[1/4, 10:15 AM] +91 77750 26914: माहिती पर लेख स्पर्धेसाठी नाही
*वृत्तपत्राचे जनक : बाळशास्त्री जांभेकर*
घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे वर्तमानपत्र अर्थात पेपर. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. तळागाळात, खेडापाड्यात अगदी दुर्गम गावात देखील आज हे वर्तमानपत्र पाहायला मिळते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुद्धा आपण नक्कीच उत्सुक असाल. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालयाचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली. दर्पण म्हणजे आपले प्रतिबिंब हुबेहूब दाखविणारे एक साधन त्यास आपण आरसा असे म्हणतो. म्हणून दर्पण हे त्या काळातील समाजासाठी आरश्यासारखेच काम केले. ज्या काळात छपाई यंत्रणा, मुद्रण व्यवस्था विकसित झालेली नव्हती, त्या काळात त्यांनी वर्तमानपत्र प्रकाशन करण्याचे धाडस दाखविले. म्हणूनच त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. अगदी सुरुवातीच्या काळात दर्पण हे भारतीय लोकांसाठी एका बाजूला मराठी व ब्रिटिशासाठी दुसऱ्या बाजूला इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत प्रकाशन करण्यात येत होती व त्या वर्तमानपत्राची किमत एक रुपया ठेवण्यात आले होते. जवळपास साडे आठ वर्षे चालेल्या या वर्तमानपत्रातून आचार्य जांभेकर यांनी इंग्रजानी केलेल्या लोकांवरील छळ, गुलामगिरी याविरुद्ध लोकांना जागे केले. अशिक्षित लोकांमध्ये जागृती निर्माण केली. विधवा पुनर्विवाहासाठी उत्तेजन दिले, त्याबाबत जनप्रबोधन ही केले. आज आपण प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. त्या प्रसिद्धी माध्यमात मुद्रित वर्तमानपत्राचे स्थान अग्रगण्य असे आहे . दृक किंवा श्राव्य प्रसिद्धी माध्यमापेक्षा मुद्रित माध्यमाकडे लोकांचा कल सर्वात जास्त असतो आणि हे अगदी स्वस्तात सहज उपलब्ध होणारे असते.
आज वर्तमानपत्राची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक प्रकारचे विविध भाषेतील वर्तमानपत्र आज आपणास वाचायला व बघायला मिळतात. वर्तमानपत्र चालविणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. एखाद्या वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक चलविणाऱ्या मालक आणि संपादक यांचेशी संपर्क करून त्यांच्या सोबत याविषयी गप्पा करुन पहावे मग नक्कीच कळून चुकेल की रोजचा पेपर कसा बाहेर पडतो ? वर्तमानपत्राचा जमाखर्चाचा ताळेबंद न जुळल्यामुळे दरवर्षी अनेक वर्तमानपत्र काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. तर वाढत्या महागाईच्या काळात सुद्धा काही वर्तमानपत्र आजही तग धरून आहेत. जोपर्यंत वर्तमानपत्र आस्तित्वात आहेत तोपर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव कुणीही विसरणार नाहीत.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मराठी , संस्कृत, इंग्रजी व हिंदी या भाषेवर विशेष प्रभुत्व होतेच शिवाय गुजराती, बंगाली, फ्रेंच, ग्रीक, लैटीन इत्यादी भाषा सुद्धा अवगत होत्या म्हणून ते उत्तम भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी लिहिलेली नीतीकथा हे पुस्तक खूप प्रसिद्ध झाले. हिंदी विषयाचे ते पहिले प्राध्यापक होते म्हणूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली. सन १८४५ मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे सर्वप्रथम प्रकाशन केले. वर्तमानपत्र क्षेत्रातील मंडळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण सदोदित मनात राहावे यासाठी त्यांचा जन्मदिवस दर्पण दिन तसेच पत्रकार दिन म्हणून साजरा करतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे अल्पायुषी होते. कारण वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजे १८ मे १८३६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम तसेच या क्षेत्रातील संपादक व पत्रकार, बातमीदार सर्वाना दर्पण दिन व पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769
[1/4, 6:51 PM] 59 Sangita deshamukh Vasmat: *सामाजिक परिवर्तनात वर्तमानपत्राची भूमिका*
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वृत्तपत्र हे समाजप्रबोधनाचे साधन समजल्या जाते.वृत्तपत्रामध्ये पहिला मान जातो तो "दर्पण" या वृत्तपत्राकडे! दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व! पारतंत्र्याने ग्रासलेला देश,देशातील अनिष्ट रूढी,चालीरीती,अज्ञान,दारिद्र्य,भाकड समजुती,अंधश्रद्धा यामुळे समाज व्याधिग्रस्त झालेला पाहून बाळशास्त्री जांभेकर अतिशय व्यथित झाले. त्यांना वाटायचे नुसते शिक्षण घेऊन फायदा नाही. त्याचा समाजाला काय उपयोग?म्हणून अशाच व्यथित अवस्थेत असतांनाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले. समाजाला प्रबोधन करायचेया उद्देशाने त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र "दर्पण" हे त्यांच्याच वाढदिवशी म्हणजे ६जानेवारी १८३२साली काढले.त्यात त्यांना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.हे एकच वर्तमानपत्र मराठी आणि इंग्रजी या जोडभाषेत चालत असे. त्यातील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून मराठी भाषा तर ब्रिटीश शासनापर्यंत आपला आवाज पोहोचावा म्हणून इंग्रजी भाषेतून एक स्तंभ चालत असे. त्याचा हवा तसा परिणाम जांभेकरांना दिसूनही आला होता. त्यानंतर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांनीही ब्रिटीश सत्तेविरूद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्र याच माध्यमाचा आधार घेतला. लोकजागृती राष्ट्रोध्दारासाठी या द्वयीनी स्वत:ला वाहून घेतले होते. यासाठी या द्वयीनी मराठी भाषेतून "केसरी" व इंग्रजी भाषेतून "मराठा" असे दोन वृत्तपत्र काढले. देशातील जनतेच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे माध्यम वापरण्यात आले. ब्रिटिशांविरुध्द या वृत्तपत्रातून आवाज उठविल्याने लोकमान्य टिळकांना वारंवार तुरुंगवासही भोगावा लागला. केसरीने केवळ वृत्त व लोकशिक्षण हे उद्दिष्ट न ठेवता जनतेला राष्ट्रअभ्युदयासाठी कार्यप्रवण करणे,हे महत्वाचे कार्य पार पाडले.प्रबोधनकार ठाकरे यांनीही "प्रबोधन" या वर्तमानपत्रातून आधुनिक विचारांचा प्रसार करून समाजजागृती करण्याचे महत्कार्य पार पाडले. समाजात जातिभेद मोठ्या प्रमाणात बोकाळलेला होता. फार मोठ्या प्रमाणातील दलित समाज हा अन्याय व अज्ञानाने भरडून निघत होता. दलितांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग घेतला. अन्याय निमूटपणे सहन करणाऱ्या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी ३१ जानेवारी १९२० मध्ये "मूकनायक" हे वृत्तपत्र सुरू केले. त्याबरोबरच " "बहिष्कृत भारत", " जनता","प्रबुध्द भारत" अशी चार वृत्तपत्रे दलितांच्या उध्दारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविली. वसंत मून असे म्हणतात,"बहिष्कृत भारत या वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे वृत्तपत्र म्हणजे धार्मिक किल्ल्यांच्या जातीभेदरुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे." यावरूनच आपणास वृत्तपत्राचा आणि समाजाचा अनन्यसाधारण संबंध लक्षात येतो.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वृत्तपत्रांनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांमध्ये देशभक्ती चेतविण्याचे,तसेच समाजप्रबोधनाच्या कार्यात फार मोलाचे योगदान दिलेले आहे. आज देशाच्या व समाजाच्या गरजा बदलल्या आहेत. आज देश पारतंत्र्यात नसला तरी देशविघातक अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. अशा समस्यांतून समाजाला बाहेर काढण्यासाठी आजही वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे.परंतु आजची वृत्तपत्रे आपली भूमिका विसरल्यासारखे वाटतात. कारण आजकालची अनेक वृत्तपत्रे ही जाहिरातीवर जास्त भर देताना दिसून येतात. ज्या राजकीय लोकांच्या,पक्षाच्या जाहिराती जास्त त्यांची तरफदारी करतांना दिसतात. नि:पक्षपातीपणा,स्पष्टवक्तेपणा,परखडपणा त्याचबरोबर निर्भीडपणा ही पत्रकारितेची मुख्य अंग आहेत. परंतु आजकालची अनेक वृत्तपत्रे विशिष्ट पक्षाचे अथवा राजकीय व्यक्तींचे मखलाशी करतांना दिसतात. परंतु काही वृत्तपत्रे याला अपवाद आहेत. ते आजही नि:पक्षपातीपणे चांगल्याचा स्वीकार व वाईटावर प्रहार करतात.आजही देश कडवी धार्मिकता,अंधश्रद्धा,भ्रष्टाचार यात अडकलेला दिसून येतो. आपल्या वृत्तपत्रातून अन्याय,भ्रष्टाचार यावर प्रभावीपणे प्रहार करतांना दिसत नाहीत. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणारी वर्तमानपत्र आज पाहिजे तेवढे दाखवताना दिसून येत नाही. वृत्तपत्रातील व्यंगचित्राचे स्थान सामाजिक,राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. कोणत्याही देशाची,समाजाची वैचारिक,बौध्दिक व सांस्कृतिक पातळी शोधायची असल्यास तेथील व्यंगचित्र पहावीत. व्यंगचित्र हे जनतेच्या मनातील मूक भाष्यच असते,असे जयदेव डोळे म्हणतात. या व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यंगचित्रकार सामाजिक,राजकीय व्यंग दाखवून, आपले इप्सित साध्य करून घेऊ शकतो. कारण व्यंगचित्रकार हा समाजमनाचा भाष्यकारच असतो. परंतु वृत्तपत्रातील या व्यंगचित्रांचे स्थानही आज नगण्यच आहे.वृत्तपत्रे ही समाजाचा भाष्यकार,अन्यायाविरुद्धचा आवाज,न्यायाचा कैवारी तर सृजनाचा अविष्कार असतात.लोकशाही बळकट करण्यामागे वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची आहे. वृत्तपत्रानी समाजातील नकारात्मक बाबींना महत्व देऊ नये. हिंसाचार,रक्तपात या बाबी वारंवार दाखविल्या तर लोकांच्या भावना बोथट होऊ शकतात. समाजात संशोधनात्मक,सकारात्मक,सृजनशील बातम्यांना प्रसिद्धी द्यायला हवी. अन्यायाविरुद्ध लेखणी प्रहार करण्यास सज्ज असायला हवी. बाळकृष्ण जांभेकर,लोकमान्य टिळक,गोपाळ गणेश आगरकर,प्रबोधनकार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन समस्यांनी जसे अस्वस्थ बनवले तशी अस्वस्थता आजकालच्या पत्रकारांना,संपादकांना लागली तर आजची वृत्तपत्रे हे समाजाचा खरा आधार बनू शकतात.
मराठीतील पहिले दर्पण हे वृत्तपत्र सुरू करणारे बाळकृष्ण जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस तसेच दर्पण या वृत्तपत्राचाही हा जन्मदिवस "दर्पण दिन" म्हणून साजरा केल्या जातो. आज आपली लेखणी अन्यायाविरुद्ध चालवणाऱ्या,सृजनशीलतेची कास धरणाऱ्या धडाडीच्या पत्रकार बांधवास दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संगीता देशमुख @१४
[1/4, 7:22 PM] 2 Manjush Deshamukh: *स्पर्धेसाठी*
*====================*
*समाज परिवर्तनात वृत्तपत्राची भूमिका*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
दिनांक ६ जानेवारी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर याचा जन्मदिवस प्रसिद्धी माध्यम क्षेत्रात *दर्पण दिन* म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त्याने प्रसिद्धी माध्यम वृत्तपत्रा विषयी थोडे पण आवश्यक....
एकोणविसाव्या शतकात भारतात मुद्रण व्यवसाय प्रामुख्याने वेग धरु लागला. आज जरी मल्टीमिडियाचे युग असले तरीही , म्हणतात ना लेखणी पेक्षा प्रभावी शस्त्र नाहि. आजहि सकाळी उठताच गरमा -गरम चहा सोबत आपली नजर शोधते, ते म्हणजे वृत्तपत्र,अगदि भल्यामोठया उद्दोगपती, राजकारणी पासून तर सर्व सामान्य मनुष्यासाठी सहज उपलब्ध व आवश्यक असलेली बाब म्हणजेच वृत्तपत्र. समाज जागृतीचे अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे वृत्तपत्र होय.
