नागोराव सा. येवतीकर

Monday, 21 December 2015

** विचार मंथन **
विषय : सख्खे शेजारी 



सुलभा कुलकर्णी, बोरीवली मुंबई 



जयश्री पाटील, वसमत 



========================================================
साहित्य मंथन
लेख स्पर्धा: सख्खे शेजारी!!
"शेजारधर्म," "निंदकाचे घर असावे शेजारी", "शेजी बाई शेजी बाई तू माझी आई ताई", असे शब्दप्रयोग आपण सर्रास करतो. अडचणीला प्रथम धावतो तो शेजारी मग रक्ता नात्याचे म्हणून शेजारी हक्काचे ! या न्यायाने आपण शेजार धरून ठेवायचा प्रयत्न करतोच. कधीअगदी शेजारी गुळपीठ  जमते . तर कधी छत्तिसाचा आकडा!
मलाही दोन्ही अनुभव आले.
माझ्या वडीलांची तत्वाला ठाम राहायची वृत्ती! तडजोड स्वभावातच
नाही! म्हणून अनेक नोकर्‍या सुटल्या, नव्या धरल्या व प्रतिवर्षी वनी विटी नराज्य या न्यायानी नवंगांव नंव घर! मला जेथपासून लहानपण आठवत तेव्हापासून ते मॅट्रिक होईयर्यंत म्हणजे १ली ते ११ वी अशा ६ शाळा झाल्या. तेव्हडीच गावे शहाराष्र्टात फिरलो. त्या पैकी एक अजूनही लक्षांत राहीलेला शेजार म्हणजे, सातारारोड कुपर इंजिनीयरींग येथील कर्मचारी वसाहतीमधला भावसारांचा शेजार! प्रकाशदादा, मझ्या बरोबरीची,  बरोबरच रोज शालेला येणारी गीता आणि भावसार काका काकू! "समसमा संयोग झाला" असं म्हणतात.आमचही कौंटुबीक नात जडल याला कारण बाबा व भावसार काका आणि मी व प्रकाशदादा यांची निसर्ग व घरासमोर मागच्या पुढच्या अंगणात येथेच्छ बाग बगीचा फुलवण्याची आवड! भावसार काकांना शेतीचं बागकामाचं चिंगलज्ञान होतं कारणं त्यांची नोकरी बरोबरच स्वत:ची शेतीपण होती. आणि मला तरफुलं झा प्राणी ,बगिचा, भाजीपाला लावणे याची प्रचंड आवड!
सातारारोडचाला या हौसिंग सोसायटीच्या घरासमोर व मागेही भलमोठ पसरलेल व कुंपण असलेलच अंगण!
 बैठ घर! मग काय! झाली आमची जमिन खोदाई, खतं माती घालणी, रोपं लावणी, पाणी चढवणीला सुरवात. त्यातच शेजारचं अंगण व परसदार सुगंधी फुलवेली, फळभाज्यांच्या वेलांनी डवरलेलं! शिवाय दोन्ही घरच्या तट्याच्या कुंपणाखालून  मांजरीच्या पिल्लावळींची ये- जा! आणि अंगणा बाहेर देखण्या कुत्र्याचं सदैव दर्शन! आणखी काय हवं! माझे पाय सारखे सारखे भावसारांच्या बागेत वळायचे! वडीलांनाही बागेसाठी काका स्वत:हून मार्गदर्शन करू लागले . कोणती रोपं कुठे लावावी, जात कशी तपासावी, पाणी किती घालावं, खत किती व कोणतं वापरा, किड व बुरशी  लागली तर काय करावं! एक न दोन! त्यांच्या मदतीने आमचं अंगण बहरलं.सुगंधी झालं घरची ताजी भाजी मिळू लागली. आणि मग सुरू झाली  ती घरच्या पदार्थांची , गोडाधोडाची सणासुदिला फराळाची देवाणघेवाण! नंतर दोन कुटूंबातील मुलाचेवाढदिवस साजरे करणं  रक्षाबंधन, ओवाळणी अंगत पंगत अशी धमाल! फारछान मनमिळाऊ काक काकू आणि प्रकाश गीता तर काय माझे बहीण भाऊच झाले माझे. कारण
मला कोणी भावंडच नाही नं!
पण हे सुख खूप नाही टिकल! २-३ वर्षातच वडीलांच्या हेककेखोर स्वभावामुळे,' कुपर इंजिनियररींगच्या ' व्यवस्थापनेशी वाजलं आणि त्यांची नोकरी व आमच ते हिरवगार बहरलेले घर  व मनमिळाऊ असा प्रेमळ शेजारही सुटला. लहान शाळकरी वय!  आई वडिलजातील तिथे जायचं! काही वर्ष नंतरही संबंध राहीले. आलो गेलो परस्परांकडे! पण..... विचवाच घर पाठीवर या न्यायाने माझी व आईची फरफट गावोगाव
चालूच राहिली. अनेक
शेजार व शाळा बदलल्या मैत्रिणी तुटल्या, नव्या जोडल्या.
या सार्‍याप्रकाराला कंटाळून आईनी हिंगणे स्री शिक्षण संस्थेच्या वसतीगृहावर मेट्रन म्हणून नोकरी धरली व आम्ही पुण्यात आलो. पुन्हा एकदा नवीशाळा!नवं घर! सोमवार पेठेतल्या एका वाड्यात एका खोलीची भाड्याची जागा मिळाली.तेंव्हा मी ७वी  ८ वी मधे मी असेन बहूदा!पुण्यातराहायलाआल्याचाआनंद होता कारण येथे मावश्या व मावस भावंड होती शहरात! शाळाही चांगली !
पण..... या घरात आई नव्हती! तिला वसतीगृहातच राहणं भाग होत.मग सुरूझाला आम्हा बाप लेकीचाच संसार!! घरची सारी जबाबदारी, घरकाम , आलंगेलं ,शाळा बाजारहाट,स्वयंपाकपाणी
सारच माझ्या अपरिपक्व खांद्यावर येऊन पडलं!
आणि अशा वेळी माझ्या मार्गदर्शनाला  सोबतीला मदतीला आले सख्खे दोन शेजारी! खोलीच्या ऊजव्या बाजूला जडे काका काकू, त्यांनी ऊतारवयात झालेली कन्या मिनाक्षी ऊर्फ कमा , ही साधारण माझ्या बरोबरीची व तिच्या आत्याबाई आणि दुसरा शेजार म्हणजे आक्का ऊर्फ फडके काकू , दादा म्हणजे फडके काका  व विजयदादा ऊर्फ आख्या वाड्याचा विज्या!
या दोन कुटूंबांच्या सर्वच चालीरिती ,वर्ण, शिक्षण  वागणूक,यां सर्वात जमिन अस्मानाच अंतर! वर्णात म्हणात तर  एक काळे व लख्ख गोरे! पण दोन्ही कू
========================================================
🌷विचारमंथन🌷
     आपण जन्माला येताना अनेक ऋण घेऊन जन्माला येतो. त्यात समाज ऋण हे अतिशय जबाबदारीचे ऋण आहे. ज्याची देवाणघेवाण ही आपल्या शेजाऱ्यांशी आपण अविरतपणे करत असतो. ती देवाणघेवाण किती निकोप आणि सशक्त आहे,हे दोघांच्याही स्वभावावर अवलंबून असते. ही देवाणघेवाण अनेक प्रकारची असू शकते. जसे की,विचारांची,वस्तूंची उसणवारीची,आर्थिक,मानसिक...इ.इ.दोन्ही शेजाऱ्यांचे संबंध हे त्यांच्या अनौपचारिकतेवर अवलंबून असतात.
  प्रत्येक धर्माचे मूळ सूत्र हेच आहे की,शेजाऱ्यावर प्रेम करा. याचा व्यंगार्थ अनेकानी लावला. पण या जगात निखळ प्रेमाइतके काय शाश्वत आहे.मानवी जीवनात शेजारधर्म किती महत्वाचे आहे!कारण प्रत्येक सुखदुखाचे पहिले वाटेकरी हे आपले शेजारीच असतात न!
आपण घराबाहेर जाताना घराला कुलूप लावतो. मला वाटते,घराचे रक्षण कुलूप नाही तर शेजारी करत असतो. कुलूप तर चोराला हेच सांगत असतो की 'घरात कोणी नाही,ये अन काय न्यायचे ते निवांत ने'. पण आपल्या कुलूपबंद घरासमोर कोणी उभे जरी राहिले तर,'काय काम होत?' ..... ??अशा अनेक प्रश्नाची सरबत्ती करून नवीन माणसाला भंडावून सोडतो. पण ही ग्रामीण भगातील संस्कृती अनेक चांगल्या बाबीसारखी आज लोप पावत चालली आहे. मोठ्या शहरात तर फ्लॅटसिस्टीममुळे अशी शेजार संस्कृती फ्लॅटच झालेली दिसते.पण ग्रामीण भागात अजूनही शेजारधर्म पाळला जातोच!माझी जडणघडण ग्रामीण भागात झालेली असल्याने याचे चांगले अनुभव माझ्या पदरात आहेत.प्रत्येकाच्या घरात शिजलेल्या वेगवेगळ्या भाज्या,नवनवीन पदार्थ एकमेकांच्या घरी आधी जायचे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आमच्या जेवणात वैविध्यता असायची,जेवणात सकसपणा यायचा! जरासं घरात कोणाचे दुखले की सगळेजण भराभर जमा व्हायचे अन ते दुखण क्षणात कमी झाल्यासारखे वाटायचे. कारण म्हणतातच ना,"दु:ख व्यक्त केले की त्याची तीव्रता कमी होते."आनंदाचीही तीव्रता अशी शेजाऱ्यांशी व्यक्त केल्यानेच वाढायची! 
    माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकट्याने राहू शकत नाही हेच खर!म्हणून शेजारी हे सख्खे शेजारीच असावेत. त्यात हेवेदावे ,रुसवेफुगवे हे क्षणिक असावेत.आपल्या घरी आजी नसली तरी शेजारची आजीच आसपासच्या लेकराना बोलावून गोष्टी सांगायची,त्यातून तशा वृध्द लोकानाही त्यांचा वृध्दापकाळ जड जायचा  नाही अन आमच्या सारख्या लेकरांवर अनौपचारिकपणे संस्कारही व्हायचे. पण आता' 'गेले ते दिवस अन उरल्या त्या गोड आठवणी'
   - संगीता देशमुख
वसमत
========================================================
 विचारमंथन -भाग - 35 वा.
विषय  -- सख्खे शेजारी
प्रेषक --  कुंदा पित्रे
===================
माणसांच जीवन नदीसारखी वळणे घेत वाहात असतं ! जिथे जाल तिथे निरनिराळी माणसे भेटतात.त्यांचे चांगले वा विचित्र अनुभव येत असतात.मला जेव्हा जेव्हा अशा माणसाचे अनुभव आले ते तसे कोणी सख्खे शेजारामध्ये मोडणारे नव्हते त्यांचे मला आलेले अनुभव कथन करते.गावाला असताना.माझे मी पंथरा वर्षाची असताना गेले. आम्ही गावातले प्रतिष्ठित. चांगल रहाणीमान ! दोन घर सोडून दुकानदार रहात .बेताचे रहाणीमान परंतु प्रथमच  ऋषिपंचमीचा उपवास आला त्यावेळी त्या दुकानदारच्या बायकानी सारं फराळाचे पाठविले.म्हणजे तुपाची वाटी दह्याची वाटीपासुन सजविलेले ताट आजतागायत माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. इतकी निगुति म्हणजे सख्खे शेजारीच ना ! दुसरे मुंबईस आल्यावर मी शिक्षण घेतले. आमच्या चाळीत गरीब बाई होत्या त्या लहान मुलांच्या शिकवण्या करायच्या.मला वर्गाबरोबर इंग्रजी आणायचे असल्याने मी तिथे सतत बसून ते करून माझा इतरही अभ्यास पुर्ण करी.आजचे शिकविण्याचे तास व पध्दति पाहिली की ती बाई किती समंजस ,पैशाची अपेक्षा न 
ठेवणा-या ,मला हवा तितका वेळ देणा-या होत्या. पुन्हा हसतमुख केव्हाही डिफिकल्टी 
सोडविणा'-या होत्या. हाही  शेजारधर्म नांव हे माझे मत.
मी चाळीत रहात होते तिधे वयस्कर जोडपे होते त्यांना मुलबाळ नव्हते. मी काॅलेजचा अभ्यास करताना त्यांच्याकडे केव्हाही म्हणजे रात्रीसुध्दा अभ्यासाला जाऊन बसे पण किती सहिष्णु वृत्ती !नेहमीच हसतमुखाने चहा देत.मी सासुरवाशिण आहे हे वाटलेच नाही हा धर्म कोणता ? मी हे माझे सख्खे शेजारीच मानते.
दादरला रहायला आले ऑफिसला जाताना रस्ता क्राॅस करताना मला गाडीने उडविले.सकाळची वेळ खिडकीतून ज्या बायकानी पाहिले त्या धाडधाड रस्त्यावल आल्याच शिवाय शेजारच्या पाणी घेऊन आल्या सांगण्याचे कारण सारे दोन दोन कारवाले फक्त माझीच कार नव्हती मी नोकरीवाली ते सारे बिझीनेसमन पण तरीही सारे थावले हे काय आहे ?शेजार सख्खा !! 
अलिकडेच माझा डावा हात घरीच पडून फ्राॅक्चर झाला घरी कोणी नव्हते .आमची तशी हाॅस्पिटलमध्यै ओळख नव्हती .ज्या मुलीला फ्राॅकात पाहिले ती डाॅक्टर झाली होती ती जवळच रहाते शेजारच्यांची मुलगी तिवा जस्ट फोन केला तिने ताबडतोब प्राॅपर मित्राला केस सांगितली त्यांने पुढचे भराभर उरकले कारण कोपराचा चुरा झाला होता.ऑपलेशनही त्याच डाॅक्टरने केले .सक्सेफुल झाले तेव्हा प्रचंड धावपळ करणारी ती छोटी डाॅक्टर पण मन मोठे असणारी व त्यावेळी ऑपरेशन नंतर मला जेवण भरविणा-या वरच्या मजल्यावर रहाणा-या मला मोठ्या भगिनी प्रमाणे असणा-या वहिनी ही माणसे कोण ?त्यांना देखील  त्यांचे व्र्याप असतातच की, !  म्हणूनच अंगचुकारपणा न करता जे धावूषन जातात.त्याना मी नात्यापेक्षा सख्ख मानते .वेअर् होऊन गेलेय आता इथेच थांबते.!
काव्याच्या ओळी सुचत आहेत पण थांबते
कुंदा पित्रे
🌺🌺🌺
========================================================










1 comment: