सोशल मिडीया आणि आधार
फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावर आधार लिंक करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली असल्याची बातमी वाचण्यात आली. एका दृष्टिकोनातून सरकारचे म्हणणे अगदी योग्य आहे असे वाटते. स्मार्टफोन आल्यापासून सोशल मिडीयाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याचा चांगला वापर करणारी मंडळी खूप कमी आहेत, मात्र गैरवापर करणाऱ्या मंडळींचा भरणा सर्वात जास्त आहे. फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मिडियामध्ये सर्वात जास्त फेक अकाउंट आहेत. ज्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे कळायला मार्ग नाही. बहुतांश जणांना याचा शारीरिक आणि आर्थिक त्रास देखील सहन करावा लागला. काही जणांची यात फसवणूक झाल्याचे प्रकार देखील घडले आहेत. याचा जास्तीत जास्त त्रास महिला वर्गांना होतो. व्हाट्सअप्प हे मोबाईल क्रमांक शी जोडलेले असल्यामुळेत्याच्यात सुरक्षितपणा वाटतो. म्हणून सध्या याचा वापर करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच प्रमाणात दुसरीकडे मात्र विश्वास नसल्यामुळे महिला वर्ग दुसऱ्या सोशल मीडियाचा फार कमी वापर करतांनादिसून येतात. मात्र महिलांच्या नावाचा वापर करून अनेकजण फेक अकाउंट उघडण्याचे प्रकार भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अफवा पसरविण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. सोशल मिडियाला आधार लिंक करणे सोयीचे वाटत असले तरी या कार्डवरील माहिती सार्वत्रिक होण्याची भीती देखील आहे. मात्र सोशल मिडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंकुश निर्माण करणे भविष्यात खूप गरजेचे आहे, एवढं मात्र खरे
- नागोराव सा. येवतीकर
really nice article,thank you and i have to share thismarathi political news
ReplyDelete