरात सुद्धा हीच परिस्थिती पाहावयास मिळते.गरीब कस होईल हि चिंता घालवण्या साठी दारू पितो तर श्रीमंत एक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून. एक बातमी वाचली होती आता दारूचे दुकान रोड पासून दूर जाणार वाटलं लोकांना मध्ये जाण्याला कंटाळा येईल व हे प्रमाण कमी होईल पण ते दोन दिवस पुरतीच झालं.सुरवातीला शौक म्हणून तर रोज सवय म्हणून दारू हे व्यसन वाढत आहे.अनेक संसार उघड्यावर येत आहेत.विचार करून मन सुन्न होत आहे.दारूची एकदा सवय लागली सम्पूर्ण कुटुंब बरबाद होते .घरातील एक एक वस्तू विकून दारू पितात व घरात गोंधळ घालतात.त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो.असं व्यसन मानवी प्रगतीच्या आड येणार आहे.म्हणून मला वाटते की दारूबंदी करण्या पेक्षा ती तयारच झाली नाही पाहिजे याचा विचार व्हायला हवा.देशात जेव्हढे बलात्कार दरोडे झाले आहेत ते केवळ दारूच्या नशेत.म्हणून दारूमुळे होणारे सामाजिक नुकसान तर कशानेही भरून निघणारे नसते.म्हणजे एका व्यक्तीमुळे कौटुंबिक सामाजिक नुकसान होते व पर्यायाने देशाचे पण.म्हणून देश प्रगत करायचा असेल तर अशा प्रगतीला अडसर ठरणाऱ्या गोष्टीच समूळ नायनाट व्हायला हवा.
केवळ दारूबंदी कायदा केल्याने त्याचे समूळ उच्चा टन होणार नाही तर स्वतःचा विचार बदलला मनाने ठरवले तर समूळ हे व्यसन बंद होईल.
आज खेड्यातील परिस्थिती मी स्वतः पाहिली आहे बायको शेतात राबराब राबते व नवरा मात्र खुशाल दारू पिऊन येतो तेव्हा काय वाटत असेल त्या माउलीला.खरच एक व्यसन पूर्ण घराचे वातावरन बिघडून टाकते.हि परिस्थिती कधीच बदलणार नाही का हा प्रश्न नेहमी माझ्यासमोर येतो
या प्रसंगी माझी एव्हढीच विनंती आहे की दारूमुळे घर बरबाद करू नका. माझ्या शाळेत एक शिक्षक होते त्यांना पण असच व्यसन पण मी त्यांचे विचार बदलून तुमची मुले आता मोठी होत आहेत आता असं वागणं योग्य वाटते का असा त्यांच्या विचारात बदल करून त्यांना या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला व थोड्या प्रमाणात तो यशस्वी पण झाला.म्हणून माझी विनंती आहे की प्रगती मधील अडसर ठरणाऱ्या या व्यसनाचा समूळ नायनाट  करण्यासाठी आपणही थोडा हातभार लावूया.
🙏🙏🙏🙏
सौ.शोभा तोटावाड( तुमवाड)

[3/26, 6:42 PM] ‪+91 96731 27794‬: स्पर्धेसाठी लेख.25/3/17.
*******************************
विषय..प्रगती मधिल अडसर दारु.
*****○○○○○○○●●●●●○○○○○○○
गाव माझ तालुक्यातील प्रमुख गाव.   
सदा हिरवाईन नटलेल .                       डोंगराच्या पायथ्याशी वसलेल.          शेती हा मुख्य व्यवसाय.
गावातुन वहानारि नदि वरदान होती.
बारामाह पाण्याची भरपुर सुविधा.
या मुळ बारामाह विविध पिक घेतली जात.
गावात प्रगतशिल शेतकरि म्हणुन.           बा ला माझ्या पुरस्कार भेटला होता.
बा तसा आडानी होता.
तरि काहिना काहि बुध्दी चालउन .
वेगवेगळी पिक घ्यायचा.
बा ची यशस्वी शेती पाहुन .
बरिच शेतकरि मंडळि बा चा आदर्श घ्यायची.
त्यात बा चा जिवलग मित्र सदाकाका
शेताचा बांधकरि .                             तसा सदाकाका पण उत्तम प्रकारे शेती करायचा.
सदा काकाला एक मुलगा एक  मुलगी होती.वैशालि अन् दिपक.
दिपक अन् मी तालुक्यात एकाच काॅलेजात शिकलो.
शिक्षण पुर्ण झाल्यावर दिपकन तालुक्यातच नौकरि केली.
मी आपला बा सारखा प्रगतशिल शेतकरी झालो.
अन् नाविण्यान शेतीत प्रगती केली.
एक दिवस सदाकाका सकाळीच घरि आले.
एक ऐकर वावर विकतोय ज्ञाना .
घेऊण टाक बाला म्हणाले;
आर सदा काय झाल पण सांगशिल ना.
सदा काका रडक्या आवाजात बोलु लागले.
पोराण संमद वाटोळ केल.
नोकरि करतो म्हणुन शहरात राहिला.
ज्ञाना नोकरि लांबच पण पोर दारुच्या
आहारि गेला.                                                                                कंपनीत घोटाळा झालाय.
आठ दहा लाखाचा .
पोलीस चौकीत आटकेत हाय.
बा म्हणाला अर सदा म्या देतो पैसे
तुझ्या सोईन कर परत .
नको नको ज्ञाना नाय जमायच सदाकाका बोलला.
बा ला सदाकाकान खुप अग्रह केला.
तरि बा न त्याच न ऐकता त्याला पैसे दिले.
सर्व प्रकरण मिटवल्यावर दिपकला सदाकाकान गावी आणला.
दिपक गावाकडे एक हप्ता निटनेटका राहिला.
परत दारुच्या आहारि गेला.
अन् सदाकाकाचे ग्रहच फिरले
बापाला मदत करायची सोडुन.मारहान करु लागला.घरात तोडफोड पैशासाठी त्रास देउ लागला.बघता बघता सदा काका दारिद्यात आला.शेतीच कर्ज
पोराच कर्ज  पोरिच लग्न कर्जाच्या भवर्यात आडकला.करनार तरि काय
सारच त्याला सांभाळायच होत. होत तो पर्यत बायकोचा एक एक डाग मोडला. इथ तिथ मोल मजुरि करुन जगायचे.
शेवटचा अर्धा एकर खपुन पोरिच लग्न केल.मोठ्या जबाबदारितुन मोकळा झाला.शेवटी आमच्या मळ्यात गडी म्हणुन काम करु लागला.
मला पाहुन  बोलायचा अर दिप्यान पण मन लाउन शेती केली असती तर लय प्रगती झाली असती. लय सपान बघायचो पण संमद उलट झाल.
किती समजाउन सांगितल तरि ऐकत नाह्य उलट आपल्यालाच शिवीगाळी करातो.नको नको झालय जगन बाळा.
डोहिवर छत हाय पण रहाता येत नाह्य
भाकरिच्या तुकड्याला महाग झालोय .
देवा कसला भोग र नशिबी दावला.
सार ऐकुन दु:खाला अंतच राहात नसे.
एक रात्री घरि येत असतांना घसरुन बांधावरच्या विहिरित पडला.
चौथ्या पाचव्या दिवशी त्याच प्रेत सापडल.
आई बाप म्हणनारे स्व:ताच्या निशिबाला दोष देत रडत होते.
सदाकाका सारखे ह्या जगात कित्येक असतील.
त्याच्या धैयाला कधी दिशा नाहि भेटली.
दारुला आधीन गेलेल्या पोराला जगवता जगवता स्व:ताच जगन हरउन बसले.
दिपकच तरि काय सुशुक्षित असुन दारुच्या आहारि जाउन आयुष्यच संपवावा लागल.
किती प्रयत्न केला तरि त्या स्व:ताची प्रगती जमली नाही.दारु त्याच्या प्रगतीला अडसर झाली.
आयुष्यात जगतांना प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो.
चांगल वाईट सुख दु:ख जीवनात येतच रहातात.
उगाचच एखाद्या व्यसनाच्या आधिन जाऊन आयुष्य का खराब करावे.

नाव.. स्टिफन कमलाकर खावडिया.
पत्ता..दिपमळा पाटस रोड दौंड जि.पुणे.
मो.नं.9673127794

स्पर्धेसाठी लेख.25/3/17.
*******************************

विषय..प्रगती मधिल अडसर दारु.
*****○○○○○○○●●●●●○○○○○○○
गाव माझ तालुक्यातील प्रमुख गाव.   
सदा हिरवाईन नटलेल .                       डोंगराच्या पायथ्याशी वसलेल.          शेती हा मुख्य व्यवसाय.
गावातुन वहानारि नदि वरदान होती.
बारामाह पाण्याची भरपुर सुविधा.
या मुळ बारामाह विविध पिक घेतली जात.
गावात प्रगतशिल शेतकरि म्हणुन.           बा ला माझ्या पुरस्कार भेटला होता.
बा तसा आडानी होता.
तरि काहिना काहि बुध्दी चालउन .
वेगवेगळी पिक घ्यायचा.
बा ची यशस्वी शेती पाहुन .
बरिच शेतकरि मंडळि बा चा आदर्श घ्यायची.
त्यात बा चा जिवलग मित्र सदाकाका
शेताचा बांधकरि .                             तसा सदाकाका पण उत्तम प्रकारे शेती करायचा.
सदा काकाला एक मुलगा एक  मुलगी होती.वैशालि अन् दिपक.
दिपक अन् मी तालुक्यात एकाच काॅलेजात शिकलो.
शिक्षण पुर्ण झाल्यावर दिपकन तालुक्यातच नौकरि केली.
मी आपला बा सारखा प्रगतशिल शेतकरी झालो.
अन् नाविण्यान शेतीत प्रगती केली.
एक दिवस सदाकाका सकाळीच घरि आले.
एक ऐकर वावर विकतोय ज्ञाना .
घेऊण टाक बाला म्हणाले;
आर सदा काय झाल पण सांगशिल ना.
सदा काका रडक्या आवाजात बोलु लागले.
पोराण संमद वाटोळ केल.
नोकरि करतो म्हणुन शहरात राहिला.
ज्ञाना नोकरि लांबच पण पोर दारुच्या
आहारि गेला.                                                                                कंपनीत घोटाळा झालाय.
आठ दहा लाखाचा .
पोलीस चौकीत आटकेत हाय.
बा म्हणाला अर सदा म्या देतो पैसे
तुझ्या सोईन कर परत .
नको नको ज्ञाना नाय जमायच सदाकाका बोलला.
बा ला सदाकाकान खुप अग्रह केला.
तरि बा न त्याच न ऐकता त्याला पैसे दिले.
सर्व प्रकरण मिटवल्यावर दिपकला सदाकाकान गावी आणला.
दिपक गावाकडे एक हप्ता निटनेटका राहिला.
परत दारुच्या आहारि गेला.
अन् सदाकाकाचे ग्रहच फिरले
बापाला मदत करायची सोडुन.मारहान करु लागला.घरात तोडफोड पैशासाठी त्रास देउ लागला.बघता बघता सदा काका दारिद्यात आला.शेतीच कर्ज
पोराच कर्ज  पोरिच लग्न कर्जाच्या भवर्यात आडकला.करनार तरि काय
सारच त्याला सांभाळायच होत. होत तो पर्यत बायकोचा एक एक डाग मोडला. इथ तिथ मोल मजुरि करुन जगायचे.
शेवटचा अर्धा एकर खपुन पोरिच लग्न केल.मोठ्या जबाबदारितुन मोकळा झाला.शेवटी आमच्या मळ्यात गडी म्हणुन काम करु लागला.
मला पाहुन  बोलायचा अर दिप्यान पण मन लाउन शेती केली असती तर लय प्रगती झाली असती. लय सपान बघायचो पण संमद उलट झाल.
किती समजाउन सांगितल तरि ऐकत नाह्य उलट आपल्यालाच शिवीगाळी करातो.नको नको झालय जगन बाळा.
डोहिवर छत हाय पण रहाता येत नाह्य
भाकरिच्या तुकड्याला महाग झालोय .
देवा कसला भोग र नशिबी दावला.
सार ऐकुन दु:खाला अंतच राहात नसे.
एक रात्री घरि येत असतांना घसरुन बांधावरच्या विहिरित पडला.
चौथ्या पाचव्या दिवशी त्याच प्रेत सापडल.
आई बाप म्हणनारे स्व:ताच्या निशिबाला दोष देत रडत होते.
सदाकाका सारखे ह्या जगात कित्येक असतील.
त्याच्या धैयाला कधी दिशा नाहि भेटली.
दारुला आधीन गेलेल्या पोराला जगवता जगवता स्व:ताच जगन हरउन बसले.
दिपकच तरि काय सुशुक्षित असुन दारुच्या आहारि जाउन आयुष्यच संपवावा लागल.
किती प्रयत्न केला तरि त्या स्व:ताची प्रगती जमली नाही.दारु त्याच्या प्रगतीला अडसर झाली.
आयुष्यात जगतांना प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो.
चांगल वाईट सुख दु:ख जीवनात येतच रहातात.
उगाचच एखाद्या व्यसनाच्या आधिन जाऊन आयुष्य का खराब करावे.

नाव.. स्टिफन कमलाकर खावडिया.
पत्ता..दिपमळा पाटस रोड दौंड जि.पुणे.
मो.नं.9673127794.

[3/26, 6:46 PM] ‪+91 78758 16146‬: स्पर्धेसाठी लेख
विषय- प्रगतीमधला अडसर ः दारू

   रविवारची सकाळ थोडी आरामाचीच. आज ओ पी डी ला सुट्टी. त्यामुळे घरातली साफसफाई ,भाज्या निवडणे , आठवड्याचे सामान भरणे तत्सम कामे सगुणाबाईंच्या मदतीने करण्याचे माझे मनसुबे चालले असतानाच सगुणाबाई इतर दोन लोकांच्या मदतीने घरासमोर उभ्या. एक डोळा काळा बुंद होऊन सुजलेला. डोक्यावर मोठे टेंगुळ. डावा खांदा रक्ताळलेला.लगेच गाडीत घालून दवाखान्यात नेऊन सगळे उपचार झाल्यावर मी एकच प्रश्न विचारला
" हे किती दिवस सोसणार?"
"मरेपर्यंत! .......
ताई, नव-याने मारले तर घर सोडेन पण पोटचा गोळाच दारूच्या नशेत बडवतो तेव्हा कुठे जाऊ? तसं पोर गुणी आहे हो. नशेत नसतं तेव्हा जिवापाड जपतं. पण प्यायलं की कसली शुद्धच नाही बघा.बायकोलाही बडवतो. मी मध्ये पडले तर मलाही" हे उद्गार पन्नाशीतल्या सगुणाबाईचे.

आमच्या सगुणाबाईसारख्या कित्येक स्त्रिया आज रोज भरडतायत. दारु पायी कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. कित्येक तरूण मुले आयुष्यातून उठली. धडधाकट शरीरांच्या चाळण्या झाल्या.....पण दारू बंदी झाली नाही. का? काही टक्के महसूल दारूविक्रीतून सरकारी तिजोरीत पडतो म्हणून? की महिन्याचे महिन्याला हप्ते मिळतात म्हणून?

दारूचे दुष्परिणाम चर्चिण्याची गरज नाही. दारुमुळे लिव्हर खराब होते. अंधत्व येते . जीव जाऊ शकतो हे सगळ्यानाच माहीत आहे. पण तरीही लोक दारू पितात. घरात मुलाना खायला घालायला पैसा नसला तरी दारू प्यायला पैसा ओततात.कित्येक घरातल्या स्त्रिया दिवसभर काम करून मुलांची व नव-याची पोटं भरतात आणि वरून त्या दारुड्या नव-याला दारुसाठी पैसे पुरवतात. पैसे नाही दिले तर मारझोड ठरलेली.शिवाय नशेत गटारात पडला जखमी झाला आजारी पडला की तो औषधपाण्याचा खर्च वेगळाच. म्हणजे दारूपायी किती आर्थिक नुकसान.घराचेही आणि पर्यायाने देशाचेही !

सध्याच्या काळात नव-याप्रमाणेच तरूण मुलेही दारूच्या आहारी जाऊ लागलेली पाहून त्या स्त्रीने नेमके काय करायचे? गावातल्या दारुभट्ट्या बंद करा म्हणून स्त्रिया मोर्चे काढतात पण तरीही गावगुंडांच्या मदतीने व पोलिसआश्रयाने हे दारू रुपी वीष आपल्या देशातल्या सा-या रक्तवाहिन्यातून पसरत आपल्या तरूण पिढीला गिळंकृत करु पाहते आहे.

उच्चभ्रू समाजात फॕशन म्हणून दारू प्यायली जाते. धनदांडग्या अनेकानी दारूच्या नशेत केलेले अपघात सर्वश्रुत आहेत. दारुच्या नशेत गाडी चालवून निरपराध लोकांचा जीव गेला तरीही पैशाच्या जोरावर आरोपी सहीसलामत सुटतात हे आपण पाहिले आहे. अशा भ्रामक     आदर्शांमुळे समाजातल्या तरुणाना दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवण्यातच खरी मर्दुमकी वाटली तर त्यात नवल काय? मुळात अशा   विकृत आदर्शांमुळेच तरुण पिढी भरटून चालली आहे व त्यांच्या प्रगतीत अडसर येत आहे. दारुच्या नशेतले अपघात, बलात्कार, खून हे समाजाला अंधारमय भविष्याच्या खाईत लोटत चालले आहेत.

