नागोराव सा. येवतीकर

Wednesday, 18 November 2015

मुख्याध्यापक खास

📕📗📘📙📓📔📒📗📘
🎋 भारतीय शिक्षक मंच 1 आयोजित 🎋
🎌  विचारधारा भाग - 4  🎌
            : : : : : विषय : : : : : : 
💥 मुख्याध्यापक खास ; तर शाळेचा विकास💥

🔺 दिनांक : 20 नोव्हेंबर 2015
🔺 वेळ : सकाळी 10 ते रात्री 07 पर्यंत 
🔺 300 ते 500 शब्द मर्यादा 
🔺 text किंवा कागदावर लिहून फोटो upload करावे लागेल 

🎤 संयोजन : नागोराव येवतीकर, नांदेड










9423625769
🎬 परीक्षण : श्याम स्वामी, हिंगोली
9765426220
🔦दिग्दर्शन : बाबाराव पडलवार, नांदेड 
9403165441
💻💻💻💻💻💻💻💻💻
वरील तीनही मोबाईल क्रमांकावर आपण आपले लेख पोस्ट करू शकता. 
लेखावर " विचारधारा भाग - 4 " लिहावे. 
चला तर मग . . . . . . . 

जास्तीत जास्त शिक्षक मित्रांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावे. आणि ही पोस्ट आपल्या इतर ग्रुप वर पोस्ट करून सहकार्य करावे. 
👉🏿👉🏿 सर्व लेख आणि निकाल पाहण्यासाठी 
👇🏿👇🏿खालील संकेतस्थळा ला भेट द्यावे. 

www.nasayeotikar.blogspot.com

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची लेख दैनिकातुन प्रकाशित करण्याचा प्रयत्न होईल. ही नम्र विनंती.
 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मुख्याध्यापक खास तर शाळेचा विकास  

'राजा कालस्य कारणम'या उक्तीप्रमाणे राज्याची प्रगती असो अथवा अधोगती यास त्या त्या कालखंडातील राजाचे कर्तृत्व कारणीभूत असते
 त्याप्रमाणे विद्यालयाचा प्रमुख हा मुख्याध्यापकही विद्यालयाच्या प्रगती अथवा अधोगतीस कारणीभूत असतो. म्हणून जर मुख्याध्यापक खास  असेल तर विद्यालयाचा  सर्वांगीण विकास हा हमखास होणारच. यात कोणाचेही दुमत असणार नाही. आणि हाच मुख्याध्यापक कर्तृत्ववान नसेल तर विद्यालयाच्या अधोगतीसही वेळ लागणार नाही. 
मुख्याध्यापक हा शिक्षक व प्रशासन याना जोडणारा दुवा असतो.त्या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारा असतो. म्हणून मुख्याध्यापकामध्ये तेवढी विचारांची,अनुभवाची परिपक्वता असली तर तो विद्यालयाला नंदनवन बनवणारा महत्वाचा घटक ठरतो.त्याच्यामध्ये उत्कृष्ट सारथ्य असेल तर तर विद्यालयाचा रथ योग्य प्रगतिपथावरुन ध्येयपूर्तीकडे नेल्याशिवाय रहाणार नाही. 
मुख्याध्यापक हा समाजनिष्ठ,ज्ञाननिष्ठ ,विद्यार्थीनिष्ठ त्याचप्रमाणें कर्तव्यनिष्ठ असावा. तो सृजनशील,कल्पकबुध्दीचा असावा. नाविन्याचा ध्यास असणारा तसेच न्यायाची कास बाळगणारा असावा. शिक्षकांच्या योग्यतेप्रमाणे कौतुकाची थाप तर वेळप्रसंगी सौम्य शिक्षाही करणारा असावा. मुख्याध्यापक हा  नियोजनाचा महामेरू असावा. नियोजनात सर्व शिक्षकांचा सहभाग असावा. स्वतः नीतिमान,शिस्तप्रिय,वक्तशीरपणाचे पालन करणारा असून शिक्षकाकडूनही त्याचे पालन करून घेणारा असावा. मुख्याध्यापकाजवळचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे गुणग्राहकता असावी. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील गुणाची पारख करून त्या गुणाना प्रोत्साहन देवून विद्यालयाचे नाव उंचावण्यात व विद्यालयाच्या सर्वांगीण विकासात त्याचा यथायोग्य उपयोग करून घेणारा असावा. त्यांच्या कलागुणांना वाव देणारा असावा. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यामध्ये सामाजिक भान,सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम,राष्ट्रीयएकात्मता,स्त्रीपुरूष समानता,वक्तशीरपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन,संवेदनशीलता,श्रमप्रतिष्ठा,अशा मूल्यांची रुजवण  करणारे उपक्रम शाळेत राबविण्यासाठी सातत्याने उपक्रमशीलअसावा.
'अतिपरिचयाते अवज्ञा'असे म्हणतात. त्याप्रमाणे मुख्याध्यापक हा मनमोकळा जरी असला तरी आपल्या पदाचा आदर राखून सर्वांशी नातेसंबंध अंतर ठेवून वागणारा असावा. किमान शाळेच्या परिसरात ऊठबस कोणाशीही गप्पागोष्टी न करता संयमशील,बाणेदार असावा.शाळेत सर्वांशी समजुतीने, वेळप्रसंगी सर्वाना सांभाळून घेणारा,उत्तम नेतृत्वगुण असणारा असावा. महत्वाचे म्हणजे तो निर्व्यसनी,सत्शील  असावा.  शाळेच्या विकासासाठी तन मन धनाने धडपडणारा असून हे सर्व शिक्षकाकडून अधिक  जबाबदारीने करून घेणारा असावा.विद्यालयात जमेल तेवढ्या सुविधा निर्माण करून देवून,त्यातून  शाळेचा विकास साधणारा असावा.तसेच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासोबत सर्वांगीण विकासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारा असावा. विद्यालयात वैज्ञानिक प्रदर्शने,मेळावे,वाचनसंस्कृती,ग्रंथप्रदर्शने,सांस्कृतिक मेळावे यांचे आयोजन करावे. 
      असं म्हणतात,'यथा राजा, तथा प्रजा'त्याप्रमाणे मुख्याध्यापक जसा तसे त्याचे शिक्षक व विद्यार्थी असतील. मुख्याध्यापक जेवढा सक्रिय,उपक्रमशील तेवढा त्या विद्यालयाचा प्रगतीचा  आलेख हा उंच असतो.
     मुख्याध्यापक हा त्या विद्यालयाचा आरसा असतो. मुख्य स्तंभ असतो.म्हणून तो जेवढा मजबूत तेवढे त्या शाळेचे भवितव्य हे मजबूत,भक्कम  आणि उज्ज्वल असेल. थोडक्यात मला असे वाटते, विद्यालयाची  प्रगती अथवा अधोगती याला मुख्य जबाबदार घटक हा मुख्याध्यापक असतो. याची जाणीव ठेवून वागणारा मुख्याध्यापक  असेल तर शाळेचा विकास नक्कीच होतो.आणि सेवाभाव न ठेवता नुसत्या पदाला भार असणारा,पैशापुरते काम असणारा,कामाप्रति निष्ठा नसणारा असेल तर ते त्या विद्यालयाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. म्हणून ज्या विद्यालयाचा मुख्याध्यापक हा जेवढा सक्रिय,कर्तव्यनिष्ठ असेल तेवढे त्या शाळेचे भाग्य झळकेल. म्हणून म्हणावे वाटते,मुख्याध्यापक खास,तर शाळेचा विकास !!! 
--संगीता देशमुख
म. गांधी माध्यमिक विद्यालय,वसमत. जि. हिंगोली 
〰〰〰〰〰〰〰〰〰
मुख्याध्यापक खास :तर शाळेचा विकास.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 

