नागोराव सा. येवतीकर

Friday, 27 July 2018

शारदा स्तवन

।। शारदा स्तवन ।।

हे शारदे मा, हे शारदे मा
ज्ञानी होण्यास आम्हा शिक्षण दे मा

तू स्वराची देवी, हे संगीत ही तुझे
प्रत्येक शब्द तुझा, प्रत्येक गीत तुझे
आम्ही एकटे, आम्ही आहोत अपुरे
तुझ्या चरणात आम्हां प्रेम दे मा
हे शारदे मा, हे शारदे मा

संतांना समजली, ऋषींनी जाणिली
वेदांची भाषा, गीताची बोली
आम्हालाही कळू दे, आम्हांला ही वळू दे
शिक्षणाचा आम्हा अधिकार दे मा
हे शारदे मा, हे शारदे मा

अति शुभ्र वस्त्रात, तू कमळात स्थिरावे
हातात वीणा, डोक्यावर मुकुट शोभे
हृदयातील आमच्या अंधकार संपू दे
उजेडात आमचा परिवार दिसू दे मा
हे शारदे मा, हे शारदे मा

( मूळ कविता हिंदी भाषेत )

अनुवाद : नासा येवतीकर, धर्माबाद

No comments:

Post a Comment