ऐन तारुण्यात समोरचं उज्ज्वल भविष्य अंधःकारमय करणारे हे व्यसन. दारूने हाताला कंप सुटतात. त्यामुळे कित्येक कौशल्याची कामे करण्यावर खिळ बसते. दारूने माणसाची  तर्कसंगत  विचार करण्याची क्षमता लोप पावते. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो. कुपोषणाने अनेक आजार होऊ शकतात.चिडचिडेपणा वाढतो. एकदा व्यसन लागल्यावर एखादा दिवस दारू न मिळाल्यास वेडेपिसे होण्याची प्रवृत्ती.(withdrawal symptoms)येतात.यातून दारूत बुडलेली संपूर्ण तरूण पिढी काय आणि कशी प्रगती साधणार?

दारूचे व्यसन हा एक रोग आहे. इतर रोगांप्रमाणेच योग्य उपाययोजना करुन तो वेळीच आटोक्यात आणला पाहिजे. उपचारांमध्ये वैद्यकीय, सामाजिक,वैचारिक,मानसिक असे विविध पद्धतीने उपचार करण्याची गरज असते. माणसाला औषधे तेव्हाच लागू पडतात    जेव्हा त्याची  मानसिकता सकारात्मक असते. सकारात्मक मानसिकतेसाठी वैचारिक बदल घडवून आणणे आवश्यक असते. जवळपास सर्व आजारांचे मूळ हे मानसिक विकारातच असते. व्यसनाधीन तरुणाला मानसिक व्याधीतून बाहेर काढून प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची म्हणजेच समाजाची आहे. दारूबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी व पोलिसांवर दबाव आणणे हे समाजाचेच काम आहे. त्याचबरोबर तरूण रक्ताला काम व संधी मिळवून देण्याचा प्रयत्नही समाजात झाला पाहिजे. नोकरी व   व्यवसायाच्या विविध संधी व मार्ग निर्माण केले पाहिजेत.   केवळ कायदे करून भागत नाही तर त्यासाठी पोषक वातावरण निर्मितीही लागते. तरच व्यसनाधीन युवकाना पुन्हा योग्य मार्गावर आणून प्रगतीपथावर नेता येईल.

दारूचे व्यसन हे अनुवांशिक असू शकते असे एका संशोधनाचे म्हणणे आहे. हा मुद्दा वादाचा असू शकेल पण त्यातील सर्वानी स्वीकारण्याचा भाग म्हणजे वडिलानी दारू पिऊ नये व मुलांसमोर चांगला आदर्श ठेवला पाहिजे. लहान मुलांसमोर दारु पिऊन पत्नीवर मारहाण करणारे मुलांवर काय संस्कार करणार? अशा वातावरणातून मुलांमध्ये   गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते हेही संशोधनाने सिद्ध झाले आहे. घरातल्या वातावरणाचा मुलांच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. आणि दारूने हीच पिढी नाही तर पुढची पिढीही खराब होते आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

सरकाराने दारुविक्रीमुळे मिळणा-या महसुलापेक्षा किती तरुण व किती पिढ्या  बरबाद होत आहेत याचा हिशोब केला पाहिजे. हे तरुण हात आपल्या व्यवसायातून कष्टातून देशाच्या सांपत्तिक स्थितीत भरच घालणार आहेत. तेव्हा सरकारवर दारुबंदीसाठी दडपण आणण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही.

एक काळ होता जेव्हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्यासाठी भारतीय युवक लढला. स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यासाठीही 'जय जवान जय किसान' म्हणत या युवकाने योगदान दिले. गांधीजी, शास्त्रीजी असे थोर आदर्श त्या युवकांपुढे होते. त्यांच्या एका आव्हानावर दारूच काय पण एक वेळचे जेवण सोडण्याची प्रतिज्ञा तरुण मंडळी करायची. दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की असे आदर्श आजच्या तरुणांसमोर नाहीत. त्यामुळेच तरुणाना दारूपासून दूर ठेवण्याचे आव्हान हे आईवडिलानी ,शिक्षकानी ,डॉक्टरानी व सर्व जागरुक सूज्ञ नागरिकानी घेतले पाहिजे. गुन्हेगारी, बेकारी यापासून मुक्ती मिळवून एक सुदृढ देश बनवायचा असेल तर तरूण पिढी तनाने व मनाने सशक्त हवी. संपूर्ण दारूबंदी दे त्यातले महत्त्वाचे पाऊल ठरेल. या गुढी पाडव्याला दारूबंदीची गुढी उभारून ख-या अर्थाने नववर्षात उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश करूया.