राजा ज्याप्रमाणे संपुर्ण राज्यासाठी आदर्श पदावरील व्यक्ती मनुन ओळखली जाते, त्या प्रमाणे मुख्याध्यापक हा शाळेचा आदर्श असतो.मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. 
 संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी. शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे,  इत्यादी. सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात. 
 विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. 
"The quality of a leader is reflected in the standards they set for themselves."
 - Ray Kroc
अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल. 
 मुख्याध्यापक म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये प्रथम प्रवेशित होणा-या विदयार्थ्यांची सुरूवातीलाच ओळख करून घेतली, त्यांचे आईबाबा कोणता व्यवसाय/धंदा करतात? त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे? त्यांच्या कुठल्या समस्या तर नाहीत ना? याबाबत संवाद साधल्यास त्या विदयार्थ्यांशी आपली वेगळी जवळीक निर्माण होईल. विदयार्थ्याना नावाने हाका मारल्यास त्यांच्यामधील शिक्षक/ मुख्याध्यापकांबददलची भीती नाहीशी होईल. आपोआप तो विद्यार्थी सुख-दु:खाच्या गोष्टींची तुमच्याबरोबर चर्चा करील, हे आपण ध्यानात घ्यावयास हवे. म्हणुन मुख्याध्यापकांनी आपल्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांशी चांगली ओळख ठेवावी.
〰〰〰〰〰〰〰〰〰
असे म्हणतात, “Happiness helps relieve tension and makes the environment healthy for working.”
〰〰〰〰〰〰〰〰〰
याप्रमाणे जर मुख्याध्यापकाने कायम हसतमुख राहिले आणि कल्पकतेने आपल्या सहकाऱ्यांना आपल्या कामाची जबाबदारी आणि जाणीव करून दिली तर एका प्रकारची कामकाजाची सकारात्मक वातावरण निर्मिती होईल आणि कोणतेही काम आपल्याला कोणत्याही गुंतागुंतीविना पार पाडता येईल. मुख्याध्यापकांनी स्वत: एक आदर्श अध्यापक असले पाहिजे. अध्यापकांचा तो मुख्याध्यापक, व्यासंग, विद्यार्थ्यांशी जवळीक या गोष्टी अध्यापनासाठी आवश्यक आहेत. प्रत्येक अध्यापकाचे अध्यापन कसे असावे याचे निरिक्षण करणे हे मुख्याध्यापकाचे कर्तव्य आहे.
ज्या प्रमाणे राष्टपती सैन्याचे प्रमुख असतात त्याप्रमाणे
मुख्याध्यापक शाळेचे प्रमुख असतात. त्यांनी चांगले गुण अंगी बाणण्याची आवश्यकता समजून घ्यावी. काही आदर्श शिक्षकांची उदाहरणे शिक्षकांसमोर ठेवावीत. या बाबतीत व्याख्यानापेक्षा चर्चा अधिक उपयुक्त ठरते. एखादी वास्तविक किंवा काल्पनिक घटना शिक्षकांच्या समोर ठेवावी. अशा प्रसंगी ¨तुम्ही काय कराल?” असा प्रश्न विचारावा. त्या सर्वांचा विचार करावा. निर्णय कसा घ्यावा, घेतलेला निर्णय अंमलबजावणीत कसा आणावा याबाबतीत मार्गदर्शन करावे. प्रत्येक शाळा निराळी, सामाजिक वातावरण निराळे त्यामुळे एक समस्या वेगवेगळ्या मार्गाने सोडवता येते याची जाणीव मुख्याध्यापकांनी ठेवावी.

¨मी मुख्याध्यापक, माझ्या हाती सर्व अधिकार¨ असे न वागता सर्वांशी प्रेमाने वागावे.शांत मार्गाने काम करवून घेणे कौशल्याचे असते. प्रसंगी आपल्या विचारांना आवर  घालावी लागते. सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य मुख्याध्यापकात असावे.

