Thursday, 3 December 2015

साहित्य मंथन whatsapp ग्रुप आयोजित 
काव्यमंथन स्पर्धा भाग क्रमांक 13
दिनांक : 04 डिसेंबर 2015
संयोजन व परीक्षण : जयश्री  ताई  पाटील 
ग्राफिक्स : उत्कर्ष  देवणीकर 
===========================
===========================
===========================
===========================
मंद धुंद मखमली प्रहरी 
धुक्यात पार नाहुनी जातो
अंगावरती शहारा येताच 
थंडीची चाहुल लागुनी जातो
✒खमितकर उमेश....
===========================
===========================
सजना रे वेलीवरच्या 
या कळीचे झाले कधीच फुल ।
गुलाबी ही हवा लागली 
थंडीची चाहूल ।
* अरविंद कुलकर्णी 
===========================
===========================
" थंडीचा काटा"
सोसावा कुठवर?
संक्रांतीच्या तिळावर
चढेल तोवर"
.....जयश्री पाटील
===========================
===========================
🍀🍀थंडीची चाहूल 🍀🍀

उन्हाळ्यात पाऊस तर,
पावसाळ्यात थंडीची चाहूल,
प्रगतीच्या नादी माणसाचे,
निसर्गाच्या विसंगत पडते पाऊल
   
🌺🌺संदीप पाटील धोंडगे,नांदेड.
===========================
===========================
गरम कपडे वा संग्रही असेल 
उबदार शाल ।
कुडकुडणार्या देहावरती 
अलगद टाकून जाल ।
* अरविंद कुलकर्णी 
===========================
===========================
थंडीची हुडहुड चाहूल 
लागावी तशी लागत नाही.!
कधी उष्मा कधी गारवा,
निसर्ग किमया कळेना काही.!!
✏_____________ जी.पी
===========================
===========================
ग्रीष्मा ने काढले भाजून 
पावसाळा अम्हावर रूसला 
गुलाबी स्वप्ने घेउन हा हिवाळा आला 
* अरविंद कुलकर्णी 
===========================
===========================
तू आहेस जवळ,
की नुसताच होतो भास...
आहे थंडीची चाहुल?
की टाकलाय प्रेमाचा फास.....
🔵WARANKAR G🔵
       👉🏼नांदेड👈🏼
  🔴 🔴
===========================
===========================
कधी गार गारवा
लागे शुष्क शहारा.!
ढगा पल्याडचा निघला रवीकर,
हस्तवदणे तो दिनकरा.!!
✏___________ जी.पी 
===========================
===========================
हाच तो गारवा,अंगावर शहारा,
छळतोच म्हणुयात,वाराहि बोचरा.
लवकर ओसरतोय गप्पांचा कोपरा,
थंडीचीच चाहूल,आता ऊबेशी आसरा.

आता वाढेल गारवा,भरेल हुडहुडी,
अंथरूणात सारखी,घ्यावी वाटेल पडी.
भूकहि लागतेय सपाटून आता,
कडाका होईल चालु ,ही तर थोडीच थंडी.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
===========================
===========================
गुलाबी थंडीची शिरशिरती चाहूल..
सोबती तव आठवांचे थिरकते पाऊल...
किरणांच्या रजईला मखमली स्पर्श झूल..
गर्द वनराईलाही नकळत पडली भूल...
   - सौ.कस्तुरी.
===========================
===========================
मॅचिंग स्वेटर घालून
 सजे श्रीमंतीचा देखावा
 उघड्यावरच्या संसाराला
 कुडाचीच वाणवा
........जयश्री पाटील
===========================
===========================
आला थंडीचा महीना 
स्वेटर मफलर काढा 
भल्या पहाट समयी 
कोवळ्या उन्हाला पडा 
नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 
===========================
===========================
थ थ थडथडून 
हू हू हुडहूडून 
भरलीया अंगा ।
शेतातल्या बांधावर
शेकोटी पेटवून 
चाललीया दंगा ।
* अरविंद कुलकर्णी 
===========================
===========================
झुळुक वाहते थंड थंडलाट
शेकोटी पेटली उबदार.!
झाडावरती पक्षी गाती गाणी,
कोकिळेचा कानी पडला मंजुळ स्वर.!!
✏___________ जी.पी 
===========================
===========================
थंडीसाठी स्वेटर मफलर 
खायला हवा सुका मेवा ।
गरीबांना मिळेल कोरभर भाकर 
याची आठवण ठेवा ।
* अरविंद कुलकर्णी 
===========================
===========================
चारोळी स्पर्धा
 १
मास आला गुलाबी थंडीचा
गोड वाटे ऊब किरणांची
सांगावा यावा  हो रायाचा
 हवी वाटे ऊब स्पर्षाशी !
*******************

ऊबदार घरांत ,गरम पांघरूणात वाटतं छान।
नाही डोईवर छप्पर
थंडीनी गोठतायत प्राण!
तुमच्या मुखात लोणी अान 
गरम भाकर।
माझी पोरं ऊपाशी हो मी
हाये चाकर।
*******************

हिरव्या कोवळ्या हुरड्याचा
गंध दरवळतो भाजल्यावर
लसणीचा ठेचा भाकरीवर
ऊतारा थंडीच्या काट्यावर!
******************
  ४
थंडीचे धुके दाटलेले 
गवत दवांत भिजलेले
चुलीत  निखारे ऊमलते
काकड आरतीचे स्वर घुमले
*********************

तीळ स्नेहाचे  घोळले गुळी
ऐन भरात थंडी,खावे वाटले
 नाजूक हलवा गुळचीपोळी
भाकरीसंगे भरीत रांधले!
©अंजना कर्णिक
===========================
===========================
धुंद एका प्रभात समयी,
गुलाबी हवा सांगून गेली,
जावू नकोस  दूर राजसा,
चाहूल थंडीची लागून गेली....
निर्मला सोनी.
===========================
===========================
थंडीच्या चाहूलीचे चिन्ह मज दिसेना यंदा
काय विपरीत लावलाय या निसर्गाने हा धंदा
कसा कोपला विनाशी बरं तू चेन्नईला
अरे बाबा बरस येऊन मराठवाडयाला
          ✏🎯🎯🎯✒
  आप्पासाहेब सुरवसे सर
        लाखनगांवकर
===========================
===========================
पावसानी दाखवली चांलीच पाठ ।
मरणाच्या थंडीची नकोच लाट। 
बळीराजाची तर लागेल वाट।
आयुष्याचा दुस्तर होईल
घाट।
*******************
हव्याशा थंडीचा डिसेंबर 
पानोपानी दव पहाटेला
चुलीत ज्वाळांची थरथर
आजीची गोधडी ऊबेला।
********************
ऋतुचक्राचे फिरते चक्र
कधी एखादा होतो वक्र
थंडी आलीया ऐन भरात
ऊबेस आसुसली गात्र 

निसर्ग बदलतोच आपला नूर नेहमी।
येत्या थंडीचे करूया छान स्वागत।
अंगात आरोग्याची करूया बेगमी।
करूया नियमीत  चांगली कसरत।
©अंजना कर्णिक
===========================
===========================
खरच यंदा आहे का हो थंडी
मग कशाला हवी गोधडी नि घोंगडी
मास कार्तिक जरी  लावतोय पंखा
वाटे भीति निसर्गाची हा कैसा डंका
       ✏🎯🎯🎯✒
  आप्पासाहेब सुरवसे सर
        लाखनगांवकर
===========================
===========================
चारोळी स्पर्धा
निसर्ग देखील अगदी बेभरवशी बनलाय।
माणसांचा गुण नाही पण वाण लागलाय।
थंडीच्या चाहुलीतून मधेच
चटका ऊन्हाचा।
कुणी द्यावा आजकाल
निसर्गाचा भरवसा!!
अंजना कर्णिक
===========================
===========================
ऋतु आता निसर्गाचे,
काही केल्याही कळेना...
दिवस का हो हे थंडीचे?
विचारा अंतीही उमजेना...

      @ उत्कर्ष देवणीकर..
===========================
===========================

सुलभा कुलकणीॅ. बोरीवली.
9930509026.
चारोळी स्पधाॅ .भाग 13.
    थंडीची चाहूल⛄
1)चहा कसा?मसाल्याचा वाफाळलेला,
    प्रेमाची गोधडी ऊबदार  पांघरायला,
     शेकोटीचा समारंभ खुणवतो सहलीला,
     थंडीचा महिना कसा मनाला भावला.
2) शरीराला हुडहुडी भरली,
    बिछान्यावर ऐटीत पसरली,
     स्वप्नांची मालिका चक्षूला दिसली,
      कधी नव्हेती थ॔डीची चाहूल लागली.
3)   ऊबदार रजईचा स्पशॅ हवाहवासा वाटतो,
       प्रियकराच्या सोबतीने उषःकाल होतो,
       अंगाअंगाला शहारा  वाकुल्या दाखवतो,
       बोच-या थंडीची चाहूल दाखवून जातो.
4)    असा कसा रे?अवचित आलास,
        मनाला चटका लावूनी गेलास,
        कालचक्र पण तू विसरलास,
        आणि थंडीला भूलूनी जरा स्थिरावलास.
5)    हिवाळ्याची चाहूल,
       पानगळीला लागली,
       मनात गुलाबी स्वप्नांना ,
       जागाच फक्त मिळाली.
===========================
===========================
चारोळी स्पर्धा
 हिवाळा येता गारवा वाढे
 थंडीचं आगमन ,मस्त वाटे
 पण हे  चरचरीत कातडे
 हातपायांना भेगा नी तडे!
*******************
 थंडीच्या  येताच चाहुल
गरम कपडे वापरात
पोटाला चिमटा काढून
आई वाढे लोणी पानात!
अंजना कर्णिक
===========================
===========================
पहाटेचा हा  गारवा थंडीचा
सख्या ऊबारा तव मिठीचा
संकेत येता तुझ्या येण्याचा
गाली रंग चढे गुलाबाचा
अंजना
===========================
===========================
चारोळी स्पर्धा✒✒
💫💫💫💫💫

✒ 
हुरहुर लागली जीवाला
समजुनी घे प्रितपाखरा
चाहुल लागता थंडीची
शोभे दवबींदू प्रितीचा खरा
..............................


गोड गुलाबी थंडीची
चाहूल लागली या मनाला
अंग अंग शहारले
उब मायेची हवी तयाला
............................


बोचर्‍या या थंडीतला
झोंबतो कसा हा गारवा
दंवबींदूच्या ठिपक्याचा शालू
शोभे धरत्रीस हिरवा
..........................


बेधुंद मनाच्या लहरीला
बांध प्रितीचे घालूया सजणी
मी राहिलो बाजुला अन् 
अवखळ थंडीची झालीस तू दिवाणी
...........................


करतो मनाला बेधुंद
पहाटेचा हा मंद वारा
लागता चाहुल थंडीची
रोमांचीत होतो देह सारा
...........................

🎯 मा.तु.खुडे
            नांदेड.
(९८२३९२२७०२)
===========================
===========================
दशदिशात दाटले धुके
गवतही  दवात न्हाले
थंडीच्या चाहुलीने
मन ओढाळ अधिरले!

प्रेमाचा रंग गुलाबी
थंडीचा स्पर्श शराबी
सुखद  थंडीच्या चाहूली
सखे सवे तूच हवी।
अंजना कर्णिक
===========================
===========================
सत्य  की  हा  भास  खरा..  
                थंड  गंध  सुटला  नवा.
      रुतुचा  हा चक्र हा कसा.. 
          कधी  उन  तर  कधी  गारवा.. 
काळे 
===========================
===========================
सुलभा कुलकणीॅ.
थंडीने भरली हुडहुडी,
सख्याने मारली दांडी,
पण कशी काढू कडी,
गुंडाळून ठेवली गोधडी.

===========================
===========================
शेकोटीच्या भवती
आले सगळे मिञजना
शेकोटी विझताच 
दात वाजे खनाखना
✒ .....खमितकर उमेश

===========================
===========================
गोड गुलाबी थंडीची चाहूल
रानफुलांतून पडते पाऊल
डोंगरदरी छान फुलारली
वसुंधा ही रंगाने न्हाली
© जागृती निखारे.
===========================
===========================
हवेतला गारवा
सुगंधभरला मारवा
सहवास हा तुझा नवा
चाहूल थंडीची, गुंजतो पारवा
© जागृती निखारे 
===========================
===========================
आभाळमाया धरली का देवा
छत तुझे बिछाना धरणीमाता
चादर दीन मी शोधू कुठे रे अन्
गोड गुलाबी थंडीची चाहूल
अजय 
===========================
===========================
मऊमऊ गाद्यांवर 
झोपणा-यांना लागतेय् थंडीची चाहूल,
रस्त्यावर उघडे बागडे झोपतेय् गरिबाचे मूल.....
गुबगुबीत दुलईचे सुख,
मायेची ऊब त्यांना देतेय हूल.....!!

 सुजाता 
===========================
===========================

संकलन - नासा येवतीकर 














No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...