नागोराव सा. येवतीकर

Saturday, 16 July 2016

📚 साहित्य  दर्पण Whatsapp ग्रुप  📰🖊
     द्वारा आयोजित

🗽    साहित्य दरबार    🗽
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

🚩भाग :- ( 13वा)- तेरावा 🚩
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
📆 दिनांक - _17/07/2016_
🛢 वार - रविवार
~~~~~~~~~~~~~~~~
🕰 वेळ - सकाळी 10:00 ते 7:00

★★★★★★★
*गुरु पौर्णिमे निमित्त* लेख स्पर्धा
††††††††††††††††††
========

*जीवनाचा खरा मार्गदर्शक -गुरु*

==================
💥 संकल्पना :--↓↓
श्री.ना सा येवतीकर सर
**************************
💥 संयोजक --↓↓
श्री आप्पासाहेब सुरवसे
************************
💥 परीक्षक -  *अनुपमा जाधव,डहाणू*
""''''''''''""""''''''''''''''''''''''''''"'''''''''''''''''""""
💥संकलन --
 जी पी पवार पाटिल सर
~~~~~~~~~~~~~~~
💥 ग्राफिक्स :-- *श्री .क्रांति बुद्धेवार सर, धर्माबाद*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""'''''"'
🔦 स्पर्धेचे नियम -

💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 आपला लेख किमान 100 आणि कमाल 500 - 700 शब्दांच्या मर्यादेत असावे.
💥 लेखाखाली आपले पूर्ण  नाव, गाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहावे.

💥स्पर्धेतील निवडक लेख संयोजक वृत्तमानपत्रातून प्रकाशित करतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ..

💥 या  स्पर्धेचा निकाल ग्राफिक्स सह खालील blog वर  आणि साहित्य दर्पण वर पाहण्यास दिनांक _17 जूलै 2016_ रोजी सायंकाळी 9:00 Pm वाजता मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये.
💥साहित्य दर्पण ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...

📩 त्यासाठी .

🎾 खालील पैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर किंवा फ़ेसबुक वर आपले लेख पोस्ट करावे ....

👤 आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
📱 09403725973

👤 नासा येवतीकर, धर्माबाद
📱 09423625769

👤 श्री मारुती खुडे सर माहुर
📱09823922702

. . . . . . *माझे गुरू : एक आठवण* . . . . . .

आज आषाढ शुद्ध पौर्णिमा त्यास गुरू पौर्णिमा असे सुध्दा म्हटले जाते. आपल्या गुरूविषयी मनात आदरभाव निर्माण करून त्यांना वंदन व नमन करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. जो शिकवितो तो गुरू. मग तो लहान असो वा मोठा.
आम्हाला शिकविलेले आमचे गुरुजी आम्हाला आज ही जशास तसे आठवतात. त्या॑नी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी पदोपदी कामाला पडत आहेत. मला आठवते ते प्राथमिक शाळेतील मराठीचे गुरुजी. ज्या मुलांना मराठी वाचन करता येत नसे त्या मुलांना गुरूजी दिवसभर उन्हात उभे करायचे. पायात चप्पल नको, ना डोक्यावर टोपी.  आपणास उन्हात उभे राहण्याची पाळी येऊ नये ही भीती मनात होती त्यामूळे गुरुजी धडा शिकविण्यापूर्वीच त्याचे 2-3 वेळा वाचन होत असे. उन्हाचा चटका मराठी वाचण्यास शिकविले, तशी शिक्षा करण्याची आज पध्दत नाही. शासनाने शिक्षेवर जशी बंदी आणली तशी गुरूजीचे आस्तित्व कमी कमी होत चालले आहे असे समाजात अधुन मधून बोलले जाते. शिक्षा केल्यामुळे मुलामध्ये भीती निर्माण होऊन मूल न्यूनगंड होण्याची शक्यता असते. या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून शाळेतुन छड़ी ला बाद करण्यात आले. म्हणजेच पूर्वी जे छड़ी लागे छम छम विद्या येई घम घम असा जो सुर ऐकू यायचा तो आत्ता बंद झाला आहे. मुले मोकळ्या मनाने नाचू बागडू लागली आणि शिक्षक मात्र डोक्याला हात लावून बसला आहे हे आजचे विदारक चित्र आहे. काही ठिकाणी याउलट पाहण्यास मिळते म्हणून सर्वत्र तसेच असेल असे छातीठोकपणे सांगता येत नाही. पूर्वी पाठातील प्रश्न-उत्तर विचारणे ही पद्धत फार कमी होती. वाचन आणि रोज एक पान मराठीच्या पुस्तकातील पाठाचे लेखन यावर गुरुजीचा जास्त भर होता. आज माझे अक्षर सुंदर असल्याचा मला खूप अभिमान वाटतो परंतु याचे सारे श्रेय माझ्या प्राथमिक वर्गातील गुरुजीला  जाते. चौथ्या वर्गात तीस पर्यंत पाढे येणे आवश्यक होते. पाढे पाठ नसले की गुरुजी रट्टा द्यायचे. त्या रुळला भिऊन सगळे पाढे पाठ. त्याचा वापर गणिती क्रिया करताना होतो हे खूप उशिरा कळले. मात्र त्याचा फायदा झाला हे विशेष. प्राथमिक शाळेत आम्हाला खूपच कडक आणि शिस्तप्रिय गुरुजी मिळाल्यामुळे पुढील संपूर्ण शिक्षण त्याच पद्धतीने गेले. मात्र शिस्त कधी मोडली नाही म्हणून शिक्षा मिळाली नाही. वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, गृहपाठ पूर्ण करणे, शिस्तीचे पालन करणे आणि गुरुजी ना आदराने बोलणे या सवयी माझ्या अंगात ज्या रुळल्या ते फक्त आणि फक्त गुरुजी मुळे. याच सवयी पुढे आयुष्यात कामाला पडत आहेत. म्हणूनच जीवनात गुरुजी चे स्थान फार महत्वाचे आहे असे वाटते.
प्राथमिक शिक्षण गावात होते. पुढील माध्यमिक शाळेत सुद्धा चांगले गुरुजी भेटले. प्राथमिक वर्गात जो पाया रचला गेला होता त्यावर याठिकाणी खूप चांगली बांधणी झाली. मुलांमध्ये विविध गुणांचा परिपोष व्हावे म्हणून या  माध्यमिक शाळेत विविध स्पर्धा घेतले जात असत जसे की निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामूळे आपोआप माझ्या मध्ये निबंध लिहिण्याची प्रेरणा निर्माण झाली. आज मी जे लेखन करतो ते या माध्यमिक वर्गातले बीज आहे असे मला वाटते. वर्तमानपत्र किंवा मासिकात जेंव्हा माझा एखादा लेख प्रकाशित होतो आणि माझे गुरुजी जेव्हा माझ्या पाठीवर हात फिरवून मला म्हणतात " बेटा, आजचा लेख खूपच सुंदर लिहिलास" तेंव्हा त्यांना जितका आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद होतो. त्या॑नी केलेल्या मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे आज मी या स्थानावर आहे. मला पाहून किंवा माझे लेख वाचून माझ्या गुरुजीना आनंद वाटतो हे त्याच्या हावभाव वरून माझ्या लक्षात येते. तोच आनंद मी माझ्या विद्यार्थीमध्ये पाहतो. माझ्या गुरुजीचे ऋण मला फेडता येईल की नाही माहीत नाही. मात्र मी सुद्धा एक गुरुजीच आहे. त्यामूळे माझ्या गुरुजीप्रमाणे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा, ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. मी जसा शाळेत घडलो तसा माझा विद्यार्थी घडावा, यातूनच गुरुजीला खरे वंदन आहे असे मला मनातून वाटते. आज गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी माझ्या सर्व गुरुवर्य मंडळींना वंदन करतो.
- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  9423625769
=====================================
🌹साहित्य दरबार🌹
🍀 भाग. -  13 वा🍀
🍁माझे अादर्श गुरू 🍁
 गुरूपोर्णिमा जवळच आहे, परंतु आधीच माझ्या आध्यात्मिक गुरू बद्दल भावना व्यक्त करायला आनंद होत आहे.  माझे गुरू स्वामी दयानंद सरस्वती अाहेत.  त्यांनी माझ्या जीवनात खूपच बदल घडवला आहे. माझ्या  कोणत्याही शंकेचे समाधान करण्यात ते तत्पर असतात. त्यांचे सर्व वेद, ऊपनिषद, पॊराणिक ग्रंथाचे अध्ययन झालेले आहे. त्यांना ब-याच अलॊकिक शक्ती प्राप्त आहेत, मी स्वतः याचा अनुभवही घेतलेला आहे, पण त्या बद्दल मी येथे चर्चा करू इच्छित नाही.  एक व्यक्ती म्हणून मी त्यांना आपल्या समोर सादर करू इच्छितो.
सर्व ग्रंथाच्या अभ्यासामुळे बहुतेक सर्वच शंकाचे ते समाधान करतात,  पण जर अशी एखादी शंका समोर आली, की त्यांना त्या बद्दल फारसे माहीत नाही, तर ते सरळ सांगतात, " सुनिल, मला या बद्दल फारशी माहिती नाही, दोन दिवसांनी मी तुला सांगेन".   नंतर दोन दिवस ते कोठून शोध काढतात माहित नाही, पण अगदी सविस्तर त्या शंकेचे समाधान करतात.
याचे दोन ऊदा. देतो:
  १) मी त्यांना एकदा विचारले होते.  *सोम* या देवतेचे विषयी मला आकर्षण वाटत आहे. त्या बद्दल माहिती सांगा.  त्या वेळे म्हणाले, मला माहिती नाही परंतु दोन दिवसांनी त्या देवतेचे बद्दल सर्व माहिती, तिची साधना कशी करावी, तिच्या अावडी, निवडी, स्वभाव. अगदी सविस्तर माहिती सांगितली आणि वर सांगितले की, तू या देवतेच्या नादी लागायचे नाही.  का? म्हणले तर उत्तर दोनच शब्द, "*माझी आज्ञा*.
   २) त्यांना मी एकदा *जलञाटक*कसे करावे हे विचारले तेव्हाही तसेच " मला माहिती नाही,  परंतु चार पाच दिवसांनी अगदी सविस्तर म्हणजे कोणत्या तिथीला करता  येते, पाणी पातळी काय असावी,सूर्याची स्थिती कशी, किती वेळ करता येते अगदी सविस्तर माहिती दिली इतकी की, ञाटक झाल्यावर डोळयाची कशी काळजी घ्यायची इथपर्यंत.
      मी त्यांना *गुरूजी* म्हणून संबोधतो.  गुरूजी सतत फिरस्तीवर असतात पण ऒंढा नागनाथ येथे ते जास्त रमतात. ऒंढयाचे त्यांना विशेष आकर्षण अाहे.  गुरूजी सांगतात काही साधना या फक्त. ऒंढा नागनाथ येथेच सफल होतात.  तसेच अासाम मधील कामाख्या देवीची ते खूप आराधना करतात. कोणालाही  ते शिष्य म्हणून लगेच स्वीकारत नाहीत.  मला सुद्धा सहा महिने सतत मागे लागल्यावर दिक्षा मिळाली होती.
 असे सदगुरू मला लाभले याकरिता मी परमेश्वराचा व गुरूजींचा सदैव ऋणी राहीन.  त्यांना वंदन करून मी माझे लिहीणॅ पूर्ण करतो.🙏🙏
🙏तस्मै श्री गुरवे नम:
🙏हरि ॐ आदेश
🙏अलख निरंजन 🙏

