नागोराव सा. येवतीकर

Friday, 31 May 2019

सर्व कविता

📸📱 " *सेल्फ़ी* "📱📸

जिंदगी की लम्हों को याद करना है
हर वक्त को अपनी अल्बम में सजाना है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 1 ।।
शादी की सगाई हो चुकी है
शादी से पहले का चेहरा याद करना है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 2 ।।
आज आप बड़े ही खुश नजर आ रहे है
खुशी की मुस्कान याद करना है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 3 ।।
कुछ तो भी बात है आपकी खुशी में
ये मुस्कान की याद ताज़ा रखनी है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 4 ।।
गम के मारे आज मदिरा खूब पी रखी
उस वक्त कैसे दिखते होंगे ये जानना है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 5 ।।
आपको गुस्सा बहुत आया है
गुस्से में लाल चेहरा देखना है
तो अपनी एक सेल्फ़ी ले लिया करो ।। 6 ।।
           - ना. सा.
नो सेल्फ़ी झोन में सेल्फ़ी मत निकालो

।। शाळा - शिक्षण ।।

पटसंख्या किती ही असो
शाळा बंद व्ह्ययलाच नको
सारे शिकूया पुढे जाऊया
शिक्षणाचे ब्रीद विसरायला नको

सर्वाना मोफत व सक्तीचे शिक्षण
गावागावातून मिळायलाच हवे
अंक आणि अक्षराचे ज्ञान
शाळेशाळेतून कळायालाच हवे

शिक्षणाचे महत्व काय असते हे
अडाणी माणसाला विचारून पहावे
शिक्षणाने जीवनात काय मिळते हे
समृद्ध झालेल्याचे जीवन पहावे

शाळेतून जे काही मिळते
त्यास जगात तोड नाही
शिक्षणाशिवाय आपले
जीवन काही गोड नाही

।।बाळाची आठवण ।।

तुझे हसणे, तुझे वागणे
आठवित राहते, तुझे बोलणे

तुझे रुसणे, तुझे फुगणे
अजुनही आठवते, तुझे चालणे

तुझे गाणे, तुझे तराणे
कसे विसरेन, तुझे पहाणे

तुझे खाणे, तुझे पिणे
आठवण येतात, तुझे रांगणे

🔢🔰 अंक कविता 🔰🔢

1⃣ एक-दोन, एक-दोन 2⃣
  माझ्यासोबत येतेय कोण ?

3⃣ तीन-चार, तीन-चार 4⃣
    खेळून मजा करू फार

5⃣ पाच-सहा, पाच-सहा 6⃣
   सतत हसत आनंदी रहा

7⃣ सात-आठ, सात-आठ 8⃣
   अभ्यास माझा सोडेना पाठ

9⃣ नऊ-दहा, नऊ-दहा 🔟
   सुट्टीच्या दिवशी घरी रहा

    ।। राष्ट्रीय प्रतिके ।।

मोर आपला राष्ट्रीय पक्षी
त्याचे पंख किती नक्षीदार
पावसाळ्यात नाचतो छान
पिसारा फुलवितो डौलदार ।।

कमळ आपले राष्ट्रीय फुल
चिखल जेथे तिथे उगवतो
कुठे पांढरा कुठे रंगीन असा
हा प्रत्येकाला फार आवडतो ।।

वाघ आहे आपला राष्ट्रीय पशू
त्याला बघून होते सर्वांची थरकाप
अंगावर आडव्या काळ्या पट्टया
डोळ्यात दिसतो त्याच्या संताप ।।

राष्ट्रीय फळ आहे आंबा
त्याची चवच आहे न्यारी
पाहुणे रावळे आले घरी
सरबराई करायला लई भारी ।।

तिरंगा आपला राष्ट्रध्वज
केसरी, पांढरा आणि हिरवा
विविध रंगाचे आकर्षण
प्रत्येकाना वाटतो हवाहवा ।।

पावसात ......