©गीतांजली 
©डॉ गीतांजली शर्मा (कसमळकर )
पुणे.अनुक्रमांक ४४.

[3/26, 6:54 PM] 608 Rohidas hole: स्पर्धेसाठी ...

प्रगतीमधील अडसर दारु
-----------------------------

      सध्या जसा काळ बदलेल तसं लोक ही बदलू लागलेत. विशेषतः तरुण पिढीचा यात अग्रक्रम आहे.
महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजातील घातक नशेबाजीची सवयीना तरुण वर्ग ओढला जातोय. दारु हाच पर्याय लोक स्विकारू लागलेत.भले सामान्य वर्ग असो ,मध्यम असो कि उच्च श्रीमंत असो. प्रत्येक घटकातली व्यक्ती दारु या व्यसनाकडे आकर्षित झालीय. लहान वयातच असे अपद्रवशी जवळीक करणे कितपत योग्य आहे. तरुणा हे विषारी द्रव प्राशण करुन तु काय साध्य करु पहातोय ? कोण म्हणे चिंता दुर करण्यासाठी,तर कुणाला झोपेसाठी ही फालतू कारणीमांसा देत देहाचा किती पाला पाचोळा करायचा. हा तरुण वर्गाला अजुनही न उमगलेलं कोडंच म्हणावे लागेल..

          या व्यसनामुळे कित्येक संसार उद्वस्त झालेले आजही दिसतात. आई वडीलांनी उन्हातान्हाची पर्वा न करता काबाड कष्ट करावं. आणी लेकरांनी .नशेबाजी अय्याशी अशा अनेक दृष्ट घातक व्यसनाशी साथ संगत करावी. म्हणजे एक प्रकारे आपलेच आपण आनंदी जीवनाचा र्हास केल्या सारखाच आहे ना.
दारुचे दुष्परिणाम डोळ्यासमोर घडत असताना ही जराशी ही अक्कल न यावी हि खेदाचीच बाब म्हणावी लागेल .

   दारु म्हणजेच जीवन नाही मिञांनो .. दारुचे परिणाम नेहमीच वाईट झालेले पहायला मिळतात. यामुळे अपघात होणे, घरात, संसारात दुर्दशा येणे . कर्जबाजारीपणा, मुलाबाळांची शिक्षणाची प्रगती खुंटणे .याला दारुच कारणीभूत ठरते.

       दारुबंदीसाठी तरुणानेच पुढाकार घेऊन अनेक संसाराला उभारी द्यावी. हीच समाजसेवा ही घडेल .
सरकारने नवीन निर्णय घेतलाय राज्य मार्ग ,महामार्ग यापासुन पाचशे मीटर अंतराच्या आत दारु परवाने रद्द करुन विक्रीस बंदी घातली आहे. निर्णय स्वागतार्ह  आहे. पण तरुण पिढीला काय फरक पडू शकेल का ?
ते कुठूनही दारु उपलब्ध करुन पार्टी,लग्नसमारंभ असे अनेक कार्यक्रमात रंगत आणतात. आणी भलते सलते अशोभनीय वर्तन करतात.

             बघा , विचार करा आपल्या घराचा, संसाराचा...
आदर्श व्हा लहानांचा . आपलेच गुण संस्कार  येणाऱ्या पिढीवर रुजणार आहे. म्हणून अशा घातकी व्यसनांना बाजूला करुन एक नवीन जीवनाचा अध्याय असा लिहा कि तुमच्या कडून चांगल्या अपेक्षांची लोकांना सवय होईल....

जागे हो तरुणा ! आता रोजच
व्यसनांचा घोट नाही रे चांगला ..
घातक विषातून कित्येकांचा
सुखी संसार अस्तित्वात भंगला...

