नागोराव सा. येवतीकर

Saturday, 9 April 2016




साहित्य गंध  Whatsapp ग्रूप  📚

........... आयोजित..........

📚   विचारधारा  📚

************************
📚 निबंध स्पर्धा खुली  📚
************************

🎋 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्ताने 🎋

💥 विषय : - "  मला समजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर "
=========================
💥 दिनांक :-13/04/2016
💥 वार : - बुधवार
💥 वेळ : - 10:00 ते  07:00 पर्यंत
==================================
💥ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे....
💥 एकास एकच लेख पोस्ट करता येईल
💥 शब्दमर्यादा : जास्तीत जास्त 500 शब्द
💥 लेख text मध्ये आवश्यक. उशीरा पोस्ट केलेले लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
💥 लेखा खाली आपले नाव, गाव व मोबाईल नंबर अवश्य लिहावे

💥 निबंध स्पर्धेचा निकाल blog वर पाहण्यास मिळेल.  त्यासाठी वारंवार चौकशी करु नये .

💥साहित्य गंध  ग्रूपच्या बाहेरील लेखक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात...
त्यासाठी त्यांनी 09423625769 या मोबाईल क्रमांकावर आपले लेख पोस्ट कराव्यात....
=========================
🎙संयोजक : - आप्पासाहेब सुरवसे,लाखणगांवकर
××××××××××××××××××××
🎗संकलक:--नासा येवतीकर ,धर्माबाद
==========================
🎤 परीक्षक : प्रवीण रसाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
=============================
मला कळालेले बाबासाहेब..

    बाबा... हा शब्दच भारी पाठिंबा आणि माया देऊन  जाणारा वाटतो..  लेकराला जन्मापासून ते तो मोठा होऊन स्वत:ची ओळख बनवे पर्यंत जो स्वत:ला झिजवून घेतो.. एवढेच नव्हे तर सर्व योग्यायोग्याचा पसारा बाजूला सारून फक्त एक सुंदर भविष्य आपल्या लेकरांपुढे ठेवतो तो बाबा.. याच बाबाचे नाव हि लेकरं पुढे स्वत: मिरवतात पण........ दु:ख वाटते सांगावयास.. हिच लेकरं त्यांचे तत्व पायदळी तुडवतात.. स्वत:च्या सोईनुसार ते वापरतात.. आणि हा बाबा केवळ निराश मनाने पाहत असतो सर्वांकडे.... अगदी सारे कर्म न् कष्ट शुन्यात मिळाल्यागत....

      आपण काय करतो आहोत याहूनही वेगळे..?? आश्चर्य वाटते की, आपणास बाबाासाहेबांची लेकरं असुनही त्यांचे तत्व समजले नाही.. बाबासाहेब आपल्याला काय सांगु ईच्छीत होते.? याचा जरा विचार करा.. चला काही प्रश्न विचारूया स्वत:ला..

१) बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली.?

२) बाबासाहेबांना मुर्तीपुजा का नको होती.?

३) जगातले एव्हढे सारे धर्म सोडून एक बौद्ध धर्मच का स्विकारला.?

४) घटनेमधील काही कलम बहूजनांच्याच हिताचे का लिहीले.?

५) धर्मपरीवर्तन का मान्य केले.?

     विचारा हे प्रश्न आपल्या धिंगाना माजवलेल्या व गंजलेल्या बुद्धीला.. विचारा हे प्रश्न तुम्हाला न कळलेल्या बाबासाहेबांच्या लेकराला.. अरे विचारा कलुषीत मनाने समाजात गुंड प्रवृतीने बाबांच्या फोटोपुढे डीजेवर नाचणा-यांना....!!

         मी सांगते जर बाबा असते तर त्यांनी जिवंतपणीच गळफास लावला असता स्वत:ला.. कारण मला समजलेले बाबासाहेब हे खुप वेगळे आहेत..खुपच वेगळे...

     बौद्ध धर्म हा शांती व अहिंसाप्रिय धर्म होता.. अगदी रानटी जनावरासही माणसाळणारा.. त्यात जिवनाच्या यशाचे, सुखाचे, प्रेमाचे, आरोग्याचे अन् आत्मरक्षेचे मार्ग होते.. त्यात मुर्तीपुजा नव्हती ना त्यामुळे होणारी अंधश्रद्धा.. या अंधश्रद्धेने कित्येक वर्ष बहूजनांना व स्त्रीयांना मरणयातनेच्या कैदेत जखडले होते.. याचेच तर मुळ त्या मनुस्मृती मधे होते..

       बाबासाहेबांनी जेव्हा ही मनुस्मृती वाचली, तेव्हा त्यांच्या समाजबांधवावर होणा-या अन्यायाची आग मनुस्मृतीस जाळून निघाली..

    बाबासाहेबांनी मुर्तीपुजा नाकारली, तर सर्वांनी त्यांचीच मुर्ती बनवली..

    बाबांनी शिकायला व संघर्ष करायला सांगीतले, तर सर्वजणांनी संघर्ष सुरू केला.. पण काय सुंदर विषय घेतात संघर्षाचा.. तर म्हणे हा एरीया आमच्या जातीचा,तो तुमच्या.. किंवा मग ऊगीच गल्लीतुन टपोरकी करणारी मुलं.. जयभिम बोलो कुछ भी करो म्हणनारे संघर्ष.. वाह.!!! बायकांची तर हद्दच भारी.. शालीनता तर कुठेच दिसेना गेली..  माफी असावी बाबासाहेब पण मला आपण समजलात त्यानुसार आपणास हा ऊद्धटपणे वागणारा नव्हे तर शांत, शालीन व आत्मसन्मानाने जगणारा समाज हवा होता ना..??

  तुम्ही दिलेल्या सुविधा वापरून मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी संघर्ष करणारा समाज हवा होता ना..??

      अशिक्षीत राहून अंधश्रद्धेला बळी पडणारा समाज नको होता ना..??

    सर्वधर्म समभाव मानुन प्रद्न्या, शिल व करूणेचे अथांग सागर हवा होता ना..??

       बाबा मला तुम्ही इतकेच कळलात.. गर्व आहे तुमची लेक असल्याचा.. पण मी ईतर बांधवांना कशी समजावू..??

 सांगा न बाबा... सांगा न....😔🙏🏻



       - राधायादव✍🏻






~~~~~~~~~ΨΨΨΨΨΨΨΨΨ~~~~~~~~

1 comment: