नागोराव सा. येवतीकर

Saturday, 14 November 2015

🎋 " साहित्य मंथन ग्रुप " 🎋
. . . . आयोजित . . . . . 
💥 विचार मंथन भाग - 30 💥

♻ विषय : ओळखा पर्यावरणाचा धोका ; प्रदूषणाला रोका 

🎬 संयोजक व परीक्षक : नंदकुमार सोवनी 

💾 ग्राफिक्स : उत्कर्ष देवणीकर 

🎤 संयोजन : अरविंद कुलकर्णी 

📆 दिनांक : 15 व 16 नोव्हेंबर 2015


चला मित्रांनो 

प्रदूषण रोकू या ; पर्यावरण वाचवू या

Friday, 13 November 2015

** बालपणीचा काळ सुखाचा  **
          - नागोराव सा. येवतीकर 

आज मी जेव्हा मोठा झालो आणि मागे वळून पाहतो तर मला लहानपणीचे ते सारेच दिवस जशास तसे आठवतात. माझे बालपणीचे मित्र आणि त्यांच्या सोबत केलेली धिंगामस्ती आठवले की आज ही वाटते की परत एकदा लहान व्हावे आणि पुन्हा पुन्हा तेच करावे. बाबांचा राग आणि आईची माया आज नाही पहायला मिळत. क्रिकेट खेळायला जाऊ नको अशी बाबांची तंबी असायची तरी सुध्दा क्रिकेट खेळायला जायचो आणि मागच्या दाराने हळूच घरात प्रवेश मिळवायचा. बाबांना ही बातमी कळू नये ही विनंती अर्थातच आईजवळ असायची. क्रिकेट खेळाबरोबर विटीदांडू, गोट्या खेळण्याचा ही खूपच नाद होता त्यामूळे अभ्यासाचे तीन तेरा होत होते ती गोष्ट वेगळी. माझी खोडी काढणारी आणि माझ्या मागे अभ्यास कर म्हणून सतत पिरपिर करणारी माझी छोटी ताई. तिच्यामुळे मी नाईलाजाने अभ्यासाला बसायचो कारण ती मला बाबांना सर्व सांगते म्हणून भीती घालत होती. मी शाळेत जायला शिकलो तिचा हात धरूनच. एके दिवशी शाळेत गुरुजींनी एका मुलाला छड़ीने खूप मारले, त्याची पँट ओली झाली. हे जेंव्हा मी पहिलो आणि शाळेत जाणार नाही म्हणून घरीच रडत बसलो त्यावेळी माझ्या ताईनेच मला ओढत शाळेत नेल.  कदाचित तिने जर मला त्यादिवशी असे केले नसते तर मी शाळा शिकलो असतो की नाही हे  मला माहीत नाही. लहानपणी मला फक्त एकच ध्यास ते म्हणजे खेळणे. गल्लीमध्ये माझ्याच वयाची पोरांची संख्या भरपूर होती  त्यामूळे खेळण्यासाठी कुणाला शोधण्याचे गरज पडत नव्हते. रविवारचा पूर्ण दिवस क्रिकेट खेळण्यात जायचं. बाजूच्या गावाचा क्रिकेटचा संघ कधी आमच्याकडे यायचा तर कधी आमचा संघ त्यांच्या गावाकडे जायचो. त्यावेळी सायकल खूप कमी होते त्यामुळे चालत आणि पळत जाण्यात खूप मजा यायची. शाळेला सुध्दा असेच चालत पळत जावे लागायचे. आमचे काही मित्र शाळा बुडवून चित्रपट पहायला जायचे आणि शाळा सुटणार त्या वेळेला आमच्या सोबत घरी परत यायचे. माझी कधी हिम्मत झाली नाही तसे करण्याची परंतु मित्राच्या आग्रहाखातर मी एक - दोनदा गेलो असेन शाळा बुडवून चित्रपट पहायला. जेंव्हा मी गेलो तेंव्हा मला खूप पश्चाताप व्हायचं. अपराधीपणाची भावना मनात असायची सोबतच गुरुजींची भीती सुध्दा होती.  लहानपणीचा संपूर्ण काळ हसत खेळत कधी संपला हे कळलेच नाही आज जेंव्हा मागे वळून पाहतो किंवा लहानपणीचे अल्बम मधील माझे फोटो मी पाहतो तेंव्हा मला हसू येते आणि क्षणातच आसू पण येते. 

आज ही वाटते की परत एकदा लहान व्हावे आणि खूप खेळावं खूप मजा करावा. 

आज बालदिन त्यानिमित्ताने परत एकदा लहानपणीच्या आठवणीना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न करतांना मन हलका झाल्यासारखे वाटते. 
आपण ही आठवण करा आपल्या बालपणीच्या काही रंजक आणि गमतीदार गोष्टी आणि share करा आपल्या बालमित्रा सोबत. 
धन्यवाद
💥 लातूरच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे यांना केंद्राचा उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी पूरस्कार जाहीर
लातूर :
श्रीमती तृप्ती अंधारे,मा. गटशिक्षणाधिकारी, पं.स. लातुर, एक कर्तव्यतत्पर अधिकारी तसेच अनेक शिक्षकांसाठी मार्गदर्शक व प्रेरक, दिपस्तंभासमान व्यक्तीमत्व. यांना भारत सरकारकडून "National Award for  Innovation in Educational Administration" हा पुरस्कार मा. स्मृती इराणी, मानव संसाधन विकास मंत्री,भारत सरकार यांच्या हस्ते दिल्ली येथे  दि. ९ व १० डिसेंबर २०१५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन!!!
💥 श्रीमती तृप्ती अंधारे यांच्या कार्याचा परिचय
 👉🏿 मा. तृप्ती अंधारे मॅडम म्हणजे चैतन्याचा व उर्जेचा अविश्रांत झरा ! विद्यार्थ्यांमध्ये रमणारं एक अजब व्यक्तीमत्व !!  शिक्षकांना प्रेरणा देऊन शिक्षण क्षेत्रात अधिकारी व कर्मचारी यांच्यातील दरी दुर करणारं व्यक्तीमत्व !! स्वत: अनेक संकटांना सामोरे जाऊनही शैक्षणिक क्षेत्रात विविध क्रांतिकारी प्रयोग यशस्वीतेने राबविले. प्रत्येक समस्येत एक संधी शोधली व त्या समस्येला अचूक उत्तर शोधून शैक्षणिक क्षेत्रात एक नवी पहाट फुलविली. " दप्तरातल्या कविता" च्या रूपाने जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा राज्यातील पहिला कविता संग्रह प्रकाशित केला. म्हणतात ना परिक्षा सोन्यालाच द्यावी लागते लोखंडाला नाही, असेच काही प्रसंगाना त्यांना सामोरे जावे लागले. परंतू त्यांनी तितक्याच संयमाने ते अग्निदिव्य पार पाडले. दिपावलीच्या प्रकाशपर्वात या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाची चमक प्रखरतेने उजळून निघाली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे."
असेच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्यंतिक तळमळ व शिक्षकांवरील विश्वास या दोहोंच्या परिपाकातून लातुरच्या शैक्षणिक चळवळीला निश्चितपणे एक अलौकीक झळाळी त्या प्राप्त करून देतील यात शंकाच नाही. त्याची एक झलक त्यांनी विजयादशमी नंतर घेतलेल्या पानाफुलांच्या सजावटीतून सहजपणे जाणवते. यशाच्या शिखरांना असेच सर करत रहा याच शुभेच्छा !!! शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,
" जिंदगी की असली इम्तिहान अभी बाकी है,
जिंदगी की असली उडान अभी बाकी है,
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीं
 सारा आस्मान अभी बाकी है!! "

 भविष्यातील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!!!

💐💐💐अभिनंदन!!!💐💐💐

Thursday, 12 November 2015


" विचार मंथन ग्रुप " आयोजित 

** काव्यमंथन चारोळी स्पर्धा  **
** विषय : भाऊबीज   ** दिनांक : 13 नोव्हेंबर 2015
** परीक्षक : निर्मला सोनी 


*********************************************************

बहीण  
एक अनोखं नातं .....

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. 
आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली 
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. 
'माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीजे च्या आपणा सर्वाना शुभेच्छा ! 
*************************************
भाऊबीजच्या दिवशी 
बहीण करते प्रतीक्षा 
ओवाळणीत काही नको
कर आयुष्यभर रक्षा 
 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
भावाला उदंड आयुष्य लाभो 
बहिणीची हीच असते ईच्छा 
वर्षातून एकदा येणाऱ्या 
भाऊबीजच्या तुम्हांला शुभेच्छा 
नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
सासर माझे तालेवार जरी 
माहेरचीच आवडे साडी चोळी
भाऊबिजेच्या मंगल वेळी
वाट पाहते बहीण भोळी 
* अरविंद कुलकर्णी 
( साहित्यमंथन च्या सर्व लहान थोर बहिणींना समर्पित )
*************************************
बायको म्हणते नवऱ्याला 
आम्ही जातो आमच्या गावा 
आज भाऊबीजचा सण जाते 
माझ्या भाऊरायाला ओवाळाया 
नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
भावाला ओवाळीते
बहिण आरती
भावाची पसरते
जगात किर्ती 
पी के देशमुख नादेंड
*************************************
बहीण आणि भावाचं
भाऊबीज हे नातं
ओवीशिवाय कंठाचं
फिरत नाही जातं
   --- शफी बोल्डेकर
*************************************
भाऊबीज घेवून आली बघ तुझी आठवण,
डोळ्यांत होवू लागली अश्रूंची साठवण,
भाऊराया, महालातला तू असे रे राजा ,
आज तरी बहिणीची तुज होईल का आठवण ....
निर्मला सोनी.
*************************************
वेड्या बहिणीची 
वेडी ही माया 
वाट पाहाते ती 
भावा ओवाळाया 
- नासा
*************************************
भाऊबिजेला उधाण आणिक भरते आनंदाचे,
ओवाळुनिया प्रिय भावाला बहीण गाऊन नाचे.
युगायुगांचे नाते हे रे अगदी प्रत्येकाचे,
म्हणून वंदिते प्रेमादरे रे काया मन नी वाचे.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
************************************
|| श्री ||

रक्षावे भगिनीस 
असे बांधवाने 
जसे रक्षीले द्रौपदीस 
श्रीकृष्ण माधवाने ||

जपावे या बंधनास 
निरामय भावनेने
जसे जपले हळूवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने ||

