Thursday, 12 November 2015


" विचार मंथन ग्रुप " आयोजित 

** काव्यमंथन चारोळी स्पर्धा  **
** विषय : भाऊबीज   ** दिनांक : 13 नोव्हेंबर 2015
** परीक्षक : निर्मला सोनी 


*********************************************************

बहीण  
एक अनोखं नातं .....

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. 
आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली 
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. 
'माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीजे च्या आपणा सर्वाना शुभेच्छा ! 
*************************************
भाऊबीजच्या दिवशी 
बहीण करते प्रतीक्षा 
ओवाळणीत काही नको
कर आयुष्यभर रक्षा 
 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
भावाला उदंड आयुष्य लाभो 
बहिणीची हीच असते ईच्छा 
वर्षातून एकदा येणाऱ्या 
भाऊबीजच्या तुम्हांला शुभेच्छा 
नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
सासर माझे तालेवार जरी 
माहेरचीच आवडे साडी चोळी
भाऊबिजेच्या मंगल वेळी
वाट पाहते बहीण भोळी 
* अरविंद कुलकर्णी 
( साहित्यमंथन च्या सर्व लहान थोर बहिणींना समर्पित )
*************************************
बायको म्हणते नवऱ्याला 
आम्ही जातो आमच्या गावा 
आज भाऊबीजचा सण जाते 
माझ्या भाऊरायाला ओवाळाया 
नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
भावाला ओवाळीते
बहिण आरती
भावाची पसरते
जगात किर्ती 
पी के देशमुख नादेंड
*************************************
बहीण आणि भावाचं
भाऊबीज हे नातं
ओवीशिवाय कंठाचं
फिरत नाही जातं
   --- शफी बोल्डेकर
*************************************
भाऊबीज घेवून आली बघ तुझी आठवण,
डोळ्यांत होवू लागली अश्रूंची साठवण,
भाऊराया, महालातला तू असे रे राजा ,
आज तरी बहिणीची तुज होईल का आठवण ....
निर्मला सोनी.
*************************************
वेड्या बहिणीची 
वेडी ही माया 
वाट पाहाते ती 
भावा ओवाळाया 
- नासा
*************************************
भाऊबिजेला उधाण आणिक भरते आनंदाचे,
ओवाळुनिया प्रिय भावाला बहीण गाऊन नाचे.
युगायुगांचे नाते हे रे अगदी प्रत्येकाचे,
म्हणून वंदिते प्रेमादरे रे काया मन नी वाचे.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
************************************
|| श्री ||

रक्षावे भगिनीस 
असे बांधवाने 
जसे रक्षीले द्रौपदीस 
श्रीकृष्ण माधवाने ||

जपावे या बंधनास 
निरामय भावनेने
जसे जपले हळूवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने ||

द्यावे पूर्णत्व नात्यास
आज बंधनाने
जसे दिले पूर्णत्व
दीपावलीस द्वितीयेने ||

ओवाळणी दिली आज
काव्यरूपी विनम्रतेने
जशी दिली तिमीरात
पणतीस प्रकाशाने ||

भाऊबिजेच्या शुभेच्छा !
- सुजाता मोघे 
*************************************

सिमेवरती लढणा-या रे,
प्रणाम तुजला भावा.
ओवाळीन मी भाऊबिजेला
आशिर्वाद मज द्यावा.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
*************************************
माझ्या लेकरांच्या भाळी नाही।
मामा मावशीची मायाळू गणगोती।
नभीच्या चंद्राशी, राऊळी देवाशी।
मी जोडते नि:स्वार्थ प्रेमाची नाती।
अंजना कर्णिक.
*************************************
दूर गेला माझा भाऊराया,हूरहूर लागली मनाला,
आला आला चंद्र बिजेचा,आतूर झाला ओवाळणीला,
भाऊराया,आस आहे,त्वरे लागगशील तू परतीला,
वाट पहाते वेडी ताई,घेऊनी हाती पंचारती भाऊबीजेला.
      - सुलभा कुलकणीॅ .मुंबई.
*************************************
भाऊराया भाऊराया
किती करतोस माया ।
अविरत अखंडपणे
मजवर तुझी छाया ॥
        डाॅ. शरयू शहा.
*************************************
सिमेवर भाऊ माझा 
लढतो रात्रंदिन 
ओवाळीते येथून तुजला 
करून नयनांचे निरांजन 
*अरविंद कुलकर्णी
*************************************
आली आली भाऊबीज,
ताईची आज आठवण आली..
ओवाळुनी घेता पंचारती,
वास्त्यल्याची साठवण झाली...
- निलेश आळंदे
*************************************
बंध स्नेहाचे,बंध प्रेमाचे
ॠणानुबंध हे जन्मोजन्मीचे
औक्षण करते भाऊराया
अायुष्य लाभो तव बहिणीचे
- मारुती तु.खुडे
माहूर, नांदेड 
*************************************
सैनिकांना विरह बहिणीच्या मायेचा
दूरदेशी सीमेवर रक्षण करी भारतमातेचा 
काही नको भाऊ राया मजला 
शौचालयाची ओवळणी मागते तुजला 
     -  आप्पासाहेब सुरवसे सर 
        लाखनगांवकर
*************************************
नको सोन नानं मजला 
नको साडी जरतारी 
ओवाळीते दादा तुजला 
टाक मानाची सुपारी 
* अरविंद कुलकर्णी
************************************* 
सणात सण मोठा दिवाळीचा 
भाऊबीजेला मान असे बहिणीचा
ओवाळीते मान पान सुपारी करदोड्याचा
ओवळणी घाला हट्ट धरीते हक्काचा
      आप्पासाहेब सुरवसे सर 
       लाखनगांवकर
*************************************
नटुनी सजुनी तयार झाले,
बंधुराज माझ्या सदनी आले
प्रेमभराने तयास न्याहळले
भाऊबीजेचे मोल आज कळले.
          
