{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
{{{}}}{{}}संकलन प्रारंभ {{{}}}{}
📚 साहित्य दर्पण Whatsapp ग्रुप 📰🖊
द्वारा आयोजित
🗽 साहित्य दरबार 🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🚩भाग :- ( 8वा )-आठवा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 12/06/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★
*शैक्षणिक वर्ष 2016 -2017 सत्राच्या प्रारंभानिमित्त विशेष*
††††††††††††††††††
==================
📝 विषय:- " *माझी शाळा* _किंवा_ *माझ्या आठवणीतील शाळा* "
==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.आप्पासाहेब सुरवसे, लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री ना .सा. येवतीकर
************************
💥 परीक्षक - *सौ. कविता देशमुख -बडवे बीड*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स - श्याम स्वामी सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🌹साहित्य दर्पण ग्रुप व्दारा
आयोजित 🌹
***********************
साहित्य दरबार
***********************
माझी शाळा
***********************
ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळा ही जशी माऊली बाळा
हासर्या फुलांचा बाग जसा आनंदी
ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी
हासुनी हसवुनी सांगुनी गोष्टी
आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ
हातात घालुनी हात तयांच्या राहु
येथेच बंधु प्रेमाचे घ्या धडे
मग देशकार्य करण्याला व्हा खडे
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा
जी तयार करते देशासाठी बाळा
हे गीत नुसते गुणगुणले तरी माझ्या बालपणीच्या शाळेचे रुपडे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते आणि 50 वर्षापुर्वीचे बालपण आठवते
आज माझे वय 56 वर्षेआहे.
मी मुख्याध्यापिका आहे पण
छे ! बालपण म्हणजे जिवनातील सकाळ,नव्हे नव्हे जीवनातील वसंत ऋतु.जीवन
म्हणजे एक लांबलचक प्रवास
आहे.,खरतर बालपण म्हटले की सर्वात अगोदर आठवते ती "आई" परंतु
दुर्भाग्य याविना का आम्हास नाही आई ." असो.
आगगाडीतल्या प्रवासासारखी अनेक वळणे येतात जीवनप्रवासामध्ये .
बालमनाची नाजुक अवस्था
पक्षानांही लाजवेल अस स्वच्छंदपणे मुक्त विहार !! अन् एके दिवशी शाळेत नाव घालायच हे ऐकले आणि मी
खुप घाबरले, कारण काही बाही ऐकलेलं शाळेबद्दल,
आईने नविन कपडे , दप्तर,
खापराची पाटी, पेन्सिल आणले आणि आमची स्वारी
तयार होऊन निघाली.
माझ सारं स्वातंत्र्य हिरावुन घेणारा तो क्षण ! इवल्याशा मनात भीती
आणि आश्चर्य यांचे व्दंव्द
चाललेल, नाव नोंदणी झाली
माझ्या वर्गात मला सोडले,
पण माझं स्वागत बावरलेल्या
चेहऱ्यानी आणि हुंदक्यानी
झालं काहीनी तर सप्तकात सुर लावला होता.झाडांच्या
फांदीवर चिमण्या बसाव्यात
तशी पोरे एकमेकांना बिलगुन
बसली होती.तिथे बाजुला माझे गुरुजी उभे होते , पांढरा शुभ्र धोतर ,शर्ट ,डोक्यावर टोपी गोड हसरा चेहरा.
त्यांच्या कडे पाहुनच मला धैर्य आलं.
आता मात्र माझी नजर आजुबाजुला गेली तो
काय मज्जाच मज्जा !! रंगीत
मणी, चेंडू , खेळणी, गोट्या,
ठोकळे आणखी बरच काही
खुप खुप आनंद झाला शाळ मला आवडली पण सवय नसल्यामुळे कधी एकदा घरी
जाईन अस मला झालं,अशा
प्रकारे माझ्या आयुष्यातील पहिल वळण.
आज मी अशा वळणावर येऊन उभी आहे की जिथुन विशाल भविष्य
काळाच क्षितीज पसरलय
ज्याला कधी अंत च नाही
आणि म्हणुण माला वाटतं की
तै माझा शाळेतला पहिला दिवस म्हणजे माझ्या उज्वल,
भविष्याची रम्य पहाट होती .
काय गमत आहे ज्या शाळेत पहिलीत प्रवेश
घेताना जी अवस्था होती तीच अवस्था दहावी नंतर होती पण फरक केवढा होता,
येताना भिती,तर जाताना भक्ती,येताना पाटी कोरी,
जाताना ज्ञानभांडारातील
अमोल रत्ने शिगोशिग भरली होती, येताना मातीचा गोळा
जाताना झालं त्याच सुंदर
शिल्प. ही किमया घडवली
माझ्या गुरुंनी,ही इमारत म्हणजे नुसत्या विटांच्या खोल्या नव्हेत तर ते आहे
साक्षात मंदिर. मंदिरात असते म्हणून कि काय शाळेत
ही घंटा असते.या मंदिराच्या
गाभाऱ्यात केलेले कवितांचे
पाठांतर,पाढ्यांची आवर्तने,
शब्द भेंड्या,सागरगोट्यांचा
रंगलेला डाव आजही सर्व
आठवते.हीच जागा ती जिथे
ज्ञानेश्वरांची ,चोखामेळ्यांची
संत कबीर.,इंदिरा संत,शांता
शेळके, बालकवी,कुसुमाग्रज
यांची ओळख इथेच झाली.
इथेच माझी एडीसन,न्युटन
यांच्याशी मैत्री झाली,मानवी
रचना समजली इथेच, चार
भिंतीत बसुन जगाची सफर
केली,जिज्ञासा चेतवली,
फुलवली ती इथेच.सहजीवन
मी इथे अनुभवले,डबेच काय
सुख-दुःख ही वाटुन घेतले.
रुसवे, फुगवे,भांडण-तंटे,
कट्टी-बट्टी यांनी चविष्ट केलं इथलं जीवन.
मला वाटतं मी खुप लांबचा
प्रवास केला, मु.अ. पद मिळालं,प्रतिष्ठा मिळाली तरीही मला जमिनीवर पाय
ठेवुनच चालायला आवडतं
जेंव्हा मी आयुष्याकडे वळुन
पहाते तेंव्हा मला काही गोष्टी
तुम्हाला सांगाव्याशा वाटतात
ते म्हणजे---या जगात कोणतीही गोष्ट सहजासहजी
आणि मोफत मिळत नसते ती
लढुन किंवा कष्ट करुन मिळवावी लागते.कष्ट करण्याचा आपल्याला आनंद
वाटला पाहिजे,कष्ट करुन बाहेर पडणाऱ्या घामाचे मुल्य
सर्वश्रेष्ठ असते म्हणून स्वावलंबी व्हायला शिकलं
पाहिजे शाळेत जे मिळतं ते
35 मार्कासाठी असतं आणि
राहिलेले 65 मार्क्स ज्यातुन
जीवन घडत असत ते तुम्हाला
शाळेबाहेर अनुभवातुन मिळवावे लागते.तुम्ही जिद्दीने
लढता तेव्हा यश तुम्हाला
शोधित असते.जो दुसऱ्याच्या सावलीत राहतो
तो स्वतःची सावली गमावुन
बसतो.सावलीची किमत उन्हात उभे राहुनच कळते हे झाले मी जिथे घडले त्या शाळेविषयी आणि आता जिथे देशाचा भविष्यकाळ मी घडवते त्या शाळेविषयी थोडसं-----
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" या उक्तीचा प्रत्येय सध्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये
येत आहे कृती केली कि यश
मिळते पण त्यासाठी कष्ट करण्याची गरज असते.
माझ्या शाळेत अत्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचा वेग थक्क करणारा आहे.एका पणतीने अनेक पणत्या लावता येतात त्याप्रमाणे एका कडून प्रेरणा अनेक जणाकडे,
ज्ञानाच्या ज्योती शाळेमध्ये
उजळण्यास सुरुवात झाली आहे शिक्षण क्षेत्रातील ही क्रांतीची नांदी आहे.
शिक्षणाचा मुळ हेतु बालकांच्या अंगभूत कौशाल्याचा विकास करण्या
करीता पुरक वातावरणाची
निर्मिती करणे व त्या व्दारे बालकांचा सार्वांगिण विकास
साधने य दृष्टीने माझ्या शाळेत प्रयत्न होतात.
कोणत्याही दडपणाशिवाय
विद्यार्थी कसे अध्ययन करतील हे पहाणे हा ज्ञानरचनावादाचा मुख्य गाभा
आहे.त्या दृष्टीने माझ्या शाळेत विद्यार्थी स्वतः ज्ञानाची रचना करतात.
कोणतीही संकल्पना जेव्हा समजते,उमगते,पटते तेव्हांच ती खर्या अर्थाने रुजते त्या प्रमाणे ज्ञानरचनावाद नव्याने रुजु पहात आहे.माझ्या शाळेत सहशालेय उपक्रम, दैनंदिन परिपाठ स्पर्धा परीक्षा
तयारी,हस्ताक्षर स्पर्धा,क्रिडा
स्पर्धा,रांगोळी स्पर्धा शाळेसाठी झटणारे सर्व शिक्षक या सर्वांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने माझी शाळा शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरत आहे.
ज्याप्रमाणे वर्षभराच्या कष्टानंतर शेतकऱ्यांना धान्याच्या रुपात केलेल्या कष्टाचे गोड फळ मिळते त्या प्रमाणे आम्हां सर्वांना केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसु
लागले.अशा प्रकारे माझ्या शाळेत विद्यार्थी अप्रगत राहणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व टीम घेत आहोत व शाळा प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल करील हे पाहिले जाते.
"गुरु ने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवु हा पुढे वारसा."
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
*शाळेला चाललो आम्ही*
नेमिचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे जून महिना उजाडला की पावसाळ्याला जशी सुरूवात होते अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेलाही याच महिन्यात सुरूवात होते. जसे शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून नवीन उत्पन्न घेण्यासाठी पावसाची जशी चातक पक्ष्यांप्रमाणे वाट पाहतो. अगदी तसेच शाळकरी मुले शाळा सुरू होण्याच्या तारखेकडे, शाळेच्या घण घण आवाज करणा-या घंटेकडे आतुरतेने वाट पाहत असतातच. तब्बल दीड ते दोन महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज शाळेला सुरुवात होत आहे. उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, गरमी आणि तेवढाच वातावरणातील उकाडा, रोज घरातच बंदीस्त राहून, मित्राची ताटातूट झालेली, तेच ते कार्टून बघून सर्व मुलांना याचा ऊब आला असेल आणि शाळा सुरू होण्याची ते वाट बघत असतील असे म्हणणे आश्चर्याचे वाटणार नाही. नवीन शाळा, नवे मित्र , नव्या वर्गात प्रवेश करणा-या सर्वच मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. कधी एकदा शाळेत जाईन आणि नव्या मित्रांना नव्या शिक्षकांना भेटेन अशी उत्सुकता त्यांच्या मनात असते त्याचमूळे शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरतेने प्रतिक्षा करणारी बच्चे कंपनी जाम आनंदात असतात. नवीन मित्रांसोबतच नवी कोरी करकरीत पुस्तके त्यांना आकर्षित करतात. कधी एकदा पुस्तके हातात पडतात असे मुलांना वाटत असते आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याच्या शासनाच्या उपक्रमामुळे सुद्धा मुलांना या दिवसापर्यंत वाट पहावीच लागते. पूर्वी जेव्हा शाळेतून पुस्तक वाटप केल्या जात नव्हते तेव्हा पालक मंडळीकडे तगादा लावून बच्चे कंपनी शाळा सुरू होण्यापूर्वी बाजारातून पुस्तके खरेदी करीत असत तर काही जण जुने पुस्तके जवळच्या मित्रांकडून अर्ध्या किमतीत खरेदी करीत. तो व्यवहार घरातील मोठ्यांना न कळविता देणे घेण्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगितले जायचे. त्यामुळे किती पैसा वाचविला याचे सुद्धा गणित करायचो. मात्र त्याची मजा आज नक्कीच नाही. पुस्तके मोफत मिळत असल्यामुळे जुन्या पुस्तकाना कोणी विचारीत नाही, फुकटात मिळणाऱ्या पुस्तकाची त्यांनाअजिबात महत्त्व वाटत नाही आणि बाजारातून खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामूळे सद्यस्थितीत पुन्हा पुन्हा वापरा पद्धतीला तिलांजली मिळाली असून वापरा आणि फेका अशी संस्कृती उदयास येत आहे, असे वाटते. त्यास्तव कागद निर्मितीसाठी पर्यावरणावर त्याचा अतिरिक्त भार पडत आहे, हे निराळेच.
शाळकरी मुलांसोबतच त्याच्या पालक वर्गांना सुद्धा शाळा कधी सुरू होते ? याची प्रतिक्षा लागून राहते. दिवसभर मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांना कामात व्यस्त ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे खरोखरच कठीण काम असल्याची जाणीव पालकांना या सुट्टीच्या निमित्ताने नक्कीच झाली असेल यात शंका नाही. त्यास्तव शाळा सुरू होण्याची आतुरता पालक वर्गातही असतेच. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांना वयाच्या तीन वर्षापासून शाळेत धाडत असतो. नर्सरी, एल.के.जी., व यु.के.जी. हे तीन वर्ष शाळा पूर्व तयारीच्या नावाखाली मुलांना शाळेत पाठविले जाते. परंतु त्यांची खरीखुरी शाळा ही वयाच्या सहाव्या वर्षी इयत्ता पहिली वर्गापासून सुरूवात होते. मुलाचे सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यास इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश देऊ नये, यामागे शिक्षणतज्ञ मानसिक बाब स्पष्ट करतात. परंतु पालक या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत लहान वयातच मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश देतात. साधारणपणे अशा मुलांना प्रवेश दिल्यानंतर याचे परिणाम तीन-चार वर्षानंतर बघावयास मिळतात आणि तोपर्यंत नक्कीच उशीर झालेला असतो. त्यास्तव ज्या मुलांची वय प्रवेश समयी सहा वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पहिल्या वर्गात पालकांनी प्रवेश देण्याचा हट्ट धरू नये. वयोमानानुसार अभ्यासक्रमाची रचना व आराखडा तयार केला जातो व कमी वयाच्या मुलांना दरवर्षी वर्ग बदलत गेल्यानंतर वरील वर्गाचा अभ्यासक्रम झेपत नाही. त्यामूळे अशी मुले अभ्यासापासून, शाळेपासून, गुणवत्तेपासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या मनात शाळा व अभ्यास याविषयी भीती निर्माण होते. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी न्यूनगंड निर्माण होते आणि त्याचा कधीच विकास होत नाही. अर्थातच ह्या मुलांना शाळेचा पहिला दिवस काय कोणताच दिवस आकर्षित करू शकत नाही. त्यास्तव आपल्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवसाचेच नाही तर शाळेचे नेहमीच आकर्षण राहील याकडे शिक्षक आणि पालकानी लक्ष देणे आवश्यक आहे.
नागोराव सा.येवतीकर
मु.येवती, ता.धर्माबाद.
मो.9423625769
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
"माझी शाळा"
ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला वाहून घेतलेल्या आणि भविष्यातील भारताच्या अधारस्तंभाना
घडविणा-या गुरुजनांना जे आत्मिक समाधान लाभतं ते इतर कोणत्याही क्षेत्रातील नोकरीत लाभत नाही.समोर बसलेले निष्पाप आणि उद्याच्या उज्वल भारताच्या स्वप्नाला डोळयांच्या
बाहूल्यातून चमक दाखवणा-या बालकांना घडवत
असताना मिळणारे समाधान फक्त आणि फक्त शिक्षकाच्याच वाट्याला येऊ शकते.आई वडिलांपेक्षा गुरुजींवर आधिक श्रद्धा आणि विश्वास ठेवणा-या आशाळभूत नजरा जेव्हा गुरुजी म्हणून पारखता येतात, तेव्हा रोमारोमातून
उठणारे तरंग आपणाला तू वेगळा कोणतरी आहेस याची जाणिव करुन देत असतात.हे धन ज्याला सापडते तेच गुरुजी सार्थकतेचे हक्कदार
असतात.
शाळा हे मंदीर या मंदीरातील दैवत विद्यार्थीआणि पुजारी म्हणजे शिक्षक असतो.आपल्या नोकरीच्या काळात अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात.आपल्याला सर्वच विद्यार्थी लक्षात राहत नाहीत पण काही चुनूक दाखवणारे,गुण दाखविणारे अथवा कधी अवगुण दाखविणारे विद्यार्थी कायम लक्षात राहत असतात.शिक्षक म्हणून काम करत असताना मला माझ्या लहाणपणीची माझी शाळा व माझे शिक्षक मला चांगलेच स्मरणात आहेत.त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा पुढे माझ्या समोर असणा-या
मुलांना ज्ञान देण्यासाठी उपयोग झाला,होत आहे.
नोकरी म्हंटलं की या गावात कधी तर दुस-या गावात कधी सतत शळा बदल होत असतो.माझी शाळा म्हणून आठवणीत राहणारी कोणती असं वेगवेगळं सांगता नाही येणार,कारण चांगल्या अनुभवासाठी एखादी तर नको असणा-या एखाद्या अनुभवासाठी दुसरी शाळा आठवणीत राहत असते.आणि खरंतर सर्वच शाळा लक्षात राहतात म्हणण्यास हरकत नाही.पण मला खासकरुन आठवणीत राहिलेली शळा पुणे जिल्ह्यातील डोंगरी वेल्हा तालुक्यातील पाबे येथील होय.ही शाळा लक्षात राहण्याचं कारण म्हणजे माझ्या नोकरीची सुरुवात या ठिकाणापासून या शळेपासून झाली. केवळ सुरुवातीची शाळा म्हणून आठवणीत आहे असं नाही.तर ते गाव,तेथील लोक,तेथील माझे सहकारी आणि विशेष म्हणजे तेथील विद्यार्थी.
शाळा म्हणजे फक्त दगड मातीच्या चार भिंतीने बंदिस्त ईमारत नव्हे.चैतन्याचा वास आणि आनंदाचा निवास असते शाळा.मी गावापासून खुप दूर असल्यानं मला फक्त शाळा आणि शाळा यवढंच काम होतं.रविवारीसुद्धा मी शाळेत असायचो,माझे सहकारीसुद्धा शाळेत असायचे.वर्ग सात म्हणजे शाळा सातवी पर्यंत होती पण वर्गखोल्या दोनच होत्या.बाकी वर्ग जवळच असणा-या मंदिरात भरत होते.खेळाला फारच कमी मैदान होते.पण खेळाविषयी आवड असणारी मुलं त्याचाच मनमुराद आनंद घेत असत.ही शाळा आठवणीत राहण्याचं आनखी एक कारण म्हणजे माझा विद्यार्थी किरण श्रीरंग कांबळे हा होय.त्याची जिज्ञासू वृत्ती मला माझे ज्ञान सतत अद्यायावत ठेवायला भाग पाडत असे.रोज नवनविन शंका आणि प्रश्न विचारायचा तो,त्याच्या अभ्यासू वृतीनं तो सर्वांचा आवडता झाला होता. मी त्याचा वर्गशिक्षक असल्यानं मला थोडा जास्तच अभिमान होता त्याचा.त्याच्या सोबतचे सर्व विद्यार्थी नव्हे तर एकूनच सर्व शाळा
आणि आम्ही शिक्षक यांच्यात पिता-पुत्राप्रमाने, माता-पुत्राप्रमाने संबंध होते.कांही कातकरी जमातीची मुलं पण शाळेत होती,त्यांच्या माध्यमातून कातकरी लोकजीवन जवळून पहाता आलं.त्यांच्या चाली, रितीरिवाज ,परंपरा आणि अंधश्रद्धा व त्या आणि तेथील लोकांचे एकुणच
जीवनमानअनुभवताआलं.शाळेतील सासंकृतिक कार्यक्रमातून अनेक सामाजीक विषयही मला मांडता आले.विद्यार्थ्याबरोबरच लोकांची सहकार्य भावना,मान सन्मान देण्याची वृतीआणि जिव्हाळा या बाबीमुळे तो भाग तो परिसर ती शाळा कायम स्मरणात राहणार आहे.जास्त पावसाचा असणारा हा भाग,राजगड आणि तोरणागडाचं रोज दर्शन होणारा हा परिसर...सळसळणारे चैतण्य देणा-या
सह्यगिरीच्या रांगा आणि छत्रपतीची पावलोपावली आठवण होणारा प्रदेश कायम आठवत नाही राहिला तरच नवल.या गोष्टीचा आनंद लुटण्याचं भाग्य केवळ त्या शाळेमुळे मला
लाभले.
अधुनिकतेच्या झगमगाटात वावरत असताना मला माझी शाळा आठवण्याचं कारण म्हणजे त्यावेळी शाळा शेणानं सारवावी लागायची.आणि दर शुक्रवारच्या या कार्यक्रमाचं नियोजन फार गंमतीदार असायचं.दोन वर्ग शेण आणायचे एक वर्ग पाणी पुरवठा करायचा तर एक वर्ग सारवन करायचा,कधी कधी यात आमचाही सक्रिय सहभाग असल्यानं लोकांच्या मनात आम्ही घर केलं होतं तर त्यानी आम्हाला केव्हाच जिंकून घेतलं होतं.
माझ्या आठवणीतील माझी पहिली ही शाळा अनेक अर्थाने आजही मला प्रेरणा देते.तिचे स्मरण
मला आजही उर्जा देते.शिक्षकांना गुरुजी म्हणण्याची तिथली पद्धत,ख-या अर्थानं पेशा शिकवणारी होती.आज मी माझ्या गावी बदलीने परत आलो आहे इकडेे मला सर म्हणून संबोधले जाते.मी गुरुजीचा सर झालो आणि गुरुजी बिरुदातील आनंदाला मुकलो,समाधानाला मुकलो.सरांचा थाट जरी नसला तरी त्याशब्दामुळे गुरुजी असल्यातील आणि सर असल्यातील ठळक भेद कोणास जाणवतही नसेल पण मी अनुवतो आणि जगतो आहे....माझ्या त्या शाळेने
मला माझ्या वरिष्टांकडून शिस्त दिली, विद्यार्थ्याकडून प्रेम मिळालं,लोकांकडून आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला.मुख्य म्हणजे
खुप मोठा अनुभव मला मिळाला. जो कायम माझ्या सोबत राहणार आहे.
श्री.पडवळ हणमंत सोपान
मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
8698067566.
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🌹स्पर्धेसाठी🌹
===================
💐माझी शाळा💐
===================
‘माझी शाळा’ म्हटलं की मन कस गोड आठवणीत हुदंडल. अगदीच शाळेत बागडायच ना तसच. मला पहिला दिवस तर आठवत नाही परंतु 4 थी पासुनची माझी शाळा आठवते.
खर तर अस वाटत की बालपणीच वय सुखाच. काय मजा,मस्ती, नुसता धिगांना. सगळ कस डोळ्यासमोरून चाललय अगदी सिनेमा पाहतो ना तसेच.
शाळा म्हटल पहिला परिपाठच आठवतो. मी शाळेसाठी फारच धडपडी खुप आवड शाळेची. त्यामुळे सगळ्यांच्या अगोदर मी कशी जाईन हित धडपड त्यासाठी काही खायच राहिल तरी चालेल पण नंबर पहिला माझाच कारण जागा पण मग पुढेच मिळेल न. आईवडिल जरी शिक्षक असले तरी तोरा कधी मिरवला नाही.पण मला नि माझ्या मैत्रीणीस पुढे कसे बसता येईल ही फार धडपड.मला आठवत माझ्या जवळच्या मैत्रीणीची बाकी मुलींची कट्टी झाली मग तिच्या एकटीसाठी पूर्ण मुलींशी कट्टी अन एकदा तर तिच्यासाठी एका मुलासही बडवली. अशी आठवणीतील व साठवतील माझ्या शाळेतील पहिली मैत्री.
हुशारीसोबत थोड्या खोड्याही होत्याच. एकदा एक भन्नाट शक्कल सुचली मग काय अंमलबजावणी ठरली नि काम फत्ते. सरांनी आरोळी निघली नि कोणाचा हा प्रताप.मग काय दोस्ती सोबत दुश्मन जागे झाले नि प्रताप कहानी सुरू “सर कल्पना अन् तिची ही खास मैत्रीण रूख्मीण हिने सर या लाकडी खुर्चीला फट पडलेली खुर्ची आणुन मांडली का तर यावर बसल्यास जोराचा चिमटा बसतो. मलाही बसला सर.” झालं मग काय उलट्या हावर झडी नि डोळ्याला अश्रूच्या धारा आणि पुन्हा घरी लेक्चर. पण मजा अन् सजा छान होती.
शाळेतली मजा अन्य कोठेच नाही....................
-कवायतीसाठी पुढे उभे राहण्याची धडपड............
- राष्ट्रीयदिनी जनगनमनसाठीचा सराव.....
- स्नेहसंमेलनासाठीचा डान्स नि तयारी.......
- उशिरा आल्याची शिक्षा.....
_पास झाल्यावर प्रत्येवर्षी वाटलेले पेढे....
-मैत्रीणीच्या डब्यातला एक घास माझा एक घास तिचा...
-परिक्षा देतांनाची धडधड.....
-रांगोळी,क्रिडा,चित्रकला,शिबर नि अजुन कितीतरी स्पर्धा..........
-अन् शेवटचा तो शाळेचा दिवस टिचर्स डे म्हणुन साजरा केलेला........
कितीतरी रडलो होतो आम्ही सगळे जणु नवरी चालली सासरी.इतका जीव त्या शाळेत गुंतलेला.वाटायच हे पुन्हा कधी नाही. का संपतीय ही शाळा कायमचीच ?माझी शाळा,माझे शिक्षक,माझ्या मैत्रीणी,माझा वर्ग,माझा बेन्च
हे सारं सारं सुटणार कायमचच. अन् अश्या भरल्या अंतकरणानी शाळेचा निरोप घेतला शेवटचा नि जीवन बदलल. तो सुखद अनुभव पुन्हा नाहीच......
संयोजक नि संकल्पनाकार यांचे आभार पुन्हा त्या आठवणीत थोडस या धकाधकीच्या जीवनात जाऊन जगता आलं.....अशी माझी शाळा तुमच्या समोर मांडता आली पुन्ह: च आभार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कल्पना जगदाळे@8★बीड.
📲9921957040.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
{{{}}}{{{}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🌹स्पर्धेसाठी🌹
मित्रांनो, उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपून आज सर्व शाळा सुरु होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर "माझी शाळा" हा लेख आपणासाठी. खरे तर प्रत्येक शाळा ही ज्ञानाईच असते. पण प्रत्येकाला माझीच शाळा मोठी वाटत असते. शाळा ती खेङेगावातली असो किंवा शहरातली, शाळा ही शाळाच असते. आपण वयानेच काय सर्वार्थाने कितीही मोठे झालो तरीही शाळेच्या आठवणींमध्ये आपण मस्त रमतो. मला तर आज माझी शाळा जशीच्या तशी आठवत आहे. हा लेख वाचल्यावर, आपणा सर्वांना सुद्धा शाळेच्या आठवणी येतील. ती शाळा, ते शिक्षक, त्या बाई, ते वर्ग, तो अभ्यास, खेळ, ईत्यादी,.....वाचा आणि घ्या आनंद !
===================
💐माझी शाळा💐
===================
*गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे,*
*आमुची तू जन्मदात्री, आम्ही तिचीच हो पाखरे,*
*देऊनी बळ पंखी, ती करिते प्रतिपाळा,*
*सर्वांहुनी निराळी, माझी शाळा*
माझे शिक्षण 1ली ते 4थी वेगवेगळ्या शाळेत झाले परंतु ज्या शाळेत मी घडलो ती भगवान विद्यालय बीड...
साधारण 1991 चा जून महिना. बाहेर चिंब पाऊस. पाठीवर दप्तर सोबत गल्लीतील मित्रमंडळी अन् घरापासून पायी जवळपास3 किमी वर शाळा माझे वडील याच शाळेत शिक्षक त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी चेहऱ्यावर भीति नाही
पाऊस जोर धरत होता तसे पाऊल झपाझप टाकत शाळेत पोहचलोत..
पांढरा खडू, काळा फळा, निरागस चेहरे, छडी घेतलेल्या बाई, जेवणाचा डब्बा, दप्तर, दगडांच्या भिंती अन् लाकडाचे बाक म्हणजे वर्ग. अन् असे अनेक वर्ग म्हणजे ‘शाळा’
पुढे पुढे अभ्यास, खेळ, वर्गमित्र, शिक्षक, सर, गृहपाठ या सगळ्या संकल्पना अनुभवू लागलो. सुदैवाने वडिल याच शाळेत शिक्षक असल्याने दहावी पर्यन्त माझी शाळा कायम राहिली, त्यावेळी शाळा आणि घर यांतील अंतर साधारण 3 किमी होतं, आज ते कितीतरी मैल आहे; उद्या कदाचित एका विश्वाएवढं असेल तरीसुद्धा ‘माझी शाळा’ माझ्याजवळच असेल अगदी माझ्या मनात, अन् हृदयातसुद्धा.
मी धांडेगल्लीतील ‘ भगवान विद्यालय, बीड’मध्ये कधी प्रवेश केला हे माझे मलाच काय कदाचित शाळेलासुद्धा समजले नाही. एवढे ऋणानुबंध त्या शाळेच्या शिक्षकांसमवेत, भिंतींशी निर्माण झाले होते. एव्हाना घरातील साखरेच्या डब्यापर्यंत हात पोचेल एवढी उंची प्राप्त केली होती, मात्र शाळेत जाण्या-येण्याची, मैदानात खेळण्याची, पळण्याची, पडण्याची उठून पुन्हा पळण्यातील आनंदाची उंची केव्हाच गाठली होती. ती उंची पुन्हा या जन्मात गाठू शकणार नाही. ज्या दिवशी ‘ माझी शाळा’ या विषयावर स्पर्धेसाठी लिहायचय असा अप्पा सुरवसे सरांचा मेसेज आला; तेव्हापासून मी शाळेच्या जुन्या आठवणीत अगदी रमून गेलो होतो. शाळेची इमारत, तिथला शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, जन्मदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा, शाळेच्या भिंतीवर असलेली गुणवंतांची नामावली केवळ बोलकीच नव्हती तर सतत प्रेरणादायी अन् काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करणारी होती. शाळेतील सर्व शिक्षकांना मी हवा तेव्हा हवा तो प्रश्न विचारायचो. अगदी ‘लोकसभेतील शून्य प्रहर म्हणजे काय’ पासून ‘माणूस मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित’ इथंपर्यंत. पण सांगताना आनंद होतो आहे की दरवेळी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईपर्यंत सर उत्तर देत होते. अगदी कधीकधी नंतर निवांत वेळ देऊनसुद्धा. विद्यार्थ्यांनं केवळ पास होऊन गुणवत्ता प्राप्त करण्यापेक्षा हे कितीतरी अधिक मौल्यवान होतं.
शाळेेचे ग्रंथालय, क्रीडामैदान आजही जसेच्या तसे आठवते.
माझी ‘ भगवान विद्यालय शाळा’ म्हणजे एक विश्व होतं. आजही कुठं 1-2 मिनिटंही उशिर झाला की, शिक्षकांनी शाळेत उशिरा पोचल्यावर मारलेले हातावरचे वळ आठवतात, अन् तेच वेळेवर पोचण्याचं ‘बळ’ देतात.
इयत्ता 6 वीत असताना मराठीच्या बाईंनी ‘ माझा आवडता खेळ’ या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा माझ्या निबंधाचं केलेलं कौतुक फार मोलाचं वाटतं. असंच इयत्ता आठवीत असताना हिंदीच्या सरांनी भाषणाच् केलेलं कौतुक आज मला जगातील कोठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान वाटतं.
कोणत्याही परिस्थितीत वेळ पाळावी, मुक्या प्राण्यांना अन् झाडांना इजा पोचवू नये, मोठ्यांना आदरानं बोलावं, खूप शिकावं, मोठं व्हावं पण आई-वडिलांना कधी विसरू नये. या संस्कारगोष्टी भगवान विद्यालय शाळेनचं मला दिल्या असं मी नेहमी कौतुकानं सांगत असतो. शाळेत साजरे होणारे गणेशोत्सव, रक्षाबंधन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ, या गोष्टी दरवर्षी मला खूप आवडायच्या.
दुर्दैवानं इयत्ता दहावीत तेवढी गुणवत्ता मी प्राप्त करू शकलो नाही, मात्र त्याहीपेक्षा अधिक ‘गुण’ शाळेनं दिल्याचं आठवलं की अक्षरश: मला दाटून येतं. इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम जवळजवळ संपला होता. त्या दिवशी शाळेचा शेवटचा दिवस होता. वर्गशिक्षक परीक्षेबद्दल निरनिराळ्या सूचना देत होते. मात्र, मी माझ्या मनात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत होतो. शाळा संपून जगात वावरण्याच्या स्वातंत्र्याचा. शाळेची घंटा वाजली, अन् आम्ही स्वतंत्र झालो. अगदी स्वतंत्र... आता छडी मारणारं कोणी नव्हतं... गृहपाठ झाला का विचारणारं कोणी नव्हतं... पण नंतर हळूहळू लक्षात आलं आपण ‘शाळा’ या विश्वात एवढे स्वतंत्र होतो की उगाच आपण जगाच्या शाळेत उतरलो अन् ‘पारतंत्र्यात’ गेलो. उगाच शाळा संपली... ती शाळा आता कधीच भरणार नाही...
*शेवटी या ओळी आठवतात...*
_शाळेत असताना मधल्या सुट्टिची मजा भारी_
_डब्बा खाऊन खेळत बसायची गम्मत न्यारी_
_काही मुलं पॉकेटमनीतुन विकत घ्यायची काहीसं_
_त्याना पाहून कधी माझंही तोंड व्ह्यायचं एवढुसं_
_लहान मुलांना पैसे न द्यायची शिस्त होती घरात_
_लाडाकोडाची मात्र असायची नित्य बरसात_
_पण वाटे आपणही कधी चटक मटक विकत घ्यावं_
_हातात आईस्क्रीम घेउन मित्रांसोबत मस्त मिरवावं_
_दिसले एकदा मित्राच्या बॅगेतले पैसे उघडे पडलेले_
_मधल्या सुट्टित माझ्याही हाती मग खाऊ आले_
_घराजवळ पोचताच लोक अचानक धावत निघालेले_
_पळणाऱ्या चोराला पकडुन शेवटी बेदम मारलेले_
_जाम टरकली माझी , खिशातले चॉकलेट बोचू लागले_
_सगळे लोकं परत वळुन मला मारणार जणु पटले_
_धुम ठोकली घराकडे , लगेच आईला बिलगलो_
_तिला सगळं खर्र सांगुन खुप खुप रडलो_
_वर्षभर शिकुनही मनाची पाटी कोरी राहून जाते_
_शाळेबाहेरची शाळा नकळत बरंच शिकवून जाते_
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद्
*✍🏻प्रविण सानप*
*धुळे*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
✨ माझी शाळा ✨
' सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे शाळा
म्हणून 'अ,आ,इ,ई' शिकण्या नियमित जा तू बाळा '
माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या शाळेला कधीच विसरू शकत नाही. शिक्षित माणसाच्या जीवनातील अत्यंत संस्कारक्षम काळ हा शाळेतच गेलेला असतो. माता आपल्या बालकाचे संगोपन करते. त्याला चालायला-बोलायला शिकवते. शाळारूपी माता ही बालकाच्या मनावर ठसवते की, "चराति चरतो भग: " - जो चालतो त्याचे भाग्यही त्याच्यासोबत चालते.
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देतांना नयन पटलांवर प्रत्यक्षात तीच... होय माझीच शाळा येऊन उभी राहिली. ज्या शाळेत आईचा हात धरून गेलो त्याच शाळेचा निरोप घेताना मात्र आईचा पदरही पुरेसा पडला नाही. खरचं जगावेगळी होती माझी शाळा... मी त्या शाळेत न शिकता त्या शाळेनेच तिच्या बाहुपाशात घेऊन मला शिकवलं... स्वाभिमानाने जगायला शिकवलं, सुख-दु:खाचा समतोल उपभोग घ्यायला शिकवलं, स्वतः बरोबरच समाजासाठी झटायला शिकवलं, आयुष्याचा खरा अर्थ शिकवलं... खरंच आज मी जे काही आहे ते फक्त अन् फक्त त्या शाळेने रूजवलेल्या संस्कारांमुळेच आहे.
. ' छडी वाजे छम छम, विद्या येई घम घम ' या काव्य पक्तींचा पुरेपूर अनुभव मला शालेय जीवनात मिळाला. आमच्या गणिताच्या शिक्षकांचा तो दांडुका आजही नजरेसमोर आला की आजही हात आपोआपच मागे जातो. पण त्याच दांडुक्याने आम्हाला गणितात इतरांपेक्षा खूप समोर नेऊन ठेवलं. तसं आम्हीही होतोच म्हणा तितकेच नटखट, खट्याळ पण अभ्यासात सदैव तत्पर. तास कुठल्याही विषयाचा चालू असो... आम्ही मात्र सदैव आमच्याच धुंदीत. धुंदी होती बालपणाची, बालपणीच्या निरागसतेची.. पण आमच्या शिक्षकांनी अभ्यासा बरोबरच आमच्या कला गुणांनाही वाव देण्याचा सतत प्रयत्न केला.
आज मी एका सामाजिक संघटनेचा जबाबदार प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरत असतो. मान-सन्मान मिळतो, चार ओळखी होतात, समाजात हक्काचं आदर मिळतो. पण ह्यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो माझ्या शाळेचा. शाळेतील चार पोरांसमोर हात-पाय थरथर कापत बोलणा-या लेकराला हजारो जनमाणसांसमोर बेधडक बोलायला शिकवलं. ही शिकवण शाळेतूनच मिळाली. माझ्या शाळेने नुसतं पुस्तकातील धडेच शिकायला लावले नाही तर जीवनाचे धडे देखील शिकवले. आमचे इतिहासाचे शिक्षक म्हणजे जणू शिकवत असतांना थेट इतिहासातच पोहोचायचे. त्यांचा रूबाबही तसाच, आवाजही तितकाच भारदस्त.. त्यांच्या तासात जणू आम्ही स्वतः रणांगणात जावून युध्द लढतोय असं भासायचं... खरंच जगावेगळी होती माझी शाळा....
ज्याप्रमाणे आम्ही शाळेत बागडलो त्याच प्रमाणे जीवनात उभारलोही. हां तशी माझ्या शाळेची इमारत जुनी होती पण तिच्यातील संस्कारांचा विस्तार बराच मोठा होता. काळानुरूप आजघडीला माझ्या शाळेचा चेहरामोहरा भलेही बदलला असेल पण आम्हाला घडवणारी माझी शाळा खरंच निराळी... पाणावलेल्या नयनांनी आज पुन्हा एकदा जावसं वाटतयं माझ्या त्याच शाळेत... मुक्तपणे बागडायला, येथेच्छ मस्ती करायला, तिच्या कुशीत अलगद झोपायला......
✎ प्रा. नितीन दारमोड @ 3
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
साहित्य दर्पण ग्रुप द्वारा 🌹
साहित्य दरबार स्पर्धा
🏠 माझी शाळा 🏠
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे माझे माहेर वडील शेतकरी आईवडील दोघेही अशिक्षित एकत्र कुटुब मोठे काका घरातील कुटुंब प्रमुख इतर दोन्ही भावांनी दादाच्या म्हणण्यानुसार चालायचे मला शिक्षणाची गोडी लागली ती माझ्या पहिल्या शिक्षिका सौ मथुराबाई यांच्यामुळे आजही मी त्याना विसरु शकत नाही कारण त्या माझ्या बाई कमी व आई अधीक होत्या नऊवारी साडी कपाळावर मोठ कुंकू अशा त्या मला माझ्या आईसारख्याच वाटायच्या त्याकाळी खेड्यामध्ये शिक्षणाच एव्हड महत्व नसायचे सुशिक्षित पिढी म्हटल तर आमची पहिली पिढी आम्हीदोघी बहीणी व दोन भाऊ मी सर्वात मोठी माझे वडील शेतकरी पण त्याना वाटायचे मुलांनी शिकावं
तेव्हा शाळेत आजच्या सारख्या सोई नव्हत्याआम्हाला कधी नवे पुस्तक मिळत नसायची जुनी पुस्तक घ्यायची शाळेजवळ शेरताटी असायची त्याच्या बुंध्याजवळ बसायचे व एक अनकुचीदार दगड घेऊन त्या चीकाने फाटलेली पुस्तक चीटकावयाची पुस्तकाला कव्हर घालायची ही काम करायचा इतका आनंद वाटायचा
आज आपण पाहतो मुलांना कशाची पर्वा नाही सगळ काही फुकट मिळतय याचा परिणाम मुलांना त्याच महत्व राहीलेल नाही पुस्तक असो गणवेश असो किंवा शाळेतील खिचडी जेव्हा एखादी गोष्ट किंवा वस्तु आपण विकत घेतो तेव्हा त्याच महत्व पटत असो
माझी शाळा एक आदर्श शाळा होतीबालमनावर जसे संस्कार व्हायला पाहीजेत अगदी तशी भक्कम पायाभरणी माझ्या शिक्षकामुळे माझी झाली शाळेत विविध उपक्रम घेतले जात असत आणी त्यात मी हिरिरीने भाग घेत असे आजही तो वर्ग तो बेंच आठवतो आणी पुन्हा एकदा लहाण होऊन शाळेत जाऊन बसावे असे वाटते
अशी माझी शाळा
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
-----माझी शाळा----
....................................
ज्ञानाचे मंदिर
ज्ञानाचा सागर
ज्ञानाचे आगर
माझी शाळा
जीवन शिक्षण मंदिर (दहिवली)१ ली ते ४थी
अभिनव ज्ञान मंदिर (कर्जत)
५वी ते १२वी हायस्कूल
या दोन शिक्षण संस्थांनी, शाळांनी माझे जीवन घडवले.
माझे गुरुजन मातापिता यांनी संस्कार केले.
त्यामुळेच आज मी या टप्प्यावर येऊन पोहोचलेय.
मराठी माध्यमात शिक्षण झाले पण कुठेही अडले नाही
आमचे शिक्षक आदर्श होते आमच्यासाठी,शिस्त होती माणूसकी होती न्याय होता दयाही होती त्यांच्याठायी.
हुशार मुलांबरोबर मागच्या बाकावरील मुलांपर्यंत त्यांचे लक्ष असे.
शाळेची प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत म्हणणे यात आम्ही अग्रेसर असू.मराठी शाळेची एक आठवण सांगते चौथीला स्काँलराशीपला बसले होते मी परिक्षा झाली नि मी पेपर बाईंकडे जमा न करताच घरी नेला आणि कौतुकाने आईला दाखवला बघ मी कसा सोडवलाय सगळा.
तिने कपाळावर हात मारुन घेतला शाळा जवळच होती अजून शाळा सुटायची होती आईने माझे बकोट धरले धावतपळत आम्ही शाळेत पोहोचलो. आईने बाईंना सांगितले की हिने चुकून पेपर घरी आणलाय असा माझा धांदरटपणा.
त्याआधी माँटेसरीतही माझ्या बाईंची तक्रार होती की ही विजू हुशार आहे पण एका जागी बसत नाही अते ज्ञ काढेतोपर्यंत चारी कोपरे फिरुन येते वर्गाचे.
हायस्कूलमध्ये गेल्यावर मराठीच्या भट बाई हिंदीच्या काळे बाई सःस्कृतचे काळेशास्त्री सर याःची मी विशेषा लाडकी होते
माझे निबंध बाई वर्गात वाचून दाखवायला लावत.चित्रकलेत मात्र कायम सी ग्रेड, आजूनही चित्र जमत नाही.
शाळेत गँदरिंग समूहगीत यात मी आवर्जून भाग घेत असे.भाषण करणे आवडायचे
परिस्थिती सामान्य होती पण वडील नविन पुस्तके दरवर्षी आणत गणवेश आणि पुस्तके वह्यांचा तो कोरा करकरीत गंध अजूनही मनात रुःजी घालतो .
अभ्यासात हुशार असल्याने सर्वांची लाडकी होते या दोन्ही शाळेने संस्कारीत केले ते ऋण गुरुऋण कधीच फेडू शकणार नाही ,अजूनही माहेरी गेले की मुलाला गाडी शाळेवरुन घ्यायला सांगते आता शाळेची मोठ्ठी इमारत झालीय ती डोळाभरुन पहाते.
शाळेचा दुसरा टप्पा जीवनात सुरु झाला माझी मुले शाळेत जाऊ लागली तेव्हा.त्या दोघांचा अभ्यास मला करुन घ्यावा लागला नाही दोघेही जात्याच हुशार ,निते ही मराठी मध्यमातून शिकले तरी मुलागी आज अमेरिकेत सिनिअर साँफ्टवेअर इंजिनिअर आहे नि मुलगा mbaकरतोय दोघेही सुसंस्कारित आहेत
आईवडीलांबरोबरच शाळाही जीवनाची जडणघडण करते
तिसरा टप्पा शाळेचा मी पाहिलेली अमेरिकेतील शाळा तिथे मी मराठी शिकवायला जात होते नुकतीच परतलेय,
तो अनुभव छानच.आपली मुलेमुली अमेरिकेत स्थायिक होतात तेथे त्यांची मुले इंग्रजीतून बोलतात आपली मराठी भाषा,त्यांच्यात रुजावी मराठी बोलणे संस्कार श्लोक त्यांना यावेत यासाठी तिथल्या मराठी लोकांनी, भारतीय लोकांनी एकत्र येऊन ही शाळा काढलीय तिथे ३ ते १४ वर्षापर्यंतची मुले शिकत आहेत मला तिथली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली व आवडली ती म्हणजे तिथे मुलांना फक्त नावाने ओळखले जाते .रिया ,निशा ,पराग असे.
परिक्षेला व हजेरीतही नाःवच लिहिले व पुकारले जाते आडनाव नाही यामुळे जातिभेद होत नाही.सर्व मुले एकोप्याने रहातात गोष्टी गाणी, प्रार्थना अभ्यास सारे खेळीमेळीत होते मुलांना न रागावता त्यांच्या कलाने घेतले जाते शिक्षा नाही त्यामुळे मुले खूष,पालकही तेवढीच छान साथ देतात ही शाळा दर रविवारी असायची. माझ्यासाठी हा खूप छान अनुभव होता.
तिथे गँदरिंग होते त्यात आपले लेझिमचेही सादरीकरण झाले आपले संस्कार त्या मातीत रुजताता हे पाहून मनाला आनंद झाला अशी ही माझी शाळा मी विद्यार्थी असताना माझ्या मुलांची शाळा मी पालक असताना नि परदेशातील मराठी शाळा मी अनुभवलेली एक शिक्षिका म्हणून.
ही आवडते मज
मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा
प्राची देशपांडे
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
📖 माझी शाळा 📖
आजचा विषय सुंदर आणि बरेच काही लिहीण्याची संबंधीत आहे पुर्वीची शाळा विशेष मी ग्रामीण भागातील शाळेचं वर्णन करीत आहे साधारण पन्नास वर्षे आधी ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक एकच आणि शाळेला इमारत सुद्धा नसायची तरी सुद्धा शिक्षकांना आदराने त्याठिकाणी शिक्षणाची गोडी विद्यार्थ्याला लागावी म्हणून प्रयत्न करावे लागायचे आज मात्र या स्पर्धेच्या युगात तेवढे काही दिसत नाही
जुन महिन्यातील शाळेची घंटा म्हणजे एक प्रकारची जीवन उध्दाराची पहिली वार्निंग आहे जसे मंदिरात गेल्यावर पहिला मान देवाच्या घंटानादाला असतो तेथे आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि शाळेतील घंटानादामुळे जीवनाचे सार्थक होते म्हणुन शिक्षण घेतल्या खेरीज माणसाची प्रगती नाही
काळ बदलला तसे माणसाची प्रगती होत रहाते आजच्या युगात शिक्षक अत्याधुनिक यंत्रणा कंप्यूटरची गरज नितांत झाली आहे म्हणून प्रत्येक शाळेला डिजिटल बनवण्याचे महान कार्य करणाऱ्या माझ्या गुरुजनांना मानाचा मुजरा प्रत्येक पालकांनी आणि शाळा प्रेमी मित्रांनी शाळेत येऊन शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या अडचणी विचारात घेऊन सहकार्य करायला हवे सुसंवादाने शाळेचाच विकास होत रहातो आणि आपुलकीची भावना निर्माण होत असते म्हणून शिक्षकांना ज्ञान सागराची वाहती गंगा म्हणले जाते ''जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन! भगवंत जाना तया जवळी! !'' म्हणून आज मंदिरा पेक्षा ज्ञान मंदिरांची नितांत गरज आहे आणि त्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र निर्व्यसनी शिक्षकांची गरज आहे मला आज अभिमानाने सांगावेसे वाटते माझ्या लहान छोट्याश्या गावातील दहावीला शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यामध्ये शाळेमधून पहिले तीनही क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला खुप आनंदाची बाब आहे
म्हणून गाडगेबाबा म्हणायचे की अंगाला वस्त्र हलके घ्या पण लेकराला शिक्षण शिकवा.
साहित्य दर्पण
✍🏻_____ गजानन पवार
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}{{{{}}}
माझी शाळा.......
माझी शाळा...मला यशस्वीपणे जीवन जगण्याची कला शिकवणारी,माझ्या नसानसात अात्मविश्वास ठासून भरणारी,यशाचे वेगवेगळी शिखरे सर करण्यासाठी व स्पर्धेच्या या दुनियेत अापलं वेगळपण सिद्ध करण्यासाठी फडफडणार्या माझ्या पंखाला बळ देणारी......
माझी शाळा........
माझी शाळा शासकिय पोष्ट बेशिक अाश्रम शाळा,मोहपूृर ता.किनवट जि.नांदेड...
गावापासून चार ते पाच किमी.अंतरावर पैनगंगेच्या तीरावर अगदी पाचशे मिटर लांब,उंच अशा महादेव डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात व
उंच उंच टेकड्याच्या
कुशीत.....
शाळा कसली गुरुकूलच ते
जिथे सर्वांगीण शिक्षणाचे धडे देवून अष्टपैलू व्यक्तीमत्व घडविणारी जणू नावाजलेली खाणच...
माझे शिक्षण याच शाळेत पहिली ते दहावी पर्यंत झाले...जिथे अाई बापाचा पत्ता नाही.नातेवाईकांचा सहवास नाही अशा या अाश्रमात माझ्या बालमनावर
योग्य असे सुसंस्कार रुजवण्याचे कार्य माझ्या या शाळेने केले......
माझ्या शाळेतील सर्वच शिक्षक हे शिस्तीचे भोक्ते व अनुशासन पालनास कटिबद्ध असणारे होते..जेवढे कडक शिस्तीचे तेवढेच माया,ममता,प्रेव व करुणेचे सागर होते.....
अशा या माझ्या अाश्रमातील एक प्रसंग या ठिकाणी मी अभिव्यक्त करणार अाहे...ज्यामूळे माझ्या अायूष्याला खर्या अर्थाने योग्य दिशा मिळाली.
मी सहावीत असतानाची गोष्ट
तसा मि वर्गात जेमतेमच होतो..पण खेळ क्रिडा सांस्कृतिक यामध्ये मात्र सर्वांच्यापूढे असायचो..
पण अभ्यासात मात्र मला मनावे तसे यश मिळत नसे..ही गोष्ट माझ्यासवे माझे वर्गशिक्षक श्री दुधे सर यांनाही सतत बोचत असे..मला बर्याचवेळा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला...पण माझ्याकडून त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसे...
