नागोराव सा. येवतीकर

Sunday, 18 October 2015

विचारधारा भाग - 2
आपल्याला काय वाटत ! आपली मुले चांगली व्हावी, यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो ? आज आपल्या मुलांना वयाची ३ वर्ष पूर्ण होत नाही तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का ? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे...
बालकाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासात कुटूंब खुप जबाबदार आहेतच..
- शाम वैजनाथ स्वामी
हिंगोली

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि शिक्षण हक्क कायदा यामुळे मुलींना प्राथमिक शिक्षण होईपर्यंत फार अडचण येत नाही.खरी समस्या सुरु होते उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना.
         'शिकून सवरून तरी काय करणार, लग्नच तर करायचे आहे..पुरे आता शिक्षण' हा ग्रामीण भागातील पालकांचा एकमुखी आवाज मुलींच्या शिक्षणातील मोट्ठा अडसर आहे.हे चित्र सार्वत्रिक आहे..
         दहावी नंतर उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात ठेवण्यास किंवा जाणे येणे करण्यास आजही ग्रामीण भागातील पालक तयार होत नाहीत..मात्र हे चित्र बदललं पाहिजे..पालकांचाच मुलींवर विश्वास नसेल तर आपणच इतरांना तसा विचार करायला संधी देत असतो हे वास्तव पालकांनी समजून घ्यायला हवं..
शहरी भागात हे प्रमाण थोडं कमी आहे कारण शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतात..पण महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शहरी पालक सुद्धा काहीसे उदासीन असतात..मुलाच्या उच्च  शिक्षणासाठी घरदार गहाण ठेवणारा पालक मुलींच्या शिक्षणाचा तितक्याच तोलामोलाने विचार करत नाही हे आजचे वास्तव आहे..
        आज शिक्षणात, नोकरीत ,स्पर्धा परिक्षांत अगदी समुद्री तळातील संशोधना पासून तर अवकाश संशोधना पर्यंत मूली कुठेच कमी नाहीत..अग्रेसरच आहेत..यावर्षीच यूपीएससी परीक्षेत भारतातून प्रथम आलेल्या पहिल्या चारही महिलाच आहेत..महाराष्ट्रातूनही अबोली नरवणे प्रथम आली आहे..त्यांच्या यशात आईवाडिलांचा मोठा वाटा असल्याचं त्या अभिमानानं सांगतात..
         पालकांनीच मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे अन तिला उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले पाहिजे..

जरुरी नहीं रौशनी चिरागों से ही  हो ,
बेटियां भी घरमे उजाला करती हैं ।।

राजेश वाघ..
जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा

नमस्कार...

मित्रहो,
        आजच्या काळात आपणास सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर दिसत आहेत.आपणास वाटते की मुलींनी पण शिक्षणात खुप प्रगती केली आहे.  हो ! हे खरं आहे.  मुलींना देखील आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. संपूर्ण जगात मुंलींच्या शिक्षणाचा प्रसार वाढतोय तरी पण खंत वाटते मित्रहो , की आजही खेड्या गावांत मुलींच्या शिक्षणाकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष केल्या जात आहे. खेड्यातील पालक मुलींच्या शिक्षणाकडे विचारपुर्वक लक्ष देत नाहीत.  असे का?
मुली ह्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असताना त्याच्यावर हा अन्याय का?  मी तर म्हणतो की पालकांनी मुलींच्या शिक्षणाकडे ही जाणिवपुर्वक लक्ष दिले पाहीजे. वर्तमान कालीन पालक देखील पुर्वजांप्रमाणे मुलींचे बालवयात विवाह न करता त्यांनाही शिक्षणाची संधी द्यावी. आजही खेड्यातील पालक कॉलेज तर सोडाच हो माध्यमिक शाळेत पाठविण्यास संकोच करतात. या पालकांना आपल्या मुलींवर विश्वास नसतो का? की हे पालक मुद्दाम स्त्री शिक्षणाच्या विरोधात असतात? की हे पालक स्त्री शिक्षणाबद्दल अजाणते आहेत?  या गोष्टीचा विचार केल्यास मला वाटते

""स्त्री जन्मा ही तुझी कहाणी  ! ह्दयी अमृत नयनी पाणी""  म्हणून मला वाटतं मुलींच्या शिक्षणाबाबतीत पालकांनी विचार करावा.

  "मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी"
माझी सर्व पालकांशी एवढीच विनंती आहे की,
सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, यांचा तरी आदर्श मुलींसमोर ठेवुन आपल्या मुलींच्या शिक्षणाची दखल घ्यावी.


धन्यवाद..

संतोष गंगुलवार ,कासराळी.
हु.गो.पानसरे महाविद्यालय अर्जापुर..बिलोली.

📚📚📚📚📚📚📚📚📚

  🙏. विचारधारा भाग दोन 🙏

📚विषय ----- मुलींच्या शिक्षणात पालकांची भुमिका 📚

मुली खूप हुशार असतात !! पण त्यांना पुढे शिक्षणाची संधी मिळत नाही !! त्यांना पुढे शिकविले जात नाही !!
का ???? मुलींना शाळेत पाठविले जात नाही तर का ??
याचा आपण कधी विचार केलाय ?
हो केलाय मग कारण काय ??
कारण मुळातच स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान आहे. पण कशामुळे ? तर खालील कारणांमुळे 👇
🌀 अनिष्ट रूढी व परंपरा ,
🌀 अंधश्रद्धा व निरक्षरता,
🌀 स्वतः ला कमी लेखण्याची वृत्ती ,
🌀 पुरुषप्रधान संस्कृती .
जर आपल्याला मुलींना फुलवायचं असेल, तिला माणुस म्हणून जगायला शिकवायचं असेल तर आपणास हे आवर्जून करावचं लागेल.

👭 तिला शिक्षणाची व आरोग्याची समान संधी ,
👭 आचाराचे व विचाराचे समान स्वातंत्र्य ,
👭 आहारात व कामात समान वागणूक ,
👭 आणि महत्वाचे म्हणजे समान दर्जा ' निर्णयाचा ' द्यावा लागेल .

आणि हे सर्व शिक्षणावाचून येणार नाही. आणि मुलीच्या शिक्षणात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे "पालक". पालकांना आपल्या विचारांना कृती ची जोड द्यावी लागेल पालकांच्या सहभागानेच मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढणार, १००% पटनोंदणी होणार.
पण----------------------------------------
🔷शिक्षणात पालकांचा सहभाग कसा असावा ???
🔷सहभागाची पध्दती कोणती असावी ???
या गोष्टी ची दखल घेणे गरजेचे आहे. मुलींच्या शिक्षणात पालकांचा सहभाग हा दोन प्रकारे घेता येतो ,1⃣ शाळेबाबत 2⃣ घराबाबत

पालकांनी मुलीच्या शिक्षणाबाबत खालील भुमिका घेणे आवश्यक आहे.
🔷शाळेबाबत 🔷
👭 घरकामाचा भार मुलीवर न टाकता तिने वेळेवर शाळेत जावे याकरीता कुटूंबात जाणिव निर्माण करणे.
👭 शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी द्यावी जेणेकरून मुलींना भावी आयुष्यात फायदा होईल .
👭 शाळेचा अभ्यास व गुणवत्ता वाढ या संबंधी मुलींशी बोलावे.
👭 अभ्यासासाठी सक्ती व बंधने या पेक्षा समजावणे व योग्य समज देणे.
👭 मैत्रिणी कोण ? कुठे राहतात ? त्यांची कौटूंबिक माहिती काय ? यांची माहिती पालकांना असावी .
👭 शाळेशी व शिक्षकांशी वैयक्तिक संपर्क ठेवल्याने पालक समर्थ बनतात.
👭मुलींबद्दलचा संशय , गैरसमज ,राग, खोटेपणाचा आरोप टाळणे .
🔷घराबाबत 🔷
👭 मुलींना समतोल व सकस आहार देणे. शारिरीक स्वच्छतेविषयी आग्रह धरणे .
👭वेळेच्या योग्य उपयोगावर देखरेख ठेवणे .
👭 मुलींसाठी घरामधे मनमोकळे वातावरण असावे , शाळा , शिक्षक , अभ्यास इत्यादी विषयांवर खूली चर्चा करून मुलींना प्रोत्साहन द्यावे .
👭 मुलींची उपजत आवड लक्षात घेऊन छंद जोपासण्यास मदत करावी.
👭 दुरदर्शन वरील कार्यक्रम पाहण्या संबंधीचे मार्गदर्शन करावे. पालकांनी ही सर्व बंधने पाळावीत .

 🔷पालकांनी मुलींचे मित्र व मार्गदर्शक बनून
मुलींच्या शिक्षणात आपली भुमिका पार पाडावी व तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा. जेणेकरून पर्यायाने समाजाचा व राष्ट्राचा विकास साधला जाईल.🔷




👭👭👭👭👭👭👭👭👭




ज्योती बोंदरे, प्राथमिक शिक्षिका, नागपूर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🎯🎯 मुलींच्या शिक्षणात पालकाची भूमिका 🎯🎯


भारताची जगात एक वेगळेपण
असलेला सांस्कृतिक देश म्हणुन ओळख आहे; आज नाही तर फार पूर्वीपासूनच .
आर्यामध्ये पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था होती तरीही स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. त्यावेळी लोपमुद्रा, गार्गी, घोषा, अपाला इत्यादी विदुषी स्त्रिया होत्या.
पण नंतरच्या काळात धार्मिक व
शिक्षण क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी झाली व स्त्रियांची
स्थिति खालावली.
भारतात ज्यावेळी स्त्रियांना चूल व मुल शिवाय बाहेर पडायची
परवानगी नव्हती त्याच काळात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे जोडप देवदूताप्रमाणे लोकांचा रोष पत्करून शिक्षण क्षेत्रात जोमाने कार्याला लागले. लोकांनी काही सुखासुखी हे कार्य होऊ दिले नाही; कुणी शेण  फेकले तर कुणी चिखल सुद्धा फेकले पण शिक्षण हे जणू त्यांच्या रक्तातच होत. एवढं होऊन ही त्यांनी आपल कार्यात खंड पडू दिले नाही तर उलट जोमाने सुरू ठेवले.
म्हणजे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सूर्योदय  झाला होता असे म्हणायला काही हरकत नाही.
पण आज जगाची बदलती परिस्थिती पाहता आपण मुलींच्या शिक्षणात पालक म्हणून कितपत योगदान देतो हे
पाहणे महत्त्वाचे ठरते.
कारण आज भारतात मुलीचे शिक्षण पूर्ण न होण्याची काही कारणे आहेत.
पाहिले म्हणजे मुलीचे शिक्षण एवढे महत्त्वाचे वाटत नाही किंवा महत्त्व देत नाहीत.
मुलगी शिक्षण घेवून काय करणार, ती 10 वीच्या वर्गात जाण्याच्या अगोदरच बापाला तिच्या शिक्षणाची नाही तर लग्नाची चिंता लागते.
एक मुलगी शिकली तर तिच्या मुळे पूर्ण कुटुंब सुधारते, सुशिक्षित  होते.
घरात जुन्या चालीरीतींप्रमाणे  वातावरण ठेवले जाते. मुलाना  शिक्षणासाठी बाहेरगावी जाता येते पण मुलीना तशी परवानगी
मिळत नाही.
तिच्यासाठी घरात मोकळे वातावरण नसते एका चौकटीत
तिला वावरावे लागते. आज तसे  पाहिले  तर जवळ जवळ सर्वच  क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत.
मुलींच्या प्रगतीच्या संदर्भातील
बातम्या ऐकून, प्रगती पाहून सुद्धा पालकांच्या मनातील न्यूनगंड दूर होत नाही याला दुर्दैव म्हणावे लागेल.
राजमाता जिजाऊ, रणरागिनी राणी लक्ष्मीबाई, वयाच्या 9 व्या
वर्षापासून मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार
करणाऱ्या अहिल्याबाई होळकर
या एक आदर्श राज्यकर्त्या स्त्रिया होत्या. त्या तशा काळात
त्यांना कुणीतरी आधार दिला मार्गदर्शन केल म्हणून आज त्या
आपल्यासाठी आदर्श उदाहरण  आहेत.
आज आपल्या पाल्यांना मार्गदर्शनाची, आधाराची, त्यांना समजून घेण्याची, आदर्श उदाहरण देऊन त्यांचे मनोबल खंबीर करण्याची गरज आहे.
आज विविध क्षेत्रात भारतीय स्त्रिया आघाडीवर आहेत. जसे की चंद्रा नुई, सी ई ओ पेप्सिको,
किरण बेदी पहिली महिला आई पि एस, मायावती माजी मुख्यमंत्री उत्तरप्रदेश, जयललिता विद्यमान मुख्यमंत्री  तमिळनाडु, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,..........
अशी बरीच उदाहरण आहेत  पालकांनी (आपण सुद्धा लेख वाचनारा प्रत्येक जण) यातून बोध घेवून आपल्या पाल्यांसाठी
त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी

सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले तर एक उच्च दर्जाची संस्कारीत, आदर्श जीवन  जगणारी पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही.
     
            धन्यवाद....!

👤 बाबाराव रा. पडलवार
      ता. मुखेड जि. नांदेड


शिक्षण म्हणजे मुल स्वतः शिकले पाहिजे .

आपण बलजबरीने आपले विचार मुलीच्या मनावर लादु नये

पालकाने एक मार्गदर्शक म्हणून भुमिका बजावली पाहिजे.


मुलगी शिकत असताना तीला तीच्या वयानुरुप मित्र मैत्रीणी सोबत आपले मन मोकळे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे




आपण समाजाचे देणे लागतो याची जान करुन देने
तीच्या आरोग्याची काळजी
तिच्यावर करावयाचे संस्कार



गजानन सोळंके परभणी

🌹मुलीच्या शिक्षणात पालकांची भूमिका🌹
 मित्रांनो, कोणत्याच पालकाला वाटत नाही की आपल्या मुलीने न शिकावे उलट मुलगी स्वतःच्याच पायावर उभी कशी राहील याकडेच पालकाचे लक्ष राहते. आज समाजात जी थोडीफार स्री पुरूष समानता दिसतेय ती फक्त पालकांनी आपल्या मुलीला योग्य शिक्षण देऊन स्वतःच्याच पायावर उभी केल्यामुळे दिसत आहे.असे मला वाटते .आपल्या समाजात 3500 जाती आहेत काही जाती अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी तर मुलीचे लग्न हीच मोठी जबाबदारी असते व ते दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात मग्न असतात.तरीदेखील आता बरेचसे पालक शिक्षणाप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा मुलीचाच आहे .

पंकज भदाणे नंदुरबार


📚 विचारधारा भाग 2 📚
🙍 मुलींच्या शिक्षणात पालकांची  भूमिका🙍

      विषय खुप साधा  व सोपा वाटतो पण खरच खुप विचार करायला लावणारा की  "मुलींच्या शिक्षणात पालकांची भूमिका"!!!

 जिच्या  जन्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो "ती" च्या शिक्षणाचा विचार तर खुप दूर राहिला. "नकोशी" अशी '"ती"....तिला काय शिकवणार हा समाज ????
       आज काळ थोडा बदलला  आहे (?), असे जरी असले तरी मुलींच्या शिक्षणाबाबत ची उदासीनता तितक्या प्रमाणात कमी झाली असे नाही. मुलभुत अधिकाराच्या नावाखाली  मुलींना प्राथमिक शिक्षण मिळते पण पुढे काय ?? तिच्या शिक्षणविषयी आवडीचा विचार करणारे फार कमी आढ़ळतील. याला कारण केवळ पालकांची उदासीनता नाही तर संपूर्ण समाजाची उदासीनता म्हणणे उचित ठरावे.
       ज्या प्रमाणे समाजात विविध घटना घड़तात , तसेच समाजाची मुलीबाबतची  संकुचित विचार प्रवृती ही बदलत नाही तो पर्यंत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग हा खड़तरच राहील असे मला वाटते. मुलींच्य्या शिक्षणात पालकांबरोबर  समाजाची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे .समाजातील घडमोडीचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनवर होत असतो , बहुतेक त्यामुळेच की काय मुलींच्य्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असवा.
त्याच बरोबर आपली परंपरा, पालकांची आर्थिक परिस्थिती ही देखील महत्वाची कारणे आहेतच "ती" च्या शिक्षणात अडथळा निर्माण करणारी..
      पण मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी वयाची मर्यादा असावी ???? त्या लग्नानंतर शिकु शकत नाहीत का ?  जर महात्मा ज्योतिबा फूलेनी त्यांच्या पत्नीला शिकवले व त्या "सावित्रीबाई" देशाच्या पहिल्या शिक्षिका ठरल्या ... त्या प्रमाणे समाजात अजुन ज्योतिबा फुले निर्माण का नाही होत ? मुलींच्या  शिक्षणात पालकांची भूमिका फार महत्वाची आहेच पण जर आजच्या काळात त्याना आपले भवितव्य घड़वायचे असेल तर त्याना त्यांच्या जोड़ीदाराची देखील "साथ" मिळणे तितकेच महत्वाचे वाटते...


सौ.वैशाली रविंद्र गर्जेपालवे
D.ed,B.A,B.ed,M.A,B.sc(2 nd year)*
शहापुर,ठाणे
 
    शेवटी पद्व्या लिहिन्याचा एकच हेतु की  मी लग्नान्तर अजुन शिकते त्या प्रमाणे आपण हि आपल्या जोडीदाराच्या शिक्षनाच्या आवडीचा जरूर विचार करवा. तरच बहुतेक  आपण  "ती" च्या शिक्षणात केवळ पालकांची भूमिका महत्वाची नसून आपण ही थोडा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करावा अशी अभिलाषा!!!!!
🙏🏻धन्यवाद🙏🏻

No comments:

Post a Comment