मुख्याध्यापक म्हणजे एक प्रकारचा सेनापतीच असतो.खरचं एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडणारा मुख्याध्यापक खुप महान असतो.
          🙏🏻🙏🏻🙏🏻

        संतोष गंगुलवार,                 कासराळी


📚📚📚📚📚📚📚📚📚

      🇮🇳 विचारधारा भाग 4🇮🇳
विषय --- " मुख्यध्यापक खास : तर शाळेचा विकास 🙏

📚   प्राचीन काळी भारतात राजेशाही पध्दत होती ,तेव्हा एक म्हण होती ;
    " यथा राजा तथा प्रजा " 
आणि आता आधुनिक काळात एक म्हण रूजत आहे ती म्हणजे ;
" मुख्यध्यापक खास : तर शाळेचा विकास"

जसा मुख्यध्यापक असेल तसचं शाळेचं वातावरण राहणार. मुख्यध्यापक खास असेल तर शाळेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 

📚 मुख्यध्यापक म्हणून माझा अनुभव ---- 
मी द्वि शिक्षकी शाळेवर गेली आठ वर्ष मुख्यध्यापक या पदावर कार्य करीत आहे. ही जबाबदारी पार पाडतांना मला अनेक अनुभव आले. एक प्रमुख म्हणून आपल्या जबाबदार्या वेगळ्या आहेत हे लक्षात आले. अधिकार प्राप्त झाले पण आपल्या पण --- आपल्या अधिकाराची अंमलबजावणी करावी वाटली परंतु सावधान व्हावे लागले कारण मुख्यध्यापकाची भूमिका आता केवळ एक प्रमुख म्हणून राहिली नसून आता तो एक प्रशासक नसून प्रशिक्षित व्यवसायिकांच्या गटाचा नेता आहे.व्यवसायिकांच्या नेतृत्वासाठी व्यवसायिकता , व्यवसायिकरण, व्यवसायाप्रती निष्ठा , आणि संस्थेत अंतर्भुत सर्व मानवी घटकांशी परस्पर संबंध कसे सलोख्याचे, सहकार्याचे राहू शकतील , विकसित होतीलं या सर्व गोष्टी किमान पातळीपर्यत तरी आपल्यात आहेत ना या बाबतीत आत्मपरिक्षण - निरिक्षणाची गरज भासली. ही नवीन जबाबदारी पेलण्यास आपण मानसिक रित्या तयार आहोत का ??? या बाबतीत शासनाची भुमिका , शासनाचे नियम सांगाळून सुद्धा नव्या जबाबदारीचे आव्हान पेलण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार सर्व प्रथम मनात आला. 
 एक प्रमुख या नात्याने मुख्यध्यापकांना शाळेच्या सर्वच घटकांशी जवळचे आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. या घटकात विद्यार्थी, शिक्षक , पालक, व्यवस्थापकिय मंडळ , परिसरातील इतर सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय अधिकारी यांचा समावेश होतो.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
📚 मी पाहिलेला एक मुख्यध्यापक असाही ------------ 
🌹जो आपल्या कर्तव्य्याप्रति एकनिष्ठ होता.
🌹 जो अध्यापनाचे कार्य करून विद्यार्थी यांच्याशी निकटचे संबंध प्रस्थापित करायचा.
🌹 शाळेतील वातावरण उत्साही व रमणीय ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचा.
🌹शिक्षकांना बोलते करणे, त्यांचे सहकार्य मिळविणे यात तर त्यांचा हातखंडा होता.
🌹 पालकांशी सकारात्मक संबंध , शालेय परिसरातील इतर संस्थांशी पुरक संबंध प्रस्थापित करणारा.
व्यवस्थापकिय मंडळ आणि शासकीय अधिकारी यांच्या सुचनांची त्वरीत पुर्तता करणारा मुख्यध्यापक मी अगदी जवळून पाहिला आहे. आणि ते म्हणजे माझ्या नोकरीच्या सुरूवातीच्या शाळेतील कर्तव्य तत्पर मुख्यध्यापक. 

 📚माझ्या स्वप्नातील मुख्यध्यापक कसा असावा----------

🍁मुख्यध्यापक म्हणजे । शैक्षणिक नेता 🍁
मग तो कसा असावा ??? 
तर तो असा असावा 👇
📝 मुख्यध्यापकाच्या सर्व भुमिका यशस्वीरित्या पार पाडून कार्यालयीन कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण देणारा , त्यांना अधिक सक्षम करणारा , त्यांचा आत्मविश्वास आणि अस्मिता उंचावून त्यांचा विश्वास जिंकणारा .

📝 वेळेनुसार आपली मानसिकता बदविणारा, व्यवस्थापकीय क्षमता आणि कौशल्य यांचा सकारात्मक उपयोग करणारा .

📝 मुख्यध्यापकाने अध्यापनाचे कार्य करावे. म्हणजे स्वतः चे आशयग्यान , अध्यापन शास्त्रीय ग्यान वृद्धींगत करून शाळेत शैक्षणिक वातावरण आणि चैतन्य तेवत ठेवणारा.

📝 शाळेचा दर्जा , गुणवत्ता , नावलौकिक वाढविण्यासाठी शाळेतील शिक्षकांना महत्त्वपुर्ण मानून त्यांना जपणारा, त्यांची काळजी घेणारा, त्यांचा सहयोग घेऊन नाविन्य पुर्ण उपक्रम राबविणारा .

📝 व्यवसायाप्रति निष्ठा , जाण, विश्वास असणारा, गुणवंत , शिलवंत , विकसनशिल , नाविन्यपुर्तीचा ध्यास असलेला मुख्यध्यापक असावा.

🍁शाळेचा मुख्यध्यापक खास असेल तर -----------🍁

📚मुलांमधे क्रियाशिलता व सृजनशिलता वाढून शिक्षण अधिक आनंददायी होईल व मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण होईल.
📚 शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढून नावलौकिक मिळेल. सुसंस्कारी विद्यार्थी बाहेर पडतील परिणामी पालकांना व समाजाला शाळेचा अभिमान वाटेल .


म्हणूनच म्हणतात 
🌹 मुख्यध्यापक खास : तर शाळेचा विकास 🌹




ज्योती बोंदरे , नागपूर

मुख्याध्यापक खास : तर शाळेचा विकास " 

🔺 शालेय स्तरावर प्रत्येक घटक महत्वपूर्ण असतो.कोणतीही संस्था असो कार्यालय असो त्या कार्यालयातील जसे कर्मचारी महत्वाचे तसे त्यांच्याकडून काम करून घेणारा प्रमुख देखील तितकाच महत्वाचा.मुख्याध्यापक म्हणजे शाळेचा कणाच...!हा कणा जितका मजबूत तेव्हढी शाळारूपी इमारत मजबूत.एकवेळ इतर कार्यालयातील प्रमुख सुयोग्य नसेल तर फारसे बिघड़णार नाही..पण ज्या ठिकाणी सचेतन मुलांशी संपर्क येतो त्या शाळेचा पूर्ण डोलारा हा मुख्याध्यापकरुपी महागुरुंवरच अवलंबून आहे.                                       ।।                                    मी मुख्याध्यापकाना महागुरु अशी उपमा दिली याचे कारण कबीरजी म्हणतात।                       'गुरु गोविन्द दोनों खड़े काके लागू पायी,बलिहारी गुरु अपने जिन्हें गोविंद दियो बताई'                         म्हणजे गुरु अर्थात शिक्षकांना देवापेक्षा वरचा दर्जा दिलेला आहे..!मग अशा गुरुंकडून आपल्या शाळेचा लौकिक वाढवणारा मुख्याध्यापक म्हणजे' महागुरुच'म्हणावा लागेल.
अशा या महागुरुंवर शाळा शिखरावर नेण्याची किंवा रसातळाला नेण्याची महाजबाबदारी असते हे मान्यच करावे लागेल.'यथा   राजा तथा प्रजा' ही उक्ति येथेही मान्यच करावी लागेल. ज्या शाळा आज शिखरावर पोहचल्या आहेत किंवा शिखर गाठू पहात आहेत..त्याचा इतिहास जर पाहिला तर इतिहासाच्या सोनेरी पानाची सुरुवात  याच महागुरु पासून झालेली दिसेल व ज्या शाळा रसातळाला जातात त्या पुस्तकावर पण याच'महागुरुचे'नाव दिसेल...!
 🍧शालासमुहातील वातावरण खेळीमेळीचे ठेवणारा तो दूत आहे'          ।🍧शाळास्तरावरील सर्व यशाचा व अपयशाचा खऱ्या अर्थाने धनी आहे.       🍧अध्ययन अध्यापन यावर नियंत्रण करणारा पण शाळा व्यवस्थापन समितीच्या दॄष्टीने अपयशाच खापर झेलणारा तो 'बकरा'आहे.या सर्व गोष्टी असल्यातरी 'मुख्याध्यापक ख़ास असेल तर शाळेचा विकास.. 'झाल्याशिवाय राहणार नाही.                     ~~हरिश्चंद्र भोईर,शहापूर,ठाणे

🌹मुख्याध्यापक खास 👉 तर शाळेचा विकास🌹

मी थोडा शीर्षक मधे बदल करुण लिहतो 👉 मुख्याध्यापक खास नक्की शाळेचा विकास , आपल्या भारतात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही कधी असच ऐकल असेल त्याच्या नेतृत्वमुळेच इतके यश मिळाल आहे कारन ही तसेच आहे , जेव्हा नेतृत्व प्रभावी असते तेव्हा बलाढ्य अश्या 1983 मधील वेस्ट इंडीज टीम ला सुद्धा हरविता येते याची प्रचिती कपिल देव यांनी आपल्यासमोर ठेवलीच आहे . दूसर उदहारण बघा आपल्या महाराष्ट्रतिल 1630 मधे ज्या मुघल व आदिलशाही विरुद्ध राग व संताप सर्वांमधेच असेल परंतु जेव्हा त्यांना छत्रपति शिवाजी महाराजांचे नेतृत्व लाभले तेव्हा त्यांचा राग व संताप कसा खदखदून बाहेर निघाला याची प्रचिती सर्वनाच् आहे .
              मुख्याध्यापक या नावतच खुप काही आहे , मुख्य अध्यापक म्हणूनच मुख्य व्यक्ति प्रभावी असेल तर कुटुंबाचा प्रभावहि तितकाच् पडतो , त्याच्यामधे सर्वात महत्वाचा गुण असावा तो त्याची भाषा , वेळ प्रसंगानुसार भाषेत बदल करण्याची कला असावी , शाळेतील शिक्षकांना त्याची आदरपूर्वक भीति वाटावी , विद्यार्थ्याना तो कुटुंबात जस बाबा असतो तसा तो शाळेत वाटावा , जस तो प्रशासनात उत्तम असावा तसाच तो अध्यापनात सुद्धा सर्वोत्तम असावा .

आतिश धोटे
जि प प्राथ शाळा मुर्लिगुड़ा
जी प चंद्रपुर










4 comments:

  1. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/1-4-20-2015-10-07-300-500-text-upload.html

    ReplyDelete
  2. 📝 लिहिता लिहिता लिहिते होऊ या 📝
    चला मित्रांनो थोडं डोक्याला ताण द्या आणि हातात लेखणी आणि लिहा

    " मुख्याध्यापक खास : तर शाळेचा विकास "

    🔺यात आपण स्वतःचे अनुभव, तुम्ही पाहिलेला मुख्याध्यापक, तुमच्या स्वप्नतील मुख्याध्यापक किंवा शाळेच्या संपूर्ण विकासात मुख्याध्यापक कसा महत्वाचा आहे

    🔺हे मुद्दे लक्षात घेऊन सुमारे 300 ते 500 शब्दांत लिहा.

    आज खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. तेंव्हा चला मग आपण ही या विचारधारा भाग - 4 मध्ये सहभाग नोंदवू या.
    धन्यवाद
    अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ ला भेट द्या
    👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
    **************************
    http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/1-4-20-2015-10-07-300-500-text-upload.html
    **************************

    ReplyDelete
  3. Mukaydayapak vichara jar paripakva asel tarach shikshkavar velo veli tapasani va niyantran asel tar shikshanat vidayrtayanna karach parivartan galu shakte

    ReplyDelete
  4. do nice but work hard on this topic

    ReplyDelete