नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 8 March 2016


* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर नाव - सौ. वृषाली शिंदे *

भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे. भारताच्‍या सर्वोच्‍च अश्‍या राष्‍ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्‍ट्रपती होण्‍याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्‍या पहिल्‍या महिला पंतप्रधान झाल्‍या. देशातल्‍या विविध राज्‍यात महिला ह्या मुख्‍यमंत्री वा इतर महत्वाच्‍या पदावर काम करीत आहेत. देशाची पहिली महिला पोलिस महासंचालक पदावर श्रीमती किरण बेदीचे नाव ठळक अक्षराने लिहीले गेले. लता मंगेशकर यांना भारताची गानकोकीळा म्‍हणून संबोधले जाते. क्रीडा क्षेत्रात पी.टी. उषा, कविता राऊत, मल्‍लेश्‍वरी, साईना नेहवाल, सानिया मिर्झा इत्‍यादी सर्व महिला आपल्‍या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्‍यासाठी महत्‍वाची भुमिका बजावली आहे. विविध क्षेत्रात असंख्‍य महिला आहेत, ज्‍यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे. समाजात अश्या असंख्य महिला आहेत ज्यांचे कार्य विशेष नोंद घेण्यासारखी आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या प्रतिलिपी डॉट कॉम मराठी विभाग प्रमुख सौ. वृषाली शिंदे यांची माहिती त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
त्यांचा जन्म मुंबईत दिनांक- २१ जुलै 1971 रोजी झाला. त्यांच्या परिवारात पती आणि एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यांचे आई वडिल दोघेही नौकरी करत. त्यांचे शिक्षण बी. ए. जरी असेल तरी माहिती तंत्रज्ञानच्या क्षेत्रात खूप मोठे काम त्यांनी केले आहे. मे १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. ते सरकारी नौकरी करतात, त्यांना भटकंती, प्रवासाची खूप आवड आहे आणि भरपूर वाचन करतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच  हे मजल गाठू शकले असे ते म्हणतात.

मी -  प्रतिलिपी कडे कसे वळलात ?  वृषाली शिंदे - लहानपणापासून साहित्य वाचनाची आवड, शाळा व कॉलेज जीवनात साधारण कविता करत असे, वाचनाची प्रचंड आवड, सामाजिक जाणीव, मातृ भाषेबद्दलची आस्था

मी -  प्रतिलिपी विषयी काही सांगा ?
वृषाली शिंदे -  प्रतिलिप हा एक तरुण आणि होतकरू मुलांनी नवीन साहित्यकसाठो उपलब्ध करून दिलेला उत्तम मंच आहे.  ह्यावर कुणीही नवीन किंवा प्रसिद्ध साहित्यिक आपले लेख, कथा, कादंबरी, कविता, नाटक किंवा कुठलेही साहित्य विना मूल्य प्रकाशित करू शकता त्यासाठी कुठलीही रक्कम घेतली जात नाही. तसेच हे साहित्य डिजिटल फॉरमॅट मध्ये ई-बुकच्या रुपात प्रकाशित केले जाते, जी कि येणाऱ्या पुढील काळाची गरज आहे. शिवाय हे ऑनलाइन प्रकाशित होत  असल्यामुळे जगभरातून ते आपण आपल्या कॉम्पुटरवर, टॅबवर किंवा स्मार्टफोनवर सहज केंव्हाही वाचू शकता. प्रतिलिपी हे काम फक्त एक भाषेसाठी करत नाही तर सध्या मराठी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू आणि गुजराथी अश्या सहा भाषेत चालू आहे आणि बाकी भाषेतही लवकरच सुरु होणार आहे. प्रतिलिपी मराठी विभागाची मी प्रमुख आहे व मराठी भाषेचं सर्व कामकाज मी पाहते. विशेष म्हणजे प्रतिलिपिवरील साहित्य वाचकांसाठी ठराविक फी च्या रुपात वाचनासाठो ठेवले जाणार आहे आणि त्यातून आलेली 70% रक्कम हि लेखकास दिली जाणार व बाकी 30℅ प्रतिलिपी आपली website व स्टाफ साठी खर्चाच्या रुपात वापरणार आहे. सध्या प्रतिलिपी ला उत्तम प्रतिसाद मिळत असून मागील आठवड्यात (मार्च पहिला आठवडा) प्रतिलिपिवरील वाचकांची संख्या 30 लाख च्या वर पोहोचली आहे, आणि हे प्रतिलिपीने खूप कमी वेळात साध्य केले, त्यासाठी लेखकाचा व वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे व त्यांचे आभार. आपण ही www.pratilipi.com या वेबसाईट ला भेंट दया आणि आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख email वर पाठवा त्यांस नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचसोबत 9969484328 या क्रंमाकावर ही संपर्क करु शकता.

मी -  जागतिक महिला दिनाविषयी महिलांना काय संदेश द्याल ?
वृषाली शिंदे -  मी संदेश देण्या इतकी मोठी तर नाहीच. कारण महिलांना महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून अनेक समाज सुधारकांनी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले आहे आणि तो एक खूप मोठा संदेश आहे. आणि त्याचमुळे आज महराष्ट्रातील अनेक महिला शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या आहेत, तरीही एक खंत आहे आजपण असंख्य महिला शिक्षण घेऊन सुद्धा आणि क्षमता असून ही आपला संसार, चूल आणि मूल ह्यापुढे सरकत नाही. तरीही मी संदेश देऊ इच्छिते कि स्त्रीयांनी मला जमणार नाही किंवा मी करू शकणार नाही हे झुगारून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यामुळे त्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा विकास घडवतील. फक्त मी स्त्री आहे असे समजून चालणार नाही तर आपणही एक मानव आहोत, पुरुषाप्रमाणे आपल्यालाही बुद्धी, ताकद दिली आहे आणि तिचा खरोखर उपयोग करणे जरूरी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
मी - आपणांस सुध्दा खूप खूप शुभेच्छा.

शब्दांकन -
नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
9423625769

No comments:

Post a Comment