मी एक शिक्षक आहे ........
जनगणना असो वा निवडणूक
सदैव मी सज्ज असतो
प्रत्येक राष्ट्रीय कामात मी
नेहमीच दक्ष असतो
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
लहानमोठे सान थोर
सर्वच नमस्कार करतात
गावातील सर्व लोक मला
मान सन्मान देतात
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
नाते अमुचे घट्ट झाले
ते मला मायबाप समजतात
शाळेत माझी चिमुकली मुले
रोज आतुरतेने वाट पाहतात
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे
निमंत्रण न विसरता देतात
लग्न असो वा इतर अन्य काम
लोकं मला न विसरता बोलावतात
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
गुरूजी किती वाजले असे
मला प्रत्येक जण विचारतात
माझ्या येण्यावर अन जाण्यावर
लोक घड्याळाची वेळ ठरवितात
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
शासन सुद्धा प्रत्येक शासकीय काम
फक्त आणि फक्त माझ्याकडून
पूर्ण करून घेतात
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
मला चार चौघात अगदी
शिस्तबध्द राहावे लागते
नियमाचे पालन तंतोतंत करावे लागते
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
इतर लोकांसारखे मला कसलेही
शान शौक करता येत नाही
सैराट होऊन जीवन जगता येत नाही
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
म्हणूनच समाजात, गावात
माझी खूप शान आहे बान आहे
माझ्या बोलण्यात आजही जान आहे
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
मला स्वतः चा खूप अभिमान आहे
अन मी आज स्वाभिमानी ही आहे
कारण ................
मी एक शिक्षक आहे ........
मी एक शिक्षक आहे ........
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
09423625769
No comments:
Post a Comment