आभाळ दाटले बघ नभी
होईल भरपूर बरसात
पाऊसधारा अंगावर झेलू
मनसोक्त नाचू या पाण्यात

वादळवारे लगेच सुटतील
ढगे पळतील वेगात
छत्रीविना पाऊस पाहू
भिजुन जाऊया पाण्यात

पडला जोराचा पाऊस
साचले पाणी खड्यात
कागदाची होडी करू या
वाहून जाऊ द्या पाण्यात

थांबला एकदाचे पाऊस
खेळूया झिम्मड पाण्यात
एकमेकावर पाणी उडवू
खेळ आलाय पहा रंगात

मी कसा घडलो ?

लेखक कसा असतो ?
शाळेत प्रश्न पडलेला
त्याचे उत्तर शोधताना
प्रश्न विचारले स्वतःला

मुलांचे पाय पाळण्यात दिसतात
असे एकमेकात बोलले जाते
माझ्या विषयी मात्र वेगळेच
बिनकामाचा निघणार असे वाटते

पण दैव माझे चांगले की
गुरु मला चांगले मिळाले
शिकून चांगला शहाणा झालो
म्हणून आज हे दिवस लाभले

मनाचा विरंगुळा म्हणून
मी विचार लिहित गेलो
कधी लोकांच्या समस्येवर
तर कधी स्वतःवर लिहिलो

मी स्वतः ला भाग्यवान समजतो
मला जीवनात सर्वस्व मिळाले
कुटुंब, परिवार, नातलगासह
जिवाभावाचे मित्र ही लाभले

*।। उपवास ।।*

दिवसेंदिवस वाढत चाललाय
तुझा देवाकडचा सहवास
आरोग्याकडे लक्ष दे
करू नकोस उपवास ।।
प्रत्येक वार असतो
कोणत्या तरी देवतेचा
सकाळपासून उपाशी
विचार कर जरा पोटाचा
अश्याने तू अशक्त होशील
करून शरीराचा उपहास
आरोग्याकडे लक्ष दे
करू नकोस उपवास ।।
रोज पोटभर खाऊ नये
त्याने अजीर्ण होऊ शकते
रोजच उपाशी राहिलो तरी
पोटात त्रास होऊ शकते
शरीराच्या वाढीसाठी
सोड उपास अन तपास
आरोग्याकडे लक्ष दे
करू नकोस उपवास ।।

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना
हार्दीक शुभेच्छा..!

मुलांना देउनी आत्मज्ञान
जागरूक त्यांना बनवी
शिक्षणाने होतो विकास
गुरुजीं सदा हेच शिकवी

जगण्याची रीत कळते
शत्रू असो की दानव
गुरुच्या संपर्कात येऊन
बनतात सर्व मानव

गुरु शेवटी गुरु असतो
त्याला जगत नाही तोड
त्यांचे बोलणे ऐकलो नाही
जीवनाला मिळते वेगळे मोड

प्रत्येकाला असतो गुरु
त्याविना मिळत नाही यश
आपल्या अज्ञानामुळे
कोणी ही करतो वश

म्हणून गुरुला देव मानूनी
सदा त्यांची सेवा करू
शिक्षकदिनाच्या निमित्ताने
सदविचाराची कास धरु

