नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 25 November 2015

🎬  ही चूक कोणाची 🎬

दैनिक लोकमत मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर रोजी माझा " जागरूक व्हा, प्रदूषण रोका " हा लेख दुसऱ्याच्या नावाने प्रकाशित झाला आहे. रोजच्या प्रमाणे वर्तमानपत्र हातात पडलं आणि वाचण्यास प्रारंभ केलो. वाचता वाचता " प्रदूषण रोका, जागरूक व्हा " असा लेख दृष्टीस पडलं. क्षणभर विचार केला की माझ्या शीर्षकाप्रमाणे दिसतय, म्हणून वाचण्यास सुरू केली. लेखाच्या सुरुवात पासून अगदी शेवट पर्यंत शब्द न शब्द तेच होते. नव्हे ते माझेच लेख होते परंतु शेवटी नाव मात्र दुसऱ्याचे होते. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आणि खपच्या बाबतीत नंबर एक असलेल्या वृत्तपत्राकडून निश्चितच अशी अपेक्षा नाही. 
खरोखर चूक कोणाची ? काय झालं असेल ? कोणी अंदाज लावू शकेल काय ? 
यापूर्वी सुध्दा माझे लेख दुसऱ्याच्या नावावर इतर वर्तमानपत्रमध्ये प्रकाशित झाले आहेत. यावर काही करता येईल काय . . . . . . ?



2 comments:

  1. हि तर शुद्ध चोरी..

    ReplyDelete
  2. नागोजी सर् अशा चोराला धडा शिकवा म्हणजे पुढे असा प्रकार घडणार नाही

    ReplyDelete