परंतु माझ्याकडे इतर चांगले गुण असल्यामूळे त्यांचे माझ्याकडे लक्ष असायचे....
एके दिवशी गणिताच्या शिक्षकांकडुन सर्वासमक्ष माझा अपमान झाला..तो अपमान माझ्या जिव्हारी लागला...यामूळे मी शाळेतून पळूनच गेलो..पंधरा दिवसांनी मा.दुधे सर माझ्या घरी अाले..व मला शाळेत घेवून गेले..अाणि मला त्यांनी वर्गाच्या माॅनिटर पदाच्या निवडनुकीसाठी उभे राहण्यास सांगितले..अाणि काय अाश्चर्य मी सर्व हुशार मुलांवर मात करुण निवडून अालो..वर्गप्रमुख झालो..अाणि त्यातच दुधे सरांनी जे कोणी पहिल्या क्रमांकाने उतिर्ण होईल त्याला घड्याळ बक्षिस देण्याचे जाहिर केले...
मी ठरवले या वर्षी हे बक्षिस अापणच मिळवाये..तसा अात्मविश्वास माझ्यामध्ये सरांनी निर्माण केला...मी तेव्हापासून मागे वळुन पाहिले नाही...
बारावीपर्यंत पहिल्याच क्रमांकाने उतिर्ण होत गेलो...
अशा माझ्या शाळेला व मला सन्मानजनक जीवन जगण्याचे मूलमंत्र देवून माझ्या अायूष्याला खर्या अर्थाने दिशा देणार्या माझ्या प्रिय पितृतुल्य गुरुजनांना सन्मानजनक मनःपूर्वक सहृदय प्रणाम...🙏
🎯 मारुती खुडे.
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
स्पर्धेसाठी
माझी शाळा
शाळा म्हटलं की आठवतं बालपण आणि बालपणी शाळेत केलेली मौज, मित्र मैत्रिणी, मस्ती, गप्पा, गोष्टी
सामुदायिक जेवण, सहल, अभ्यास आणि अजून बरंच काही...
तर आज मी तुम्हाला माझ्या लहानपणी शाळेत घडलेला एक गमतीदार प्रसंग सांगणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी कधी अचानकपणे असे मजेशीर प्रसंग घडत असतात आणि त्या प्रसंगांची आठवण पुढे आयुष्यभर रहातेच आणि त्या प्रसंगांच्या स्मरणाने मनाचा एक कोपरा नकळत सुखावतो...
... पैकी असाच एक प्रसंग मी इयत्ता दुसरीत मराठी मुलींच्या शाळेत असताना घडलेला. त्या दिवशी आमच्या शाळेत इन्स्पेक्शन होती. शाळा तपासायला साहेब आले होते. आम्ही सर्व मुली खूप उत्साहात होतो. बाईंनी म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका मंचरकर बाई यांनी आम्हाला सांगितले होते, 'साहेबांनी प्रश्न विचारला की, लगेच तुम्ही न अडखळता उत्तर द्या.' साहेब आमच्या वर्गात आले. एकसाथ नमस्ते झाले. बाईंनी साहेबांचे स्वागत केले. मुलींची माहिती दिली : सध्या पटावर किती, हजर किती गैरहजर किती इ. मग साहेबांनी आम्हाला प्रश्न विचारले, त्यापैकी एक प्रश्न होता, "नाती सांगा. आत्या कुणाला म्हणतात ?"
मी पट्कन बोट वरती केले. साहेब म्हणाले "सांग उत्तर." मी म्हणाले, *आईच्या नणंदेला आत्या म्हणतात. "*
माझे उत्तर ऐकून साहेब चकित झाले. म्हणाले, की" हिने तर नात्यांच्या पलिकडे नाते सांगितले. त्या वेळी साहेबांना वडीलांच्या बहिणीला आत्या म्हणतात, हे उत्तर अपेक्षित होते. अर्थात माझे उत्तरही बरोबर होते. मला तिन आत्त्या आहेत. त्या घरी येणार असल्या की आई मैत्रिणींना सांगायची, "माझी मोठी नणंद येणार आहे, मला लहान नणंदेकडे जायचे आहे." तिचे हे वाक्य ऐकून माझ्या मनावर पूर्णपणे बिंबवले गेले होते की, आत्या म्हणजे आईची नणंद.
नंतर साहेबांनी मला शाबासकी दिली आणि बाईंना विचारले, की "ही मुलगी कोणाची आहे?" बाई म्हणाल्या, "ही आपल्याच शाळेत एक सहशिक्षिका आहेत. सौ. सुंदर खेडकर त्यांची मुलगी आहे ही."
त्यावर साहेब म्हणाले, "ही मुलगी मोठी झाल्यावर कोणी तरी वेगळीच होईल."
शाळेत नंतर माझ्या उत्तराची बरीच चर्चा झाली. माझे वय इतके लहान होते की तेव्हा मला निटसे काही कळले नाही, पण आमच्या बाई मात्र माझ्यावर जाम खुश झाल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितले, "शशि पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या वर्गात इन्स्पेक्शन असेल तेव्हा तू घरी राहू नकोस. नक्की शाळेत ये. तुझ्यामुळे आज शाळेला, वर्गाला साहेबांनी चांगला शेरा दिला."
शाळेत दुसर्या दिवशी परिपाठाच्या वेळेस सर्व शिक्षकांनी माझे कौतुक केले.
आजही इतक्या वर्षांनी लहान पणीच्या शाळेतील आठवणींनी मन आनंदून जाते.
शाळा म्हणजे संस्कार मंदिर जेथे आपली माणसिक जडणघडण होते, विचारांना दिशा मिळते बाह्य जगात वावरण्यासाठी मनाची तयारी करून घेतली जाते.
अशी माझी शाळा मला आजही प्रिय आहे.
लेखिका - सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
@35
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
साहित्य दरबार
भाग 8
"माझी शाळा "
**************
स्पर्धेसाठी
************
"जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा ",हे नाव एका छोट्याशा खेड्यातील, गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील चामोर्शीच्या छोट्याशा शाळेचं. संस्कारमंदीर न म्हणता खूप काही देणा-या शाळेचं. 1962 /63 म्हणजे माझा पहिला वर्ग. बालकमंदीर वगैरे चैन तेव्हा परवडणारी नव्हतीच. उजवा हात डोक्यावरून नेऊन डाव्या कानाला लागला की बखोट धरून शाळेत बसवण्याचा तो काळ होता. अर्थात माझं तसं झालं नाही, कारण बाबा मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. 1ली ते 4थी फक्त 12मुली. झगा घालणारी मी एकटीच. चार पाच जणी परकरी, काही साडीतल्या , आणि दोघीं तर चक्क नऊवारी नेसून शाळेत यायच्या.
शाळेच्या हाॅलमधे दोन भिंतीशी पहिला दुसरा वर्ग, तर व्हरांड्यात तिसरा चौथा वर्ग भरायचा.
प्रार्थना झाली की, पाढे सुरू व्हायचे. एक दोन पासून ते वीस दाहे दोनशे पर्यंत. इयत्तेनुसार. पाढे संपले की वर्गानुसार कविता म्हणायचो. सारंच अगदी तालासुरात. सगळे संत पंत तंत कवी भेटले तेव्हा. म्हणूनच या कवी आणि कवितांचे घट्ट नाते जुळून आले. आजही या सर्व कविता पाठ आहेत, कारण या कवितांनी आमची पाठच सोडली नाही.
या कवितांनी आमची लहान भावंडं निजवली. कितीतरी अन्योक्ती म्हणून आमच्या भावल्यांची लग्न लावून दिली. हो आणि कवितेच्या भेंड्या खेळताना आजही त्या मला जिंकवून देतात.
नवीन पुस्तकांची चैन नव्हती. पण नव्या अभ्यासात रमायचा तो रम्य काळ होता.
राजापुरे बाई(मुख्याध्यापिका ), नामेवार बाई , वासलवार बाई या तिघींनी आयुष्य भराचे संस्कार केले.
वर्गात मी पहिली येत असे. पण आंतरशालेय (हा शब्द आत्ताचा) लंगडी, कबड्डी , खोखोमध्ये मी लहान म्हणून घेत नव्हते. आत्ता कळतं तेव्हा सगळ्या खेड्यातल्या शाळांतील मुली अशाच मोठ्या असायच्या. मी आपली संगीत खुर्ची ,स्मरण शक्ती, चमचा लिंबू खेळायचे. झालंच तर नाच गाणं, भाषण यात नंबरात यायची.
लांडा फ्राॅक, बाॅबकट, जुनं पण ब-यापैकी दप्तर घेऊन मी शाळेत जायचे. इतर मुली मला हसायच्या . कधीच मैदानी खेळात घ्यायच्या नाही.
मला खूप गुण मिळाले तरीही चिडवायच्या. दादा आणि बाबा अभ्यास घेतात हे त्यांना खोटंच वाटायचं. म्हणायच्या, तू खोटं बोलतेस. दादा न बा तर शेतावर जातात.
एकदा खूप रडवेली होऊन मी घरी आले. काही तरी बिनसलंय हे आईने ओळखलं.बाळ पाळण्यात झोपलं होतं. मला जवळ घेऊन आई बंगईवर बसली. झोका घेत घेत गाऊ लागली
"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक "
कोणी न त्यास घेई खेळावयास संगें
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वा-यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्यांचेच त्या कळाले तो राजहंस एक "
गाणं संपलं. आईने मला त्या गाण्याचा अर्थ छान समाजावून सांगितला.
मला त्या नंतर मागे वळून बघावं लागलं नाही.
नंतर5त7 आणि 8ते10वा वर्ग वेगवेगळ्या दोन शाळांमधे झाले. 6व्या वर्गात असताना "सागरा" या शब्दाची विभक्ती संबोधन आहे हे मी एकटीनेच बरोबर सांगितले म्हणून झालेला टाळ्यांचा आवाज मला आजही जगण्याचं बळ देतो.
काळबांधे सरांनी मला भूगोल असा शिकवला की पुढे सुवर्ण पदक घेऊन मी त्याच विषयांची प्राध्यापक झाले.
जगण्याचा मार्ग मला या शाळांनी दिला. 9वीत असताना आमचे मुख्याध्यापक स्व.मुनघाटे सर आम्हाला मराठी शिकवायचे. सहामाही परीक्षेत मी लिहिलेला निबंध त्यांनी पूर्ण शाळेत् वाचून दाखवला आणिां मी भविष्यात लेखिका होईन हे भविष्य वर्तवलं होतं. खरी कविता मी त्यांच्याकडून शिकले. त्यांचेच मार्गदर्शन घेऊन गुणवंत /सुवर्ण पदक विजेती ठरले.
चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करूनही कुणाला प्रकाश द्यायला हवा हे समजत गेलं.
अनेक घटनांमधून कळत होतं की, कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद माणूसही कुरूप ठरतो. हे पुन्हा पुन्हा नव्याने कळत गेलं.
आज मुलांची मानसिकता ओळखून आम्ही वागायला हवे आहे. आपलं पिल्लू वेगळं आहे का हे वेळीच ओळखले तर पुढील अनेक गंभीर, नको ते, कडवट प्रसंग नक्की टाळता येतील .
तेव्हापासूनच मी मला ओळखायला शिकले. कठीण प्रसंगात ठाम रहायला शिकले. याच गीतानं मला माझी ओळख दिली.
हीच माझ्या शाळेची नव्हे शाळांची अनमोल भेट आहे.
@@@@@@@@@
सुनंदा पाटील मुंबई
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🍁स्पर्धेसाठी🍁
🏚माझ्या आठवणीतील शाळा 🏚
* "शाळा" म्हटले की मुलांमधे आदर्श,संस्कार,प्रेम,
हट्टीपणा,चांगुल पणा, स्वार्थीपणा,द्वेष,खोडकरता,
निरागसता, हे गुण दिसतातच...
पण सोबतच , शिक्षकांबद्दल आदर मात्र अखंड असतो...
"शाळा" आणि "शिक्षक" अखंड एकमेकांची साथ असणारं नातं, कारण मी खानदानी शिक्षकी घरातली, आजी-आजोबा पासून ते आई-बाबा सुद्धा शिक्षक...
तालुका चांदुर बाज़ार मधले गाव "तळवेल", ईथे माझी लाडकी शाळा "जिल्हा परिषद्" मधे माझे ४थी पर्यंत चे शिक्षण, नंतर तिथेच हायस्कूल ला १० वी पर्यंत...कॉलेज पुन्हा अमरावती ला, असा हा शाळे पासून चा प्रवास.....
माझ्या शाळे बद्दल कीती सारे लिहिण्यासारखे आहे.
कारण त्यावेळी "बालमेळावा" राहायचा , पंचायत समिती मधल्या एक ठिकाणी...
शाळे मधल्या शिस्ती सर्व मुलांच्या तोड़पाठ असायच्या...माझेच बाबा H.M. आणि आई शिक्षिका त्याच शाळेवर... बाबा खुपच शिस्तप्रिय , मला वाटायचे शाळा माझ्याच घरची...
