नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 4 December 2018

डॉक्टर देव की दानव

डॉक्टर : देव की दानव

डॉक्टर हा देवानंतरचा देव आहे, असे म्हटले जाते. कारण मनुष्य आजारी पडला किंवा त्याला काही दुखापत झाली तर तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याच्यावर योग्य उपचार करून बरा करतो. काही वेळा तर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम देखील डॉक्टर करतात. देवानंतर लोकांचा जर कोणावर विश्वास असेल तर ते आहे डॉक्टर. पण कधी कधी डॉक्टर देखील सर्व उपचार केल्यावर आता सर्व काही त्याच्या हाती आहे असे म्हणतो त्यावेळी तो स्वतःदेवाला विनवणी करीत असेल की, देवा याला वाचव, ते आता तुझ्या हाती देतो. रुग्णाला वाचविणे हे प्रत्येक डॉक्टरचे पहिलेआद्य कर्तव्य आहे. म्हणून कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाच्या जीवाशी सहसा खेळत नाही. पण काही डॉक्टर यास अपवाद असतात. ते फक्त पैसा कमविण्यासाठीडॉक्टर होतात. त्यांना रुग्णांच्या परिस्थितीशी काही देणे घेणे नसते. डॉक्टर ही पदवी मिळविण्यासाठीकिती रुपये खर्च करावं लागलं त्या सर्व रक्कमेची वसुली यातुन करावी. या उद्देश्याने ही मंडळी वागताना दिसून येत आहेत. आज वाचण्यात आलेली एक बातमी अशीच मन सुन्न करणारी आहे. पैश्याच्या हव्यासापोटी काही डॉक्टर गर्भवती महिलेची सिझरिंग करीत आहेत. काही डॉक्टर लोकांचा हा व्यवसाय झाला आहे की, दिवस भरण्यापूर्वी गर्भवती महिलेची सिझरिंग करायचे आणि मुलांची चांगली वाढ झाली नाही म्हणून त्याला ऑक्सिजनमध्ये ठेवायचे. त्या डॉक्टरला त्या ऑक्सिजन टिमकडून काही ठराविक रक्कम मिळत असेल म्हणून तर ते पंधरा ते वीस दिवस पूर्वीच सिझरिंग करतात. आमच्या ओळखीच्या एका गरीब कुटुंबातील महिला पोट दुखत आहे म्हणून दवाखान्यात गेली. ती साडेआठ महिन्याची गर्भवती असताना तिचे सिझरिंग करून बाळ बाहेर काढले. त्या बाळाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे ऑक्सिजनमध्ये ठेवले. रोज पाच हजार रु. याप्रमाणे वीस दिवसात एक लाख रु बीलकरण्यात आले. बिचारी ती गरीब जोडपे आपल्या अंगावरील सोने विकून हे बील अदा केले. अश्या डॉक्टर ला देव म्हणायचे की दानव हेच कळत नाही. आज डॉक्टर लोकांची बिल्डिंग पाहिले की लक्षात येते की हे लोकांना कश्याप्रकारे लुटत आहेत. डॉक्टरकी ही एक सेवा राहिली नसून भरपूर पैसे कामविण्याचा एक व्यवसाय बनले आहे. त्यामुळे जो तो डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर कश्यासाठी व्हायचे तर फक्त बक्कळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट दिसून येत आहे. डॉक्टर लोकांची फीसयाविषयी कोठे ही काही नोंद अथवा त्याविषयी काही कायदा नसतो. एका दिवसांतकिती रुग्णांनी त्यांच्याजवळ नोंदणी केली ? किती तपासले गेले ? त्यांचीकिती रक्कम डॉक्टर कडे जमा झाली आणि यातून किती पैसा इनकमटॅक्सच्या स्वरूपात सरकारकडे भरली. याचे कुठे ही नोंद नसते. कोणत्याही दुकानात सामान खरेदी केल्यावर त्याच्या कडे रीतसर पावती मागितली जाते तशी रीतसर नोंदणी फीची पावती डॉक्टर कडे का नसते ? यावर कोणी ही आजपर्यंत बोललेले पाहिले नाही. सरळ सरळ हा व्यवसाय गैरव्यवहार दिसतो. छोट्या शहरात शंभर रुपये तर मोठ्या शहरात तीनशे ते पाचशे रु फीस असते डॉक्टर मंडळींची. जनता डॉक्टराना देव मानते त्यामुळे त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तसे कार्य करायला हवे. रुगांच्या साध्या तपासण्यासाठीजास्तीची रक्कम ठेवल्यामुळे बरीच मंडळी त्या डॉक्टरकडे जाणे टाळतात. आजार अंगावर काढतात. म्हणून परत एकदा सांगावेसे वाटते की डॉक्टर मंडळींनी देव होण्याचा प्रयत्न करावा. पैसे तर आपणास आपोआप मिळणारच आहेत. पैश्याच्या हव्यासापोटी जनसामान्य लोकांचे हाल करू नका. आज कित्येक लोकांना दवाखाना नशिबात नसते. दवाखान्यात डॉक्टरच्या जवळ येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. म्हणून डॉक्टर लोकांनी खास करून ग्रामीण भागात फिरून सेवा दिल्यास आपल्या शिक्षणाचे खरे सार्थक ठरेल.

( समाजातील काही चांगल्या डॉक्टर बांधवांचे मन दुखावले असेल तर क्षमा करावे. )

- नासा येवतीकर

3 comments:

  1. आता परत कोरोणा काळात करत असलेल्या लुटिबद्दल लिहा. खरंतर डॉक्टर हा देव नसून दानव च आहे याची खात्री पटायला लागली आहे. काही अपवाद वगळता.

    ReplyDelete