अरे, असा कसा रे भाऊराया,
झाला कसा तयार रे ? पाठ फिरवाया
आई,बाबा,ताई नाती विसराया
ओवाळू कुणा मी 
भाऊबिजेसाठी असूनी भाऊराया?
  - सुलभा कुलकणीॅ बोरीवली मुंबई.
        9930509026.
*************************************
जीवापाड जपती जे देशाला
रात्रंदिन जागून.. घेती झीज
आगळी करून ती भाऊबीज
त्या कष्टाचे... करू या चीज
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************

बहिण भावाच्या नात्यात
असते म्हणे ओढ रक्ताची
तरी मने  गुंततात इस्टेटित
गाठ तुटते जन्म  नात्याची
अंजना कर्निक 
*************************************
भाऊ बहीण नात्याची गोडी
अवघड नात्यांमध्येही यावी 
इकडची विहीण .. ते व्याही
सासर माहेर भाऊबीज व्हावी
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************
दोन व्यक्तींमधे असावे नाते
माणूसकीचे।
वागणे असावे  प्रेमळ ,साधे
सन्मानाचे।
भाऊबिजेच्या ओवाळणीचे
हे क्षण आनंदाचे।
आश्वासक आधाराची द्यावी
  नारीस अभिवचने।
अंजना कर्णिक
*************************************
बहिण भाऊ गोडी निराळी 
भाऊबीजेच्या सणाला..!
नकोच दादा दुसरे दान मज,
आतुरले मन भेटायला..!!
✏ - - - - - - - जी.पी
************************************

नकोत मजला शालू दागिने
आस ओढ ती नाही कशाची 
भाऊबीजेला हवी ओवाळणी
खट्याळ प्रेमळ सहवासाची
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************

प्राणाची बाजी लावून जो लढला
सीमेवरती लढूनी अमर तो
जाहला

विधवेस तयाच्या बहीण हो
तुम्ही माना
अन काळोख्या जीवनी हो
अंजना कर्निक 
*************************************

साजरी करता अापुली भाऊबीज।
येई तयांचाही आठव मन्मना।।
दॆवे जे पारखे या सुखा।
अायुरारोग्य शांती लाभो तयांना॥
जयंत देशपांडे, अहमदनगर
*************************************

गोडी नात्याची अवीट ही
भाऊ बहिण भाऊबीजेची..!
आठवणीत रमते माहेरच्या ,
निरांजने भरून डोळ्यांची..!!
✏ - - - - - - - जी.पी 
*************************************

नकळत उघडे भाऊबीजेला कुपी पूर्वस्मृतींची।
बालपणीचा सुगंध करी पुलकित हर क्षणी।।
आयुरारोग्य समाधान स्थॆर्य अन् शांतीची।
करिता भाऊराया ऒक्षण, हीच आळवणी ईश्वरचरणी।।
जयंत देशपांडे 
*************************************

भाऊबीज सण साजरा 
आनंदाचा पुर आला..!
बहिण जाई कामाला 
भाची ओवाळी मामाला..!!
✏ - - - - - - जी.पी 
*************************************

चित्र पाहूनी आठवणीना जाग आली.
भाऊराया ओवाळीले तुला मी भाऊबिजेला.
ओवाळणीचा रूपया जपून मी ठेविला.
आज परत तोच स्वप्नात खणखणू लागला.
सुलभा कुलकणीॅ.
*************************************

बहिणीची ती वेडी माया
बंधुसाठी झिजवती काया
नाक डोळे मोडती भाऊजया
औक्ष मिळो देवा माझ्या भाऊराया
प्रार्थना करीती भावासाठी आयाबाया  
      आप्पासाहेब सुरवसे सर
      लाखनगांवकर
*************************************
बहीण भावाचे नाते अतूट..
जणू आपुलकीचे बंधन...
येता सण भाऊबीजेचा..
आठवांचे जुळते स्पंदन...
   - सौ.कस्तुरी
*************************************
आनंदवनातील "भाऊबीज" असे निराळी 
मना मनातील काढून टाकते काजळी
मंदा नि प्रकाश आमटे घडविती हेमलकसा
कुष्ठरोग हटविण्याचा दांपत्यांनी घेतला वसा
       आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
*************************************
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा
सण मायेच्या ओलाव्याचा
भाऊबीज म्हणती 
सारे या सणाला
मेघा शिंदे 
*************************************
हाती घेऊन आरतीचे तबक
वाट मी पाहते भाऊराया
काढीली  रांगोळी मी सुबक
जाण  या बहिणीची माया!
अंजना कर्णिक
*************************************
होत नाही बरोबरी कधी,
बहिण-भाऊ या नात्याची..
सांभाळुनी भार संसाराचा,
करी बहिण चींता भावाची...
       @ उत्कर्ष देवणीकर...
*************************************
संसाराची सुबक आखणी
करण्याचे परी कसब आगळे।
नात्यांची जपणूक करताना
स्वतःस न देई महत्त्व वेगळे।।
जयंत देशपांडे 
*************************************
भाऊबीज घेवून आली बघ तुझी आठवण,
डोळ्यांत होवू लागली अश्रूंची साठवण,
भाऊराया, महालातला तू असे रे राजा ,
आज तरी बहिणीची तुज होईल का आठवण ....
निर्मला सोनी.
*************************************
पंचमी, भाऊबीज असो की सण हे राखी
बहिण ही असावी मानलेली किंवा सखी
तिला घेऊन जाण्यासाठी भाऊ करीतो नम्र विनंत्या
आई ,बहिण ,बायको पाहिजे तर थांबवा स्त्रीभ्रूण हत्या
आप्पासाहेब सुरवसे, लाखनगांवकर
*************************************
1) कोंबडा की,कोंबडी करवंद चाखताना
कब्बडी लंगडी डाव मांडताना
दादा त्यात नसूनसुध्दा असायचा
खुद्कन् हसायचा भाऊबीज देताना

2)  सारवलेले असे अंगण
     खळ्यावर पडे भाताची रास
     असे मंद टिपूर चांदण
     पाटावर सजे भाऊबीज खास

3)  दूर ,दूर गेले ते सारे
      घर जाहले सुने,सुने
      आठवांचे सतत वारे
      ना भाऊबीज मन दिवाणे

4)   भाऊ मोठा,मोठा होई
       ती सासरी, नांदत होती
       कधी कधी समाचार येई
      ती भाऊबीज जपत होती
          - कुंदा पित्रे
*************************************
बहीण गेली सासरी 
भाऊ दूर देशी 
भाऊबीजच्या सणाला 
होई गाठीभेटी 
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
साता समुद्रापार गेला भाऊ
बहीण  राहिली  मायदेशी 
मना बिजेस कशी समजावू 
तुझ्या भेटीची  रे असोशी।
अंजना कर्निक 
*************************************
कृष्णसखा आधार  तिचा
पुरविली वस्त्रे ऐन गरजेला
काय हवं आजच्या द्रौपदीला
भाऊबीज की, हात हवा रक्षणाला
    - कुंदा पित्रे
*************************************
बहीण भावाच नातं 
एका काळजाच।
ठेच एकास लागता दुसर्‍याने रडायच।
बहीण सासरी जाता
भाऊ मनी ऊदास।
भाऊबिजेचा सण येता
हसू फुटत खुशीचं।
     - अंजना कर्णिक
*************************************
भाऊ आलाच नाही 
वाट पाहून शिणले डोळे
तुमच्यासारखे भाऊ मिळाले
मायेने दाटले डोळे
डॉ शिल्पा जोशी
**********************************
नाती कळत नसतात रक्ताची
असतात प्रेमाची विश्वासाची 
तुमच्यासारख्या भावनिक नात्याची
भाऊबीज खास सजवायची
डॉ शिल्पा ताई जोशी
मुंबई
**************************************
द्रोपदी म्हणाली कृष्णाला 
ये दादा भाऊबीजेला
तुझ्यासारखाच भाऊ मिळो 
प्रत्येक बहिणीला 
डॉ शिल्पा ताई जोशी 
मुंबई
****************************************





 


3 comments:

  1. असावी बहिण एक मायेचा झरा देणारी
    बहिण नाही मला गळा कोरडा पडला
    देवा प्रत्येक भाऊबीजेला
    एक बहिण मला सुद्धा हवी होती
    काजव्या सम जीवनात प्रकाश देणारी

    ReplyDelete
  2. असावी बहिण एक मायेचा झरा देणारी
    बहिण नाही मला गळा कोरडा पडला
    देवा प्रत्येक भाऊबीजेला
    एक बहिण मला सुद्धा हवी होती
    काजव्या सम जीवनात प्रकाश देणारी

    ReplyDelete
  3. छान अप्रतिम

    ReplyDelete

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...