School Chale Hum
शाळेला चाललो आम्ही
नेमिचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेलाही याच महिन्यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्पन्न घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्याच्या तारखेकडे, शाळेच्या घण घण आवाज करणा-या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच. तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्याची ते वाट बघत असतील असे म्हणणे आश्चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र , नव्या वर्गात प्रवेश करणा-या सर्वच मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी उत्सुकता त्यांच्या मनात असते त्याचमूळे शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्तके त्यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याच्या शासनाच्या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते. पूर्वी जेव्हा शाळेतून पुस्तक वाटप केल्या जात नव्हते तेव्हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्चे कंपनी शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारातून पुस्तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्तके जवळच्या मित्रांकडून अर्ध्या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्याची मजा आज नक्कीच नाही. पुस्तके मोफत मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकाना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांनाअजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामूळे सद्यस्थितीत पुन्हा पुन्हा वापरा पद्धतीला तिलांजली मिळाली असून वापरा आणि फेका अशी संस्कृती उदयास येत आहे, असे वाटते. त्यास्तव कागद निर्मितीसाठी पर्यावरणावर त्याचा अतिरिक्त भार पडत आहे, हे निराळेच.
शाळकरी मुलांसोबतच त्याच्या पालक वर्गांना सुद्धा शाळा कधी सुरू होते ? याची प्रतिक्षा लागून राहते. दिवसभर मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांना कामात व्यस्त ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे खरोखरच कठीण काम असल्याची जाणीव पालकांना या सुट्टीच्या निमित्ताने नक्कीच झाली असेल यात शंका नाही. त्यास्तव शाळा सुरू होण्याची आतुरता पालक वर्गातही असतेच. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांना वयाच्या तीन वर्षापासून शाळेत धाडत असतो. नर्सरी, एल.के.जी., व यु.के.जी. हे तीन वर्ष शाळा पूर्व तयारीच्या नावाखाली मुलांना शाळेत पाठविले जाते. परंतु त्यांची खरीखुरी शाळा ही वयाच्या सहाव्या वर्षी इयत्ता पहिली वर्गापासून सुरूवात होते. मुलाचे सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यास इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश देऊ नये, यामागे शिक्षणतज्ञ मानसिक बाब स्पष्ट करतात. परंतु पालक या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत लहान वयातच मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश देतात. साधारणपणे अशा मुलांना प्रवेश दिल्यानंतर याचे परिणाम तीन-चार वर्षानंतर बघावयास मिळतात आणि तोपर्यंत नक्कीच उशीर झालेला असतो. त्यास्तव ज्या मुलांची वय प्रवेश समयी सहा वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पहिल्या वर्गात पालकांनी प्रवेश देण्याचा हट्ट धरू नये. वयोमानानुसार अभ्यासक्रमाची रचना व आराखडा तयार केला जातो व कमी वयाच्या मुलांना दरवर्षी वर्ग बदलत गेल्यानंतर वरील वर्गाचा अभ्यासक्रम झेपत नाही. त्यामूळे अशी मुले अभ्यासापासून, शाळेपासून, गुणवत्तेपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या मनात शाळा व अभ्यास याविषयी भीती निर्माण होते. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी न्यूनगंड निर्माण होते आणि त्याचा कधीच विकास होत नाही. अर्थातच ह्या मुलांना शाळेचा पहिला दिवस काय कोणताच दिवस आकर्षित करू शकत नाही. त्यास्तव आपल्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाचेच नाही तर शाळेचे नेहमीच आकर्षण राहील याकडे शिक्षक आणि पालकानी लक्ष देणे आवश्यक आहे.
नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद.
मो.9423625769

No comments:
Post a Comment