नागोराव सा. येवतीकर

Monday, 26 February 2018

मराठी दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा

*मराठी पाऊल पडती पुढे ....*

साहित्य स्पंदन समूह आणि
आपली माणसं समूह प्रस्तूत

*मराठी दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा*

*स्पर्धेचे अटी आणि नियम :-*

01) दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 09 ते सायं. 06 वाजेपर्यंत पोस्ट केलेले लेख स्पर्धेसाठी स्विकार केले जातील.

02) शालेय विद्यार्थ्यांसाठी गट
    *  इयत्ता पहिली ते पाचवी
    *  इयत्ता सहावी ते आठवी
    * इयत्ता नववी ते बारावी
आणि
    * खुला गट सर्वासाठी

03) आपले नाव व पत्ता लिहिणे आवश्यक.

04) सुंदर, वळणदार आणि चूका नसलेले लेखनाचे प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक  निवडले जातील.

05) विजेते आणि सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

06) निकाल पेपरमधून प्रसिद्ध करण्यात येईल. वारंवार विचारणा करू नये.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*पारितोषिक :-*

कै. खंडेराव माणिक इटलोड यांच्या स्मरणार्थ रमेश इटलोड यांचेकडून प्रत्येक गटात प्रथम क्रमांक पारितोषिक (151/-)

कै. शिवानंद शिलारे यांच्या स्मरणार्थ उदय शिलारे यांचेकडून प्रत्येक गटात द्वितीय क्रमांक पारितोषिक ( 101/- )

कै. कारभारी सयाजी नरसिमलू अवधूतवार यांच्या स्मरणार्थ धनराज अवधूतवार यांचेकडून प्रत्येक गटात तृतीय क्रमांक पारितोषिक ( 51/- ) ........

कै. हणमंत नारायण जेटेवाड बरबडेकर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक गटात उत्तेजनार्थ पारितोषिक ( प्रत्येकी 25/- ) आर. एच. जेटेवाड बरबडेकर यांचेकडून ( एकूण 501/- )

टीप :- पारितोषिकात वाढ होऊ शकते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जास्तीत जास्त मराठी प्रेमी नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खालील उतारा स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षर मध्ये लिहून 9423625769 या मोबाईल क्रमांकावर whatsapp करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

येथून लिहिण्यास सुरुवात करावे.

*मराठी राजभाषा दिनानिमित्त हस्ताक्षर लेखन स्पर्धा*

संपूर्ण नाव :-
वर्ग :-          शाळेचे नाव :- 
पत्ता :-

मराठीचा विकास आपल्याच हाती

मराठी ही महाराष्‍ट्राची राजभाषा आहे. मात्र आपल्‍याच राज्‍यात आपण आपल्‍या मराठी भाषेला पदोपदी ठार करीत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करीत असतो, त्‍यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्‍यांना भाषेच्या प्रत्‍येक शब्‍दात असलेल्या सौंदर्य आणि सामर्थ्‍याची जाणीव नसते, त्‍यांना वाक्‍यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते. अशा लोकांच्‍या भाषेमुळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, असे म्‍हणणे चूकीचे ठरणार नाही. आज प्रत्‍येक पालक आपल्‍या पाल्‍यांना मराठी माध्यमाच्‍या शाळेऐवजी इंग्रजी माध्यमाच्‍या शाळेत पाठविण्याकडे जास्‍त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणा-यांची संख्‍या सर्वात जास्‍त आहे.  इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या स्पर्धेत टिकू शकते, अशी धारणा पालकांची बनली आहे. माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्‍हणून त्‍याला  लहानपणापासून इंग्रजीचे धडे शिकविण्‍यास प्रारंभ केला जातो. सध्‍या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे की, प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्‍यमातून झाले की त्‍याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही. परंतु वास्‍तव काही उलट आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्‍यामूळे मुलांची संकल्‍पना अधिक स्‍पष्‍ट होते. तसेच त्‍यास घोकंपटटी किंवा वारंवार अभ्‍यास करावे लागत नाही. विषयाची  संकल्‍पना मुलांना कळाली तर ते अगदी सहजपणे व्‍यक्‍त होऊ शकतात. म्हणून आपल्या मुलांना मराठीच्याच शाळेत प्रवेश द्यावा. आज मराठी राजभाषा दिवस त्यानिमित्त आपण सर्व मराठीप्रेमी माणसांनी मराठीच्या विकासासाठी लोकांत जागृती निर्माण करू या.

- नागोराव सा. येवतीकर यांच्या पाऊलवाट या पुस्तकातून साभार

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन मराठीचा प्रसार करू या.

No comments:

Post a Comment