"आई-बाबा" ला "आदर्श शिक्षक पुरस्कार" भेटलेला होता, ते शाळेला मंदिरच समजायचे ...माझ्या शाळे ची प्रसन्नता अजूनही आठवते...
"सर्वपल्ली राधाकृष्णन" यांच्या फ़ोटो समोरची जागा मला न चुकता स्वच्छ करावी लागे नाहीतर बाबां ची ओरड असायची...शाळेच्या सम्पूर्ण आवारा मधील स्वछता तेव्हा एका- एका वर्गा ला करावी लागत असे...
शाळा तपासणी साठी , B.D.O. वगैरे नेहमीच यायचे. त्यांचे मुक्काम आमच्याच् कड़े... ते बाबां ना नेहमीच म्हणायचे की तुमच्यामुळे शाळा जिवंत झाली...
त्यावेळी "ढ़" मुलांना शिक्षक घरी बोलावून तासंतास येई पर्यंत गिरवायचे, ते ही काम माझ्या आई कडेच. ५ वाजेपर्यंत शाळा व नंतर ६ ते ८ घरी कलकलाट असायचा...
मी कधी उनाड़की वगैरे केलेली आठवत नाही, प्रार्थना झाली की रोज प्रत्येकाला परिपठ वाचावा लागे,एकदा माझा चुकलेला लगेच बाबां नी छडिने एक लावून दिली. ते मागेच् उभे असायचे , पहिल्यांदा शाळेत माझ्या शिक्षकां जवळ मी रडली ..."तू कधीच चुकत नाही म्हणुन तुझे बाबा तुझ्यावर रागवत नाहि... पण आज परिपाठ चुकलेला होता म्हणून ते रागावले...
तेव्हा ४था वर्ग बोर्ड परीक्षा राहायची, स्वतःचा वर्ग पण सुविचार लिहून सजवला असायचा, माझ्या वर्गाच्या चारही भिंतीं वर ड्राइंग सिट वर सुविचार लिहिण्याचे काम माझेच...
बालपन फारच शिस्तप्रिय गेलेल, दिवळीच्या दिवशी सुद्धा आई बाबा शाळेत येवून शाळेच्या बहेरच्या दरावर "तोरण" चढ़वायचे...एवढे शाळेला जीवापाड़ जपले...अजूनही शाळा तशीच आहे, पण "आई- बाबा " मात्र कायमचे सोडून गेलेंत...त्यांच्या मुळे गावात अजूनही शाळे बद्दल त्यांचा आदर्श सांगण्यात येतो...
या प्रिय शाळेला आणि माझ्या गुरुजनांना शतश: नमन ।।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹वृषाली वानखड़े✍🏻
*75*
🌴अमरावती🌴
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🍁🍁स्पर्धेसाठी🍁🍁
=====================
*माझी* *शाळा*
~~~~~~~~~~~~~~~~~~
दि १२/६/२०१६
=====================
काल २६जून ,२६जून म्हंटले कि कोणत्याही विद्यार्थी किंवा शिक्षका ला त्या दिवशी काय ? किंवा कोणती खास बाब त्या दिवसाची तर झोपेत सुद्धा 'शाळेचा पहिला दिवस' हेच वैशिष्टय ऐकायला मिळेल. मी पण एक शिक्षक आणि त्याच नात्याने माझ्या साठी सुद्धा २६ जून हा दिवस तेवढाच महत्वाचा आणि धामधुमिचा होता आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टी नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या विविध कार्यक्रमांनी आणि धावपळी मूळे जाम दमले होते , घरी परत येताच पटापट स्वयंपाक वगैरे आटोपून लवकर झोपायचे होते ,घरी जेवतांना शाळेच्या पहिल्या दिवसा चा विषय निघालाच मुले म्हणाली 'आई--कसा गेला आज शाळेचा पहिला दिवस ?' मी पण 'खूप छान'म्हणून उत्तर दिले ,मग मुले म्हणाली 'खूप छान ? मग दमली कशी '? तेव्हा मुलांना मी म्हणाले थकवा तर आलाच पण त्या मागे आनंद किती मिळाला हे शब्दात नाहि सांगता यायाचे . छोटे -छोटे गोड , निरागस विद्यार्थ्यांचे चहरे डोळ्यासमोर येवू लागले आणि त्याचे बोबडे बोल मी त्यांच्याच भाषेत बोलू लागली , जेवता -जेवता मुले जेव्हा मध्येच मोठयाने हसली तेव्हा माझी तंद्री तुटली आणि मी भानावर आली . आणि लगेच मुलांना म्हणाली जेवा लवकर आणि आवरू दया मला लवकर मी पण झोपणार आज लवकर. सर्व आवराआवर करुन खरच झोपायला गेली आणि पडल्या पडल्या झोप लागली मला.
नंतर------- स्वप्नात मी , माझी शाळा, माझ्या शाळेचे दिवस---म्हणजे माझे विद्यार्थी जीवनाचे दिवस ----ती पुस्तके आणल्यावर कव्हर लावून देतांना बाबा , शाळेचा ड्रेस ठिकठाक करणारी आई आणि ---पेनात ड्रॉपर ने शाई भारतांना मी ----पूर्ण -पूर्ण--अगदि स्पष्ट दिसू लागले सर्व आणि- - आणि माझी शाळा, माझे सर आणि बाई सर्व दिसू लागले डोळ्यासमोर अगदि एखादा चित्रपट बघावा तसे माझी मैत्रिणी कविता, सुनीता आणि कोण ती---ह शोभा सर्व -सर्व अगदि त्याचे दप्तरांचे रंग ,मला शोभा चा खूप खूप आवडणारा फ्रॉक अगदि स्पष्ट दिसत होते मला.
माझी शाळा 'भारतीय ज्ञानपिठ हायस्कूल ' मला शिकविणारे मुळे सर ,ठाकुर सर आणि माझे सर्वात आवडते सर --जे चित्रकला आणि नृत्य दोन्ही शिकवायचे ते पहुरकर सर ,ठाकुर सर गणित शिकवायचे आणि खेळ पण घेत असत पण मला गणिता साठी नाहि पण खेळ घेत होते न ते सर म्हणून ते पण आवडायचे
आणि मुले सर ---बापरे!!!! इंग्रजी शिकवायचे ते किती छडया मारायचे ते जितके शब्दांच स्पेलिंग चुकायचे तेवढ्या छडया पण दहाविला मला त्यांच्या मुळेच ७१ मार्क्स मिळाले होते नाहि तर किती मुले फेल झाली होती इंग्रजी मध्ये --बापरे !!!
माझी शाळा घरा पासुन एक किलोमीटर अंतरावर पण घरून १०:४५ ला निघाली कि बरोबर प्रार्थने ला हजर प्रार्थने नंतर सर्वात आधी वर्गात गेल्यावर सरस्वती स्तवन आणि मग वर्ग सुरु--तेव्हा दर शुक्रवारी शेवटच्या पिरेडला सरस्वती पूजन व्हायचे आणि ते गुळ-फुटाणे --आ हा हा काय मज्जा यायची ! काय चव असायची त्याला आणि एकमेकांना मिळालेला प्रसाद बघणे कुणाला जास्त मिळाला आणि कुणाला कमी याचा अंदाज घेणे आणि चक्क आरतीचे ताट घेवून आरती करण्या साठी भांडणे सुद्धा, वर्गाची मॉनीटर म्हणून मग मी जायची सोडवायला भांडाणे आणि माझ्याशीच कट्टी करायच्या दोन-चार मैत्रिणी आणि मग काय ----गट काय पडायचे ,आणि आपल्या गटातली मैत्रीण दुसऱ्या गटात गेली नाहि पाहिजे म्हणून मग ती म्हणेल तसे --तीला लिहून काय द्यायचे तिचे दप्तर उचलायचे आणि खेळतांना ती आउट होवूनही तिचीच बाजू घ्यायची आणि काय काय ? आणि काहीदिवसां नी परत सर्वजणी एकत्र यायचो .
पण, खूप दिले ह मला माझ्या मत्रिणीं नी खूप वेळा सरां चा मार खाण्या पासून वाचविले मला , मागून शब्दांचे स्पेलिंग सांगून --तोंडावर हात ठेवून ठेवून आणि बिचाऱ्यां नी स्वत:च मार खाल्ला सरांच्या लक्षात आल्यावर
खूप गंमतीचे आणि म्हंटले तर भयानक प्रसंग होते शाळेचे पण आज पण मला एक प्रसंग खूप आठवतो ------मला वाचनाची लहानपणा पासूनच आवड होती पण त्यानेच मला एकदा वडिलांनी कधी नव्हे ते रागविले अर्थात समजाविन्या साठीच-----घरी सर्व भावंडांना वाचनाची आवड होतीच त्या मुळे वडिलांनी त्या वेळी 'चांदोबा' हे मासिक लावले होतेच ,मला आठवते आता पण मी त्या दिवशी नेहमी प्रमाणे शाळेत जायला निघाली आणि तेवढयातच सायकल वरुनच मासिक टाकले घरात वाटप करणाऱ्याने आणि निघून गेला मी जाता -जाता मासिक उचलले आणि घरात एकदा डोकावून बघितले की कुणी बघत तर नाहि आहे ना म्हणून आणि दप्तरात टाकले आणि निघाली शाळेत . प्रार्थना झाली वर्गातील सरस्वती स्तवन पण झाले आणि सर वर्गात यायचे होते म्हणून मी गोष्टी चे पुस्तक काढले आणि लागली वाचायला कारण खूप -खूप आवडायचे मला ' चांदोबा '
सर वर्गात आले ,हजेरी झाली , माझे वाचन सुरूच सरांनी इंग्रजी चे पुस्तक काढायला सांगितले आणि नेहमी प्रमाणे आधी सरां नी लेसन चे वाचन केले आणि मग नंतर आमच्या कडून तीन-चार लइन्स वाचन-नेहमीप्रमाणे , पण ,माझे लक्ष सतत खालिच -पुस्तकात ,मी पण थोडी हुशार म्हणूनच ह सरां च्या नजरेत ---सरां नी आवाज दिला नेक्स्ट मंजुषा --नेक्स्ट मंजुषा मला माझे
नाव ऐकू येताच मी गोंधळली आणिइकडे तिकडे बघू लागली --मैत्रिणी म्हणाल्या उभी राहा --तुला वाचायल सांगितले आहे मी उभी राहिली -घाम सुटला आणि खूप घाबरून गेली ,सरांना वाटले माझा काही तरी गोंधळ होतोय म्हणून सर जवळ आले मला कोणती लाइन सुरु आहे म्हणून सांगायला तर ---------
काय ???
चक्क माझ्या इंग्रजी च्या पुस्तकात मी 'चांदोबा' वाचून राहिले होते ----सर मला व माझ्या पुस्तकांना घेवून सरळ ऑफिस मध्ये मुख्याध्यापकां कडे माझे वडिल सुद्धा त्याच शाळेत हेडक्लार्क म्हणून काम करायचे लगेच त्यांना हि पाचारण करण्यात आले माझा कारनामा सांगण्यात आला . तो दिवस आज सुद्धा आठवतो -------
त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटल्या नंतर घरी जाण्याची खूप भिती वाटत होत पण, वडिल घरी आल्यावर त्यांनी मला जवळ बसविले आणि समजावून सांगितले "वाचनाची सवय खूप चांगली पण ,त्याच बरोबर शाळेतील शिस्ती चे पालन सुद्धा करायलाच पाहिजे ,या नंतर मला अशी कंप्लेंड यायला नको ,घरी आल्यावर वाचायचे होते चांदोबा!!!
त्या दिवसा पासून ठरविले खरोखरच माझ्या मूळे माझ्या वडिलांना आज ऑफिस मध्ये यावे लागले ,माझी तक्रार ऐकण्या साठी असे पुन्हा करायचे नाहि शिस्त मोडायची नाहि जो पर्यंत मला पूर्ण समज नव्हता तो पर्यंत मला वाईट वाटले आणि राग सुद्धा आला इंग्रजी च्या सरां चा -----पण, जेव्हा दहाविला मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आणि तेच सर घरी भेटायला आले पेढे घेवून त्या वेळी त्यांचे रागविण्याचे कारण समजले मला.
सकाळी पाच चा गजर लावला होता गजर वाजला आणि मी एकदम खडबडून जागी झाली , आणि स्वप्न तुटले .पण थोडा वेळ गादिवर तसेच पडून विचार केला की कित्ती दिले न माझ्या शाळेने मला----सर्वच खेळ, कला,नृत्य आणि शिस्त आणि अनमोल संस्कार
आज पण कुणी विचारले काय कारवेसे वाटते तर एकच वाटते ---पुन्हा लहान व्हावे पुन्हा शिकायला शाळेत जावे आणि पुन्हा तेच शिक्षक मिळावेत पण मी मात्र या वेळी बदलून खूप अभ्यास करावा आणि खूप यश मिळवावे.
