नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 2 August 2016

उपक्रम - " माझे भाषण "*

भाषण करणे ही एक कला आहे. सर्वानाच भाषण करता येते असे ही नाही. आज कित्येक जणाना भाषण करण्यासाठी उभे केले की ते  सारे विसरतात. काही काही तर भाषण करणे नको म्हणून त्यापासून दूर पळतात. ही भाषण करण्याची कला शालेय जीवनापासून जर विकसित करण्यात आली तर भविष्यात मुले न भीता, न घबराता अगदी बिनधास्तपणे बोलू शकतात. यासाठी गरज आहे सहशालेय कार्यक्रमात भाषण स्पर्धा आयोजित करणे, विविध जयंती आणि पुण्यतिथी किंवा उत्सव, सण, राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना भाषण करण्यास प्रोत्साहित करणे
याच विचारातून मग *" माझे भाषण "* नावाच्या उपक्रमाचा जन्म झाला.
15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीया साठी मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. संपूर्ण भारतात हा दिवस स्वातंत्र दिन म्हणून ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने या दिवशी मुलांनी भारतीय स्वातंत्रलढा मध्ये सहभागी असलेल्या क्रांती कारक आणि शूरवीर व्यक्ती विषयी आठवण काढून विनम्र अभिवादन करण्यासाठी *" माझे भाषण "* ह्या कार्यक्रमाचे नियोजन करून प्रत्येक इच्छुक मुलास भाषणा ची स्क्रीप्ट तयार करून दिली.
मुले कामाला लागली यावर्षीचा 15 ऑगस्ट त्यांच्यासाठी जरा वेगळा अनुभव देईल आणि मला सुध्दा एक चांगला सुखद अनुभव देईल असे वाटते. पाहू या *" माझे भाषण "* कितपत यशस्वी होते ते.
भाषणाची स्क्रिप्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

www.nasayeotikar.blogspot.com







धन्यवाद

1 comment: