नागोराव सा. येवतीकर

Saturday, 25 May 2019

ग्रामीण दुष्काळ

ग्रामीण दुष्काळ आणि शहरी झगमगाट

आपण भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीच्या काळात गेलो तर आपणांस असे दिसून येते की, त्यावेळी ग्रामिण भागात राहणारी संख्या शहरांतील संख्येपेक्षा कमी होते. आर्थिक चलन अस्तित्वात आले नव्हते. लोकं कामांच्या मोबदल्यात धान्य देत असे आणि सर्व धान्य त्याच गावात फिरत रहायचे. सर्व लोकांच्या हाताला काम मिळायचे त्यामुळे कोणी बेरोजगार दिसायचा नाही. एकमेकात प्रेम व सहकार्याची भावना त्यांच्यात असायची. पुढे यांत हळूहळू बदल होत चालले आणि शहरीकरणाचा विस्तार वाढत जाऊ लागला. कामांच्या मोबदल्यात जसे पैसा आला तसे लोकं खेड्यातून शहराकडे धाव घेऊ लागली कारण इथे शहरांत सर्व सुख सोई सुविधा मिळतात आणि तेच खेड्यातून मिळत नाहीत म्हणून खेडी ओस पडायला लागली आहेत. दुष्काळाच्या झळा फक्त ग्रामिण भागातच आहे असे नाही तर शहरांत सुध्दा या दुष्काळाच्या झळ जाणवत असतात. जो झगमगाट शहरांत दिसून येतो तो खूप वरवरचा असतो. ग्रामिण भागातील गरीब शेतकऱ्यांसारखी मंडळी इथे शहरांत सुध्दा तसेच राहतात. पैसा फेक तमाशा देख ही प्रवृत्ती इथे शहरांत आढळून येते. पण खऱ्या माणुसकीची माणसे आज ही खेड्यातूनच सापडतात. शहरीकरण ची संस्कृती खेड्यात न गेलेली बरी. असे दुष्काळ येतात आणि जातात.

- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment