Monday, 7 December 2015

पूरक वाचनाचा एक तास 
                                                                      - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद  
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा भावनिक, सामाजिक व भाषिक विकास व्हावा, म्हणून शाळांच्या वेळापत्रकात आता एक तास हा पूरक वाचनाचा असणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 
भाषेच्या तासिकांपैकी एक तासिका पूरक वाचनासाठी ठेवण्यात यावी, असे या आदेशात सांगितले आहे. त्यामुळे लवकरच आता शाळांमध्ये विद्यार्थी अवांतर वाचन करताना दिसतील. या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांना वयोगट व अभिरुचीला अनुसरून पूरक वाचन साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यायचे आहे. गोष्टीरूप पुस्तके, कथासंग्रह, संतसाहित्य, ऐतिहासिक साहित्य व थोर महापुरुषांचे चरित्रे, तसेच त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय घटना यांचे वाचन यामध्ये करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांचा इतिहास समजेल व त्यांच्या आदर्शांचा जडणघडणीत उपयोग होऊ शकेल. 









1 comment:

  1. लेख वाचून अभिप्राय देण्यास विसरू नका

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...