नागोराव सा. येवतीकर

Friday, 29 November 2019

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे



कुटुंब ही मुलांची पहिली शाळा असते. आई ही त्याची पहिली शिक्षिका असते तर वडील त्याचे दुसरे शिक्षक. वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे शिक्षणासाठी शाळेत जाण्यापूर्वी तो घरातच वावरत असतो. या वयात मुलांना चांगले काही ऐकायला आणि बघायला मिळाले तर आपले मूल नक्की बुद्धिमान होऊ शकते. खास करून आईने मुलांना नेहमी काही ना काही ऐकू घालावे. उदाहरण म्हणून आपण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन विचारात घेता येईल. मा जिजाऊ यांनी बाल शिवाजी यानाा लहानपणी रामायण आणि महाभारत यातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे राजे घडले. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी थोडा वेळ अवश्य काढावे. मुलांना असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्यावी. कुटूंबातील वाद किंवा कलह मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करत असतो. म्हणून कुटुंबात नेहमी प्रेमाचे आणि खेळीमेळीचे वातावरण असायला हवे. 
आपण लावलेले रोपटे चांगले वाढावे म्हणून त्यास आपण नित्यनेमाने पाणी टाकतो. सूर्यप्रकाशात त्याची वाढ चांगली होते. मुलांच्या बाबतीत देखील असेच आहे. मुलांच्या निकोप वाढीसाठी आईने पाण्याचे काम करावे तर वडिलांने सूर्यप्रकाश व्हावे. वयाच्या दहाव्या वर्षेपर्यंत मुलांकडे विशेष लक्ष दिले की पुन्हा त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची गरज भासत नाही. तेंव्हा नुकतेच पालक झालेल्या आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. 
- नासा येवतीकर, 9423625769

3 comments:

  1. लेख मनापासुन आवडला.मनापासुन शुभेच्छा.यासोबतच आई आणि वडीलांनी आपला मोबाईल आणि आपला टि.व्ही.काही वेलासाठी नक्की,ईमानदारीने बंद ठेवावा.मोबाईलला आणि टि.व्हीला जेवढा वेल देतात त्याच्या दुप्पट वेल आपल्या हुशार मुलासाठी द्यावा.त्यातुन रिझल्ट पाहायचा असेल तर तो प्रत्येक पालकाला सोलासतरा वर्षानंतर नक्की मिलेल.किंवा दहावी बारावी नंतर त्याचं सत्य बाहेर पडेल.बघा पालकांनो.एवढं जमते का?मो.टीवी,महत्वाचा नाही असं १००% म्हणनार नाही.पण माझा विचार बावाँ.

    ReplyDelete