नागोराव सा. येवतीकर

Saturday, 18 June 2016

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 9वा )-नववा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - 19/06/2016
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00
★★★★★★★
*खास वटपौर्णिमेनिमित्त*
††††††††††††††††††
========

*मी आजची सावित्री ; नाही भित्री*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.आप्पासाहेब सुरवसे,  लाखणगांवकर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री ना .सा. येवतीकर
************************
💥 परीक्षक -  *वृषाली वानखडे अमरावती*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स - बी. क्रांति सर
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक 20 जून 2016 रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702
**********#########***********####$$$*********$$$$$$
[6/19, 11:46 AM] ‪+91 86980 67566‬:
 *मी आजची सावित्री-नाही भित्री*
पुराण कालापासून स्रीयांबाबत समाजाचा दृष्टीकोन चांगलाच आहे असं म्हणता येत नाही.पण कांही ठिकाणी स्रीयांचे चांगले चित्र उभं केलेले आहे.खरं तर स्त्रीयांचे कर्तृत्व हे तेव्हाही चांगलेच होते आजही चांगलेच आहे.तेव्हापेक्षा आज अधीक जोमाने आणि धाडसाने स्त्रीचा वावर दिसतो आहे.'चुल आणि मुल' चा जमाना केव्हाच माघं पडला आहे.मनुसंस्कृतीत आडकलेली प्रवृती स्त्रीयांना हिन वागणूक देत आलीआहे..पडद्यामध्ये स्त्रीयांना ठेऊन हवा तसा
तिचा भोग घेत आलेला समाज विचाराने फार प्रगल्भ झाला आहे असं आजही म्हणता येत नाही. पण आपल्या बुद्धीने आणि जिद्दीने स्त्री पुढे पुढे जात आहे. इंग्रजांचे जुलमी राज्य होते पण सुधारणावादीपण होते हे मात्र नक्की.म्हणूनच
लार्ड बेंटिगच्या प्रयत्नाने आणि राजाराम मोहन राय या भारतीय सुधारकाच्या मेहनतीने जुलमी सती प्रथा बंद झाली. स्त्री स्वातंत्र्यावर जुलमी आणि जाचक असणारी ही प्रथा स्त्रीयांना दुय्यम स्थान दर्शविणारी अशीच होती. पुराणात आणि इतिहासात अनेक स्त्रीया या नावलौकिक आणि कर्तृत्व गाजवून गेल्या आहेत.पण त्यांचा उदोउदो
समाजापुढं हवा तेवढा झाला नाही,होऊ दिला नाही.पुरुषप्रधान संस्कृती आणि पुरुषीअहंकार
नेहमीच स्त्रीयांना दुय्यमस्थानी ठेवत आला आहे. आपल्या मनगटातील नेटानं तिनं दाखवलेला
एखादा पराक्रमही पुरुषांना पचनी पडत नाही.
शिक्षणापासून कोसोदूर असणारी स्त्री केवळ भोग वस्तु म्हणून होती. तिला ना विचाराचे स्वातंत्र्य ना आचाराचे वा बोलण्याचे स्वातंत्र्य होते.रुढी आणि परंपरा जपण्याचे वा त्या सक्तीने पाळण्याचा जणू तिच्यासाठी दंडकच होता.घरातील कर्त्यापुरुषाने घेतलेला निर्णय आणि लादलेली जबाबदारी तिला विनाविरोध निभवावी लागत असे.बालविवाह सारख्या अनिष्ठ रितीने तर बालपण हरपून आणि करपुन जात असे.पुराणात रामाबरोबर सीतेला वनवास भोगावा लागला,उर्मिलेला तर घरी राहून का वनवास सहन करावा लागला....? भर सभेतच द्रौपदीचे वस्त्रहरण,रामाचा सीता त्याग तिची अग्नीपरीक्षा काय काय आणि कशी कशी वागणूक केली आहे स्त्रीबरोबर.भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातही शत्रुचीं पहिली शिकार स्त्रीच होत आली आहे,अगदी आजही तीच गत आहे.
ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांच्या लौकिक प्रयत्नामुळे चित्र बदलत गेलं.पण प्रवृत्तीची मुळं खोल खोल रूतलेल्या समाजाला शिक्षण घेतलेली स्त्री पण रुचेना गेली.भ्रामक कल्पना आणि परंपरेला चिकटलेला माणूस मुलीला जन्म देण्यापासून स्वत:ला रोखू लागला.मुली आईच्या गर्भातच गुदमरु लागल्या...त्या तिथंच मरु लागल्या, त्यांना तिथंच मारले जाऊ लागले... मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर घटला,समाजात असमतोल निर्माण झाला.गुन्हेगरी,बलात्कार अतिप्रसंग,विनयभंग ना ना प्रकार वाढत गेले,चाललेत.हुंड्यासारख्या प्रथा मुलींच्याबापाला
पापेच्या वाटेला घेऊन जातात...हुंडा देऊनही मुलीच्या सुखाची शाश्वती नसते.मग मुलीलाही आपल्या जन्माचं ओझं होतं,स्वत:ला शोधते आणि स्वगत म्हणते.....,
       स्त्री म्हणून
दु:खानं भरलेली दुनिया सारी
पण माझं दु:ख आगळं सर्वापरी
स्त्री म्हणून मी जन्माला आले
आई वडिलांनाही दु:खच झाले...!
   मातेनेच जन्म दिला पुरुष मुलांना
   मग तुच्छ का लेखावे स्त्री मुलींना
   स्त्री म्हणून मी जन्माला आले
   जगण्यातला आनंद विसरुनच गेले....!
वयाआधिच लग्न उरखले
हुंड्यासाठी त्यांनी छळले
स्त्री म्हणून मी जन्माला आले
जीवणात मी कित्येकदा मेले....!
   तोडण्या रुढी श्रृंखला घेते मी पुढाकार
   तेव्हा समाजच करतो माझा धिक्कार
  स्त्री म्हणून मी जन्माला आले
  अन्यायाशिवाय कांही न भोगले..!
फार भोगले फार सोसले
लढण्या आता सिद्ध मी जहाले
भावनेने पेटले स्त्रीत्वाच्या
तोडीन श्रृंखला पुरुष बंधनाच्या..!!
या भावनेचा उद्रेक झालेली आज स्त्री दिसते आहे.सैराट जीवनशैली जगणयाची आस घेऊन पुढं आलेली स्त्री सर्वक्षेत्रात व्यापून राहिलेली स्त्री धाडशीच म्हणावी लागेल.खेळ,शिक्षण,व्यवसाय,संगीत,आकाश,
विज्ञान तंत्रज्ञान कोणतं कोणतं क्षेत्र शिल्लक नाही
जिथं स्त्री पोहचली नाही.जखम बरी होते पण ओरखडा किंवा व्रण शिल्लक राहतो त्या प्रमाणे
स्त्री कितीही पुढं गेली किंवा आकाश कवेत घेतलं तरी दर्जाहिन प्रवृतीना ही गोष्ट पचत नसते..तेव्हा या धाडसी महिला, पोरींच्या जिद्दीला आणि धाडसाला आपण पुरुषांनी ताकद दिली पाहिजे.जी मी दिली आहे......मी स्वाभिमानाने सांगतो आणि वागतो आहे दोन मुलींचा बाप म्हणून....! मला दोन मुलीच आहेत याची खंत नसून अभिमान आहे मला.भयमुक्त जीवन जगण्याचा आपल्याएवढाच मुलीना,आजच्या सावित्रीनां आधिकार आहे.तसं त्या भित्र्या मुळीच
नाहीत पण गरज आहे ती फक्त तुमची आमची विचारसरणी बदलण्याची. तीच्या धाडसाला तुमची ताकद लावण्याची.........कारण ती तर म्हणतेय......"देखना ही चाहते हो मेरी उडान को
तो जरा उंचा करो आसमान कों..|"

               श्री.हणमंत पडवळ
           मु.पो.उपळे(मा.)ता.उस्मानाबाद.
                8698067566.
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
[6/19, 1:35 PM]
मी आजची सावित्री   नाही भित्री

पुराणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आजचा वटसावित्री पुजनाचा उत्सव सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणी तेव्हापासुन ही सावित्री आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाला साकडे तो एक श्रध्देचा भाग आहे
        आज स्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते नव्हेनव्हे त्याच्यापेक्षाही जास्त व चांगले काम महिला करते तरीही तीला घरात दुय्यम स्थान का
 आज मुलीचे प्रमाण कमी आहे तीला गर्भातच संपवल जातय आणी त्याचे परिणाम मानवी जिवनावर होत आहेत
    प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत कालचीच बातमी पहा महिला लढाऊ वैमाणिका म्हणुन भारतीय हवाई दलात अवनी भावना व मोहना या तिघीची नियुक्ती झालेली आहे
   आजची सावित्री भित्री नाही आणी ती अन्यायही सहन करु शकत नाही पुर्वी मुलगी म्हटल की चुल व मुल हेच तिच काम अस अलिखीत असायचे  मुलीचा सासरी छळ होत असे पण आता खुप बदल झालेला आहे स्री प्रत्येक क्षेत्रात यशस्वी काम करू लागली आहे ती आता अबला नसुन सबला झालेली आहे
   किती तिचे रुप आई बहिन बायको मुलगी  प्रत्येक ठिकाणची जबाबदारी वेगळी  पण ती न डगमगता सगळ्या जबाबदार्या पार पाडते अशा स्री ला भित्री म्हणायचे का देशाच्या पंतप्रधानापासुन ते शेवटच्या घटकातील महिला हि तेव्हडीच कार्यक्षम आहे
आठ मार्च हा जागतीक महिला दिन या दिवशी कर्तुत्ववान महिलाचा सन्मान केला जातो ती प्रेरणा घेऊन महिला आनखी चांगले काम करतात
   मॉ जिजाऊ नसती तर छत्रपती शिवबा नसते  अशा या नारीला कोनीही अबला समजु नये
    आजही महिलावर अन्याय अत्याचार होतात पण माझे एकच सांगणे आहे आपल्या मुली सक्षम बनवा जीवनातील धोके मुलीना समजुन सांगा वत्या परिस्थीत कस वागायच हे ही तीला सांगा त्याना उगीचच भिती दाखवु नका


खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड
मो नं (९४०३५९३७६४) (२०)
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 2:37 PM]
🌷साहित्य दर्पण🌷
      व्दारा आयोजित
********************
📗साहित्य दरबार 📗
मी आजची सावित्री --नाही भित्री
🌳🌹🌳🌹🌳🌹🌳
आपण आज पर्यंत दोन सावित्री पाहिल्या आहेत
1]सत्यवानाची सावित्री  2]ज्योतिबाची सावित्री आणि आज पहात आहोत विज्ञान युगातील सावित्री .
 तस पाहिलं तर आख्यायिका  असली तरी सत्यवानाची सावित्री ही भित्री नव्हती कारण यम म्हटले कि आज आपण घाबरतो पण पुरातन काळात सावित्रीने यमा कडुन आपल्या पतीचे प्राण परत मिळवले मग सत्यवानाची सावित्री  हि भित्री नव्हती हे सिद्ध होते.आणि ज्योतिबाच्या सावित्रीने तर कमालच केली समाजाचा अनन्वित छळ सोसुन, समाजाची अवहेलना पत्करुन पतीच्या खांद्याला खांदा लावुन त्यांच्या कार्यात मोलाची मदत करुन अखील स्री जातीला शिक्षणामुळे समाजात मानाच स्थान प्राप्त करुन दिलं
स्रियांची कालची आणि आजची स्थिती पाहता सद्याची स्थिती प्रगतीकडे वाटचाल करणारी दिसुन येते
परंतु काल म्हणजे फार वर्षापूर्वी आपल्या देशात स्रिया पुरुषाच्या बरोबरीने
शिकत होत्या, वेदांचे अध्ययन करीत होत्या याचे दाखाले आपण पुराणात ऐकले आहेत सभेत मोठमोठ्या पंडितांना हरवणार्या गार्गी , मैत्रयी यांची नावे आपल्याला ऐकुन माहित आहेत पण नंतरच्या काळात आपल्या देशावर परकिय आक्रमणे झाली.त्यांच्या पासुन स्रियांचे रक्षण करणे ही गोष्ट प्रामुख्याने जास्त महत्त्वाची होती. त्यासाठी त्यांच्यावर हिंडण्याफिरण्याची, शिकण्यासवरण्याची., घराबाहेर पडण्याची अनेक बंधने घातली गेली.तिला शिक्षणाच्या संधी नाकारल्या गेल्या त्यामुळे चुल आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र बनले. तिचे घरातील स्थान दुय्यम बनले
वास्तविक पाहता स्री आणि पुरुष हे एकमेकापेक्षा वेगळी
त्यांच्यात शारीरिक फरक आहे याचा अर्थ समाजातील त्यांचे स्थान एकमेकापेक्षा कमी जास्त आहे असा नव्हे.
परंतु स्रियांच्या बाबतीत मात्र
पुर्वीपासुनच---पायातली वहाण पायातच बरी---अशी हिनतेची कमी लेखणारी भावना समाजात रुढ झाली .
संत तुकारामांनीआपल्या अंभगात सांगितले आहे कि पायात वहाण नसेल तर आपल्या पायाचे संरक्षण कसे होणार छान वर्णन आहे
पायातली  वहाण समजुन स्री -पुरुष भेदभावाची  सुरुवात घरापासुनच झालेली हे स्पष्ट होते.सार्वजनिक जीवनातही
स्री ला दुय्यम वागणुकीला सामोरे जावे लागले.बायकांना काय समजते,त्यांची अक्कल चुलीपुरती अशाच भावनेतुन महत्वाचा निर्णय घेण्याची संधी कधी दिली जात नसे संधीच दिली गेली नाही तरतिची क्षमता कशी सिद्ध  होणार. या सार्याच्या मुळाशी  स्री ही पुरुषापेक्षा कनिष्ठ दर्जाची असा चुकीचा समज घट्ट रुतलेला दिसुन येतो
                आपल्या देशात इंग्रज आले त्यांच्या बरोबर नवे विचार घेऊन आले.शिक्षणाचे महत्त्व लोकांना कळु लागले त्या काळात त्यांना राज्य कारभारात  मदत करायला माणसे हवीत म्हणुण  का होईना इंग्रजांनी ही शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले त्याचा परिणाम  स्री शिक्षणावर झाला. स्रियांनी शिकले पाहिजे या साठी समाज सुधारकांनी ही प्रयत्न केले.यातुन स्रियांसाठी वेगळ्या शाळा सुरु झाल्या कारण स्री शिकल्या शिवाय समाज सुधारणार नाहीहे हे समाजातील मुठभर लोकांना पटले परंतु मुठभर लोक म्हणजे समाज नव्हे.
सन १८४८ते१९४७ या पारतंञ्याच्या काळात स्वकीयांनी आणि इंग्रजांनी स्री शिक्षणासाठी विविध समित्यांची स्थापना केली.
१८५४ च्या वुड ने काढलेल्या खलित्यात असे ठाम पणे सांगण्यात आले की,, स्री शिक्षण लोकावर अधिक नैतिक व शैक्षणिक परिणाम  करते त्यामुळे स्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.हे चांगले विचार इंग्रजांचे होते समाजात अनिष्ठ रुढी प्रचलित होत्या त्या सर्व स्रियांवर अन्याय होतील अशाच होत्या . केशवपन, सतीची चाल, पडदा पद्धती या सर्व बंद करण्यामध्ये आपल्या देशातील समाज सुधारकांचा महत्वाचा वाटा होता हे नाकारुन चालणार नाही.
"पिता रक्षती कौमार्ये,
भ्राता रक्षति यौवने,
रक्षन्ति स्थविरे पुत्रः न स्रीस्वातंञ्यं अर्हति."
या मनुउक्तीचा अर्थ असा आहे कि जीवनाच्या प्रत्येक वळणावर पुरुषाच्या खांद्यानं तिला आधार द्यावा, तिला जपावं.परंतु याचा अगदी उलटा अर्थ समाजाने लावला
स्री म्हणजे भोगवस्तु, स्री म्हणजे करुणा, स्री म्हणजे अश्रु. लहाणपणीच मुलीनां सांगितलं  जातं मुलांसारख स्वच्छंदी , उन्मत्त वागु नकोस
संध्याकाळी लवकर घरी ये
कोणी चार शब्द बरे वाईट बोलला तर ऐकून घे, उगीचच चार चौघात आपली मतं सांगु नकोस.लहाणपणापासुनच त्या कन्येच्या नाजुक मनावर
गुलामगिरीच्या साखळ्या आवळल्या जायच्या.मुलगी वयात आली की., तिच्या सुखाच्या कल्पनाच हा समाज बदलवुन टाकतो.तिच सुख म्हणजे चांगला पगारदार नवरा, अन् सोन्यामोत्याचे दागिने.म्हणजेच तिच्या बाह्यांगाला नटविण्यामध्ये गुंग असणार्याना आज्ञानाच्या अंधःकारात खित्पत पडलेलं तिच अंतरंग दिसत नव्हतं.
जे आदर्श पुरुष होते त्यानी मात्र स्रियांना मानाचा दर्जा दिलेला आहे. जगज्जेत्या सिंकदराला भारतातुन परतताना प्रथम दर्शन हवे होते, ते त्याच्या आईचे !
शिवरायांना आई म्हणजे देहातील प्राण वाटे , तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे संसाराच सार काय तर ममताळु माय !!

           आज समाज काही अंशी बदलला आहे . स्री शिक्षणामुळे घराबाहेर पडण्याचे स्वातंञ्य तिला मिळालं, विकासाच्या संधीच खतपाणी मिळाल म्हणुण तिनं पाळणा सांभाळून आपलं कार्यक्षेत्र कधी व्हँलेंटिना तेरेश्कोवा म्हणुण अवकाशा यानापर्यत नेले आहे तर कधी
बचेंद्री पाल म्हणुण एव्हरेस्ट सर केलं आहे कधी इंदिरा गांधी बनुन राजकारणातील आपलं वर्चस्व सिद्ध  केलं आहे.तर कधी किरण बेदी च्या रुपानं आपलं नैतिक आणि शारीरिक सामर्थ्य सिद्ध  करुन दाखवल आहे , तर पंकजा मुंडेच्या रुपानं कुठलाही आधार नसताना पित्याचे स्वप्न पुर्ण करण्याच आव्हान स्विकारलेलं आपल्याला दिसत परंतु या बोटावर मोजण्या एवढ्या स्रिया प्रगतशिल असल्यातरी ग्रामीण भागात काय शहरी भागात काय स्रियावर अत्याचार होताना दिसतात परंतु भविष्यकाळ आशावादी आहे . शेवटी जाता जाता काल घडलेलं उदा. सांगते माझी नात ट्युशन वरुन गाडी वर घरी येत होती पोलिस महाशय वर्दीवर समोरुन राँग साईड ने येत होते ,अपघात थोड्यात चुकला .पोलिस महाशय नाती ला म्हणाले गाडी बाजुला घे .पण ती भित्री सावित्री नव्हती तिनेही निर्भीड पणे म्हटले काका तुम्ही राँग साईडने तुमची गाडी बाजुला घ्या.यावरुन स्पष्ट होते आजची सावित्री  भित्री नाही आणि ती कधीच नव्हती .,परंतु समाजाने तिला भित्र बनवलं होतं.
सौ.मीना सानप  बीड @ 7
9423715865
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 2:41 PM] नासा येवतीकर धर्माबाद
 *सावित्री नको होऊ भित्री*

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असे संस्कृत मध्ये म्हटले आहे याचा अर्ध ज्या घरात महिलांची पूजा केली जाते तेथेच देव वास् करतो .
 पुरातन काळापासून तर आजपर्यंत महिला ह्या दुय्यम स्थानावर रहिल्या आहेत. पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांना कधीच महत्वाची जागा मिळाली नाही. रामायण आणि महाभारतातील महिलांना किती त्रास सहन करावे लागले याची माहिती आपणास त्या पात्रातून निदर्शनास येते. मध्ययुगीन काळात राजे महाराजे यांनी सुध्दा महिलांना म्हणावे तसे महत्त्व दिले नाही. तरी राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या काही कर्तबगार महिला इतिहासात होऊन गेल्या. इंग्रजाच्या राजवटीत असताना समाजसुधारणेचे वारे जोरात वाहत होती. अनेक महिला पुढे येऊन स्वातंत्राच्या लढ़ा मध्ये पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेतला भारत स्वातंत्र होण्यामागे सरोजिनी नायडू अरुणा आसफअली सारख्या महिलांचा सिंहाचा वाटा होता. भारत पूर्ण स्वातंत्र्य झाल्यावर देशातील लोकांना विकसित करण्याचा फार मोठा प्रश्न प्रशासनासमोर आ वासुन उभा होता. लोंकाची निरक्षरता ही प्रामुख्याने मोठी समस्या होती त्यातल्या त्यात महिलांची निरक्षरता. मुलींच्या शिक्षणावर भर देण्यासाठी शासनाने अनेक उपक्रमाची योजना तयार केली आणि त्याची अंमलबजावणी सुध्दा केली. त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात दिसून येतात. असे एकही क्षेत्र शिल्लक नाही ज्याठिकाणी महिला दिसणार नाही त्यामुळे महिलांची खुप प्रगती झाली पण, आज ही महिलावर खुप अत्याचार आणि अन्याय केल्या जाते. ते शिकुन साक्षर झाली मात्र त्या शिक्षणाचा त्यांच्या जीवनात काहीच फायदा नाही असे वाटते. शिक्षणाने माणसाचा विकास होतो याचा अर्थ असा आहे का की शिक्षणाने नोकरी मिळते आणि आपला विकास होतो. नोकरी साठी शिकायचे अशी पध्दत सध्या दिसून येते. कारण शिक्षणाने माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो असे म्हटले जाते. मात्र हे महिलांच्या बाबतीत लागू पडत नाही असे वाटते. याच गोष्टीचा फायदा समाज घेत असतो. म्हणून तिला आजच्या सावित्रीला भित्री समजल्या जाते. आजच्या स्त्रीने हे सर्व बाजूला सारुन वेगळी वाट निवड करने अगत्याचे आहे.

नासा
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:19 PM]
मी आजची सावित्री - नाही भित्री

आज वटसावित्री! जी आपल्या देशात फक्त महाराष्ट्रातच साजरी केल्या जाते.  समाजमाध्यमामधून एक मेसेज दिवसभर फिरेल," बायका कोणालाही गुंडाळतात,आज तर त्या वडालाही गुंडाळतील!" हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा व नवऱ्याचे आयुष्य वाढावे म्हणून पूजा करणाऱ्या स्त्रियांची पुरुषवर्गाकडून अशी विनोदाच्या स्वरूपात अवहेलना चवीने दिवसभर होणार! आणि हिंदू स्त्रिया  श्रध्देने(?),संस्कृती म्हणून  वडाची पूजा करणार!श्रध्देसमोर प्रश्न निर्माण होण्यामागचे कारण हे की,अनेक कुटुंबात नवरा पत्नीचा शारीरिक,मानसिक छळ वर्षानुवर्षे करत असतो अशांच्या पत्नीदेखील ही पूजा करताना दिसतात. डोळसपणे विचार करणारे सगळे या वास्तवावर  विचार करतील की,पुनर्जन्म आहे का?आणि पुनर्जन्म असेल तर  अशा पूजाअर्चानी हाच नवरा पुन्हा मिळेल का? किंवा अशा पुजाअर्चानी जर नवऱ्याचे आयुष्य वाढले असते तर विधवा स्त्रिया दिसल्या असत्या का?जर इथेही ज्याच्यात्याच्या श्रध्देचा प्रश्न असेल तर अजून काही प्रश्न आपल्याला पडायला हवीत.  ती म्हणजे, बायकोचं आयुष्य वाढावं किंवा हीच बायको जन्मोजन्मी मिळावी म्हणून पुरुषांनी करण्यासाठी  एकही व्रत का नाही? स्त्रीच्या गर्भात बाळ वाढताना आणि त्याला जन्म देताना तर स्त्रीचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात. मग तो पुनर्जन्म सुरक्षित व्हावा,त्यातून बाळ,बाळंतीण सुखरुप बाहेर पडावी,यासाठी पुरुषाकडे  एखादे व्रत का नाही? मग यावरुन असे समजावे का की,स्त्री ही खऱ्या अर्थाने सबला असून तिला कोणाकडून दयेचे दान किंवा  कोणाच्या प्रार्थनेची गरज नाही परंतु पुरुषाला मात्र त्यांचे आयुष्य वाढवून घ्यायचे असेल,सदैव सुखी रहायचे असेल,सुरक्षित रहायचे असेल तर,त्यांच्या पत्नीने कठोर व्रतवैकल्ये,उपवास वगैरे केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही! यावरुन कोण अबल आहे आणि सबल आहे,यावर विचार करण्याची नितांत गरज आहे,असे मला वाटते.बऱ्याच जणाना वाटेल की,नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा पूजा करु द्याव्यात. पण नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरे मार्ग नाहीत का? ज्योतिबाच्या सावित्रीने नवऱ्यावरचे प्रेम जपले नाही का?  यातून अंधश्रद्धेला खतपाणी आपण घालत नाही का? स्त्रियाना यातून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळणार असेल तर अशी झाडे घराभोवती लावून वटसावित्री साजरी करावी,जेणेकरून संपूर्ण कुटुंबालाच ऑक्सिजन वर्षभर भरपूर मिळेल. या झाडाची मोठ्या प्रमाणात असलेली मुळ्या पाहून तर घराभोवती हे झाड लावणे आपल्याला उपद्रवी वाटते.
             जोवर स्त्री शिक्षणापासून वंचित होती,धर्मशास्त्राशिवाय इतर शास्त्राशी तिचा संबंध आला नव्हता,विचार करण्याचे स्वातंत्र्यही तिला  नव्हते तोवर अशा  पूजाअर्चात तिने व्यस्त रहाणे ठीक होते. कारण त्याकाळी याशिवाय स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. पण आजच्या  सुशिक्षीत स्त्रीने हे वागणे किती संयुक्तिक आहे? आणि ज्या  पुरुषवर्गासाठी ही  व्रतवैकल्ये चाललीत,त्यांच्या नजरेत व्रतवैकल्ये करणाऱ्या अशा स्त्रियाना काय दर्जा मिळतो?तर पूजापाठाच्या नावाने मूर्खपणा चालला म्हणून टिंगळटवाळी? ज्यातून काहीही साध्य होत नसताना विज्ञानयुगात अशा निरर्थक गोष्टी करण्यात वेळ घालवायचा  म्हटल्यावर लोक टिंगलटवाळी नाही करणार तर काय करणार?? यातून कोणी वृक्षसंवर्धन होते,असे म्हणत असेल तर,खरंच किती स्त्रिया वृक्षारोपण करतात किंवा वडाच्याही झाडाचे संवर्धन करतात? याउलट त्या कोणीतरी लावलेल्या,वाढविलेला प्रचंड मोठा वड पाहून पूजा करतात. कधी या दिवशी स्त्रियांनी वडाचे झाड लावले,असे ऐकले नाही उलट ज्या शहरी स्त्रियांना वडाचे झाड उपलब्ध नाही,अशानी मात्र कोणाकडून तरी वडाची फांदी तोडून त्याची पूजा केलेली नित्य ऐकण्यात आलेले आहे. अर्थातच यादिवशी वृक्षारोपण होत नसून काही ठिकाणी यानिमित्ताने वृक्षतोड मात्र होताना नक्की दिसते.
           आपण महाराष्ट्रातील स्त्रियांनी वारसा पुढे चालवायचा अशा महाराष्ट्रातीलच दोन सावित्री आपल्यापुढे उभ्या राहतात. एक आपल्या पतीच्या विधायक  कार्याला मूर्तस्वरुप देऊन,त्याच्या खांद्याला खांदा लावून,कार्याच्या रुपातून पतीला  लौकिकार्थाने अजरामर करणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले;तर आपल्याला सत्यता किती हे माहीत नसलेली,फक्त कपोलकल्पित आख्यायिकेच्या आधारे ऐकलेली वडाची पूजा करुन नवऱ्याचे प्राण वापस आणणारी सत्यवानाची सावित्री! यापैकी आजच्या स्वतःला आधुनिक म्हणून घेणाऱ्या स्त्रीने कोणाला आदर्शस्थान मानायचे,हे विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज आपल्या आजूबाजूला अनेक समस्या आहेत.शिक्षण घेऊन कर्तबगार झालेल्या स्त्रियांनी ज्योतिबाच्या सावित्रीसारखे समाजासाठी विधायक कामे करायची की कपोलकल्पित सत्यवानाच्या सावित्रीसारखे अंधश्रध्देच्या आहारी जायचे,हा आधुनिक स्त्रीसाठी फार मोठे आव्हान आहे.आज त्याना हे दाखवून द्यावे लागेल की आजची सावित्री भित्री नाही,ती कुठल्याही गैरसमजाला बळी पडणार नाही. स्वतंत्र विचाराची डोळस दृष्टिकोन असणारी सावित्री आहे. कुठल्याही अंधानुकरणामध्ये अडकलेली भित्री सावित्री नाही!
 संगीता देशमुख
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:29 PM]
स्पर्धेसाठी..

मी आजची सावित्री- नाही भित्री

सर्व जण म्हणतात सावित्री घडवा. आजची परिस्थिती पाहता सावित्री घडून ही जाईल पण सत्यवान ...!
  ज्याच्यासाठी हे व्रत करायचे तो कितपत सावित्रीच्या परिक्षेस उतरतो.
सकाळी गेलेला संध्याकाळी कोणत्या परिस्थतीत घरी येईल सांगता येत नाही. दिवसभर राबून कमावलेले पैसे तो दारुभट्टीवर गमावून येतो. ज्याला कुंटूबाची जबाबदारी समजत नाही कर्तव्य समजत नाही त्यालाच सात जन्म तरी का मागावे?
कोणताच हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणत नाही. तो तर एकाच जन्मात सात पत्नी मिळवून चुकतो. मग समाजातील सर्व नियम रितीरिवाज स्त्रीयांनीच पाळायचेत का?
वटसावित्री हे व्रत खूप पुरातन काळापासून स्त्रिया करीत आल्यात. तेव्हाच्या स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या. या निमित्ताने का होईना. त्यांना इतर स्त्रियांशी विचारांची देवाण घेवाण करता येई. मनाला समाधान ही लाभत असे.
पण आजच्या काळात स्त्रियांजवळ कीतीसा वेळ राहिलाय? घरातली स्त्री घराबाहेर पडली. पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. जिच्या जवळ कुंटुंबालाच दयायला वेळ नाही ती कधी आणि कशी व्रत वैकल्ये सांभाळणार? ज्या काळात सावित्रीने सत्यवानाला परत आणले ते सतयुग होते. पण आज कलियुग आहे. या युगात ब-याच अंशी लॅप पावलेले आहे.  आजच्या आधुनिक काळात किती सावित्री आपल्या सत्यवानाला परत आणू शकतील शंकाच आहे.
मला वाटते आजची स्त्री इतकी कमजोर नाही. ती स्वावलंबी आहे. नव-यालाच काय ती तर अख्खे कुंटुंब आपल्या हिंमतीवर सांभाळू शकते. व्रत करणे वाईट नाही पण त्यामागचे कारण जोपासत बसणे हे तर अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे असे मला वाटते.

निर्मला सोनी
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 4:48 PM]
साहित्य दरबार🖊
     
   💥आयोजित💥

💃मी आजची सावित्री ....

  नाही भित्री💃

         ★स्पर्धेसाठी★
==================

आजचे युग हे स्पर्धेचे युग,संगणकाचे,विज्ञानाचे,नवनविन शोधाचे युग आहे.
म्हणुनच या गतिमान,क्रियाशिल युगात पुरूषाच्या बरोबरीन ही आजची सावित्री या नव युगाच्या दिशांना गवसणी घालतांना दिसत आहे अन् तिच्याकडे पाहूनच मग आपसुकपणे शब्द निघतात कि.....“ आजची सावित्री..  नाही भित्री”

खर पाहता आजची स्री ही चुल नि मुल या व्याख्येतच बांधली जाणारी नाही कारण सत्यवानसावित्री नंतरच्या युगप्रवर्तक,क्रातीज्योती सावित्रीन जी ज्योत आजच्या.आधुनिक सावित्रीकडे दिलीय त्या ज्योतिन तिच जीवन प्रकाशय,प्रगत तर बनलयच पंरतु वेळ पडल्यास त्याच ज्योतीची ती ज्वाला बनुन अन्यायसंहारक देखील बनली आहे.

आजच्या युगातली सावित्रीन अस एकही क्षेत्र नाही की ते तिन काबीज केल नाही...नि यावरुन ती भित्री नाही हेच सिद्ध होत.

-आजची सावित्री आकाशी पोहचली....
-आजची सावित्री वाऱयाशी लढतेय...
-आजची सावित्री समुद्राशी सामना करतेय.....
-आजची सावित्री कंडक्टर बनली....
-आजची सावित्री आँटोवाली बनली.....
-  आजची सावित्री वैमानिक बनली...
एवढेच नाही तर बाळाला
-हदयी कवटाळून पोलीस बनुन गस्तही घालतेय.... तर
कुठे मलाला बनुन शिक्षणासाठी छातीवर गोळया झेलतेय नि मृत्यूला हुलकावनी देवून पुन्हा सावित्री न भित्री बनुन त्याच गोळ्या झाडणाऱयासमोर आपल काम अखंड चालू ठेवतेय. इतकेच नाही तर एका विधानसभेत आजची सावित्री बाळाला छातीशी बिलगुन घेवून स्पीकरचे काम करतांना जगाने पाहिलेय.

मी आजची सावित्री...  नाही भित्री हे सांगतांना अभिमान वाटतोय कारण माझ्या तमाम भगिनी या अहोरात्र तारेवरची कसरत करून कुटूंब रथाच दुसर चाक यथायोग्य बनुन आपला छंद सांभाळत आज ती गौरवान जगत आहे.

माझा सलाम,नमन आजच्या सर्व सावित्रींना🙏🏻🙏🏻🙏🏻

===================
कल्पना जगदाळे@8★ बीड
📲9921967040
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
===================
[6/19, 5:26 PM]
*मीच खरी सावित्री,
   भित्री तर नाहीच🙏🏻

☝🏻सर्वांचे लेख वैचारिक मांडणी तिल छान च✍🏻👌🏻👌🏻👌🏻

मी 30 वर्षा ची असतांनाच विधवा झाले. माझा मुलगा 3rd ला होता, जीवन साथी कायम च सोडून जान्या च्या वेदना माझ्या पेक्ष्या कोण जानेल.  कितीही भित्री नसली तरी समाज दोन प्रकार चा मी पाहला, सासरी मंडळी चे हेवी दावी सर्व सोसले. नवरा नस्तांना समाज जास्तच पारखायल शिकले, सासुबाई ची खुपच मदत झाली, माझ्या मिस्टर ला माझे पेंटिंग चे खुपच कौतुक होते, इंटर्मिजीएट, एलीमेंट्री क्लास् मी घ्यायची,  आता अनेक क्लास्सेस घेते, मी जे जगते त्याचे सगळ्यांना कौतुक आहे, आज तनिष्का माझा ग्रुप आहे, समाजसेवक म्हणून, अमरावती च्या *महापौर*माझी मैत्रीण च, सर्व मैत्रिणी माझ्या सावित्री🙏🏻माझ्या एकटेपनात साथ देणाऱ्या. अनाथ असेल कुणी तर आम्ही तनिष्का मदतच करणार. त्यात माझ्या सासु सासर्यांची जबाबदारी, मुलाचे शिक्ष ण सर्व एकटी पार पाडत आहे. आज माझे सासरे एडमिट आहे, मी हॉस्पिटल मधे च लिहत आहे, पेंटिंग मधे खुप पुरष्कार मिळवले, जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय, समाज सेवे मधे श्री फडणवीस सर चा पण पुरष्कार मिळवला. माझ्या आईने पण20 वर्षीय आधी पुणे प्रबंध1st no, मिळवला. आई, बाबा, मिस्टर कायमची सोडून गेले त, मी मात्र *सावित्री*म्हणुन जगत आहे, माझ्या सासु बाई मला*आजची सावित्री* म्हणतात. चांगले, वाई ट अनुभव सर्व सोस त .माझा जीवन प्रवास चालूच आहे🙏🏻
 
 ☝🏻स्पर्धेसाठी नाही.🇮🇳
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 5:40 PM] ‪+91 84220 89666‬
स्पर्धेसाठी

मी आजची सावित्री  ??
नाही भित्री
*******************

मला एक अतिशय सुंदर पुस्तक वाचायला मिळाले. त्यात आपल्या परिसरातील सर्व  झाडे, जंगलातील वृक्ष , याची माहिती, उपयोग वाचायला मिळाले.
यात काही वनस्पतींना उल्लेख नव्हता. समुद्र सोप किंवा ज्याला बेशरम म्हणतात, ही वनस्पती विषारी आहे. गुरेही याला तोंड लावत नाही. याचा काय उपयोग?
एका  कार्यक्रमात हा विषय निघाला. एका आदिवासी स्त्रीने
याचा उपयोग सांगितला .नवरा दारू पिऊन आला की बेशरम होऊन, त्या बेशरम माणसाला, बेशरम
च्या फोकानं झोडपून काढायचे.
स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणा-या आम्ही सर्व फक्त साक्षर स्त्रिया आहोत, याचा नव्याने शोध लागला. भित्री नसलेली ती खरी शूर सावित्री होती.
"पिता रक्षति कौमार्ये, भर्ता  रक्षति यौवने" या काळात स्त्री स्वतंत्र नव्हती वगैरे म्हणणारे म्हणोत बापडे, पण त्यावेळी मुलगी, बहीण,पत्नी, आई सुरक्षित होती  हे नाकारता येत नाही.
कारण निसर्गाने जो फरक स्त्री पुरूष यात केलाय, तो मान्य करून पुढील वाटचाल करायला हवी. जरा धाडसाचे  वाटेल, पण लिहिल्यावाचून राहावत नाही, जोपर्यंत स्त्रीवर होणारा बलात्कार हा केवळ अपघात आहे हे  आमचा समाज मान्य करीत नाही तोपर्यंत स्त्रीने घाबरून राहिलेले बरे.
आम्ही समाज सुधारणेच्या केवळ वल्गना करतो. कारण एखादी बलात्कार झालेली मुलगी, आम्हाला सून म्हणून चालते का?
योनीशुचितेच्या कल्पना फक्त स्त्रीच्या बाबतीतच जास्त प्रखर आहेत हे कटू सत्य आहे. स्त्रीने पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालावं जरूर, पण शर्यत लावून आज जे धावणे सुरू आहे ते मलातरी पटत नाहीच.
आणि धावणारच असाल तर आगामी धोके लक्षात घेऊनच. नाहीतर बेशरम होऊन जगण्याची तयारी हवी किंवा पुढच्याला बेशरमपणे, बेशरमचा दणका द्यायची ताकद हवी कदाचित हे विषयांतर होत असेल. पण बेडकीनं बैल होण्याची स्वप्न बघू नयेत,असं मला  वाटतं.
यावर काहींची वेगळी प्रतिक्रिया असूच शकते. आमच्या मुलींना काळाची गरज ओळखून चालण्याची ताकद द्यायलाच हवी , पण निसर्गाच्या विरोधात जाऊन नव्हे, तर निसर्गाचा मान ठेवून.
या विषयावर मी अनेक रचना केल्या आणि त्याचे फक्त मुलींच्यासाठी शाळेत, महाविद्यालये , स्त्रियांची मंडळे इथे अनेक  कार्यक्रम केले. उत्तम प्रतिसाद मिळाला. कालच्या एका गज़लेत मी लिहिले आहे
" संरक्षणात  गायी, तेथे वळू न आले"
असो. गोफणीनं आम्ही पाखरं हाकलतो, विषारी कीटकनाशक टाकून पीक वाचवतो , बागायतीला काटेरी कुंपण घालतो. मग पोटच्या पोरीला भित्री  न करता, संभाव्य धोक्यांची कल्पना देऊन तिचं संरक्षण करा, एवढी एक अपेक्षा मी केली तर काही चूक आहे का?
सुनंदा पाटील मुंबई
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
[6/19, 5:44 PM] ‪+91 98603 14260‬
स्पर्धेसाठी
मी आजची सावित्री -नाही भित्री
***********************
आज वटपौर्णिमा.सत्यवानाचे प्राण हरण करणा-या यमराजाकडून युक्तीवादाने त्याच्याशी जिंकून सावित्रीने
सत्यवानाला, आपल्या पतीला जीवन मिळवून दिले
अशी कथा पुराणात आहे  सावित्रीला प्रणाम.
ज्योतिबांच्या सावित्रीने स्वतः शिकून  समस्त स्त्री जातीला शिक्षणाचे बाळकडू दिले . समाजाचा रोष ओढवला तरी शिक्षणाचे द्वार उघडून दिले तिला प्रणाम.
  आजची स्त्री सुशिक्षित आहे तिला शिक्षणाच्या सर्व वाटा खुल्या आहेत.गृहिणीपदापासून पंतप्रधान राष्ट्रपतीपद सांभाळत आहे.सैन्यातही ती लढत आहे गाडी रिक्षा ट्रक विमान अगदी आंतराळातही ती झेपावली आहे
 डाँक्टर वकील विज्ञानक्षेत्र अगदी राजकारणातही ती अग्रेसर आहे.
  आजची स्त्री चूल,नि मूल एवढेच कार्यक्षेत्र न ठेवता संसार नोकरी मुलेबाळे सर्वच आघाड्यांवर लढत आहे.
  मध्यंतरी एक बातमी वर्तमानपत्रात वाचली.पतीच्या दोन्हिही किडन्या खराब झाल्या अगदी मरणासन्न अवस्था झाली तेव्हा त्याच्या पत्नीने आपली स्वतःची किडनी देऊन त्याला जीवदान दिले ही आधुनिक सावित्रीच नव्हे का?
प्रत्येक गृहिणी ,प्रत्येक पत्नी आपले पती मुलेबाळे सासूसासरे  यांची काळजी करते व घेते प्रसंगी ती स्वतः आजारी पडते पण समस्येला न डगमगता तोंड देते
सहनशीलता हा एक गुण परमेश्वराने बहाल केला आहे.
आजची सावित्रीही खंबीरपणाने मार्ग काढते आहे व्रतवैकल्ये घरासाठी पतीसाठी करते आहे
जन्ममरण कुणाच्याही हाती नसते पण पतीनिधनानंतर आपले दुःख विसरुन मुलाबाळांना कष्ट करुन वाढवताना कितीतरी स्त्रियांना आपण पहातो.शेतकरी आत्महत्या करतात पण शेतकरीण सारे दुःख विसरुन घरासाठी मुलांसाठी फिरुन उभी रहाते हे सावित्रीचेच रुप नव्हे काय?
 प्राची देशपांडे
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 5:57 PM] ‪+91 97306 89583‬
स्पर्धेसाठी...✍✍✍
     *आजची सावित्री,नाहि भित्री*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
          मित्रांनो,आज वटपौर्णिमा.आजच्या दिवसाचं महत्व आणि पावित्र आपणा सर्वांना ज्ञातच आहे.शतको वर्षापुर्वी सत्यवान आणि सावित्री यांच्या आख्यायीकेवरून आजच्या दिवसाच महत्व ठरविल्या गेल.
हिन्दू संस्कृति मधे या दिवशी वडाला दोरा गुंडाळून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया मनोभावे व्रत वैकल्य करतात.
आई सांगते म्हणून तर काहि कुमारिका कन्या सुद्धा होणारा नवरा माहित नसतांना जन्मों जन्मी तोच मिळावा म्हणून निरंकाळ उपवास तापास करतात.
ही *सावित्री* पतिच्या सुखासाठी अहोरात्र झटते,तोच सत्यवान ऐके दिवशी सर्व संसाराचा गाढा *तिच्यावर* सोपवुन निघुन जातो...
मग सुरु होते त्या *सावित्रीचि* खरी परीक्षा...
समाज,सगे सोयरे, नातलग सगळे तिच्या
लाचारीवर हसायला उठतात.अशा वेळी हिच
*सावित्री* डोई चा पदर कंबरेला खोचुन एकटिच चालू लागते....सोबत असतात फक्त मेलेल्या सत्यवानाच्या चार दोन आठवणी आणि रडनारी ती पोरं...
पठिमागे नसतो कुणाचा साथ,नसते कौतुकाचि थाप...दिसतो फक्त काळाकुट्ट अंधार...तरी ति चालत जाते...
         असाच एक व्हिडिओ सध्या वॉट्स ऍपवर फिरतांना दिसला....
शांताबाई यादव हे त्या सावित्रीच नाव.दाढ़ी कटिंग करण्याचा पतिचा व्यवसाय.तीस चाळीस वर्षापुर्वी सुखाने चालत असलेल्या संसाराला नजर लागते आणी तिच्या *सत्यवानाचा* मृत्यु होतो...पाठीमागे बालअवस्थेतिल चार मुली व पत्नी सोडून हा निघुन जातो...एकर भर शेती नाहि की काहीच नाहि...दुःखाच डोंगर वरुन चार मुलिंचा सांभाळ...ड़ोळ्याने दिसतो फक्त दाढ़ी कटिंग चा पतिचा व्यवसाय....ती निर्धार करते आता पतिचा व्यवसाय आपण करायचा,पुरुषांना तोंडात बोटे घालायला लावनारा निर्णय ती घेते...अन् एकटिच चालू लागते... गावातील लोक सुद्धा तिच्या कडे दाढ़ी कटिंग ला येतात...ते फक्त तिची उमेद पाहुन.एका दाढ़ी कटिंग चे विस रुपये मिळायचे...एवढ्यात कसं भागणार म्हणून म्हाशिचे केस काढु लागते...त्याचे शंभर रुपये मिळायचे...
या व्यवसायात कसलीही लाज या सावित्रीने बाळगलि नाहि.याच व्यवसायाने तीने आज चार मुलींची लग्ने केली,आणि स्वतहि आनंदाने एकटिच संसार करीत आहे....
शेतकरयांच ही असच होत मित्रांनो...आपला बळीराजा निसर्गापुढ़े हलबल होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो,लेकर बाळ उघड़ी पाडून निघुन जातो...मग यातना या सावित्रीला सोसव्या लागतात.तरि हार न मानता ति लढते...
या आधुनिक सावित्रीन्ना माझा मानाचा मुजरा
खरच *आजची सावित्री मुळीच नाहि भित्री*

         ✍प्रणाली काकडे✍
******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******

[6/19, 6:01 PM] ‪+91 94213 45341‬
 साहित्य दरबार  मी आजची सावित्री नाही भित्री

सावित्रीचया लेकी आम्ही
कुठेकमी सांगा तुम्ही
गडावरची ती हिरकणी
शिवरायास ती मानीणी
पुर्वी महिलांना मार्गदर्शन नव्हते शिक्षणाचा दर्जा प्राप्त झाला नव्हता
शिक्षणाची आई सावित्री ज्योतिबा फुले हेच खरे माय बाप समाजाच्या प्रवाहाविरूध यांनी शिक्षणाची धगधगती मशाल पेटवली सारा भारत देश शिक्षणाने प्रभावित झाला पण अंधार अत्याचार पिळवणूक केशवपण बालविवाह बालविधवा कुमारीमाता यांचा सुळसुळाट झाला होता तो काळ खुपच धकाधकीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्कादायक स्थिती चा विचार करता माय सावित्री बाईनी स्त्रि जीवनाचे शिक्षण परिस बिज शोधले आणि स्त्रि शिक्षण संस्था  शाळा उघडण्याचे धाडस दाखवले  म्हणुनच आजची सावित्री
शिक्षणाने उपलब्ध झालेली नोकरी
करून  सत्यवाना सोबत प्राणपणाने लढत आहे बदलता काळ लक्षात घेता प्राण परत आणण्यासाठी  जे बौद्धिक कौशल्य जुन्या सावित्रीने वापरले
त्यापेक्षा जास्त बुद्धी आजही माझ्या कडे आहे हे आजची सावित्री सांगते हेच वास्तव सत्य परिस्थिती लक्षात घेता मान्य करायला हवे आजच्या काळात त्यांनी गगनाला भिडणारी महागाई
वाढली असून त्यांना काही प्रमाणात तरी मदत हातभार लावणार्‍या ओळीत ती आहे
जुन्या परंपरा जोपर्यंत ताज्या आहेत त्याचा आदर ती करणारच
भाव आहे म्हणून देव आहे श्रद्धा प्रयत्न पुवॅक प्रगतीकडे घेऊन जाते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे घेऊन जाते भारतीय संस्कृती सर्व गोष्टीत लक्षावधीने  सवॅश्रेष्ठ आहे  पतीचे सात गुण जरीआवडले तरी सात जन्म सोबत राहु शकतात म्हणनच
आजही आहे तया परिस्थितीला
सामोरे जाऊन कुटूंब आबाधित आहे विदेशी परंपरा यांचे आनुकरण यामुळे पिठी बिघडत आहे करिता जुन ते सोन म्हणायची वेळ आली आहे शिक्षणासाठी मुलीना घराबाहेर ठेवणे अवघड झाले योग्य वेळी वयात आलेल्या मुलीचे लग्न करणेच योग्य आहे

सौ संगीता सपकाळ (कदम) बीड 9421345341

******$$$$$$$$*****$$$$$$$$$********$$$$$$$*******
साहित्य दरबार - स्पर्धेसाठी - 
आजची सावित्री नाही भित्री - 
एक सावित्री पुराणातली सत्यवानाची तर दुसरी सावित्री इतिहासातली जोतिबांची. स्त्रीत्वाच्या गुणांनी मंडित या सावित्री आजच्या आधुनिक स्त्रीयांना वारसा आहेत. भावना, अवनी, मोहना या भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या पहिल्या तीन वैमानिक. कुठे स्पर्शली त्यांना भीती? 
स्त्रीयांचा विधायक उर्जा, जबाबदारी जपण्याकडे कल असतो. मूल, परिवार, नोकरी, सामाजिक जबाबदारी सांभाळण्याची कसरत तिला करावी लागते. चाकोरीबद्ध जीवनात विविध भूमिका ती पार पाडते. आजची समाजव्यवस्था स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत उदार होते आहे. हा संक्रमण काळ आहे तिच्यासाठी. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने उभी राहते आहे. एकल पालकत्व भूमिकेतून देखील आपल्या अपत्याचे संगोपन योग्यरित्या समर्थपणे करते आहे. नव्या जीवनशैलीने तिचे जीवन धकाधकीचे झाले तरी ती प्रत्येक आव्हान पेलते आहे. त्यात यशस्वी होते आहे. अपयशाचे भय तिला नाही. तसेच शीलाची, जीवाची, वित्त, मत्ता  लुबाडले जाण्याच्या भीतीने ती मागे पडत नाही. 
शिक्षणाने तिला स्वतंत्र विचार करण्याची मोकळीक मिळाली आहे. पुरूषसत्ताक जीवनपद्धतीला ती आपल्या कर्तृत्वाने छेद देते आहे. संस्कार, परंपरांचा बागुलबुवा न करता ती विविध आघाड्यांवर एकटी संघर्ष करते आहे. भयाची, बलहिनतेची भावना तिला स्पर्शत नाही. जुन्या कालबाह्य रितीरिवाजांना ती फाटा देते आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण आल्याने ती प्रश्न विचारू लागली आहे. तिची अंधश्रद्धा गळून पडू लागली आहे. 
पूर्वी मैत्रेयी, गार्गी सारख्या विदुषी तिच्या आदर्श होत्या. आता कल्पना चावला, पी टी ऊषा, इंदिरा गांधी अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रीयांचे उदाहरण तिच्या डोळ्यापुढे ठळक उभे आहे. 
मर्यादांचे भय दूर सारून तिने गगनभरारी घेतली आहे. आपले स्त्रीत्व जपताना ती सर्जनशील, संवेदनशील, हळवी असली तरी डोळस झाली आहे. व्यवसायाची नवनवी दालने खुली झाल्याने शारीरिक दुर्बलतेवर मात करून तिचा मुक्त संचार सुरू आहे. भयावर तिने विजय मिळविला आहे. 
आता आकांक्षांपुढती गगन ठेंगणे तिला. 
:बाबू फिलीप डिसोजा 
@39
[[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]]
स्पर्धेसाठी 
मी आजची सावित्री   नाही भीत्री 

नमस्कार वटपौर्णिमेच्या सर्वां ना शुभेच्छा .खरंच सर्व पुरुष किती नशीब वाण ज्यांच्या साठी प्रत्येक स्त्री हे व्रत करते .आपली पुरातन संस्क्रुति पती परमेश्वर माननारी आहे .त्यामुळे आज ही स्त्री जिथे असेल तिथे ही पूजा करताना दिसते .मी तरी या मागचे वैद्न्यानीक कारण समजून पूजा करते .सत्य वाणाला सवीत्रीने यमाच्या दारातून परत आणले पण खरंच आज तसा सत्यवान आणि सावित्री रहिली आहे का ?हे विचार करण्याची वेळ आली आहे .काही ठराविक उदा .सोडले तर आजच्या काळात ही स्त्री पूर्णपणे स्वतंत्र नाही च असे म्हणावे लागेल .पूर्वीच्या काळी स्त्री पुरुष समान मानले जात .स्त्रियांचे मौजीबंधनही केले जात असे ..मध्ययुगीन काळात स्त्री ला खूप त्रास झाला .पण आधुनिक युगात तर स्त्री ला जन्मालाच येऊ दिले जात नाही .तरी स्त्री स्वतंत्र झाली असे आपण म्हणतो .पूर्वी पासुनच स्त्री -पिता ,पती ,आणि पुत्र या तीन" प "कारी शब्दात अडकून पडली आहे .लहानपणी पिता ,तरूण पणी पती आणि म्हातारपणी पूत्राच्या इच्छेने जगावे लागते .आजची स्त्री भीतरी मुळीच नाही .त्यामुळे च सर्व क्षेत्रात ती प्रगती करताना दिसते .स्त्रिया सर्व कामे चांगली करतात पण त्यामुळे बरेच पुरुष सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोप्वून अलिप्त होताना दिसतात ..स्त्री ला नौकरी करूनही घरातील सर्व कामे करावी लागतात .तरीही ती न घाबरतासर्व  करते .पण जर स्त्री पुरुषाची सर्व कामे करू शकत असेल तर पुरुषांनी स्त्री चे एखादे काम केले तर काय बिघडते ?पण असे होताना दिसत नाही .स्त्रीला पै पाहुणा बघणे मुलांचा अभ्यास घेणे ई .कामे करताना खूप दमछाक होते .पण त्याची जाणीव असल्याचे पुरुष दाखवत नाहीत .
आपण पाहतो की सर्व ठिकाणी स्त्रिया आपली कामे खूप छान करतात साधी भाजी आणणे, किराणा आणणे ,मुलाच्या तसेच शाळेत पालक सभेस जाणे ही कामे सुधा स्त्रिया जास्त चोखंदळपणे करतात .तसेच नोकरीच्या ठिकाणी सुधा स्त्रिया आपले काम जास्त काळजीने करताना दिसतात .त्यात स्त्री च्या जिवाचे काय हाल होतात हे स्त्री झाल्यावर च कळते .स्त्रीला बाहेरून येऊन घरातील सर्व कामे करावी च लागतात .उलट मी म्हणते की नौकरी करणाऱ्या स्त्रीला घरचे आणि बाहेरचे दोन्ही जास्त करावे लागते .एवढे करून ही बऱ्याच घरात ह्या स्त्री ला सन्मान मिळत नाही .असे दिसते .अजूनही स्त्रीला सासू र वास नाही पण पतीवास सहन करावा लागतो मोठी शहर सोडली तर स्त्री ला आर्थिक स्वातत्र्यं नाही .अहो माझ्यासोबत च्या काही शिक्षिका आज ही अशा आहेत की त्याना त्यांचे पगार ही माहीत नाहीत .कारण ते काम त्यांचे नवरे चोख करतात .खूप स्त्रियांना आर्थीक भावनिक स्वातंत्र्य नसते .पण अपेक्षा चे ओजे मात्र खूप असते .
 ----कविता देशमुख 


[6/19, 7:31 PM]  🏵स्पर्धेसाठी🏵

🏵मी आजची सावित्री ... नाही भित्री....🌹

    स्रियांच्या बाबतीत आजही समाजाचं चित्र फारसं बदललेलं दिसत नाही... अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हटलं तरी चालेल...     ब-याचदा त्याचा प्रत्येय आल्या शिवाय रहात नाही... जेवढी नकारात्मकता आहे तेवढेच सकारात्मक चित्रही पहायला मिळतं..... या लेखातून... सकारात्मकतेविषयीच बोलण्याचा प्रयत्न....
         मी आजची सावित्री ....
मांडता येतात मला माझे विचार...सहजतेनं व्यक्त होता येतं....चांगल्या- वाईटातला कळतो फरक... तुलनात्मकदृष्ट्या. जुन्या रुढी, परंपरांना मी खतपाणी घालत नाही... अंधश्रद्धेचं ओझं माझ्याच्याने पेलवत नाही.....
      सावित्री बाई फुलेंचा आदर्श आहे माझ्यासमोर ....
पूजनीय, वंदनीय आहेत त्या...
प्रत्येक 'स्री' च्या अस्तित्वाची ओळख आहेत त्या....समर्पणाचं, त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहेत त्या...
कर्तृत्वाची परिसीमा आहेत त्या.... स्री शक्तीचा जागर आहेत त्या... प्रेमाने ओथंबलेली घागर आहेत त्या... जिवंत आहेत त्या आजच्या प्रत्येक सावित्रीच्या मनात... स्वयंपूर्णतेचे, स्वावलंबनाचे, आदर्श जीवनाचे, शिकून- सवरुन स्व- कर्तृत्वाचे ध्वज उभारण्याचे मुर्तीमंत उदाहरण बनून... जळत आहेत ज्योतीस्वरुप...
रुजत आहेत मनामनात 'स्री-शिक्षणाची' प्रेरणा बनून....
         त्या सावित्रीला स्मरते मी नित्य....तिच्या विचारांनी प्रेरित होऊन... प्रकाशमान करते मी माझं संपूर्ण जीवन... माझ्यातील क्षमतांची ओळख मला त्या माता सावित्री मुळेच झाली...त्या आईचा आदर्श समोर ठेवून अजूनच उंचावत आहे माझं आकाश.... मला आजमावण्यासाठी.... खरी उतरत आहे मी... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर .... यशाचे ध्वज फडकविण्यासाठी अधिर आहे मी.... "स्री शिक्षणाचा" वारसा अविरत जपायचा आहे... प्रत्येक स्रीच्या मनात सावित्री बाई फुलेंची शिकवण जाणिवपूर्वक पेरण्याचा अट्टहास आहे माझा... शिक्षणाने समृद्ध होऊनच... प्रत्येक स्री स्वयंपूर्ण होईल हा विश्वास आहे माझा..
          मी स्वतः स्वयंपूर्ण आहे... बिनधास्त आहे...सर्व जबाबदाऱ्या पेलण्याचं माझ्यात सामर्थ्य आहे...सांभाळता येते मला मर्जी कुटुंबाची... पेलते मी जबाबदारी बाहेरची आणि घरची... स्वतःला सिद्ध करता-करता जपते मी नात्यांना बखुबी...खांद्याला खांदा लावून जोडिदाराच्या...सांभाळते मी धूरा संसाराची ... जपते आईपण... करते योग्यरितीने मुलांचं संगोपन ... घडवते एक चांगलं व्यक्तिमत्त्व भावी पिढीचं...
         अंधश्रद्धेला पडत नाही बळी... खोडून काढते प्रत्येक कल्पना खुळी... चांगली- वाईट नजर मला कळते...वाईट प्रवृत्तीच्या लोकांना शिकवता येतो धडा...
       मान्य आहे मला, स्वप्नवत सारं असणार नाही...पण परिस्थितीशी झुंज देता येते मला...अन्याय सहन करणं रक्तातच नाही माझ्या.... अन्यायाला लगाम घालण्याची मला, अवगत आहे कला...
       सावित्री बाई फुलेंचा वारसा चालवायचा आहे अखंड.... सावित्रीच्या अनेक वारस कन्यांनी उंचावली आहे मान देशाची.... अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवत...फडकवले आहे ध्वज यशाचे....कुठल्याच बाबतीत मागे नाही... सोबतीने लढत आहे "आजची सावित्री"... झेप तिची दिवसेंदिवस उंचावत आहे.... सहज अवकाशाला गवसणी घालण्यासाठी .... उडवते ती "फायटर प्लेन" अगदी आत्मविश्वासाने .... बिनधास्तपणे....देशाच्या सीमेवर... लढते आहे देशासाठी.... सलाम तिच्या कर्तृत्वाला .... अशी अनेक क्षेत्र आहेत... जी स्रीयांनी काबीज केली आहेत....काय वर्णावे त्यांचे गुण...???
    सलाम.... सलाम... सलाम.
आजच्या सावित्रीच्या लेकी स्वयंपूर्ण आहेत.... केवळ आणि केवळ सावित्री बाई फुले आणि क्रांतीसुर्य ज्योतिबा फुलेंमुळेच.....

आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्हांस असे अभिमान 
प्रगत आणि उज्वल भविष्य 
प्रगल्भ आमचा स्वाभिमान ....

- जयश्री अनिल हातागळे 
कोंढवा बुदृक ,पुणे 48
[[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]][[]]

[[]][[]][[] संकलन समाप्त [[]][[]][[]




[6/19, 6:13 PM] नासा येवतीकर धर्माबाद:
साहित्य दरबार स्पर्धेत आज सहभागी स्पर्धक
1) हणमंत पडवळ
2) सुन्दरा सानप
3) नासा येवतीकर
4) मीना सानप
5) संगीता देशमुख
6) निर्मला सोनी
7) कल्पना जगदाळे
8) वृषाली वानखडे
9) सुनंदा पाटील
10) प्राची देशपांडे
11) प्रणाली काकडे
12) संगीता सपकाळ
13) बाबू फिलीप डिसोजा 
14) कविता देशमुख 
15) जयश्री अनिल हातागळे 

चुकून कोणाचे नाव राहिल्यास चेक करावे























No comments:

Post a Comment