समाज व्यवस्था ही सतत परिवर्तनशील असते ती राजकीय, आर्थिक,साहित्य,कला-क्रिडा असो किंवा कृषि या पैकी कोणतेही क्षेत्र असो त्याचा थेट संबंध समाज जिवनाशी असतो आणि एकाच वेळी दररोज आपल्याला गाव,जिल्हा,राज्य,राष्ट्रिय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच माहिती आपल्या पर्यन्त पोहचविण्याचे काम वृत्तपत्र करीत असतो.
वृत्तपत्र म्हणजे समाजाचा आरसा असावा त्यात समाजात घडणारी वृत्ते छापली जातात.अगदि सर्वसामान्यांच्या मागण्या,न्याय,अन्याय,बदल यांना वाचा फोडण्याचे कार्य वृत्तपत्र करीत असतात. वृत्तपत्रा मध्ये अनेक स्तंभ असतात जसे की राजकीय, सामाजिक, आर्थिक, खेळ, कला-क्रिडा, संस्कृती-साहित्य व कृषी.
वृत्तपत्राने नेहमी सधन-निर्धन,अबल-सबल,जाती-पाती किंवा कोणतेही भेद न करता समाजा समोर सत्य बाजू मांडली पाहिजे कारण ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, प्रचार व प्रसाराचे माध्यम आहे.वृत्तपत्रांमध्ये जनसंपर्क ,मुलाखत किंवा प्रत्यक्ष स्थळ भेट यातून अगदि जशीच्या तशी किंवा कधी-कधी अपूरी माहिती किंवा अपारदर्शकता किंवा आमिषांना बळी पडून बनावटी बातम्या अशा अनेक प्रकारच्या वार्ता वाचायला मिळतात.
एखादया घटनेवर समाजातील मान्यवर मंडळी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया मांडतात ,व्यक्त करतात आणि त्यातूनच बनते एक विचार प्रवाह . जी वृत्तपत्रे अधिक जागरूक,अधिक प्रामाणिक, अधिक व्यापक स्वरूप , निरपेक्ष पण प्रभाविपणे कार्य करतात त्या वृत्तपत्रांमध्ये सृदृढ़ आणि विचारक्षम समाज निर्मिती ची क्षमता व योगदान निश्चितच असते.
आज युग धकाधकीचे झाले किंवा पूर्वी तसे नव्हतेही तरीही कुणीही दररोज एकमेकांना भेटून एखादया घटने बद्दल मत जाणून घेवू शकत नाहि किंवा आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा प्रत्येका पर्यन्त पोहचवू शकत नाही नेमकं हेच कार्य वृत्तपत्रे करीत असतात. चालु घडामोडी व बदलती समाज व्यवस्था यात सहसंबंध साधण्याचे कार्य व त्यातूनच एक समाज क्रांति घडून एका सृदृढ़ व बळकट समाजाची निर्मिती ती वृत्तपत्रे करतात जी निरपेक्ष व पारदर्शक पणे आपले कर्तव्य पार पडतात.
म्हणूनच पूर्वी ची दर्पण, प्रभाकर,हिन्दू पेट्रिअर,अमृत बझार पत्रिका,केसरी,मराठा ही स्वातंत्रपूर्व वृत्तपत्रे असोत की आजची वृत्तपत्रे असोत त्यांचा आपला समाज घडविण्यात खूप मोठा वाटा आहे . योग्य दिशादर्शन करणाऱ्या त्या तमाम पत्रकार बंधूंचा हा समाज नेहमीच ऋणी राहील .
*====================*
*मंजुषा देशमुख@३६*
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
[1/4, 7:41 PM] Manisha Wani: ।।लेख-स्पर्धेसाठी।।
।।समाज परीवर्तनात वृत्तपत्रांची भुमिका।।
जनसामान्यां पर्यंत पोहोचण्याचं उत्तम साधन म्हणजे वृत्तपत्र.हे समीकरण कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय.वृत्तपत्र नसते तर मला वाटतं आजही आपला देश पारतंत्र्यातच राहिला असता.काय चांगलं व काय वाईट हे जनते समोर मांडून जनतेलाच निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे महत्वपूर्ण काम वृत्तपत्रच करत आहेत.
आपणा सर्वांना माहितच आहे,लोकमान्य टिळकांनी ४जानेवारी १८८१ मधे पुण्याहून केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले.ह्या वर्तमानपत्राचा मुळ उद्देश जनमानसांत सामाजिक परीवर्तन घडवून आणणे,स्वातंत्र्य मिळविण्या साठी जनतेला उद्युक्त करणे,जुन्या चालीरीती व अंधश्रद्धां पासून जनतेला वाचविणे ह्या प्रकारची समाज जागृतीची कामं केसरी सारखी वृत्तपत्रे करत होती.ज्ञानप्रकाश व नवा काळ ही दोन्ही वृत्तपत्रे केसरी प्रमाणेच कार्यरत होती.
त्या काळी रेडियो पाहिजे तितका लोकप्रिय नव्हता.व सामान्य जनतेला परवडण्या सारखाही नव्हता.त्यामुळे जनतेला वर्तमानपत्र हाच काय तो आधार होता.दळणवळणाची साधने कमी असल्याने व वर्तमानपत्रांच्या प्रतिही मर्यादीतच छापत असल्याने वर्तमानपत्र वाचायला खुपच झुंबड उडत होती.तर अशा प्रकारे वृत्तपत्रे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक व जनते मधला एक दुवाच होता.गांधींनी तर त्यांच्या सत्याग्रहाची प्रसिद्धी ही केवळ वर्तमानपत्रांच्या आधारेच केली व जनतेचा पाठिंबा मिळवला.
आजही आपण पहातो,कित्येक घरी सकाळी सहाच्या आत वर्तमानपत्र नाही आले तर त्या घरातील मंडळी घर डोक्यावर घेतात.पाच मिनीटे जरी इकडे तिकडे झाले तरी त्या बिचाऱ्या पेपर वाटणाऱ्याची खैर नसते.कित्येक लोकं तर प्रात:विधीला जाण्या साठी वृत्तपत्राची वाट पहात असतात.त्याला कारण ही तसेच असते,जो पर्यंत महत्वाच्या बातम्या व संपादकीय लेख वाचत नाही तो पर्यंत कित्येकांना चहा सुद्धा घश्याखाली जात नाही.
एकंदरीत काय तर वृत्तपत्रांनी आजवर खुप महत्वाची भुमिका बजावलीय.महिलांना समानतेची वागणूक मिळवून देण्यातही वृत्तपत्रांचा मोठा सहभाग आहे.निवृत्त झालेले कित्येक आजी आजोबा तर वृत्तपत्रांच्या आधारेच दिवस पसार करतात.अशी माणसं वर्तमानपत्रांतील खडा न् खडा बातमी,कथा,कविता व लेख वाचत असतात व भावलेले लेख,कविता व कथांची कात्रणे जपून ठेवतात.अशा प्रकारचे छंद जोपासणारी पुष्कळ माणसे आजही आहेत व वृत्तपत्रे ही त्यांच्या साठी संजिवनीचं काम करतात.
मला वाटतं आजकालच्या पिढीला वृत्तपत्र वाचायची अजिबात आवड नाही,त्याला कारण ही तसेच आहे.एकतर आजकालच्या मुलांना राजकारणात व रोजच्या घडामोडींमधे बिलकूल रस राहिला नाही.तसेच व्हिडियो गेम्स व दुरदर्शन वरील घाणेरड्या सिरीयल्स मुळे ही मुले एका विचीत्र वातावरणात वाढत आहेत.समाजात काय चाललय ह्याची त्यांना फिकीरच नाही.आपण समाजाचे घटक आहोत व सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे ही भावनाच त्यांच्या मधे दिसून येत नाही.त्यामुळे आजकालची पिढी वृत्तपत्रां पासून खूपच दूर जात आहे.
मला वाटतं ह्या पिढीला निष्क्रीय बनविण्यात आपल्या समाजाचाही मोठा वाटा आहे.घरात मोठ्या व्यक्तीच रहात नसल्याने ह्या मुलांना तरी ह्या गोष्टींचे ज्ञान कसे होणार?वृद्धाश्रमांचा प्रसार व विभक्त कुटूंब पद्धतीमुळे मुलांना देखील चांगले वाईट काय हे समजत नाही व त्यांच्या नादान बुद्धीला जे योग्य वाटतं तेच ते घेतात व आपला वेळ सत्कारणी लावतात.वाचनालयाची आवड आज फार कमी मुलांना राहिली आहे.मुख्य म्हणजे वाचनाचीच आवड ह्यांना राहिली नाही.
तरीही मला असे वाटते,आजही कित्येक घरात सामुहिक रीत्या वृत्तपत्राचं वाचन केलं जातं व ज्ञानाचा प्रचार व प्रसार हा वृत्तपत्रा द्वारे आजही अविरत चालूच आहे.
ई-वृत्तपत्र हा एक नवीनच निघालेला प्रकार आहे व आजकालची तरूण पिढी ह्याचा पुरेपूर फायदा घेत आहे.वृत्तपत्रांनी देखील तरूण पिढीला विचारात घेवून व त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून अनेक बदल कालानुरूप स्विकारले आहेत व त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.विविध खेळांच्या बातम्या,सिनेमाची माहिती व नट नट्यां विषयी गॉसिप्स ह्यांचा समावेश केल्या मुळे वर्तमानपत्रांची चलती वाढली आहे व जुन्या व नवीन पिढींच्या आवडी निवडीचा ताळमेळ बसविण्यात वृत्तपत्रे यशस्वी झाली आहेत.
###########समाप्त############
सौ.मनिषा वाणी.
सुरत. ०४/०१/२०१७.
०९४२६८१०१०९.
[1/4, 8:22 PM] 9 Subhadra Sanap: *📚स्पर्धेसाठी*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*समाज परिवर्तनात वृत्तपत्राची भूमिका*
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
आज आचार्य बाळशास्री जांभेकर यांचा जन्मदिवस *दर्पण दिन*म्हणुन साजरा केला जातो.पत्रकारीतेमध्ये कार्य केल्यामुळेच त्यांचा जन्मदिन आज साजरा केला जातो.
सकाळी उठल्याबरोबर डोळे चोळतच पेपर पहायची सवय खुप जनांना असते.आपणांस एखादी घटना माहित असली तरी ती पेपरमध्ये पाहिल्यास त्याची सत्यता पटते. पत्रकार म्हणजे सुगंधी वारा.आपल्या आजुबाजुला व इतरत्र घडनार्या चांगल्या वाईट घटना शोधने व त्या लोकांपर्यत पर्यंत पोहचविणे. हे महत्वाचे काम पत्रकार करत असतात. देशातील कानाकोपर्यात घडनार्या घटना सर्वसामान्यापर्यंत पोहचतात.
पत्रकाराच्या या कामामुळे शिक्षण,आरोग्य,शेती विषयी,वेगवेगळ्या प्रकारे माहिती देण्याचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून होते.म्हणुनच पत्रकार बांधवांनी सामाजिक ऐक्य जपण्याचा प्रयत्न करावा.कोणत्याही प्रकारच्या तेढ निर्मान होणार नाही याची काळजी पत्रकार बांधव घेत असतात.
याच कारणास्तव लोकमान्य टिळकांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरु केले. आजकाल इंटरनेटच्या युगात पेपर वाचनारांची संख्या कमी होतेय की काय असे वाटु लागतेय. पण पेपर वाचला पाहिजे.
सौ खेडकर सुभद्रा बीड
समुह क्र.२०
मो.न.९४०३५९३७६४
[1/4, 8:56 PM] जयश्री पाटील: समाज परीवर्तनात:
वृत्तपत्राची भुमिका
"लेखणी" ही दुधारी तलवार आहे, जिचा आवाज वृत्तपत्राच्या माध्यमातून अगदी जोरकस एेकायला मिळतो. 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकरांपासून अव्याहतपणे सुरू असलेली ही वृत्तपरंपरा आज भारतीय समाजाची अविभाज्य घटक बनलीय. समाजमनाचा आरसाचं म्हणा ना. स्वातंत्रपुर्व काळात लोकमान्य टिळक,आगरकर इ.नेतेमंडळी वृत्तपत्राद्वारेच प्रबोधन करीत असत. स्वातंत्र्यप्राप्तीत वृत्तपत्रांचा खारीचा वाटा होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या आधारस्तंभाचे खंदे शिलेदार ठरतात ते पत्रकार बंधू. त्यांच्याच खांद्यावर तर ही वृत्तपत्राची कमान डौलाने उभी असते.
पुर्वी ग्रामिण भागात ही सेवा पोहोचत नसे. पण आज चित्र पालटलयं. कानाकोपर्यापर्यंत आज दैनिक पोहोचत आहे. आज ग्रामिणलोक याद्वारे शहराशी व जगाशी जोडले गेलेत हे अभिमानास्पदच आहे.
जरी आज प्रसारमाध्यमे भरपूर असली तरीही वृत्तपत्राचे स्थान अबाधित आहे. सकाळी आजही प्रत्येक व्यक्ती उठल्याउठल्या चहाअगोदर पेपरची वाट बघतो. गांधीजी तर गमतीने म्हणत की ," लोक चहासोबत बिस्कीटे खातात व मी मात्र चहासोबत पेपरमधून शिव्या खातो".
भारतीय संस्कृतीत जितकं प्रातःकाली सडा,रांगोळी,कोंबड्याची बांग ,भुपाळी व वासुदेव प्रसिद्ध आहे तितकीच वृत्तपत्राचीही ख्याती आहे.
आज वृत्तपत्र घरातील सगळ्याच कुटूंबाने हातात घ्यावे असे त्याचे रूपडे बनलेले आहे. अबालवृद्ध त्याच्या प्रेमात आहेत. कारण कीडसकॉर्नर,सखी,कृषी,क्रिडा,शिक्षण, राजकारण,खेळ,चालू घडामोडी यासारखे असंख्य सदरे त्यात झळकतात. विशेष म्हणजे "संपादकीय", हे मानाचे पान बनले आहे. अतिशय वाचनिय व अभ्यासपुर्वक असे हे पान असते. गृहिणींसाठी बाजारभाव व पुरूषांचे शेअरमार्केट अगदी आवडीचे सदर असतात.
कित्येक दुर्लक्षित सरकारी, निमसरकारी व सहकारीकामे केवळ वृत्तपत्राने दखल घेतल्याने चुटकीसरशी निकालात निघतात. कित्येक गरजूंना वृत्तपत्राने समस्येची दखल घेतल्याने आर्थिक,शैक्षणिक मदत देखील होते. बातमी मुळे कित्येक दाते योग्यवेळी मदत पोहोचवून लोकांचे प्राणदेखील वाचवितात. दुरावलेले परीजन एकत्र येतात. या माध्यमाद्वारे कितीतरी गरजू लोक नोकरी मिळवून जिवनात यशस्वी होतात. जाहीरात व वधू-वर विषयक सदर या दोन्ही जिव्हाळ्याच्या बाबी.
आज खास पत्रकारीतेचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. दुर्लक्षित असलेले हे क्षेत्र आज आवडीनं स्विकारलं जातयं व नवनविन आव्हानं स्विकारतयं. मुलांच्या बरोबरीने मुलीही इथे दिसतात हेही नसे थोडके. पत्रकारबंधूंचे कौतूक करावे तेवढे थोडेच. अगदी जीवाचे रान करून व प्रसंगी जिवावर उदार होवून ते बातमीचा पाठपुरावा करतात. वेळकाळेचे बंधन न पाळता स्वतःला कामात झोकून देतात. काही काही बातम्या कव्हर करतांना त्यांना अनेकांचा रोष पत्करावा लागतो.
सामाजिक चळवळ क्रांतीकारी ठरते ती केवळ वृत्तपत्रांमुळेच. अनेक भाषांमधे,अनेक भागात ज्वलंत विषय मांडले जातात ज्यायोगे समाजात विचारमंथण सुरू होते. सर्वसामान्यांचा कौल व मतं हे याद्वारेच चाचपले जातात. अनेक अभ्यासू लोक निर्भीडपणे चिकीत्सक मतप्रदर्शन करून समाजाला मार्गदर्शन व प्रेरणा देत असतात.
एक बोलके व ह्रदयस्पर्शी उदाहरण जाताजाता आठवतेय. शाळेत जाण्यासाठी पास पुरते पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. पत्रकारबंधूंनी ती बातमी उचलून धरली व तेव्हापासून मुलींना पदवीपर्यंत बसप्रवास मोफत झाला.
वृत्तपत्र एक दखलपात्र सामाजिक अंग आहे व आचंद्रसुर्य राहील.
.
जयश्री पाटील
प्रा.शिक्षिका
वसमत, जि.हिंगोली
[1/4, 9:20 PM] Rushikesh Deshmukh: लोकशाहीचा चौथा स्तंभ काल आणि आज
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाकडे आपण पाहत असतो . निकोप व संवर्धनशील लोकशाहीच्या यशाचे गमक हे निश्चितच प्रसारमाध्यमांमुळे अबाधित असे राहिलेले आहे . आपल्या लोकशाहीप्रणित राष्ट्रात वृत्तपत्रांची भूमिका ही लोकशाही समृद्ध करण्यासाठी नेहमीच महत्वाची राहिलेली आहे . यात शंकाच नाही.
६ जानेवारीला आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . या दिवशी समाजातील विविध भागात पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या कार्याला गौरविण्यात येते . आचार्य बाळशास्त्री जाभेकरांनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी 'दर्पण'नावाचे पहिले वृत्तपत्र काढले आणि त्या दर्पण मधून समाजाचे प्रतिबिंब लोकांना दिसू लागले . समाजसुधारणा करायचे असेल तर सुधारणांचा प्रसार व प्रचार करावा लागेल हे आचार्य जाभेकरांनी ओळखले होते म्हणून त्यांनी पहिले वृत्तपत्र काढले व त्यातून समाजाच्या सुधारणांविषयी , सरकारच्या जुलुमाविषयी तसेच समाजात प्रचलित असणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरांविषयी गहन प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले .
भारतीय स्वातंत्र लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे . लोकमान्य टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' ही दोन वृत्तपत्रे सुरु केली व त्यातून सरकारच्या ध्येयधोरणांचा पर्दाफाश केला पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बहिष्कृत भारत' व 'मूकनायक' या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले . देशाच्या सांस्कृतिक जडण-घडणीत वृत्तपत्रांची ही खूप मोठी आहे .
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा आग्रहीपणे मांडला त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाले . हे कदापी कोणीच विसरू शकणार नाही .
देशाच्या सामाजिक ,आर्थिक व राजकीय जडण-घडणीत वृत्तपत्रांची फार मोलाची भूमिका असते .लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी , देशात धर्मनिरपेक्ष वातावरण टिकवून ठेवणे व धर्मनिरपेक्ष समाज घडवण्यासाठी व अन्याय अत्याचाराला कडाडून विरोध कार्यासाठी वृत्तपत्र नेहमीच महत्वाचे असतात .
आज महाराष्ट्रात सहा हजारच्या वर वृत्तपत्रे निघत असतात . यावरून वृत्तपत्राचे समाजातील स्थान किती महत्वाचे आहे ते अधोरेखित होते . आता इलेक्ट्रॉनिक माध्यम मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत पण तरीही वृत्तपत्रांचे स्थान त्यांना घेता आले आहे असे म्हणता येणार नाही .वृत्तपत्रांचे अग्रलेख , वैचारिक लेख व साहित्यविषयक लेख वाचणारा वर्ग मोठा आहे .या सगळ्यांची मेजवानी वृत्तपत्रातून वाचकांना मिळत असते .
सारीच वृत्तपत्रे आता ऑनलाईनही वाचायला मिळत आहेत . प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये बातम्यादेणारे अँप असतेच असते . वाचन संस्कृती कमी झाली अशी ओरड करणाऱ्यांना एवढेच म्हणावे वाटते की वाचनाची साधनं बदलली आहेत पण वाचन कमी झालेले नाही .
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जो सामाजिक , राजकीय व आर्थिक घडामोडीच्या विविध प्रश्नांना निर्भीडपणे आपल्या लेखणीतून मांडत असतो . समाज बदलण्याची ताकत त्यांच्यात असते . मात्र काही राजकीय पुढारी त्याला त्रास देतात तर कधी काही सामाजिक झुंडशाहीला त्याला सामोरे जावे लागते .आर्थिक स्थेर्य त्याला लाभेलच असंही नाही . तरीही समाजाच्या समृद्धतेसाठी , निकोप वाढीसाठी तो लढत असतो . लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जगणारा पत्रकारबंधु हा फार मोठ्या सामाजिक सुधारणा घडवून आणणारा संघर्षशील समाज सुधारक असतो . त्याच्या या कार्याला या पत्रकार दिन किंवा दर्पण दिनानिमित्त मानाचा मुजरा ...
- ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मु पो : शिळवणी ता : देगलूर जि : नांदेड
पिनकोड : ४३१७४१
संपर्क :९९२३०४५५५०
No comments:
Post a Comment