=====================
*सौ* *मंजुषा* *देशमुख*
@४०📝
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
~~~~~~~~~~~~~~~~~~
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
स्पर्धेसाठी
"माझ्या आठवणीतील शाळा"
शाळा हा विषय माझ्या तरी आवडीचा आहे पण हल्लीच्या मुलांना कार्टून, व्हिडीओ गेम्स, मोबाईल अशा गोष्टींचं आकर्षण जास्त असल्याचं जाणवतं... अभ्यासाकडे जरा दुर्लक्षच होतं या गोष्टींमुळे.
खरंच..! लहानपणीचे शाळेतील दिवस, मग महाविद्यालयीन, कॉलेजचे शिक्षण घेतानाचे दिवस हृदयाच्या एका खास कप्प्यात अगदी आवर्जून जपून ठेवलेत.
बालवाडी, पहिली, दुसरीचं शिक्षण माझं आजोळी झालं... मळेगाव, बार्शी. घर रानात होतं. गम्मत यायची रानातून गावात शाळेत चालत जावं लागायचं. शेताच्या बाजूनेच गावात जाण्यासाठी कच्ची सडक होती....त्या रस्त्याच्या बाजूने बोरं, शेलवट, चिंच, करवंद असा रानमेवा असायचा मग शाळेत जाता-जाता दगड मारून चिंच - बोरं पाडण्याचं ठरलेलं काम. त्यावेळी शाळेत जाण्याचं एक विशिष्ट कारण होतं ते म्हणजे त्यावेळी सुकडी आणि दुधाची एक बाटली आम्हाला शाळेतून मिळायची. बाकी काही आठवत नाही त्या शाळेतलं.... शिक्षकांची नावं वगैरे ...
अजून एक आठवतंय शाळेच्या बाजूचं प्रशस्त मंदीर आणि भली मोठी घंटा... त्या मंदिरात जावून रोज घंटी वाजवण्यासाठी कोणालातरी उचलून घ्या म्हणत घंटी वाजवायची आणि दहावेळा साष्टांग दंडवत घालायचा हे नित्याचं काम. देव पावला की नाही कोणास ठाऊक??
आई-वडील पुण्यात असल्यामुळे मग मलाही पुण्याच्या म.न.पा च्या शाळेत घालण्यात आले. ती शाळा
ब-यापैकी आठवणीत राहीली. तिथेही जेमतेम तीन वर्षे शिकले. तिथल्या माझ्या क्लासटिचर आशालता शिंदे मॕडम आठवतात. खुप छान दिसायच्या त्या माझा लाडही खुप करायच्या.अभ्यासात खुप हुशार होते मी... पहिला नंबर यायचा.बरीचशी बक्षिसेही मला त्या शाळेतून मिळाली.
नवीन को-या वह्यांचा, पुस्तकांचा वास घेणं खुप आवडायचं मला शिवाय नवीन वही व पुस्तकावर सुंदर हस्ताक्षरात अगदी कोरीव काम करत स्वतःचं नाव लिहिणं आजही मला आवडतं.
खुप चांगले संस्कार झाले त्या शाळेत मानसिक जडण-घडणीला तिथूनच सुरुवात झाली....
पुन्हा एक नवीन वळण ... घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मला आणि माझ्या भावाला होस्टेल मध्ये ठेवण्याचे ठरले. त्यासाठी शाळेतून मला शाळा सोडल्याचा दाखला घ्यायचा होता पण मॕडम म्हणाल्या एवढ्या हुशार विद्यार्थीनीला आम्ही दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही.... पण आईने समजावून सांगितले आणि त्यांनी दाखला दिला.
का कोणास ठाऊक मला खुप भारी वाटले तेव्हा हुशार म्हटले म्हणून, मलाहि नव्हती सोडायची ती शाळा.
मग, काय माझी रवानगी पुण्यातीलच विश्रांतवाडी येथील बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतीगृहात झाली. तेथेच जवळ असलेल्या टिंगरेनगर येथील हिमगिरी विद्यालयात प्रवेश मिळाला.
ही शाळा दुमजली व प्रशस्त होती याचा मला खुप आनंद झाला. एवढया मोठ्या शाळेत शिकायचे म्हणून धाकधुकही होती मनात. शिक्षणाची आवड असल्यामुळे या शाळेतही मी माझी ओळख निर्माण केली. खेळाचीही आवड होती मला... या शाळेतूनच मी कबड्डी जिल्हा पातळीवर खेळले.. संघाची मी कॕप्टन होते.. सगळेच शिक्षक त्या शाळेतील आदर्श घेण्याजोगे होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हे त्या शाळेचे सूत्रच होते जणू. विद्यार्थ्यांचे गुण हेरुन त्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली जायची...
एक चांगलं व्यक्तीमत्व घडवलं त्या शाळेने... अशी स्वतःची स्तुती करायला
आवडेल मला....!!!
---जयश्री हातागळे
कोंढवा बुदृक
@66
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
स्पर्धेसाठी
लेख – माझी शाळा – भाग ८ वा
प्रेषक – कुंदा पित्रे—(४६)
शाळा म्हटली कि, अगदी राष्ट्रपतीपासुन ते शेतात काम करणारा चार बुक शिकलेला शेतकरी असो. त्यांच्याठायी,त्यांच्या मनात शाळेसाठी एक खास एक बैठक तयार झालेली असते.त्या दिवसांच गुपित आपल्या मनात सांठवत तो आयुष्य आक्रमित असतो.माझ्या आयुष्यात शाळा हा नाजुक कोपरा जपुन ठेवलाय ! पुष्कळजणांच्या आयुष्यात पहिली ते दहावी किवा अकरावी पर्यत सलग एका शाळेत शिक्षण झाले असेल पण मी दोन शाळातून शिकले. पहिली ते सातवी कोकणातील पिटकुली शाळा व पुढे चार वर्षानी गिरगांवातील मुलीची शाळा आठवी ते अकरावी !
गावाच्या शाळेविषयी काय बोलावे ?साठ वर्षापुर्वीचा काळ,गावातील आम्हीच मोठे ,माझ्या वडिलांनीच शाळा स्थापन केलेली व पुढे फायनल पर्यत वाढवलेली. त्यामुळे गावात शिक्षक आले कि, ते त्यांची दुसरीकडे सोय लागेपर्यत आमच्याचकडे रहात असत . त्यामुळे शिक्षकांचा वचक असा कधी वाटलाच नाही. उलट सगळ्या शिक्षक व शिक्षिकाकडून प्रेमच मिळाले. बरं आवाज थोडा बरा म्हणून प्रार्थना,झेंडा वंदनाचे राष्ट्रगीत,शारदोत्सवात भाग हे अगदी ओघानेच येत असे.आमच्या शाळेत शारदेत्सव मोठा दणाक्यात साजरा होई. मग पताका लावून शाळा सजवणं,कार्यक्रमासाठी स्टेज सजविणे,नाच,नाटुकले यांच्या तालमी,देवीची मुर्ती सजविणे, त्यावेळी फुलांना बहर येत असे. मग काय फुलांच्या माळा करणे . हे सारे करताना मैत्रिणी,इतर मुलं जोमाने एकत्र काम करीत असू . पण तेथे कसलंच आकर्षण नसे निव्वळ नितळ पारदर्शी मैत्रीची देवाण घेवाण होत असे. (सैराटनं मन खचून गेले)
मैत्रीणी सुध्दा जिवाभावाच्या एकीने कै-या आणल्या तर दुसरी तिखट मीट आणणराच.चिंचा पाडायच्या व फ्रॉकात लपवून शाळेच्या मागे जाऊन फस्त करायच्या. किती सुंदर होते जीवन.! नाही कसली चिंता नाही काळजी.सायंकाळी शाळेतून आले की, हातपाय धुऊन ,थोडे खाऊन परवचा म्हणायच्या,अभ्यास करायचा,तेव्हा क्लासेस,शिकवण्या नव्हात्या. आम्हाला अभ्यासाला बस म्हणुन पण सांगावे लागत नसे. अभ्यासात कांही अडचणी असतील तर दुसरे दिवशी मास्तर सोडवून देत असत असा सगळा विश्वास व नेकीचा मामला होता. आणी हो शाळेची मातीच्या जमिनी असत तेव्हा दर आठवडायाला शेणानी सारवणे असायचे. आम्ही सगळे विद्यार्थीच सारवण करीत असू . मी मोठ्या घरची म्हणून सवलत नसे. त्यामुळे आयुष्यात पुढे मोठेपणाचा अहंकार कधी मनाला शिवला नाही. मुलांच्या मनांची मशागत जसे आईवडिल करीत असतात तसेच मुलांना जगात कसं वागाव ,जगाव यात शाळेचाही मोठा वाटा असतो. अर्थात मुलांनी पण शाळेत मिळालेल्या संधीच सोने केले पाहीजे. असंच माझ्या पिटकुल्या शाळेतून सातवीची तालुक्याला जाऊन परीक्षा दिली.तेव्हा माझ्या त्या छोट्या आयुष्यात मोठी घटना घडली !! परीक्षेला चिपळूण येथे गेली असताना कोयनानगरच्या डॉमचे उद्घाटन करायला पंडीत जवाहरलाल नेहरु येणार होते. आम्ही मुलं परीक्षा संपली परतून निघणार होतो पण वडिलांनी निरोप दिला मुलांबरोबर येऊ नको. नेहरुना पाहून ये. मी थांबले आमच्या ओळखीच्या बरोबर कोयनानगरला गेले अगदी जवळून दोन फुटावरुन नेहरु चाचाना पाहिलं केव्हढा भाग्याचा दिवस होता. त्यांच शालीन रुप मी अजुनही विसरु शकत नाही ती डोळ्यात सांठवत माझं गावंच शिक्षम थांबलं कारम पुढे शाळात नव्हती. मुलीना बाहेरगांवी ठेवणे त्या काळाच्या दृष्टीने योग्य नव्हते.
चार वर्षानी मुंबईत पदार्पण – राहिलेले आठवी ते अकरावी शिक्षण सुरु,वय अठरा चालु.इतर मुली तेरा वर्षाच्या मी साडीत त्या स्कर्टमध्ये पण मी लाजले नाही त्यांच्यात मिसळून गेले. इंग्रजी विषय सोडला तर बाकी सा-या विषयात उत्कृष्ट गुण मिळायचे. आता आपल बाळबोदपण संपलं याची प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हा कीतीही कष्ट करुन अकरावी व्हायचेच हे मनाशी ठाम निश्चय केला.तेव्हा क्लासेसनी हळु हळु जीव धरायला सुरुवात केली होती.मला ध्येय गांठायचे होते. तेव्हा दिवस,वार वेळ लक्षात न घेता. अभ्यासात बुडवून टाकले. मैत्री होत्या पण मर्यादित. शाळा ,घर, क्लास हेच जग होते तेव्हा !! तरी देखील वार्षिक उत्सवाला नववीत असताना टिचरांच्या आग्रहामुळे एका एकांकित भाग घेतला. मला वाटतं आनंदीबाई व राघोबादादा यांची एकांकिका होती त्यात आनंदीबाईची भुमिका केली होती. पहिलं बक्षिस मिळाले. पण त्या कला क्षेत्रापेक्षा मला अभ्यास महत्वाचा वाटत होता.परत अभ्यासात झोकून दिले.आमची ही शाळा काही खुप नांवाजलेली नव्हती अकरावी रिर्झल्ट चांगला लागावा म्हणून शाळेने कंम्पलसरी सात ऐवजी आठ विषय घ्यायला लावले. तिथे मात्र मी जरा खटटू झाले. पण तरी सुध्दा साठाला दोन टक्के कमी मिळून उत्तीर्ण झाले. आताच्या नव्वद टक्के प्रमाणेच ते गुण होते. माझे वय २१ होते आणी मी आठवीपासुन विवाहिता होते.
माझ्या पिटुकल्या शाळेची सय अजूनही मनी दाटते व थोड्या समजत्या वयातील शाळा मनाला ओढ लावते. आपलं जिद्दीपण त्या शाळेत कसं भरभरुन आलं ,त्या शाळेत आपण किती कष्ट घेतले ते गारुड मनात या वयातही एकटी बसली असताना चलतचित्राप्रमाणे डोळ्यासमोरुन सरकन जातो. मी म्हणते या दोन शाळा मला खुप काही शिकवून गेल्या .
जय हिंद जय महाराष्ट्र
कुंदा पित्रे (४६)
दादर,मुंबई २८
९३२४७४२७०६
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
🌹स्पर्धेसाठी🌹
📝माझी शाळा.....
माझी सध्याची शाळा जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद
शाळेची वाटचाल....….
जि प प्रा शाळा शेंडी ही दोन शिक्षकी शाळा आहे.इ.१ली-४थी मध्ये २६ विद्यार्थी आहेत.सदर गावची लोकसंख्या ५००असुन गावातील सर्व पालकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती व शेतीपुरक व्यवसाय हेच आहेत.सदर परिसर दुष्काळी पट्ट्यात येत असल्याने शिक्षणाकडे पालकांची उदासीनताच आहे.
अशाही परिस्थितीतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तपुर्ण शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच आम्ही दोन्हीही शिक्षक नियोजन करत असतो व त्याप्रमाणे अंमलबजावणी करत असतो.
