नागोराव सा. येवतीकर

Saturday, 30 January 2016

📚 साहित्य मंथन 📚
          आयोजित 
📍"विचारमंथन " भाग -41 📍
📔 विषय :- माझे हक्क व माझे कर्तव्य 
👤 संयोजक व परीक्षक :-सौ .संगीताताई देशमुख, वसमत 
💻 ग्राफिक्स :-क्रांती एस. बुद्धेवार, बिलोली 
🕙 वेळ :- सकाळी 10 ते सायं 7
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
साहित्यमंथनच्या सर्व सदस्याना कळविण्यात येते की ,आजचा साप्ताहिक विचारमंथनचा विषय "माझे हक्क आणि कर्तव्य" हा आहे. मला खूप अभिमान वाटतो की,आपल्या गृपमध्ये खरोखरच श्रेष्ठ दर्जाची लहानथोर अशी एकूण ९८  साहित्यरत्न समाविष्ट आहेत. पण खेद याचा वाटतो की,या ९८साहित्यरत्नापैकी फक्त १५-२०जणच स्पर्धेत सहभागी होतात. या गृपवर चालणार्या स्पर्धा म्हणजे आपल्या बुध्दीला,कल्पनाशक्तीला वाव देणारे असतात. आपल्यासाठी ही प्रत्येकवेळी नवीन संधी असते. त्यामुळे सर्वानी या संधीचा फायदा घेवून आपल्या कल्पनाशक्तीला,विचारशक्तीला प्रगल्भ करायला हवं. त्यामुळे सर्वाना विनंती की ,या विचारमंथनमध्ये सर्व सदस्यानी आपले विचार मांडून सहभाग नोंदवावा 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
 आजच्या  विचारमंथन मध्ये आतापर्यंत सहभागी झालेले साहित्यिक खालीलप्रमाणे
१) ना सा येवतीकर, धर्माबाद 
२) गजानान पवार, हिंगोली 
३) निर्मला सोनी, अमरावती 
४) जागृती निखारे, पुणे 
५) रामराव जाधव (कविता), अहमदनगर 
६) सुलभा कुलकर्णी, मुंबई 
७) प्रवीण रसाळ, पुणे 
८) संजय पाटील
९) अंजना कर्णिक, मुंबई 

१०) कुंदा पित्रे, मुंबई 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


🔰 माझे हक्क आणि माझे  कर्तव्य 🔰

लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना दुसऱ्याच्या हक्काची गोष्ट आपण हिसकावुन तर घेत नाही ना याचा जरा सुध्दा विचार केला जात नव्हता. पण जसजसे वय वाढत गेले आणि आणि हक्क म्हणजे काय ? याची परिचीती आली आणि कळू लागले आपल्या हक्कासोबत कर्तव्याची जाणीव जेंव्हा झाली तेंव्हा हक्काने ज्या गोष्टी मिळवायला पाहिजे त्यावर सुध्दा आत्ता हक्क न सांगता समायोजन करण्याचे शिकलो. दुसऱ्याच्या हक्कातील वस्तु हिरावून घेतल्याने आपणाला तो आनंद मिळत नाही जो आनंद आपली वस्तू इतरांना वाटण्यात मिळते. हक्काची जाणीव झाली की माणूस सर्वात पहिल्यांदा कर्तव्याकडे वळतो. ज्यांना जाणीव होत नाही ते फक्त हक्कासाठी नेहमी लढत राहतात. हक्काची मागणी करतांना कर्तव्याला विसरून चालणार नाही. मी या देशाचा घटक असल्यामूळे देशाने मला काही हक्क दिले आहेत त्याच सोबत काही कर्तव्य सुध्दा आहेत. मला चांगले शिक्षण मिळावा, शुध्द पाणी मिळावा, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधा मिळण्याचा मला हक्क आहे. त्याच बरोबर हे हक्क मिळविण्यासाठी आपले कर्तव्य काय आहेत. आपण एक जागरूक नागरिक होऊन प्रत्येक पाऊल जागरूकतेने टाकणे आपले कर्तव्य आहे. आपण आपले कर्तव्य विसरून चालल्यामुळे आज अशी विपरित परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे माझे हक्क काय आहे हे तर आपणांस माहिती पाहिजेच शिवाय कर्तव्य सुध्दा आपण कधीही विसरू नये असे वाटते.
- नासा येवतीकर, धर्माबाद
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

