नागोराव सा. येवतीकर

Thursday, 4 August 2016



*📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊*
..................आणि...............

*📔 तुम्ही आम्ही पालक मासिक 📔*

...........यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित .........

*🗽  साहित्य दरबार वैचारिक लेखमाला  🗽*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- (सोळावा ) 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 07/08/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★★★★★★★★

*विषय - शिक्षक काल आणि आज*
†††††††††††††††††† †††††††††
💥 संकल्पना :- ना सा येवतीकर
**************************
💥 संयोजक - आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक - सौ. स्नेहल आयरे मुंबई
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""'''""""''''''''''''''''''''''''''"''''''
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :- क्रांती बुद्धेवार
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _8 ऑगष्ट 2016_ रोजी सायंकाळी 9:00 वाजता मिळेल. त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱9823922702
=================************=====================
 📕   स्पर्धेसाठी     📕
➖➖➖➖➖➖➖➖
     शिक्षक काल आणी आज
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

गुरुब्रम्हा गुर्रुविष्णू गुरु्रदेवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैश्रीगुरुवेन महा गुरुबद्दलची श्रध्दा या श्लोकातुन व्यक्त केली जाते फारपुर्वीची गुरुपरंपराही वेगळी होती शिष्याला गुरुगृही राहुन अध्ययन करावे लागत असे विद्या मिळवणे फार अवघड होते पुरानामध्ये महाभारतात रामायणात कशापध्दतीने गुरुशिष्य परंपरा होती हे सगळ्यांनाच माहित आहे त्यावर जास्त लिहण्याची गरज नाही 
       आजचा विषय म्हणजे शिक्षक काल आणी आज भारत स्वतंत्र झाल्यानंरच खरतर शिक्षणाचा जास्त विस्तार झाला पंचवीस वर्षापुर्वीचे शिक्षक जरआपण पाहिले तर शिक्षकाप्रती असलेली श्रध्दा प्रेम आपुलकी हि वेगळी होती शिक्षक विद्यार्थी हे नाते फार जवळचे होते तुटपुज्या पगारावर सुध्दा प्रामाणिकपणे शिकवणारे शिक्षक पुस्तकापलीकडचे ज्ञान देणारे शिक्षक जगण्याचे शिक्षण देणारे शिक्षक आणी या शिक्षणातून निर्माण व्हायच्या आदर्श पिढ्या
      खरच कुठे चाललाय आजचा बाजारु शिक्षक फक्त पैशाच्या मागे धावतांना मुळ उद्देश दुर चाललाय हे आपण विसतोय का याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे तुलनात्मक दृष्टीने जर आपण कालचा व आजचा शिक्षक पाहिला तर प्रत्येक बाबी पहाण्याची गरज आहे मुलांसमोर आईवडीलांनंतर शिक्षक हेच आदर्श असतात म्हणुन त्याच वर्तन हे आदर्शच असाव म्हणजे शिक्षकाच रहाणीमान मी अस म्हणणार नाही शिक्षकान पुर्वीप्रमाणे धोतर टोपी या वेशात असाव पण आपल रहाणीमान हे प्रभावी असावे शिक्षकीपेशाला शोभेल असे
     पुर्वी पालक शिक्षकावर भरवसा ठेवून रहायचे कारण त्यांचा त्या शिक्षकावर तेव्हडा विश्वास होता पण परिस्थीती खुप बदललीय क्षमा मागुन सांगते शिक्षकाचाच स्वतवर विश्वास राहीला नाही  किती शिक्षकाची स्वतची मुले आपल्याच शाळेत शिकत आहेत याचा जर सर्व्हे केला तर आपल्या लक्षात येईल किमान प्राथमिक शाळेतील शिक्षकानीआपली मुले स्वतच्या नजरेसमोर ठेवली व आपल्या मुलांबरोबर इतर मुलांना शिकवले तर आपली विश्वासार्हता टीकली असती हे आपण समजुन घेतले पाहीजे
          आज अगदी पहिलीपासुन मुलांना ट्युशन असते पालकांचा असा समज झालाय कि पगारदार शिक्षकांपेक्षा ट्युशन मध्ये चांगल शिकवतात म्हणजे शिक्षकाचे महत्व फक्त वर्गात हजेरी घेणे इतपत राहिलय का विचार करा नववी दहावी पर्यंत किमान मुले शाळेत येतात तिथुन पुढे काय कोनत्याही कॉलेजमध्ये जे आपले बांधव आहेत ते त्या पगाराच्या मोबदल्यात विद्यार्थांना काय देतात खरच आज चिंतन करण्याची गरज आहे पुर्वी मुले शिकण्यासाठी शाळेत जायची आज बाहेर शिकुन विद्यार्थी शाळेत येतो अस म्हटल तरी वावगं ठरु नये काय आदर्श घ्यावा गुरुजींचा
    एक प्रसंग आठवला एकदा गुरुजी वर्गात आई ही कविता शिकवत होते शिकवतांना खुप भावनाविवश झाले होते सगळा वर्ग स्तब्ध शिक्षकाच्या डोळ्यात अश्रु मुलेही रडु लागतात पण वर्गातील एक मुलगा हसत होता गुरुजींच लक्ष त्या मुलाकडे गेल गुरुजी म्हणाले मी कविता एव्हडी मन लावुन शिकवली सगळा वर्ग रडतोय तुला काय झाले त्यान दिलेल उत्तर एवहडे मार्मिक होते तो म्हणाला तुम्ही कविता खुप छान शिकवली पण मी तुमच्या शेजारीच रहातो तुम्ही तुमच्या आईसी कसे वागता हे मी रोज पहतो गुरुजी तुम्ही तुमच्या आईला नीट जेवायलाही देत नाहीत कधीकधी आईला खुप वाईट बोलताहो त्यामुळे मला रडु नाही आल गुरुजी
      प्रसंग संपला पण यातुन आपण काय बोध घेऩार आहोत म्हणुनच आपला पेशा हा फार पवित्र पेशा आहे आपण काहीतरी पुर्वजन्मी पुण्य केल असाव म्हनुण शिक्षक झालोत अशा या पवित्र पेशास कुठे कलंक लागु नये म्हणुन जपा दुर्दैवाने काही घटना ऐकल्यावर खुप दुख होत काही लोकांमुळे शिक्षकीपेशा बदनाम व्हायला लागलाय पण अजुनही खुप चांगले व प्रामाणिक शिक्षक  आहेत त्यांचे  काम खुप चांगले आहे त्यांना प्रशासनानेही प्रोत्साहित करायला पाहिजे
      सगळ्यांच्या नजरेतुन उतरलात तरी चालेल पण आपल्या विद्यार्थाच्या नजरेतुन उतरु नका त्यांच्या मनात शिक्षकाप्रती आदर कायम ठेवा
   शेवटी एव्हडेच म्हणेल  
 पणती जपुन ठेवा अंधार फार झाला
 थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

      खेडकर सुभद्रा बीड (२०)
          मो नं (९४०३५९३७६४)
=================************=====================

 "शिक्षक काल आणी आज"

    गुरूजी, मास्तर,गुरूवर्य, शिक्षक,सर असे अनेक नामस्मरणी उल्लेखनीय आसलेले प्रत्येकांचे गुरू, आई वडीलांच्या नंतर जगात दुसरा गुरू म्हणजे शिक्षक, विद्यार्थींना घडवने ऐवढच उद्देश नसून, घडवलेल्या प्रत्येक विद्यार्थी स्पर्धेत टिकला पाहीजे, याची खात्रीशीर शिक्षण देणारा शिक्षक, पुस्तकी ज्ञान यापलीकडचे शिक्षण विस्तार करणे म्हणजे शिक्षक.
   आज काल शिक्षक म्हणजे भय भिती उरली नाही, शासनाने शिक्षकांच्या हातातील छडी हाकालली,तेव्हापासून थोडी शिक्षकांचा महत्व आजच्या विद्यार्थ्यांना समजने कठीण झाला आहे,'छडी लागे छम छम विद्या येई घमघम', या ओळींना आता स्थगिती मिळाली, उलट्या हातांवरील छडींचा मारा आजही माझ अस्मरणीय आहे.
   महाराष्ट्र शासन तंत्रज्ञानाची वाटचाल करत आहे, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आनेक शाळे डिजिटल करण्यात मग्न आहे, शिक्षकांच्या हाताला काम तर तेव्हढेच परंतू डिजिटल शिक्षक झाले पाहीजे, हातातल्या खडू जरा दुर करा आणी माऊस हाती घ्यावा गुरूजी, असे म्हणजे काही वावगे नाही,
   शिक्षकी पेशा हा पवित्र व मंगलमय असून तो घेतलेला वसा आहे. याला सेवेची जोड दिली तर मुलेही फुले होतात. अशा प्रकारे मुलांवर प्रेम करणारे शिक्षक दुर्मीळ होत चालले आहेत, काही अपवाद वगळता  "शिक्षकांच कार्य एक, करतो एक" आशी परिस्थिती उद्भवत आहे,शिक्षकांना विद्यार्थी घडवायचे आहेत, त्यांना नवनवीन दिशा समजावून पुढील वाटचालीस प्रवृद्ध करायच आहे, असे आजची शिक्षक मंडळी दिसत नाही, "पगारीला हापावले विद्यार्थी खपावले" म्हटले तरी चालते, शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर प्रेमाने धडे शिकवले पाहीजे, परंतू आजचे शिक्षक पगारीवर प्रेम दर्शवतांना दिसत आहेत, प्रत्येक शिक्षक हिच वाटचाल करेल आसे नाही, शिक्षकांना खरे तर समाजातून आदर मिळाला पाहीजे, आपल्या पाल्यांना घटवणारे गुरूजी त्यानां वेळोवेळी दाद देत राहीलो तर विद्यार्थ्यांवरील प्रेम वाढेल,समाजच्या प्रवृतीने शिक्षकांची माणसीक स्थीतीत बदल घडत आली आहे, पुर्वी गुरूजींनी मारल,  तरी पालकांच कुठलीच तक्रार शिक्षकावर होत नसे, मात्र आजच्या काळात इतका बदल झाला की, शिक्षकाणी विद्यार्थ्यांवर कुठल्याच प्रकारचे तणाव व मारहाण करता कामा नये , असे अगोदूरच बजावले गेले, अश्या परिस्थितीत शिक्षकांच्या माणसीक पाठबळीत फार मोठा बदल घडत गेला.तरी विद्यार्थी शिक्षक हे नात संस्कारमय नात आहे , या नात्यात घट्टपणे अवखळने काळची गरज आहे,
आजचे शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कमकुवत होत चालले आहे. विद्यार्थी सुसंस्कारमय करण्याचे अवघड काम शिक्षकांवरती आहे. ते त्यांनी प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. 
   "स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !" या ओळींप्रमाणे माराने केवळ जखम करू शकता पण शब्दांनी मण जिंकवून विद्यार्थ्यांच्या मणात मोलाच बदल घडवने शक्य आहे.
  विद्यार्थी-शिक्षक या समीकरणाशे नविन अभिक्रीया घडू शकतो, देश बदलन्याच सामर्थ या दोन गटात भिनल आहे, याकरीता शिक्षकांनी आपल कार्य व समाजानी आपल कर्तृत्व पार पाढने काळाची गरज आहे. 


----लेखक--------
श्रीपाद पटेल राऊतवार
मदनूर जि.निजामाबाद
मो.नं.9970052837
----------------

ग्रुप बाहेरील स्पर्धेसाठी लेख
=================************=====================
 *शिक्षक काल आणि आज*

स्पर्धेसाठी नाही

*तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज*
         नागोराव सा. येवतीकर
         मु. येवती ता. धर्माबाद

आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास शालेय विभागाचे शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण संचालक मा. गोविंद नांदेडे आणि शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर साहेब यांना वाटतो. त्याच मुळे त्यांनी राज्यातून तंत्रस्नेही शिक्षकांची फौज तयार व्हावी यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर तंत्रस्नेही शिक्षकासाठी कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत.
आज राज्यात सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. अनेक गावातील जनता स्वयंस्फुर्तीने समोर येऊन शाळेला समृध्द कसे करता येईल ? याचा विचार करीत आहेत. 14 व्या वित्त आयोगातुन शाळेला मदत मिळत आहे. गावचे सरपंच इतर सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेत यापूर्वी शिक्षण घेतलेले आणि सध्या चांगल्या पदावर काम करणारे गांवकरी, तसेच शाळेतील कार्यरत शिक्षक यांनी सर्वानी मिळून शाळा डिजिटल आणि ज्ञानरचनावादी करण्याचा जणू विडा उचलला आहे असे चित्र सध्या राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षकास सुध्दा बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वीचा शिक्षक आणि त्याची अध्यापन पध्दती आत्ता मागे पडली आहे. तीच ती पुरातन पद्धत वापर करण्या पेक्षा काही तरी नवीन शोध लावून त्या मार्गाचा वापर केले तर समाजात आपला टिकाव त्याशिवाय आपली धडगत नाही हे आत्ता शिक्षकांना कळून चुकले आहे. त्यामुळे आज प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही होण्याचा प्रयत्न करतोय आणि ते गरजेचे आहे. काळानुरूप जर आपण आपल्यात बदल केला नाही तर आपली विद्यार्थ्यात पालकात आणि समाजात काही पत राहणार नाही 
आज शाळेतील सर्व योजना मग ते मुलांची शिष्यवृत्ती असो किंवा विद्यार्थ्याची सरल मध्ये माहिती भरणे असो ते आत्ता ऑनलाइन झाले आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत रोजच्या रोज लाभार्थी विद्यार्थी संख्या ऑनलाइन करण्याचे काम यावर्षी 15 जून पासून चालू करण्यात आले. स्वच्छ विद्यालय पुरस्कारसाठी ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय शाळेचा पुरस्कार साठी विचार केला जाणार नाही. शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळविण्यासाठी या वर्षी पासून ऑनलाइन द्वारे च अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे शालेय कारभारात आत्ता ऑनलाइन चे काम फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शिक्षकांचा पगार सुध्दा आज शालार्थ या ऑनलाइन प्रणाली द्वारे दिल्या जात आहे परंतु सध्या ही प्रक्रिया शिक्षक किंवा मुख्याध्यापक स्वतः तयार करीत नसून बाहेरील कमर्शियल व्यक्ती कडून करून घेत आहेत त्यामुळे शासन ज्या उद्देश्यासाठी प्रणाली सुरु केली ती असफल होताना दिसत आहे शिक्षक आणि मुख्याध्यापकच नाही तर अधिकारी मंडळी सुध्दा याच मार्गावरुन वाटचाल करीत आहेत यासाठी आर्थिक झळ सोसावे लागत आहे ती गोष्ट वेगळी नुकतेच बदल्याच्या प्रक्रिया पार पडल्या यात जवळपास हजारांच्या घरात बदल्या झाल्या पूर्वी च्या पद्धतीनुसार एका ठिकाणाहुन गमन आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित झाले की संपले पण आज या शालार्थ प्रणाली त पूर्वी सारखे तर प्रक्रिया कराविच लागते तयशिवाय
ऑनलाइन सुध्दा गमन आणि उपस्थित व्हावे लागते आणि त्यासाठी ज्याना जसे जमेल तसे ह्या बाहेरील व्यक्तिनी पैसे उकळले असल्याची चर्चा आज शिक्षक खाजगी स्वरुपात बोलत आहेत याला कारण एकच आहे आपण तंत्रज्ञानाशी मैत्री न करता त्यापासून दूर पळत राहिलो आणि त्याचा फायदा या व्यक्ती घेत आहेत यात त्याची काहीच चूक नाही ज्यप्रकरे आपणास काही आजार झाला असेल तर आपण
डॉक्टर कडे जातो तो डॉक्टर एकही इंजेक्शन किंवा औषध न देता फक्त कागदावर ट्रीटमेंट लिहून देतो आणि आपण त्याला त्याची जे काही फी असेल 60 रूपया पासून 500 रूपया पर्यन्त त्याला देतो कारण त्याने त्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा वापर आपल्या साठी केलेला आहे
त्यामुळे बाहेरील लोक अमुक काम करण्यासाठी तमुक पैसा घेतात एवढा खर्च शाळेच्या मुख्याध्यापकानी कसे समायोजन करावे यास फक्त एक आणि एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही सुध्दा तंत्रस्नेही बना संगणक शिका आणि त्या संगणकाचा वापर शालेय अध्यापनासोबत शालेय कामकाज मध्ये सुध्दा वापरल्याशिवाय पर्याय नाही आपली जुनी परंपरा थोडासा बाजूला सारून या नव्या तंत्रज्ञानाने मुलांना शिकवित राहिलो आणि शालेय व्यवस्थापनात याचा वापर केला तर आपल्या शाळेला, शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वैयक्तिक आपणाला ही याचा फायदा नक्की होईल.

तेंव्हा चला तर मग आपण सारे तंत्रस्नेही शिक्षक बनू या आणि येत्या वर्षात संपूर्ण महारष्ट्र प्रगत करू या.


[8/7, 3:33 PM] ‪+91 85548 57252‬: साहित्य दर्पण समुह आयोजित
लेखांक स्पर्धेसाठी....
                   विषय मांडतोय.....
'शिक्षक :  काल आणि आज'
✍शाहीर प्रमोद जगताप.
_______________________

   गुरुजनांच्या ज्ञानाद्वारे जगी
   उभारली यशशिखराची गुढी...
   शिक्षकनावाची देऊन शिवी
    तोंडसुख घेतेय हल्लीची पिढी...

शिक्षक म्हटलं की,डोळ्यासमोर उभा राहतं अत्यंत शिस्तप्रिय,ज्ञानाधिष्ठीत व्यक्तिमत्त्व.शिक्षकांचा साचा काल आणि आजही तोच आहे.पण युगायुगाची स्थित्यांतरे शिक्षकांची प्रतिष्ठा कमी करुन गेली.सन १९९६-९७ पर्यत ची शिक्षक पिढी म्हणजे गावात मिळणारा सन्मान,विद्यार्थ्यांमध्ये असणारी आपुलकी,आदराची भावना, विषयाची गोडी यासारख्या गुणांचा सहसंबंध तत्कालीन शिक्षकांशी येतो.परंपरागत साधनसामग्रीचा वापर करून केलेले अध्यापन ही प्रभावीपणे होते.त्यांची शिकवण्याची तळमळ, विषयज्ञान,आशय मांडणी  सभोवतालच्या उदाहरणे देऊन घटक स्पष्टीकरण करण्याची पद्धती यामुळेच कोणताही क्लास अथवा ट्युशनची गरज विद्यार्थ्यांना वाटत नव्हती.
                 कविता शिकवताना आशयानुरूप केलेले हावभाव हृदयाला भिडणारी कवितेला दिलेली चाल ही अंत्यत देखण्या स्वारूपाची असायची.आजचे शिक्षकही अधुनिक तंत्रज्ञान वापरून अध्यापन करतात पण व्यवस्था अध्यापन अडथळे निर्माण करत असते.कालचे शिक्षक हे केवळ परीक्षेसाठी न शिकवता जगण्याची मुळं शाश्वत आणि प्रबल होण्याच्या दृष्टीने अध्यापन करित होते तर बेस्ट आँफ फाईव्हच्या जमान्यात केवळ परीक्षार्थी पिढी शासननिर्णयामुळे ना इलाजाने घडवित आहेत.
                     जसजसा काळ बदलला तसतसे ही स्थित्यांतरे कालानुरूप बदलत गेली.कालच्या शिक्षकांना अध्यापनाखेरीज अन्य कामाचा तगादा नसल्यामुळे अध्यापन व अध्ययन प्रक्रियेत सातत्य व प्रभाव होता.तर आजच्या शिक्षकांच्या वाट्याला येणारे एकूण कामाचे तास, प्रत्यक्ष अध्यापन,शासनाच्या विविध जनगणना,सर्वेक्षण,निर्मलग्राम जनजागृती,निवडून प्रक्रियेतील कार्यभार,यासारख्या एक ना अनेक शासकीय कामाची जबाबदारी,शिक्षक संघटना मधील मतभेद,शैक्षणिक कालावधीत असणारी संघटनेची अधिवेशने,यामध्ये पाठीमागे राहिलेला क्रमिक अभ्यासक्रम,यामुळे अध्यापतील सातत्य कमी झाले तरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चा शासनाचा अजेंडा ,शिक्षकी पेशात राजकारणाने केलेला प्रवेश ,विद्यार्थी संचय यादी,त्यातच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची धुरा सांभाळत आँनलाईन डाटा संकलन,विविध अहवाल प्रत्याभरण यासारख्या अध्यापनाव्यतिरिक्त कामाचा बोजवारा अध्यापनात अडथळे निर्माण करतो.यामुळेच आजचा शिक्षक व्यवस्थेने हतातला बाहुला बनवून ठेवला आहे.
                          संगणकाच्या युगात शिक्षकाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन ,विद्यार्थ्यांमधील शिस्तीचा आभाव,खाजगी क्लास व ट्युशनमुळे शिक्षकाप्रती कमी झालेला आदरभाव,यासारखे प्रश्न आजच्या शिक्षकांना भेडसावत आहेत.आजच्या शिक्षकासोबत आंधळी कोशिंबीर खेळणारे शासन निर्णय शिक्षकाला शिक्षक म्हणून सेवा करण्याऐवजी घाण्याला जुपंलेल्या बैलाप्रमाणे देत असणा-या वागणूकीमुळे 'शिक्षक : काल आणि आज हा भेद मांडावा लागतोय हीच खरी शिक्षक या घटकाची शोकांतिका आहे.
_____________________

✍शाहीर प्रमोद जगताप
      रा.गोखळी ता,फलटण 
      जि.सातारा .
      मो.95 61222177
[8/7, 4:29 PM] Sunil Vilas: स्पर्धेसाठी 