जमीन जाते, घर जाते आणी
काळजाला धस्स आग लागते...
नशीब फिरवावं वादळानं
घरच्या अब्रुला परकी नजर लागते

तु सतत नशेतच होतो चुर
जणू आयुष्याचा करार केलाय...
अशा वागण्यानं नाती गोती
मुलं बाळं पार विसरून गेलाय.....

केली दुर्दशा अन राखरांगोळी
मरणाची नसते कधीच चिंता,...
आई वडीलांना का रे सजा
अजूनही दुख भोगवतोय अनंता...

सावध हो वेळीच तरुणा
अजुन वेळ गेलेली नाही ....
फुलव आनंद जगण्यातला
सुर्य कायमचाच मावळलेला नाही ...

रोहिदास बापू होले
गोपाळवाडी ,दौंड ,पुणे
२६/३/२०१७
मो. ९०२८३४१५३६

[3/26, 6:55 PM] VaishLi Deshmukh: प्रगती मधला अडसर -दारू

पहले इन्सान आदतों को           बनाता है ।
बादमें आदत इन्सान को बनाती है ।

      प्रगती मधला अडसर म्हण्जे दारू........!यात दारू आणि प्रगती हे दोन शब्द महत्वाचे आहे.कारण जिथे दारू आहे तिथे प्रगती नाही ,आणि जिथे प्रगती आहे तिथे दारू नाही......ही सत्यता आहे.
      सर्वात मोठा तरूणाईचा देश म्हणून आपल्या देशाला गौरविले जाते पण आजचा तरुण हा दारूच्या नशेत आपली शक्ति गमविताना दिसून येत आहे.अल्पवयातच तो दारूच्या आहारी जात  आहे.नववर्ष,होळी ,पोळा ,गणपती विसर्जन ,नवरात्र विसर्जन ,राजकीय निवडनुका
यात दारू शिवाय तरूणाई म्हणजे,बैलाला बिना बेगडाच पोळा दाखवणे होय !असे आमचे तरुण दारू रूपी बेगडानी आपला उल्लास साजरा करतांना दिसून येत आहे.
     दारूच दुकान सुरू करण्यासाठी सर्व प्रथम जे नाहरकत प्रमाण पत्र लागते.ते खरं तर महिलांच्या अधिकार क्षेत्रात असते.कोणत्याही दारूच्या परवान्यासाठी त्याला सर्वप्रथम  आपला अर्ज सादर करावा लागतो मग तो  ग्रामपातळीवर महिला सभा ,पुरुष महिला सभा यात तो अर्ज पारित झाला तरच तो हे दुकान लावू शकतो.पण महिला ह्या दारू दुकानाचा ठराव कधीही मान्य करायला हा ठराव पारित करणार नाही यांकरीता, ह्या सर्व गोष्टी फक्त चार भिंतीच्या आत केल्या जातात.ग्रामपंचायत ठराव ,महिला सभा ठराव हे फक्त कागदोपत्री  नाटकीय विश्लेषण करून केले जाते.त्या वेक्ती कडून लाखो रुपये घेऊन त्याला  दारूचा परवाना दिला जातो,हेआपल्या देशाच  विदारक  सत्य आहे.हे कुठे तरी थांबले पाहिजे !
      दारू हा दोन अक्षरी शब्द माणसालाच हानिकारक नाही तर देशाच्या प्रगतीलाही  मारक आहे.दारू मुळे अनेक तरुण बेधुंद गाडी चालवीत आपला प्राण गमावीत आहे.तर  काही तरुण अनेक आजाराने ग्रासले आहे.दिवसभर काम करणारा श्रमिक आपली रोजची अर्धी अधिक कमाई दारूत खर्च  करतो.दारू मुळे घरचे घरपण नाहीशे होते.घरची आर्थिक पातळी कमकुवत होते.त्यामुळे तो आर्थिक उन्नती साधू शकत नाही.असे किती तरी अपाय ह्या दारू मुळे होते !त्यावर सरकार निश्चितच बंदी आणायला पाहिजे.
   भारतीय संविधानातील राज्य घटनेतील अनु.47मध्ये सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावेरील मार्गदर्शक तत्व समाविष्ट केले आहेत.त्या तत्वा अमली पदार्थाच्या उत्पादन ,विक्री ,खरेदी तसेच सेवन यावर शासनाने बंदी आणायला पाहिजे !तरच आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्ग पथावर नेता येईल.तसेच या देशातील जनता मोठ्या आनंदात राहू शकतील !
- वैशाली देशमुख, नागपूर

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...