नागोराव सा. येवतीकर

Thursday, 12 November 2015

** साहित्य मंथन ** या whatsapp ग्रुप वर
दिवाळी निमित्त जमलेली काव्यमैफल
दिनांक 12 नोव्हेंबर 2015

******************************
लक्ष दिव्यांनी  आसमंत व्यापले,
उजळली धरणी न् अंबर झाकले,
आनंद असा घेवून आली दिवाळी,
उधाण सर्वांच्या जीवनास आले ....
निर्मला सोनी.
******************************
माझ्या फुप्फुसा बन दगड..
माझ्या फुप्फुसा बन दगड...

अटळ आहेत फटाके सारे,
सढळ आहेत ते फोडणारे
पिचणाऱ्या पिचशील किती,
खोकत खोकत जगशील किती
थांबव हृदयाची धडधड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!

कशासाठी काढतोस घाण,
रक्तामध्ये भरतोस प्राण
सगळीकडे धूर, जाळ
अजुन तगशील किती काळ ?
पर्वा तुझी करतो कोण ?
झाडे-बिडे लावतो कोण ?
थांबव आकुंचन-प्रसरण,
माझ्या फुप्फुसा दगड बन...!!

नरकासुरास मारल्यानंतर कुणी केलं दारूकाम ?
फुटले होते का फटाके, वनवासातून येता राम ?"
काssही काssही विचारू नकोस,
धर्मा-बिर्मात शिरू नकोस
बुद्धी त्यांना आहे खूप,
तुलाच लावतील मोठ्ठं कुलूप !
प्राणवायूची नळकांडी,
घेऊन फिरतील पाठीवरती
शोधतील यंत्र श्वास घ्यायला,
नको राहूस ते पहायला
तूच सोड आपला गड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!

ऐक बॉम्ब, ऐक माळा,
कानामधला फेकून बोळा,
ऐकून घे अंतिम आवाज,
पाहून जा पैशाचा माज
त्यांचेच पहा फुटतील कान,
रक्त ओकून जातिल प्राण
जगून तरी करतील काय ?
खाली डोकं वर पाय !
शिकूनसुद्धा नाहीत सुजाण,
विवेक इथे पडला गहाण
अशा जगी कशासाठी,
जगण्याची ही आटाआटी ?
फक्त एकदा कर आक्रोश,
दाखवून जा सारे दोष
ऐकून तुझी व्यथा खरी,
शपथ वाहील कुणीतरी
साजरा करील निर्मळ सण,
हिरवाईचं सजेल बन,
एवढे श्रेय तुला रगड,
माझ्या फुप्फुसा बन दगड...!!!

- स्वप्निल चाफेकर, ८ / ११ / २०१५
( कविवर्य विंदांच्या 'माझ्या मना बन दगड" वरून प्रेरित )
******************************

दिपावली की शुभ घड़ी,
झूमकर आयी  है बड़ी,
भर ले खुशियाँ दामन में,
माँ लक्ष्मी तेरे द्वार खड़ी ....
निर्मला सोनी.

******************************
दिवाळी दिवाळी दिवाळी दिवाळी।  
 निराळी निराळी निराळी निराळी  ।।

सुगंधात न्हालो.. प्रफुल्लीत  झालो।  
सकाळी सकाळी सकाळी सकाळी ।।

कधी मैफली रागदारी पहाटे ।      
 भुपाळी   भुपाळी भुपाळी भुपाळी ।।

करंजा नि चकली..पुन्हा सांज झाली।
फराळी फराळी फराळी फराळी ।।

उकाडा जरासा..परी ही दिवाळी ।    
हिवाळी हिवाळी हिवाळी हिवाळी ।।

 - शेख इक़्बाल मिन्ने
******************************
दिवाळी
आकाशीच्या तारका आज
आल्या नाचत  इथे भुईवर
 ऊतरल्या  लक्षलक्षदिव्यात
 सोबतीला लक्ष्मीचा वावर।

सळसळ रेशमी वसनांची
रंगावली शोभे डौलदार
देखणी वस्र जरीकाठी
प्रसंन्नस  हसतय घरदार।

माणसां माणसांत प्रेमरज्जू
 रुढी ओवाळणीची बांधते
 दूरावलेले बहिण बंधू नाते
नव्याने पुन्हा फुलू लागते।

दिवाळीचा आशीर्वाद मिळो
प्रत्येक घरी ऊजळो ज्योती
तम निराशेचा विरून जावो
फळो फुलो शिवारी माती।
अंजना कर्णिक.
******************************
लक्ष्मी माता चतुर्भुज
आशिर्वाद देती झाली..!
आनंद सण दिपावली,
सुखसंमरूद्धी घरी आली..!!
✏ - - - - - - - जी.पी...
******************************
चरण शब्दाने जरा
संभ्रम झाला मनी  ।
व्यक्त करतो आभारा
उत्तर आले झणी।।
जयंत
******************************
खुपच शिघ्र रचले कवण
न लागता एक क्षण
नवनित जणू कविंचे मन
परि तितकेच ते कठीण
अरविंद कुलकर्णी
******************************
काही नसते बरे
कवींना कठीण
क्षणातच रचति
अनेक कवन
नासा
******************************
वाहती गंगा दारी आसता
समर्पक जीवन अर्पावे..!
उजळून घ्यावा देह तेवढा,
शब्दांच्या जगी किर्तीवंत व्हावे..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************
ना सा आमचा हिरा कोहिनूर
त्यांच्या लेखणीचा अजब नूर
कविता असो कि लेख असो
 बातमीपत्राचा तर वेगळाच जोर
अरविंद कुलकर्णी
******************************
शब्दाचे मोती वेचू जाता
सापडले शब्द धन हिरेजडीत..
शब्दांचीया जाता गावोगावी
सापडली मित्ररुपी सोन्याची वात..!!
✏ - - - - - - - - जी.पी
******************************
माझ्या ईच्छा अनेक
माझे स्वप्न अनेक
परंतु दैव योगाने
मी बनलो शिक्षक
नासा
******************************
नशीबाचा खेळ भारी
तुम्हा घडली पंढरी..!
आम्ही जगता जगतो
घेवुन कांबळी शेतशिवारी..!!
✏ - - - - - - जी.पी
******************************
कुष्ठरोगी हीच होती
माझी पंढरी
आशिर्वाद त्यांचा घेउन
आलो येथवरी
अरविंद कुलकर्णी
******************************
स्वप्नाळू मिळणे गुरु
लक्षण हो भाग्याचे।
पिढी घडविण्याचा मेरु
पेलणे असे कष्टाचे।।
जयंत
******************************
करीता मनोभावे सेवा
लाभला प्रसादाचा मेवा..!
पाहिला देव माणसातील,
जडजीवा उद्धरीले देवा..!!
✏ - - - - - जी.पी.
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
मात्र विकास बाकी खुंटतो।
जयंत
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
दुःख डोंगर उभा ठाकतो..!!
G P
******************************
पीडीतांचि सेवा केली,
दुरितांना दिला आधार,
जनसेवा केलीत आपण,
म्हणुनी ईश्वर मानीती आभार .

       संदीप,नांदेड .
******************************
करीता मनोभावे सेवा
लाभला प्रसादाचा मेवा..!
पाहिला देव माणसातील,
जडजीवा उद्धरीले देवा..!!
✏ - - - - - जी.पी

******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
जीव कलेचा गुदमरतो
उत्कर्ष
******************************
कलेला वाव मिळाला,
तर आविष्कार घडतो,
मुस्कटदाबी केली तर,
जीव कलाकाराचा की हो तुटतो.
         संदीप, नांदेड
******************************
कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो
मुस्कटदाबी केली तर
सत्याचे वर्मा घाव बसतो...!!
G P
******************************

सेवाभाव आपुल्या ध्यानीमनी,
काय सेवेत अन् काय सेवानिवृत्त,
नदीचा धर्म अविरत वाहण्याचा,
करितें ना दूजाभाव बाल ना वृद्ध .
 संदीप,नांदेड.
******************************

कलेला वाव मिळाला
तर आविष्कार घडतो ।
मुस्कटदाबी केली तर
मन - उपवास घडतो॥
          डाॅ. शरयू शहा.
******************************

पावसाने खेळली अशी खेळी,
बळी ठरला दुष्काळाचा बळी,
फास घेवू की घेवू  मी  जहर,
रे कशानं जगवू तान्ही बाळी....
निर्मला सोनी.
******************************
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण ।
सांभाळत सारे व्रण
परीक्षाच सोबतीण ॥
             शरयू शहा.
******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
चिंता कशाला उद्याची,
हसतच जगावे जीवन ....
निर्मला सोनी.
******************************
कधी असावी शिदोरी जवळी
सतत असावा तूंच अंतरी
तुझ्या संसाराची रित निराळी
भाव भक्तीचे नाम बरोबरी
कुंदा पित्रे

******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
पूर्ण करण्या अपेक्षा,
नित्यचि मनी दडपण.
  🌺🌺 संदीप धोंडगे,नांदेड .
******************************
माझ्या तनामनांत तू,
माझ्या हर क्षणांत तू,
किमया ही गं प्रीतीची,
माझ्या कणाकणांत तू....
निर्मला सोनी.
******************************
जया अंगी मोठेपण,
तया यातना कठीण,
त्यानाच होतो त्रास
तेच जगतात खरे जीवन
नासा
******************************
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
मी माझे, तूं तुझेपण
जावो,येवो खरेपण
कुंदा पित्रे

******************************

No comments:

Post a Comment