Thursday, 8 June 2023

पंढरीची वारी ( Pandhari Wari )

          पंढरीची वारी

तुकोबांची गाथा । ज्ञानोबाचे ज्ञान । 
नामाचे भजन । मुखी असे ।।

समर्थांचे श्लोक । नाथाचे भारुडे ।
चोखा मेळा घडे । संगतीत ।।

पहाटे काकडा । सायं हरीपाठ । सज्जनाची गाठ । कीर्तनात ।।

सावळा विठ्ठल । उभा तो पंढरी ।
चंद्रभागे तिरी । वाट पाही ।।

हरीचा तो भक्त । भजनात दंग ।
गातसे अभंग । रातदिन ।।

पायी दिंडी चाले । आषाढी कार्तिकी । 
हरी नाम मुखी । घरोघरी ।।

मन हे चंचल । नसे जरा स्थिर ।
वाहे सैरभैर । चहूकडे ।।

श्रावण मासात । पावसाचा जोर । 
जिवा लागे घोर । हर एक ।।

नको ती काळजी । करू नको चिंता ।
विठ्ठलच आता । मदतीला ।।

- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769

No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...