📄माझे हक्क कर्तव्य 📄

🌺🌺🌺🌺🌺🌺
आजचा विषय म्हणजे लिखाणाला सुवर्ण पर्वणीच आहे ''माझे हक्क आणि कर्तव्य'' बाहेर गावी आहे लिहायची खुप इच्छा आहे  पण लिहायला व्यत्यय येतोय क्षमस्व...
माझे हक्क आणि कर्तव्य बजावताना आपल्यावर सोपविण्यात आलेली जवाबदारी चोखपणे मनापासून बजावणे हेच प्रथम कर्तव्य बनते ''तो गणराज गणपती आधी मन घेई हाती'' मनाला आपल्या अधीन केल्यावर जे डोंगरा सारखे पुढे असलेले काम किंवा ही सहज पणे आपल्या हातून घडत जाते.
आपले हक्क आपले निर्णय प्रांजळपणे मांडताना आपली जीमेदारी समोरच्या व्यक्ती जवळ निसंकोच सांगावे हाच त्यावरील उपाय आहे, वेळ निघुन गेल्यावर त्या गोष्टीला परत सांगणे कठीण जाते त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढा देणे म्हणजे लढाई करणे नव्हे तर आपले विचार समोरच्याला पटवून देण्यासाठी कार्य करीत रहाणे.
आपल्याला जन्म देणारी आई  मुलाला जन्माला घालते आणि त्याबाळाची जोपासना जीवापाड करते हे तिचे ही कर्तव्य आहे पण तिने सतत मुलगा मोठा झाल्यावर मी तुला जन्मदिला हे सतत सांगत रहावे योग्यतेचे नाही आणि मुलाचे ही तेवढेच परम  कर्तव्य आहे की आपल्याला जन्माला घालणारे आईवडील यांची जन्मभर सेवा करीत रहावे..
''आयुष्य खुप सुंदर आहे''
साहित्य मंथन ग्रुपने मला बोलते केले आहे,माझ्या सारख्या पामराला येथे लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व ग्रुपचा शतशः ऋणी आहे

जिवाभावाचा नाते जुळले
साहित्य मंथन वाटेवरी..!
रोज येथे नव्याने नव्याने ,
सोडत जाती गोड शिदोरी..!!
✏____ साहित्य मंथन आयोजित विचार मंथनसाठी
---- गजानन पाटील पवार
            वरुड देवी, हिंगोली..

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

विचार मंथन

"माझे हक्क व कर्तव्य"

  आयुष्य जगत  असतांना विविध नैतिक बंधने, कर्तव्य यात मानव जन्मताच बांधल्या जातो. ज्या समाजात, ज्या कुटूंबात जन्माला येतो, त्यांच्या  विषयी आपोआपच कर्तव्य यांची जाणीव होत राहते.
वयानुसार, परिस्थिति नुसार प्रत्येक व्यक्ति आपापले कर्तव्य बजावित असते. जिथे कर्तव्याची जाण येते तिथेच हक्क ही सहजपणे येते. आपल्या हक्कासाठी प्रत्येक व्यक्ति जागरुक असते आणि असायला ही हवे असे मला वाटते.
वयानुसार परिस्थितीशी समरुप होतांना कर्तव्य व हक्काची अंमलबजावणी होत असते.
एखादे लहान मूल जर खेळण्यासाठी रडत असेल तर वडील लगेच खेळणे विकत घेवून देतात. मुलाला कळत नसले तरी वडील या नात्याने वडिलांना आपल्या कर्तव्याची जाणीव होते आणि मुलाचा तो हक्को आहे हे ही जाणवते.
     आयुष्याचा एक एक टप्पा पार करित असतांना आपण सर्व या अवस्थेतून जातोच. बाल अवस्थेत आई वडीलांकडे हट्ट करणे तर बाल हक्कच. मग पुढे शालेय जीवन,  महाविद्यालयीन जीवन हेही हट्टाने परिपूर्ण असते. आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपण आईवडीलांजवळ आपला हक्क समजूनच मागत असतो. आईवडील ती गोष्ट कोणत्या ही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण पुढे हीच मुले आईवडीलांविषयी स्वतः चे कर्तव्य कसे विसरतात कुणास ठावूक?

व्यवहारी जीवन जगत असतांना समजूतदारपणा वाढतो. ख-या जगाची जाणीव होते. यशाची पायरी चढत असतांना, जीवनाला योग्य दिशा दाखवत असतांना आयुष्य एका वळणावर येवून स्थिरावते. आईवडील, बहीण- भाऊ, पत्नी-मुले हे सर्व एखादया वलयाप्रमाणे आपल्या भोवती फिरतांना दिसतात. एक सामाजिक बांधिलकी आपसूकच निर्माण होवून जाते. तेव्हा आठवते आपले हक्क जोपासता जोपासता केवळ कर्तव्य दृष्टि समोर येवून ठाकते. एक मुलगा, भाऊ, वडील, आजोबा,सर्व कर्तव्य पार पाडत जीवन जगावे लागते.

मला वाटते हा तर मानवधर्म आहे.

माझा ही हट्ट माझ्या आईवडिलांनी नेहमी पूर्ण केलाय. मला त्यांच्या प्रेमाची पूर्ण जाणीव होती. माझे वडील माझा खूप लाड करायचे.  पुढे जेव्हा त्यांची सेवा करण्याची वेळ आली तर मी माझे कर्तव्य बजावित त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत होते त्यांच्या.
जे काम मुलाने करायचे असते, त्या भावाचे सर्व कर्तव्य मी मुलगी असून पार पाडले.

आजचा विषय खूप छान आहे. खूप काही लिहिता आले. तशी संधी साहित्य मंथनने उपलब्ध करुन दिली, त्याबद्दल खूप खूप आभार.

निर्मला सोनी.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 विचारमंथन: भाग ४१.
विषय: माझे हक्क आणि कर्तव्य

 मुलभूत हक्क, कर्तव्य आणि आचरण या दैनंदिन जीवनातील महत्वपूर्ण बाबी आहेत.म्हणतात ना आपण ह्या बाबी दुसर्यांसाठी अपेक्षितो.स्वतःसाठी उपेक्षितो.पण हे चुकीचेच आहे.आपण आपले हक्क पायतळी न तुडवता त्याचे आचरण करायला हवे.माझे हक्क आणि कर्तव्य हा आजचा विषय!
 लहानपण आठवले की मी मधला नंबर आहे हेच आता आठवते.मोठी ताई,   ती प्रत्येक वेळी आपला हट्ट पूर्ण करून घेत असे .प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क ती बजावत असे.भाऊ एकुलता एक त्यामुळे तोही आपला हक्क प्रत्येक वस्तूंवर सांगत असे.लहान बहिण शेंडेफळ म्हणून तिचाही हक्क सगळ्याच बाबींवर! अगदी आईबाबांच्या प्रेमावरही ह्या तिघांचा जोरदार हक्क ! मी ह्या तिघांच्या कुठल्याही प्रकारच्या बाबींमध्ये सामिल नसले तरी आळ माझ्यावरचं यायचा.म्हणजे  प्रत्येक कारणीभूत मीच! मला माझा हक्क फारसा बजावता आलाच नाही. प्रत्येक वेळी ताई मोठी, भाऊ एकुलता एक वंशाचा दिवा, धाकटी बहिण लहान म्हणून त्यांचे लाड कोड पुरविले गेले.मी त्या हक्काला वंचितच राहिले.त्यामुळे कुठे कसा हक्क गाजवायचा हे कळतच नव्हते.हक्क म्हणून काहीचं मिळू शकणार नाही ते तेव्हाच कळले.माझा हक्क अभ्यासावर आहे हे कळल्यामुळे मी तो हक्क उत्तम बजावत होते.वर्गात कुणाशीच भांडण नव्हते म्हणून मैत्रिणींवर हक्क सांगू शकले.आजही वॉट्स अँप वर शाळामैत्रिणी आहेत. कुठलीही गोष्ट हातात घेतली की ती उत्तमप्रकारे पार पाडायची हा माझा हक्क होता.म्हणून शिक्षणाकडे कल झुकविला हक्काने जे जे शिकावेसे वाटले ते शिकले.जे जे करावेसे वाटले ते ते केले.
 लग्न करून सासरी आले वाटले नवर्यावर हक्क गाजवू; तर मोठा मुलगा म्हणून त्यांची कुटूंबाबाबत कांही कर्तव्ये होती, ती मी मोठी सून म्हणून मलाही झेलणे प्राप्त होते.मग मी मोठी वहिनी, मामी, काकू, मोठी आई म्हणून नातेवाईकांनी आपले हक्क सांगितले.आणि मी ते हक्क आनंदाने स्विकारल.नणंदेला, दिराला शिकविणे, त्यांची लग्न लावून देणे, बाळंतपणे, सासूसासर्यांची बारीक सारीक आजारपणे, घरी हे डॉक्टर म्हणून येणार्या नातेवाईकांची आजारपणे त्यांची ही सारी कर्तव्ये त्यांचा माझ्यावरचा हक्क म्हणून पार पाडली आणि पार पाडत आहे. जीवन जगत असतांना एवढे मात्र शिकले की, जगा आणि जगू द्या.आपली कर्तव्ये हाच आपला हक्क , आपला हक्क हेच आपले कर्तव्य! हे शेवटी खरे.
माझा हक्क म्हणजे माझ्या सासर माहेरच्या लोकांना जपणे.त्यांची आपल्या नात्याशी असलेली गुंफण उत्तमपणे गुंफत राहणे.एवढेचं नव्हे तर समाजाप्रती असलेली माझी कर्तव्ये एक समाजप्रिय प्राणी म्हणून पार पाडणे हा माझा हक्कही आहे.परिसर स्वच्छ ठेवणे, सामाजिक नितीमूल्यांची जाण निर्माण करून देणे.परस्परातं सामंजस्य राखून , कलह मिटविणे.प्रेमभावना जागविणे. स्वदेशप्रेम जागृत करणे .ही माझी कर्तव्ये मला पार पाडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे.
 मुलभूत सुविधा म्ह्णजेच अन्न, वस्त्र, निवारा हा माझा हक्क आहे.तो मी मिळविला आहे.जीवनात घेण्यापेक्षा देण्याचीच भूमिका पार पाडत आले.कर्तव्य, हक्क समजून हे सारं पार पाडतांना त्यागातला आनंद लुटत आले.
हट्ट करून कांही मिळत नाही.त्यापेक्षा समजूतदारपणा बाळगून परिस्थितीचा स्विकार करणे हे पण मला कर्तव्य वाटते.
*****
© जागृती निखारे.
३१ /१/२०१६.दुपार२.४०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
विषय हक्क आणि कतॅव्य
 नुकताच प्रजासताक 67वा आपण साजरा केला.या दिनामुळे मानवाला आपले  हक्क प्राप्त झाले यासाठी आभार.
      मानव जन्माला आल्याबरोबर तो बाळ,मुलगा, नातू, भाऊ इत्यादी नात्यांची पदके बिरूदावली म्हणून मिळतात. त्याचबरोबर तो एक देशाचा सुजाण नागरीक म्हणून  ओळखला जातो. त्यासाठी आधारकाडाॅची गरज लागते. तसे ओळखपत्र नसेल तर तो माणूस म्हणून जगूच शकत नाही का? थोडक्यात त्याला कोणाच्यातरी आधाराची गरज असते एवढे मात्र खरे.  
      पण आजचा मानव पाहता गरजेपुरता आधार घेऊन आधारवड नाहिसा करण्याच्या दृष्टप्रवृतीचा वापर करताना दिसतो.हा मानव हक्क आणि कतॅव्य हे जणू जुळे भाऊ एकाच नाण्याच्या दोन बाजू या सा-या संकल्पनांना मूठमाती देत आहे. हक्काची जाणीव ठेवून कतॅव्य जाणूनबुजून विसरणारा झाला आहे का? असे वाटते.मला जसा हक्क आहे तसे तो दुस-यालापण आहे हे जणू त्याला मान्यच नाही   त्याच्या हातून चूकीच्या गोष्टी घडत जातात. नधध वृध्दाश्रमाचा र स्ता दाखवणे पैशासाठी धध खून करणे भृणहत्या करायला भाग पाडणे. सवाॅत कळस म्हणजे भष्टाचारात सामील होणे  देशद्रोही कामाला हातभार लावणे अशा घटना त्याच्याकडून घडतात. सारी माणसे ही एकाच ईश्रवराची लेकरे आहोत ही वचनेही विसरतो.आणि मग. 
     मानसा मानसा कधि व्रहशील माणूस
     लोभासाठी झाला मानसाचं रे कानूस!
 माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे अशा वचनाची जाणीवकरून देण्याची वेळ आपणच आपल्यावर आणली आहे.
     विश्वशांती सहिष्णुता सवॅधमॅसमभावराष्ट्रभक्ती स्वाभिमान उत्तमशील शिस्त व राष्ट्रसेवा अशा गुणांचे बाळकडू फक्त शब्दात वाचनात राहिलेले दिसतात. मी माणूस आहे मले कोणी त्रास देऊ नये वेदना देऊ नये मला सन्मानाने वागवावे. माझा अपमान करू नये मला माझ्या इच्छेनुसार जगू द्यावे माझ्या जीवनात अडथळे आणू नयेत य् व अशा गोष्टीची अपेक्षा करताना आपणही असेच वागले पाहिजे हे विसरू नये. कोठेही थूंकू नये घाण करू नये.भष्टाचाराला खतपाणी घालू नये. सौजन्याने वागावे. जातीधमाॅवरून प्रांतभाषेवरंन भेदभाव करू नये. स्त्रीला कमी लेखू नये कोणाच्याही कमकुवयपणाचा गैरफायदा घेऊ नये संकटकाळी मदतीचा हात द्यावा  सवाॅना आपल्याप्रमामे मत असते अशी आपली कतॅव्य सवाॅनीच लक्षात ठेवली तर वृध्दाश्रम स्वछतामोहीम अशा वागवागळया उपक्रमामध्ये अमुल्य वेळ न दवडता कुटूंबाच्या व देशाच्या उन्नतीसाठी माणूस वेळ घालवू शकेल.आणि मग तो इतर प्राण्यासारखा प्राणी न राहता खरा मनूष्यप्राणी म्हणून जगू शकेल असा ठाम विश्वास आहे.
  म्हणूनच 
          हक्क आणि कतॅव्य हे दोन हात नमस्कारासारखे आहेत.त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करू नये. या दोन हातांचानमस्कार हाच खरा आपल्या जगण्याचा आधार आहे हे विसरून चालणार नाही.
        धयवाद! 
           सुलभा कुलकणीॅ.बोरीवली.

*************************************************
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

विचारमंथन : भाग ४१
=================
माझे हक्क आणि कर्तव्य
=================

मा. अरविंद कुलकर्णी काकांनी विचारमंथन उपक्रमाअंतर्गत अतिशय सुंदर अशी सकल्पना आज आपणासमोर मांडली त्याबद्दल त्यांचे व संयोजक-आयोजक, परिक्षक, ग्राफिककार यांचे मनस्वी आभार.

II आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे, II
II शहाणे करोनी सोडावे, सकलजन II

- समर्थ रामदास स्वामी

आपल्या आजच्या विषयाचा गुढार्थ समर्थांच्या या उक्तीत सामावला आहे फक्त तो समजुन घेणे आवश्यक.

माझा हक्क... माझा हक्क करीत माणुस आयुष्यभर रडत, झगडत असतो व त्यातच तो आपल कर्तव्य विसरतो असे मला तरी वाटते

समर्थांच्या उक्तीचा संदर्भ घेतला व त्यावर आपण मनपुर्वक विचार केला तर लक्षात येईल... ज्या कोण्या परमेश्वर, अल्लाह, गॉड, निसर्ग, न्युटरिकल एनर्जीने या अखिल ब्रम्हांडास व त्यातील जीवसृष्टिला जन्म दिला त्याची सर्वोत्तम व सर्वात घाणेरडी कलाकृत्ती म्हणजे मनुष्यप्राणी

हो मनुष्यप्राणी...
माझ्या, तुमच्यासारखे विचार करु शकणारे मनुष्यप्राणी
त्याने आपल्याला बुध्दि दिली, बुध्दिला जाणीव दिली, जाणीवेला जिज्ञासा दिली, जिज्ञासेला महत्वकांशा दिली, महत्वकांशेला स्वप्न दिली, स्वप्नांना आशा दिली, आशेला इर्षा दिली इर्षेला कृती दिली, कृतीला शारिरिक ठेवण दिली, शरिराला शक्ती दिली, तीला जोड म्हणुन सहनशक्ती दिली, सहनशक्तीला राग, लोभ, मत्सर, आपुलकी दिली, यासर्वांना काबुत ठेवण्याकरता सर्वांवर अधिराज्य करणार मनं दिल, मनाला पंतप्रधान म्हणुन मेंदु दिला, मेंदुला सेनापती म्हणुन चेतनाशक्ती दिली व चेतनेचा फौजफाटा म्हणुन असंख्य, अगणित विचार दिले

त्याच अगणित विचारांचा फौजफाटा घेऊन आपल्या प्रयत्नांचा वारु उधळतो चौफेर... हक्क व कर्तव्याची लगाम झिडकारुन....

प्रयत्नाच्या अश्वावर आरुढ होऊन सच्चाईच्या मार्गाने यशापयश, प्रगती-अधोगतीचे टप्पे पार पाडत माणुस म्हणुन जगण्याच्या जीवनमार्गावर अविरत घोडदौड करने आपला (माझा, तुमचा, सर्वांचा) हक्क आहे.

व समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपल्या मागुन आपल्या मागुन आपल्याच मार्गावर येणाऱ्या पांथस्थाना मार्गातील अडथळ्यांची जाणीव आपल्या अनुभवातुन करुन देने व आपल्याला आलेल्या अडचनी त्यांना न येता त्यांचा मार्ग सुखकर करने हे आपले (माझे, तुमचे, सर्वांचे) कर्तव्य.

धन्यवाद

आपलाच
प्रवीण रसाळ.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 हक्क आणि कर्तव्य 

विषय सोपा पण तितकाच गहण, त्यातील गहणता ज्यास समजली त्यास जीवनाचा फल्सफा (मराठी शब्द आठवला नाही क्षमस्व 🙏) उमजला.
विषय एकाच नाण्याच्या दोन बाजु सोबत सोबत असतात, तरीही कर्तव्य ही बाजु महत्वाची (उच्च प्रतिची) असते. त्यातला फरक ओळखून जिवन परिपूर्ण करता नाही आले तरी उत्तम नक्कीच करता येऊ शकते. लहानपणी फरक कळत नसतो वस्तु हवी म्हणजे हवी हा हट्ट कुठेतरी हळूहळू हक्काची चुणचुण लावून जातो पण हळूहळू प्रगल्भता आली की फरक ऊमजु लागतो. तो समजणे हीच पुर्ण प्रगल्भता (MATURITY) फार नाही काही उदाहरण देऊन विचार मांडु इच्छितो. 
हे विचार काही विशिष्ट अनुभवातून तसेच काही विशिष्ट लोकांच्या कडुन मिळालेल्या अनुभवातून मांडण्यात आले आहे, कोणासही उद्देशून नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. 

आई वडिल मुलांना संस्कार देऊन उत्तम संगोपन देऊन कर्तव्य करतात परंतु त्यांचा मुलांवर तितकाच हक्क असतो हे मुलांनी विसरु नये. आजकाल बर्याच वेळेस ऐकिवात येते पालकांच्या मालमत्तेवर हक्क सांगणारी मुले स्वतःची कर्तव्य विसरून त्यांना वृद्धा़श्रमात पाठवणी करून त्यांची so called privacy enjoy करतात.अरे त्यांचा हक्क आहेच की तुमच्या जिवनावर, त्यांच्या धडाडीच्या जिवनांत त्यांनी हक्क विसरून कर्तव्य पार पाडली तर आपले कर्तव्य आहे की त्यांचा हक्क त्यांना देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

पण आजची पिढी कुठेतरी कमी पडते हेच दुर्देवी सत्य अन् ते असत्य करण्यासाठी सर्वांचेच आशिर्वाद हवेत अन् प्रयत्न ही. अन् हे ऐकुन नाना पाटेकरांची वाक्य आठवतात 
नटसम्राट पाहुन आसवे काढण्यापेक्षा घरी असलेल्या आई वडिलांची सेवा करा.
मी तर म्हणेन वाड वडिलांची श्राद्ध दिवशी शेकडो च्या अन् हजारोंच्या संख्येने अन्नदानाच्या नावाखाली जेवण घालण्यापेक्षा जिवंतपणी सुखा समाधानाचे दोन घास द्यावेत हे श्राद्ध अन् घास टाकणे ही प्रथा आपसुकच बंद होईल. 
कर्तव्य अन् हक्क याचा समांतर मध्य गाठुन जीवन जगण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल सर्वांना. करतही असतील पण समोर दिसणार्या अशा चुकांना रोखण्याला आपण प्रयत्न नक्कीच करायला हवा.
ज्या दिवशी एकही व्यक्ती वृद्धा़श्रमात नसेल तेव्हा कर्तव्य अन् हक्क याचा समन्वय झाला असे म्हणता येईल. 

श्री कृष्णाने गीतेत म्हटले आहे 
कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन् 
कर्म करत रहा हाच संदेश महत्वाचा यावरूनच कर्तव्य महत्वाचे, येथे फळ म्हणजे हक्क असे धरले तरी वावगे ठरू नये हे माझं मत. 

संजय पाटील
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

साहित्य मंथन विचार मंथन:  लेखन स्पर्धा.
हक्क आणि कर्तव्य
खरतर एकाच नाण्याच्या या दोन बाजू! जर एखाद्याला आपले  योग्य आणि अन्य कोणाला हानी होणार नाही  असे हक्क मिळावे असं वाटत असेल तर अन्य बंधीत व्यक्तींनी आपले कर्तव्य ,जबाबदारीने पाळायला हवेच. आता हे साध ऊदाहरण बघा, शाळकरी मुल मोठ होताना पालकांच्या हाती आधी असतं.  नंतर होशाळा काॅलेजात जातं , शिक्षण घेतं आणि प्रौढ होत. या दरम्यान त्याच्या प्रती आहार ,पोषण , सांभाळ आणि संस्कार हे कर्तव्य असत आई बाबा अन्य कुटूंबीय. त्याला त्याची ग्रहण क्षमता असेल तितकं शिकवण, शिस्त लावणं, एक जबाबदार नागरिक घडवणं ही जबाबदारी शिक्षक, शिक्षण संस्था, आजुबाजूचा समाज याची असते.
पण आपण हल्ली पदोपदी
म्हणतो," आजकालची पिढी बिघडलीय, त्यांना मोठ्यांप्रती आणि देशाप्रती काहीही कर्तव्य भावना नाही!'
पण असं त्यच्याकडे एक बोट दाखवतो तेंव्हा ऊरलेली चार बोटे आत आपल्याकडे म्हणजेच पालक ,शिक्षणक्षेत्र, समाज, शासन यांचेकडेवळलेली असतात. मुलाला आपल्याच वर्तनातून, स्वार्थाची, केवळ हक्क मिळवण्यासाठी आटापीटा करण्याची शिकवण वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थातून त्यांना कळत नकळत मिळत गेलेली असते. स्वाभाविकपणे ती मुले हे असे आपमतलबीपणाचे संस्कार ऊचलतात. कर्तव्य ही जाणिवपुर्वक करायची गोष्ट
आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
कुटूंबात  घरात वागताना वेगवेगळ्या नातेसंबंधात असलेले कर्तव्य निट पार पाडले गेले नाही की विसंवाद निर्माण होतो. लग्न करून नव्यानी घरात आलेल्या सुनेकडून तिने सर्वांचा मान राखावा, सर्व कामे करावीत, स्वत:च्या आजवरच्या विचार , आकांक्षा, संस्कारांना तिलांजली देऊन केवळ त्यागकरण्याचे कर्तव्य करावे अशी अपेक्षा पती सासूसासरे, दिर, नणदा, जावा ,अन्य नातलगकडून असते . पण त्याचवेळी तिच्या माहेरच्या माणसांचा, संस्कारांचा इच्छेचा आदर करणे, साधे तिला माणूस म्हणून वागवणे हे देखील कर्तव्य सासरच्या लोकांकडून पाळले गेले नाही तर विसंवादाचे रूपांतर विभक्त होण्यात होते.  पतीच्या आई वडीलांची सर्व सेवा देखभाल, सुनेने तन मन धनाने करायची. ते तिचे कर्तव्यच आहे म्हणायचे. मग  सुनेच्या आई  वडीलांची जबाबदारी घ्यायचे कर्तव्य कोणी पार पाडायचे?  तो हक्क तिला नाही का? संसारातला आनंद आणि यश हे खर तर सर्वच जण आपला हक्क मागताना कर्तव्य पण कसं जाणिवपुर्वक  निभावतो त्यावर अवलंबून असते .
आजकाल अपघात झाले, की सरकार आणि वाहतूक व्यवस्थेला नावे ठेवायची हे आपण हक्काने करतो. नुकसानभरपाईचे दावे लावतो. पण साधेसाधे वाहतुकीचे नियम ना पादचारी पाळत ना वाहनचालक! देशाचे
शासन चांगले हवे तर निवडणुकीला मत द्यायला जाताना लोकाना कंटाळा! मतदाना तारखेच्या आसपास जोडून सुट्या आल्या की चाललच पब्लीक  बाहेरगावी पिकनिकला! मगृमतदान टक्का जेमतेम ४२,४८ ते ५० टक्केच! पहा कितीनावरीकांनी आपले मुलभूत कर्तव्यही बजावले नाही! मग हक्कांसाठी आंदोलने, दंगे कोणत्या अधिकाराने करतो आपण?
सार्वजनिक बागा, रेल्वे, प्लॅटफाॅर्म, बसेस व रस्ते देशाच्या नागरिकांचीच हक्काची मालमत्ता असते. पण त्याची निगा राखण्याचे कर्तव्य आपल्या गावीही नसते.
 चांगल जगा आणि जगू द्या हे हक्क आणि कर्तव्य याचा समतोल साधल्याशिवाय होणार नाही. तेच राष्र्ट मोठं होतं जिथले नागरिक आपलं कर्तव्य श्वासाइतक्या सहजपणे निभावतात! कायद्याच्या बडग्याने नाही. 
टाळी एका हातानीनाही वाजत! थोडं द्या थोडं घ्या!
प्रेम जबाबदारीन करा.आदर सन्मान हक्काने न मागता आपोआप न मागता चालून येणारच!  मुलांचे आई बाबा त्यांच्या आईवडीलांबाबत सर्व कर्तव्य पार पाडतायत असं वाढणार्‍या मुलांनी पाहिलं की  पालनपोषणाचा हक्क कोर्टात जाऊन मागायची वेळ पालकांवर येणार नाही. चांगल आरोग्यमय जिवनाचा हक्क तेंव्हाच मिळेल जेंव्हा सारे देशवासी सभोवताल व पर्यावरण स्वच्छ ठेवतील!
अंजना कर्णिक. मुंबई .
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌺साहित्य मंथन स्पर्था🌺
         ====विषय ===
🌹माझे हक्क आणि कर्तव्य🌹
      🌷 प्रेषक--कुंदा पित्रे 🌷
=====================
घरातील सहा मुलांमध्ये शेंडेफळ आई तीन वर्षाची असताना गेली मग दुसरी आई आली तेव्हा फक्त पडेल ते काम सावत्र आई सांगेल ते व सांगेल तसे वागणे नाहितर इंगा ठरलेला! तेव्हा हक्क आणि कर्तव्ये मी जवळजवळ मैलोन्गणिक लांब होते.आपला हक्क आहे ,कर्तव्य आहे याबद्दल जाणिवा नेणिवा बोथटच राहिल्या फक्त आपल्यामुळे वडिलांना त्रास होऊ नये .म्हणून तोंड दाबून राहिले.हे कर्तव्य वडिल जाईपर्यंत पार पाडले.
मुंबईस आल्यावर लगेच 18व्या वर्षी  विवाह .तिथे देखील लहान!
 सासूबाईचे व जावेचे मोठे स्थान मला एव्हढे जाणवले की हेच आपले घर कारण आईवडिल नाहीत भावंडाची आवळ्याची मोट अजूनही आहै.बहिणीनी जरी सांगितले नाही तरी कर्तव्याची जाण आली की,कुटंबाला धरून रहायचे .नव-याकडे तक्रार करायची नाही.जेव्हा हे पाहिले की,सासू जाऊ आपल्यात मला सामावून घेत नाही आहेत.माझा घरातील हक्क डावलत आहेत.मी कांही न बोलता एम.ए.पर्यंत शिक्षण घेऊन 30 व्या वर्षी नोकरी पकडली .मुलांसाठीची कर्तव्ये ढोर मेहनत घेऊन पार पाडत होते.मला वाटे माझे बालपण वा तारूण्य दुर्लक्षित केले गेले ते मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यावेळी सकाळी पांचला दिवस सुरू होऊन रात्री बाराला मावळे! मुलांशी कर्तव्य कठोर प्रसंगी वागले पण त्यांचे भले झाले.मुले इंजिनियर होऊन अमेरिकेत सेटल आहेत.दादरला घर घेतले तरी देखील सासरी हक्क मिळालाच नाही.माहेरी वा सासरी कुठेही हक्कासाठी भांडले नाही.स्वबळावर कष्ट करीत राहिले. हक्क मिळोत वा न मिळोत कर्तव्य करीत रहायचे.एक त्यात बरे होते मोठा गोतावळा नव्हता कुणाचे पैशानी करावे लागले नाही .भावंडानी आपापले कष्ट करून संसार थाटले पण मी छोटी म्हणून जिव्हाळा जपतेय.
या संपुर्ण आयुष्यात एव्हढे कळले की,तुम्ही मन तगडे केलेत,अपार 
कष्टाना साद घातलीत, कोणाकडूनहि अपेक्षा ठेवली नाहीत,नातेसंबधशी योग्य अंतर ठेवून त्यांच्याशी स्नेहबंध ,प्रेमळता ठेवलीत.,जेव्हा हवी असेल तेव्हा मदतीसाठी आपलं कर्तव्य समजून उभे राहिलात,मित्र, मैत्रिणी,नातेबंध हे काही कारणास्तव दुराव्याने वागले तर ते सोडून देऊन त्याला मानवी स्वभाव म्हणून सोडून द्यावे. हक्काचं गणित मांडलं की , त्रास होतोच ! हक्क व कर्तव्य  जुळे भाऊ आहेत  कर्तव्य पार पाडताना हक्क मागोमाग येतोच.
आज जगांत काय चाललं आहे .?राजकीय,सामाजिक,
धार्मिक पातळीवर बोलणे नलगे !मंथनवर सारे जाणते आहेतच.
कर्तव्याचा विसर पडलाय व हक्कासाठी कोर्टकचे-या चालु आहेत ही झळ मलाही लागलेय आईवडिलानी दोघाकरता घेतलेले घर मोठा भाऊ देणार नाही म्हणतो व धाकटा म्हणतो मी तुझा भाऊ हे तूं नाकारतोस.आज पंधरा वर्षे कोर्टात केस चालु आहे.भावाचे वय 87 धाकट्या भावाचे 77 आहे. हक्कासाठी!! आईने रामलक्ष्मणा सारखी वाढवलेली  मुले कोर्टाच्या चकरा मारत आहे. म्हणूनच माझा वरील ह्यू कथन केला.
हा विषय देऊन साहित्य मंथनने लिहायला लावले बरे वाटले.
धन्यवाद
स्नेहांकित
कुंदा पित्रे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼













No comments:

Post a Comment