✍      *।। शिक्षक ।।*    ✍

शिक्षक असल्याचा अभिमान मला आहे
शिक्षकांविषयी स्वाभिमान मला आहे

माणूस घडविण्याचे काम करतो
त्यामुळे समाजात सन्मान मला आहे

माझी वागणूक एक आदर्श ठरते
म्हणून चार लोकांत मान मला आहे

काय करावे अन काय करू नये
पदोपदी याचे अवधान मला आहे

नव्या तंत्रज्ञानांविषयी मुलांना
सजग करण्याचे ज्ञान मला आहे

प्रगतीपथावर नेणारा सुजाण असा
नागरिक घडविण्याचे भान मला आहे

              *।। विचार ।।*

बुध्दीवंत करतात चांगला विचार
म्हणूनच असतो चांगला आचार

जो चांगले विचार करून बोलतो
त्याच्या जीवनात असतो सदाचार

जास्त संपत्तीची आस धरून
कमविणारा करतो भ्रष्टाचार

मैत्री वाढेल आणि टिकेल ही
जर असतील आपले सुविचार

वाईट बोलण्याने साथ तुटते
म्हणून करू नये अविचार

मोकळेपणाने जो करतो संवाद
समाजात त्याचा मुक्त संचार

⛳    *।। कष्ट ।।*   ⛳

रोज करावे खुप खुप कष्ट
होईल आपला आळस नष्ट

समाज विरोधी कृत्य केल्यास
सारेच म्हणतील आपणास दुष्ट

कुणासोबत वाईट वागू नये
अन्यथा नाव होईल भ्रष्ट

समोरच्या लोकांना कळेल असे
आपले विचार असावे स्पष्ट

इतरांना नेहमी सहकार्य करावे
कधीच विसरु नये ही गोष्ट

।। आठवण ।।

पूर्वीसारखी स्वप्नात ती येत नाही
आठवणीतून काही ती जात नाही

मला माहित आहे तिचे जगणे
माझ्याशिवाय क्षणभर ती राहत नाही

मोठ्या टपोऱ्या डोळ्यातील अश्रु
गाळताना मला ती पहावत नाही

खुप प्रेम केलो होतो तिच्यावर
माझ्याशिवाय तिला करमत नाही

मला त्रास नको याची काळजी घेते
काही झाले तर तिला सोसवत नाही

ती सुखाने रहावे कुठेही म्हणून
मी तिच्या जीवनात डोकावत नाही

पूर्वीसारखी स्वप्नात ती येत नाही
आठवणीतून काही ती जात नाही

    ।।   जीवनसाथी   ।।

जीवनसाथी माझी श्वास आहे
माझ्यावर तिचा विश्वास आहे

मला जगण्याची दिशा कळाली
खरे सांगतो ती माझी आस आहे

तिच्या येण्याने स्वप्न पूर्ण झाले
तिच्याविना माझे जीवन भकास आहे

एकमेकाना समजून चालतो आम्ही
तेच तर जीवनाचा विकास आहे

वाद झाले तरी संवाद होतात
म्हणून तर जीवन झकास आहे

*।।   बेफिकीर   ।।*

खिशात नाही दमडी फिरण्यात दंग आहेत
उपाशी पोरे घरात हे खाण्यात दंग आहेत

जगात चाललेल्या अनैतिक गोष्टीच्या
पेपरमधील बातम्या वाचण्यात दंग आहेत

लोकांना एकवेळचे जेवण मिळत नाही
हे क्रिकेटचा खेळ पाहण्यात दंग आहेत

अन्नासाठी कोणी चालतो तर कोणी
पोटासाठी सकाळी चालण्यात दंग आहेत

ईथे कुणाला नीट ऐकूच येत नाही
मोठ्या आवाजात बोलण्यात दंग आहेत

सीमेवर दुष्मनाच्या हल्लेत जवान मरतोय
कॉमेडी शो बघत हसण्यात दंग आहेत

नेहमीच जर तर ची भाषा बोलणारे
नशिबावर दोष देत रडण्यात दंग आहेत

यांना कशाचे काही देणे घेणे नाही
बेफिकीर मौजमजा करण्यात दंग आहेत

........... *।। कष्ट ।।* ..........

कष्ट हेच आमच्या जीवनाची राणी
आम्ही गातो रोज आनंदाची गाणी

जीवनात करावे अपार कष्ट तेंव्हाच
चमकेल आपल्या गळ्यात यशाचे मणी

उन्हाळ्यात जर नको असेल दुष्काळ तर
जमिनीच्या पोटात भरावे पावसाचे पाणी

लोकं आपल्या सदा सोबती असतील
जर असेल आपली चांगली वाणी

समाजात असे करावे काम छान
जसे दही घुसळल्यावर येते लोणी

मनातील कचरा असे साफ करावे जसे
केस साफ करण्याचे काम करते फणी

.               *।। आई ।।*

नारी सर्व रुपात, करा तिचा आदर
गर्भात कळी खुडून, करू नका अनादर

कुणी म्हणतो ताई अन कुणी म्हणतो माय
कुणी म्हणे बायको तर कुणी म्हणतो मदर

ती सदैव झटते असते आपल्याचसाठी
तिच्या सेवेसाठी असावे सदा सादर

जरी मोठे झालो तरी विसरत नाही
सदा आठवते ऊब देणारी मायेची पदर

नऊ महिने नऊ दिवस ती सांभाळ करी
बाळाचे घर म्हणजे आईचे उदर

तिच्या सहवासात ना थंडी ना वारा
शांत झोप लागेल जरी अंगावर नसेल चादर

आपल्या बाळासाठी सोसते खुप कष्ट
विसरु नका तिला करा जरा कदर

जो विसरतो तिला आणि जगतो चैनीत
त्यांच्या जीवनाचे होईल कधी ना कधी गदर

   .              ।। निवडणुका ।।

निवडणुका आले जवळ की, सारे आठवते
हाता-पाया जोडून मतदान करण्यास कळवते

निवडणुकीतली आश्वासने गेली वाऱ्यावर
एकदा आले निवडून की सारे काही विसरते

त्यांचे कोणतेही काम चुटकीसरशी पण
छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला पळवते

मालाला भाव नको तरी वाढते महागाई
कसे आणि किती प्रकारे जनतेला छळवते

पाच वर्षात केले नाही काही काम की
पाहून पाहून जनता त्याला नक्की रडवते

*एक मतला एक शेर*

आज ही मी साहित्याला करतो वंदन
या कामी मदत करते साहित्य स्पंदन

चला लिहू या आपल्या मनातले भाव
करू या आपल्या विचारांचे मंथन

अभिव्यक्त होण्याची संधी सर्वाना मिळते
चला मुक्त होऊ या तोडून सारे बंधन

लेखणी अशी बहरू दे तो वसंत शब्दांचा
दरवळून या टाकू विचार, जसे सुगंधी चंदन..!

