नागोराव सा. येवतीकर

Tuesday, 3 November 2015

🎯🎯🎯 "बालविवाह रोखण्यासाठी" या ऑफ पिरियड सदराखाली दिनांक 02-11-2015 रोजी प्रकाशित झालेला श्री. नागोराव सा. येवतीकर यांच्या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया 🎯🎯🎯

******************************

"बालविवाह रोखण्यासाठी" या ऑफ पिरियड सदराखाली प्रकाशित झालेला श्री. नागोराव येवतीकर यांचा लेख अतिशय मार्मिक होता. कारण आजही बहुतांश गावात भांडवलाच्या कमतरतेमुळे व जुन्या विचारसरणीमुळे बालविवाहच केले जातात. यांमुळे एक सक्षम पिढी घडण्यापासून दूर सारल्या जाते. बालविवाह रोखला तरच ख-या अर्थाने राष्ट्र अधिक परिपक्व व प्रगतीशील बनेल. सामाजिक मानसिकता बदलण्या हेतू लिहिलेला हा लेख नक्कीच प्रकाशदायी आहे.
- प्रा. नितीन दारमोड
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद
मो. नं. 9975805143
******************************


आज दि. २/११/२०१५ रोजीचा लेखक नासा लिखित "बालविवाह रोखण्यासाठी" हा लेख वाचला. अतिशय सुंदर असा विषय व लेख प्रकाशित झाला आहे. त्या विषयाची कल्पना व आशयाची मांडणी काळानुरुप वाटली व ते सद्दस्थितीत अत्यंत गरजेची वाटते तद्वतच असेही सांगावसे वाटते की कोणत्याही गोष्टीवर बंधने घालून, कायदे करुन व प्रसंगी शिक्षा करुन त्या गोष्टीवर काही प्रमाणात आळा घालता येईल पण ती संपूर्णतः संपूष्टात येईल असे वाटत नाही त्यासाठी समाज जागृती होणे व ते विचार प्रत्येकाला पटून जोपर्यंत विषयांशी निगडीत विचार समाज करणार नाही तोपर्यंत विचाराचे फलित साध्य होणार नाही. करिता समाजजागृती होणे आत्यंतिक आवश्यक वाटते.
हणमंत बाचेवाड
जि. प. हा. येताळा
******************************

 
 नागोराव येवतीकर यांचा दिनांक 02-11-2015 रोजी दैनिक लोकपत्र मध्ये प्रकाशित " बालविवाह रोखण्यासाठी " हा लेख वाचून खुप आनंद झाला.
आपण ज्याप्रमाणे लेखामध्ये छत्तीसगढ सरकारचे बालविवाह रोखण्यासाठीच्या  प्रयत्नाचा जो उल्लेख केलात आणि त्याही पुढे जाऊन बालविवाह कशा प्रकारे रोखता येतील यावर केलेल भाष्य खुपच मार्गदर्शनपर आहे.
      आपल्या देशात बालविवाहाची पद्धत खुप जूनी आहे ते मोडीत काढणे सहज शक्य नाही.
मुलींच्या बाबतीत पालकाची असलेली समजूत ही आजच्या काळात कशाप्रकारे नुकसानकारक आहे हे आपला लेख वाचल्यावर लक्षात येते.
      ज्याप्रकारे लग्न पत्रिकेवर आठरा वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून त्यांची मतदान कार्डची प्रिंट घेण्यात यावी हे प्रयोग सुद्धा बालविवाह रोखण्यमध्ये खास उपायकारक आहेत.
     खरचं आपण "बालविवाह रोखण्यासाठी" या लेखामध्ये  समाजात स्वातंत्रय पूर्व काळाच्या अगोदर पासून सुरू असलेली पद्धत कशी घातक आहे आणि कशा प्रकारे हाताळता येईल यावर केलेल लेखन समाजासाठी खुपच प्रेरणादायी आहे.
आपले लेख समाजाच प्रबोधन करतील हे नक्की!!

🙏🏼 बाबाराव रा. पडलवार
एकलारा, ता.मुखेड जि.नांदेड
******************************


 ऑफ पिरियड या सदरात दिनांक 02 नोव्हेंबर सोमवारी नागोराव सा. येवतीकर यांचा " बालविवाह रोखण्यासाठी " हा लेख वाचण्यात आला.
          मुळात ज्या घरात मूली उपवर झालेल्या असतात. त्या घरातील पालक नेहमीच चिंतेत आणि काळजीच्या सावटाखाली वावरत असतात. विशेषतः ग्रामीण भागात यापेक्षा अत्यंत विदारक परिस्थिति आहे.म्हणूनच जुन्या काही अनिष्ट चाली -रीती ह्या महाराष्ट्र -तेलंगाना- आंध्र सीमावृत्ती भागात आजही अडाणीच नव्हे तर शिक्षित आणि  उच्चशिक्षित असलेल्या लोकांचा समाज सुध्दा पाळतात . त्यासाठी कायदा केला तरी त्यातून पळवाट शोधत असतातच
         त्याचे असे की विशेषतः ग्रामीण, दुष्काळी डोंगराळ , उसतोडणीसाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हयात तर लग्न लावण्याचा नवीनच  प्रकारआस्तित्वात आहे ; त्याला गोंडस नाव आहे ते म्हणजे""" गेटकिन""""

