Wednesday, 6 April 2016





** पुष्प पहिले *** आरोग्य मथंन : डोळयाची निगा *


डोळा हा परमेश्वराने  दिलेला अनमोल अवयव आहे.  " दृष्टी आहे तर सृष्टी अाहे" या सारखे  वाक्ये आपण सतत ऎकतो.  असे असून आपण डोळयाची काळजी नीट घेत नाही. ती कशी घ्यावी हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
तर प्रथमत: डोळयाची काळजी कशी घ्यावी हेच समजून घेणे अावश्यक अाहे.  डोळयाचे विविध अाजार यात समाविष्ट करणे अशक्य असल्याने प्रत्येक आकारा बाबत एक दिवस ठेवण्यात येईल व सभासदांना आवश्यक वाटल्यास त्या त्या  क्षेत्रातील तज्ञाकडून माहिती सादर करण्यात येईल.
प्रथमतः
डोळयाची काळजी :---
हे याकरिता महत्त्वाचे आहे की अनेक लोकांना कॅामप्यूटर वर, मोबाइल वर, टीव्हीकडे  पहावे लागते.  अशाप्रकारची कार्य. करताना सतत screen कडे न बघता १५/२०मिनीटा नंतर नजर लांबवर इकडेतिकडे टाकावी. अाजुबाजुला हिरवे झाडे असतील तर एखादा मिनीट त्यावर नजर टाकावी. हिरवा तंग डोळयाना शितलता प्रदान करतो. झाडे नसतील तर पडदे अथवा टेबलक्लॉथ हिरवे वापरावेत.  
प्रामुख्याने डोळा लाल होणे याला  आपण डोळे  येणे (conjunctivitis) असे म्हणतो.  परंतु काही वेळेस प्रवास तोही बाईकवर केला तरी डोळे लाल होतात याला डोळे अाले असे म्हणता येणार नाही
  हा प्रकार डोळयाना जास्त वारे लागून ओलावा नष्ट झाल्यामुळे डोळा लाल होऊ शकतो असे होऊ नये यासाठी २०/२५ किलोमीटर प्रवास बाईकवर करणे गरजेचे  असल्यास चांगल्या दर्जाचे सनगॅागल्स वापरावेत.
* डोळयाची स्वच्छता : डोळयाची स्वच्छता रोज करणे आवश्यक अाहे.  स्नान करताना थंड पाण्याने डोळे धुवावेत. कोणतेही घरी उपलब्ध असलेले अोषध डोळयात टाकू नये.  कारण प्रत्येक औषध हे विशिष्ट कारणाकरता दिलेले असतात.  त्याकरता ते इतर कारणासाठी वापरु  नये.  प्रत्येक अोषध फोडताना घरातली सुई, टाचणी बाभळीच्या काटयाचा वापर करु नये. प्रत्येक अोषध फोडण्यासाठी त्याच्या झाकनातच व्यवस्था केलेली असते ते पूर्ण फिरवल्यास ते उघडता येते  न उघडल्यास एक रु ची इंजेक्शनची सुई मिळते  ती वापरावी. एकदा उघडलेले औषध ३० दिवसच वापरता येते त्यापुढे ते निकामी होते करीता ते फेकून द्यावे. डॅाक्टरच्या सल्ल्याने औषध सांगितलं तसेच वापरावे, मनाने अथवा केमिष्टच्या सल्ल्याने वापरू नये.  हायड्रॉक्वारटीझोन असलेले औषध वापरल्याने पारपटल(cornea) कडक होतो ते इष्ट नाही. शक्यतोवर eyedrops छोट्या छोट्या तक्रारी करता वापरू नयेत कारण प्रतिजैविकाची(antibiotics) सवय झाल्यास ते खरोखरची वेळ(emergency) आल्यावर काम करत नाहीत. (Resistancy) येऊन जाते.  डोळयावर जास्त ताण आल्यास पाणी येते ही नैसर्गिक गोष्ट अाहे हा आजार नाही यासाठी औषध उपचार करू नयेत. पण डोळे कोरडे  पडणे याला उपचार करावा लागतो. अोषधी वापरताना expiry date जरूर बघावी.
* चष्माचा नियमित वापर : ज्यांना चष्मा आहे त्यांनी तो नियमित वापरावा  आजकाल तरूण वयात, शाळेत जाणाऱ्या मुला/मुलीत चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाने सुध्दा शालेय नेत्रतपासणी कार्यक्रमावर बराच जोर दिला आहे. डोळयाचा नंबर वर्षातुन एकदा तपासणे आवश्यक आहे. वयाच्या ४० व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीला जवळचे वाचण्यासाठी चष्मा लागतोच.  जवळचे बघण्याची लेन्सची क्षमता या वयात कमी होते यालाच आपल्याकडे चाळीसी लागली असे म्हणतात. हा चष्मा फक्त जवळचे पाहण्यासाठी लावावा लागतो परंतु सध्या मोबाइल मुळे जवळचे वाचण्याची निकड केव्हाही भासू शकते म्हणून हा चष्मा सतत डोळयावर नाही लावला तरी सोबत बाळगावा लागतो. फक्त जवळचा नंबर असेल तर Reading pinto नावाचा छोटा चष्मा मिळतो.  तो सतत बाळगायला सोपा असतो.
जवळचा नंबर (presbiopic correction) हा सुद्धा  वर्षाला तपासून घ्यावा. चाळीशीत लागलेला चष्मा हा पाच वर्षात एक - दोन पॉइंट याप्रमाणे वाढतो, तो वयाच्या ६० वर्षापर्यंत. त्यानंतर मोतीबिंदु व्हायला सुरवात होते. जवळचा चष्मा न लावता वाचायला दिसू लागते हेच मोतीबिंदुचे पहिले लक्षण आहे.
मोतीबिंदु वर कुठलेही अोषध नाही. तो शस्त्रक्रिया करूनच काढावा लागतो. अाजकाल आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याने ही शस्त्रक्रिया अगदी सहज सोपी झाली आहे.  
वार्धक्यामुळे होणारा मोतीबिंदु(senile)  याचे प्रमाण जास्त असले तरी मोतीविंदु डोळयाला मार लागल्याने होणारा (traumatic :) अथवा दुसर्या रोगामुळे होणारा (secondary) आणि जन्मजात (congenital)  हे ही प्रकार यात आहेत.
तेंव्हा चला तर मग आपल्या अमूल्य अश्या डोळ्यांची योग्य काळजी घेऊ या. ज्याला डोळे नाहीत त्यालाच या डोळ्यांची किमत कळत असते हे ही सत्यच आहे. ( क्रमशः )
-  डॉ. सुनील बेंडे 
   नेत्र चिकित्सक अधिकारी, 
उपजिल्हा रुग्णालय, वसमत जि. हिंगोली 
संपर्क क्र. : 09404071984
*****************************************************






No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...