मी तीन वर्षापुर्वी या शाळेत बदलुन आले.पुर्वीचे शिक्षक शाळेकडे व विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष देत नसत.त्यातच ग्रामीण भागातील पालक,,पाल्यांना देण्यासाठी वेळ नसतो त्यांच्याकडे.माझे काम पाहुनच तीन महिन्याच्या आत गावक-यांनी शाळेला कुलुप लावले.आंम्हाला एक मँडम पुरेशा आहेत ते दोन शिक्षक आंम्हाला नकोत.गावक-यांच्या सतत मागणीमुळे ते माझे दोन बांधव निलंबित झाले व माझ्यावर १-७ वर्ग व मुख्याध्यापिका पदाचा भार येऊन ठेपला.या शाळेचा अध्यापनाचा व इतर शैक्षणिक कामकाजाचा भार मला पेलवेल की नाही ही शंका होती पण माझे पती श्री हरिश रणदिवे यांच्या सहकार्यामुळे मला सतत प्रेरणा मिळत गेली.गेल्या तीन वर्षापासुन मी माझ्या शाळेचे रुपडेच बदलुन टाकलेय.
'घराची कळा अंगण दाखवते'याप्रमाणे मला शाळेचा उडालेेला रंग स्वस्थ बसु देत नव्हता.शाळेचा परिसर खुप मोठा,रंग नाही, ग्रामीण भाग उदास वाटायचे.दहा वर्ष शहरी भागात नौकरी केलेली त्यामुळे करमक नव्हते,शिवाय मी एकटीच स्टाफ नाही.स्वयंसेवक,प्रेरकांच्या मदतीने एक दीड वर्ष काढली.मी प्रथम माझा वितार काही गांवकरी व विविध समिती सदस्यांना शाळेची रंगरंगोटी बाबत माहीती दिली.सर्व जण लगेच तयार.शाळेचा समोरचा भाग रंगवुन घेतला.बोलक्या भिंती,स्वच्छ व सुंदर परिसर,यामुळेच शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन हळुहळु बदलु लागला.
ज्ञानरचनावादी पद्धतीने वर्गाची रंगरंगोटी करुन अध्यापणास सुरुवात केली.विद्यार्थी व शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार केले.गेल्या वर्षी वाशी तालुका ज्ञानरचनावादी जाहीर करताना माझ्या शाळेची निवड केली याचा मला अभिमान वाटतो.अधिकारी व पदाधिकारी यांच्या सतत शाळाभेटी झाल्या.१००हुन अधिक जणांनी ज्ञानरचनावादी वर्गास भेटी दिल्या.
माझ्या शाळेत राबविलेले विविध उपक्रम.........
अगदी थोडक्यात........
१.नातं मित्रत्वाचं-------
शाळेत मुलांसोबत मित्रत्वाचं नाते तसार केल्यास त्याचा निश्चितच चांगला परिणाम जाणवतो.गणित ,इंग्रजी त मुलांना खुप अडचणी येतात.त्या कोणासमोर मांडाव्यात हा प्रश्न मुलांना पडतो.या उपक्रमामुळे मुले शिक्षकांना भेटुन आपली अडचण दुर करु लागली.मुलांची जवळीक तर झालीच पण गुणवत्ता सुद्धा वाढली.
२.रचनावादी परिपाठ------
ज्या शाळेत परिपाठ चांगला होतो तेथे निश्चितच मुलांचे मन रमते.परिपाठ म्हणजे शाळा व जिवन यांना जोडणारा सेतु असतो.दररोज नवीन प्रार्थना व समुहगीते,तिन्ही भाषेतुन प्रतिज्ञा यामुळे मुलांना शाळेत येण्याची गोडी लागली.
३.विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे-------
सतत कामात असणारी खेड्यातील माणसे अशांना ना मुलांच्या वाढ-दिवसाचे कौतुक ना बक्षिसांचे.मात्र शाळेत मुलांच्या वाढ-दिवसाच्या तारखा महिनावार फोटो लावुन वर्गात ठेवल्या.त्यामुळे मुलांना स्वत:ची व मित्राची तारीख माहित झाली. शालेय परिपाठात वाढदिवस साजरे केल्यामुळे मुलांमध्ये आनंद व उत्साह निर्माण झाला.
४.वृक्षाबंधन-------
टाकाऊतुन टिकाऊ जुन्या लग्नपत्रिका विविध आकारात कापुन दोन्ही बाजुला रंगीत दोरे बांधुन पर्यावरण स्नेही राखी तयार केली.शाळेच्या परिसरात असणा-या झाडांना राखी बांधुन,झाजांची पुजा करुन ,पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
------
५.स्टार ऑफ द डे----
६.चॉकलेट फेस अँवॉर्ड----
७.फिरते व तरंग वाचनालय---
८.चला तंत्रस्नेही बनुया---
९.बायोमैट्रिक हजेरी---
१०.पर्यावरण स्नेही होळी---
११.इकोफ्रेंडली गणपती---
१२.कार्यानुभव विविध उपक्रमांची माहीती--
इत्यादी उपक्रम राबवुन माझी शाळा १००% प्रगत आहे.
.. संगीता भांडवले(१६)
वाशी, उस्मानाबाद
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{{}}}}{{{}}}
नमस्कार सवॅ साहित्य दपॅण टिमला खूप दिवसांनी भेटतेय सर्वाना
स्पर्धा साठी सौ संगीता सपकाळ बीड 9421345341
माझी शाळा मी कधीच विसरू शकत नाही कारण ती एक प्रकारची आयुष्य भराची शिदोरी म्हणून काम करत असताना तात
बिजरूपी विचार रूजत अ सतात
ते शाळेत च पूणॅ
जीवन हे शाळेत घाडते सर बाईख
याचे नखशिखांत निरिक्षण आपण
करत असतो ती व्यक्ती कोण जाणे
आपल्या आयुष्यात काही तरी नवीन गोष्टी शिकायला सांगितले जाते व त्या अनुषंगाने त्या वेळी त्यांनी व्यक्त केली जात असलेलेच
शब्द आपल्या मनात घर करुन त आपण आपल्या भावनानिर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आसतो
शाळा आपण कधीच विसरू शकत नाहीत कारण त्या काळात त्यांनी व्यक्त केली जात अस लेली शब्द आपले जीवन बदलून टाकते माझ्या चित्रा जोश मॅडम माझे खूप छान कौतुक करायला मागेपुढे पाहत नसत म्हणुन मीही आज खूप छान पदावर कार्यरत आहे
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
94234 73472:
माझी शाळा कै.चादमलजी लोढा प्राथमिक शाळा चौसाळा. या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. ही खाजगी शाळा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षक चांगले लक्ष देत असत.मला शाळेत असताना जाधव सर. गायकवाड सर.खाकरे सर तेलप सर. झिरमीरे सर. हे फार छान शिकवायचे ते आजही आठवते. जाधव सर शब्द लिहून पाठ करून घेत..त्यामुळे कधीच विसरणार नाहीत असे ईंग्रजी शब्द पाठ होत असत.त्यावेळेला पावसाळ्यात आमची फार फजिती होत असे मी सुलतापुर येथुन चालत येत होतो.आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी. नाटक. गाणे असे संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असे..सामुदायिक आत्महत्या केंद्र. हे नाटक फार लोकप्रिय झाले होते. आजही काही लोक मला त्या नाटकातील नावाने चिडवतात. आमच्या शाळेत ज्या शिक्षकांनी कमी पगारावर नोकरी केली. त्याना आचानक जिल्हा परिषदेची नोकरी लागली. ..ते बदलून गेले. .पण ते आमच्या आठवणीत आजही आहेत. पुढे माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद चौसाला येथे झाले.ही शाळा पण फार छान आहे...या शाळेत असताना भरपूर आभ्यास करून घेत असत. आमच्या शाळेने पुढे भरपुर क्लास वन. क्लास टू ऑफिसर तयार केले. माझी जिल्हा परिषद शाळा ही नंबर एकची शाळा आहे...
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}}
इंग्रजाळलेलं नाव असलं तरी माझी शाळा मराठीच बरं का...'न्यू इंग्लिश स्कूल जामनेर'.जि.जळगाव(खान्देश).खान गेला पण नाव लावून गेला अन शेक्सपिअर उगाीच म्हणून गेले की नावात काय असतं...हो नां? .असो तर जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून अवघ्या 26 कि.मी.अंतरावर नी कांग नदीच्या काठावर वसलेलं ठिकाण.
माझ्या शाळेबद्दल काय सांगू नी किती सांगू .आईनंतर माझी प्रिय व्यक्ती म्हणजे हीच शाळा.आईबाबांची बदली झाल्यानं आम्ही तालूक्याला आलो ्न पाचवीच्या द्वितीय सत्रात मी या शाळेत आले.इंग्रजी ओ आकाराची शाळा...बोलक्या भिंती व बोलकेच शिक्षक.पहिल्याच दिवसी पहिल्याच तासात जॉनी जॉनी यस पापा ही कविता शिकले.आमची तुकडी ही सुपरतुकडी होती त्यामूळे उत्तमोत्तम शिक्षक लाभलेत.
संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली शाळा.कुठलचं क्षेत्र दुर्लक्षित झालेलं नव्हतं.दर आठवड्याला हस्ताक्षर स्पर्धा,निबंध स्पर्धा,वत्कृत्व स्पर्धा व्हायच्या.बाळकडू प्यायले ते इथेच जे आजवर पुरतयं.दरवर्षी शाळेचा वाढदिवस साजरा होतो.अनेक दिग्गज व्यक्तींची भेट शाळेतच झाली.बाबासाहेब पुरंदरे...जगदिश खेबुडकरांचा ऑटोग्राफ मी आजवर जपलाय.
एैसपैस मैदान होतं.अगदी नववीपर्यंत प्रचंड खेळलो.कबड्डी,खोखो,व्हॉलीबॉल माझे आवडते खेळ.एकदा केवळ माझ्या साध्या राईट प्रक्टीसमुळे व्हॉलीबॉल जिंकलो तेव्हा सरांनी कौतूक केलेलं अजून आठवतं.राज्यस्तरीय कबड्डी प्रशस्तीपत्रामुळे माझा डी.एडला नंबर लागला हे ही नसे थोडके.शाळेचे ऋण तर फिटू शकत नाही पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून गेल्या नोव्हेंबरमधे मी पुढाकार घेवून स्नेहमेळावा घेतला व शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
याच शाळेत मिळाले जिवलग मित्र-मैत्रिणी.जवळपास सगळेच आज यशोशिखरावर आहेत.आवर्जून तिळगूळ वाटायचो,राखी बांधायचो,सोबत खेळायचो अन नाचायचो गायचो देखील.नुसतं आठवलं तरी डोळे भरून येतात.
आमचे शिक्षक निबंधातील शुद्धलेकन तपासायते,जादा वर्ग तासिका घ्यायचे.प्रसंगी रागवायचे.शिस्त तर बापरे...प्रार्थनेला उशिर झाला म्हणजे शिक्षा.आजही त्यामुळेच कुठेही मी वेळेअगोदर पोहोचते.प्रत्येक विज्ञान प्रात्यक्षिक तर प्रयोग शाळेत आवर्जून केलेत व अनुभव घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रमात मी नाट्यछटा करायचे.खूप भारी अनूभव यायचा.गर्ल गाईडचे कॅम्प...शेकोटी कार्यक्रम भारावून टाकायचे.इंग्रजी व गणिताचे शिक्षक हे जीव ओतून शिकवायचे.छोटी छोटी चूक दुरूस्त करायचे.
माझं इंग्रजी हस्ताक्षर थो़डं खराब यायचं.येवले सर म्हटले की जयश्री दररोज एक पान लिहून आण व दाखव. मी एवढे दिवस न चुकता लिहिले की एक दिवस सरच म्हटले आता बस कर.
एकदा माझा छोटा भाऊ तो तिसरीत असेन प्राथमिक शाळा लागूनच होती.काही कारणास्तव अचानत वर्गात आला व आक्का म्हणून हाक मारून बोलून गेला.मग काय दोन तिन दिवस वर्गात आक्का म्हणून चिडवलं गेलं.
मी रागीट होते.कधी शिक्षकांशीही कट्टी करायचे.लामखेडे सर म्हणायचेjayshri your range is on the top of your nose.माझं नाक मोठ असल्यानं असेल कदाचीत.हाहाहा.
निरोप समारंभाला तर रडू आवरतं नव्हतं.त्या दिवशी शिक्षक भरवत होते पण हुंदके आवरतं नव्हते.येत्या2019 ला शाळेचा शंभरावा वाढदिवस आहे.पुन्हा आम्ही भेटणार.बालपणात जाणार व आठवणी भरून आणणार.
...." ही आवडते मज मनापासून शाळा
जशी लावते लळा माऊली बाळा"
........जयश्री पाटील
{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}{{{}}}
{{{}}}{{{}}} समाप्त {{{}}}{{{}}}
○गजानन पवार पाटील
खुप छान ब्लॉग सरजी
ReplyDeleteनितांत सुंदर
ReplyDelete