Monday, 7 December 2015




📖 एक तास अवांतर वाचन 📝

सायंकाळी शाळेत मुले कुणाचे  काही ऐकत नाही. खेळू घालण्याचा त्यांचा एकच तगादा असतो. दिवसभर अभ्यास करून त्यांना कंटाळा आलेला असतो. त्यासाठीच मुले गोंधळ करतात. यावर उपाय काय करावा असं विचारात असताना वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने मुलांकरिता अवांतर वाचन करून घेण्याविषयीचे शालेय शिक्षण विभागाचे पत्र मिळाले आणि एक कल्पना डोक्यात आली की आपण रोज एक तास मुलांचे अवांतर वाचन घ्यावे. मग त्यानुसार नियोजन तयार करण्यात आले आणि या पध्दतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 
कृती - 
मुलांना सर्वप्रथम सूचना देण्यात आली. उद्यापासून रोज सायंकाळी एक तास आपण दूसरे पुस्तक वाचन करणार आहोत. यांसाठी आपल्या जवळ असलेले पुस्तक आपण सोबत आणावयाचे किंवा शाळेत उपलब्ध असतील ते पुस्तक आपणास वाचण्यास देण्यात येईल. ज्यात गाणी, गोष्टी, क्रांतिकारकाची ओळख, अकबर - बिरबल च्या गोष्टी, इसापनीती यासारखे पुस्तक उपलब्ध होतील असे सांगण्यात आले. मुले आनंदी  झाली. त्यांना उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा लागली. प्रत्यक्ष उपक्रम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक मुलांना एक कागद देण्यात आले ज्यावर दिनांक, वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि त्यासमोर वर्गशिक्षकाची  स्वाक्षरी करण्याचा तक्ता केलेले होते. मुलांच्या हातात पुस्तके देण्यात आली. सर्वप्रथम हातात पडलेले पुस्तक ची माहिती कागदावर लिहून ते शिक्षकाकडे देण्यात आले. मग एकदाची मुले वाचन करण्यास सुरुवात झाली. वर्गात एकदम नीरव शांतता होती प्रत्येकजण वाचन करण्यात मग्न होते. वाचन करीत असताना काही समस्या आली किंवा शब्द कळाले नाही तर वर्गावर उपस्थित असलेल्या शिक्षक ना विचारू लागले. मुले थोडं चौकस होत असल्याचे जाणवू लागले. 
साधारणपणे एक आठवडा उलटले त्यानंतर या उपक्रमाचा मागोवा घेण्यासाठी सर्व मुलांना बोलते केले मुलांनी वाचन केलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. काही मुलांनी पुस्तकातील महत्वाची माहिती नोंद करून ठेवली आणि त्याचा वापर प्रश्न मंजूषा सारख्या उपक्रमात करू लागली.
सायंकाळी खेळण्याचा जो हट्ट मुलांचा राहत होता तो कमी झाला. मुले या तासाचे वाट पाहू लागले. तक्ता असलेला कागद भरू लागला. मुलांसोबत शिक्षक सुध्दा वाचन करू लागले आणि तेही आपल्या वाचलेल्या पुस्तकांची यादी करण्यास सुरुवात केली. 
असा पंधरा दिवसाचा कालावधी मजेत उलटले त्यानंतर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी सर्व मुलांनी " वाचन प्रेरणा दिवस " साजरा करतांना वाचनाचे महत्व या विषयी भाषण आणि लेखन केले. 
त्यानंतर विद्या परिषद ने पूरक वाचनासाठी एक तास बाबत आदेश काढले आहे असे वाचण्यात आले आणि मुलांना सुध्दा ही बातमी कळाली तेंव्हा मुले आनंदाने नाचू लागली आणि पूर्वी प्रमाणे आपण रोज सायंकाळी एक तास वाचन करण्यासाठी शिक्षकाकडे मागणी करू लागली. 
या उपक्रमातील काही महत्वपूर्ण बाबी 
* पुस्तक मुले निवडणार 
* पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव लिहिणार 
* पुस्तकातील महत्वपूर्ण नोंदी वेगळ्या कागदावर घेणार 
* आठवड्यातील एक दिवस वाचलेल्या पुस्तकाविषयी सर्वांसमोर सांगणार 
* नोंदीचा वापर प्रश्नमंजूषा सारख्या उपक्रमात करतील. 
* पुस्तक वर्गात वाचायचे आणि वर्गातच ठेवायचे 
* नोंद केलेला कागदी तक्ता त्यांच्या फाईल ला लावणे. 

असा उपक्रम आहे यात अजून काही बदल करावेसे वाटते का ? 

तरी आपला स्पष्ट अभिप्राय द्यावा ही विनंती



No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...