Saturday, 5 October 2019

माझा फळा, माझी लेखणी

दिनांक 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत " माझा फळा-माझी लेखणी " हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला त्यात देण्यात आलेले विषय खालीलप्रमाणे

उपक्रमाचे नाव -
*माझा फळा - माझी लेखणी*

उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 20 ऑगस्ट 2019 मंगळवार
आजचा विषय :-
विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे नाव फलकावर लिहावे.

संकल्पना : नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 21 ऑगस्ट 2019 बुधवार

आजचा विषय :-
आईचे नाव लिहा ( मराठीत )

संकल्पना - नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 22 ऑगस्ट 2019 गुरुवार

आजचा विषय :-
मित्र-मैत्रिणीचे नाव लिहा ( मराठीत )

संकल्पना - नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 23 ऑगस्ट 2019 शुक्रवार

आजचा विषय :-
बाबाचे नाव लिहा ( मराठीत )

संकल्पना - नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 24 ऑगस्ट 2019 शनिवार

आजचा विषय :-
गावाचे नाव लिहा ( मराठीत )

संकल्पना - नासा येवतीकर
9413625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 26 ऑगस्ट 2019 सोमवार

आजचा विषय :-
' श ' हा अक्षर असलेला शब्द लिहा ( मराठीत )

उदा. शहर, उशीर, शैलजा, शेती, शंकर, बशी,

उद्दिष्ट - मुलांना विशेष अक्षरांची ओळख होणे आणि या शब्दाचा जोडीदार, ज्याचा आवाज सारखा आहे, जो ' ष 'आहे त्याचे शब्द वेगळे आहेत याची जाणीव होणे.

संकल्पना - नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 27 ऑगस्ट 2019 मंगळवार

आजचा विषय :-
' ष ' हा अक्षर असलेला शब्द लिहा ( मराठीत )

उदा. षटकार, पोषाख, वेष, वैष्णवी, उष्ण,

उद्दिष्ट - मुलांना विशेष अक्षरांची ओळख होणे आणि या शब्दाचा जोडीदार, ज्याचा आवाज सारखा आहे, जो ' श 'आहे त्याचे शब्द वेगळे आहेत याची जाणीव होणे.

संकल्पना - नासा येवतीकर
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 28 ऑगस्ट 2019, बुधवार

आजचा विषय :-
' न ' हा अक्षर असलेला शब्द लिहा ( मराठीत )

उदा. नयन, नाग, नियम, शनी, अनुमान, नैराश्य, आनंद इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना विशेष अक्षरांची ओळख होणे आणि या शब्दाचा जोडीदार, ज्याचा आवाज सारखा आहे, जो ' ण 'आहे त्याचे शब्द वेगळे आहेत याची जाणीव होणे.

संकल्पना : नासा येवतीकर
9413625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 29 ऑगस्ट 2019, गुरूवार

आजचा विषय :-
' ण ' हा अक्षर असलेला शब्द लिहा ( मराठीत )

उदा. बाण, आणि, पाणी, नणंद, अणू, इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना विशेष अक्षरांची ओळख होणे आणि या शब्दाचा जोडीदार, ज्याचा आवाज सारखा आहे, जो ' न 'आहे त्याचे शब्द वेगळे आहेत याची जाणीव होणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 31 ऑगस्ट 2019, शनिवार

आजचा विषय :-
' ळ ' हा अक्षर असलेला शब्द लिहा ( मराठीत )

उदा. शाळा, बळी, वाळू, वळीव, वेळोवेळी इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना विशेष अक्षरांची ओळख होणे आणि या शब्दाचा जोडीदार, ज्याचा आवाज सारखा आहे, जो ' ल 'आहे त्याचे शब्द वेगळे आहेत याची जाणीव होणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 03 सप्टेंबर 2019, मंगळवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
पहिल्या अक्षरावर अनुस्वार असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. नंदन, आंबा, चिंता, चेंडू, गुंता, इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना अनुस्वाराची ओळख होणे आणि अनुस्वार अक्षरांच्या शिरोरेषेवर देणे याची जाणीव होणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
*उपक्रमातील काठिण्यपातळी वाढवू या*

मुलांची शब्दसंपत्ती उपयोगात आणण्यासाठी जे शब्द फळ्यावर लिहिण्यात आले आहेत. त्या प्रत्येक शब्दांचे एक वाक्य तयार करायला सांगावे. इयता तिसरीच्या पुढे यास उत्तम प्रतिसाद मिळेल. जसे की

चिंच - चिंच आंबट असते.
आंबा - मला आंबा खूप आवडतो.
मांजर - माझ्या घरात एक मांजर आहे.

असे विद्यार्थ्यांकडून 15 ते 20 वाक्य तयार करण्याचे काम करून घेता येईल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 04 सप्टेंबर 2019, बुधवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
पहिल्या अक्षरावर वेलांटी असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. लिहा, चिंतन, किर्तन, मीठ, पीठ, विठोबा

उद्दिष्ट - मुलांना पहिल्या अक्षरावर वेलांटी देतांना पहिली असावी की दुसरी वेलांटी याची ओळख होणे. काही शब्दांवर काही फरक पडत नाही. एक अक्षरी शब्द देखील लिहून घ्यावे.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 05 सप्टेंबर 2019, गुरूवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
पहिल्या अक्षराला उकार असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. बुध, गुरू, शुक्र, कुमार, दुपार, मुलगा, तू इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना पहिल्या अक्षराला उकार देतांना पहिला असावा का दुसरा उकार याची ओळख होणे. काही शब्दांवर काही फरक पडत नाही. एक अक्षरी शब्द शक्यतो दीर्घ असतात ते ही देखील लिहून घ्यावे.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 06 सप्टेंबर 2019, शुक्रवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
शेवटच्या अक्षरावर वेलांटी असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. काठी, आणि, सावली, बाकी, पाणी, मनोमनी इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना शेवटच्या अक्षरावर वेलांटी देतांना पहिली वेलांटी असावी का दुसरी वेलांटी याची ओळख होणे. फक्त आणि हा शब्द पहिली वेलांटी येतो बाकीच्या सर्व शब्दांवर दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ असते याची जाणीव मुलांना करून द्यावी

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 09 सप्टेंबर 2019, शनिवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
दुसऱ्या अक्षरावर वेलांटी असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. पालिका, वहिनी, वहिवाट, पाणिनी, उकिरडा, तारीख, खेरीज, गतिमान, बेरीज इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना दुसऱ्या अक्षरावर वेलांटी देतांना पहिली वेलांटी असावी का दुसरी वेलांटी याची ओळख होणे. शक्यतो शब्दांच्या दुसऱ्या अक्षरावर पहिली वेलांटी येते याची जाणीव मुलांना करून द्यावी. काही अपवाद शब्द वगळून. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 11 सप्टेंबर 2019, सोमवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
दुसऱ्या अक्षराला उकार असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उदा. नकुल, मागून, वाटून, वळून, मुंगूस, कुटुंब,  इत्यादी

उद्दिष्ट - मुलांना दुसऱ्या अक्षराला उकार देतांना पहिला उकार की दुसरा उकार याची ओळख होणे. शब्दांच्या दुसऱ्या अक्षराला काही ठिकाणी पहिला उकार येतो याची जाणीव मुलांना करून द्यावी. काही अपवाद शब्द वगळून. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 14 सप्टेंबर 2019, शनिवार

व्याकरणाच्या नियमांची नकळत ओळख करून देणे

आजचा विषय :-
पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराला वेलांटी असलेले शब्द लिहा ( मराठीत )

उद्दिष्ट - मुलांना पहिल्या व दुसऱ्या अक्षराला वेलांटी देतांना कोणती वेलांटी येते याची जाणीव मुलांना करून द्यावी. काही अपवाद शब्द वगळून. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 16 सप्टेंबर 2019, सोमवार

आजचा विषय :- शेत ( याविषयाशी निगडीत शब्द लिहा )

उद्दिष्ट - शेत आणि त्याच्याशी संबंधित सर्व शब्द मुले विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 18 सप्टेंबर 2019, मंगळवार

आजचा विषय :- शाळा ( याविषयाशी निगडीत शब्द लिहा )

उद्दिष्ट - शाळा आणि त्याच्याशी संबंधित सर्व शब्द मुले विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 19 सप्टेंबर 2019, गुरूवार

आजचा विषय :- आई ( याविषयाशी निगडीत शब्द लिहा )

उद्दिष्ट - आई आणि त्याच्याशी संबंधित सर्व शब्द मुले विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*त्यातून छानसा निबंध किंवा कविता तयार करणे*

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 20 सप्टेंबर 2019, शुक्रवार

आजचा विषय :- जंगल ( याविषयाशी निगडीत शब्द लिहा )

उद्दिष्ट - जंगल आणि त्याच्याशी संबंधित सर्व शब्द मुले विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*त्यातून छानसा निबंध किंवा कविता तयार करणे*

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 21 सप्टेंबर 2019, शनिवार

आजचा विषय :- रफार असलेले शब्द लिहा
उदा. - वर्ग, निसर्ग, वर्षा, कर्म, सर्रास इत्यादी

उद्दिष्ट - रफारचे सर्व शब्द मुले विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 23 सप्टेंबर 2019, सोमवार

आजचा विषय :- पोटातून र जोडलेले जोडशब्द असलेले शब्द लिहा
उदा. - प्रकार, क्रम, क्रमांक, द्रव इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 24 सप्टेंबर 2019, मंगळवार

आजचा विषय :- र ची जोडाक्षर असलेले शब्द लिहा
उदा. - कुऱ्हाड, बिऱ्हाड, साऱ्या, याचप्रकारची जोडाक्षरे इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 25 सप्टेंबर 2019, बुधवार

आजचा विषय :- ऋ असलेले शब्द लिहा

उदा. - कृमी, कृषी, गृह,  याचप्रकारची जोडाक्षरे इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 26 सप्टेंबर 2019, गुरूवार

आजचा विषय :- सारख्या अक्षरांची जोडाक्षर असलेले शब्द लिहा
उदा. - नक्कल, दिग्गज, गप्पा, किल्ला इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 27 सप्टेंबर 2019, शुक्रवार

आजचा विषय :- इंग्रजी अँ असलेल्या अक्षरांची शब्द लिहा
उदा. - कॅट, बॅक, ऍक्टर,  इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 28 सप्टेंबर 2019, शनिवार

आजचा विषय :- इंग्रजी ऑ असलेल्या अक्षरांची शब्द लिहा
उदा. - ऑस्कर, कॉल, बॉल, टॉल इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उपक्रम -
*माझा फळा-माझी लेखणी*
दिनांक :- 30 सप्टेंबर 2019, सोमवार

आजचा विषय :- आ शब्दावर अनुस्वार असलेले शब्द लिहा
उदा. - दांडी, गांधी, भांग,  वांगे,  इत्यादी

उद्दिष्ट - मुले शब्द विचार करून सांगतील. शिक्षक मुलांना मदत करतील. मुलांना शब्दसंग्रह वाढविता येईल.

*काठिण्यपातळी*
लिहिलेल्या शब्दांचे 15 ते 20 वाक्य वहीवर लिहिणे.

*संकल्पना - नासा येवतीकर*
*9423625769*
~~~~~~~~~~~~~~~~~~~

अहवाल लेखन करू या .......

• एक छोटं रजिस्टर घ्यावं

• पहिल्या पानावर उपक्रमाचे नाव लिहावं " माझा फळा - माझी लेखणी "

• दुसऱ्या पानावर याची पूर्ण कृती लिहायची

• तिसऱ्या पानावर या उपक्रमाचे काय फायदे होऊ शकतील ते लिहावं

• चौथ्या पानावर तक्ता करावा त्यात
अ क्र । दिनांक । विषय । सहभागी विद्यार्थी । उपक्रमशील शिक्षक सही । मुअ सही

• त्याच वहीत शेवटच्या काही पानावर या उपक्रमाविषयी पालक, अधिकारी यांच्या प्रतिक्रिया घेता येईल.

या पद्धतीने data तयार केला म्हणजे याचे document सहज तयार होईल.

धन्यवाद .....!

आपण सर्वजण उपक्रम राबवत असतो मात्र त्याचे document करत नाही. ते करायलाच हवं म्हणून हा खटाटोप

संकल्पना : - नासा येवतीकर
पदवीधर भाषा शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, धर्माबाद
ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769
nagorao.yeotikar@gmail.com

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...