      ।। मी साहित्यिक ...... ।।

मी लिहित नाही, कुणी वाचावे म्हणून
मी लिहितो मनाला मिळावे खुशी म्हणून

साहित्याचा ना गंध होता ना होता छंद
पूर्वी कविता म्हटले की जात होतो पळून

मनातील भावना व्यक्त करता खुप लिहिलो
लेखन किती झाले एकदा मागे पाहिलो वळून

विचार करत गेलो आणि लिहित गेलो म्हणून
साहित्याचा आस्वाद घेता आले फार जवळून

ललित लेख कथा आणि कविता लिहिताना
साहित्यातील नवरस आज मला आले कळून

मी साहित्यिक असा लहानाचा मोठा झालो
अनेक वाचक माझ्या साहित्यावर जाती भाळून

*नवरात्र स्पेशल कविता*

.            *।। नारी ।।*

नवरात्रीच्या दिवसात असतात नऊ रंग
पूर्ण वर्षभर जगती त्या आठवणीच्या संग

दिनविशेषा पुरते इथे नारीला पूजले जाते
नंतर मात्र तिला पदोपदी करावे लागते जंग

आई वडील आजी आजोबा पती आणि मुले
सगळ्याची सेवा करण्यात नेहमीच राहते दंग

तिच्याकडे आहे बुध्दी आणि जरा शक्ती
जग जिंकू शकते जर बांधला तिने चंग

आजच्या जगात अबला नसून सबला आहे
ती दुर्गा बनू शकते करू नका तिला तंग

.        ।। करू नये ।।

प्रेमाने बोलत रहा असे करू नये वाद
जीवनात चांगल्या गोष्टीना करू नये बाद

नवरा-बायकोनी नेहमी रहावे एकोप्याने
वाद वाढत राहतील असे करू नये संवाद

संसारात सदा चढ-उतार येतच राहतात
जीवनातल्या कटु प्रसंगाना करू नये याद

मानवी जन्म आहे श्रेष्ठ मिळणार नाही पुन्हा
जीवन आहे अनमोल असे करू नये बरबाद

.     *।।     ऑनलाइन गुरुजीं     ।।*

गुरुजींने असे काय केले आहे हो पाप
सर्वचजण त्यांना देऊ लागले आहे ताप

काही करून सर्व कामे ऑनलाइन करा
मुले अप्रगत राहिली की करता तुम्ही संताप

दिवसा शाळा आणि रात्रीला माहिती भरा
त्यांची अवस्था पाहून उडतो अंगाचा थरकाप

मुकी बिचारी कुणी हाका अशी त्यांची स्थिती
किंमत करण्याचे कोणतेही नाही माप

ऑनलाइन बदल्याने गुरुजीं झाले सैरभैर
सरकारने लावली बदल्याच्या वशिलीवर चाप

गुरुजींना देऊ नका हो असा तुम्ही त्रास
अन्यथा दे देतील तुम्हाला नुकसानीचा श्राप

.             *।। पाप लागतं ।।*

करू नये कुणाचं वाईट नसता पाप लागतं
गोरगरीबांना खाल्लो लुटून तर शाप लागतं

केली असेल चोरी आणि मन खात असेल
न पळता देखील तेंव्हा बघा धाप लागतं

जसे आपले विचार तशी राहणार कृती
कोणतेही कर्म करा त्याला एक माप लागतं

तुम्ही कसे आहात हे वर्तनावरुन कळते
वर्तनाच्या मोजणीला एक मोजमाप लागतं

तशी तर आपली ओळख खुप आहे पण
आपल्या नावासाठी एक बाप लागतं

*।। जीवनात .....।।*

जीवनात कधी कधी होते खरीखुरी परीक्षा
चांगले काम केलो किती तरी मिळते शिक्षा

अपार मेहनत व कामावर श्रध्दा असली की
नशिबात सर्व मिळते असावी प्रतीक्षा

गरज असेल तितकेच खर्च करावे तेंव्हा
येणार नाही वेळ आपल्यावर मागायची भिक्षा

सर्वांशी प्रेमाने रहावे आणि गोडही बोलावे
सुखीसमृध्द जीवनासाठी मिळते हीच दीक्षा

ईश्वरावर श्रद्धा ठेवावी काळजी करू नये
तोच करतो नेहमी आपल्या जीवनाची सुरक्षा

.     *।। चूक माझी ।।*

( एका कष्टकरी शेतकऱ्यांची व्यथा )

विश्वास तुझ्यावर ठेवून
केलो फार मोठी चूक
पश्चाताप करतो आत्ता
मिळत नाही बघ सुख

माझ्या कष्टाला मिळेल
वाटले योग्य ती किंमत
घामाला मिळत नाही दाम
कशी भागेल माझी भूक

आज नाही तर उद्या
उगवेल चांगला दिवस
आशा ठेवलो तरी ही
माझ्या नशिबी फक्त दुःख

डोक्यावरी कर्ज वाढतो
रोज वाढत जाते काळजी
माझ्या आत्महत्येमुळे सर्व
होतात काही दिवस भावुक

इथे आळशी लोकांना
बरेच काही मिळते अन
कामकऱ्यांना मनस्ताप
चूक माझी झाली ठाऊक

।। आली आली दिवाळी ।।

दिवाला दिवा लावुनी
प्रकाश पसरे चहुकडे
हृदयास हृदय जोडूनी
आनंद मिळे सगळीकडे

आली आली दिवाळी
उरात माझ्या मोद भरे
नवे कपडे सर्वच नवे
जीवनात दुःख ना उरे

लाडू शेव अनारसे
फराळाची मेजवानी
मित्र नातलगाची भेट
दिवाळीच्या निमित्तानी

नका करू आतिषबाजी
दारूगोळा फटाक्याची
यावर्षी करू या संकल्प
प्रदुषणमुक्त दिवाळीची

*।।  प्रदुषणमुक्त दिवाळी  ।।*

आली आली बघा दिवाळी
प्रदूषणमुक्तीची देऊ या टाळी

विचाराची पेटवू या ज्योत
सहकार्याची खाऊ या गोळी

फटाक्याचा आनंद असे  क्षणभर
संपूर्ण जीवनाची करते होळी

सर्वत्र धूर आणि धडाडधूम
आवाजाने घाबरतात सगळी

अघटित काही घडले की
जीवनाची होते राखरांगोळी

अपघातापूर्वीची घेऊ काळजी
येऊ देऊ नये कुणावर ही पाळी

फटाक्यामुळे नको कोणते दुःख
करू या प्रदुषणमुक्त दिवाळी

...       *दिवाळी*      ...

दिवाळी...  सर्वांच्या आनंदाचा
दिवाळी... नव्या नव्या कपड्याचा
दिवाळी... गोडधोड खमंग फराळाचा
दिवाळी... धूमधडाक फटाक्याचा
दिवाळी... नातलगाच्या स्नेहमिलनाचा
दिवाळी... जुने बालमित्र भेटण्याचा
दिवाळी... तेजोमय दीपोत्सवाचा

दिवाळी... सर्वाच्या आपुलकीचा
दिवाळी.. बालगोपाळाच्या मस्तीचा
दिवाळी... माहेरी आलेल्या लेकीचा
दिवाळी... विद्युत रोषणाईचा
दिवाळी... असतो व्यापाऱ्यांचा
दिवाळी ... तुमचा आणि आमचा
दिवाळी... सारखा असतो सर्वांचा

*।। मातृभाषेतून शिक्षण ।।*

शिक्षणात आपल्या मुलांकडून
पालक ठेवतात खुप अपेक्षा
अपेक्षेच्या ओझ्याखाली दबून
मुलांना मिळते मोठी शिक्षा

मूल जन्मल्यापासून सुरु होतो
शिक्षणाच्या स्वप्नाची मालिका
मूल शिकून मोठे व्हावे म्हणून
सर्व म्हणती इंग्रजी शाळेत शिका

आपली मातृभाषा सोडून सर्व
परक्याच्या भाषेला जवळ करतात
कुणाला काही कळत नाही मात्र
इंग्रजीचा खोटा आव आणतात

ज्याच्यासाठी लहानपणापासून
सर्व शिक्षण इंग्रजीत घेत होते
मोठे झाल्यावर फुगा फुटतो
त्यावेळी मातृभाषेचे महत्त्व वाटते

म्हणून प्राथमिक शिक्षण नेहमी
व्ह्ययला हवे आपल्या मातृभाषेत
नेमकी समस्या काय काय असते
सांगता येते तेंव्हा आपल्या भाषेत

पाणी

पाणी नाही म्हणूनी
फिरतोस रानोरानी
पाणी असता घरी
त्याची बचत न करी ।। 1 ।।

बचत ही आजची
जीवन आहे उद्याची
आपण हे जाणावे
पाण्याचे अपव्यय टाळावे ।। 2 ।।

पावसाचे पाणी असो
वा असो पाणी नद्याचे
वाहते पाणी अडवून
जीवन जगू समृद्धिचे ।। 3 ।।

जागोजागी आपण
अनेक शोषखड्डे करूया
वाहत असणारे पाणी
या खड्यात मुरवू या ।। 4 ।।

वाढेल पाण्याची पातळी
मिळेल पाणी पिण्यासाठी
दाहीदिशांची भटकंती
थांबेल तुझ्याचसाठी ।। 5 ।।

संवर्ग झाले चार
शिक्षक हैराण
घोळ संपेना
बदलीची

सरलची माहिती
रातभर जागती
धसकी घेतली
बदलीची

गावाजवळ सरले
उभे आयुष्य आत्ता
काळजी लागली
बदलीची

काळा दिवस ( 01 नोव्हेंबर )

पेन्शन म्हणजे काय असते ?
म्हातारपणा ची काठी असते
जीवनाला एक आधार असते
कुणी जवळ नसले तरी तिच्या
मदतीने जीवनाला आकार असते

पेन्शनमुळे काय काय होते ?
कुटुंबात आमचा सन्मान होते
कुणी तरी आम्हाला विचारते
हातात नसेल काही पैसा तर
कुत्र्यासारखी आमची हाल होते