द्यावे पूर्णत्व नात्यास
आज बंधनाने
जसे दिले पूर्णत्व
दीपावलीस द्वितीयेने ||

ओवाळणी दिली आज
काव्यरूपी विनम्रतेने
जशी दिली तिमीरात
पणतीस प्रकाशाने ||

भाऊबिजेच्या शुभेच्छा !
- सुजाता मोघे 
*************************************

सिमेवरती लढणा-या रे,
प्रणाम तुजला भावा.
ओवाळीन मी भाऊबिजेला
आशिर्वाद मज द्यावा.
डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे.
*************************************
माझ्या लेकरांच्या भाळी नाही।
मामा मावशीची मायाळू गणगोती।
नभीच्या चंद्राशी, राऊळी देवाशी।
मी जोडते नि:स्वार्थ प्रेमाची नाती।
अंजना कर्णिक.
*************************************
दूर गेला माझा भाऊराया,हूरहूर लागली मनाला,
आला आला चंद्र बिजेचा,आतूर झाला ओवाळणीला,
भाऊराया,आस आहे,त्वरे लागगशील तू परतीला,
वाट पहाते वेडी ताई,घेऊनी हाती पंचारती भाऊबीजेला.
      - सुलभा कुलकणीॅ .मुंबई.
*************************************
भाऊराया भाऊराया
किती करतोस माया ।
अविरत अखंडपणे
मजवर तुझी छाया ॥
        डाॅ. शरयू शहा.
*************************************
सिमेवर भाऊ माझा 
लढतो रात्रंदिन 
ओवाळीते येथून तुजला 
करून नयनांचे निरांजन 
*अरविंद कुलकर्णी
*************************************
आली आली भाऊबीज,
ताईची आज आठवण आली..
ओवाळुनी घेता पंचारती,
वास्त्यल्याची साठवण झाली...
- निलेश आळंदे
*************************************
बंध स्नेहाचे,बंध प्रेमाचे
ॠणानुबंध हे जन्मोजन्मीचे
औक्षण करते भाऊराया
अायुष्य लाभो तव बहिणीचे
- मारुती तु.खुडे
माहूर, नांदेड 
*************************************
सैनिकांना विरह बहिणीच्या मायेचा
दूरदेशी सीमेवर रक्षण करी भारतमातेचा 
काही नको भाऊ राया मजला 
शौचालयाची ओवळणी मागते तुजला 
     -  आप्पासाहेब सुरवसे सर 
        लाखनगांवकर
*************************************
नको सोन नानं मजला 
नको साडी जरतारी 
ओवाळीते दादा तुजला 
टाक मानाची सुपारी 
* अरविंद कुलकर्णी
************************************* 
सणात सण मोठा दिवाळीचा 
भाऊबीजेला मान असे बहिणीचा
ओवाळीते मान पान सुपारी करदोड्याचा
ओवळणी घाला हट्ट धरीते हक्काचा
      आप्पासाहेब सुरवसे सर 
       लाखनगांवकर
*************************************
नटुनी सजुनी तयार झाले,
बंधुराज माझ्या सदनी आले
प्रेमभराने तयास न्याहळले
भाऊबीजेचे मोल आज कळले.
          
अरे, असा कसा रे भाऊराया,
झाला कसा तयार रे ? पाठ फिरवाया
आई,बाबा,ताई नाती विसराया
ओवाळू कुणा मी 
भाऊबिजेसाठी असूनी भाऊराया?
  - सुलभा कुलकणीॅ बोरीवली मुंबई.
        9930509026.
*************************************
जीवापाड जपती जे देशाला
रात्रंदिन जागून.. घेती झीज
आगळी करून ती भाऊबीज
त्या कष्टाचे... करू या चीज
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************

बहिण भावाच्या नात्यात
असते म्हणे ओढ रक्ताची
तरी मने  गुंततात इस्टेटित
गाठ तुटते जन्म  नात्याची
अंजना कर्निक 
*************************************
भाऊ बहीण नात्याची गोडी
अवघड नात्यांमध्येही यावी 
इकडची विहीण .. ते व्याही
सासर माहेर भाऊबीज व्हावी
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************
दोन व्यक्तींमधे असावे नाते
माणूसकीचे।
वागणे असावे  प्रेमळ ,साधे
सन्मानाचे।
भाऊबिजेच्या ओवाळणीचे
हे क्षण आनंदाचे।
आश्वासक आधाराची द्यावी
  नारीस अभिवचने।
अंजना कर्णिक
*************************************
बहिण भाऊ गोडी निराळी 
भाऊबीजेच्या सणाला..!
नकोच दादा दुसरे दान मज,
आतुरले मन भेटायला..!!
✏ - - - - - - - जी.पी
************************************

नकोत मजला शालू दागिने
आस ओढ ती नाही कशाची 
भाऊबीजेला हवी ओवाळणी
खट्याळ प्रेमळ सहवासाची
                 डाॅ. शरयू शहा.
*************************************

प्राणाची बाजी लावून जो लढला
सीमेवरती लढूनी अमर तो
जाहला

विधवेस तयाच्या बहीण हो
तुम्ही माना
अन काळोख्या जीवनी हो
अंजना कर्निक 
*************************************

साजरी करता अापुली भाऊबीज।
येई तयांचाही आठव मन्मना।।
दॆवे जे पारखे या सुखा।
अायुरारोग्य शांती लाभो तयांना॥
जयंत देशपांडे, अहमदनगर
*************************************

गोडी नात्याची अवीट ही
भाऊ बहिण भाऊबीजेची..!
आठवणीत रमते माहेरच्या ,
निरांजने भरून डोळ्यांची..!!
✏ - - - - - - - जी.पी 
*************************************

नकळत उघडे भाऊबीजेला कुपी पूर्वस्मृतींची।
बालपणीचा सुगंध करी पुलकित हर क्षणी।।
आयुरारोग्य समाधान स्थॆर्य अन् शांतीची।
करिता भाऊराया ऒक्षण, हीच आळवणी ईश्वरचरणी।।
जयंत देशपांडे 
*************************************

भाऊबीज सण साजरा 
आनंदाचा पुर आला..!
बहिण जाई कामाला 
भाची ओवाळी मामाला..!!
✏ - - - - - - जी.पी 
*************************************

चित्र पाहूनी आठवणीना जाग आली.
भाऊराया ओवाळीले तुला मी भाऊबिजेला.
ओवाळणीचा रूपया जपून मी ठेविला.
आज परत तोच स्वप्नात खणखणू लागला.
सुलभा कुलकणीॅ.
*************************************

बहिणीची ती वेडी माया
बंधुसाठी झिजवती काया
नाक डोळे मोडती भाऊजया
औक्ष मिळो देवा माझ्या भाऊराया
प्रार्थना करीती भावासाठी आयाबाया  
      आप्पासाहेब सुरवसे सर
      लाखनगांवकर
*************************************
बहीण भावाचे नाते अतूट..
जणू आपुलकीचे बंधन...
येता सण भाऊबीजेचा..
आठवांचे जुळते स्पंदन...
   - सौ.कस्तुरी
*************************************
आनंदवनातील "भाऊबीज" असे निराळी 
मना मनातील काढून टाकते काजळी
मंदा नि प्रकाश आमटे घडविती हेमलकसा
कुष्ठरोग हटविण्याचा दांपत्यांनी घेतला वसा
       आप्पासाहेब सुरवसे लाखनगांवकर
*************************************
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा
सण मायेच्या ओलाव्याचा
भाऊबीज म्हणती 
सारे या सणाला
मेघा शिंदे 
*************************************
हाती घेऊन आरतीचे तबक
वाट मी पाहते भाऊराया
काढीली  रांगोळी मी सुबक
जाण  या बहिणीची माया!
अंजना कर्णिक
*************************************
होत नाही बरोबरी कधी,
बहिण-भाऊ या नात्याची..
सांभाळुनी भार संसाराचा,
करी बहिण चींता भावाची...
       @ उत्कर्ष देवणीकर...
*************************************
संसाराची सुबक आखणी
करण्याचे परी कसब आगळे।
नात्यांची जपणूक करताना
स्वतःस न देई महत्त्व वेगळे।।
जयंत देशपांडे 
*************************************
भाऊबीज घेवून आली बघ तुझी आठवण,
डोळ्यांत होवू लागली अश्रूंची साठवण,
भाऊराया, महालातला तू असे रे राजा ,
आज तरी बहिणीची तुज होईल का आठवण ....
निर्मला सोनी.
*************************************
पंचमी, भाऊबीज असो की सण हे राखी
बहिण ही असावी मानलेली किंवा सखी
तिला घेऊन जाण्यासाठी भाऊ करीतो नम्र विनंत्या
आई ,बहिण ,बायको पाहिजे तर थांबवा स्त्रीभ्रूण हत्या
आप्पासाहेब सुरवसे, लाखनगांवकर
*************************************
1) कोंबडा की,कोंबडी करवंद चाखताना
कब्बडी लंगडी डाव मांडताना
दादा त्यात नसूनसुध्दा असायचा
खुद्कन् हसायचा भाऊबीज देताना

2)  सारवलेले असे अंगण
     खळ्यावर पडे भाताची रास
     असे मंद टिपूर चांदण
     पाटावर सजे भाऊबीज खास

3)  दूर ,दूर गेले ते सारे
      घर जाहले सुने,सुने
      आठवांचे सतत वारे
      ना भाऊबीज मन दिवाणे

4)   भाऊ मोठा,मोठा होई
       ती सासरी, नांदत होती
       कधी कधी समाचार येई
      ती भाऊबीज जपत होती
          - कुंदा पित्रे
*************************************
बहीण गेली सासरी 
भाऊ दूर देशी 
भाऊबीजच्या सणाला 
होई गाठीभेटी 
- नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद
*************************************
साता समुद्रापार गेला भाऊ
बहीण  राहिली  मायदेशी 
मना बिजेस कशी समजावू 
तुझ्या भेटीची  रे असोशी।
अंजना कर्निक 
*************************************
कृष्णसखा आधार  तिचा
पुरविली वस्त्रे ऐन गरजेला
काय हवं आजच्या द्रौपदीला
भाऊबीज की, हात हवा रक्षणाला
    - कुंदा पित्रे
*************************************
बहीण भावाच नातं 
एका काळजाच।
ठेच एकास लागता दुसर्‍याने रडायच।
बहीण सासरी जाता
भाऊ मनी ऊदास।
भाऊबिजेचा सण येता
हसू फुटत खुशीचं।
     - अंजना कर्णिक
*************************************
भाऊ आलाच नाही 
वाट पाहून शिणले डोळे
तुमच्यासारखे भाऊ मिळाले
मायेने दाटले डोळे
डॉ शिल्पा जोशी
**********************************
नाती कळत नसतात रक्ताची
असतात प्रेमाची विश्वासाची 
तुमच्यासारख्या भावनिक नात्याची
भाऊबीज खास सजवायची
डॉ शिल्पा ताई जोशी
मुंबई
**************************************
द्रोपदी म्हणाली कृष्णाला 
ये दादा भाऊबीजेला
तुझ्यासारखाच भाऊ मिळो 
प्रत्येक बहिणीला 
डॉ शिल्पा ताई जोशी 
मुंबई
****************************************





 


** साहित्य मंथन ** या whatsapp ग्रुप वर
दिवाळी निमित्त जमलेली काव्यमैफल
दिनांक 12 नोव्हेंबर 2015

******************************
लक्ष दिव्यांनी  आसमंत व्यापले,
उजळली धरणी न् अंबर झाकले,
आनंद असा घेवून आली दिवाळी,
उधाण सर्वांच्या जीवनास आले ....
निर्मला सोनी.
******************************
माझ्या फुप्फुसा बन दगड..
माझ्या फुप्फुसा बन दगड...

अटळ आहेत फटाके सारे,
सढळ आहेत ते फोडणारे
पिचणाऱ्या पिचशील किती,
खोकत खोकत जगशील किती
थांबव हृदयाची धडधड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!

कशासाठी काढतोस घाण,
रक्तामध्ये भरतोस प्राण
सगळीकडे धूर, जाळ
अजुन तगशील किती काळ ?
पर्वा तुझी करतो कोण ?
झाडे-बिडे लावतो कोण ?
थांबव आकुंचन-प्रसरण,
माझ्या फुप्फुसा दगड बन...!!

नरकासुरास मारल्यानंतर कुणी केलं दारूकाम ?
फुटले होते का फटाके, वनवासातून येता राम ?"
काssही काssही विचारू नकोस,
धर्मा-बिर्मात शिरू नकोस
बुद्धी त्यांना आहे खूप,
तुलाच लावतील मोठ्ठं कुलूप !
प्राणवायूची नळकांडी,
घेऊन फिरतील पाठीवरती
शोधतील यंत्र श्वास घ्यायला,
नको राहूस ते पहायला
तूच सोड आपला गड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!

ऐक बॉम्ब, ऐक माळा,
कानामधला फेकून बोळा,
ऐकून घे अंतिम आवाज,
पाहून जा पैशाचा माज
त्यांचेच पहा फुटतील कान,
रक्त ओकून जातिल प्राण
जगून तरी करतील काय ?
खाली डोकं वर पाय !
शिकूनसुद्धा नाहीत सुजाण,
विवेक इथे पडला गहाण
अशा जगी कशासाठी,
जगण्याची ही आटाआटी ?
फक्त एकदा कर आक्रोश,
दाखवून जा सारे दोष
ऐकून तुझी व्यथा खरी,
शपथ वाहील कुणीतरी
साजरा करील निर्मळ सण,
हिरवाईचं सजेल बन,
एवढे श्रेय तुला रगड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!!

- स्वप्निल चाफेकर, ८ / ११ / २०१५
( कविवर्य विंदांच्या 'माझ्या मना बन दगड" वरून प्रेरित )
******************************

दिपावली की शुभ घड़ी,
झूमकर आयी  है बड़ी,
भर ले खुशियाँ दामन में,
माँ लक्ष्मी तेरे द्वार खड़ी ....
निर्मला सोनी.

******************************
दिवाळी दिवाळी दिवाळी दिवाळी।  
 निराळी निराळी निराळी निराळी  ।।

सुगंधात न्हालो.. प्रफुल्लीत  झालो।  
सकाळी सकाळी सकाळी सकाळी ।।

कधी मैफली रागदारी पहाटे ।      
 भुपाळी   भुपाळी भुपाळी भुपाळी ।।

करंजा नि चकली..पुन्हा सांज झाली।
फराळी फराळी फराळी फराळी ।।

उकाडा जरासा..परी ही दिवाळी ।    
हिवाळी हिवाळी हिवाळी हिवाळी ।।

 - शेख इक़्बाल मिन्ने
******************************
दिवाळी
आकाशीच्या तारका आज
आल्या नाचत  इथे भुईवर
 ऊतरल्या  लक्षलक्षदिव्यात
 सोबतीला लक्ष्मीचा वावर।

सळसळ रेशमी वसनांची
रंगावली शोभे डौलदार
देखणी वस्र जरीकाठी
प्रसंन्नस  हसतय घरदार।

माणसां माणसांत प्रेमरज्जू
 रुढी ओवाळणीची बांधते
 दूरावलेले बहिण बंधू नाते
नव्याने पुन्हा फुलू लागते।

दिवाळीचा आशीर्वाद मिळो
प्रत्येक घरी ऊजळो ज्योती
तम निराशेचा विरून जावो
फळो फुलो शिवारी माती।
अंजना कर्णिक.
******************************
लक्ष्मी माता चतुर्भुज
आशिर्वाद देती झाली..!
आनंद सण दिपावली,
सुखसंमरूद्धी घरी आली..!!
✏ - - - - - - - जी.पी...
******************************
चरण शब्दाने जरा
संभ्रम झाला मनी  ।
व्यक्त करतो आभारा
उत्तर आले झणी।।
जयंत
******************************
खुपच शिघ्र रचले कवण
न लागता एक क्षण
नवनित जणू कविंचे मन
परि तितकेच ते कठीण
अरविंद कुलकर्णी
******************************
काही नसते बरे
कवींना कठीण
क्षणातच रचति
अनेक कवन
नासा
******************************
वाहती गंगा दारी आसता
समर्पक जीवन अर्पावे..!
उजळून घ्यावा देह तेवढा,
शब्दांच्या जगी किर्तीवंत व्हावे..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************
ना सा आमचा हिरा कोहिनूर
त्यांच्या लेखणीचा अजब नूर
कविता असो कि लेख असो
 बातमीपत्राचा तर वेगळाच जोर
अरविंद कुलकर्णी
******************************
शब्दाचे मोती वेचू जाता
सापडले शब्द धन हिरेजडीत..
शब्दांचीया जाता गावोगावी
सापडली मित्ररुपी सोन्याची वात..!!
✏ - - - - - - - - जी.पी
******************************
माझ्या ईच्छा अनेक
माझे स्वप्न अनेक
परंतु दैव योगाने
मी बनलो शिक्षक
नासा
******************************
नशीबाचा खेळ भारी
तुम्हा घडली पंढरी..!
आम्ही जगता जगतो
घेवुन कांबळी शेतशिवारी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************
कुष्ठरोगी हीच होती
माझी पंढरी
आशिर्वाद त्यांचा घेउन
आलो येथवरी
अरविंद कुलकर्णी
******************************
स्वप्नाळू मिळणे गुरु
लक्षण हो भाग्याचे।
पिढी घडविण्याचा मेरु
पेलणे असे कष्टाचे।।
जयंत
******************************
करीता मनोभावे सेवा
लाभला प्रसादाचा मेवा..!
पाहिला देव माणसातील,
जडजीवा उद्धरीले देवा..!!
✏ - - - - - जी.पी.
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
मात्र विकास बाकी खुंटतो।
जयंत
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
दुःख डोंगर उभा ठाकतो..!!
G P
******************************
पीडीतांचि सेवा केली,
दुरितांना दिला आधार,
जनसेवा केलीत आपण,
म्हणुनी ईश्वर मानीती आभार .

       संदीप,नांदेड .
******************************
करीता मनोभावे सेवा
लाभला प्रसादाचा मेवा..!
पाहिला देव माणसातील,
जडजीवा उद्धरीले देवा..!!
✏ - - - - - जी.पी

******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
जीव कलेचा गुदमरतो
उत्कर्ष
******************************
कलेला वाव मिळाला,
तर आविष्कार घडतो,
मुस्कटदाबी केली तर,
जीव कलाकाराचा की हो तुटतो.
         संदीप, नांदेड
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
सत्याचे वर्मा घाव बसतो...!!
G P
******************************

सेवाभाव आपुल्या ध्यानीमनी,
काय सेवेत अन् काय सेवानिवृत्त,
नदीचा धर्म अविरत वाहण्याचा,
करितें ना दूजाभाव बाल ना वृद्ध .
 संदीप,नांदेड.
******************************

कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो ।
मुस्कटदाबी केली तर
मन - उपवास घडतो॥
          डाॅ. शरयू शहा.
******************************

पावसाने खेळली अशी खेळी,
बळी ठरला दुष्काळाचा बळी,
फास घेवू की घेवू  मी  जहर,
रे कशानं जगवू तान्ही बाळी....
निर्मला सोनी.
******************************
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण ।
सांभाळत सारे व्रण
परीक्षाच सोबतीण ॥
             शरयू शहा.
******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
चिंता कशाला उद्याची,
हसतच जगावे जीवन ....
निर्मला सोनी.
******************************
कधी असावी शिदोरी जवळी
सतत असावा तूंच अंतरी
तुझ्या संसाराची रित निराळी
भाव भक्तीचे नाम बरोबरी
कुंदा पित्रे

******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
पूर्ण करण्या अपेक्षा,
नित्यचि मनी दडपण.
  🌺🌺 संदीप धोंडगे,नांदेड .
******************************
माझ्या तनामनांत तू,
माझ्या हर क्षणांत तू,
किमया ही गं प्रीतीची,
माझ्या कणाकणांत तू....
निर्मला सोनी.
******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
त्यानाच होतो त्रास
तेच जगतात खरे जीवन
नासा
******************************
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
मी माझे, तूं तुझेपण
जावो,येवो खरेपण
कुंदा पित्रे

******************************

Wednesday, 11 November 2015

" माझी फ़ेसबुक कहाणी "

नाही मिळत आमच्या पोस्ट ला जास्त  LIKE
म्हणून आम्ही वापरतो आत्ता MASSENGER  HIKE

आमच्या पोस्टला मिळतात फार  कमी COMMENT
जसे काही आम्ही WALL वर वापरलाय अंबुजा CEMENT

त्यांच्या पोस्ट ला करतात आम्हांला TAG
जणू काही आमच्या हातात त्याचा  FLAG

आवडली पोस्ट की करतात मात्र SHARE
विचार करीत नाहीत की आहे का आपल्या NEAR
😊 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 😊

सहज सुचलं म्हणून . . . . . . . . . . .

Tuesday, 10 November 2015

दैनिक देशोन्नती च्या दिवाळी 2015 विशेष अंकात माझी
" नावाची लक्ष्मी " कथा
प्रकाशित झाली आहे. तेंव्हा जरूर वाचावे.
जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली 
ता. धर्माबाद जि. नांदेड 
येथील विद्यार्थ्यानी शिक्षक मंडळींना दिलेल्या शुभेच्छा . . . . ! 












Monday, 9 November 2015

शिक्षकाच्या हातात खडु द्या : लेख 
कै. विजय नकाशे यांना समर्पित


दिवाळी 2015

Sunday, 8 November 2015

http://lokpatra.in/wp-content/uploads/2015/11/48.jpg

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - नासा