विषय :-  शिक्षक : काल नि आज

'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा.'
अज्ञानास ज्ञानाची कवाडे निरपेक्षपणे उघडी करून देणारा गुरु,अंध:कारात स्वतः दिप होऊन प्रकाश देणारा गुरु,सुर्यासम 
ख-या मित्राची भूमिका बजावणारा गुरु,प्रसंगी कुसुमाहुन मृदू तर कधी वज्राहुन कठीण होणारा गुरु,शिष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा गुरु.गुरुची अर्थात शिक्षकाची अशी अनंत रुपे आपणांस पहायला मिळतात.पूर्वीच्या काळापासून मनुष्याच्या जीवनाचा कायम भाग असणा-या शिक्षणातुन मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करून देण्याचे कार्य शिक्षकरूपी परिस करीत आला आहे.रामायण,महाभारत युगांतील महर्षी वाल्मीकी,व्यासमुनी,द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्यांना सर्वोत्तम करण्यात आपल्या जिविताची धन्यता मानली.ज्ञानदेवांपासून तुकाराम ,रामदास आदि संतांनी लोकशिक्षणाचे,लोकोद्धाराचे महान कार्य हाती घेवून समाजोद्धार घडवून आणला.ख-या अर्थाने ते या समाजाचे शिक्षक होते.
          आपल्या अभ्यासविषयात तन-मनाने रममाण होणारा,विद्यार्थी घडविण्यात आपल्या जीवनाची सार्थकता मानणारा आदर्श शिक्षक स्वातंत्र्यपूर्वकाळापासून या भारतभूमीत आपणांस पहावयास मिळतात.गुरुदेव रविंद्रनाथ टागोर,साने गुरुजी,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,कर्मवीर भाऊराव,डॉ.बापूजी साळुंखे, गो.ग.आगरकर,प्रा.ना.सी.फडके,आचार्य अत्रे,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,श्री.म.माटे,पु.ग.सहत्रबुद्धे, वाडिया काँलेजचे आर.सदाशिव अय्यर,प्रा.ग.प्र.प्रधान,फ़र्ग्युसनचे दे.द.वाडेकर,राजारामचे प्राचार्य गोकाक, जे.पी.नाईक,लिलाताई पाटील,डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम,डॉ.माशेलकर,प्राचार्य शिवाजीराव भोसले अशा शिक्षकांनी शिक्षणातील अध्यापनाचा वसा,वारसा जणू विद्यादेवता सरस्वतीमातेकडून घेतला होता.ज्ञानमंदिरात देहभान हरपून,जिवाचे रान करून ,प्रचंड विद्वतेचा कस लावत या गुरुंच्या वाणीतून ज्ञानाचे मधुघट अक्षरश: ओसंडून वाहत असत.या त्यांच्या ज्ञानसरींत अखंड भिजत रहावे असे विद्यार्जन करणा-या शिष्यास वाटत असे.त्यांच्या वाणीतील प्रत्येक शब्द त्यांच्या विद्वत्तेची,व्यासंगतेची पुरेपुर साक्ष देत असे.'निष्काम कर्म' या भावानेतुन हे हाडाचे शिक्षक कार्यरत होते.आई जशी मुलाला कर्तव्य म्हणून संभाळते,मुलाने मोठे व्हावे,त्याने मिळवते होवून आपले काम करावे अशी अभिलाषा तिच्या मनी कदापि नसते. 'कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'याप्रमाणे जशी माऊली मुलाचे करते तद्वतच हे शिक्षक आपले योगदान देत असत.आपल्या मनात ज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवणारे,औपचारिकतेच्या पलिकडे जाऊन कार्य करणारे,स्वतः आहोरात्र तेवत राहून ज्ञानप्रकाशाचे दान करणारे,प्रखर बुद्धिवादी तितकेच भावनिक हे गुरुवर्य होते.
                     विद्यार्थ्यांच्या ओढीने अखंड विद्यार्जन करणारे नि या विद्येचे संपूर्णपणे दान करणा-या या गुरुवर्यांचे पगारही बेताचेच असत.उलट शिष्याच्या जिवनोन्नतीकरिता पगारापेक्षा जास्त स्वतः खर्च करणारे गुरुवर्य पूर्वीच्या काळी होते हे आपणांस त्यागाची धगधगती मशाल असलेल्या कर्मवीर भाऊरावांच्या उदाहरणावरून दिसते.आण्णा आणि लक्ष्मीबाई यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यज्ञकुंडात आपल्या प्रपंचाची आहुती दिली.नोकरीत आण्णांना 300 रुपये प्राप्ति होत असे.त्यावेळी सोन्याचा भाव 20 रुपये प्रती तोळा होता.त्यावेळी आण्णांनी शासनाने देऊ केलेले 300 रुपये वेतन नाकारले इतकेच नव्हे तर लक्ष्मीबाईंच्या 90 तोळे सोने नि मंगळसुत्राची आहुती त्यांनी आपल्या विद्यार्थी प्रेमापोटी दिली.महात्मा गांधींनी शिक्षकाला मातारूपी शिक्षक असे संबोधले.शिक्षक आपली निष्ठा समर्पित भावनेने देतो.अशा समर्पणाची किंमत पैशात करता येत नाही.'निष्ठेला मोल नाही,ते एक मुल्य आहे'असे ते म्हणाले.शिक्षक हा अतिश्रेष्ठ हे शिक्षकाच्या बाबतीत महात्मा गांधींनी काढलेले उद्गार पुरेसे बोलके आहेत.
                  आजकाल मात्र गुणपत्रिकेवरील गुणांच्या जंजाळात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही तसाच जिथे-तिथे दिसत आहे.गुणवत्तेची कृत्रिम चाळणी हातात घेवून विद्यार्थ्यांना या शिक्षकांद्वारे निवडले जात आहे.पूर्वीच्या काळातील ज्ञानतपस्वी शिक्षकांप्रमाणे स्वतःला ज्ञानयज्ञात तावून सुलाखून काढणारे शिक्षक आज अपवादानेच पहायला मिळतात.घंटेचे टोल,पगाराची तारीख,वेतन आयोग,नेहमीच्या सुट्ट्या ,हक्काची रजा,गावातील राजकारण,शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा इतर आपल्या सोयीच्या मागण्यांसाठी झटणा-या शिक्षक संघटनांच्या वर्तुळात आजचा बहुतेक शिक्षक व्यस्त आहे.सामाजिक उत्तरदायित्वाच्या कार्यास 'अशैक्षणिक काम' असे गोंडस नाव देत त्यापासून पळ काढणारे आजचे शिक्षक कर्मवीरांप्रमाणे संसाराची आहुती तर दूरच पण आहे त्या वेळेतही पेशाशी प्रामाणिक राहत कार्य करताना मनाने उदासीन जाणवतात.मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे.आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक आहे.त्याचा आजचा वर्तमान उजळला तरच उद्याचे भारताचे भविष्य उजळेल याचे भान कोठेच उरलेले नाही.ज्यांच्या मनात साने गुरुजींचे ममत्व असायला हवे असे गुरुजी अपवादाने दिसून येतात.मी वर उल्लेखलेल्या गुरुवार्यांइतका किंबहूना त्याचा जवळपास जाईल इतका व्यासंग आजच्या शिक्षकांत विरळच.पुर्वीच्या शिक्षकांच्या ज्ञान,चारित्र्य,व्यक्तिमत्व,आचार-विचारांचा मोठा दबदबा वाटत असे.ही व्यासंगी नि आचारनिष्ठ मंडळी मोठ्या उर्जेने,निष्ठेने,निर्धाराने ज्ञानदानाचे कार्य करीत असे.पण आता तसे फारसे दिसत नाही.कोवळ्या संस्कारक्षम मनांना सुयोग्य वळण देणारा,घडविणारा शिक्षक हा सर्वांगाने सुज्ञ,स्वतंत्र,स्वाभिमानी,चारित्र्यवान,सदैव ज्ञानाग्राही असला पाहीजे.पण आज भौतिक सुखाच्या मागे धावणा-या,समाज उन्नतीस बाधक राजकारण,ज्ञानदानाव्यतिरिक्त पूरक व्यवसायात गुंतलेल्या आजच्या शिक्षकाने सरस्वतीला पराधीन केल्याचे जाणवते.
       असे असुनही वाळवंटात ओअसिस असावे नि त्याच्या शोधार्थ भटकणा-या पथिकास सुखावह वाटावे तसे आजच्या शिक्षकांत अनेक ठिकाणी असे ओअसिस असल्याचेही आढळते.अनेक शाळांमधून ज्ञानाच यज्ञ पूर्वीच्या गुरुवर्यांप्रमाणे तेवत ठेवणारे गुरुजन भेटीस पडतात.या त्यांच्या ज्ञानयज्ञाच्या तेजाने दशदिशा उजळतील नि भविष्यात सर्वच शिक्षक या ज्ञानयज्ञात सर्वस्वाची आहुती देण्यास सिद्ध होतील असा सार्थ विश्वास मला वाटतो.अखेरीस कालच्या नि आजच्या शिक्षकांबद्दल मला म्हणावेसे वाटते,'दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती!'

--------लेखन:- श्री.सुनील विलास अस्वले,वि.मं.पोहाळे/आळते,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.(सुवर्णविलास 9049211785)
[8/7, 4:33 PM] ‪+91 94231 53509‬: *साहित्य दरबार वैचारिक लेख माला*                                        💥विषय : - *शिक्षक काल आणि आज*💥                                   कालचा शिक्षक काळाच्या ओघात आजचा सुलभक कधी झाला ते कळलेच नाही. आज घोकंपट्टी, पाठांतर हे प्रकार कालबाह्य ठरत आहेत असे वाटत आहे. कालच्या पुस्तक किंवा मुखोदगत ज्ञान असा शिक्षक आज लॅपटॉप घेवून दिसत आहे. विज्ञान , तंत्रज्ञान यांची सांगड आज शैक्षणिक बाबतीत घातलेली दिसून येत आहे व शिक्षकाला पर्याय बनू पाहत आहे.                              एकिकडे असे दिसत असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपली मुले अशा शाळेत पाठवण्याचे ठरवले आहे जीथे फळ्यावर शिकवले जाते. त्यांच्या मते फळ्यावर खडूने जे शिकवले जाते तेच खरे शिक्षण.                 आज त्यामुळेच शिक्षकाच्या एका हातात खडू तर दुसऱ्या हातात माऊस चालवण्याचे कौशल्य प्राप्त केले आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाच्या शिकवण्याला तोड नाहीच. सजीव व्यक्ति व निर्जीव वस्तू यात अध्ययन - अध्यापनाचा फरक तर पडणारच ना ?                         आपणही जाणतो , आपल्यालाही जीव तोडून शिकवणाऱ्या शिक्षकाने शिकवले आहे , एका सर्वेत असेही सिद्ध झाले आहे की जे शिक्षक असे जीव तोडून शिकवतात त्यांचे सरासरी आयुर्मान हे १० वर्षांनी कमी होते. तरी हाडाचे शिक्षक आपला पेशा सोडत नाही. शिकवताना जी ऊर्जा खर्च होते ती शिक्षकाची परंतु त्यातून ऊर्जा घेवून कितीतरी पिढया या सर्वोच्च शिखरावर पोहचल्या आहेत, त्यातूनच शिक्षण देण्यास पुन्हा नवी उर्मी मिळत जाते.                             कालचा झटणारा शिक्षक आजही तंत्रज्ञान अवगत करण्यास झटत आहे, स्वखर्चाने शाळा टिजीटल बनवत आहे, तंत्र स्नेही होत आहे, विविध शैक्षणिक ग्रुप बनवत आहे व विचार मंथन घडवून आणत आहे.      असे शिक्षक पाहीले की वाटते काल काय किंवा आज काय शिक्षकाचे महत्व हे कालाधीत राहणार आहे.      अभिमान वाटतो मला असे कालानुरुप स्वतःत बदल घडवून नव्या पिढया घडवणाऱ्या शिक्षकांचा. किशोर भीमराव झोटे, @ 32 औरंगाबाद.
[8/7, 4:42 PM] 10 Meena Sanap: 📚साहित्य दर्पण व्दारा आयोजित 📚
साहित्य दरबार
***********************
वैचारिक लेखमाला स्पर्धा
***********************
विषय-- *शिक्षक --काल आणि आज*
***********************
'' गुरु ईश्वर तात माय ''
''गुरुविन जगी थोर काय ''
आई-वडील , ईश्वर या सगळ्या प्रतिमा कोणामध्ये पहावयास मिळत असतील तर त्या गुरु मध्ये.म्हणजेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, कारण गुरु आपणाजवळचे सर्व ज्ञान शिष्याला देत असतात.म्हणुण संत तुकाराम महाराज म्हणतात---------
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन किंवा गुरुजन. चंदन ज्याप्रमाणे आपला सुगंध इतराना देऊन आपल्या पात्रतेचे बनवतात त्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांना बनवतात. गुरु म्हणजे ज्ञान देणारे.आता आपण त्यांना शिक्षक म्हणतो.
आज आपण कालचा शिक्षक आणि आजचा शिक्षक या विषयी मत व्यक्त करणार आहोत.
शिक्षक होणं हे काही वाटतं तितकं सोप नाही.कारण या पेशामध्ये शिक्षकानं फक्त  द्यायचच असतं आणि ते देणं ही कोणत्ही भौतिक बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने द्यायच असतं
हे मी पुर्वीचे सांगते आहे आता शिक्षकांना भरमसाठ पगार आहे फक्त तो वेळेवर होत नाही,  असो.
पुर्वी च्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात  होती गुरुच्या घरी राहुन त्यांची सर्व कामे करुन ,सेवा करुन विद्या संपादन करायची .विद्याभ्यास पुर्ण केल्या नंतर शिष्य गुरु दक्षिणा देत असत. नंतर काही श्रीमंत ,जमीनदार आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या घरीच गुरुजीना ठेवत.कालांतराने रविंद्रनाथांच्या शांतीवन सारख्या निसर्ग शाळा सुरु झाल्या.जमीनदारांच्या राजांच्या मुलांना शिकवण्याच्या बदल्यात गुरुजीनाही बलुतेदार पद्धती प्रमाणे धान्य मिळायचे तरीही
गुरुजी आपले ज्ञानदानाचे पवित्र कार्य इमाने इतबारे करत असत.त्यावेळचे शिक्षण म्हणजे पावकी, निमकी, दिडकी ,अडीचकी आणि या व्दारे तोंडी हिशेब , पुस्तक वाचण्यासाठी बाराखडी तोंडपाठ करुन घेतली जाई.नंतर इंग्रज आले
त्यांनी राज्यकारभाराच्या सोईसाठी शाळा काढल्या.बालवाडी ते ४थी पर्यंत शिक्षण गावातच होई.. ४थी पास झालेले विद्यार्थी  शिक्षक म्हणुण नोकरीस लागत असत.गुरुजी ज्या गावात नोकरीस असत तिथेच वास्तव्यास असत.त्यामुळे गावक-यांच्या सुख-दुःखात समरस होत.गावातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.गुरुजीनां राहायला घर फुकट,भाजीपाला, दुध इ.बाबी फुकट.गुरुजींचा पोशाख एकदम साधा , पांढरे शुभ्र धोतर,पांढरा नेहरु, डोक्यावर टोपी.गावात गुरुजीना मान असे लग्न जमवण्यापासुन ते चावडीवरील भांडण मिटवण्या पर्यंत गुरीजींना मान दिला जाई,गुरुजी जे सांगतील ती पुर्वदिशा. गुरुजींच्या शाळेत जायच्य वेळेवर लोक किती वाजले ते सांगत. म्हणजेच वक्तशीरपणा हा गुण पुर्वीच्या गुरुजीकडुन घेण्यासारखा होता.शिस्त तर वाखाणण्या जोगी होती गुरुजी रस्त्यात दिसले तरी मुले घाबरायची म्हणजेच गुरुजीविषयी आदरयुक्त भीती होती.भीतीयुक्त आदर काही कामाचा नाही.गुरुजी तन मन लावुन शिकवायचे .स्पर्धा एवढ्या वाढलेल्या नव्हत्या पाठांतरावर भर होता .अभ्यास नाही केला तर हातावर छड्या भेटायच्या उठाबशा काढायला लागत पण तरी ही पालक भांडायला येत नसत.काँपी हा प्रकार नव्हता त्यामुळे यशस्वी जीवन कसं जगावं याचे धडे शाळेत मिळत.

काळाच्या प्रवाहामध्ये गुरुजी हे नाव बदलुन मास्तर , शिक्षक, आणि आता सर.नावाप्रमाणे भूमिकेतही बदल झाला.पिंजरा सिनेमातील मास्तर पाहून समाजाची शिक्षकाकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदलली.परंतु आज आपण पाहतो की माझे काही शिक्षक बांधव समाजाच्या रोषाला कारणीभूत होत आहेत.कुंपणानीच जर शेत खाल्लं तर दाद कोणाकडे मागायची अरे आपण समाजाचा आरसा आहोत.हा आरसा कसा स्वच्छ असायला नको ? डागाळलेल्या आरशात समाजाचे प्रतिबिंब दोषयुक्त दिसेल.आपणाला ठाऊक आहे चांगल्या चारिञ्याच्या अभावी असलेले बौध्दिक ज्ञान म्हणजे अत्तर चोपडून सुगंधित केलेले निर्जीव शरीर होय.आज तुमचा आदर्श तुम्हांपुढे बसलेले चिमुकले जीव घेणार आहेत.शिक्षक म्हणजे--शि-शिलवंत., क्ष-क्षमाशिल, क-कर्तव्यदक्ष इतके सुंदर जर आपले नामकरण असेल तर जागा ना त्या नावाला, मला येथे आवर्जुन सांगावे वाटते कि सर्वच शिक्षक आसे नाहीत फक्त बोटावर मोजण्या इतकेच शिक्षक आपल्या कर्तव्यात कसुर करताना दिसतात.परंतु आपणाला माहित आहे एक आंबा नासला तर शेतकरी म्हणतो सगळे आंबे नासतील.म्हणुण माझ्या बांधवाना नम्रतेची विनंती आपल्या कर्तव्यापासुन यत्किंचितही ढळू नका.गुरु या प्रतीचा असावा की, ज्याच्या केवळ काल्पनिक अस्तित्वानेही अर्जुनाच्या तोडीचा एकलव्य तयार व्हावा.
पोटार्थी विद्या व्यापारी म्हणजे गुरु किंवा शिक्षक नव्हे.अशी आपली प्रतिमा असायला हवी.
सद्याच्या काळात त्याच चाकोरीबद्ध पद्धतीने शिकवणे कालबाह्य झाले आहे .त्यातुन नव्या ज्ञानरचना वादाच्या निमित्ताने शिक्षकांच्या अंगभूत गुणांना व कौशल्यानाही नवनवे पैलु पडू लागले आहेत त्यातुन आजचा  शिक्षक वेगळ्या वाटा , वेगळा मार्ग चोखाळू लागले आहेत.नुसता काळ बदलतोय असं नाही तर काळानुरुप तंत्रज्ञानही बदलतय, ही बदलाची पावलं ओळखून आजचा शिक्षक तंत्रज्ञानाची कास धरुन पूढील वाटचाल करीत आहे.आदर्श शिक्षक किंवा गुरु समाजाचूया विकासाच रहस्य आहे . हे मानवतेचं मूलस्थान आहे मात्र गरज आहे ते जपण्याची.
थोड लक्षात घ्या, समजा कमरेला धोतर, अंगात कुडता, डोकीला पागोटे, खांद्यावर घोंगडे,हातात एक काठी घेऊन एखादा माणुस रस्त्याने निघाला तर त्याला आपण महात्मा म्हणू ? शक्य नाही.
महात्म्याचे महात्म्य हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबुन असते.असे थोर कर्तृत्व फुल्यांच्या ठाई होते. आणि म्हणुण प्रवाहाच्या विरोधात जाऊन शिक्षकाचे पवित्र कार्य केले. म्हणुण शिक्षकांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले पाहिजे.आणि खरच काही शि क्षक उदात्त भावनेने हे कार्य करीत आहेत .कारण तत्वाने भारलेली माणसे तपशिलाच्या विचारात पडत नाहीत.सर्व कामे आँनलाईन असली तरी शाळेतील शिक्षकांना फक्त  शिकवू द्यायचच काम करु द्याव .
पन्नास कामं शिक्षकांच्या  मागे लावता उदा. खिचडी ,बांधकाम,गावात किती शौचालय आहेत.इ. आणि विचारता गुणवत्ता कशी नाही
या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा .आणि बांकाम अजीबात शिक्षका कडे देऊ नका .किती त्रास देतात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष 
       उत्तम तयारीचे विद्यार्थी  देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालतात हे आमच्या  शिक्षकांनी जाणले आहे त्या दृष्टीने ते काम करीतही आहेत.
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
या दृष्टीने माझ शिक्षक बांधव  तळागाळातील विद्यार्थ्यांना  ज्ञान देण्यासाठी ज्ञान रचनावादी दृष्टीकोन घेऊन पुढे चालला आहे,निश्चितच तो आपला विद्यार्थी  21 व्या शतकाच्या स्पर्धेत समर्थपणे तोंड देण्यास तयार यात शंका नाही 
***********************स्पर्धेसाठी
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
***********************
[8/7, 5:09 PM] ‪+91 98603 14260‬: शिक्षक काल आणि आज
स्पर्धेसाठी
**********************
गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः
     आई वडील हे आद्य गुरु प्रत्येकाचे.त्यानंतर मूल शाळेत जाते .शिक्षक, गुरुजी आता सर ज्ञान देतात. शिस्त लावतात.
अगदी पूर्वी गुरुकुल पध्दत होती गुरुगृही आश्रमात राहून सर्वांगीण शिक्षण घ्यावे लागे.अगदी राम कृष्ण ही गुरुगृही राहून शिकले .तेथे भेदाभेद नव्हता.सर्व नेमून दिलेली कामे करावी लागत.अरुणी ,धौम्य मुनी श्रीकृष्ण सांदिपनी यांच्या गुरुशिष्य कथा सर्वश्रुत आहेत.
   त्यानंतर गुरुंना राजघराण्यात राजवाड्यात मानाचे स्थान देऊन शिक्षण घेण्याची प्रथा सुरु झाली द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु होते.
  गुरु म्हणजे ज्ञानवंत, मार्गदर्शक ते विद्यार्थी घडवतात.संस्कार करतात.
 "छडी लागे छमछम विद्या येई घमघम "
शिक्षकांनी मारले तरी आईवडील काहीही आक्षेप घेत नसत उलट तुझेच काही चुकले असेल अशी तंबी देत त्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त होती .
हे शिक्षक मायाळूही असत हुशार विद्यार्थ्यांचे कौतुकही करत.त्यामुळे मुलांना शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती वाटत असे.शिक्षक मनापासून शिकवत पाढे ,परवचा स्पेलिंग पाठ करवून घेणे प्रसंगी आपला डबा मुलांना देणे त्यांची फी भरणे यामुळे गुरुजनांचा विद्यार्थी आदर करत.त्यांचे ऋण विसरत नसत.
 आताच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. तीन वर्षाच्या मुलाला शाळेत अडकवून त्यांचे शैशव हरपतेय,इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे पेव फुटलेय. त्यामुळे मराठी शाळा शेवटचा श्वास मोजतायत.
 शिक्षकांनाही शाळेत शिकवण्याबरोबरच निवडणुकीची कामे,जनगणनेची कामे कुटुंब नियोजनाबद्दल जागृती अशी इतर अनेक कामे करावी लागत आसल्याने शिक्षक कंटाळतात अक्षरशः पाट्या टाकतात (काही अपवाद असतीलही,)पण त्यामुळे शिक्षक त्रासलेले असतात.त्यात मोबाईलचे वेड विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत पसरलेय त्यामुळे शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे लक्षही नसते पुनः शिक्षा करता येत नाही कारण पालक भांडायला येतात ,त्यामुळे शिक्षकही दुर्लक्ष करतात आता तर काय नववीपर्यंत मुलांना नापास करायचेच नाही त्यामुळे मुले सैराट झालीत .खाजगी शिकवण्या लावल्याने मुलेही शाळेत लक्ष देत नाहीत पगार मिळतोय ना ,मग मला काय त्याचे ?अशी शिक्षकांचीही वृत्ती होऊ लागलीय.
या सा-यात विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय आईवडीलअनिलजी नोकरी करतात आजी आजोबा गावी वा वृध्दाश्रमात सुसंस्कारांचा अभाव शिक्षकही पहिल्यासारखे नाहीत तळमळीने शिकविणारे त्यामुळे उद्याचा विद्यार्थी कसा घडणार.
 दहावी बारावी झाल्यावर मुले सायन्स घेऊन इंजिनिअर डाँक्टर होतात आर्टस कडे ओढा कमीच मग पुढच्या पिढीत विद्यार्थी कसे घडणार घडवणार प्रश्नच आहे,
  संगणकीय शिक्षणाने क्रांती केलीय .अभ्यासक्रमात होणारे बदल, त्याचे योग्य प्रशिक्षण नसलेले शिक्षक त्यामुळे विद्यार्थीही आदर करीत नाहीत,त्यांची टिंगल करतात 
शिक्षकच जर रशिक्षित नसतील सुसंस्कारीत नसतील तर विद्यार्थी कसे घडवणार ,आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो त्याने मन विषण्ण होते हे सारे कुठे घेऊन जाणार काही कळत नाही 
 आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आदर्श शिक्षक बनले पाहिजे आदर्श शिक्षक बनण्यासाठी विद्यार्थी घडविले पाहिजे 
 शिक्षक विद्यार्थी पालक या त्रिसूत्रींवरच मानवी जीवन अवलंबून आहे 
 प्राची देशपांडे
समूह क्रमांक १५
[8/7, 5:26 PM] ‪+91 75880 55882‬: 🌹शिक्षक काल आणि आज🌹
          स्पर्धेसाठी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्नेहलता कुलथे 🌹
***************
   'गुरूविन कोण दाखवीन वाट',अशी एक म्हण आहे,आणि हो ,आपल्या जीवनातील एक विशिष्ट वळण देणारी,वाट दाखवणारी व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे, आपले आदरस्थान शिक्षक .आई प्रथम गुरू आहे ती तर आपल्याला जन्मापासूनच जगण्याचे सर्वच पाठ देत असते परंतु शिक्षक आपल्याला जगाच्या उच्च पातळीवर जगण्यासाठी प्रबळ बनवत असतात.शि-शिस्त, क्ष-क्षमता,क-कार्य या तीन गोष्टीचासंगम घडवतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा ,जगण्याचा एक अविभाज्य घटक असतो शिक्षक.
              शिक्षकाची भूमिका वीसतीस वर्षापूर्वी पाहिलेतर,पायात कोल्हापुरी वाहाणा अंगात नेहरू शर्ट,धोतर किवा पायजमा अशा वेशभुषेत शिक्षक होता.शिकवताना आवाजातील रुबाब,पोर..कशी टर्की भ्यायची.पाढे आलेच पाहिजेत असा अट्टाहास करणारा शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी पाठांतरीत असण्यासाठीआग्रही असायचा.पूर्ण पुस्तक विद्यार्थ्यांना पाठ करायला लावणारा शिक्षक प्रसंगी छडीच्या धाकावर विद्यार्थ्यांना झुलवत असे."छडी लागे छमछम विद्या येई घमघम",अशा प्रकारची गाणी प्रसारमाध्यमांतून देखील प्रसारीत होत.विद्यार्थी देखील शिक्षकांच्या शब्दाचा बाहेर नव्हती.शिक्षक  म्हणजे समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती असा बोलबाला होता.समाजातील लोकांच्या घरातील अडीअडचणी सोडवणारा एक समजुतदार व समंजस सुशिक्षित आदरणीय व्यक्ती म्हणुन त्याची ख्याती होती.गावागावात शिक्षकांचा शब्द कोणी ओलांडत नसत.शिक्षकाला पूज्य मानणारी मंडळी घरातील दैवताप्रमाणे मानणारी मंडळी शिक्षकाला खूपआदर देत असे.
             शिक्षक देखील विद्यार्थ्यांना दैवत मानुन त्याना मनोभावे शिक्षण देत असे ज्ञानाचे अमृत विद्यार्थ्यांना पाजणे संस्कारक्षम   रामायण ,महाभारतातील कथा सांगणे एकच ध्यास शिक्षकाला होता.प्रशासनाने नेमुन दिलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गळी उतरवणेत्याना उच्च पदस्थ करणे व शिक्षणाला धर्म मानणारा शिक्षक शाळेप्रती अर्पितो होता.त्यावेळी विद्यार्थी देखील शिक्षकांच्या प्रत्येक शब्दाला मान देणारा होता.गुरुजी म्हणतील तिच पूर्व दिशा एवढा विश्वास शिक्षकांच्या शब्दावर होता."बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही ".गुरुजींना विचारतो असे वाक्य विद्यार्थ्यांच्या तोंडुन ऐकायला मिळायचे.ज्ञान विद्यार्थ्यांनप्रती पोहचवणे व त्याना समाजात एक प्रतिष्ठीत, मूल्यवान बनवणे हाच ध्यास शिक्षकांना होता.
          दिवसेनदिवस शिक्षणाच्या या प्रवाहात बदल होत गेले.अभ्यासक्रम बदलले.लोकसंख्या वाढली नियमीत पणे शिकवणा-या शिक्षकांच्या भूमिकेत देखील बदल झाले .व्यावसायिक  अभ्यास अभ्यासक्रमात समाविष्ट झाला व कृतीयुक्त अभ्यासाला महत्व आले .परीक्षा पध्दती बदलली.कार्याला,कृतीला,शा.शि.ला महत्त्व आले.व पर्यायाने शिक्षकांच्या भूमिकेत बदल झाला.देशातील निवडणुका असतील जनगणना असेल कुठल्याही गोष्टीची निवड असेल शिक्षकांच्या सहभागाशिवाय तिला पूर्णत्वयेईना गेले व पर्यायाने शिक्षकांच्या हालचालीत बदल झाला .विद्यार्थ्यांना जे ज्ञान दान दिले जात असे त्यात थोडा कोरडेपणा येऊ लागला.राष्ट्रीय कार्यातील कामाला तर शिक्षकाला हातभार लावावाच लागतो त्या ठिकाणी पर्याय नसतो.शिक्षकांच्या अध्यापनाच्या कार्यात थोडा अडसर निर्माण होतो परंतु शिक्षकांनी स्वतःला सावरुन अध्यापनाच्या कार्यात यशस्वीता ठेवली.
         दिलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा व शोधकवृत्तीने प्रश्नाची उत्तरे कशी शोधायची आपल्याला असलेल्या बुद्धीचा वापर करुन स्वयंअध्ययनकसे करायचे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने दिग्दर्शकाची भूमिका पार पाडायला आता सुरुवात केली आहे.
        न्युटन ने ज्या प्रमाणे स्वत: विचार करुन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याप्रमाणे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भावी शास्त्रज्ञ बनवण्याचे काम सध्या  शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांत आत्मजागृती ,ज्ञानरचनावाद जागृत करण्याचे काम व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनवण्याचे काम शिक्षक  करत आहे.विद्यार्थ्यांना चौकोनी चिरा बनवण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षक जात आहे.छडी गेली ..विद्यार्थ्यांन सोबत एकरुप होवुन शिक्षक नाचु गाऊ लागला.विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन हात फिरवु लागला .लेकरही ज्ञानाचे धडे गिरवु लागले.
पर्यायाने विद्यार्थी स्वयंअध्ययनाचे पाठ गिरवण्याचा प्रयत्न करत आहे जेणे करुन भविष्यात येणा-या संकटाला त्याला तोंड देण्याची क्षमता प्राप्त होईल.अशारितीने शिक्षकाला देखील अतिशय काटेकोरपणे स्वत:च्या चारित्र्याला जपावे लागत आहे कुठलीही वाईट गोष्ट करणे शिक्षकाला टाळणे अपरिहार्य झाले आहे.
        पूर्वी शिक्षकाच्या छडीच्या,त्याच्या आदराच्या तालावर विद्यार्थी मोठा झाला संस्कारी झालाखूप मोठा साहेब झाला.परंतु ज्ञानेश्वरानी भिंत चालवली म्हणुन नतमस्तक होणारा विद्यार्थी व शिक्षक आज मात्र भिंत कशी चालवली या गोष्टीचा विचार करतो आहे व तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करुन नासा या वैज्ञानिक प्रयोगशाळेत, मायक्रोसॉफ्टच्या कंपन्या न मध्ये जागतिक पातळीवर देशाच नाव करत आहेत पर्यायाने शिक्षकाचे देखील नाव होत आहे.
       आमच्या शिक्षकांनी ,गुरुजींनी भले ही गुरूकुल पद्धतीत छडीचा धाक दाखवुन श्रमप्रतिष्ठा ,ज्ञान आमच्या अंगी बाणुन आम्हाला शिकवले.परंतु मित्रांनो, आजचा शिक्षक मात्र विद्यार्थ्यांचा मित्र झाला आहे.तो मुलांना सांगतो,तुम्ही डिस्कव्हरी चॅनल पाहा,हिन्दी, इग्रंजी बातम्या ऐक व पाहा .पूर्वी मात्र सिनेमा पाहिला म्हटले की छडी मिळत असे.
        काळ बदलला गरजा बदलल्या स्पर्धा वाढली व शिक्षकाला देखील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासासाठी,"आधी केले मग सांगितले "याप्रमाणे अक्षरशः नाचवावे लागते हो!.शाळेत होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारी साठी विद्यार्थ्यांना अगोदर नृत्य करुन दाखवावे लागते नंतरच ते नृत्य करतात.असा हा आमचा आजचा आदर्श शिक्षक सर्वगुणसंपन्न आहे.पूर्वी ही होता परंतु मुलांच्या कलागुणाना वाव देत त्याचे सुप्तगुण सुद्धा आता प्रकट झाले आहेत व विद्यार्थी देखील मित्रत्वाच्या नात्याने सर ,"तुमच्या मोबाईलवरचे ते देशभक्तीपर गीत दाखवा बरे"!असे म्हणत आहेत.त्याना शिक्षकांचा आदर आहे भिती नाही.
         कालपर्यंत डोळे मोठे करुन,हातात छडी घेऊन शिकवणारा शिक्षक आज मात्र मान डोलवीत ,डोळ्यांच्या खाणाखुणा करत ,गाण्याच्या तालावर हातवारे करत विद्यार्थ्यांन सोबत ज्ञानसागरात मंत्रमुग्ध झाला आहे.
    म्हणुन म्हणावेसे वाटते..
"नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
 सत्यम् शिवम् सुंदरा
विद्या धन दे आम्हास एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा".🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्नेहलता कुलथे 
मोबा 7588055882
क्र.37
[8/7, 5:29 PM] 13 Babu Disuza: साहित्य दरबार - स्पर्धेसाठी :
शिक्षक काल आणि आज :
काल आणि आज या कालसापेक्ष संज्ञा आहेत. काल म्हणजे भूतकाळ. पण तो किती जुना धरावा? आज म्हणजे वर्तमान, सध्याचा चालू काळ. पूर्वीचे गुरू म्हणजे शिक्षकच. प्राचीन गुरूकुलापासून अस्तित्वात असलेला हा वर्ग. वैदिक काळात त्यांचे महत्व अतिशय होते. सांदिपनी, द्रोणाचार्य, शुक्राचार्य आदि आश्रम व्यवस्थेतील शिक्षकच. आचार्य ही पदवी, बिरूद त्यांना आदराने लावले जाई. राजकीय सल्लामसलत देखील राजदरबारी ते देत असत. अश्या गुरूंचे शिष्य देखील त्या तोलामोलाचे असत. गुर्वाज्ञा प्रमाण असे.
कृष्ण, अर्जुन, एकलव्य, कच आदि शिष्य याची उदाहरणे होत. जीव ओतून आपली विद्या, कला शिष्यांना देणारे गुरू समाजात वंदनीय होते. गुरूप्रति शिष्यांना अत्यादर होता. तस्मै गुरूवे नमः म्हणून लीन होत. शिष्यांवर गुरूचा पुर्ण अधिकार असे. प्राप्त केलेल्या विद्येसाठी शिष्य गुरूदक्षिणा देत. गुरूपौर्णिमा त्याचेच प्रतिक आहे. आपापल्या कुवतीनुसार ही गुरूदक्षिणा असे. गुरूंचा चरितार्थ त्यावर चाले. 
काळ बदलला. गुरू गुरूजी झाले. पोटार्थी बनले. अर्थ आणि समाज व्यवस्थेतील बदलाने हे घडले. इंग्रजी सत्तेच्या अंमलात शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली. स्वातंत्र्य मिळाल्यावर अमुलाग्र बदल झपाट्याने होत गेले. 
आजचे शिक्षक प्राथमिक, माध्यमिक असे शालेय वर्षांतले होत. शाळांची वर्गवारी देखील सरकारी, निमसरकारी आणि खाजगी अशी झाली. शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित अश्या खाजगी शिक्षण संस्थांना आता अंतर्राष्ट्रीय विदेशी संस्थांशी स्पर्धा करावी लागते. शिक्षकांची अर्हता डी एड, बी एड, एम एड या पदव्यांनी ठरू लागली. शिक्षकांची वेतन श्रेणी अतिरिक्त अर्हता, सेवा ज्येष्ठता यांवर निर्धारित केली. 
आज शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त अनेक शासकीय कामांना जुंपले जाते. जनगणना, मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेत हक्काने नेले जाते. आरोग्य विषयक सर्व्हे देखील त्यांच्याकडून करविला जातो. अशा शिक्षणेतर कार्यात गुंतल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यावर याचा परिणाम होतो. 
अनेक ठिकाणी सरकारी शाळा एकशिक्षकी असल्याने त्या शिक्षकांवर अतिताण येतो. ग्रामीण भागातील शिक्षकांना शहरात उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने मिळत नाहीत. खेड्यांमधून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने अनेक उपक्रम राबविण्यात अडथळा येतो. शासकीय अनास्था बव्हंशी यास कारणीभूत आहे. अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन अंदाजपत्रकाशी सरकारने निगडीत केल्याने शासकीय दप्तरदिरंगाईमुळे महिनोनमहिने मिळत नाही. विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांना संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या मर्जीनुसार होत राहते. हंगामी स्वरूपात वर्षानुवर्षे अनेक शिक्षक वेठीला धरल्यासारखे काम करीत राहतात. 
मुलांची शिकवणी घरी खाजगी पणे घेता येत नाही. मुलांना साधी छडी ते उगारू शकत नाहीत. पूर्वी छडी वाजे छम छम म्हणत. पालक दुर्लक्ष करीत. आता कायद्यांनी शिक्षकांवर नियंत्रण आणले आहे. 
आजच्या युगात विज्ञानाचा वेग विस्मित करणारा आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षण पद्धतीत बदल करणे भाग आहे. पारंपरिक शिक्षण नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी स्वतः प्रथम टेक्नोसॅव्ही होणे अनिवार्य आहे. यासाठी सरकारने वेळीच प्रशिक्षण आयोजित करायला हवे. 
दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थी आणि पालक यांच्या मनांतून आदर्श शिक्षकाची जी प्रतिमा लोप पावत चालली आहे ती पुनर्स्थापित करून उजळणे राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे. 
:बाबू फिलीप डिसोजा 
निगडी, पुणे ४११०४४ 
@39
[8/7, 5:30 PM] ‪+91 75888 76539‬: 🌹       *स्पर्धेकरीता*   🌹