@२१ सुनिल बेंडे
९४०४०७१९८४
C/54, भाग्य नगर, कारेगाव रोड परभणी
अाधार क्रमांक. 665989333442
             😎😎😎
=====================================

 ‪+91 75888 76539‬
🌹 *साहित्य दरबार*  🌹

🔵 *माझे आदर्श गुरु* 🔵

आयुष्यात मार्ग दाखवण्याचे काम आपल्याला ज्यानी केले त्या सर्वांचा
समावेश 'गुरु ' या व्यापक संकल्पनेत
होतो असे वाटते.
आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुकडून जी
विद्या आपण अर्जन करतो त्याचे स्मरण करण्याचा दिवस.
माणसाला आयुष्यात प्रत्येक कार्य यशस्वीतेसाठी गुरुची अवश्यकता असते.
मी माझ्या आयुष्यात आदर्श गुरु
म्हणून विश्वात्मक गरुदेव ...
*जंगलीदास महाराजांना*
मानतो.ज्यांच्या कृपेने माझे आवघे
आयुष्यच बदलून गेले.हिंदू धर्म शास्त्रानुसार चार पूरुषार्थ सांगितले
गेले.धर्म , अर्थ , काम, मोक्ष.यातील तीन अनायासे आपण आयुष्यात पार पाडतो.पण मोक्ष यासाठी थोडा अट्टहास जरुर करावाच लागेल त्याशिवाय त्याची पुर्तता होणार नाही.
माणसाचे मन निर्विचारी जोपर्यंत
होत नाही तोपर्यंत आपल्याला खरे सुखाची अनुभूती मिळणार नाही.
हे सुख सद्गुरुशिवाय मिळू शकत नाही.आत्मचिंतन हाच या सुखाचा
मार्ग गुरुदेवानी मला दिला.मला माझ्या आयुष्याचा खरा अर्थ  सापडला.प्रत्येक जीव आज सुखासाठी दिवसरात्र धडपडत आहे.
सतत प्रयत्न करतो आहे.मी एक असाच जीव होतो.पण जेव्हापासून
गूरुदेवांच्या सान्निध्यात आलो आयुष्य
एका आनंदी वळणावर येवून थांबलं.
गुरुदेव म्हणतात  "जोपर्यंत आत्मचिंतन माणूस करत नाही तोपर्यंत तो सुखाने राहू शकत नाही.
काय माझ्या गुरुचे वर्णन सांगू?
निर्विकार दृष्टी , अंगावर सफेद पंचा
अचल शांतता.सदैव ध्यानामध्ये अवस्था.अतिशय अल्प आहार.
अतिशय मितभाषी.
आज मी पहाटे उठुन योगा , प्राणायाम
करून ध्यानधारणा करतोय याचे सर्व
काही श्रेय गुरुदेवांना जातं.आज माझं
जे काही चाललय ते त्यांच्याच कृपेने.
 "शुद्ध ज्याचा भाव झाला ... दुरी नाही देव त्याला " या उक्तीनुसार खरच माणसाचा भाव शुद्ध असेल तर
त्याला याच जन्मात भगवंताची प्राप्ती
झाल्याशिवाय राहणार नाही.
मनाला बांध घालून त्याच्याकडून विवेकबुद्धिने कार्य करुन घेता आले पाहिजे .ही कला फक्त गुरुजवळच
साध्य करुन घेता येते असे वाटते.
धन शुद्धी दानाने होते.तन शुद्धी
स्नानाने होते .मन शुद्धी ध्यानाने होते.
विश्वशक्ति माणसाला जास्तीत जास्त
फक्त आणि फक्त ध्यानानेच मिळते.
ही कृपा गुरुशिवाय होऊच शकणार नाही.एक प्रामाणिक कबूली द्यावी वाटते ती म्हणजे ध्यान जास्त वेळ करत गेलो तर तुमची विधायक संकल्प सुद्धा गुरुच्या कृपेने पुर्ण होतात हा माझा वैयक्तिक अनुभव
आहे.अशा वेळी संतवचन आठवते ते म्हणाजे " आधी पुजा सद्गुरुनाथा--
ज्याची देवावरी सत्ता ."  याची देही याची डोळा....भोगू मुक्तीचा सोहळा.
यांचा खरच अनुभव गुरुदेवांच्या कृपेने
आल्याशिवाय राहत नाही.
शेवटी असे वाटते........
सानंद आदराने माथा जिथे झुकावा..
शिष्यास सर्व देई ऐसा गुरु असावा.

      🌹आत्मा मालिक🌹

       🌹    ॐगुरूदेवाय नमः🌹

🔵बालाजी चौधरी .केशव नगर लातूर🔵
आधार क्र..376580448411
=====================================
 
+91 90117 42342‬
गुरूप्रोर्णिमेच्या निमित्ताने मला गुरूंचा आदर व्यक्त करण्याची संधी या साहित्य दर्पण गुपमुळे मिळाली त्यामुळे प्रथमतः  मी या गुपची ऋणी आहे .खर सांगायच तर माझा आदर्श गुरू कोण ?हा प्रश्नच मुळी गोंधळात टाकणारा अाहे,करण माझ्या मते जीवनातील प्रत्येक क्षण ,प्रत्येक व्यक्ति,प्रत्येक गोष्ट,प्रत्येक अनुभव माझा गुरू आहे असे मला वाटते .गर्भधारणेतील नऊ महिने गर्भयातना सहन करूनही माझ्यावर गर्भसंस्कार करणारी" माझी आई "माझी गन्मदाती,माऊली माझी पहिली आदर्श गुरु आहे.                                ज्या गुरूजनांनी मला "अ"आईचा काढायला शिकवले ते माझे आठवणितले गुरूजी माझे आदर्श गुरू.एखादा चांगला किंवा वाईट अनुभवही आपल्याला चांगले काहीतरी शिकवतो मग त्याला आपण आपला गुरु का मानू नये?                 समाजाने दिलेली अपमानास्पद वागणूक सहन करूनही स्त्री शिक्षणाचे पावित्र कार्य करून आज ज्यांना ज्ञानज्योती म्हणून संबोधलें जाते त्या सावित्रीबाई माझ्या आदर्श गुरू आहेत.ज्या काळात स्त्री सर्व समाज बंधनात अडकलेली असताना आपल्या पत्नीला कार्यात साथ देणारे महात्मा फुले माझे आदर्श गुरु का नसावेत?मी तर म्हणते सर्वांचे आदर्श असावेत.अनाथ मुलांचे माय-बाप झालेल्या सिंधुताई सपकाळ,कुष्ठरोग्यांची सूषृषा करणारे बाबा आमटे पारिवारातील सर्व़ व्यक्ती,एकं नावाडी म्हणून जन्माला येवूनही भारताचे नाव जगात गाजवणारे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम,शेतात राबणारी माझी माय,दिवसभर काबाडकष्ट करून रात्रभर मुलांची काळजी करणारा बाप माझे आदर्श गुरु आहेत.भीक म्हणून मिळालेल्या एका भाकरीतील अर्धि.भाकरी रस्त्यावरच्या भूकेजलेल्या पोराला देणारा भिकारी मला माझा गुरु वाटतो.   .                🌷     "चिखलातला जन्मही सार्थकी लावावा,जिजाऊंसारखा गुरु सर्वांना मिळावा."   🌷                            🍀🙏🏼🙏🏼     गुरु तू सदाही कहता-"श्रम,लगन हैं।        सच्चा गहना|"                             गुरु तेरा धन्यवाद ,तुझको कऱती हुँ मैं शत-शत प्रणाम|🙏🏼🙏🏼🍀    '              माझा हा लेख सर्व गुरूजनांना समर्पित.                                    
🙏🏼🌸श्रीम् मिनाक्षी तुकाराम माळकर                            
      चौसाळा,बीड.🌸🙏🏼

=====================================
🙏🙏------गुरुपौर्णिमा-----🙏🙏
                   
                       गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः|
                   गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ||
   गुरु म्हणजे ब्रम्हा , विष्णु आणि महेश यांचे रूप.या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो! असा गुरुमहिमा आपल्या भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे.
           मानवी जीवन हे परस्परावलंबी असते.'एकमेकां साहाय्य करू,अवघे धरु सुपंथ.' या उक्तीप्रमाणे मनुष्यमात्र आपले जीवनमान सुधारण्यासाठी,उंचावण्यासाठी इतरांची मदत घेतच असतो. कोणीही एकटा जीव स्व-सामर्थ्यावर जीवन व्यतीत करू शकत नाही.आपल्या या सुंदर जीवनाला घडविण्याचे,त्याला पाठबळ देण्याचे,आधार देण्याचे कार्य कुटुंबातुन सुरु होते.पुढे जाऊन समाजातील ज्ञात-अज्ञात घटकही आपल्या आयुष्याला,व्यक्तित्वाला उभारी देण्याचे,निर्भयता देण्याचे कार्य आपल्या परीने करत राहतात.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर भेटणारे ,लाभलेले हे सर्व ज्ञात-अज्ञात घटक म्हणजेच आपले गुरू.
         मनुष्याच्या जीवनात गुरू हे  दिशादर्शक,दीपस्तंभ,मार्गदर्शक आहेत.आई-वडील या जीवनाच्या आद्यगुरुप्रमाणेच चांगले शेजारी,चांगले मित्र तसेच चांगले शिक्षक वा गुरू आयुष्याला लाभणे महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे.आपल्या या गुरुवर्यांच्या आचार-विचार,मार्गदर्शनाचा प्रभाव आपल्यावर होऊन आपले योग्य असे जीवनमान घडत राहते.जीवनाला योग्य ती दिशा देवून आपल्या जीवनाचे उन्नयन करण्याचे कार्य या गुरुंकडून घडते.शिकणे,अनुकरण करणे ही मनुष्याची जन्मजात प्रवृत्ती असते.जन्माला आल्यापासून आई -वडील,आजी-आजोबा ,भावंडे कुटुंबातील इतर सदस्य यांच्या शिकवणीचे अनुकरण,पालन करीत मनुष्य आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण करत राहतो.
विधायक शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन आपले आयुष्य आधिक सुंदर,परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.हे शिक्षण घेत असताना अनेक प्रकारच्या अनुभवांची शिदोरी,परिस्थिती,निसर्गातील घटना,पुस्तके तसेच आपले आई-वडील,आदर्श व्यक्तिमत्वे,शिक्षक आणि देवता यांसारख्या आदर्शरूप  घटकांचा प्रभाव आपल्यावर पडत राहतो.याच्यामाध्यमातून मनुष्य औपचारिक-अनौपचारिकरित्या स्वतःला 'घडवत' जातो.आयुष्याला विधायक वळण लागणे महत्त्वपूर्ण असते यासाठी सद्गुरुंना शरण जाऊन त्यांचे नम्रभावे शिष्यत्व पत्करणे कधीही योग्य ठरते.
      ज्याप्रमाणे जलाशिवाय समुद्र,सूर्य-तारकांशिवाय आकाश,भावविन भक्ती,राजाविन सेना या गोष्टी जशा विसंगत नि अपूर्ण वाटतात तसे सद्गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे.म्हणुनच श्री समर्थ रामदासांनी 'सद्गुरुविण जन्म निष्फळ' असे म्हटले आहे.ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी नौकेची आवश्यक्ता असते तद्वतच संसाररूपी हा भवसागर पार करण्यासाठी गुरुची आवश्यक्ता असते.
         या भुतलावावर थोर विभुतींनी समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचे कार्य केले.संत ज्ञानश्वर,संत एकनाथ,संत नामदेव ,संत तुकाराम ,या संतांबरोबरच छत्रपती शिवराय,स्वामी विवेकानंद,साने गुरूजी ,महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांनी समाजोद्धराचे कार्य केले पण या व अशा सर्व महापुरुषांना त्यांच्या जीवनात सद्गुरुंचे आशीर्वाद लाभले.कोणी आपल्या मातेस,कोणी आपल्या बंधूस तर कोणी आपल्या शिक्षकांस गुरू मानून त्यांच्या मार्गदर्शनाने कार्य केले म्हणून हे सर्व महापुरुष,वंदनीय ठरले.प्राचीन काळी श्रीकृष्ण,श्रीराम यांनीही वसिष्ठ ,संदीपनी ऋषींकडे ज्ञानार्जन केले.आपण ज्यांच्याकडून विद्यार्जन करून आपण आपला स्वतःचा,आपल्या कुटुंबाचा,समाजाचा,राष्ट्राचा उद्धार करतो त्या गुरुंना मनोभावे स्मरण करून त्यांचा सन्मान करणे,कृतज्ञता व्यक्त करणे,त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणुनच 'गुरुपौर्णिमा' हा दिवस सर्वच क्षेत्रांत आपणांस ज्ञानदान करणा-या गुरुंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
          या शुभदिनाचे औचित्य साधुन मीही माझ्या जीवनातील माझे आद्यगुरू माझे आई-वडील,माझी भावंडे  तसेच माझ्या औपचारिक शिक्षणातील माझ्या अंगणवाडीतील ताईपासून उच्च शिक्षणातील प्राध्यापकांपर्यंत तसेच आज शिक्षक म्हणून कार्य कर ताना मला लाभलेले आजअखेरचे सर्व मार्गदर्शक गुरुवर्यांना मी साष्टांग नमन करतो. या सर्वांच्या आशिर्वादाने मी आज जरी गुरूच्या भुमिकेत असलो तरी मला आजपर्यन्त जीवनानुभव देणा-या या प्रत्येक गुरूंचा मी आजही शिष्यच आहे.आजच्या व्यासपूजेच्या निमित्ताने  माझा या  समस्त गुरूंना मनोभावे साष्टांग नमस्कार!
  शेवटी ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे,
 सद्‌गुरु सारिखा असता पाठीराखा,
 इतरांचा लेखा कोण करी ,
 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो,
 आता उध्दारलो गुरुकृपे ॥

श्री .सुनील विलास अस्वले, पदवीधर अध्यापक,
वि.मं.पोहाळे / आळते, ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर
मोबाईल 8805835959
=====================================

[7/17, 3:52 PM] ‪+91 94207 84086‬: 🙏माझा आदर्श गुरू🙏
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू!गुरूर्देवो महेश्वरः!!!
गुरू साक्षात परब्रह्म !तस्मै श्री गुरवे नमः!!!
        मला आवर्जून सांगावेसे
वाटते कि प्रत्येकाला आपापला आध्यात्मिक गुरू असतोच,प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे.मलाही आहेत पण मला आज आगळ्यावेगळ्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे.आणि तो गुरू म्हणजे "निसर्ग."
        गुरूपासून आपण आचरणाचे नियम शिकत असतो.त्यानुसार आपण वागतो.इ.सातवी ला कविता देखील आहे 'बिनभिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरू,झाडे वेलीला पशूपाखरे यांशी गोष्टी करू!'
      मला निसर्गातील झाडाला गुरू मानावेसे वाटते.माझ्या या गुरूपासून खूप घेण्यासारखे आहे.निस्वार्थ, परोपकार, अखंड सेवा, इत्यादी.
      सदैव दुसय्रासाठी देत राहणे.दुसर्याला फुले फळे देताना झाडाला जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही.उन्हाच्या काहिलीत वाटसरूला विसावा  देणारे झाड ,कृतार्थतेची अनुभूती मिळवल्याशिवाय राहात नाही.आपले जीवनच ज्या प्राणवायू वर अवलंबून आहे तो प्राणवायू सर्वांना माझा गुरू देतो.साने गुरूजीनी तर तृणाला गुरू च्या जागी मानलय.कारण खडकावर सुद्धा ते आपलं अस्तित्व दाखवतं.
   निसर्गात अश्या लाखो गोष्टी आहेत ज्यांच्यापासून आपल्याला रोज काही ना काही शिकायला मिळते.लहानातला लहान किटक सुद्धा जगण्याची जिद्द शिकवतो.कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शिकवण निसर्गातूनच मिळते.
      म्हणूनच मला निसर्गाला गुरू मानावेसे वाटले.
निसर्गासारखा नाही रे गुरू!!!
निसर्गासारखा नाही रे गुरूवार!!!
               श्रीमती.माळेवाडीकर आर.जी.माजलगाव.
[7/17, 4:49 PM] ‪+91 97306 89583‬: स्पर्धेसाठी...✍

🙏 || *गुरु ईश्वर तात माय*|| 🙏
    || *गुरुविन जगी थोर काय*||

           मानसशात्रात म्हटल्या प्रमाणे मनुष्य, जन्म घेताच शिकत जातो.म्हणजे मनुष्य हा जन्मा पासुनच गुरुच्या अधिनस्त असतो.लहान मूल जेव्हा जन्म घेते तेव्हा त्याचा आद्य गुरु त्याची जन्मदात्री माता असते.तिच्या कडुनच ते लहान लहान गोष्टी शिकत जातं.म्हणजे माता ही आपली पहिली गुरु असते.थोड़ मोठ झाल की आसपासचा परिसर,घरची इतर मंडळी त्याला पुढील शिक्षण देण्यास प्रारम्भ करते,कळत नकळत ते त्यांच्या कडून शिकत असतं.ही मंडळी देखील आपल्या जीवनात गुरुची भूमिका निभवत असते.मूल मोठ होत शाळेत जाऊ लागतं,तिथेहि त्याला अनौपचारीकतेतुन औपचारिक शिक्षणाकडे नेणारे गुरु लाभतात.त्यांच्या आश्रयात ते मूल घडत जातं.शाळेची पहिली पायरी ओलांडतांना मूल हे मातीप्रमाने असतं.त्याच्या तील गुण दोष हे मातीत विखुरलेले असतात,त्या मातिला गाळून चाळूून विशिष्ट आकारात रुपड़ देन्याच कार्य गुरु करतात. मनुष्या च्या जीवनाला खरा अर्थ गुरुमुळेच प्राप्त झालेला आहे याचे उदाहरण आपल्याला प्राचीन इतिहासात पाहायला मिळते,उत्कृष्ट धनुर्धारी एकलव्य गुरुविना दिशाहीन होता,गुरु नसला तरि त्याने मातीत गुरु शोधला.गुरु द्रोणाचार्यांचे अर्जुनाप्रती असलेले प्रेम हे गुरु च्या शिष्य प्रेमाचे मोठे उदाहरण आहे,एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा हे गुरुप्रती गुरुभक्तिचे उदाहरण पहावयास मिळते.गुरुमुळे जीवनाला स्थिरता येते.
मी सुद्धा एक गुरु आहे,ज्ञानदान हे गुरुचे आद्य कर्तव्य असले तरि देशासाठी देशभक्त तयार करण्याचे कार्य गुरु करीत असतात.आपल्याला एक चांगला नागरिक बनविन्यात जे जे गुरु वाटेत भेटत गेले त्या सर्वांप्रती आस व्यास पौर्णिमे निमित्त कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायला हवी...
गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वा वर आठवण होते गुरुची...माझा गुरु म्हणजे माझी *आई*
*आई माझा गुरु ,आई कल्पतरु ,सुखाचा सागरु,आई माझी* परमपूज्य साने गुरुजींच्या या ओळी जनु काहि माझ्या आई साठीच बनलेल्या असाव्यात...माझी आई काहि खुप उच्च शिक्षित नसली तरि जीवनाची समज असलेली सुशिक्षित आहे.वडील बालपणीच वारले असतांना तिने मला सांभाळल,शिक्षण दिल.अडीअडचनींनी भरलेले तिचे जीवन तिने आमच्या साठीच खर्ची घातले.कठिन परिस्थितीत शस्त्र न टाकता लढन्याच शास्त्र तीन मला शिकवल,जीवन जगतांना स्वतःला सांभाळत संकटांना तोंड देत दोनदोन हात करण्याची कला मी तिच्याकडुनच शिकले.माझ्या आईने मुला मुलीत कधीही भेदाभेद मानला नाही,स्वतः पुरुषांप्रमाणे कष्ट करुण प्रामाणिक पणे जीवन व्यतीत करण्याचा मंत्र तिने आम्हा भावंडांना दिला.बालपणी पासुनच चांगले संस्कार तीने आमच्या वर केले.
मुक्या प्राण्यावर, झाडे वेलिंवर प्रेम करण्याचे निसर्ग शिक्षण तिने बालपणीच आम्हाला दिले.
"जीवन फुलपाखरा प्रमाणे जगावे पण ध्येय मधमाशीप्रमाने ठेवावे "असे शिक्षण तिने आम्हाला दिले.आजही संकटे आली की तिची वचनं आठवतात आणि संकट वाऱ्यासारखी उडून जातात...
माझ्या आयुष्याला वळण देणाऱ्या,वळणावळणावर दिपस्तंभा प्रमाणे भासणाऱ्या, सुसंस्काराची खाण असणाऱ्या माझ्या गुरुला म्हणजेच माझ्या आई ला गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वावर त्रिवार वंदन.
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

       ✍प्रणाली काकडे✍
[7/17, 5:04 PM] Surwase Bsnl: 📚  *साहित्य दर्पण*  💻

       💥  द्वारा आयोजित💥

🗽   _साहित्य दरबार_   🗽
===================
_विषय_ - *माझ्या जीवनाचा खरा मार्गदर्शक - गुरु*
===================
*गुरुर्र ब्रम्हा: गुरुर्र विष्णु : गुरुर्र देवो: महेश्वरा*
*गुरुर्र : साक्षात परब्रम्ह:  तस्मै श्री गुरवे नमेः*

         *आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु* या कवितेेतील ओळी प्रमाणे एकूणच सर्व काही शिकण्याचा मूळ पाया हा *आईच* असते. आईच आपला पहिला गुरु असते. वास्तविक विचार करता आपल्या पोटच्या मुलाच्या पहिल्या पाऊलांचे आप्रूप- नवल, आश्चर्य  आणि आनंद कोणाला असेल तर तो फक्त आणि फक्त आईला असतो. तेवढा आनंद कोणत्याही गुरुला होवुच शकत नाही. आणि मग एका मागुन एक अशी यशाची आणि विविध क्षेत्रातील गुरुवर्याच्या आशीर्वादाने उत्तुंग शिखरे आपण पादाक्रांत केली तर आईला नक्कीच गहीवरुन येते. डोळ्यात पाणी हे आसवं म्हणून नव्हे तर आनंदाश्रु म्हणून नकळत टपकतात आणि ह्या पाण्याची सर- किंमत जगातील कोणत्याही  बिसलेरी किंवा शुद्ध तसेच मौलिक पाण्याला तर नक्कीच नसतेच नसते. आणि म्हणून आईला तिच्यातील मातृत्वाच्या आईपणाला गुरुवर्याला मानाचा त्रिवार सलाम...!!!

             जीवनाच्या या वाटेवरचा खडतर प्रवास हा प्रत्येक जिव - जंतु एकंदरीत सर्व मानवजात करत असतो. यामध्ये फक्त आपणच महाकाय संकटांचा सामना करतो आहोत असे नसते. प्रत्येक जन आपापल्या परीने जीवन जगण्याची पराकाष्टा , सत्वपरीक्षा देतच असतो. आणि मग याच परीक्षेच्या जीवन रूपी यशाचा कोणी का होईना मार्गदर्शक असतोच  असतो. परिक्षेच्या जीवन रूपी यशाचा कोणी का होईना मार्गदर्शक असतोच असतो. *गरज ही शोधाची जननी आहे.* त्या प्रमाणे *गुरुच्या शोधात* प्रत्येक क्षणाला शिष्य असतोच असतो हे सत्य नाकारता येणार नाही.

           ज्या प्रमाणे प्रेमाला वयाची बंधने नसतात. त्याचप्रमाणे आपल्या खऱ्या मार्गदर्शक गुरुला मानायचेच असेल तर आपल्या जीवनाच्या वळण वाटेवर *गुरु* म्हणून एखादा मानसिक रोगी ही योग्य *मितवा* म्हणून वाटाड्या होवून मित्र होवून किंवा तत्वज्ञानाचे अमृतमयी डोस पाजत असतो. फक्त आपला दृष्टिकोन महत्वाचा  आहे. आपण नेहमी सकारात्मक बाबींचा विचार केल्यास या मनोविकृत रोगी पासूनही खुप काही गोष्टी शिकु शकतो. म्हणूनच या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे मध्यांतरी एक पोस्ट फिरत होती की तुम्हाला कुठे जायचे आहे ते तुम्हीच ठरवा.पाटी होती .
*येरवाडा-आळंदी -विमानतळ* मग लोक नकारात्मक दृष्टिकोन ठेवत येरवडयाकडे काना डोळा करायचे.पण खरा आनंद हा विमानात नाही किंवा उंच भरारी घेण्यात नाही. तसेच भक्ति मार्गातून देव धर्माचे पुजा आर्चा करून मानसिक समाधान किंवा जीवन जगण्याची उम्मीद मिळणार किंवा मिळतेच असे नाही . पण याच तथा कथीत नकारात्मक भावनेच्या नजरेतून येरवडा या ठिकाणाकडे जग पाहते आहे . पण येरवडा हा अनुभव गुरूंचा खजाना आहे.कारण जो जग जिंकण्याची महत्वकांक्षा घेवून आलेला जो जिता वही  *सिंकदर* ही याच मनोविकार लोकांना आदर्श गुरु मानायचा कारण जग जरी जिंकले तरी सर्व काही इथेच या भू लोकी सोडून जायचे असते हे त्याला एका वेडसर माणसाचे म्हणणे मनोमन पटले होते आणि म्हणून तो तेंव्हा पासून त्या मनोविकार आजारी माणसाला त्याचा आदर्श गुरु -मार्गदर्शक मानायचा.हे सत्य नकारता येणारे नाही, यात शंका नाही. येरवडा येथून नक्की दोन गोष्टींचा आदर्श मिळू शकतो .तो म्हणजे मनोविकारांचा आजार हा केवळ वैचारिक किल्ल्यांच्या अपयशी पायऱ्या चढल्यामुळे नशिबी माथी मारलेला तो एक कलंक असतो ; नव्हे  ते एक जीवन जगण्याचे वेगळे सूत्र असते. आणि येरवडयातील नाण्याची दुसरी बाजू म्हणजे तेथील कारागृह .पण याच करागृहाच्या भिंती गुन्हेगारी जगतातील लोकांना पुन्हा उभ्या आयुष्याच्या मशाली पेटवून, नवीन जीवनाची पहाट उगवत मशालीला ज्वलंत करत त्या मशालीचा प्रकाश हा संपूर्ण मानवजात उजळून निघावी अशी शिकवण देते आहे. आणि म्हणून कु -विचारांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला सु- विचारांच्या कृतीत बदल नव्हे तर क्रांती घडवून आणण्याचे महतभाग्य हे येरवडा क्षेत्र करते आहे हे या ठिकाणी नाकारून चालणार नाही. याचा अर्थ असा होत नाही की गुन्हेगारी आणि विकृत मनाला चळवळ म्हणून पाठिंबा आहे असा नाही . पण गुरु शिवाय कुठेही विद्या नाही आणि विद्या आहे म्हणजे गुरु असतील असे नाही . अपवादात्मक परिस्थिती ही स्वत: स्वत:चे गुरु म्हणून प्रकट करावे लागते .

     खरे पाहता आपल्या दैनंदिन जीवनाच्या आयुष्याची *वेल* वाढवत  असताना तिला वेगवेगळ्या स्वरूपाचे खत पाणी घालवे लागते अगदी तसेच या निसर्गाच्या चरचरातून , मुक्या प्राण्याकडून खुप काही नवनवीन पदोपदी शिकायला मिळत असते. आणि म्हणून काही -काही वेळा  या मुक्या अबोल प्राण्यांचा हेवा -असूया वाटते. अगदी स्वत:च्या  आत डोकावल्यास आपला आपल्याला खुप राग येतो आपल्या एकूणच स्वार्थी वागण्याचा दुर्गंध येतो. या मुक्या प्राण्यांकडून जगण्याची वेगळी कलाटणी प्राप्त होते आहे. त्यातून मग आपण त्यांचा आदर्श घेत आपल्या जीवन प्रवासात घडया बसवण्याची  किंवा गगनभरारी घेण्याचे आडाखे बांधत असतो .त्यातून नवनवीन , सृजनशील आणि संवेदनशील गोष्टींचा उहापोह शिवाय भविष्याच्या वेधाचा ठाव घेत आपल्या जीवनाच्या नौकेत आमूलग्र बदल प्रत्येक जण पावलावर  पावलावर घेत असतो .म्हणून च की काय या आणि अशा ज्ञात -अज्ञात गुरुवर्यांना मानाचा मुजरा  सलाम..!!!

    गुरु हा वयाने थोर असेलच असे नाही आणि म्हणून डॉ. बाबासाहेब  आंबेडकर स्वत:ला उभ्या आयुष्यात विद्यार्थी म्हणून गणत होते.त्यांनी स्वत: *आजन्म विद्यार्थी* ही उपमा लावून घेतली होती . हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, होता आणि असणार.  यात काही शंका नाही. कारण या ज्ञानाचा महासागर अथांग आहे आणि आपण त्यातील सूक्ष्म जिव - जंतु आहोत हीच भावना कोणत्याही शिष्याची असायला हवी नाही तर अति आत्मविश्वास नडल्याशिवाय राहणार नाही.
     आज तर हे स्पर्धेचे युग आहे .यात ही गुरु ही संकल्पना विशेष महत्व धारण करते आहे. *गुरु म्हणजे पैसा आणि शिष्य म्हणजे त्यांचे एक उपसा यंत्र* असेच चित्र आज म्हणावे लागेल.आजचा गुरु गुरुदक्षिण्याशिवाय  शिकवणी किंवा विद्या देत नाही . हे सत्य वास्तव आहे.  सर्वच गोष्टी पैशाच्या रुपात विकत घेता येत नाहीत म्हणून पैसा हा सर्वस्व नाही तिथे ही प्रेम हा शब्द सर्वस्व आहे शिष्यप्रेम नसेल तर गुरु हा *वांझ* असेल हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.आणि म्हणून पूर्वीच्या काळातील गुरुकुल पद्धती आणि *गुरु -शिष्य प्रेम* पहावयास मिळत नाही हे त्यांचे हे  द्योतक आहे. म्हणूनच की काय आज गुरुला पाहून नाक मुरडत - दुर्लक्ष करत निघुन जातो . कारण ज्या वयात याच गुरुने सरकारी पगारीचा मलीदा खात जे शिक्षण देयाला पाहिजे होते. ते शिक्षण त्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा त्याच्या अकार्यक्षमतेमुळे , आणि इतर कामचुकारपणांच्या कारणांमुळे आज गुरुला  गुरु मानायला शिष्य तयार नाहीत हीच आज खरी शोकांतिका आहे. त्यासाठी तमाम गुरु वर्गाने सर्व बाबींचा साकल्याने विचार करत आपल्या कर्तव्य कार्य शैलीशी एकनिष्ट राहत आपल्यातील एका  हाडाच्या गुरुला जागृत करत त्याने सरकारच्या  सहाव्याच काय  सातव्या वेतन आयोगाच्या पगारीच्या पैशांचे आखाड़े बांधत नवनवीन योजना कागदावरच्या प्रत्यक्षात राबविताना आपल्यातील गुरुला पुन्हा एकदा नव्याने चेतवून,  नवी उम्मीद आणि ऊर्जा भरून स्वत: ला काल सुसंगत ठेवत स्व: ज्ञान पिपासू वृत्ती ठेवून , ज्ञान दान वाटण्याचे महत्वपूर्ण काम हाती -पदरी घ्यावे म्हणजे येणारा काळ हा गुरु  - शिष्याचा नात्यांचा मळा  सदाबहार फुललेला दिसून येईल. म्हणजे यातून येणाऱ्या भावी पिढ्या अशा गुरु पौर्णिमेचे औचित्य साधुन आपल्या गुरूंची सेवा करायला तयार होतील आणि तेंव्हा खऱ्या अर्थाने गुरु आणि शिष्य प्रेम वृद्धिगंत होईल. म्हणूनच पुन्हा एकदा ज्ञात -अज्ञात आणि लहान-  थोर  समस्त गुरुवर्गांना नतमस्तक होत ही साहित्य लेखन संपदा अर्पण करतो ..!!!
    ✍🏼🖊🖋🎯✏️🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे सर*
       *लाखणगांवकर*
_*AMKSLWOMIAW47*_

*साहित्य दरबार स्पर्धेसाठी*
[7/17, 5:08 PM] 10 Meena Sanap: 🍁साहित्य दर्पण ग्रुप 🍁
व्दारा  आयोजित
गुरु पोर्णिमे निमित्त
********************
माझा आदर्श गुरु
******************
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातली साउली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
हे गीत अभिमानाने गावेसे वाटते.कारण गुरुपोर्णिमा म्हणजे आपल्याला ज्ञान देणार्या व्यक्तीचे स्मरण आणि पुजन करण्याचा दिवस
गुरुपोर्णिमेलाच आपण व्यास पोर्णिमा असे म्हणतो.खरच किती मंगल दिवस हा !
महर्षी व्यासांनी महाभारत लिहुन मानवाला जीवनातील सर्व प्रश्नानां उत्त्तरे दिली आहेत असो.
तसं पाहिल तर देव न मानणार्याला सुध्दा गुरु असतो गुरुची भूमिका आई पासुन सुरु होते, कारण प्रत्येक गोष्ट पटवुन देणे,ती कशी करायची हे शिकवणे, आपल्या उन्नतीकडे लक्ष देणे
होणार्या चुका उदार अंतःकरणाने माफ करुन विसरणे हे सर्व कार्य गुरुच करीत असतो. त्यांचे नाव., गाव वेगळे असेल, अध्यात्मिक गुरु शैक्षणिक गुरु, त्यांचे रुप भिन्न असेल
शरीर श्री-किंवा पुरुषाचे असेल परंतु ह्दय माञ एकच असते, भावना एकच असतात.
शिष्यांचा विकास करणे, त्याना योग्य मार्ग दाखवणे हेच गुरुचे धेय्य असते.
        आईही आपला पहिला गुरु असते.शरीराने शरीर जन्माला घालते ती आई परंतु ज्ञानात्मक जन्म हा गुरुच देत असतो.खुप साधना करुनही
जे तत्व हाताशी येत नाही किंबहुना जे 'सार' ग्रहण होत नाही ते त्यांच्या कृपाप्रसादाने
सहज मिळते इतके गुरुचें अधिष्ठान आहे.श्रीगुरु हे ब्रम्ह , विष्णु, महेश आहेत हे म्हणण्याचा आशय फार वेगळा आहे,ज्ञान क्षेत्रात  गुरु  जन्म देतात म्हणुण ब्रम्ह म्हणतात, दिलेल्या ज्ञानाचे विस्मरण होऊ नये म्हणुण त्या ज्ञानाचे पालन करतात म्हणजे सांभाळतात म्हणुण त्या अर्थाने विष्णु आणि अज्ञानाचा नाश करतात म्हणुण महेश म्हणजेच गुरु हे परब्रम्ह असतात.देव साक्षात ज्ञान देत नसुन गुरुच्या मुखातुन ते मिळत असते.
जगातील व जीवनातील सत्य सांगणारे, अज्ञानाला ज्ञान देणारे, स्वभाव परिवर्तन करणारे प्रेममय मुर्ती म्हणजे गुरु  होय.ते गाण्यासाठी कोणाच्या आवाजाला वळण देतात तर कुणाच्या बोटाला लय देतात,कोणाचे विचार बदलतात, कोणाचे मतं तर कोणाचे मनं बदलतात. अनेक रुपातुन गुरु  आपणाला दर्शन देतात. पाहणारा फक्त आंधळा नसावा.
संत ज्ञानेश्वरांनी पंधराव्या अध्यायात गुरु चरणांची पुजा केली आहे.अप्रतिम, अदभुत, अव्दितीय अशी ती पुजा !
आता ह्दय हे आपुले !
चौफाळुनिया भले !
वरी बैसवू पाऊले!
---श्री गुरुची
मन , बुद्धी , चित्त, अहंकार या चौघांना अध्यात्मात ह्दय असं म्हणतात . अंतःकरण  हे त्याच दुसरं नाव, चौरंग हा चार पायांचा असतो म्हणुण ह्दयाला चौरंग करुन त्यावर गुरुचे चरण स्थापन करतात. एवढे गुरु महात्म्य आहे .प्रत्येक शिष्याने निदान गुरुपोर्णिमेला तरी आपल्या गुरुंचे स्मरण करुन पुजा करायला पाहिजे.
जीवनात पाण्याची जागा कोणी घेऊ शकत नाही, पाणी म्हणजेच जीवन त्याला अन्य पर्याय नाही हीच गुरुची अनन्यता होय. शरीर आणि प्राण या गुरुचरणाच्या दोन पादुका आहेत उगीच नव्हे सर्व संत आपल्या गुरुंच्या पादुका घेऊन पंढरीला जात.
स्री असणं आणि आई होणं हा जसा बाईतला फरक आहे
तसाच सामन्य माणुस आणि गुरु यांच्यात फरक आहे.
भावे विण देव न कळे निःसंदेह
गुरु विण अनुभव कैसा कळे
गुरु होणं वाटत तितकं सोप नाही, कारण गुरुला फक्त  द्यायच आणि द्यायचच असतं
तन, मन, धन, ह्दय आत्मा  आणि तेही विनामुल्य!
तुम्ही म्हणाल शिक्षकानां तर पगार असतो परंतु अध्यात्मिक गुरु सायास करुनी शिकविती . त्याना माहित असते आपण इतराना ज्ञान जेवढे देऊ त्याच्या कितीतरी पटीने  आपणाला आनंळ मिळणार आहे.
माणसातलं पशुत्व जायच असेल तर त्याला ज्ञान घेण आवश्यक आहे मग गुरु शिवाय ज्ञान कोण देईल.
मानवेतर प्राण्यामध्ये नसलेलं एकच नातं मानवामध्ये आहे
ते म्हणजे गुरुशिष्याच होय
अनंत काळाचा वारसा देणारे
व आपले लघुत्व घालणारे गुरु असतात.गुरु संस्कार करतात म्हणुण जगज्जेता सिंकदर पित्या पेक्षा श्रेष्ठ स्थान गुरु अँरिस्टाँटलला देतात.संत कबीर तर परमेश्वरापेक्षा ही गुरु श्रेष्ठ मानतात.
माझे अध्यात्मिक गुरु वैकुंठवाशी ह.भ. प.भिमसिंह महाराज भगवान गडकर हे होते काय सांगाव माझ्या गुरुंचे वर्णन साधी रहाणी उच्च विचार सरणी पांढरा शुभ्र पोशाख , कानात कुंडल, भगवा फेटा.आज ही मी गडावर दर्शना साठी गेल्यावर मला ते असल्याचा भास होतो
माझे गुरु नेहमी म्हणत उत्तम शिष्यामुळे गुरु गुरुत्वाला जातो . महाराज नेहमी म्हणत
गुरुच्या पोटात शिरुन विद्या मिळवणारा कच, भुंग्यानी मांडी पोखरली तरी गुरुचे मस्तक हलु न देणारा कर्ण आणि गुरुमंत्रा साठी गुरुच्या आदेशावरुन नारायण गडावरुन उडी मारणारे वै.ह.भ.प भगवान बाबा असे शिष्य असल्यावर गुरु हे वटवृक्षा प्रमाणे विस्तारत जातत. माझे गुरु द्रोणाचार्यासारखे होते.सूर्याने अंधार दुर होतो परंतु गुरुच्या  कृपेने अज्ञान अंधार नाहीसा होतो.गुरुमुळे माया बंधने गळुन पडतात आणि गुरु सत्कर्माची वाट दाखवतात.
अशा माझ्या  परम पुज्य गुरुनां त्रिवार नमन.
सौ. मीना सानप बीड @7
9423715865
[7/17, 5:25 PM] 9 Subhadra Sanap: स्पर्धेसाठी
  माझे आदर्श गुरू
   गुर्रुब्रम्हा गुर्रुविष्णू गुरु्रदेवा महेश्वरा ।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैश्रीगुरुवेन महा ।।
मानसाच्या जिवनात गुरुचे महत्व खुप आहे गुरु हे दिशा दर्शक असतात                  आज मी माझ्या गुरुची महती सांगणार आहे माझे आदर्श गुरु म्हणजे माझे पतीराज श्री सानप सर
      कारण माझे लग्न नववी मध्ये असतांना झाले वयाच्या चौदाव्या वर्षीत त्यावेळी मुलीच्या शिक्षणाचे खेड्यात एव्हडे महत्व नव्हते अशा परिस्थितीत  मला माझ्याप मिस्टरांनी लग्नानंतर शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली अगदी रेग्यलर शाळेत जाऊन दहावीची परीक्षा दिली नंतर डी एड चे शिक्षण पुर्ण करुन मी शिक्षिका झाले  
       मी शिकले म्हणुनच मला माझे कुटुंब उच्चशिक्षित करता आले म्हणुनच मी आज माझे गुरु म्हणुन सानप सरांनाच मानते त्यांनी दिलेेले संस्कार मला मोलाचे वाटतात म्हणुन या आगळ्या वेगळ्या गुरुला वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
       खेडकर सुभद्रा बीड (२०) मो नं(९४०३५९३७६४)
[7/17, 5:53 PM] 14 Vrishali Wankhede: 🙏🏻सर्व गुरुंना समर्पित🙏🏻✍🏻📚🇮🇳

*गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा***
गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः:**🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रत्येकाच्या विचार सरणी प्रमाणे प्रत्येकाचे गुरु विषयी मत सुद्धा वेगळेच.
विखुरलेल्या जीवनात जर अचानक कुणी आपली मानसिकता समजून, योग्य दिशा दाखवणारा भेटला तर तो आपल्याला गुरु समानच असतो. असे माझे अनेक गुरु असतील की त्यांना ही माहीत नसावे मी त्यांना गुरु मानते ते.
अगदी माझ्या बालमैत्रीं न पासुन तर मला सांभाळणाऱ्या आजी पर्यंत सर्वच माझे गुरु.🙏🏻
*आई* मात्र माझ्या साठी हृदयी साठवलेला गुरु.* मी आज जे काही आहे ते फक्त तिच्या मुळेच. लहानपणी प्रत्येकाची आई संस्कार/प्रेम देतेच. माझ्या आईने मला 6वित असताना शाळेच्या चपराशि मावशी कड़े रहायला पाठवले होते,2दिवस.  आई तेव्हा शाळेची H. M. होती. तिने तिथे रहायला का पाठवले यांचे कारण मी परत आल्यावर मलाच कळले. ती म्हणाली समाजातील अनेक लोक कसे जीवन जगतात हे त्यांच्या सोबत राहुनच कळते, शिकवायची गरज भासत नाही.
तेव्हपासुन त्या चपराशि मावशी पण माझ्या गुरु झाल्या. त्या दोन दिवसात त्यांच्या कडून जे काही शिकले ते आज कामी आले.
लहान पनापासून प्रत्येक आई आपल्यावर संस्कारचे धड़े गिरवतेच पण त्यातून कुणी घडते तर कुणी बिघडते.*
कितीही लाडत वाढले तरी खाच खडगे कसे ओलांडायचे ते आई नेच शिकवले. आईला पुढले भाकित कसे कळते हेच समजायचे नाही, प्रत्येक वेळी??? डोळ्यासमोर. कुठला प्रसंग आला तर माहेरची वाट न धरता कसे सामोरे जायचे, घरच्यांना कसे सांभाळून घ्यायचे, प्रेमाने जग जिंकता येतं, तिरस्कारने सर्व हरल्या जाते. हे सर्व आई चेच बोल.
*आता आईच नाही, मात्र तिचे अस्तित्व जागोजागी *खड़सावत* राहात.
 मी आज फक्त तिच्या मुळे खंबीर उभी. काय योग्य काय अयोग्य सर्व तिच्यामुळे उमजले.
बाबा लाड़ पुरवणारे गुरु बनले, आई मात्र*खंखणित*धड़े देऊन*गुरु*बनली.

अश्या सर्व*आईला* गुरु पोर्णिमेनिमित्य माझा*साष्टांग नमस्कार🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

✍🏻वृषाली वानखड़े🇮🇳

🌴अमरावती🌴🙏🏻

✍🏻स्पर्धेसाठी🖋📚
[7/17, 5:55 PM] ‪+91 95944 97073‬: स्पर्धा

माझे आदर्श गुरू

माझे आदर्श गुरू माझे विश्व
माझे आहेत माझे आई- बाबा
त्यांच्यामुळे मी घडले
जीवन प्रवासात मी
सुख असो की दु:ख पण
कधी नाही डगमगले
त्यांच्या प्रेमळ स्पर्शानी
अन् सोबतीने
सर्व जीवन गाणे स्फुरले
फक्त त्यांच्या सोबतीमुळे
सुंदर जीवनाचे रहस्य मज
कळले....
आडवळणावर जाताना त्यांनी
सावरले
आधांऱ्या राती त्यांनी आकाश
 तील पिठूर दाखवले
कधी गमतं जमत करुनी
सोबतीने खेळ खेळनी
आपल्याला हसवले
खुप सारे प्रेम करुनी
आपल्याला जीवापाड
नाजुक फुल कळी
प्रमाने जगवले
कधी आजारी पडलो
तर दिन रात्र जागूण
सेवा भावे जगवले
थोर तुझे उपकार
म्हण्यास शेवटी
भाग पाडले......

तुम्ही पाडलेच

कविता शिंदे
[7/17, 5:57 PM] ‪+91 75880 55882‬: 📘   साहित्य दरबार   📘

🌹🌹माझा आदर्श गुरु🌹🌹

गुर्रू बहर्मा गुर्रू विष्णू गुर्रू देवो महेश्वरा
गुर्रू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेणनम:
       जन्माला आलेल्या लहान बालकाला
बोलायला शिकवणे त्याच्या लाडीक भाषेत त्याला ऊत्तर देऊन त्याच्या भावना समजावून घेणे त्याप्रमाणे वागणे त्याच्या हाताला धरून चालवणे .अहो एवढेच नाही तर गर्भ राहिल्या पासून त्याची काळजी घेणे,गर्भसंस्कार करणे,परमेश्वराचीआराधना ,मोठ मोठ्याचांगल्या चारित्र्यवान पुरुषाची चरित्रे, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचने,प्राण्यांची सेवा,गायीची पूजा कोण करते?--बाळाची आई करत असते.कशासाठी ?--तर माझा बाळ चांगल्या कलागुणानी ,संस्कारानी युक्त असले पाहिजे. जन्माच्या अगोदर पासून नऊ महिने माता आपल्या बाळावर चांगले संस्कार करते.ते संस्कार विचारांचे असतात,अन्नाचे असतात.                        
           माझ्या आईनेदेखीलअशाच प्रकारे माझ्यावर संस्कार केले.माझी आई जास्त शिकलेली नाही परंतु मी चार वर्षांची असताना तिने मला शिकवणी लावली होती.मी दररोज शिकवणीला जात असे,एकेदिवशी शिकवणीचे गुरुजीआईला म्हणाले ,मुलीला काही शिकवत जा की.
यावर आई म्हणाली मला येत नाही म्हणून तर तुमच्याकडे शिकवणी लावली आहे .त्यावर गुरुजी मात्र  गप्प झाले .माझी आई अशी स्पष्टोक्ती आहे.माझा पण तोच स्वभाव झाला.खरे बोलणे व प्रामाणिकपणे आपले काम करणे या गोष्टी मला लहाणपणापासून आईने शिकवल्या.आईला जास्त लिहीता वाचता येत नाही पण अभ्यास कर ,मला मोठ्याने वाचून दाखव म्हणत आई मला अभ्यास करायला लावायची . वेळच्यावेळी मला अभ्यासाला बसवायची व शाळेत दररोज पाठवायची. आईच्या नियमीतपणामुळे माझे शिक्षण व्यवस्थीत व चांगले झाले.घरातील सगळीकामे सुद्धा वेळेवर झाली पाहिजेत असा तिचा आग्रह असतो.सकाळी सहाच्या आत उठणे व नऊच्या नंतर झोपणे हा तिचा नियम असतो.
           मी सहावीला होते तेव्हा पासून गजानन महाराजांचे पोथीचे पारायणे,शिवलीलामृत,व्यंकटेशस्तोत्र ती मला वाचायला लावायची ,वाच वाच येत असत ,असे म्हणायची व ती ऐकायची कारण तिला वाचता येत नाही पण मला मात्र तिने पोथ्या वाचायला लावल्या व आजही मला त्याची आवड आहे.हे संस्काराचे बाळकडु तिने मला दिले ज्यामुळे मला आध्यात्माची चांगली आवड लागली व मी माझ्या मुलांना व शाळेत विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊ शकत आहे.
         जीवनात चांगले आध्यात्मिक गुरू भेटणे पण फार मोलाचे असते ते देखील तिच्या मुळे शक्य झाले.राष्ट्रीय संत श्री पाचलेगावकर महाराज माझे गुरु आहेत.
मी चार वर्षाची असताना व बारा वर्षांची असताना दोन वेळा माझ्या गळ्यात त्याच्या  शिष्यानी साप घातला होता.हिंदू धर्माच्या एकीसाठी त्यानी कार्य केले.त्यांच्या प्रवचनातून मला एवढे मार्गदर्शन होत गेले की जीवनात येणा-या प्रत्येक अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य मला मिळाले संकटकाळी महाराजांनी माझे व माझ्या परिवाराचे संरक्षण  केले.माझे आध्यात्मिक  गुरू राष्ट्रीय संत श्री पाचलेगावकर महाराज  यांच्या चरणी शतश:प्रणाम🙏
         महाराज भेटले त्याच्या सेवेचा मला लाभ मिळाला तो आईमुळे.माझे लग्न झाले व माझे वडील गेले परंतु माझी आई खंबीरपणे माझ्या पाठीशीउभी राहिली कारण आता मला ती एकटीच होती.मला भाऊ बहीण कोणी नाही .आई एकटीच...
परंतु तिने मला व माझ्या पतीला नोकरी नसताना सांभाळुन घेतले व लागेल नोकरी घाबरु नका म्हणुन मायेचा हात पाठीवर ठेवला.
          आता माझ्या पतीचे निधन झाले व मी काय करु म्हणुन ती थांबली नाहीतर माझ्या वाढत्या संसाराची स्वप्ने तिने पाहिले व मला झालेले दोन मुलं व एक मुलगी यांच्यावर माझ्यापेक्षा ही काळानुरूप बदललेले चांगले संस्कार केले.त्याना उच्चशिक्षित करणामागे तिचे समर्पणआहे.
तिने माझ्या संसारासाठी तिच्या कुठल्याही आशाआकांशा ठेवल्या नाहीत तर पूर्ण जीवन चंदनाप्रमाणे झीजवले.
         मुलं लहान आहेत तोपर्यंत घरबांध ,शेती घे मग मुलांचे शिक्षण होईल खर्च होईल म्हणून बचतीचे गणित तिचेच
ती कुठे गणित नाही शिकली पण अर्थशास्त्र तिला खूप चांगले येते.आज तिचे वय 75वर्ष आहे पणअजून देखील मला डब्बा करुन देण्याची धडपड तिचीच असते.माझी नोकरी कशी झाली व मुलं मोठी कधी झालीमला अजूनही लक्षात येत नाही.मी देवकी प्रमाणे जन्म दिला पण आईने यशोदेप्रमाणे त्याचे पालनपोषण केले.
        माझ्या साठी आई चंदनाप्रमाणे झिजली परंतु त्याचा सुवास मात्र सदैव दरवळत राहणार आहे.माझ्या जीवनात तिचे मोलाचे स्थान आहे..त्याची तुलना मी कशाशीही करु शकत नाही.
          तिच्या संस्काराची शिदोरी मला जन्मोजन्मी पुरणार आहे. आध्यात्मिक गुरू पेक्षाही मला माझा संस्कार गुरू आई मोठी आहे.तिच अस्तित्व मीठाप्रमाणे आहे ते जर नसेल तर अन्न बेचव होते.
          जगात आईच्या मार्गदर्शनाला विचाराला,अस्तित्वाला,मायेला तोड नाही.आईचे प्रेम हे महामंगल स्तोत्र आहे.त्याची महती गाण्यासाठी शब्द मात्र अपुरे पडतात .
                   आई माझा गुरू
                   आई कल्पतरु
                   सौख्याचा सागरू
                   आई माझी.🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*****************************
स्नेहलता कुलथे
मोबा 7588055882
क्र.37
[7/17, 6:00 PM] Nirmala soni: स्पर्धेसाठी...

" गुरूबिन ज्ञान नही" म्हणतात ते उगाचच नाही.
अगदी जन्मापासून जीवनाला दिशा देणारे गुरूच होत.
  आयुष्यभरात कळत नकळत गुरु लाभतच असतात. जन्मतःच आई गुरु म्हणून लाभते. वडील ही पाठीशी खंबीरपणे उभे राहून जीवनदिशा दर्शवित राहतात. शैक्षणिक जीवनात निरंतर ज्ञान देणारे शिक्षकवृंद.
पुढे ही व्यवहारी जीवनात ही गुरु शिवाय मार्ग मिळत नाही.

कधी कधी परिस्थिती गुरु बनून जीवनाला कलाटणी देवून जाते.

मला ही शाळेत महाविद्यालयीन जीवनात छान शिक्षक लाभत गेले.
त्यांच्याच मुळे मी हिंदीत बोलणारी असूनही मला मराठी यावी समजावी म्हणून माझ्या शिक्षिका झटायच्या. मला जीव तोडून शिकवायच्या.
 त्यांना विसरणे तर मला शक्यच नाही.
पुढे ही महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धेत माझा नंबर यावा म्हणून मला सतत प्रोत्साहन देणा-या शिक्षिका आज ही डोळयासमोर जशाच्या तशाच दिसतात.
मला घडविण्यात त्यांचा ही सिंहाचा वाटा आहे हे विसरून कसे चालेल?

सांसरिक जीवन जगत असतांना केवळ वेळ जावा या उद्देशाने काही तरी कागदावर रेखाटता रेखाटता कधी कवियित्री बनत गेली कळलेच नाही.
दोन चार वर्षे लिहून झाल्यावर फेसबुक ला आले आणि इथेच ख-या अर्थाने मला माझे गुरु सन्माननीय रमेश सरकाटे सरजी भेटले.  ज्यांनी माझ्यातील कवियित्री ओळखली आणि मला मार्गदर्शन देणे सुरु केले. मला ही मार्गदर्शनाची गरज होतीच. मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे लिहू लागले. बघता बघता कविते विषयी काहीच ज्ञान नसणारी मी भराभर लिहू लागली. वेळ प्रसंगी ते रागावले चिडले पण तरी ही शिकविले. चुकले की मला ही रडायला यायचे पण धीर सोडला नाही. त्यांनी ही मला मार्गदर्शन करणे सोडले नाही.
हिंदीत लिहिणारी मी चक्क मराठीत लिहू लागली. ते ही कविता नाही तर मराठी गजल. चुकत चुकत शेवटी गजल शिकलीच. शिकत असतांना काही चांगले तर काही अत्यंत कटू आणि चीड आणणारे प्रसंग घडले. पण धीर सोडला नाही.
मन खिन्न व्हायचे. सर्व सोडून दयावे वाटे. पण माझ्या गुरूंनी मला वेळोवेळी हिंमत दिलीय.  आणि त्यांच्याच कृपेने काटेरी वाटेवर चालत मी जगासमोर येवून ठाकलीय. कोळशाला पैलू पाडले त्यांनी.
पण त्यांनी ज्या कोळशाला पैलू पाडले तो कोळसा हिरा आहे की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

मला अभिमान आहे की सरकाटे सरजी माझे गुरू आहेत. मला अभिमान आहे त्यांची शिष्या असण्याचा.

आज मी जे काही आहे त्याचे सर्व श्रेय मी माझ्या गुरूलाच देईल.

आज साहित्य दर्पणने छान विषय ठेवलाय. त्यामुळे काही अंशी गुरुचे आभार मानता आले.

धन्यवाद साहित्य दर्पण
🙏🙏

निर्मला सोनी.
[7/17, 6:11 PM] ‪+91 86980 67566‬: "जीवनाचा खरा मार्गदर्शक"
आचार्य देवो भवं असा वेदाचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदाचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते असा भगवद्गीतेचा
संदेश जोपासणारी आपली संस्कृती.....
आपली जडणघडण आणि आयुष्याचा मार्ग चालण्याचं पायात ज्यानी बळ दिलं अशा मनात
आणि ध्यानात असणा-या सर्वांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस आपल्या स्मृतीत राहतो याचाच अर्थ आपण घडलेलो आहोत. बिघडलेलो नाही.पदोपदी अवहेलना झेलावी लागते आहे...मान सन्मान आणि आदर या गोष्टी
हळुहळू संपत चालल्या कि काय असा समज दृढ
होत असताना खरा मार्गदर्शक शोधने महाप्रयासाचे काम आहे.पण खरा मार्गदर्शक कसा असतो,त्याची लक्षणं काय हे तरी आपण जाणले पाहिजे.मार्गदर्शक वा गुरु एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा मार्गदर्शक. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.विद्यार्थ्याना त्यांच्या वयाचं होऊन शिकवलं तर त्यांना लवकर समजतं शिवाय
त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.हा आदर
मिळवण्यात यशस्वी होणारा खरा मार्गदर्शक होऊ शकतो.मार्गदर्शन करत असताना समोरच्याची समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.पण गुरुचे कर्तृत्व किंवा त्यांच्या प्रयासाला ध्यानात ठेवलं जात नाही.नाही तरी संतानी म्हटल आहेच,....
   "अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात,
    वरी घालतो धपाटा,आत आधाराचा हात..||
    आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
    ओल्या मातीच्या गोळयाला येई आकृती वेगळी
    घट थोराघरी जाती,घट जाती राऊळात....||
    कुणी चढून बसतो गाव गंगेच्या मस्तकी
    कुणी मद्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी
    आव्यातली आग नाही कुणी पुन्हा आठवत..||
    कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
    देता आकार गुरुने,ज्याची त्याला लाभे वाट
    घट पावती प्रतिष्ठा,गुरु राहतो अज्ञात...||
शिष्याला प्रतिष्ठा देऊन अज्ञात राहिलेला गुरु आपले कार्य करुन मोकळा झालेला असतो.एखाद्याचे जीवन घडविण्याचे काम येवढेही सोपे नाही. तरीपण खरा मार्गदर्शक, गुरु, शिक्षक अखंडपणे हे काम करत असतो.सद्य स्थितीकडे पाहता असे म्हणता येईल,'शिक्षकाचे मन आकाशापेक्षाही मोठे असावे,त्याचे चिंतन
महासागराइतके खोल असावे, बुद्धी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि स्वभाव चंद्राप्रमाणे शितल असावा.शिक्षणक्षेत्र ही एक तपोभूमी मानून विद्यार्थ्याशी समरस झाल्यास आपली तपश्चर्या आपोआप फळाला येते.या प्रयासास खरेपणाने उतरणारे शिक्षक बांधव आहेत....त्यांची महानता
श्रेष्ठ तर आहेच पण गुरु विन कोण अधारु हे तत्व
सर्वस्वी अंगिकारून आपण वागले पाहिजे.प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु येत असतो आपली घडण त्याच्या कर्तृत्वातूनच होत असते.कोणाच्याही दातृत्वाची
कतृज्ञतापुर्वक नोंद घेणं हे संस्कृतीचे लक्षण आहे.ज्यानी आपल्या अध्ययन निष्ठेने विद्यार्थ्याच्या जीवनाला आशय निर्माण करुन दिला.त्या मार्गदर्शक गुरुना वंदन करण्याचा गुरुपोर्णीमा हा दिवस.आपणही जीवन जगत असताना लहान लहान गोष्टीतून आनंद घेतला पाहिजे....भविष्यात एखाद्या दिवशी मागे वळून
पाहाताना याच गोष्टी खूप मोठ्या होत्या याची जाणीव होईल.कदाचीत आपणास घडवणा-या मध्ये अनेक जणांचा वाटा असू शकतो,पण आपला कोणीतरी गुरु मार्गदर्शक नक्कीच असतो.त्याला आपण कधीच विसरू शकत नाही. तोच खरा आपल्या जीवनाचा मार्गदर्शक.पुन्हा प्रश्न येतो की जीवनाचा खरा मार्गदर्शक कोणास म्हणावे,आपणास बाह्य जग जिंकताना अंतरिक बळ आणि आत्मविश्वास जागृत करणारा खरा मार्गदर्शक.
"कपाळावरील रेषेचे भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच
येत नाही".तेव्हा कामात राम शोधण्यास लावणारा खरा मार्गदर्शक होय.आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञाननिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त असणारी व्यक्तीमत्वे आवश्यक आहेत.ती घडवणारा खरा मार्गदर्शक. नवचैतन्याने डवरलेल्या, निरागस, अवखळ, जिज्ञासू अशा उद्याच्या भारताचा सहवास शिक्षकांना लाभतो. तो शिक्षक ख-या अर्थाने गुरु
मार्गदर्शक आहे..!
"गुरु हा सुखाचा सागरु | गुरू हा प्रेमाचा आगरु
गुरु हा धैर्याचा डोंगरु | कदाकाळी डळमळी ना ||
गरु हा घली ज्ञानांजन | गुरु हा दाखवी निजधन
गुरु हा सौभाग्य देऊन | साधू बोध नांदवी ||
गुरु हा भक्तीचे मडंण | गुरु हा दुष्टाचे दंडण
गुरु हा पापाचे खंडण | नानापरी वारीतसे ||
गुरुचा महिमा अगाध आहे..माझ्या जीवनाला आकार देणा-या मला माणूस बणविणा-या त्या गुरुवर्याना माझा अंतकरणपुर्वक नमस्कार आणि वंदन...!!
घराचं अंगण असो,शाळेचं प्रांगण असो वा विद्यालयाचे क्रिडांगण असो,विद्यार्थी जीवनाच्या
नभांगणात गुरुजीचे स्थान ध्रुवता-यासारखे
अढळ आहे..अढळच राहिल......!!

                        श्री.हणमंत पडवळ
           मु.पो.उपळे (मा.)ता.जि.उस्मानाबाद
                 8698067566.

स्पर्धेसाठी
[7/17, 6:27 PM] ‪+91 75882 07368‬: 🌷स्पर्धेसाठी🌷

गुर्रू ब्रम्हा गुर्रु विष्णु
गुर्रु देवो महेश्वरा:
गुरुर साक्षात परब्रम्ह
तस्मेय श्री गुरुवें नमः
माझ्या जीवनातील पहिले गुरु  माझे माता पिता कारण त्यानीच मला हे जग दाखवल जन्मापासुंन वयाच्या 21 वर्षा पर्यंत मला सांभाळून मज़वर संस्कार केले जे की माझा शेवटचा श्वासापर्यत पूरतील आता तुम्ही म्हनाल की गुरु एकच असतो माझे मात्र तस नाही मी दतगुरुच अवलोकन केल  त्याचिच कृपा
म्हणा काय आहेच शाळा कॉलेजच्या शिक्षकांना पण मी गुरु मानेल त्यानी मला विद्येच दान दिल आणि मला वयाच्या 28 व्या वर्षी माझ्यावर जीवा पाड़ प्रेम करना-या माणसाने मला अशा गुरुचे दर्शन घड़वले की मी
 धन्य पावले मला त्याक्षणी असे वाटले माझ्याा जीवनाचे सार्थक झाले त्यागुरुचे नाव प्रेम रावत त्याना बाल योगीश्वर या नावाने ओळखले जाते कारण त्यानी वयाचा 8 व्या वर्षा पासून प्रवचन देण्यास सुरुवात केली त्याचा संदेश असा आहे परमेश्वर
 आपल्या मधेच आहे त्याची ओळख करून देण्यासाठी चार क्रिया देतात मी अनुभव घेतला आहे येथील भौतिक सुख क्षणिक असते ते चिरंतन असते त्याना मी महाराजजी म्हणते अर्थात सर्व शिष्य वर्ग त्याना या नावाने ओळखतो मला प्रत्यक्षात दोनदाच दर्शन झाले आम्ही प्रत्यक्ष बोललो नाही पण प्रत्येक प्रवचनातुन मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ते एक अशि कथा सांगतात लहांन मुले खेळ पानी खेळत आसतात खेळात ते पूर्ण स्वयंपाक बनवतात पण खरी भुक लागली की ते आईकड़े पळत जातात  भुक लागली सागतात कारण त्याना माहित असते खेळात पोट भरत नाही  तसेच संसार हा  खेळ आहे आपण सुध्दा खरी भुक लागल्यावर परमेश्वराकड़े जायला पाहिजे तोच आपल्याला शांतिचा अनुभव देतो याचा अर्थ असा नाही की संसार करायचा नाही पण परमेश्वरा ला जाणायच कबिरदासजीचा एक सुंदर दोहा मला आठव ला
  तु कहता कागज की लेखी
मैे कहता आखन की देखी
 अजुन एक किस्सा आठवला ते सांगतात पाउस जरूर पडणार ऊन व थण्डी पडणार त्यला आपण रोऊख शकत नाही ते सर्व असताना आपला बचाव कसा करायचा हे शिकवणारा पाहिजे गुरु याचा असा मतितार्थ आहे कि जीवनात सुख दुख जरूर येणार कारण हे कालचक्र आहे पण परमेश्वर व गुरु हे मज़जवळ असल्यांने मला त्यानी दुखा:त असताना त्याची अनुभूति दिली आहे अजून एक गमत जीवनातील आतपर्यतचा जो अवघड रस्ता होता तेव्हा  त्यानी उचलूंन घेतले
माझे यांनतरचे गुरु दयान:न्द सरस्वती हे खुप जाज्वल्य आहेत यांनीही खुप काही दिले एकाग्र होण्या्साठी साधना सांगितली त्याचीही मला अंनुभूति आली हे मात्र आमच्या घरी आले होते माझ्या छोटा मुलगा तेजस डॉ आहे त्याला त्यानी मोलाच मार्गदर्शन केले आम्हाला पडलेल्या प्रश्नाचे ते निरसन करतात त्यानी लक्ष्मी स्तोत्र व विष्णुसहस्ञंनाम म्हणायला सागीतले
    गुरुबिन कोंन छुड़ावे
आता लिहणे थाबवते
@49 नलिनी वांगीकर
     (सायली)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
[7/17, 6:35 PM] nagorao26:          

             *आई माझा गुरु*

जीवनामध्ये गुरुचे स्थान अनन्य साधारण महत्वाचे आहे. गुरु विना ज्ञान मिळविणे अशक्य आहे,असे संत कबीर आपल्या दोहात सांगतात. लहानपणापासून ते वृध्द अवस्थेपर्यन्त आपणास गुरुची आवश्यकता भासते.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक वळणावर आपणास गुरुची गरज भासते.गुरु म्हणजे कोण असतो ? गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात दिवा लावून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, गुरु म्हणजे दिशादर्शक. जेव्हा जेव्हा आपणास काही अडचणी निर्माण होतात, समस्या उद्भवतात तेंव्हा तेंव्हा आपणास जाणकार तज्ञ व्यक्तिकडे जावे लागते. म्हणजेच गुरुकडे जावे लागते. गुरु म्हणजे लघू नसलेला, लहान नसलेला. ज्याच्याकडे भरपूर ज्ञान व विद्या आहे तोच खरा गुरु. जे लोक गुरु होण्याचा मुखवटा धारण करतात ते एक ना एक दिवस उघडे पडतात आणि त्यांची पत घसरल्याशिवाय राहत नाही. आपले स्थान टिकविण्यासाठी गुरु लोकांना खुप मेहनत घ्यावी लागते.आपले ज्ञान सतत वाढवत ठेवावे लगाते.त्यासाठी नियमित अभ्यासाचा सराव करावा लागतो.
पूर्वीच्या काळात गुरुच्या घरी जाऊन आणि तेथेच राहुन शिक्षण घ्यावे लागत असे त्यास गुरुकुल पद्धत असे म्हटले जाते. त्याठिकाणी गुरु हा शिष्याना ज्ञान देण्याचे काम करीत असत आणि त्या विभागाचा राजा त्या गुरुचा यथायोग्य धनसंपत्ती देऊन स्वागत करायचा, ही पध्दत होती. ही गुरुकुल पद्धत आत्ता हॉस्टेलच्या स्वरुपात दिसून येते. मात्र त्यात गुरुकुल मध्ये जी आत्मीयता , प्रेम किंवा जिव्हाळा दिसून येत असे ते मात्र दिसून येत नाही.मधल्या काळात गावोगावी गुरुकुल ऐवजी शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा उदयास आली आणि गुरुकुल मधील गुरु हे शिक्षक या नावाने ओळखले जाऊ लागले.विद्येचे घर अगदी आपल्या घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण घेणारे आणि देणारे यांची संख्या वाढीस लागली. राजाच्या ठिकाणी शासन त्यांना दरमहा वेतन देत शासकीय कर्मचारी केले. असे हळूहळू गुरुचे पद व्यावसायिक होत गेले. गुरुच्या व्यवसायात जैसेही लक्ष्मी, पैसा प्रवेश केला तैसे विद्या मंद गतीने दूर निघून गेली. कारण लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्र राहू शकत नाहीत.
शाळेच्या बाबतीत सुध्दा असेच घडले शाळेत जैसे ही लक्ष्मीने प्रवेश केला तसे शाळेचेही रूप पालटले. पूर्वी शाळेतल्या गुरुजींना खुप मान सन्मान मिळायाचा, आदर मिळायाचा, लोक त्यांना सन्मानाने बोलायचे,मात्र आज तशी परिस्थिती नाही. आज गुरूजी बदलले,समाज बदललला, आणि परिस्थिती सुद्धा बदलली. आज कोणालाही शाळेतील गुरूजीची गरज भासत नाही. कारण त्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी घरात संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल, स्मार्ट फोन सारखे तंत्रज्ञान 24 तास त्यांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुरुचे ज्ञान तोकडे वाटत असेल ? सोशल मिडियाच्या विविध माध्यमातून ज्ञानाची झरे वाहत आहेत. काही वर्षानंतर गुरुची संकल्पना मागे पडते की काय ?अशी भीती सुध्दा राहुन राहुन मनात येते.त्यासोबत अजुन ही या गोष्टीवर विश्वास वाटतो की गुरुशिवाय मनुष्याचे जीवन सफल होऊच शकत नाही. संगणका सारखे निर्जीव वस्तू बटण दाबता क्षणी माहिती देईल ;परंतु गुरु -शिष्य या दोन सजीवात ज्ञानाची जी देवाणघेवाण ते कदापि ही शक्य नाही. मुलांवर संस्कार टाकण्याचे काम निर्जीव वस्तू नक्कीच करू शकणार नाही, त्यासाठी सजीव व्यक्तीच पाहिजे.
मनुष्याच्या जीवनात गुरुचे पहिले स्थान हे आपणास जन्म देणाऱ्या आईला दिले जाते. पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी पासून आईचा संबंध येतो. आई आपल्या बाळाला नऊ महीने नऊ दिवस गर्भात वाढवून मोठी करते. गर्भसंस्कार सुध्दा जीवनात मोलाचे काम करतात. आई आपल्या मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे संस्कार करते आणि मुलभुत ज्ञान सुध्दा देते. ऐकणे आणि बोलण्याची क्रिया आईने जर शिकविली नसती तर त्या मुलाचा काय विकास होऊ शकतो ? याची आपण कल्पना करू शकतो. समाजामध्ये आणि शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येक मुलांना आई ज्ञानाचे धडे देऊन तयार करते. म्हणूनच आई माझा गुरु आई कल्पतरु असे एका कवीने आपल्या कवितेत म्हटले आहे.इतर सर्व गुरुपेक्षा आई ही अत्यंत महत्वाची आद्य गुरु होय. आपले मूल चांगले संस्कारी, हुशार आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येक आईने तज्ञ गुरुच्या भूमिकेतून आपल्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे आणि हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांची आई राजमाता जिजाऊ यांनी घडविले म्हणून ते लहान वयात सुध्दा खुप मोठा पराक्रम करून दाखवू शकले. परमपूज्य सानेगुरूजी सारखा हळव्या मनाचा आणि आईच्या हृद्याचा व्यक्ती आपणास लाभला ते फक्त त्यांच्या आईमुळेच, हे त्यांच्या श्यामची आई पुस्तकातुन पानोपानी दृष्टिस पडते. अशियम्मा सारख्या मातेच्या संस्कारामुळे ए पी जे अब्दुल कलाम सारखे मिसाईल मैन देशाला राष्ट्रपती म्हणून मिळाले.आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुला वंदन तर करायचेच, शिवाय आपल्या आद्य गुरुला म्हणजे आईला ही वंदन करण्यास विसरून चालणार नाही.

- नागोराव सा येवतीकर
  मु येवती ता धर्माबाद
  9423625769
[7/17, 6:40 PM] ‪+91 87962 61088‬: 🌹 स्पर्धेसाठी 🌹

 जीवनाचा खरा मार्गदर्शक

================

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षातः परर्ब्रम्ह
तस्मैश्री गुरूवेनमः

आयुष्य आपल असत पण ते निर्माण केलेले असते विधात्याने आणि आपले विधाते म्हणजे आपले माता पिता जन्मदाते भाग्य आपले विधिलिखित जरी असले तरी ते घडवणे हे सर्वस्वी आपल्या हाती असते मी तर म्हणेन तेच खर असत आणि जेव्हा आपण बोबडे बोल बोलतो तेव्हापासून आपण जोपर्यंत स्वतःला नीट ओळखु लागेपर्यंत आपले पालण पोषण करतात ते आपले जन्मदाते म्हणून मला ते गुरुस्थानी आहेत आणि राहतील सर्व शिकवण ते देतात चांगले वाईट शिकवतात संस्कार करतात कधी कधी रुक्ष होतात पण त्यातही त्यांची माया प्रेम जिव्हाळा असतो जो आपल्याला आपले आयुष्य घडवण्यास मदत करतो
 म्हणतात की लहान मुल म्हणजे एक चिखलाच्या गोळ्यासारखं असतं
आपण जसं त्याला घडवु जसा आकार देऊ ते तसं घडत जातं जेवढं सुंदर बनवु तेवढं
आणि ते घडवण्याचं कलाकुसरीचं काम खरंच कुणा कारागीराचंच आणि ते घडवतात आपले आईबाबा
ज्याने भुक दिली तो भाकरपण देईल
यासारखंच ज्या विधात्याने आपल्याला या जगात पाठवलं त्यानेच आपलं हे आयुष्याचं कोवळं रोपटं रोवण्यासाठी त्याला प्रेमाचं जीव्हाळ्याचं खतपाणी देऊन संस्काराची त्यावर फवारणी करुण त्यातुन एक सुंदर फुल फुलण्यासाठी आईबाबाना पाठवतो
तेच घडवतात आपल्याला शिकवतात जगायला...

पुर्व जन्मीची पुण्याई
संस्कार उदरी भेटला
नऊ महिने मी आई
श्वास स्वर्गात घेतला. ..

      माझे गुरू म्हणजे माझे
आईबाबा 🙏🙏🙏 . ..

🇮🇳 पियु जाधव 🇮🇳
   
      🌹 पुणे 🌹[7/17, 3:52 PM] ‪+91 94207 84086‬: 🙏माझा आदर्श गुरू🙏

      🌹 पुणे 🌹

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/10/whatsapp-8-05-2016-1000-700.html

2 comments:

  1. खुप स्तुत्य उपक्रम! मनस्वी धन्यवाद!

    ReplyDelete
  2. अप्रतीम सर

    ReplyDelete