"""गेटकिन ""म्हणजे काय तर ,बैंड नाही , मंडप नाही, वऱ्हाडी  मंडळी नाही , फक्त जवळचे 10 -20 नातेवाईक लग्नाला उपस्थित असतात. शिवाय लग्न पत्रिकेचा तर काहीच मेळ नसतो.एकदंरीत सर्व काही कमी खर्चात आणि 10- 12 दिवसानी तीच नवरी उस तोडण्यासाठी उसाच्या फडात असते .मान पानाच्या सर्व गोष्टीला फाटा देत अचानक मुलीला लग्नाला तयार करायचे आणि लग्न लावायचे . एवढेच नव्हे तर कित्येक वेळेस नवरी मुलीला 8 वी, 9 वी किंवा मग 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असताना शाळेतून बोलावून लग्नाच्या बाहुल्यावर चढवल्या जाते ; आणि तिथेच तिच्या जीवनाची खडतर वाट चालू होते !!!
 त्यासाठी गावागावातुन शाळा आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यामार्फत  आशा वर्कर्स , नर्स यांच्यामाध्यमातून किशोर वयीन मुलींचे मेळावे आयोजित  करावेत .त्यांच्या पालकांचे उदबोधन वर्ग किंवा मग समुपदेशन करण्यासाठी एखादा शासन स्तरावर महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात यावा .......
🎯🎯🎯
आप्पासाहेब सुरवसे सर
    लाखनगांवकर
मो .नं. :-9403725973
******************************


सर्व प्रथम सन्मानिय लेखक महोदयांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच. कारण अतिशय गहन अाणि ज्वलंत विषयावर अापण प्रकाश टाकला अाहे. नव्हे तर काळची गरज ओळखून अापण अापले विचार अभिव्यक्त केले.
            सदर लेख अापल्या समाज व्यवस्थेला अात्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा अाहे. तसेच योग्य धोरणात्मक निर्णयापर्यंत दिशा ठरविणारा अाहे. खरच बालविवाह ही एक भयंकर समस्या अाहे. अाजही समाजामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणात होत अाहेत. त्याचे होणारे परिणाम अापण अगदी योग्य मांडले अाहेत. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत समाजाची लग्न करण्याची संकुचित वृती व समाजामध्ये अाजही अनिष्ठ रुढी व त्याचे होणारे गंभीर परिणाम विशद केले अाहेत.ही बाब खरच लक्षवेधी अाहे.
         मुलगी हे एक ओझं अाहे. तेओझं लवकर कमी करुन मोकळं व्हावं असे वाटणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच अाहे. ही बाब अतिशय चिंताजनक अाहे आणि खरच भारताचा भविष्यकाळ बळकट होण्या ऐवजी कमकुवतच होणार यात शंका नाही.
      या लेखन प्रपंचाच्या अनुषंगाने काही प्रश्नही मनात निर्माण झाले. त्याचेही विश्लेषण व्हावे असे मला वाटले.हल्ली महाराष्ट्राच्या काही भागात कुंकूटिळ्याच्या कार्यक्रमातच विवाह करण्याची पध्दत रुढ होत अाहे.येथे लग्नपत्रिकेचा प्रश्न येत नाही.दुसरी गोष्ट म्हणजे  समाजातील असेही काही घटक अाहेत त्यांच्या रोटीचाच प्रश्न सुटला नाही.तर बेटीचा प्रश्न तर त्यांच्यासाठी मोठं अावाहनच अाहे..अाजही ते दारिद्र्यात खितपत पडलेले अाहेत.अज्ञान अंधकारात डुबले अाहेत.शिक्षणाचा गंधही त्यांना नाही.साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या मुलींच्या अायुष्यावर पडणार अाहे हे वेगळं सांगायला नको.येथेही पत्रिकेचा प्रश्न येत नाही.
  त्याहीपलीकडे जावून सांगायचे झाले तर बालविवाह हा एक प्रकारचा मानसिक विकारच बनला अाहे.अशा विकाराचे निदान करायचे कोणी...? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो...

🎯मारुती तु.खुडे
पाचोंदा,माहुर जि.नांदेड

📚📚📚📚📚📚📚📚📚
 . . . . . . प्रतिक्रिया
 दैनिक लोकपत्र च्या आॅफ पिरियड या सदरात प्रकाशित झालेल्या
" बालविवाह रोखण्यासाठी "
या लेखासंदर्भातील माझ्या प्रतिक्रिया
ना सा येवतीकर यांनी आपल्या समाजातील बालविवाहाचे यथार्थ व मार्मिक चित्र रंगविले आहे. बालविवाहामुळे होणारे फायदे तर नाहीच आहे त्यातून होणारे नुकसान याचे योग्य वर्णन करून आपणास विचार करायला भाग पाडले आहे. शहरी भागात ही समस्या नसली तरी ग्रामीण भागातील परिस्थिती चे वास्तव चित्र आपणा समोर उभे केले. त्यांनी आपल्या लेखातून छत्तीसगड सरकारच्या निर्णयाची माहिती दिली , असा निर्णय खरोखरंच स्तुत्य आहे आणि अशा निर्णयांची अंमलबजावणी व्हायला च पाहिजे ही जाणीव प्रस्तुत लेख वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. बालविवाह विषयाचे अतिशय मार्मिक व सुस्पष्ट विवेचन मांडलेले आहे. हा लेख विचार करायला प्रवृत्त करणारा एक उत्तम लेख आहे. so think about childhood marrage.
- कु. ज्योती बोंदरे, नागपूर
9372963213

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

No comments:

Post a Comment