*शिक्षक काल आणि आज*

शिक्षक हा समाजाचा आधार होता 
आज आहे आणि भविष्यात राहणार
यात कसलीच शंका घेण्याचे कारण उरत नाही.
मागील काळातील सिंहावलोकन करत असताना म्हणजे अगदी रामायण , महाभारतापासून पौराणिक बाबी पाहताना शिक्षकाचे समाजात
स्थान अतिशय आदराचे होते.गुरुकुल
पद्धत फार प्रभावी होती.विद्यार्थ्यांना 
आईवडीलाना सोडून गुरुगृही रहावे
लागायचे.गुरुची प्रामाणिकपणे सेवा
करायची , दिलेली विद्या नितांत निष्ठेने अर्जन करायची.त्यामधून कसे विद्यार्थी घडायचे यांची उच्च प्रतीची 
उदाहरणे म्हणजे, कर्ण , अर्जून , 
भीम , अशी कितीतरी उदाहरणे आहेत.सर्व काही गुरु अशी समर्पण
भावना असायची .त्यामुळे गुरुला सुद्धा सर्वकाही अध्यापन मोठ्या 
जबाबदारीने पार पाडावे लागायचे.
           स्थित्यंतर हा काळाचा नियम
आहे आणि ते होतेच.तशाच पद्धतीने काळ बदलला तशी शिक्षणाची समीकरणं बदलली.गुरुकुलाचे शाळेत
रुपांतर झाले आणि गरजेनुसार 
म्हणा किंवा नवीन बदलानुसार शाळा गावात आल्या.शिक्षकांच्या भुमिकेतही बदल झाला.मागील चाळीस पन्नास वर्षाच्या शैक्षणिक मार्गक्रमणात शिक्षक अतिशय काळानूसार विद्यार्थ्यांना घडवत आले.
दर्जा अतिशय चांगला ठेवण्याचे कार्य 
शिक्षकानी केले.पण हळूहळू बाह्य 
देशातील शैक्षणिक प्रयोगांचा परिणाम आपल्या शिक्षण पद्धतीवर होता होता
जीवनाच्या सर्वच बाबीवर होत गेला.
तरीही शिक्षकानी आपली भुमिका प्रामाणिकपणे पार पाडत आणली.
शैक्षणिक बदल करताना आजच्या काळात म्हणावं तसं शिक्षकांना वैचारीक मंथनात न घेता शिक्षण तज्ञानाच विचारात जास्त प्रमाणात घेण्यात आलं परिणामी शिक्षकांची भुमिका पूर्णपणे बदलली.
शिक्षकांना शैक्षणिक स्वातंत्र्य खर्या
अर्थाने दिलं गेलं नाही अस वाटतं.
आजच्या शिक्षकावर किती जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव
सर्व समाजाला झाली पाहिजे.

🔹निवडणूक
🔹जनगणना
🔹गाव सर्वेक्षण 
🔹शालाबाह्य सर्वेक्षण 
🔹मतदार याद्या बनवणे
अशी कितीतरी अशैक्षणिक कामाची
यादी सांगता येईल की, या एवढ्या 
ओझ्याखाली आजचा शिक्षक शैक्षणिक कार्य करतोय याची नुसती
कल्पनाच केलेली बरी.तरीसुद्धा आजचा शिक्षक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतोय.
खरच विचार केला तर शिक्षकांची 
कार्य काय आहेत? आणि आज 
सरकार काय करवून घेतय याचा
ताळमेळ बसतोय का? 
आजच्या शिक्षकाला बहुवर्ग अध्यापन 
करावे लागते .विद्यार्थी संख्या जास्त 
असेल तर त्या शिक्षकांची किती 
तारांबळ होते ,वर्णन करुन सांगताच
येणार नाही.मात्र सर्वजण अपेक्षा मात्र खूप ठेवतात.
अधिकारी येतात प्रशासकीय नियमाप्रमाणे सर्व करा म्हणतात.
होय खरं आहे ते पण कमतरतेच्या
बाबी त्याना सांगितल्या की म्हणातात
तसा अहवाल द्या.
शिक्षकानी असे वागले पाहिजे असेच
काम केले पाहिजे अमुक बाबींची पुर्तता केली पाहिजे .आणि त्यात एखादा शिक्षक चुकीचं वागला की
मग काय सर्व शिक्षकच चुकीचे असा भाव समाजात तयार होतो.शेवटी असे
म्हणता येईल की समाजाला आदर्शवतच शिक्षकाने असावे.पण त्याना काम करण्यात येणाऱ्या अडचणी याचाही विचार झाला पाहिजे.आजही शिक्षक त्याच्या 
कर्तव्याशी प्रामाणिकच आहे.आजही 
खेड्यापाड्यात शिक्षकांना अतिशय 
मानाचे स्थान आहे ते केवळ त्याच्या 
प्रामाणिकपणाचा पुरावाच होय.
अशैक्षणिक कामाचे ओझे जर कमी झाले तर नक्कीच हा महाराष्ट्र प्रगत
झाल्याशिवाय राहणार नाही.
अहो देशातील पिढी आजही शिक्षकावरच अवलंबून आहे .अधिकारी असोत , वैद्य असो
मंत्री असोत, अहो हे घडले तर शेवटी
शिक्षकांच्या संस्कारानेच.म्हणूनच असे वाटते की आजचा शिक्षक शैक्षणिक कार्य उत्तम प्रकारे करत आहे व पूढे
करतच राहिल यात शंका नाही.

              *जय गुरुदेव*

  *चौधरी बालाजी माधवराव*

              *लातूर*

🙏🏼🙏🏼
[8/7, 5:32 PM] 6 Kalpna Jagadale: *शिक्षक :काल आणि आज*

==================

शिक्षण ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे . आणि याचसाठी शिक्षक या संस्थेची स्थापणा या शिक्षण प्रक्रियेसाठी सुयोग्य व्हावे म्हणुन केली आहे.

शिक्षक काल नि आज हा खरच खुपच चर्चापरामर्श करण्याचा आजच्या काळाचा मुद्दा बनत चालला आहे. आपल्या वाडवडिलांच्या म्हणजे कालच्या काळातील शिक्षक हा स्वच्छ,पारदर्शी नि सच्चा होता असेच म्हणावे लागेल. गुरूजनांना मान,सन्मान,आदर होता.तसेच गुरूजी आले म्हटले तरी मनात धडधड सुरू व्हायची कारण ती भिती आदरयुक्त होती. आणि मुलही तितकीच आज्ञाधारक,सुसंस्कारक्षम होती. 

पुर्वीच्या काळी ज्ञान हे गुरूकुलातुन दिले जायचे.त्यामुळे गुरू नि शिष्य या दोन माध्यमात विचारांचे आदानप्रदान थेट होत असे. ना अडथळा ना  कोणतीही आडकाठी. ज्ञानासोबत गुरू हे जीवनकला देखील शिकवत.

काही वर्षापुर्वीपर्यतही गुरूजींना खुपच मानाचे स्थान होते.मला आठवतात माझे गुरूजी जे डोंगरउताराहुन चालत आलेले नि ते आले म्हणजे नऊ वाजले रे म्हणारे आम्ही मुल. मला आठवतात त्या बाई ज्या गुडघे दुखत असतांनाही व सेवानिवृत्तीला दोन दिवसच असतांनाही शाळेत येवून पाय लांबवून का होईना पण प्रत्येक मुलीला जवळ घेवून शिकवणाऱया. अश्या गुरूप्रती मान झुकते नेहमी हे तितकेच खरे.

परंतुपरिस्थीती बदलली नि
कालही बदलला वेळही बदलली नि सगळी समिकरणेच बदलली.तसेच जी साचेबंद शिक्षकाची व्याख्या होती ती काळ परत्वे बदलली.आजचा गुरू हा केवळ ज्ञानदाता राहिला नाही तर तो *पैसे दया नि ज्ञान घ्या* या व्याख्येत मोजला जाऊ लागला आहे.

खरतर आजची शिक्षण पद्धतीच मुळात चुकीची बनत चालली आहे.क्लासेसच्या नावाच्या विळख्यात हे शिक्षण व शिक्षक गुरफटला आहे. आजच्या शिक्षणाचे जणु बाजारीकरणच सुरू झाल आहे. आणि मग आमचा गुरूजी बिघडलाचा सुर सुरू झालाय. खरतर आजचा पालकच श्रीमंत झालाय म्हणुन त्यास वैयक्तीक शिकवणी हवी मग पैसे कितीही मोजु.नि मग शिक्षक गडगंज झाला नि मग तो व्यसनाधिन,जुगारी,नि अजुन खुप काही करू लागला पण हे कोणामुळे?  *एका गुरूजीमुळे* सगळे का बदनाम ? करणारे करतात नि गव्हाबरोबर मग किडेही रगडतात हेच खरे.

आजही जीव तोडीन शिकवणारे शिक्षक आहेत न पण त्यांकडे कोण लक्ष देतो ? पैसे देवुन आदर्श पुरस्कार मिळवणारे गुरूजी नि नेतेलोकांच्या पुढेपुढे करणारे गुरूजी नेहमीच चमकतात नि खरे काम करणारे मात्र मागेच राहतात.पहा आजही तांडावस्तीवर स्वतांचे  शिक्षणोपयोगी अँप्स करणारे आधुनिक गुरूजी आहेत.काही ठिकाणी टँबद्वारे शिकवणारा शिक्षक आजही विदयार्थ्याचाच विचार करतोय.कितीतरी शिक्षक आजही तळमळीन शिकवतात परंतु त्यांची कोणी दखल घेत का ? त्यांनाही प्रोत्साहन दया, कौतुक करा नि मग बोला तुमचा गुरूजी धाब्यावर दिसला. शासनान अशा शिक्षकावर कठोर कारवाई करत नाही तर काही ग्रम तांदुळात घोळ येतो म्हणुन तडकाफडकी निलंबन ?  परिणाम काय आमच्या त्या प्रामाणिक शिक्षकाला त्यांचा प्रामाणिकपणा जीव देवून सिद्ध करावा लागतो. 

हे सगळ विवेचन करण्याचा हेतु एकच की शिक्षक काल आणि आज हा एकसारखाच आहे. परंतु समाजाची शिक्षणाची व्याख्या बदलली नि काही शिक्षक बदलल्यामुळे शिक्षक बदलला हा ठपका शिक्षकावर पडला इतकेच. आजही खऱया शिक्षकाची कमतरता नाही.म्हणुनच मी म्हणेन शिक्षक काल आणि आज हा एकसारखाच आहे फरक इतकाच की हाताच्या पाच बोटासारखा....

🖊🖊🖊📝🖊🖊🖊

कल्पना जगदाळे@8★बीड


    *👆🏽स्पर्धेसाठी👆🏽*
[8/7, 6:00 PM] 13 Babu Disuza: ५.५५ पर्यंत स्पर्धक 
१.सुभद्रा खेडकर 
२.श्रीपाद पटेल 
३.प्रमोद जगताप 
४.बाबू डिसोजा 
५.सुनील अस्वले 
६.किशोर झोटे 
७.मीना सानप 
८.प्राची देशपांडे 
९.स्नेहलता कुलथे 
१०.बालाजी चौधरी 
११.कल्पना जगदाळे
[8/7, 6:06 PM] 59 Sangita deshamukh Vasmat: *शिक्षक कालचा आणि आजचा*
  

आपल्या देशात प्राचीन रामायण-महाभारतामधील गुरूपासूनचा  प्रवास आज 'टिचर' पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्याकाळी राजघराण्यातील मुले गुरूगृही  जाऊन वेगवेगळ्या विद्या,ज्ञान संपादन करीत असत. गुरू आणि शिष्याच्या नात्यात कुठलाही किंतु नसायचा. जीवनाला  योग्य वळण देण्याचे काम गुरू करीत असत,किंबहुना तेच आपले जीवनकार्य मानत असत .राजानी दिलेली गुरुदक्षिणा ही ऐच्छिक  असायची. गुरू गरीबच असत. तरी त्यांच्याघरी राजपुत्रानी दैनंदिन कामे करणे ही गुरूसेवा समजली जायची. आणि ही गुरुसेवा राजपुत्र अगदी निष्ठेने करीत असत. गुरू आपल्या कुवतीनुसार राजपुत्राना निसर्गाच्या सहवासात शिक्षण देऊन कर्तव्य पूर्ण करीत असत.म्हणूनच -
"गुरुर ब्रम्हा,गुरुर विष्णू,गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरुवर्ये नम:||"
एवढा गुरुप्रति आदरभाव त्या  शिष्यालाच  नाहीतर समाजाला सुध्दा होता.द्रोणाचार्यासारखा गुरू,एकलव्यासारख्या  शिष्याला विद्या न देताही गुरुदक्षिणेचा मात्र दावेदार ठरायचा! त्यात पीडित एकलव्याला किंवा समाजालाही ते गैर वाटत नसे.
        त्यानंतरच्या काळात या गुरूचे स्थान व्यावसायिक 'गुरूजी'नी घेतले. गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते घनिष्ठ असायचे. हे  गुरुजी फक्त शाळेतील विद्यार्थ्यांचाच मार्गदर्शक नसायचे;तर त्या गावातील सर्व कारभार,लग्ने,महत्वाची कामे यात मार्गदर्शन करण्याचे कामही गुरूजीनाच करावे लागायचे. कोणत्याही कामात त्यांचाच सल्ला महत्वाचा ठरायचा.म्हणूनच शेतातली नवाळी असो,घरातील शिजलेला नवा पदार्थ असो,आधी गुरुजीच्या घरी अगदी नित्यनेमाने, सेवाभावाने आणि व्रतस्थपणे जात असे.शिक्षक हे शाळेपुरते मर्यादित नसून त्यांची बांधिलकी समाजाशी असायची.मिळणाऱ्या  तुटपुंज्या पगारात संसार चालवून ते समाधानी असायचे. निर्व्यसनी,सालस,कर्तव्यनिष्ठ,कर्तव्यतत्पर असायचे. विद्यार्थ्याशी भावनिक नाळ चांगली जोडलेली असायची. विद्यार्थ्याला घरची अडचण असो अथवा शाळेची,शिक्षक हे  भावनिक,मानसिक,सामाजिक  आधारस्तंभ  वाटायचे. शिक्षक असूनही गावाशी,शेतीशी नाळ जोडलेली असायची.म्हणूनच समाज व विद्यार्थी त्या शिक्षकाकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आदराने पाहायचे. विद्यार्थी सुध्दा आपले आदर्शस्थान,श्रध्दास्थान म्हणून आपल्या शिक्षकाकडे पहायचे. आणि त्याकाळी आदर्श मानावा असे जीवनमान सर्वच शिक्षकाचे असायचे. शिकवण्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा विद्यार्थी घडविण्यात जास्त आनंद असायचा.
          हे झाले कालपर्यंतचे शिक्षक! आपण आपल्या वडिलाना,आजोबाना त्यांच्या शिक्षकाबद्दल बोललो तर आजचा शिक्षक आणि कालचा शिक्षक यांच्यातील बदलते स्वरुप आपल्या लक्षात येईल. कारण  आजचा शिक्षक हा आज आपणासमोरच आहे. आज सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि गुरूपासून गुरुजी,आणि गुरुजीपासून टिचर असे स्वरुप बदलत गेले.इंग्रजीपुढे  मायबोलीतला गोडवा जसा सपक झाला तसा गुरुजीमधला आदर कमी होऊन विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्याही नजरेत आजचा शिक्षक हा "आधर"झाला. काळ बदलतो तशा सर्वच बाबी बदलत जातात. तसे शिक्षणक्षेत्रात फारमोठे संक्रमण झालेले आहे.आजच्या शिक्षकाची गावाची नाळ तुटली. त्यांच्या मनाला आणि पायालाही ओढ ही शहराची लागली. मातीच्या सहवासातून येणारा मनाचा ओलावा कमी झाला आणि शहरातील फ्लॅटमध्ये राहून भावनाही फ्लॅट व्हायला लागल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापुरताच संबंध उरला. त्याहीपलीकडे आजच्या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकापेक्षा बाहेरच्या खासगी शिकवणी घेणारा पोटभरू ( गल्लाभरू )शिक्षक हा जवळचा वाटू लागला.आजच्या पालकांचाही विश्वास हा शाळेतील शिक्षकापेक्षा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावरच अधिक दिसून येतो.आजच्या शिक्षकांचाही  शाळेत विद्यार्थ्याना शिकवण्यापेक्षा त्याच विद्यार्थ्याना खासगी शिकवणी घेऊन शिकवण्याकडे कल वाढला आहे.पूर्वीसारखे आजही आधुनिक  द्रोणाचार्य पुन्हा दिसू लागले. त्या द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता त्याचे श्रेय घेतले होते,त्यानी अगंठा मागितला होता. आजचे खासगी शिकवण्या घेणारे द्रोणाचार्य हे असेच आपण न शिकवलेल्या पण  यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव  आपल्या फ्लेक्सवर लावून त्याचे श्रेय घेताना दिसून येतात. म्हणूनच एक यशस्वी विद्यार्थी एकाचवेळी  अनेक फ्लेक्सवर झळकताना दिसतो. वेतनातून मिळणारा पैसा कमी वाटू लागल्याने की काय,शिक्षकी नोकरीसोबतच अजून एखादा जोडधंदा स्वीकारण्याकडे कल वाढला. त्यामुळे आपोआपच शिक्षकी पेशावरची निष्ठाही ढळली. हे सांगण्याचे वैषम्यही वाटते की,आजच्या शिक्षकाजवळ पहिल्यापेक्षा अधिक पैसा जवळ खुळखुळु लागल्याने आजचा शिक्षक व्यसनाधिन  बनला आहे. संध्याकाळी गावातील लोकांसोबत गावच्या  पारावर बसून लोकांशी नाळ जोडणारा  शिक्षक आज संध्याकाळी नित्यनियमाने  बारमध्ये बसताना दिसतो.आजचे सर्वच शिक्षक असे  आहेत असे मी म्हणणार नाही,याला काही सन्माननीय अपवादही आहेत,जे की आजही अनेक विद्यार्थ्याना ते दिपस्तंभच  वाटतात. आजचेही अनेक शिक्षक समाजोपयोगी कार्य करताना,समाजाशी नाळ जोडलेले दिसून येतात.पण खेदाने सांगावे लागते की,हे प्रमाण फार कमी आहे. आज जिल्हा परीषदेच्या शाळा ह्या फार मोठ्या संक्रमणातून जात आहेत. त्या अनेक शाळानी आज कात टाकलेली आहे.अनेक शाळातील शिक्षक फार मोठ्या जिद्दीने या बदलासाठी पेटून उठलेले दिसून येत आहेत.आणि हा बदल गरीब,ग्रामीण विद्यार्थ्यासाठी खूप मोठी पर्वणी ठरणार आहे. स्वामी विवेकानंद यानी  म्हणाले होते की ,If a poor student can not come to education,education itself must go at his doorsteps .आजचा शिक्षक हा गरजूपर्यंत ज्ञान घेऊन पोहोचला आहे.यातून अनेक संवेदनशील लोकांच्या मनाला कुठूनतरी एक आशेचा किरण दिसू लागला आहे,पुन्हा एकदा खूप मोठ्या काळानंतर गरीबांसाठी शिक्षण येवू पहाते आहे. हा आशादायी बदल चिरकाल टिकावा एवढेच! त्यासोबतच आज शिक्षकावर आलेल्या शिक्षणेत्तर कामाचा बोजा कमी झाला तर,शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक वेळ देईल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.असे घडले तर पुन्हा एकदा समाज- विद्यार्थी-शिक्षक यांचे नाते दृढ होईल. साने गुरुजी म्हणतात,
"तुम्ही आदर्श असाल की नाही माहीत नाही,पण तुमच्यापुढे बसलेले १५०-२००विद्यार्थी मात्र तुम्हाला आदर्श मानतात. त्याप्रमाणे आपले आचरण असावे!" एवढे जरी आजच्या शिक्षकाने मनावर बिंबवले तर  आजचा शिक्षक स्वत:च्याही मनात आदर्श बनू शकतो.

*संगीता देशमुख@१४*
[8/7, 6:08 PM] Gajanan patil: शिक्षक काल आणि आज 
*ज्ञानाची उगम गंगा*
*स्तंभ जगाचा ज्ञान*
*शिक्षक ज्ञान कुंभार*
*दुर सारतो अज्ञान*
शिक्षक ज्ञानाचा भांडार जगातील सर्वात सुंदर परमेश्वरानी निर्मिती केलेली एक अनमोल ठेवा म्हणजे *शिक्षक* गुरू ज्यांच्या पासून सर्व अज्ञात असलेल्या सर्व काही गोष्टींचे ज्ञान जड जीवाला मिळत असते म्हणूनच मानवाला गुरू खेरीज ज्ञान, शिक्षण , माहिती मिळत नाही पुर्वी किंवा आताही थोडा फार बदल झाला आहे परंतु इतरा पेक्षा अधिक संवेदनशील करुणेचा प्रेमळ झरा शिक्षक प्राणीच आहे हे विसरून चालणार नाही युग बदलत गेले तसेच पद्धती सुद्धा बदलत गेल्या पुर्वी गुरुकुल पद्धत होती विद्यार्जनासाठी
गुरू गृही रहावे लागत होते उदाहरणार्थ श्रीराम, श्रीकृष्ण सुदामा, बलराम ,अर्जुन,सर्व काही जे गुरूनी सांगितले कामे करावी लागत होती ते आनंदाने स्विकार करायचे *''गुरूंची तुम्ही पाळावी अज्ञा खरे बोलण्याची करावी प्रतिज्ञा"* यामुळे सर्व जीवन समृद्ध होऊन एक नवीन दिशा मिळत असे काळानुरूप बदल घडत राहिला एकेकाळी शिक्षक म्हणले की समाजात एक वेगळेपण आणि त्या शिक्षकांची मुलांवर संस्कार आणि एक वेगळेपणाची छाप होती ती आज दिसत नाही याचे परीक्षण करणे गरजेचे आहे आज ही आदर्श शिक्षक आहेत नाहीत असे नाही पण काही गुरूजनांच्या वाईट  कृत्यामुळे सर्व शिक्षकवृंदावर याचे शिंतोडे माळले जातात आज बरेच  शिक्षक वाम मार्गाने वागताना समाजात दिसतात व्यसन,दारू,जुगार,खेळताना ही दिसतात हे निंदनीय आहे यामुळे एक समाजातील जे आदर्शवत स्थान होते ते कुठेतरी गमावल्या सारखे वाटते यामुळेच सोशल मीडियावर जास्त विनोद वाचायला मिळतात ते शिक्षकवर्गावर 
दुसरी गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आज या स्पर्धेच्या युगात जि.प्र शाळेतील प्रचंड विद्यार्थी घट होते याचे कारण नेहमी शिक्षणा पेक्षा शिक्षकावर जास्त बोजा पडला तो म्हणजे *कागदी घोड्यांचा* यामुळे शिक्षण सोडून त्यांना जास्तीचे इतरत्र कागदपत्रात गुंतवून ठेवले आहे यामुळेच पालक वर्ग जिल्हा परिषद शाळेकडून इंग्रजी माध्यमाकडे ओढला गेला आहे कधी कधी प्रामाणिक शिक्षकांना इच्छा असूनही मुलांकडे लक्ष देता येत नाही याचे त्यांना जास्त दुःख होते म्हणून शासनाने शिक्षकाकडील हे इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकच काम फक्त शिक्षण शिक्षण येवढेच ठेवले तर अजुन खुप भविष्य सुंदर सुखकर होईल यात शंका नाही 
           गजानन पवार @81
[8/7, 6:37 PM] nagorao26: *शिक्षक काल आणि आज*    
मानवाच्या जडणघडणीत ,सामाजिक,सांस्कृतिक व आत्मिक उन्नत जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात एका शिक्षकाची नितांत आवश्यकता असते ; किंबहूना त्याशिवाय जीवन साफल्य अशक्यच. शिक्षकाचे महत्त्व अन्यन्यसाधारण असले तरी आजचा  शिक्षक व कालचा शिक्षक यात बराच बदल झालेला आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. यापूर्वीचा शिक्षक केवळ विद्यार्थी विकास कसा होईल, प्रत्येक काम आपले परमकर्तव्य समजून करायचा आताचा शिक्षक म्हणजे— मोले घातले रडाया  | ना आसू ना माया | त्याला स्वत:चे कर्तव्य व सामाजिक बांधिलकी याची जाणीव राहिलेली नाही. तो स्वार्थी बनला आहे स्वत:च्या पलीकडे ही एक सुंदर विश्व आहे व आपण त्याचे अविभाज्य घटक आहोत याची जाणीव आजच्या शिक्षकास झाली तर सामाजिक क्रांती होईल. यासाठी पुढील आचारसंहिता पाळणे गरजेचेआहे. 
१) वास्तविक जीवन कसे जगावे याची विद्यार्थ्यात जाणीव निर्माण करणारा.
२) राष्ट्रीयमूल्यांची व नैतिक मूल्यांची जोपासना करणारा 
३) वैज्ञानिकदृष्टी विकसित झालेला 
४) आधुनिकता व परंपरा याचा समन्वय साधणारा 
५)काळानुरूप स्वत:मध्ये बदल करणारा   
अशा गुणानी युक्त असलेल्या शिक्षकाडून प्रचलित समाजाच्या अपेक्षापूर्तीची शक्यताआहे. आजचा शिक्षक सामाजिक बांधिलकी सांभाळणारा असावा अशी मापक आभिलाषा समाजाने तरी का बाळगू नये ? म्हणून *ज्याच्या हाती शिक्षणाची दोरी | तो समस्तासी उद्धारी ||* या न्यायाने  आपले वर्तन, बोलणे व एकंदरीत सर्व व्यवहार प्रगल्भेतून करावे. असा आजचा शिक्षक असावा.
    *- माधवराव संभाजीराव वारले*
     *उच्च श्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक* 
*जि.प.प्रा.शा. माचनुर ता. बिलोली*

ग्रुपबाहेरील स्पर्धेसाठी
=================************=====================












3 comments:

  1. खूप छान विचारांना चालना मिळते लेखनकलेचा आस्वाद घेता येतो

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या अभिप्राय बद्दल

      Delete
  2. खुप सुंदर विचार " शिक्षक काल आणि आज " याबद्दल आपले बांधवानी मांडले. सर्वांचे अभिनंदन.

    ReplyDelete