काय फायदा पेन्शन असल्याचा  ?
जीवनात प्रश्न नसेल काळजीचा
महिन्याला प्रश्न सुटतो पोटापाण्याचा
कोणी ही असेल नसेल जवळ तरी
पेन्शनने सकाळ होई हसरा आमचा

शासनाने असे पेन्शन का नाकारले
या शिक्षकांनी असे काय पाप केले
दिवस आहे आजचा जे निर्णय केले
निवृत्तीनंतर कुठे दिसत नाही सूर्य
म्हणून सर्वानी काळा दिवस ठरविले

खुप मारल्या उड्या
अन केली खुप मजा
अभ्यासाची आठवण
देखील झाली नाही राजा

दिवाळीचा फराळ
मित्रांसंगे केली फस्त
दिवसभर खुप भटकणे
रात्रीला गप्पा चाले मस्त

असे वाटत होते की
कधीच संपूच नये सुट्टी
मामे भावाबहिणी संगे
जमली होती माझी भट्टी

दिवाळी सुट्या संपल्या
आत्ता आपल्या घरी जाऊ
भेटतील जुने मित्र सारे
चल लवकर शाळेला जाऊ

आली शाळेची आठवण
की सारे विसरायला होते
कधी एकदा सर्वाना
भेटतो असेच काही होते

।। उघडली शाळा ।।

वीस दिवसानंतर उघडली शाळा
दिनविशेष सुविचाराने रंगली फळा

घण-घण घण-घण घंटा वाजली
सारी मुले रांगेत झाली गोळा

सर्वत्र कसे सुमसान झाले होते
मुलांसोबत पक्षी काढू लागले गळा

जुन्या मित्रांची झाली गळाभेट
आजचा दिवस सर्वापेक्षा वाटे वेगळा

बघा बघा घड्याळात वाजले चार
घंटी वाजली आत्ता घराकडे पळा

नेहमी खरे बोलावे कधी ही बोलू नये खोटे
नसता जीवनात सहन करावे लागेल तोटे

नकारघंटा सोडून नेहमी सकारात्मक रहा
विचार करतील आपणास जीवनात मोठे

जीवनात सुखासोबत दुःख येणारच आहे
डगमगायचे नाही येवो किती ही संकटे

आपली प्रगती दुसऱ्यांना नेहमीच छळते
शत्रू नेहमीच पसरवून ठेवतात टोकदार काटे

दिवाळी सुट्या

खुप मारल्या उड्या
अन केली खुप मजा
अभ्यासाची आठवण
काही झाली नाही राजा

दिवाळीचा सारा फराळ
मित्रांसोंबत केली फस्त
दिवसभर खुप भटकणे
रात्रीला गप्पा चाले मस्त

असे वाटत होते की
कधीच संपूच नये सुट्टी
मामे भावाबहिणी संगे
जमली होती माझी भट्टी

दिवाळी सुट्या संपल्या
आत्ता आपल्या घरी जाऊ
भेटतील जुने मित्र सारे
चल लवकर शाळेला पाहू

आली शाळेची आठवण
की सारे विसरायला होते
कधी एकदा सर्वाना
भेटतो असेच काही होते

© नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

।। मान्सून ।।

मान्सूनची ओढ लागली
येईल काही दिवसांत
मजा करू खूप खूप
नाचू पहिल्या पावसात

चातकपक्ष्याप्रमाणे वाट पाहती
लक्ष देती फक्त पावसाकडे
पड रे पाऊस लवकर म्हणून
डोळे लावून बसले आभाळाकडे

प्रचंड उष्णता आणि गरमी
प्रत्येकजण झालंय हैराण
पावसाच्या येण्याने मिळेल
सर्वांना एकदाचे समाधान

पावसाच्या येण्याने सर्वजण
लागतात आपापल्या कामाला
मुले जातील शाळेला आणि 
शेतकरी जाईल आपल्या शेताला

संपेल पावसाची प्रतीक्षा
बरसतील पाऊसधारा
धरती होईल थंडगार अन
हवेत सुटेल गार गार वारा

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment