Wednesday, 2 March 2016



दिनांक 28 फेब्रुवारी 2016 रोजी पुण्यात झालेल्या " साद माणुसकीची - सामाजिकता अभियान " ची पहिली राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली त्यांचे क्षणचित्रे आणि प्रतिक्रिया जरूर पहा 





* तुम्ही आम्ही पालक मासिक मार्च 2016 चा अंक प्रकाशित करतेवेळी मान्यवर @ 






तुम्ही आम्ही पालक मासिक माहे - मार्च 2016


नागोराव सा. येवतीकर यांचा या मासिकातील लेख 
" मुलींचे शिक्षण - प्रगतीचे लक्षण 


श्री संतोष  मुसळे, जालना  यांचा या मासिकातील लेख 
" मिळून साऱ्याजणी  " 
पहिल्या बैठकी वर मिळालेल्या प्रतिक्रिया 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मा हरीश सर
      शिक्षण क्षेत्रा विषयी, समाजातील दुर्बल वंचित घटकांच्या शिक्षणाविषयी आपली तळमळ , समाजातील अनेक विविध विचार प्रवाहांना एकत्र आणून एका व्यासपीठावर उभे करण्याचे सामर्थ्य , कमालीचा विनम्रपणा,अभ्यासू वृती व् एक उत्तम प्रशासक हे गुण मनाला खूप भावले..
आपल्या विचारांची बैठक एवढी स्पष्ट आहे की समोरच्या व्यकती च्या मनात कसलाच हेतू उरत नाही
आपले मौलिक मार्गदर्शन,मा गीत सर,आदरणीय काळपांडे साहेब यांचे मार्गदर्शन.मा आगाशे सर यांची ऊर्जा खूप शिकवून गेली....
तसेच या प्रसंगी राज्यभरातून आलेले माझे शिक्षक बांधव व् भगीनी आपल्या शाळेसाठी करत असलेली धडपड पाहून या गोष्टीचे खूप समाधान वाटले की पैसा किंवा पगार याच्या पलीकड़े जाऊन आमचे शिक्षक किती 
सुरेख कार्य करत आहेत..

कालच्या या तुम्ही दिलेल्या साद या अभियानाबाबत आपणा बद्दल च्या भावना या माझ्या छोटयाश्या कवितेत मांडण्याचा एक केविलवाणा प्रयत्न......


🌺साद माणुसकीची🌺

माणुसकीच्या अभियानात दिलीत तुम्ही साद
राज्यभरातील सर्व गुरुनी
दिली आपणास दाद...

केले प्रेरित महान कार्यास
घालूनी हृदयास हात
गुरु ची महती अपार जाणून
केले सामिल आम्हा यात..

आदरणीय सारे मान्यवर
सर्वांची आपणास साथ
सर्वांची लाभों ऊर्जा येथे
होण्या समर्थ या अभियानास

सौ कल्पना महाडिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुप्रभात. 
कल्पना मॅडम अतिशय सुंदर कविता आणि  अभियानाबद्दलचा आपला अभिप्राय खूपच बोलका! 
तुमचं काम सुद्धा खूप छान आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दुव्याचं काम करण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
-  हरीश बुटले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
धन्यवाद सर
आपल्या या प्रमाणिकपणाच्या प्रयत्नात माझा  कणभर वाटा पण मला  खूप आत्मिक समाधान देईल कारण माझ्या शिक्षणासाठी देखील अशीच आपणासारख्या एका महान व्यक़्तीने केलेली मौलिक मदत आज मला इथवर घेऊन आली आहे 
सौ कल्पना महाडिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🙏🙏🙏 कालची 'साद माणुसकीची ' एक  अविस्मरणीय  अनुभव देणारी ठरली. मा हरिष बुटले सरांनी किती मोठी माणसं जोडून ठेवलीत याची प्रचिती वेळोवेळी सर्वांच्या मनोगतातून येत होती. आपापल्या क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या गुणीजनांचा सहवास अतिशय सुखद आणि प्रेरणादायी आहे. 'तुम्ही आम्ही पालक' सह सर्व शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्राला निश्चितच अनुकरणीय ठरतील असा विश्वास वाटतो. विवेकी लोकांनी एकत्र येऊन ह्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली आहे.  आपण त्यामध्ये चांगल्या वृत्तीच्या शिक्षकांना सहभागी करु या. .....खूप आनंददायी अनुभव. 🙏🙏🙏🙏 कालच्या कार्यक्रमाचे मी केलेले सूत्रसंचालन आपण सर्वांनी गोड करुन घेतले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. ......🙏🙏🙏🙏🙏
- श्री अरविंद शिंगाडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हरीष सर मला खर तर काल उपस्थित  राहण्यासाठी खूपच वेळ झाला मी श्रीखंड पुरी जरी  मिस केली असली तरी स्विट डिशचा  माञ थोडा तरी नक्कीच  आस्वाद घेतला मला उशिरा येऊनही खूप अस वाटत होत खरच मी सकाळपासून का नव्हते  खर तर आम्हा सर्व  अगदी मनापासून काम करणाऱ्या  बांधवांना  आपण ही एक नवी प्रेरणाच  देत आहात आणि तुमच्यामुळेच सर्व  असे निस्वार्थी हेतूने  आपल्या  कार्यावर निष्ठा  असणाऱ्या  बांधवांना एकञित आणून एक जिव्हाळ्याचे  नाते जोपासणारे मोठे  कुटुंब निर्माण  करत आहात आपण काल म्हणत होता खूपच  चांगलेही  ज्ञानी लोक एकञ राहू शकत नाहीत पण मी फक्त ज्ञानी अस न म्हणता मुले,पालक ,समाज यांचा अभ्यास करुन  जो तळमळीने त्यांना मदत करुन असे विद्यार्थी  ,समाजाला पुढे  नेऊ इच्छितो म्हणजेच त्याजवळ माणुसकी आहे आणि आपण तर नाव इतक साजेस दिले आहे साद माणुसकिची  निश्चितच  या group  मध्ये  आम्ही सर्व  हातात हात घालून आपल्याला  अभिमान वाटेल आसेच काम करु आपली ही साद हा आवाज तर मानामनापर्यंत पोहोचतच आहे सर काल मला थोडा वेळच होते पण खरच खूपच छान वाटले . मी यासाठी कल्पनाचेही खूप आभार मानते शिवाय आपल्या  group  मधील रविंद्र केंचे व लिंबिकाई सर यांनीही  मला अगदी हक्काने बोलले का नाही गेलात तुम्ही इतकी चांगली संधी का सोडत आहात आपला प्रतिनिधी  हवाच सर मला वाटत इथेच हे कुटुंब निर्माण  होत चालल  आहे मी नाही तर तुम्ही जाऊन या आणि आम्हाला सांगा असेच आपल्या मध्ये सर्वजण आसलेने  कोणी कोणाला न खेचता  प्रत्येकाच्या  नवीन अनुभवाने इथे एकमेकाला निश्चितच  बळ येऊन सर्वांनी नवी प्रेरणा  इथे मिळत जाईल  साद माणुसकीची नावाप्रमाणेच इथे सर्वजण आहेत हे काल आपण घेतलेल्या सर्वांच्या  छोट्याशा स्वरुपाची मुलाखत यावरुनही लक्षात  आले.परत  होणाऱ्या  मिटिंगसाठी निश्चितच  आमची सर्व  टिम येईल  धन्यवाद सर 
- मगदुम स्नेहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साद माणुसकीची।।।
एक मानवीय प्रक्रिया जिथे जागृत होतात चेतना ; आणि ही चेतना प्राप्त होतेय या ग्रुप मधून .....
।।
ज्योत से ज्योत जगाते चलो 
प्रेम की नया बहाते चलो ।।
- श्री प्रवीण शिंदे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कल्पना, स्नेहा दोघी काल होत्या पण मी नव्हते. खरच भेटीची एक संधी गेली स्नेहा. खूप छान वाचले या विषयी. अरविंद सरांचे संचालन क्या बात हॆ.
पुन्हा भेटू कधीतरी नक्की. याच परिवाराच्या सोहळ्यात. काळपांडे सर पण होते म्हणजे सोने पे सुहागाच.
- स्मिता गालफाडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्मिता  खर तर हरिष सरांनी ही एक खूपच छान संधी उपलब्ध  करुन दिली आहे  त्यासाठी आपणही एकत्र येणे गरजेचे आहे पुन्हा  वेळी मात्र  मी ही लवकर  येईन अन् तुही उपस्थित रहा.  आज परत एका शैक्षणिक  व सामाजिक  बांधिलकी जपणूकी संदर्भात  उर्जा निर्माण  होणाऱ्या चांगल्या  group  मध्ये  असल्याचे  समाधान मिळते .
- मगदुम स्नेहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मा.बुटले सरजी,
साद माणुसकीची या नावतच खुप ताकद आहे.आपण महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधु बहीनींना खुल व्यासपीठ निर्माण करुन दिलात त्याबद्दल आपले मनपुर्वक आभार.
श्री.गजानन पुं.जाधव
प्रा.शिक्षक,पं.स.रोहा,जि.रायगड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हरिष सर जाधव सरांच काम खूपच उत्कृष्ट  आहे. सर आदिवासी भागामध्ये काम करतात  त्यांचा नवोपक्रम मध्ये  राज्यात  नंबरही आला आहे मुलांची भाषा वेगळी असली तरी मुलांना त्यांनी प्रगत केले आहे तेथील समाज व मुलांसाठी काम करणे खरच तारेवरची कसरत तरीही सर सफल झालेले आहेत.
- मगदुम स्नेहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
म्हणूनच आपणासारख्या अश्या शिक्षकांना 'राष्ट्रीय संपत्ती' म्हणून संबोधतो
-  हरीश बुटले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कालचा कार्यक्रम खुपच छान 

ग्रुपचा उद्देश,प्रेरणा,संयोजन,आयोजन,हेतू...सर्वच best
- स्वरदा खेडेकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मा हरीश सरजी
काही अपरिहार्य कारणांमुळे मला काल येता आले नाही.पण खुप चांगली सुरुवात आपण केलि आहे.त्याची चर्चा ही दिवसभर सुरु आहे.बाळासाहेब वाघ सर शी पण बोलणे झाले. यामधे सहभागी शिक्षक ही खुप उत्साही आहेत.मला सर्वाना भेटन्याची इच्छा झाली आहे .पुढील कार्यासाथी सर्वाना मनापासून शुभेच्छा!
श्री सिध्दराम माशाले
सर फॉउन्डेशन,सोलापूर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार बुटलेसर मी  गोपालकृष्ण कालेकर सर पन्हाळा .आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा! मला मुलांच्या परीक्षेमुळे यायला जमले नाही त्याबद्दल क्षमस्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साद माणुसकीची
चांगली माणसं एकत्र आली की, चांगला समाज घडतो.चांगल्या शिक्षकांच्या हातुन चांगले विद्यार्थी घडतात.चांगले विद्यार्थी देशाचे आधारस्तंभ. अशाच एका सत्कार्यासाठी मा.हरीष सर आपण दिलेली हाक.व त्या हाकेला साद देणारी प्रत्यक्ष उपस्थित मान्यवर व  मनाने सहभागी मंडळी यांचा सहवास नविन काहितरी करण्याची उर्मी देणारा ठरला.
    महाराष् ट्रातील तमाम शिक्षक बंधु-भगीनींना आवाहन करतो की समाजाच काहीतरी देणं लागतं
योग्य वेळ व योग्य व्यासपिठ मा.बुटले सरांनि उपलब्ध करुन दिले.
    तर वाट कसली बघता स्वतः सहभागी व्हा व चांगल्या मित्रांना सहभागी करा.
       समाजासाठी एक चांगल व्यासपिठ व संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरांचे आभार 
व सहभागी सर्व मान्यवरांचे आभार.
  नरेश वाघ 
वर्धा 8605559930
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Our initiative is very good sir hope our group do well in the social, education and all the related areas am already attached to one such group and we work for the school run by Matin bhosale school name ? Prashnachinha shala for fasepardhidhi Stu.  On reading yesterday and today's comment feel very proud to be a part of ur group thanks for Papale sir who join me hope that soon we work on ground level. 
Shri Satish P Kshirsagar 
asst. Teacher p.s. 
Karanja zp washim
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Extremely sorry for registering opinion little late. I wish to appreciate the initiative and the vision of Harish Sir. Congratulations for it. I would like to know who is the coordinator for Pune region and will we be associating for work?? Sure Sir! I will communicate the details to you. 
Priti Khandelwal, pune 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
साद माणूसकी परिवारातील सर्वांना नमस्कार ..मी विनायक हिरवे,मलकापूर जिल्हा कोल्हापूर .मित्रांनो आपल्या सर्वांना एकत्र आणलेबद्दल बुटले सरांचे मनापासुन आभार . आपण एकत्र येणं हा निव्वळ योगायोग नसून ती नियतीनं आखून दिलेली योजना आहे असं मला वाटतं.शुद्ध हेतू आणि उद्देश असेल तर नक्कीच आपण यशस्वी होतो,यावर माझा विश्वास आहे.आपण स्विकारलेल माणूसकीचं अभियान समाज कल्याणासाठी आदर्शवत ठरेल..मी गेली १५ वर्ष यासाठी धडपडत होतो...आणि आज आपल्या सर्व दिग्गज मंडळीच्या सावलीत राहणेची संधी मिळतेय,ही खुप भाग्याची गोष्ट आहे..कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा group अगदी लवकरच मी तयार करतोय.. 
विनायक हिरवे,मलकापूर (कोल्हापुर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 मस्त चर्चा. छान उपक्रम. बुटले सर तुमचे आमचे प्रयत्न निश्चित यशस्वी होतील. आम्ही सारे सोबत आहोत. खूप उत्साहात हे सारे होत आहे, याचा आनंद आहे.
- श्री भाऊसाहेब चासकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हरीश सर,  आम्ही बरेच लोक काल उपस्थित राहू शकलो नाही पण कालच्या मिटींगचा सविस्तर सारांश आम्हाला  कळू शकेल का. 
कारण तालुका पातळीवर संघटन करताना त्याचा आम्हाला उपयोग होईल
अनिल घुले
डहाणू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वरील सर्व पोस्ट " साद माणुसकीची whatsapp ग्रूपवरून copy & paste केलेले आहे. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
या कार्यक्रमाच्या VDO साठी प्रतीक्षा असावी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही पोस्ट वाचल्यावर बहुतांश शिक्षक मित्र सहभागी होण्यासाठी फोन करीत आहेत आणि msg सुध्दा करीत आहेत. त्यापेक्षा आपणांस या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर जिल्हा किंवा तालुका प्रतिनिधी यांच्याशी त्वरीत संपर्क करा. लवकरच आम्ही विभाग - जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक प्रसिध्द करणार आहोत. Stay Connected With Us - Thanks 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~








1 comment:

  1. साद माणुसकीची व पालक तुम्ही आम्ही या नावातुनच सदर यशाची व महत्वपुर्ण कुशलसंपन्न संस्काराची ओळख होण्यास शैक्षणीक वेगवेगळ्या प्रयोगाची व अनुभवाची सांगड घालण्यास सतत ही चळवळ प्रेरणादायीच ठरेल.

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...