Saturday, 25 May 2019

माझी शाळा

माझी शाळा

मला लहानपणापासून शाळा आवडत होती काय ? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. मी घरात सर्वात लहान. त्यामूळे सर्वाचे माझ्यावर प्रेम असायचे. खास करून माझी छोटी बहीण. जिच्यामुळे मी शाळेत जायला शिकलो. माझे घर म्हणजे अगदी छोटे दोन रूमचे. वडील शिक्षक होते, पण ते दर आठवड्यास भेटायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक सायकल आणि छत्री असायची. उन्हाळा पावसाळा असो वा हिवाळा. त्यांच्या विषयी माझ्या मनात नेहमीच आदरयुक्त भीती असायची. त्यांनी मला कधी रागावले नाही पण मनात एक वेगळीच धाक होती. अर्थातच मी पहिली आणि दुसऱ्या वर्गात रडत रडतच गेलो. तिसऱ्या वर्गात मात्र माझ्या सोबत ताई नव्हती कारण ती चौथी पास झाली आणि पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते. त्यामूळे मला ताई शिवाय शाळेत जावे लागले आणि येथूनच कदाचित शाळेची गोडी लागली. या वर्गात शिकविणारे सर जेंव्हा बाजारात मला भेटतात तेंव्हा त्यांना खूप आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांना आनंदी पाहून माझे ही मन भरून येते. माझ्या पाऊलवाट पुस्तकाचे प्रकाशन झाल्याची बातमी वाचून माझे प्राथमिक शाळेतील शिक्षकानी चारचौघात कौतूक केले तेंव्हा मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा किती तरी पटीने माझ्या गुरुजनांना झाला. मी तसा खूप हुशार असा विद्यार्थी नक्कीच नव्हतो पण पहिल्या दहा मध्ये नेहमीच असायचो. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी धर्माबाद या मोठ्या शहरात शिकण्यासाठी आलो. मी खेड्यातून आल्यामुळे मला " ड " वर्गात प्रवेश देण्यात आला. या शाळेची पध्दतच होती की खेड्यातील मुलांचा वर्ग वेगळा ठेवण्याचा, ही शाळेची पध्दत मला कदापिच रुचली नाही तरी मला काही करता येत नव्हते. एक दोन वेळा प्रयत्न केला की अ किंवा ब या तुकडीत प्रवेश द्यावा पण मिळाला नाही. ड तुकडीच्या वर्गात सर्वच प्रकारची विद्यार्थी होती. अर्थातच सर्वगुणसंपन्न असा आमचा वर्ग. या वर्गातील सर्व विद्यार्थी ज्यात मी अभ्यासात वर्गात नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर. घरापासून आणि आईपासून दूर राहताना खूप दुःख वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्याची ओढ लागायची. गावाकडील मित्र आणि त्यांच्या सोबत खेळण्याची मजा काही औरच. येथे भरपूर लिहिण्याचा योग आला ज्यामुळे माझे अक्षर लेखन सुधारणा झाली. दररोज जवळपास सर्वच विषयांच्या प्रश्नोत्तर लिहावे लागायचे आणि वही पूर्ण न केल्यास शिक्षा

- नागोराव सा. येवतीकर

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...