शिक्षक मित्रांनो,
सप्रेम नमस्कार.
उपक्रम पूर्ण वाचल्यानंतर आपल्या शाळेवर हा उपक्रम राबवायचा असेल तर खालील लिंकवर क्लीक करून *फक्त शिक्षकांनीच* या समुहात join व्हावे.
https://chat.whatsapp.com/1RpRh2hyecS3rJeQArZVTU
उपक्रमाचे नाव :
*माझा फळा - माझी लेखणी*
◆ कृती -
*हा उपक्रम शाळा स्तरावर तसेच वर्ग स्तरावर घेता येईल.
*मैदानात किंवा वर्गात एक फळा आणि खडू ठेवण्यात यावे.
*परिपाठमध्ये फळ्यावर आजचा विषय सर्व मुलांना सांगण्यात यावे.
*मुले वर्गात गेल्यानंतर एकेक विद्यार्थ्यांना त्या विषयाशी निगडित शब्द फळ्यावर लिहिण्यास सांगावे.
*दुपारपर्यंत सर्व विद्यार्थी लिहून झाल्यावर विद्यार्थ्यांना त्या फळ्याचे निरीक्षण करायला सांगणे.
*फळ्यावर लिहिलेले शब्द चुकीचे असतील तर त्यावर विद्यार्थी चर्चा करतील ( नाव न सांगता )
*ज्या विद्यार्थ्याने अचूक शब्द आणि सुंदर अक्षरांत लेखन केले त्याचे नाव दुसऱ्या दिवशी परिपाठात सर्वांसमोर सांगणे.
*रोज एक नवा विषय मुलांना देणे आणि विद्यार्थ्यांनी शब्दांचे फलक लेखन करणे.
फायदा -
*लेखनक्षमता विकसित होईल
*मुलांची शोधकवृत्ती वाढीस लागेल
*चुकीचे शब्द शोधल्यामुळे भविष्यात शब्द लेखनात चूका कमी होण्यास मदत होईल.
*मुलांच्या मनात आनंद निर्माण होईल.
*विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढीस लागेल.
*इतरांपेक्षा आपले लेखन कसे आहे ? तो स्वतः ठरवेल आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.
*विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला वाव मिळतो.
*अभ्यास करण्यात गोडी निर्माण होईल
*विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
रोज एक नवा विषय या समुहात दिले जाईल, आपल्या शाळेत *माझा फळा - माझी लेखणी* राबविणाऱ्या शिक्षकांचे स्वागत आहे.
*संकल्पना - नासा येवतीकर*
उपक्रमशील शिक्षक, नांदेड
9423625769
*उपक्रमातून शिक्षण समूह नियमावली*
*माझा फळा - माझी लेखणी या उपक्रमावर आपणांस दररोज काम करायचे आहे.
*त्याअनुषंगाने रोज सकाळी एक विषय समूहात पोस्ट करण्यात येईल
*त्याच विषयाच्या संबंधित माहिती आणि फक्त एक आणि एकच फोटो दुपारी एकनंतर share करायचे आहे.
*या उपक्रमाला प्रतिसाद कसा मिळतो ? यावर पुढील क्रिया ठरविता येणार आहे.
*आपणास काही समस्या असेल किंवा काही सूचना द्यायचे असतील तर admin च्या मोबाईल क्रमांकावर whatsapp करावे कृपया call करणे टाळावे.
*हा उपक्रम आपण सर्वजण शाळेवर सलग एक आठवडा राबविल्यानंतर याचे feedback घेणार आहोत.
*आपण सर्व शिक्षक आहोत, सुज्ञ आहोत. त्यामुळे येथे उपक्रमशिवाय कोणतीही पोस्ट करूच नये.
*आपले उपक्रम राज्यभर पोहोचविण्याचे काम या समुहाच्या माध्यमातून करण्याचा हा छोटा प्रयत्न आहे.
*प्रत्येकांच्या उपक्रमाला येथे संधी मिळणार आहे. फक्त थोडा वेळ प्रत्येकाने सबुरीने घ्यावे.
*एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण मिळून मिसळून काम करणार आहोत.
*आपण करत असलेल्या उपक्रमाची documetnt करणे आवश्यक आहे म्हणून तशी तयारी करण्याचे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न असेल.
*सहकार्य करू या नक्की काही तरी वेगळं करून दाखवू या.*
आपण सर्व शिक्षक मित्रांनी विश्वास दाखवून समुहात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ........ आणि
धन्यवाद .......!
नासा येवतीकर, संयोजक
No comments:
Post a Comment