नागोराव सा. येवतीकर

Friday, 27 November 2015

काव्य मंथन अंतर्गत आजचा चारोळी स्पर्धेचा विषय आहे -असहिष्णुता.
1. स्पर्धा ठीक 10 वाजता सुरू होईल व शेवट साय. 7 पर्यंत चालेल.
2. स्पर्धे दरम्यान चारोळी व्यतिरिक्त इतर कोणत्याही पोस्ट टाकू नये.
3. चारोळीत संबंधीत शब्द असावा व चारोळी अर्थपूर्ण असावी.
4. स्पर्धेतील चारोळीमुळे एखादया व्यक्ती,जात अथवा धर्माच्या भावना दूखावल्या जाणार नाहीत,अशीच चारोळी 
पोस्ट करण्यात यावीत,याची सर्वानी खबरदारी घ्यावी.
5. सर्व साहित्य मंथन परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून येथेच्छ आनंद लुटावा.
     धन्यवाद.🙏
       🌺🌺🌺संदीप पाटील,नांदेड.
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'सहिष्णुत्व '  यापरी काय हो वायले?
जयंत देशपांडे 
अहमदनगर
***************************************

🇮🇳 मी भारतीय 🇮🇳
माझा भारतीय असण्यावर 
आज शंका घेतली जात आहे 
मी भारतीय आहे हे जगाला
ओरडून सांगावे लागत आहे 
          - ना. सा .
***************************************
विचीत्र सवयी विचीत्र व्यसने,
किती सहावे शरिरात्म्याने.
तया शिणवीता,छळता छळता,
असहिष्णूता मग ये ओघाने.
कितीक चुकतो स्वत:हि आपण,
सोडत नाही कुणीहि मी पण.
दाखवितो शरिरात्मा मग इंगा,
असहिष्णूता त्याचीच ही पण.

डॉ.सुधीर अनंत काटे,निगडी,पुणे
***************************************
चारोळी स्पर्था
सहिष्णूता

  आर्य चाणाक्य वदले होते     एक सत्य,
  'केंद्रशासन जेधवा होते देशी समर्थ,
चोर पुढारी ढोंगी म्हणताती
'सारे व्यर्थ!
'सहिष्णूता लयास गेली हो'
बोलती असत्य!
©अंजना कर्णिक,मुंबई
***************************************

💥💥साहित्यमंथन 💥💥
                       आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼

🌍चारोळी  स्पर्धा 🌎
================
📢📢असहिष्णुता📢📢
================
सहिष्णुता की असहिष्णुता
माणसा तुझा खरा धर्म कोणता
तू जागव आतंरिक मनाची मानवता
त्या शिवाय पर्याय नसे बा आता
           🎯🎯🎯
        आप्पासाहेब सुरवसे
             लाखनगांवकर

***************************************
जिथे खातो तिथे छेद करतो 
जाणता असो अजानता 
सोसतो यांचे नखरे  ,पुन्हा
आमचीच होते असहिष्णूता
* अरविंद कुलकर्णी 
(स्पर्धेसाठी नाही )
***************************************
बलीदान त्या शुरांचे
दवडू नकाच फोल।
गाफील राहू नका रे
सहिष्णूतेचे बडवून ढोल।
©अंजना कर्णिक
***************************************
🔔  असहिष्णुता 🔔
गावागावात अन् घराघरात 
आज असहिष्णुता लपलेली आहे 
अच्छे दिनच्या शासनात
सहिष्णुता जणू संपली आहे . . . ? 
          - ना. सा.
***************************************
स्पर्धैसाठी

बधुभाव हा भारतभू चा असे   अमोल अलंकार,
अन ,'अतिथी देवो भव' हा असे आमुचा संस्कार,
परधर्मी वा परदेशींना मिळे
 परीपूर्ण सहकार,
तरी कृतघ्न , ढोंगी म्हणती,
इथे असहिष्णूता फार।
©अंजना कर्णिक
***************************************
स्पर्धैसाठी
माझ्या देशीचे लोकशासन असहिष्णू जर तुम्हास वाटे
खुशाल करावे हो देशाट्टन
हेच योग्य जनमनास वाटे!

©अंजना कर्णिक
***************************************
💥💥साहित्यमंथन 💥💥
                      आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼

🌎🌎चारोळी स्पर्धा🌍🌍
===============
🔫🔪असहिष्णुता🔪🔫
============
या भारत देशात आहे लोकशाही 
बरी नाही ती लष्करी नि हुकुमशाही
नाहीतर माजेल सर्वत्र अराजकता
नव्हे वाढतील दंगली नि असहिष्णुता
         🎯🎯🎯
      आप्पासाहेब सुरवसे
        लाखनगांवकर
***************************************
💥💥साहित्यमंथन💥💥
                    आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼

🎌🏆चारोळी स्पर्धा🏆🎌
================
📚📚असहिष्णुता📚📚
===============
असहिष्णुता म्हणजे तरी काय ?
होई वाटोळे नि विध्वंस दुसरं काय.
म्हणून सरकार राबवी मूल्यशिक्षण 
त्यात असे सर्व धर्म समभावाची शिकवण
     ✏🎯🎯🎯✒
     आप्पासाहेब सुरवसे
         लाखनगांवकर
***************************************
💥💥साहित्य मंथन 💥💥
                       आयोजित
🎼🎼काव्यमंथन🎼🎼
📘📕चारोळी स्पर्धा📔📓
==================
🔪🔫असहिष्णुता🔫🔪
==================
मज देशा गरज ती सहिष्णुतेची
परी भाऊगर्दी झाली असहिष्णुतेची
तया साठी व्हावे वैचारिक परिवर्तन
यासाठी राबवी उपक्रम साहित्यमंथन
        ✒🎯🎯🎯✏
       आप्पासाहेब सुरवसे
            लाखनगांवकर

***************************************
💥💥असहिष्णुता 💥💥

उसळल्या येथे कधी जातीय दंगली,
दुखावल्याही आहेत धार्मिक भावना,
बळावली अनेकदा समाजात असहिष्णुता,
तरी जगात दुसरा महान भारत देश गावेना.

                  🌺🌺    संदीप,नांदेड .
***************************************
स्पर्धेसाठी:-

असहिष्णुतेचे वारे जेव्हा घरादारात पसरले,
सहिष्णुता दुषित झाली हे तेव्हा कळले ,
विकास भारताचा पोहोचला साता समुद्रापार, 
मात्र विचारांच्या वावटळीत जनमत अडकले ....

निर्मला सोनी.
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'सहिष्णुत्व '  यापरी काय हो वायले?

जयंत देशपांडे 
अहमदनगर
***************************************
जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'असहिष्णता '   कशी हो म्हणू याले?

जयंत देशपांडे 
अहमदनगर
***************************************

💫💫💫💫💫💫💫
✨✨✨✨✨✨✨
साहित्य मंथन चारोळी स्पर्धा


मूल्य अन् संस्काराचे धडे
मिळतात ईथल्या या मातीत
असहिष्णुतेचा कलंक नको
ज्योत पेटवा समतेची छातीत
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟



रक्तरंजित ईतिहासाचे 
पून्हा साक्षीदार होवू नका
असहिष्णुतेला देवून थारा
मूल्यांची चिरफाड करू नका
✨✨✨✨✨✨✨

असहिष्णुतेच्या विख डंकाने
कोलमडतील बांधव सारे
विविधता अन् एकतेची
उजडतील घरे दारे
✨✨✨✨✨✨✨

लाख बंडखोर येतील
सहिष्णुता भंग करायला
रोखा तिथेच चिरडा त्यास
जहरी असहिष्णुतेच्या विषाणुला

💫👆💫👆👆👆💫
       🎯  मारुती तु.खुडे
                माहूर,नांदेड
***************************************

जाती धर्माच्या नावावर
जे भडकवतात इथे दंगे....
असहिष्णु त्यांना म्हटले
तर दाखवतात तेच इंगे....

डाॅ.लक्ष्मण उगले
***************************************

👮🏻👲🏻👳🏻असहिष्णुता👨🏼👩🏼👸
               चारोळी स्पर्धा

जे जे आले झाले इथले
धर्मपंथा तयां आचरु लागले
घर 'आपुलेच' समजते झाले
'असहिष्णुता '   कशी हो म्हणू याले?

जयंत देशपांडे 
अहमदनगर
***************************************
अाले किती परकीय आक्रमूनी आमुचेवरी।
झुंजलो बहु राखूनी निज अस्तित्व परी॥

शतकानुशतकांचे होते हेच चक्र जरी।
सामाविले त्या सर्वांशी, सहिष्णुता हीच खरी॥

जयंत देशपांडे
अहमदनगर
***************************************
'क्रांतीवीरां'नी गुंफिली होती 'सोनेरी पाने सहा'।
सहिष्णु हिंदवी मानसिकता पानोपानी पहा ।।
आक्रमणे जितकीही झाली सामावली मातीत ह्या।
वर्धिष्णु जाहली संस्कृती सामावूनी सारा जहाँ ॥
जयंत देशपांडे
अहमदनगर

***************************************
💐💐💐💐💐💐
असहिष्णुतेचा फुटलाय,
म्हणे देशात बॉम्ब.....
यालाच म्हणतात राव,
चोराची उलटी बोंम्ब.....
🔵WARANKAR G🔵
    👉🏼नांदेड👈🏼
💐💐💐💐💐💐💐

***************************************
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर
व्यर्थ करती विचार मंथन...
शेतक-याच्या समस्यांचे
शासन करीत नाही चिंतन....

डाॅ.लक्ष्मण उगले....
***************************************
स्वहितासाठी धर्म ठेकेदार 
लावती धर्माधर्मात भांडण...
प्रजा सोसते त्याचे परीणाम
हे भरतात संपत्तीने रांजण....

डाॅ.लक्ष्मण उगले....

***************************************
स्पर्धेसाठी....

स्वहितासाठी धर्म ठेकेदार 
लावती धर्माधर्मात भांडण....
पसरवून असहिष्णुता इथे
ते स्वताचे भरतात रांजण....

डाॅ.लक्ष्मण उगले....

***************************************
माणुसकीच धर्म खरा,
ओळख तु माणसा रे....
असहिष्णुता जन्म घेइ,
जेथे बंधुभाव मोडला रे...

      @ उत्कर्ष देवणीकर...

👆स्पर्धेसाठी नाही...

***************************************

आचार विचारांच्या लढाईत..
असहिष्णूतेचे वहाती वारे...
माणूसकीशी नाळ तुटली अन्..
धर्मयुद्धाचे पेटती निखारे...

    - सौ.कस्तुरी.
***************************************
सुलभा कुलकणीॅ.मुंबई.
 9930509026.
        साहित्य मंथन.आयोजित.
          चारोळी स्पधाॅ.भाग12.
 विषय असहिष्णुता.
   1)आठव शौयॅ त्या अमरजवानांचे,

       आठव पराक्रम त्या रणरागिणींचा,
      ऐकू येतो ना, आक्रोश भूमातेचा,
     कुणी दिला अधिकार तुवा असहिष्णुतेचा.
  2)जातोस जा परी,
      नको लावू कलंक भूमातेला असहिष्णुतेचा,
     जरा ठेव भान आपुल्या इतिहासाच्या पानांचे,
      दिधला पोटचा गोळा,आहुती दिली कुंकूवाची,
      नकोस ना ! विसरू उपकार आपल्या कमॅभूमीचे.
3)   धमाॅधांना वठणीवर आणणे,
      ही जर असेल असहिणुता,
      तर करा प्रतिज्ञा, घ्या आपुली आण,
     करू या महान आपुल्या भारता.
    4)असहिष्णुतेचा बळी देऊनी,
       वाचवू या आपुल्या देशाला,
     सद्सद् विवेक बुद्धी स्मरूनी,
     महान बनवू या हिंदुस्थानाला.
5)   सहिष्णुतेचा घास गिळूनी नाही गप्प बसला,
       विसरला पायाखालील तृणावता भूमातेला,
       डोईवरच्या स्वच्छ अशा निलांबरीला,
      असहिष्णुतेची कास धराया तू कारे धावला?
***************************************

💣असहिष्णुता 💣

टिव्ही मीडियावर चाललीय गहन चर्चा,
देशात घोंगावतोय असहिष्णुतेचा वारा,
एका वेळेच्या जेवणाची हमी नाही,
जाऊन त्या गरीबांस असहिष्णुतेचा अर्थ विचारा.

   🌺🌺   संदीप पाटील,नांदेड.
      ***स्पर्धेसाठी नाही ***
***************************************
चारोळी स्पर्धा
एका गाली मारली  थप्पड
तर करा पुढे  दूसरा गाल
इथे  ही भुक्कड शिकवण
तरी  म्हणे असहिष्णूच फार
अंजना
***************************************
साहित्य मंथन ==स्पर्धा
================
विषय =असहिष्णुता
================
प्रेषक==कुंदा पित्रे
🌸🌸🌸🌸🌸🌸
1) अन्न,वस्त्र,पाणी,निवारा
     असहिष्णुतेचा बाजार भरला
    अन् विकृतिने मांडला पसारा
     नितळ भावनांचा गळा घोटला
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
2) उगाच गप्पा गावरानच्या
     मिटावी असहिष्णुता सारी
     अर्धी भाकर पोटी कोणाच्या
     होता,कोणाला कळवळा भारी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
3) व्यसन ,धुमसते सुसाट
    असहिष्णुता मनी साचते
     जनता मरते उगा फुकट
     बालजीवांचे संचित नासते
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
4)असहिष्णुतेच्या फुलल्या बागा
     जगा जगांची  रित  निराळी
     कां करतो आपण,उगा त्रागा
     संस्कृतिंची ओरड ती वेगळी
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
5) बुध्दाची तर ती सहिष्णुवृत्ती
   असहिष्णुवर रामदासी कोरडे
   अन्  हिच असे, संताची प्रवृत्ती
    तत्वज्ञ तरी काय करी बापुडे
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
कुंदा पित्रे

***************************************

इथे जागोजागी असहिष्णु आहे 
कुणाला पाणी मिळत नाही 
तर 
कुणी खराब रस्त्याचा शिकार होतोय 
शेतकऱ्यांना कुणी मदत देत नाही

-  नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद

***************************************


सध्याच्या असहिष्णुतेवर आधारित लेख

💥 ** . . मी भारतीय आहे . . ** 💥

शाळेत असताना " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञेचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा काही एक संबंध नाही. म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. शाळेतल्या प्रत्येक गोष्टीचा जर माणसाच्या मनावर प्रभाव राहिला तर जगात कोठेही असहिष्णुता दिसून आली नसती. असहिष्णुता म्हणजे काय ? या प्रश्नाचे साध्या आणि सरळ व सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे घटनेने जे स्वातंत्र्य दिले आहे त्यास बाधा पोहोचणे किंवा गळचेपी होणे. मग असहिष्णुतेची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून होते. घरामध्ये पाहतो की आपणाला घरात मुक्तपणे वावरता येत नाही. कुटुंबप्रमुख म्हणून आपल्यावर आई पेक्षा वडिलांचा धाक सर्वात जास्त राहतो. त्यानंतर घरातील मुलीवर नेहमी असहिष्णुता घडत असते. कधी कधी तिच्या मनात येत ही असेल यापेक्षा आपण घरातून निघून गेलेलं बरं. असा विचार तिच्या मनात केंव्हा येतो ? जेव्हा तिला घरात असुरक्षित वाटायला लागते त्यावेळी असा विचार हळूच डोकावून जातो.
घरात सुनेला जी वागणूक मिळते तिथे सुध्दा असहिष्णुता निर्माण होत नाही काय ? मासिक पाळी जे की नैसर्गिक आहे परंतु स्त्रियाना या काळात घरात मुक्तपणे वावरता येत नाही, असे का ? याचा आपण का विचार करीत नाही. गावागावात आणि घराघरात आपणाला पदोपदी असहिष्णुता आढळून येते तर आजच एवढा उहापोह किंवा चर्चा करण्याचे कारण कळत नाही. प्रत्येकाला आपली आणि आपल्या लेकरांची काळजी असते. शाळेला गेलेली मुले शाळेची वेळ संपून गेल्यावर पाच - दहा मिनिटे घरी आले नाही तर आपणाला काळजी लागते. मनात विविध प्रकारचे प्रश्न आणि शंका निर्माण होतात. मुले घरी आल्यावरच जीव भांड्यात पडतो. तेंव्हा राहून राहून मनात येतोच की वातावरण खूपच खराब झाले आहे. कधी कुठे काय होईल याचा काही नेम नसतो. पूर्वीच्या काळी इतर गावाला गेलेला व्यक्ती पत्राद्वारे आपली खुशाली कळवत असे. सासरी असलेली मुलगी कशी आहे हे टपालनेच कळत असे. परंतु काळ बदलला आणि त्याप्रमाणे परिस्थिती सुध्दा. आजच्या मोबाईलमुळे हे फारच जलद आणि स्वस्त झाले आहे. त्यामूळे लवकरात लवकर एकमेकांना निरोप देणे आणि घेणे सोपे बनले आहे. याच मोबाईल मुळे जगात कुठेही घडलेली घटना क्षणात आपणाला कळत आहे. दिवसभर चाललेल्या असहिष्णु विषयी माहिती वाचून वाचून डोकं दुखण्याची वेळ आली होती.
नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलमुर्गी या विचारवंताच्या हत्येनंतर भारतात असहिष्णुतेचे वातावरण पेटू लागले. साहित्यिक मंडळी आपले पुरस्कार सरकारला परत देऊ लागले आणि जो तो या विषयी बोलू लागला. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी वाटू लागली. लोकप्रतिनिधी, अधिकारी, शासकीय कर्मचारी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी आदि सगळ्याना आपले जीवाची पर्वा लागली. शासकीय कर्मचारी वर जेंव्हा कुणी हल्ला करतो तेंव्हा प्रत्येक कर्मचारी विचार करतो की आपले काही खरे नाही. पत्रकार मंडळी वर भरपूर हल्ले होतात. वास्तव लेखन करणाऱ्या लेखकांना जीवन जगणे कठीण होऊन राहते.  म्हणजे इंग्रजाचा गुलामगिरी काळात ज्याप्रमाणे लोकाना विचार करण्याची सूट नव्हती. तसाच काहीसा प्रकार येथे दिसून येत आहे. जे कुणी समाजसुधारणा करण्यासाठी पाऊल उचलेल त्याचे पाय कापणे अगदी सर्रासपणे चालू आहे. विचार करणाऱ्या व्यक्तीची हत्या होऊ शकते पण  विचाराची नाही हे कदाचित त्यांना ठाऊक नसेल.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु इतर बाबतीत अजून ही पारतंत्र्यात आहे असे वाटते. स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यनंतर भारतातील अनेक लोकांना खूप वाईट वागणूक मिळाली पण त्यांच्या डोक्यात कधी भारत सोडावे असे वाटले नाही. हा देश माझा आहे आणि मी या देशाचा एक घटक आहे ही भावना त्यांच्या मनात होती. आजही जेंव्हा विदेशात राष्ट्रगीत ची धून वाजते तेंव्हा आपण सावधान स्थितीमध्ये चटकन उभे राहतो.  जे स्वतःचा मर्यादित विचार करतात त्यांना भारतच काय जगात कुठेही सहिष्णुता आढळून येणार नाही. सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. आपण सर्व भारतीय आहोत या भावनेने एकत्र राहिलो तरच सर्व सुरक्षित राहू. एकमेकांवरचा विश्वास टिकून राहील याची काळजी घेऊ या. मी भारतीय आहे याची जाण राहिली की बाकी कशाचा त्राण वाटत नाही 
- नागोराव सा. येवतीकर 
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

No comments:

Post a Comment